SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

कोफोर्जकडून अमेरिकन आयटी कंपनीचे २.३५ अब्ज डॉलरला अधिग्रहण

मुंबई: एकूण जागतिक स्थितीत आयटी कंपन्यांच्या मार्जिनमध्ये व वाढीत घसरण झाली असताना कोफोर्ज (Coforge) या आयटी सेवा क्षेत्रातील कंपनीने सिलिकॉन व्हॅलीमधील आयटी व ए आय कंपनी असलेल्या 'एन्कोरा (एआय नेटिव) कंपनीचे २.३५ अब्ज डॉलरला अधिग्रहण (Acquisition) केले आहे. कंपनीच्या वर्क फ्लो व्यवस्थापन (Workflow Management) मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व तंत्रज्ञान सेवा पुरविणारी ही कंपनी कंपोझेबल ए आय प्लॅटफॉर्म आहे. या अधिग्रहणाचे मूल्य २.३५ अब्ज डॉलर्स निश्चित झाले आहे ज्यामध्ये १८१५ रुपये प्रति शेअर दराने (सुमारे २१% डायल्यूशन) प्रेफरेंशियल शेअर्सद्वारे इशू केले जाणारे १.८९ अब्ज डॉलर्सचे इक्विटी आणि ५५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज समाविष्ट आहेत असे कंपनीने स्पष्ट केले. याविषयी आयटी कंपनी कोफोर्जने ब्रिज फायनान्सिंग किंवा क्यूआयपी (Quality Institutional Placement QIP) द्वारे संबंधित कंपनीचे कर्ज फेडण्याची योजना आखत असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. यासह अधिग्रहणात उपलब्ध माहितीनुसार, ५५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कोफोर्ज ब्रिज फायनान्सिंग किंवा क्यूआयपी (QIP) द्वारे फेडण्याचीही योजना आखत आहे.या संपूर्ण करारामध्ये, एडव्हेंट इंटरनॅशनल आणि वॉरबर्ग पिंकस यांच्यासह विक्रेते कोफोर्जमध्ये ९.३८ कोटी शेअर्ससह सामील होतील. सध्या या शेअरची किंमत उपलब्ध माहितीनुसार १८१५ प्रति शेअर आहे. ही किंमत एक्सचेंजवरील संबंधित दिवसाच्या १६७३ रूपयांच्या पातळीच्या बंद भावापेक्षा ८.५% अधिक प्रिमियम दरात आहे.कंपनीला या अधिग्रहणानंतर आर्थिक वर्ष २६ मध्ये सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्स वाढीव महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २३ ते आर्थिक वर्ष २६ या काळात सुमारे १३% सीएजीआरने (Compound Annual Growth Rate CAGR) महसूल वाढेल आणि समायोजित एबिटडा मार्जिन (Adjusted EBITDA Margin) १९% पातळीच्या जवळपास असेल असे कंपनीला वाटते दरम्यान अधिग्रहणांनंतर, एकत्रित कंपनी सुमारे १४% एबिट मार्जिनवर कार्यरत राहण्याची अपेक्षा कंपनीने गुंतवणूकदारांच्या बैठकीत व्यक्त केली जात. यासह कोफोर्ज व्यवस्थापनाने कालांतराने प्रति शेअर उत्पन्नात (EPS) वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.या अधिग्रहणामुळे कोफोर्जला २.५ अब्ज डॉलर्सची तंत्रज्ञान सेवा कंपनी बनण्यास मदत होईल, ज्यामध्ये ए आय संबंधित अभियांत्रिकी, डेटा आणि क्लाउड सेवा व्यवसायांचा समावेश असेल. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये २ अब्ज डॉलर्स महसूल मिळवण्याची शक्यता कंपनीला वाटते‌. या अधिग्रहणामुळे कोफोर्जच्या हायटेक आणि आरोग्यसेवा आयटी क्षेत्रातील पोर्टफोलिओत वाढ होण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. सध्या कोफोर्जची २५ देशांमध्ये ३३ जागतिक वितरण (Distribution Network) केंद्रे आहेत.शुक्रवारी संध्याकाळी करारानंतर गुंतवणूकदारांना संबोधित करताना, कोफोर्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक सुधीर सिंह यांनी सांगितले आहे की, एन्कोराच्या समावेशामुळे कोफोर्जला वाढीच्या पुढील टप्प्यात एक फायदा मिळेल, ज्यामध्ये एआय, डेटा आणि क्लाउड सेवांचे वर्चस्व असेल. एन्कोराची (ए आय नेटिव्ह) २०२६ साठी अंदाजित उलाढाल ६०० दशलक्ष डॉलर्स आहे. या कराराच्या घोषणेपूर्वी काल शुक्रवारी कोफोर्जचा शेअर दर ३.७% घसरून १६७३.२५ रुपयांवर बंद झाला होता.या वर्षी इयर टू डेट बेसिसवर (YTD) कंपनीचा शेअर १३% नी घसरला असून शेअर १ महिन्यात १०.५३% घसरला आहे. तर गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ९.२९% घसरण झाली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 5:10 pm

