बिहार निवडणुकीत AI Generated व्हिडिओ वापरता येणार नाही, निवडणूक आयोगाचे आदेश
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकांदरम्यान Artificial Intelligence ने तयार केलेल्या व्हिडिओंच्या वापरावर बंदी घातली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही उमेदवाराला आपल्या विरोधकांविरुद्ध प्रचार करण्यासाठी AI व्हिडिओ कोणत्याही स्वरूपात वापरण्याची परवानगी राहणार नाही. आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की कोणताही उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रचारासाठी कोणत्याही प्रकारचा AI व्हिडिओ वापरू शकणार नाही,” तसेच हे निर्देश सर्व […]
जातीयवादावला कंटाळून हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांनी आत्महत्या केली होती. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका केली आहे. भाजप आणि संघाच्या द्वेषपूर्ण आणि मनुवादी विचारसरणीने समाजात विष पसरवले आहे असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. […]
ICC Women’s World Cup मध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये विशाखापट्टणम येथे सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भंबेरी उडवली होती. 100 धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ तर 153 वर 7 विकेट पडल्या होत्या. या कठीण परिस्थितीत रिचा घोषणे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देत विस्फोटक फलंदाजी केली आणि […]
पश्चिम बंगालमध्ये SIR लागू होऊ देणार नाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे केंद्र सरकारला आव्हान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजनवर केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे. बंगालमध्ये SIR लागू होऊ देणार नाही. पश्चिम बंगाल वेगळा आहे. SIR संदर्भातील चर्चांपासून बंगालला जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे. अधिकाऱ्यांना बैठकींसाठी बोलावून धमकावले जात आहे असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जींनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना आव्हान देत म्हटले, […]
Ratnagiri News –जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला
रत्नागिरी जिल्हापरिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणासाठी सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सोडत निघणार आहे. तसेच ९ पंचायत समित्यांची सोडत त्याच पंचायत समितीमध्ये होणार आहे. पंचायत समिती आरक्षण सोडतीच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी तहसिल कार्यालय इमारतीत जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सभा घेण्यात येणार आहे. सोडतीचे ठिकाण […]
Ahilyanagar News –श्री साईबाबांच्या चरणी भक्ताने 74 लाखांचे सुवर्ण ताट अर्पन केलं
श्री साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे. याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक श्री साईबाबांना विविध दान अर्पण करत असतात. अशाच एका साईभक्ताने आज (09 ऑक्टोबर 2025) 74 लाख 49 हजार 393 रुपये किंमतीचे सुवर्ण ताट साईंच्या चरणी अर्पण केलं आहे. ठाण्यातील हीर रिअल्टी व्हेंचर प्रा.लि.चे साईभक्त धरम कटारिया यांनी श्री साईचरणी 660 ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण […]
मुशीर खानवर बॅट उगारल्याने पृथ्वी शॉवर कारवाई होणार? माजी क्रिकेटपटूच्या हाती निर्णय
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यामध्ये तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. हा सामना अनिर्णीत सुटला मात्र, पृथ्वी शॉ आणि मुशीर खानमुळे हा सामना सध्या चर्चेत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वी शॉ (181) आणि अर्शिन कुलकर्णीने (186) दमदार फलंदाजी केली. पृथ्वी शॉ ला मुशीर खानने बाद केले आणि स्टेडियमवर दंगा […]
तुळजापूर पं स सभापती पद सर्वसाधारण वर्गासाठी खुले
तुळजापूर (प्रतिनिधी) -पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी सुटल्याने तालुक्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या मंडळींनी निवडणूक लढविण्याचीतयारी सुरू केली आहे. आगामी निवडणूक चुरशीची आणि रोमहर्षक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुंबई येथे काल राज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षण सोडती नंतर गुरुवारी धाराशिव येथे सभापती पदाचे आरक्षण प्रक्रिया संपन्न झाली यात तुळजापूर पंचायतसमिती सभापती पद हे सर्वसाधारण गटासाठी खुले राहिले. यामुळे तालुक्यातील अनेक दिग्गज पुन्हा एकदा राजकीय रंगमंचावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.या तुळजापूर पंचायत समिती पुर्वी काँग्रेस ताब्यात होती राज्यात सत्तांतर होताच येथे सत्तांतर होवुन ही पंचायतसमिती भाजप आराणाजगजितसिंहपाटील यांच्या ताब्यात गेली आता पुन्हा ही पंचायत समिती कुणाचा ताब्यात जाणार हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.सदरील पंचायत समिती सभापती पद खुल्या गटासाठी सुटल्याने या निवडणुकीकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे.
वाणेवाडी येथे पारंपारिक बियाणे संवर्धन व नैसर्गिक शेतीवर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
तेर (प्रतिनिधी) बायफ संस्था आणि UNGC यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथे पारंपारिक शेती, गावरान बियाणे संवर्धन आणि भविष्यातील शेतीची दिशा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने शेतकऱी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बायफ संस्थेबद्दल तसेच संस्थेचे ग्रामीण भागातील कार्य आणि धाराशिव जिल्ह्यातील मागील दहा वर्षांतील प्रगती याविषयी प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.यानंतर डॉ. संतोष एकशिंगे यांनी सुरु होणाऱ्या नवीन प्रकल्पाची माहिती दिली तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे महत्त्व, गावरान बियाण्यांचे संवर्धन आणि या पद्धतीचा मानवी आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान जुन्या वाणांचे बी संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची नोंद घेण्यात आली. यावेळी महेश जमाले यांच्या नैसर्गिक शेतीविषयक अनुभवांवर आधारित TISS (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला व्हिडिओ शेतकऱ्यांना दाखवण्यात आला.या चर्चासत्रात पारंपारिक शेतीतील अडचणी, गावरान बियाण्यांचे संवर्धन, उपाययोजना आणि टिकाऊ शेतीची दिशा या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.कार्यक्रमासाठी बायफ संस्थेचे अधिकारी डॉ. संतोष एकशिंगे, डॉ. आतूल मुळे, डॉ. किशोर कदम तसेच TISS चे विद्यार्थी उपस्थित होते
वाचन संस्कृती वाढवावी- प्रा.राजा जगताप
धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा महाविद्यालय, धाराशिव येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. राजा जगताप (मराठी विभाग प्रमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव ) यांनी “मराठी भाषा: प्राचीनत्व व वर्तमान परिस्थिती” या विषयावर बोतलतांना पुस्तके मस्तकं घडवतात ,अनुभव देतात,साहित्य वाचनातूनच वेगवेगळे अनुभव मिळतात त्यासाठी व मराठीचे संवर्धन करण्यासाठी वाचन संस्कृती वाढवावी असे प्रतिपादन केले आहे. अत्यंत सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वल करून करण्यात आली. अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त महाविद्यालयामध्ये मराठी विभागातर्फे निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, तसेच विविध उपक्रम राबवण्यात आले. प्रा. राजा जगताप पुढे बोलताना म्हणाले की, मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास अफाट आहे. मराठी भाषेला वैभवशाली परंपरा आहे. केवळ भाषा संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, अस्मितेची व इतिहासाची वाहक आहे.तसेच, सध्याच्या काळात मराठी भाषेला भेडसावणाऱ्या समस्यांवरही त्यांनी भाष्य केले. इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मराठी भाषेचे अवमूल्यन होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मराठी भाषेचा सातत्याने वापर करण्याचे आवाहन केले आणि डिजिटल माध्यमांतही मराठीतून अधिक संवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. मोरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य,डॉ. मोरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या अभिमानासाठी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. अविनाश ताटे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी जे निकष लागतात याची सविस्तर माहिती दिली.प्रमुख उपस्थितीमध्ये क्रीडा विभाग प्रमुख, डॉ. चंद्रजीत जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. अनघा तोडकरी, मराठी विभाग प्रमुख , डॉ. तुळशीराम उकिरडे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मनीषा जांगीड हिने केले, तर आभार कुमारी गायत्री जांगीड हिने मानले. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे रस्ते, बंधारे, पूल, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना पत्राद्वारे सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा आयोजित करून आपल्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा, तसेच दुरुस्तीकरिता आवश्यक कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून तसा ठराव मंजूर करून घ्यावा अशी मागणी केली आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी आमदार पाटील यांना मंगळवारी ग्रामसभा घेण्याबाबत सूचना देणार असल्याचे म्हटले आहे.यासोबतच ग्रामसभेत नुकसानीचे केलेल्या पंचनाम्याचे चावडीवर वाचन करण्याची मागणी केली आहे,जेणेकरून सर्व ग्रामस्थांना नुकसानीचा व पुढील कामकाजाचा पारदर्शक आढावा घेता येईल. अतिवृष्टीमुळे गावागावातील पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रत्येक गावाने आपले प्रस्ताव प्राधान्यक्रमानुसार सादर करणे गरजेचे आहे.नुकसानीचे पंचनाम्याचे जाहीर वाचन केल्यास या प्रक्रियेत पारदर्शकता राहील.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी तातडीने ग्रामसभा घेऊन आवश्यक ठराव मंजूर करावेत व जिल्हा प्रशासनाला पाठवावेत असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
पंचनाम्याच्या यादीवरून वाद पेटला
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील साडेसांगवी येथे प्रशासन व शेतकरी यांच्यातील तणाव पुन्हा उफाळला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांच्या याद्या दाखवण्याच्या मागणीवरून ग्रामसेवक व शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी बालाजी देवकते हे आपल्या घराच्या पडझडीबाबत पंचनाम्याची यादी पाहण्यासाठी पंचायत समिती, भूम येथे आले होते. त्यावेळी साडेसांगवी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक पवार यांना त्यांनी संबंधित यादी दाखवण्याची विनंती केली. या साध्या मागणीवर ग्रामसेवक भडकले व “तुमच्या गावाला घोडा लावतो” अशा अशोभनीय भाषेचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ शेतकऱ्याने मोबाईलवर रेकॉर्ड केला. याचाच राग मनात धरून ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या आवारातच शेतकऱ्यावर धावून जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असताना अधिकारीच शेतकऱ्यांवर हात उचलण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शेतकरी पुत्र भगवान बांगर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, “अशा मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे,” अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे दिवसभर पंचायत समितीच्या आवारात तीव्र चर्चेला ऊत आला होता.