सोलापूरात ‘मविआ’चे जागावाटप ठरले; काँग्रेस मोठा भाऊ, तर शरद पवार गटाला इतक्या जागा, जाणून घ्या

सोलापूर : सोलापुरात महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेस, ठाकरसेना, राष्ट्रवादी(शप), माकप ह्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन जागावाटपाची घोषणा केली आहे. भाजपला रोखण्यासाठी महा विकास आघाडीतील राजकीय पक्ष मनसेसह याठाकाणी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामळे, सोलापुरात भाजप-शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच, आम्ही आप आणि वंचितलाही सोबत येण्याचे […] The post सोलापूरात ‘मविआ’चे जागावाटप ठरले; काँग्रेस मोठा भाऊ, तर शरद पवार गटाला इतक्या जागा, जाणून घ्या appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:51 pm

वाढदिवसाच्या दिवशीच ‘भाईजान’ला कोर्टाचा झटका.! खोट्या सहीमुळे सापडला अडचणीत, न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

Salman Khan | forged signature : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. मात्र, याच आनंदाच्या क्षणी सलमान एका नव्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता ‘बनावट सही’चा गंभीर आरोप झाल्याने राजस्थानमधील कोटा येथील ग्राहक न्यायालयाने सलमानला प्रत्यक्ष न्यायालयात हजर […] The post वाढदिवसाच्या दिवशीच ‘भाईजान’ला कोर्टाचा झटका.! खोट्या सहीमुळे सापडला अडचणीत, न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:47 pm

MS Dhoni : भाईजानच्या पार्टीत कॅप्टन कूलचा जलवा! सलमानच्या ६०व्या बर्थडेला धोनीची हजेरी, VIDEO व्हायरल

MS Dhoni attend Salman Khan Birthday Party : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या दोन वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे झारखंड क्रिकेटला ऐतिहासिक उंचीवर नेण्यामागे त्याचा मोलाचा वाटा असल्याचे समोर आले आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसाच्या पार्टीतील त्याची उपस्थिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमानच्या ‘बर्थडे पार्टी’त […] The post MS Dhoni : भाईजानच्या पार्टीत कॅप्टन कूलचा जलवा! सलमानच्या ६०व्या बर्थडेला धोनीची हजेरी, VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:46 pm

ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन डी. सी. : ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत कार्यरत विमान कंपन्यांची १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. विमान प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक जण वेगवेगळ्या विमानतळांवर अडकून पडले आहेत. सुट्टीत फिरायला जाण्याची योजना आखणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. हिमवादळामुळे उड्डाणे रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी ऐन सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. दुसरीकडे कॅलिफोर्नियातील विनाशकारी पुरामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.देशाच्या मोठ्या भागात डेव्हॉन वादळाने थैमान घातल्याने ईशान्य आणि मध्यपश्चिम भागात जोरदार हिमवृष्टी झाली, तर कॅलिफोर्नियामध्ये विक्रमी पाऊस पडला, त्यामुळे सुट्टीतील प्रवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत विमान कंपन्यांनी १८०२ उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच २२ हजारांपेक्षा जास्त उड्डाणांना विलंब झाला. यामुळे अनेकांचे हाल झाले. अप्पर मिडवेस्ट, ईशान्य आणि मिड-अटलांटिक प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. हिमचटवृष्टी, गारपीट आणि गोठवणारी थंडी यामुळे हवाई प्रवास विस्कळीत झाला. न्यू यॉर्कमधील प्रमुख विमानतळ - जॉन एफ. केनेडी इंटरनॅशनल, नेवार्क लिबर्टी आणि लागार्डिया येथून होणारी विमान वाहतूक पुरती कोलमडली. अनुक्रमे जेटब्लू, डेल्टा एअर लाइन्स, रिपब्लिक एअरवेज आणि अमेरिकन एअरलाइन्स यांनी अनेक उड्डाणे रद्द केली. विमान वाहतूक कोलमडल्यामुळे फटका बसलेल्यांना बदल शुल्क माफ केल्याचे अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि जेटब्लूच्या प्रवक्त्यांनी सांगितले. कंपन्यांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील विविध प्रांतांच्या प्रशासनाने नागरिकांना उड्डाण रद्द झाले अथवा विलंबाने होत असले तरी विमानतळ सोडून इतरत्र जाणे टाळा, असे आवाहन केले आहे. न्यू यॉर्क शहर आणि आसपासच्या भागात प्रति तास एक ते दोन इंच हिमवृष्टीचा अंदाज आहे. अमेरिकेतील काही भागांमध्ये ११ इंचांपर्यंत हिमवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ईशान्य अमेरिकेत हिमवादळाने मोठा तडाखा दिला. कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली, रस्ते पाण्याखाली गेले, भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला. तीन लोकांचा मृत्यू झाला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 4:30 pm

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या, ज्ञान आणि भारताच्या भविष्यातील भूमिकेबाबत मोठं आणि चर्चेत राहणारं विधान केलं आहे. भारताला जागतिक महासत्ता बनायचं असेल, तर देशातील लोकसंख्या, कौशल्य आणि पारंपरिक मूल्यांची योग्य सांगड घालणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले असावीत, असा सल्ला दिला.'इंडियन्स सायन्स काँग्रेस'मध्ये बोलताना नायडू यांनी लोकसंख्येला भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगितलं. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विचारांशी सहमती दर्शवत, जर भारतातील तरुणांची क्षमता योग्य दिशेने आणि राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडली गेली, तर भारताला जगातील सर्वोच्च शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या भाषणात त्यांनी १९६१ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचंही कौतुक केलं. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सभ्यतेचा वारसा जपण्याचं काम हे विद्यापीठ करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची बौद्धिक आणि शास्त्रीय ताकद नवीन नाही, हे सांगताना नायडू यांनी इतिहासातील अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. ४५०० वर्षांपूर्वीची प्रगत नगररचना, तक्षशिला आणि नालंदा यांसारखी विद्यापीठं, गणित, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, अध्यात्म आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्राचीन भारताचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं.आर्थिक भवितव्यभारताच्या आर्थिक भवितव्याबाबत बोलताना नायडू यांनी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच परदेशात कार्यरत असलेल्या भारतीयांच्या उच्च उत्पन्नाकडे लक्ष वेधलं. १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताने घेतलेली झेप पाहता, लवकरच भारत जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०४७ पर्यंत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गंगा–कावेरी नदी जोड प्रकल्पसंसाधन नियोजनावर बोलताना त्यांनी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचं समर्थन केलं. गंगा–कावेरी नदी जोड प्रकल्प हे देशाचं दीर्घकाळाचं स्वप्न असल्याचं सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात जलसुरक्षेला महत्त्व दिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व राज्यांनी परस्पर सहमतीने हा प्रकल्प राबविल्यास शेती, उद्योग आणि एकूणच विकास प्रक्रियेला चालना मिळेल, असंही ते म्हणाले.दरम्यान, लोकसंख्या नियंत्रणावर देशभरात चर्चा सुरू असताना, लोकसंख्या वाढीच्या समर्थनार्थ करण्यात आलेलं हे विधान भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय लाभांश लक्षात घेऊन केल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विकसित भारत २०४७ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुण पिढीची संख्या महत्त्वाची असल्याचं या विधानातून स्पष्ट होत आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 4:30 pm