Ratnagiri News – शिरगांव-तळसर गावच्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व
सह्याद्री व्याघ प्रकल्पास लागून असलेल्या शिरगांव-तळसर गावांच्या सीमेवरील जंगलात पट्टेरी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असता वनविभागाने जाऊन पाहणी केल्यानंतर तेथे वाघाच्या पंजाचे ठसेही सापडले त्यानंतर जिल्हा वनविभाग सतर्क झाला. 5 ऑक्टोबरला सायंकाळी पथकाने घटनास्थळी जाऊन ठसे मिळालेल्या ठिकाणी प्लास्टर कास्टींगसह या परिसरात चार ट्रॅप कॅमेरे जंगलात बसवले आहेत. प्रथमदर्शनी वाघ असल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला […]
जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपावर वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध
धाराशिव (प्रतिनिधी)- निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही वीज कंपन्यात अनेक पद्धतीने सुरु असलेले खाजगीकरण, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खाजगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुर्नरचना लागू करणे, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर क्रमबद्ध आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देऊन गेल्या पंधरा दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीने सुरू केलेली आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी मध्यरात्रीपासून पुढील 72 तासापर्यंत जिल्ह्यातील एक हजार वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. बुधवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर संपातील वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. जानेवारी 2023 पासून ज्वलंत व महत्वाच्या विषयांबाबत कृती समिती सातत्याने शासनाशी व प्रशासनासोबत पत्र व्यवहार करत आहे. 4 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्र्यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन व कृती समिती यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीमध्ये तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरण करण्यात येणार नाही. उलट या कंपन्यांच्या आर्थिक बळकटी करता राज्य शासन 50 हजार कोटींचे अर्थसहाय्य करेल, असे कामगार संघटना प्रतिनिधी बरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मुख्यमंत्री वांच्या आश्वासनानंतर कृती समितीने 4 जानेवारी 2023 रोजीचा संप स्थगित केला होता. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाचा भंग करत तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनाने विविध मार्गान खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. खाजगीकरण व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 ते 11 ऑक्टोबर 2025 असे तीन दिवस संप करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे. शासन, ऊर्जा विभाग व तिन्ही वीज कंपन्यांचे प्रशासन न्यायिक मागण्या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाईलाजाने आंदोलनाचा निर्णय कृती समितीला घ्यावा लागला असल्याने आंदोलनामध्ये राज्यातील 86 हजार कामगार, अधिकारी, अभियंता व कंत्राटी व बाह्य स्तोत्र कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बुधवारच्या आंदोलनात जिल्ह्यातील सात संघटनांचे पदाधिकारी बापू जगदे, बाळकृष्ण डोके, बी. एस. काळे, प्रवीण रत्नपारखी, नवनाथ काकडे, रवींद्र ढेकणे आदींनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान या संपात जिल्ह्यातील सर्व महावितरण कार्यालयातील एकूण एक हजार अधिकारी, अभियंते, कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आहेत प्रलंबित मागण्या महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, महापारेषण कंपनीमधील 200 कोटींच्या वरील प्रकल्पाच्या माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध व महापारेषण कंपनीचा शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यास विरोध, महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण करण्यास विरोध, वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना त्वरित लागू करणे, 7 मे 2021 चा शासन आदेश सुधारित करून मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे तसेच सेवा जेष्ठतेनुसार खुल्या प्रवार्गातूनही पदोन्नती देणे, तिन्ही वीज कंपन्यातील वेतंगत 1 ते 4 स्तरावरील संवर्गनिहाय रिक्त पदे पदोन्नती, सरळसेवा भरती व अंतर्गत भरतीद्वारे एम.एस.ई.बी. होल्डिंग कंपनीच्या मूळ इठ प्रमाणे भरणे, कंत्राटी, बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना नोकरीत समाविष्ट करण्याबावत उपाययोजना करणे, महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुर्नरचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी त्वरित थांबविणे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणेकरीता बैठकीचे आयोजन
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात माहे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकाचे नुकसान प्रचंड झाले आहे. याचबरोबर अनेक गावामध्ये घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची जनावरे पुरामध्ये वाहून गेले असून जिल्हाभरात नद्यांनी पुर पातळी ओलाढल्याने नदीकडेच्या जमीनी खरडुन गेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आढावा बैठकीचे करणेबाबत जिल्हाधिकारी, धाराशिव यांना सुचीत केले आहे. सदर बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, धाराशिव येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी दु. 04.00 वा. घेण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, मृद व जलसंधारण, सर्व तालुका पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे प्रतिनिधी, तसेच संबंधित अधिकारी यांना हजर राहणेबाबत सुचना केल्या आहेत. या बैठकीस पत्रकार या नात्याने पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सतीश कदम महाराज यांचे अखेर उपोषण मागे
भुम (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी दुधाला आधारभूत हमीभाव द्यावा यास इतर मागण्यासाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या हभप सतीश कदम महाराज यांची आणि कृषिमंत्री भरणे यांच्याशी हभप प्रकाश बोधले महाराज यांनी मध्यस्थी करून आज उपोषणाची सांगता झाली. गेल्या सात दिवसापासून भुम येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तालुक्यातील आष्टा येथील हभप सतीश कदम महाराज हे आमरण उपोषणास बसलेले होत. या सात दिवसाच्या कालावधीत राज्यातील शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापासून वारकरी संप्रदायातील हभप विशाल खोले महाराज यांच्यासह अनेक लोकांनी उपोषणास भेटी देऊन महाराजांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता. अखेर आज हभप प्रकाश बोधले महाराज यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याबरोबर दूरध्वनीद्वारे कदम महाराज यांच्याशी चर्चा घडवून आणून या आंदोलनाबाबत मार्ग काढण्याचे ठरवून प्रत्यक्ष बोलून या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री भरणे आणि कदम महाराज यांच्या चर्चा होऊन ज्यावेळी राज्यात कर्जमुक्ती होईल त्यावेळेस सरसकट कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला जाईल व शेतकऱ्याच्या दुधाबाबत हमीभाव निश्चित केला जाईल यासह अनेक मागण्यावरती सकारात्मकपणे चर्चा होऊन या उपोषणास आज सांगता करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे,तहसीलदार जयवंत पाटील,ॲड. विलास पवार, विठ्ठल बाराते,सुशेन जाधव, धनंजय सावंत, अरुण काकडे, तात्यासाहेब अष्टेकर ,राजकुमार घरत ,उद्धव राजे सस्ते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. अखेरीस वारकरी संप्रदाय ची शिष्टाई पुण्याला आली.
नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा स्वबळाचा नारा !
धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवावी असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे करुन निवडणुकीत उतरण्याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागणी केली. धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीच्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.9) शहराध्यक्ष सचिन तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. सदर बैठकीत प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी व चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वबळावर नगरपालिका निवडणुक लढवावी अशी एकत्रीत मागणी केली. तसेच नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. बैठकीस समियोद्दीन मशायक अकबर पठाण, मनोज मुदगल, असद पठाण, मोहन मुंडे, विशाल शिंगाडे, विशाल साखरे, सतीश घोडेराव, सचिन सरवदे, संदीप बनसोडे, विवेक घोगरे, इलियास मुजावर, इफ्तेखार मुजावर, सुहास मेटे, निहाल शेख, सौरभ देशमुख, सलमान शेख, शांताराम लोंढे, विवेक साळवे, नारायण तुरुप, बालाजी वगरे, राजाभाऊ जानराव, अरातफ काजी, सुमित पापडे, डी. के. कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात “फेसा“चे उद्घाटन.
धाराशिव (प्रतिनिधी)- “फेसा“ फर्स्ट इयर स्टुडन्ट इंजिनिअरिंग असोसिएशन अर्थात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विद्यार्थी संघटनेचे नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आले. “फेसा“च्या माध्यमातून वर्षभरात विविध ऍक्टिव्हिटीज चे आयोजन केले जाते. प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांच्या आधारावर त्यांची मुलाखत घेऊन “फेसा“च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. आणि या फर्स्ट इयर इंजीनियरिंग असोसिएशनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा विभाग प्रमुख डॉ.उषा वडणे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, डॉ.पी एस कोल्हे, प्रा. ए झेड पटेल, प्रा. पी एम पवार, डॉ. प्रीती माने, प्रा. डी.एच. निंबाळकर, प्रा. सुनीता गुंजाळ, संजय मैंदर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे म्हणाल्या की “फेसा“चे उद्घाटन करताना दरवर्षी वेगळा अनुभव येतो.परंतु यावर्षीच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत अल्पकाळामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने “फेसा“चे संघटन करून या माध्यमातून पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन करून स्वतःमध्ये असलेल्या बुद्धिमत्तेची आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चुणूक दाखवलेली आहे. या गोष्टीचा आम्हाला नक्कीच अभिमान आणि विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते.आणि विद्यार्थी आपले हेच कौशल्याचे सातत्यपूर्ण चार वर्ष ठेवतील. अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की यावर्षी शिक्षक दिन ते अभियंता दिन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर करून इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वतःकडे लक्ष वेधून घेतले. या प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांचे समाजामध्ये सुद्धा खूप ठिकाणी कौतुक झाले.याचाच परिपाठ म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आपली प्रोजेक्ट आणि मॉडेल प्रेझेंट केले आहेत. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी ए आय वर खूप चांगले प्रोजेक्ट सादर करून अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण मागे नाहीत हे दाखवून दिले. कौशल्यावर आधारित महाविद्यालयामध्ये असलेल्या विविध कोर्सेसचा या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. जेणेकरून सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना तात्काळ मोठ्या पॅकेजच्या संधी सहज मिळू शकतील. यावेळी प्राचार्य डॉ. माने यांनी आवर्जून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटीशी संलग्नित असून दिवाळीनंतर याचे कोर्सेस सुरू होत आहेत.ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद केले.आणि याचाही विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्युरिटी, वुमन्स एम्पॉवरमेंट, होम सेक्युरिटी, ग्रीन सिटी, रिनेव्हेबल एनर्जी, हायड्रोजन सोलर पॅनल, रेन डिटेक्टर अशा नाविन्यपूर्ण विषयांचा पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन साठी अंतर्भाव केला होता. यावेळी तेरणा रेडिओचे संजय मैंदर्गी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत कु. श्वेता माने आणि टीम यांनी म्हटले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले. पोस्टर प्रेसेंटेशन मधून एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन वर प्रोजेक्ट सादर केलेल्या प्राजक्ता कदम आणि तृप्ती गायकवाड ला प्रथम क्रमांक मिळाला. तर इनव्हिसिबल इंजिनसाठी अक्षरा झिरमिरे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वुमन एम्पॉवरमेंट या नावीन्यपूर्ण पोस्टर साठी सय्यद मिसबा ला तृतीय क्रमांक मिळाला. प्रिया ढोबळे, अंजली सानप विद्यार्थ्यांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला. प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेझर अँड सेक्युरिटी सिस्टिम, रॉक अँड पिनियन, जेट इंजिन, लाईट फिडीलिटी हे प्रोजेक्ट सादर केलेले विद्यार्थी रेयान मोमीन , मुसेफ काझी, निकम प्रतीक, शिंदे प्रज्ञा, गवळी सार्थक, रोहिणी सुकाळे, श्रद्धा देटे, दिग्विजय बीटे,गणेश रणखांब , देवराज मेंढे यांना अनुक्रमे बक्षीस मिळाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्ट आणि मॉडेल प्रेझेंटेशन ला परीक्षक म्हणून लाभलेले डॉ. पी. एच. जैन, प्रा. ए.डी बोरकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. रोहिणी बोंडगे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. पोस्टर प्रेझेंटेशन साठी प्रथम वर्ष विभागाचे प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.एम व्ही जोशी, प्रा. डी.डी मुंडे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. आरती शिंदे,सतीश नेपते, प्रद्युम्न वाघमोडे व दिगंबर जाधव यांनी परिश्रम घेतले.
पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईची ‘कनेक्टिव्हीटी’ अधिक वेगवान करणाऱ्या भुयारी मेट्रोच्या (ॲक्वा लाईन) वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी (08 ऑक्टोबर 2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन झालं आणि मेट्रो जनतेच्या सेवेत दाखल झाली. सुंदर स्टेशन, आलिशान कोच पण तिकिटावर मराठी भाषेचा समावेश नाही आणि सूचनाही मराठीमध्ये […]
नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कुस्ती स्पर्धेचे आयोजन
नळदुर्ग (प्रतिनिधी)- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले आणि मुलींच्या कुस्ती स्पर्धा 2025 चे आयोजन दि. 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर मराठवाडा विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ क्रिडा विभागाचे संचालक डॉ.सचिन देशमुख, ऑलंपिक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु. गौरी शिंदे, पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास गावातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केले आहे.
पूरकाळात मुख्यालयी गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.
परंडा (प्रतिनिधी )-धाराशिव- जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुराच्या काळात वर्ग १ आणि वर्ग २ दर्जाचे काही अधिकारी आदेश डावलून मुख्यालयी गैरहजर राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. महापुराच्या काळात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे, जनावरे आणि शेती उद्ध्वस्त झाली असताना काही अधिकारी मात्र आपल्या कर्तव्यस्थळावर अनुपस्थित राहून स्वतःच्या संसारात रमल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापूराच्या काळात जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहावेत,असा आदेश असतानाही काहींनी तो आदेश धाब्यावर बसविला.त्यामुळे अशा कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांचे पुरकाळातील लोकेशन व येडशी-तामलवाडी व औसा रोडवरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी अधिकारी ओळखून कठोरातील कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागणीसंदर्भात वंचित बहुजन आघाडी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष अँड.प्रणित डिकले, जिल्हा संघटक विकास बनसोडे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे आणि किरण धाकतोडे आदींची उपस्थिती होती.वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की, जर दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.
झारापला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा
11 व 12 ऑक्टोबर रोजी आयोजन झाराप / प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील झाराप येथील श्री देवी भावई मित्रमंडळाच्या वतीने तेथीलच श्री देवी भावई मंदिरात 11 व 12 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता श्री ब्राह्मण देव महिला मंडळ (पावशी – मिटक्याचीवाडी ) ,7.45 वाजता गुरुकुल संगीत [...]
सर्वोच्च न्यायालयात एसआयआर प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, “या कार्यवाहींच्या निकालापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे अंतिम यादीतून वगळलेल्या सुमारे 3.66 लाख मतदारांना अपील करण्याचा हक्क सुनिश्चित करणे ही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच निवडणूक […]
रस्ता सत्याग्रह : महामार्ग सुरक्षिततेसाठी तरुणाची पायी लढाई ! चैतन्य पाटीलची अनोखी पदयात्रा
तब्बल 17 वर्षांहून अधिक काळापासूनअपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच 66) अडथळे, रखडलेली कामे, जीवघेणे खड्डे, धोकादायक वळणे आणि अपघातप्रवण ठिकाणे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून शासनापर्यंत खरी वस्तूस्थिती पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तरुण अभियंता चैतन्य पाटील (गाव कासू, पेण) यांनी एक आगळीवेगळी मोहीम (पदयात्रा) सुरू केली आहे. त्यांनी या मोहिमेला अर्थपूर्ण नाव दिलंय ‘रस्ता सत्याग्रह पायी […]
Solapur News : अकरा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी उद्या आरक्षण सोडत
सोलापुरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला सुरुवात सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार १० ऑक्टोबर रोजी सात रस्ता येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी एक वाजता अकरा पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाच्या काळासाठी आरक्षण सोडत निश्चित करण्यात येणार आहे. [...]