Salman Khan Video : सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर आऊट; ६० व्या वाढदिवशी भाई जानचं फॅन्सला मोठं गिफ्ट

Salman Khan | Battle Of Galwan – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आज वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण केले असून, या खास दिनाचे औचित्य साधत त्याने चाहत्यांना एक मोठे ‘सरप्राईज’ दिले आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या […] The post Salman Khan Video : सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर आऊट; ६० व्या वाढदिवशी भाई जानचं फॅन्सला मोठं गिफ्ट appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:26 pm

Silver: वर्षाच्या सुरुवातीला चांदीत गुंतवलेले 5 लाख रुपये झाले आज 13 लाख

नवी दिल्ली | वर्ष २०२५ हे गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने ‘सुवर्णकाळ’ ठरले आहे. सोन्याच्या किमतीत झालेली वाढ थक्क करणारी असली, तरी चांदीने तर सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या ५ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून चांदीने शेअर बाजार आणि बँकांनाही मागे टाकले आहे. आज २७ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा भाव २.३६ लाख रुपये प्रति किलोच्या पार […] The post Silver: वर्षाच्या सुरुवातीला चांदीत गुंतवलेले 5 लाख रुपये झाले आज 13 लाख appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:20 pm

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीजआपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर सादर केला आहे. मात्र हा केवळ वाढदिवशी दिलेला सरप्राइझ नसून, देशाच्या सीमांवर उभ्या राहून प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केलेला एक गंभीर आणि हृदयस्पर्शी अभिवादन आहे.या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. त्याचा कणखर पण संयमी स्वभाव, नियंत्रित आक्रमकता आणि शांततेतून व्यक्त होणारी ताकद — हे सर्व त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देते. विशेषतः टीझरच्या शेवटच्या क्षणी त्याची निर्धारपूर्ण नजर प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते.टीझरमध्ये हिमालयातील कठोर आणि निर्दयी भूभाग, तसेच उंच पर्वतीय सीमांवरील युद्धाची कठोर वास्तविकता अत्यंत प्रभावी पद्धतीने दाखवली आहे.टीझरला स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभते, ज्यामुळे दृश्यांमधील भावनिक तीव्रता अधिकच वाढते. त्यासोबत हिमेश रेशमिया यांनी दिलेला दमदार पार्श्वसंगीताचा ठेका, या दृश्यांना आणखी प्रभावी आणि हृदयाला भिडणारा बनवतो.‘बॅटल ऑफ गलवान’ हा फक्त युद्धपट नाही — तो संघर्षाची खरी किंमत, सीमांवर लढणाऱ्या सैनिकांचे अदम्य साहस आणि हे शाश्वत सत्य दाखवतो की, शौर्य जरी अमर असले तरी खरा विजय नेहमी शांततेचाच असतो.अपुर्व लखिया दिग्दर्शित हा चित्रपट शौर्य, त्याग आणि जिद्दीचे थरारक आणि निःसंग चित्रण करतो. या चित्रपटात चित्रांगदा सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट सलमा खान यांच्या ‘सलमान खान फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मित होत आहे

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 4:10 pm

FIIs Stock Market Outflow: २०२५ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २ लाख कोटींची बाजारातून विक्री