एकोणीस वर्षाच्या मुलीच्या पोटात 10 किलोचा ट्युमर, यशस्वी शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी दिले जीवदान
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांनी एका 19 वर्षाच्या मुलीला नवे जीवदान दिले आहे. मुलीच्या पोटातून 10 किलोचा ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात तीस, वीस आणि वीस सेमी माप आणि 10.1 किलोग्रॅम वजनाच्या दुर्लभ रेट्रोपेरिटोनियल ट्युमर वाढत होता. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी आव्हान […]
Solapur News : शिवसेना उबाठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन !
सोलापुरात शिवसेनेचा एल्गार: ओल्या दुष्काळाच्या घोषणेची मागणी सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपयांची मदत राज्य शासनाकडून देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय [...]
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. बिहार, […]
मी आणि माझे सहकारी सुन्न झालो होतो, बुट फेकीच्या प्रकरणावर गवई यांची प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टात झालेल्या बूट प्रकरणानंतर तीन दिवसांनी मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. गुरुवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांनी सांगितले की, “सोमवारी घडलेल्या घटनेमुळे माझे सहकारी आणि मी सुन्न झालो होतो, पण आता आमच्यासाठी ही बाब म्हणजे भूतकाळ आहे. सोमवारी मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर 71 वर्षांच्या एका वकिलाने बूट फेकून […]
आयटीआयमधील अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीने उद्घाटन सोलापूर : वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आव्हान पेलण्यासाठी सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करून अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम अंगीकारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील विजयपूर रोडवरील महात्मा बसवेश्वर आयटीआय महाविद्यालयात [...]
आता भूकंपापासून वाचण्यासाठी गुगलचे नवे फिचर
भूकंपापासून वाचण्यासाठी आता गुगल नवीन फिचर घेऊन येत आहे. एखादा भूकंप येण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांना एक धोक्याची सूचना मिळणार आहे. यामध्ये भूकंप झाल्यास युजर्संना सतर्क करण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. गुगलच्या म्हणणयानुसार हे फिचर 2020 पासून लॉन्च झाले असून त्यांनी 2 हजारहून अधिक भूकंप शोधले आहेत. 2023 मध्ये फिलीपिन्समध्ये 6.7 चा भूकंप शोधला आणि 2.5 […]
Solapur News : कर्जत रेल्वे ट्रॅफिक ब्लॉकचा फटका प्रवाशांना !
रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकावर तब्बल ३० तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक केला जाहीर सोलापूर : मध्य रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकावर १२ ऑक्टोबरला तब्बल ३० तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. यामुळे सोलापूर, मुंबई, पुणे, कोकण आणि दक्षिण भारताच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे. दरम्यान, ११ ते १२ ऑ [...]
ओमराजे निंबाळकर यांनी भूमच्या पोलीस निरीक्षकाकडे मागवला खुलासा
भूम (प्रतिनिधी)- खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भूम येथील उपोषण करते हभप सतीश कदम महाराज यांच्या उपोषण ठिकाणावरून शेतकरी पुत्रांवर गुन्हे का दाखल केले .असे दूरध्वनी वरून पोलीस निरीक्षकांना विचारले असता खासदारांचा फोन कट केला. व कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर न दिल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या अधिकाराचा हक्क भंग केल्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांना पत्राद्वारे खुलासा मागवला आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्याचा सात बारा कोरा करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावा यासाठीतालुक्यातील आष्टा येथील हभप सतीश महाराज कदम हे दि. 03 ऑक्टोंबर पासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येऊ लागल्याने शहरातील माजी नगर अध्यक्ष संजय गाढवे, विजयसिंह थोरात यांच्या सह शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्ता रोको करून आंदोलन केल्याने. पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी जमावबादी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे सदरील आंदोलनकर्त्यांनी केल्याचा ठपका ठेवत दोन माजी नगराध्यक्ष यांच्या सह 70 ते 80 शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद केला होता. . पोलीस निरीक्षकाच्या विरोधात थेट हक्कभंगाचा आरोप भूम चे पोलीस निरीक्षक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना दूरध्वनीद्वारे केलेला प्रकाराबद्दल खासदार यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, आपण एक जबाबदार अधिकारी असताना जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी जाणून बुजून दुर्लक्षित करीत आहात. मी धाराशिव लोकसभेचा सदस्य असल्याने पोलीस निरीक्षकांनी लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्यामुळे माझ्या अधिकार व हक्कांचा भंग झाल्याची भावना झाली आहे. असे पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यावर काय खुलासा करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत अखेर आजजाहीर झाली असून, यावेळी महिला आणि पुरुषांना समान संधी मिळाली आहे. आठपैकी चार पदे महिलांसाठी तर चार पदे पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार कळंब, धाराशिव आणि परंडा या तीन पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) महिलांना आरक्षण मिळाले आहे. तर उमरगा तालुक्यात अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी, लोहारा तालुक्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी, वाशी तालुक्यात ओबीसी महिलांसाठी तर भूम आणि तुळजापूर येथे सर्वसाधारण घटकासाठी सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील राजकारणाला वेग आला असून, संभाव्य उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातही पुढाऱ्यांमध्ये समीकरणे जुळवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. पंचायत समिती सभापती निवडणुकीत या आरक्षणाचा मोठा परिणाम होणार असून, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे स्पष्ट होताच तालुकास्तरावरील लढती रंगणार आहेत.
‘मेस्मा'लागू केल्याने वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने दि. 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन बुधवारी (दि. 8) पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे. संपकाळात नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर रात्रंदिवस सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वाहून गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराला मदत
भूम (प्रतिनिधी)तालुक्यातील देवळाली येथील गावा लगत असलेल्या नदीच्या पात्रात गणेश दगडू तांबे हा युवक वाहून गेला होता. नंतर चार दिवसांनी परंडा तालुकामध्ये त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या कुटुंबाला शासनाच्यावतीने चार लाख रुपयांची मदत त्याचे वडील दगडू तांबे व आई यांच्याकडे देण्यात आली. तालुक्यातील देवळाली येथील युवक दि. 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी देवळाली येथून वस्तीकडे जात असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत पावला. त्यांच्या कुटुंबांना प्रशासनाकडून लगेच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार जयवंत पाटील यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी सचिन फड, प्रवीण शेटे, धनंजय शेटे यांनी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर लगेच भूम येथील तहसील कार्यालयात वडील दगडू तांबे व आई यांच्याकडे धनादेश देण्यात आला. यावेळी सरपंच श्रीपती सोनवणे, सचिन फड उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
नळदुर्ग (प्रतिनिधी)- पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जखनी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर यांच्या सचिव कु. सुजाता चव्हाण व व्यवस्थापक नागेश चव्हाण यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जखनी तांडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन्सिल, शालेय बॅग, स्वप्नात, पेन, खोडरबर, साबण असणपट्ट्या आदी साहित्याची भेट देण्यात आली, त्याच बरोबर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने कु. सुजाता चव्हाण यांचा नवदुर्गा म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामस्थानी त्यांचे आभार मानले.
Solapur News : मंद्रुप येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी…!
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मंद्रुपमध्ये अभिवादन कार्यक्रम by समीर शेख अंत्रोळी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी मशाप्पा कोळी व वासुदेव नाटिकर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय कोळी, उपाध्यक्ष शिलसिद्ध कोळी, माजी अध्यक्ष [...]