मोहित सोमण: एनएसडीएल (National Security Depository Limited NSDL) ताज्या प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors FIIs) यांनी संपूर्ण वर्षभरात २ लाख कोटींची गुंतवणूक शेअर बाजारातून काढून टाकली असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढल्याचे स्पष्ट झाले असताना रूपयांचे अवमुल्यन झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार सर्वाधिक रक्कमेची जावक (Outflow) आयटी क्षेत्रातून झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तब्बल ७९१५५ कोटी रुपयांची ही जावक असून उर्वरित महत्वाच्या क्षेत्रात हेल्थकेअर (२४३२४ कोटी), कंज्यूमर ड्युरेबल्स (२१५६७ कोटी), कंज्यूमर सर्विसेस (१९९१४ कोटी), रियल्टी (१२३६४ कोटी), फायनांशियल सर्विसेस (१०८९४ कोटी), ऑटोमोबाईल (९२४२ कोटी) क्षेत्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूकदारांनी जावक केल्याचेही यात स्पष्ट झाले आहे. दरम्यान आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑईल अँड गॅस (९०७६ कोटी), सर्व्हिस (८११२ कोटी), टेलिकॉम (४७१०९ कोटी) रुपयांची गुंतवणूक निव्वळ आवक (Net Inflow) झालेली आहे.यापूर्वी शेअर बाजारातील झालेली आकर्षक आवक यंदा मात्र मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्रामुख्याने इतर चीन, जपान, युरोप, युएस अशा शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भारतापेक्षा अधिक १२ ते ६१% परतावा (Returns) मिळाला असल्याने गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक फटका आयटीत बसला आहे. जगभरातील भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील झालेले स्लोडाऊन व कर्मचारी कपात, आर्थिक अस्थिरता अशा कारणांमुळे या क्षेत्रातील गुंतवणूकीला फटका बसला. दरम्यान आकडेवारीत स्पष्ट केल्याप्रमाणे झालेली जावक शोषून घेण्यासाठी घरगुती गुंतवणूकदारांनी एसआयपीत (Systematic Investment Plan SIP) केलेल्या विक्रमी वाढीमुळे बाजारात त्याचा तुलनात्मकदृष्ट्या फायदा झाला आहे. तब्बल ही गुंतवणूक ३.२ लाख कोटीवर गेल्याने यांचा सर्वाधिक गुंतवणूक फायदा लार्जकॅप व नवीन सूचीबद्ध झालेल्या कंपनीत झाल्याचे स्पष्ट झाले.एकंदरीतच आर्थिक वर्ष २०२५ मधील मोठ्या प्रमाणावरील शेअर्समध्ये झालेली विक्री जागतिक बदलांचे आणि देशांतर्गत मूल्यांकनावरील दबावांचे प्रतिबिंब असले तरी नफ्याच्या वाढीची सुधारलेली शक्यता, सरकारी धोरणात्मक पाठिंबा आणि मजबूत देशांतर्गत गुंतवणुकीत झालेली वाढ अथवा आवक यामुळे गुंतवणूकदार आशावादी आहेत. तज्ञांच्या मते हा सर्वात वाईट काळ कदाचित संपला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये गुंतवणुकीच्या प्रवाहात हळूहळू स्थिरीकरण किंवा उलटफेर होण्याची शक्यता आहे तथापि जागतिक अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदारांनी निवडक राहावे आणि मूलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करावे असे तज्ज्ञ सांगतात.एफआयआय निव्वळ विक्रेते असतानाही, या देशांतर्गत लवचिकतेने व्यापक बाजारातील घसरणीला आधार दिला आहे.गुंतवणूकदारांसाठी सल्ला २०२६ मध्ये काय? ॲक्सिस सिक्युरिटीजने एक सकारात्मक दृष्टिकोन या आऊटलूक विषयी मांडला आहे. ज्यानुसार आर्थिक २०२६ मध्ये मूल्यांकनावर आधारित स्थिरीकरणाकडून नफ्यावर आधारित तेजीच्या चक्राकडे (Bull Cycle) बदल अपेक्षित आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून 'घसरण झाल्यावर खरेदी करा' (बाय ऑन डिप्स) या दृष्टिकोनाची ब्रोकरेज शिफारस करते. आरोग्यसेवा, वित्तीय सेवा यासह विविध मार्केट कॅपमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पीएसयु बँक शेअर्समध्ये पुनरागमची शक्यता वर्तवली असून हे शेअर रिबाऊंड होऊन चांगला परतावा (Returns) देतील असा अंदाज गुंतवणूकदारांसाठी बांधला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 4:10 pm

मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी बड्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवणार, महायुतीचा मास्टरप्लॅन काय?