गोर बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा
धाराशिव (प्रतिनिधी) - बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे. ते आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसटी ब असे स्वतंत्र आरक्षण देऊन आम्हाला हक्काच्या आरक्षणामध्ये सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी सकल गोर बंजारा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये गोर बंजारा समाजातील युवक, युवती, महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या टोपीवर जै बंजारा, जै सेवालाल, एकच मिशन एसटी आरक्षण तर एकच लाल सेवालाल, एसटी आरक्षण आमच्या हक्काचे आदींसह विविध घोषवाक्य लिहिलेले बॅनर प्रत्येकांनी हातामध्ये घेत प्रचंड घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. तसेच संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा असलेला पांढरा ध्वज या मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरले. विशेष म्हणजे पांढरे वादळ सकाळी 11 वाजल्यापासून शहरात गोंगावत होते. ते वादळ दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट सभेला संबोधित केल्यानंतर शांत झाले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून दिवाळीपूर्वी आरक्षणाची मागणी मान्य करा. अन्यथा गोर बंजारा समाज दिवाळी मुंबईत पाट व बकरी घेऊन येऊन साजरी करत सरकारला सळोकी पळून करून सोडणार असल्याचा थेट सज्जड दम वजा इशारा मार्गदर्शन करताना नेत्यांनी सरकारला दिला. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेली सेंट्रल प्रोव्हुन्से सर (CP) बेरार, नागपूर (MP) च्या शिफारशी समवेत हैदराबादचे गॅझेट लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून वसंतराव नाईक व तत्कालीन शासनाच्या आणि न्या. बापट व अन्य आयोगांचे या जमाती संविधानाच्या अनुच्छेद 342 (2) नुसार अधिसूचित जमाती प्रवर्गामध्ये गोर बंजारा जमातीचा समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्याबाबत नमूद केलेले आहे. तर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.8.2.2016, 13.2.2019, 8.12.2020, 22.12.2020, 7.2. 2023 व लक्षचंडी यज्ञ, पोहरादेवी दि.1.4 2017, नंगारा संग्रहालय पोहरादेवी भूमिपूजन कार्यक्रमात दि.3.12.2018 व 12.2.2023 रोजी दिलेले आश्वासन. तसेच हिंदू बंजारा कुंभ कार्यक्रम दि.30.9.2023 व प्रधानमंत्री नंगारा लोकार्पण कार्यक्रम दि.5.10.2024 या दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बैठक आयोजित करून त्या सोडविण्यास हा प्रयत्न केला गेला मात्र अध्यापित या प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील गोर बंजारा जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा जमात ही विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषय जगत आहे. ते राहत असलेल्या तांड्यात कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्यामुळे तांडेच्या तांडे विकसित नसल्याने ते शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे तांडे ओस पडत आहेत. तसेच 1931 च्या जनगणने वेळी बंजारा तत्सम विमुक्त व भटक्या जमाती 1971 कायद्याने बाधित असल्याने त्यांची सर्वंकष नोंद न झाल्याने पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना मिळाले नाही. सरकारपर्यंत त्यांचा आवाज आज पर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या नावान प्रवर्गात धर्मात आणि राज्यात विभागले गेले. विशेष म्हणजे राष्ट्रीय डी.एन.टी. व एस.टी. आयोग यांच्या प्रसिद्ध सर्व अहवाल व शिफारस मध्ये गोर बंजारा जमातीस अनुसूचित जमाती किंवा जातीत समावेश करण्याच्या अनेक वेळा शिफारशी केलेले आहेत. या जमाती आदिवासी पेक्षाही हलाखीचे जीवन जगत असून त्यांचे जीवनमान उंचावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण तात्काळ लागू करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी दुपारी 12 वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 2 वाजण्याच्या सुमारास धडकला. मोर्चा धडकल्यानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चा कार्यास आमदार राजाभाऊ राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, प्रा ज्योती प्रकाश चव्हाण, अपेक्षा जाधव, प्रा लक्ष्मण चव्हाण, विजय नायक, मोहन राठोड, सुरेश पवार, बाबू राठोड, माजी सभापती प्रकाश चव्हाण, हरिभाऊ जाधव, दिलीप जाधव ,राजाभाऊ राठोड, ऍड राजाभाऊ पवार, शहाजी चव्हाण, बालाजी राठोड, कालिदास चव्हाण, विजय राठोड, वैभव जाधव, जगन्नाथ चव्हाण, योगेश राठोड, संतोष चव्हाण, अविनाश चव्हाण, यशवंत चव्हाण, मोहन राठोड, प्रताप राठोड, शिवाजी राठोड, सचिन जाधव, विलास राठोड, अमृता चव्हाण, वसंत पवार, अतुल राठोड आदींनी संबोधित केले. यावेळी सरकारला धारेवर धरीत दिवाळीपूर्वी बंजारा समाजाला आदिवासींच्या 7 टक्के आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र अनुसूचित जमाती (ब) प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे. जर सरकारने आरक्षण नाही दिले तर हा समाज ऊस तोडायला कोयते घेऊन जाण्याऐवजी कोयते, काळी पाट व बकरे घेऊन मुंबईत येईल आणि त्यानंतर सरकारला सळोकी पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नेत्यांनी दिला. हा मोर्चा बार्शी नाका येथील जिजाऊ चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौक, संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या हातात एकच मिशन एसटी आरक्षण, एकच लाल सेवालाल, वन नरेश, वन आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदींसह विविध घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण परिसर मोर्चेकर यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. मोर्चा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समाजाच्यावतीने खास स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व अल्पोपाराची देखील सुविधा उपलब्ध केली होती. स्वयंसेवकांनी व्यवस्थित नियोजन केल्यामुळे मोर्चात सहभागी झालेले युवक युवती महिला व पुरुषांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागला नाही किंवा कुठल्याही प्रकारची गैरसोय निर्माण झाली नाही.
विद्यार्थ्यांना स्कुल किट वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या अलीकडच्या मुसळधार पावसामुळे परांडा तालुक्यातील देवगाव,वडनेर, वागेगव्हाण व लाहोरा या गावांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली.या पुराच्या पाण्यात घरे, गुरेढोरे, शाळा तसेच विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे साहित्य वाहून गेले. गावोगाव दुःखाचे सावट पसरले होते. अशा कठीण प्रसंगी जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुढे आला व त्यांनी बाधितांना मदतीचा हात दिला.याच पार्श्वभूमीवर,समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) मनेश खंडागळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,‘टच टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प' (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवण्यासाठी व त्यांच्या शिक्षणाला पुनरुज्जीवित करण्यासाठी 386 विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने युक्त ‘स्कूल किट'वाटप करण्यात आले.या वेळी ‘टच'संस्थेचे उमाकांत पांचाळ व सहकाऱ्यांनी लाभार्थी मुलांशी थेट संवाद साधून त्यांना आत्मविश्वासाने आणि नव्या उमेदीनं शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. हा उपक्रम कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज मोटे, टच बालग्राम संस्थेचे विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम डोलारे आणि महारुद्र नक्षे यांच्या सहकार्याने पार पडला. या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवे बळ, आत्मविश्वास आणि आशेची नवी किरण मिळाली. हे केवळ शालेय किटचे वाटप नसून त्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी उभारलेला एक दृढ विश्वासाचा पूल ठरला आहे.
तुळजापूरमध्ये बनावट खत निर्मितीवर कृषि विभागाची धडक कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषि विभाग सतत निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहे.या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे “तेरणा व्हॅली फर्टीलायझर अँण्ड केमिकल“ नावाने बनावट खत निर्मिती कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय भरारी पथकाने धडक तपासणी केली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी महादेव आसलकर यांच्या आदेशानुसार भरारी पथकप्रमुख एन.एम.पाटील (कृषी विकास अधिकारी,जि.प.धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली श्री.प्रविण पाटील, व्ही.एम.भुतेकर, डी.व्ही.मुळे, आबासाहेब देशमुख, दीपक गरगडे, जी.पी.बनसोडे आदी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली.तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने सविस्तर अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.त्यानंतर कृषि आयुक्तालयातील परवाना अधिकारी तथा कृषि संचालक (नि.व.गु.नि.) यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर तेरणा व्हॅली फर्टीलायझर अँण्ड केमिकल या कंपनीचा खत निर्मिती परवाना तसेच खत विक्री परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. यापुढेही अशा कारखान्यांवर व विक्रेत्यांवर तपासणी सुरू राहणार असून,दोषी आढळल्यास बियाणे/खते/किटकनाशके कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी खते,बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फक्त अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच खरेदी करावी.खरेदीवेळी पक्की पावती,ई-पॉस मशीनचे बिल आणि खताच्या बॅगवरील किंमतीशी ताळमेळ तपासावा. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व अंतिम मुदत पाहून घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे टॅग,पिशवी व थोडा नमुना हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावा.शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावणाऱ्या कोणत्याही बनावट व बेकायदेशीर कृत्यांवर विभागाकडून कठोर कारवाई सुरूच राहील,असेही प्रभारी अधिक्षक कृषि अधिकारी एम.के. आसलकर यांनी सांगितले.
परंडा (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) परंडा तालुका तालुक्यातील पुरगृस्त अतिवृष्टी मध्ये झालेल्या गावांमध्ये दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठवलेल्या किटचे वाटप तालुक्यातील शेळगाव, आनाळा, पिठापुरी, खासगाव ,जाकेपिपरी ढगपिपरी,बृम्हगाव ,जवळा (नि.)खासापुरी,आलेश्वरवाडी ,आवरपिंपरीसह अनेक गावांमध्ये किट वाटप करण्यात आले. रिपाइं महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांनी केलेल्या वंचीत कुंटूंबाना किट मिळत नसल्याने अंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, आय टी शेल जिल्हाअध्यक्ष आकाश बनसोडे, माजी ता.अध्यक्ष फकिरा दादा, सुरवसे बाबा, गायकवाड जयराम,साळवे बापू हावळे उत्तम ओव्हाळ, संजिवन भोसले, दिपक ठोसर, भास्कर ओव्हाळ ,लालासाहेब भालेराव, रामा ओव्हाळ, धनाजी यसवद, लझ्मन सरवदे आदीसह मोठ्या प्रमाणात गरजूना किट वाटपात उपस्थित होते.
धाराशिव (प्रतिनिधी)- भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कार्यालयीन कामकाज सुरू असताना झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात हल्लेखोर वकील राकेश किशोर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानवी हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांनी केली आहे. या संदर्भात कैलास पवार यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुख पदावर असलेल्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न हा न्यायसंस्थेवरच झालेला गंभीर आघात आहे. या कृत्याबद्दल हल्लेखोर वकील राकेश किशोर यांचा वकिली परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, तसेच त्याच्याशी संबंधित सनातन संघटनेवर बंदी घालण्यात यावी.”संघटनेच्या प्रतिनिधींनी असेही नमूद केले की, अशा प्रकारच्या घटनांमुळे देशातील न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होतो. त्यामुळे शासनाने तातडीने कठोर भूमिका घेत दोषींवर देशद्रोह व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी. “सरन्यायाधीशांवरील हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे तर लोकशाहीच्या मूलभूत स्तंभावर झालेला हल्ला आहे. दोषींना कठोर शिक्षा न दिल्यास भविष्यात असे प्रकार वाढतील.” या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा कार्याध्यक्ष खालील पटेल, आर.पी.आय. (खरात गट) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, अरुणकुमार माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजयकुमार गायकवाड, आणि सुग्रीव कांबळे यांच्या सह्या आहेत.संघटनेने शासनाला आवाहन केले आहे की, न्यायसंस्थेवरील हल्ला हा राष्ट्रविरोधी कृत्य ठरतो, त्यामुळे दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून सनातन संघटनेवर बंदी व आरोपीचा वकिली परवाना कायम रद्द करण्यात यावा.
तळवडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
न्हावेली /वार्ताहर गुरुवर्य बी.एस.नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या इयत्ता सातवीतील पियुष संजय परब तसेच आठवीतील गणेश विशाल परब या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या दोघांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.भारत क्लब ॲकडमी सावंतवाडी येथे [...]
फर्रुखाबादमध्ये विमान दुर्घटना टळली, धावपट्टी सोडून विमान झुडपात घुसले
उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात विमान दुर्घटना घडली आहे. एक खासगी विमान टेकऑफ दरम्यान धावपट्टीवरुन घसरले आणि झुडपात आदळले. ही घटना आज 9 ऑक्टोबर रोजी फर्रुखाबादमधील नंदन एअरस्ट्रिपवर घडली. ही एक छोटी एअरस्ट्रिप आहे जी प्रामुख्याने खाजगी आणि प्रशिक्षण उड्डाणांसाठी वापरली जाते. या अपघातात विमानाचे किरकोळ नुकसान झाले, परंतु पायलट आणि प्रवासी दोघेही सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. […]
Video –पंतप्रधानांना राज्यात हवाई पाहणी करायलाही जमले नाही –प्रियंका जोशी
मराठवाड्यात पुरामुळे शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावलं आहे. त्यावर सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यावरून युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी सरकारवर टीका केली आहे.
Satara News : कापिल गावात बोगस मतदानाचा आरोप ; ग्रामस्थांचे तीव्र धरणे आंदोलन ..!
कापिल गावात बनावट मतदारांविरोधात ग्रामस्थ आक्रमक सातारा : 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कापिल गावात बोगस मतदानाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे! गावात वास्तव्यास नसलेल्या काही लोकांनी कापिल गावाच्या पत्त्यावर बनावट आधार कार्ड तयार करून मतदान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या गंभीर प्रकरणावर आज ग्रामस्थांनी एकत्र येत धरणे आंदोलन छेडले आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, साताऱ्यातील [...]
Video –आनंदाचा शिधा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलाच नाही
आनंदाचा शिधा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलाच नाही, तुम्ही आणि तुमचं ट्रिपल इंजिन सरकार नेमकं करतंय काय? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल.
आचरा येथे पिंपळ कोसळल्याने विद्युत वाहिन्या, दुचाकीचे नुकसान
आचरा प्रतिनिधी (फोटो परेश सावंत) आचरा देऊळवाडी येथे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेला महाकाय पिंपळवृक्ष अर्धवट मोडून रात्रीच्या सुमारास रस्त्यावर कोसळला. यात मोठया प्रमाणात विद्युत वाहिन्या तुटून जमीनदोस्त झाल्या. रस्त्यालगत उभी करून ठेवण्यात आलेली दुचाकी कोसळलेल्या वृक्षाखाली सापडल्याने नुकसान झाले. आचरा रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच दिवसा भाविक, स्थानिक ग्रामस्थ यांची रहदारी असते . वृक्ष [...]
Video –उद्धव ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे यांचं खणखणीत भाषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शिवसेना पक्षाचे राज्य संघटक वसंत मोरे यांनी त्यांच्यासमोर खणखणीत भाषण केले.
Satara News : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी रोपांची देशभरात मोठी मागणी ; शेतकऱ्यांना लाखोंचा नफा !
महाबळेश्वर जावळी वाई तालुक्याची स्ट्रॉबेरी रोपे निघाली परराज्यात ! by इम्तियाज मुजावर सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई आणि जावळी तालुक्यांतील सुपीक माती आणि थंड हवामान स्ट्रॉबेरी लागवडीसाठी वरदान ठरले आहे. केवळ फळ उत्पादनापुरते न थांबता येथील शेतकऱ्यांनी [...]
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधांपेक्षा हे 5 पदार्थ अधिक प्रभावी आहेत, वाचा
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात आहार महत्वाची भूमिका बजावतो. नैसर्गिक पदार्थांमध्ये असे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराचे रोगांपासून संरक्षण करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. बटाटा नवीन आहे की जुना कसा ओळखाल? नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ संत्री […]
वाडा तालुक्यातील आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून जीवन संपविले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे. देविदास परशुराम नवले( 15)इयत्ता दहावी व मनोज सिताराम वड (14) इयत्ता नववी अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून […]
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर यांनी ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना […]
नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याचा भाजप-अदानींचा डाव! संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. मात्र दि. बा. पाटील यांच्या नावाला भाजप आणि गौतम अदानी यांनी विरोध केला आहे. जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जावे आणि विमानतळाला त्यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपकडून होत आहे. याबाबत अदानी आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या […]
बाजारात असलेला बनावट लसूण कसा ओळखाल?
आपले स्वयंपाकघर हे लसणाशिवाय अपूर्ण आहे. परंतु सध्याच्या घडीला बाजारात मिळणारा लसूण हा भेसळयूक्त असल्यामुळे, याचा आपल्या आरोग्यावरही खूप परीणाम होतो. अस्सल लसूण हा हलका पिवळा किंवा पांढरा रंगाचा असतो. तुम्हाला बाजारात दिसणारा लसूण हा थोडा पांढरा किंवा पिवळा दिसला तर तो लसूण खरा आहे. दुसरीकडे, बनावट लसूण अधिक पांढरा आणि चमकदार दिसतो. अस्सल लसूण […]
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांची सदस्यता रद्द
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी आता वकील राकेश किशोर तिवारी यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे मुख्य न्यायाधीश (SCBA) भूषण रामकृष्ण यांनी हा निर्णय घेतला आहे. वकील राकेश किशोर हे 2011 पासून सुप्रीम कोर्टाच्या बार […]
Satara Crime : वाई तालुक्यातील तरुणाचा महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल; गुन्हा दाखल
13 पेक्षा अधिक महिलांना अश्लील कॉल; वाई तालुक्यातील व्यक्तीविरोधात कारवाई सातारा : वाई तालुक्यातील एका गावात चक्क एका व्यक्तीने गावातील तब्बल १३ हुन अधिक महिलांना मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि घटना दि. २५ सप्टेंबर [...]
नैराश्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण आणि चिंता सामान्य आहे, परंतु हा ताण हळूहळू नैराश्यात बदलू शकतो. जगभरातील लाखो लोक या स्थितीचा अनुभव घेत आहेत. ही समस्या कोणालाही भेडसावू शकते. जगभरातील लाखो लोक दरवर्षी नैराश्याशी झुंजतात. पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा WHO च्या अहवालानुसार, २८० दशलक्षाहून अधिक लोक या समस्येचा सामना […]
Sangli Crime : अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार, दहा वर्षे सक्तमजुरी
महाविद्यालयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरणी आरोपी दोषी; न्यायालयाकडून शिक्षा सांगली : अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी राहुल मानसिंग चव्हाण (रा. झेरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) याला दहा वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी [...]
पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा
पपईचे झाड आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप उपयुक्त मानले जाते. त्याची फळे आणि पाने मानवी आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून रोज पपईचा वापर आहारात करायलाच हवा. दैनंदिन जीवनात पपईचा समावेश केल्याने, अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. पपईच्या फळांचा आणि पानांचा असाच उल्लेख आयुर्वेदातही आढळतो. फक्त कारलेच नाही तर, कारल्याच्या वेलाची पानेही शुगरवर आहेत सर्वात बेस्ट, वाचा […]
जामसंडेत 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त, गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
सिंधूदूर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे बाजारपेठयेथील अनिकेत लाड यांच्या किराणा दुकानावर छापा टाकून 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.25 वा.सुमारास केली.या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी 5.25 वा.सुमारास जामसंडे […]
दरोडेखोरांना बेळगावपर्यंत सोडलेल्या दोन गाड्या जप्त
जुने गोवेतील टॅक्सीचालकाची पोलिसांकडून चौकशी : टॅक्सीचालकानेपणजीहूनजुनेगोवे, बेळगावलासोडले म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे डॉ. स्व. मोहन घाणेकर यांच्या बंगल्यात मंगळवारी पहाटे पडलेल्या दरोडाप्रकरणी पोलिसांची दोन पथके कर्नाटक व महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहेत. दरोडेखोरांनी पणजीहून जुने गोवे येथे आणि तेथून बेळगावपर्यंत जाण्यासाठी वापरलेल्या जुने गोवेतील टॅक्सीचालकाच्या दोन कार जप्त केल्या आहेत. बुधवारी दुपारी म्हापसा पोलिसस्थानकावर या [...]
गणेशपुरीच्या नागरिकांचे उपअधीक्षकांना निवेदन
म्हापसा : म्हापसा गणेशपुरी येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोड्याचा तपास गतीने सुरू आहे. दरोडेखोरांच्या शोधात पोलिसांची पथके कार्यरत असून दरोडेखोरांना लवकरच गजाआड केले जाईल, असे आश्वासन म्हापसा पोलिसस्थानकाचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी गणेशपुरीतील रहिवाश्यांना दिले आहे. या नागरिकांनी गणेशपुरी परिसरातील गस्त वाढवावी, सुरक्षा व्यवस्था कडक करावी, बस शेड, परिसरात आऊट पोस्ट सुरू करून तेथे [...]
‘माझे घर’ योजनेचे अर्ज सोमवारपासून उपलब्ध
मुख्यमंत्र्यांकडूनअधिकाऱ्यांनामार्गदर्शन पणजी : राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि नुकत्याच गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या ‘माझे घर’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विविध अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. येत्या सोमवारपर्यंत योजनेचे अर्ज लोकांसाठी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्वरी सचिवालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, महसूल सचिव संदीप जॅकीस, [...]
Shirala : शिराळा नगरपंचायत आरक्षण जाहीर; काहींना धक्का, तर काहींचा जल्लोष
शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणूकीसाठी १७ प्रभागमधील आरक्षणामध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती युवकांची झाली असून दोन वर्षांपासून अनेकजण पुर्वीच आरक्षण पुन्हा पडणार नाही. यावेळी निवडणुकीच्या तयारीला लागले होते. परंतु बहुतांश प्रभागात गत पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण पडल्यामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला. बहुतांश दावेदारांच्या दांड्या [...]
दिवाळीच्या पूर्वसंध्येला फातोर्डामध्ये नवा पायंडा
रात्री 12 नंतर कार्यक्रम बंद : विजयसरदेसाईयांचापुढाकार पणजी : दिवाळीच्या पूर्व संध्येला अहोरात्र होणाऱ्या धागडधिंगाण्याला फातोर्ड्याचे आमदार व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी देखील आक्षेप घेतला असून फातोर्डामध्ये एक नवा पायंडा घालत त्यांनी रात्री बारानंतर कार्यक्रम बंद केला जाईल, अशी घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर नरकासुर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर येणाऱ्या पहिल्या [...]
गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम
अमितपाटकरयांच्यावरचकाँग्रेसच्यावरिष्ठनेत्यांचाविश्वास पणजी : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वावरच पूर्ण विश्वास ठेवत आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या सूचना राज्यातील सर्व नेत्यांना दिली आहे. दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा गोव्याचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल तसेच [...]
नवविवाहितेचा खून करून पती फरार
कमलदिन्नीतीलघटना: मृतदेहबेडबॉक्समध्ये बेळगाव : केवळ साडेचार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेचा खून करून तिचा मृतदेह कॉटखालील बेड बॉक्समध्ये ठेवून पती फरारी झाला आहे. मुडलगी तालुक्यातील कमलदिन्नी येथे बुधवारी ही घटना उघडकीस आली असून रात्री उशिरापर्यंत मुडलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. साक्षी आकाश कुंभार (वय 20) रा. कमलदिन्नी असे त्या दुर्दैवी नवविवाहितेचे [...]
मिलिटरीकॅम्पमध्येअधिकाऱ्याच्यागणवेशातवावर बेळगाव : लष्करी गणवेशात वावरणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन मल्लनगौडा बिरादार (वय 40) रा. नालतवाड ता. मुद्देबिहाळ जि. विजापूर असे त्याचे नाव आहे. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मिलिटरी कॅम्प परिसरात हा युवक [...]
बेळगाव-मिरज रेल्वेमार्गाची सरव्यवस्थापकांकडून पाहणी
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक मुकुल सरन माथूर यांनी बुधवारी बेळगाव-मिरज दरम्यानच्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. दुपदरीकरण व विद्युतीकरणानंतर रेल्वेची वाहतूक वाढली असल्याने रेल्वे प्रवास सोयीचा व्हावा, कोठेही कमतरता राहू नये, यासाठी पाहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागीय व्यवस्थापक बेला मीना देखील उपस्थित होत्या. बेळगाव ते मिरज या दरम्यानच्या रेल्वे मार्गासोबत रेल्वे स्थानकांचीही [...]
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदुकीचा परवाना दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत गँगस्टरला शस्त्रपरवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच कारवाई केली […]
विविध खात्यांतील रिक्त जागांवर उमेदवारांची त्वरित नेमणूक व्हावी
बेरोजगारयुवकसंघर्षसमितीबेळगावजिल्हाशाखेच्यावतीनेमुख्यमंत्र्यांनानिवेदन बेळगाव : राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर त्वरित नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवक संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे. शाखेच्या सदस्यांनी बुधवार दि. 8 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये 2.86 लाखांहून जागा रिक्त आहेत. [...]
Health Tips –शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणता काढा घ्यावा? जाणुन घ्या
बदलत्या हवामानाचा मोठ्यांसह लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्यावर परिणाम होतो. थंड वारा, धूळ आणि विषाणूजन्य संसर्ग आपल्याला सहज आजारी पाडू शकतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या सामान्य समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशी काढा […]
Sangli Miraj Dangal I मिरज दंगलप्रकरणी 150 जणांवर गुन्हा
मिरज दंगलप्रकरणी १५० जणांवर गुन्हा; मुख्य आरोपीसह २२ अटकेत मिरज : अपशब्द एका समाजाबद्दल वापरल्याच्या कारणातून दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन जमावाने धुडगुस घातल्याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे १५० हुल्लडबाजांची ओळख पटविली आहे. यातील ३५ जणांची नावे निष्पन्न झाली असून मुख्य संशयितासह [...]
रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत चिमूटभर हिंग खा, तुमच्या शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळतील, वाचा
हिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केवळ चिमूटभर हिंग आपल्या शरीरासाठी वरदानाचे कार्य करतो. पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रित करणे, मासिक पाळीच्या वेदना कमी करणे, श्वसनाच्या समस्यांशी लढणे आणि रक्तातील साखर नियंत्रित करणे. त्यात अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. हळदीचे पाणी की हळदीचे दूध यातील कोणते सर्वात उत्तम, जाणून घ्या हिंग पचनास मदत […]
आता दररोज करता येणार बेळगाव-दिल्ली प्रवास
6 ऑक्टोबरपासूनविमानफेरीपूर्ववत बेळगाव : देशाच्या राजधानीत बेळगावमधून आता दररोज विमान प्रवास करता येणार आहे. मागील काही दिवस आठवड्यातून तीन दिवस असलेली सेवा आता पुन्हा दैनंदिन करण्यात आल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. अवघ्या अडीच तासामध्ये बेळगाव ते दिल्ली असा प्रवास करता येणार असल्याने बेळगावसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्ली गाठता येणार आहे. चार वर्षांपूर्वी बेळगावमधून [...]
मद्यविक्रीत मोठी घट; मात्र महसुलात वाढ
अबकारीखात्याचीअर्धवार्षिकउलाढालीचीआकडेवारी: उत्पादनशुल्कातवाढझाल्यामुळेखपकमी बेळगाव : अबकारी खात्याच्या अर्धवार्षिक उलाढालीच्या आकडेवारीनुसार राज्यातील मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2023-24 च्या तुलनेत मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे मद्याचा खप कमी झाला आहे. मात्र विक्रीत घट झाली असली तरीही दारूचे दर वाढले असल्याने अबकारी खात्याच्या महसुलावर कोणताही परिणाम झाला नाही. राज्य सरकारने पंचहमी योजना लागू केल्यापासून विशेष करून दारूवरील [...]
सरन्यायाधीश भूषण गवईंविरोधात यु्ट्यूबर अजित भारतीचे वादग्रस्त विधान, पोलिसांनी घेतले ताब्यात
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आता युटूबर अजित भारती याने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. यामुळे युट्यूबर अजित भारती याला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. ‘माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’; शूज […]
ऊस दराच्या घोषणेसाठी हारुगेरीत 10 पासून आंदोलन
कर्नाटकराज्यरयतसंघ-हसिरूसेनेचापुढाकार: गळीतहंगाम1 नोव्हेंबरनंतर बेळगाव : यंदा राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरू केला जाणार आहे. याबाबतचा आदेश सरकारने जारी केला असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रतिटन 5500 रुपये (कारखान्यांकडून 3500 आणि सरकारकडून 2000) इतका देण्यात यावा, या मागणीसाठी शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेतर्फे हारुगेरी क्रॉस [...]
Income Tax Raid : कोल्हापुरातील प्रतिष्ठित स्टील व्यावसायिकावर आयकर विभागाची धाड !
या धाडीतून बेहिशोबी मालमता उघडकीस येण्याची शक्यता कोल्हापूर : कोल्हापुरातील एका मोठ्या व प्रतिष्ठित स्टील व्यावसायिकावर बुधवारी आयकर विभागाने धाड टाकली आहे. या धाडीतून बेहिशोबी मालमता उघडकीस येण्याची शक्यता आहे. या स्टील व्यावसायिकाची स्टील फॅक्टरी कोल्हापुरातील गोकुळ शिरगांवसह गोवा येथे आहे. या व्यावसायिकाच्या रमणमळा [...]
महसूलमंत्रीकृष्णभैरेगौडायांचेआश्वासन: उत्तरकर्नाटकातीलचारजिल्ह्यांत7.24 लाखहेक्टरवरपीकहानी बेंगळूर : पुरामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्या खात्यात लवकरात लवकर भरपाई जमा केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिले. उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकातील जिल्ह्यांत सरकारने केलेल्या पीक नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षण आणि भरपाईच्या तपशीलांबाबत बुधवारी कृष्णभैरेगौडा यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. तसेच आतापर्यंत राज्य सरकारने जाहीर झालेल्या [...]
बेंगळूर नगरपालिकांसाठी 50 टक्के महिलांना तिकिटे
उपमुख्यमंत्रीडी. के. शिवकुमारयांचीमाहिती बेंगळूर : ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या (जीबीए) अंतर्गत येणाऱ्या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना दिली जातील. त्यामुळे येत्या काळात बेंगळूरमधील पालिकांमध्ये निम्म्या संख्येने महिला नगरसेवक असतील, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण आणि बेंगळूर राजकीय कृती समितीने (बी.पीएसी) बेंगळूरच्या माऊंट कार्मेल कॉलेजच्या सहकार्याने बुधवारी ‘बेंगळूर विकास आणि [...]
सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकावर हत्तीचा हल्ल्याचा प्रयत्न
बेंगळूर : राज्यात 22 सप्टेंबरपासून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण (जातनिहाय गणती) सुरू आहे. बुधवारी सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून गेलेल्या कोडगू येथील शिक्षकावर हत्तीने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने शिक्षकाने दुचाकी वाटेतच सोडून पळ काढल्याने तो बचावला. कोडगू जिल्ह्याच्या विराजपेठ तालुक्यातील मालदारे गावात ही घटना घडली आहे. गोणिकोप्पलू येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक शिवराम हे बुधवारी सकाळी [...]
Gold Price : सोन्याला झळाळी सव्वा लाखाची
एका दिवसात सोने १९००, तर चांदी ३४०० ने महागली कोल्हापूर : दसऱ्याचा सण संपताच अवघ्या एका आठवड्याच्या आतच सोने दररोजच्या वाढीने सव्वा लाखाच्या पार गेले आहे. बुधवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल ₹१,२६,२०० झाली असून, चांदीचा दरही किलोमागे ₹१,५७,६०० वर पोहोचला आहे. एका दिवसात सोन्यात ₹१,९००, तर चांदीत [...]
मैद्याला स्लो पाॅइजन का म्हटले जाते, वाचा सविस्तर
आजकाल, लोक, विशेषतः तरुण आणि मुले, जंक फूड, स्ट्रीट फूड आणि फास्ट फूडचे इतके व्यसन लागले आहेत की त्यांना दररोज बाहेरून काहीतरी हवे असते. लोक मोमोज, अंडी आणि चिकन रोल, समोसे, पास्ता, पिझ्झा, बर्गर, ब्रेड आणि बरेच काही आवडतात. परंतु हे पदार्थ बनवण्यासाठी मैद्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणूनच मैदा हा आहारातून टाळण्याचा […]
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विदेशात फरार झाला आहे. त्यातच पुणे पोलिसांनी नकार दिलेला असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने नीलेश याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. याच प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला […]
लाच घेताना फौजदाराला रंगेहाथ पकडले, ज्या ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक तेथील कोठडीत मुक्काम
भावाविरुद्ध दाखल असलेल्या शस्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मदत करण्यासाठी आठ हजारांची लाच घेणाऱ्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षक संतोष वसंत राऊत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे या लाचखोर अधिकाऱ्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या आवारातच मंगळवारी रात्री दहा वाजता ही लाच स्वीकारली. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात फौजदार म्हणून रुबाबात फिरला, तेथील कोठडीतच त्याला रात्र काढावी […]
Kolhapur News : महाराष्ट्रातील 200 साखर कारखाने का जोडले जाऊ शकत नाहीत ? : माजी खासदार राजू शेट्टी
एआय शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर करा : राजू शेट्टी कोल्हापूर : कारखान्याच्या फायद्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर नको. शेतकऱ्यांचे हित ही या तंत्रज्ञानामध्ये जपा. या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस उत्पादनामध्ये वाढ होईल. तर ती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. पण त्याचबरोबर कारखानदाराचाही फायदा होणार आहे. या [...]
बेकायदा 27 फ्लेक्सबाजांवर गुन्हे दाखल, बेकायदा फ्लेक्स बॅनर्सवर जोरदार कारवाई
पुणे शहरातील बेकायदा फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत आतापर्यंत 5 हजारांहून अधिक बेकायदा फलक हटविण्यात आले आहेत. 71 प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याचे पत्र स्थानिक पोलिसांना दिले असून, त्यापैकी 27 प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, राजकीय फ्लेक्सबाजीला मूकसंमती देत प्रशासनकेवळ व्यावसायिकांच्या बॅनर्सवरच लक्ष केंद्रित […]