Mumbai Municipal Corporation Election । Bjp : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक आता खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) कंबर कसत असतानाच, दुसरीकडे महायुतीनेही मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी तगडी रणनीती आखली आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीने स्टार प्रचारकांचे ‘कार्ड’ खेळण्याचे ठरवले आहे. भाजपचा ‘यूपी-बिहार’ […] The post मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी बड्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवणार, महायुतीचा मास्टरप्लॅन काय? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:04 pm

National Consumer Helpline: ग्राहकांना 45 कोटींचा परतावा; फसवणूक झाल्यास ‘या’क्रमांकावर करा तक्रार

नवी दिल्ली: देशभरातील ग्राहकांसाठी ‘नॅशनल कंज्युमर हेल्पलाइन’ (NCH) एक मोठा आधार ठरत आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ महिन्यांत या हेल्पलाइनच्या माध्यमातून ग्राहकांना ४५ कोटी रुपयांहून अधिकचा परतावा (Refund) मिळवून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व प्रकरणे न्यायालयात जाण्यापूर्वीच (प्री-लिटिगेशन स्टेज) सोडवण्यात आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २५ एप्रिल ते २६ […] The post National Consumer Helpline: ग्राहकांना 45 कोटींचा परतावा; फसवणूक झाल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:03 pm

पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट..! आता शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार? शहरातील समीकरणं बदलणार?

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील प्रस्तावित युतीची चर्चा काल (२६ डिसेंबर) फिस्कटली आहे. जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे ही आघाडी होऊ शकली नाही. अजित पवार गटाने शरद पवार गटाला अवघ्या ३० ते ३५ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तसेच घड्याळ चिन्हावर लढण्याची […] The post पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट..! आता शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार? शहरातील समीकरणं बदलणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 4:01 pm

AUS vs ENG : आऊट की नॉट आऊट? लाबुशेनच्या विकेटवरुन पेटला वाद, रुटने घेतलेल्या कॅचचा VIDEO व्हायरल

AUS vs ENG Marnus Labuschagne catch controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सनी पराभव करत मालिकेत विजयाचे खाते उघडले. मात्र, सामन्यात केवळ चेंडू आणि बॅटचा संघर्षच नाही, तर अंपायरिंगच्या निर्णयावरून मोठा वाद पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनच्या विकेट्सने सामन्यात […] The post AUS vs ENG : आऊट की नॉट आऊट? लाबुशेनच्या विकेटवरुन पेटला वाद, रुटने घेतलेल्या कॅचचा VIDEO व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:59 pm

VVMC Election : भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आरोप

Vasai-Virar Municipal Corporation Election : वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले असून महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. “भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला आहे. जागावाटपात राष्ट्रवादीला पूर्णपणे डावलल्यामुळे आता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे महायुतीमध्ये उभी […] The post VVMC Election : भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आरोप appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:48 pm

Drishyam 3 : ‘दृश्यम ३’सिनेमात अक्षय खन्नाच्या जागी झळकणार ‘हा’बडा अभिनेता; एक्झिटचं खरं कारण आलं समोर !

Akshaye khanna | jaideep ahlawat | Drishyam 3 – बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी सस्पेन्स-थ्रिलर फ्रँचायझी ‘दृश्यम’ च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका प्रोमोद्वारे ‘दृश्यम ३‘ची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुसऱ्या भागात आपल्या भेदक अभिनयाने साळगावकर कुटुंबाची झोप उडवणारा अभिनेता अक्षय […] The post Drishyam 3 : ‘दृश्यम ३’ सिनेमात अक्षय खन्नाच्या जागी झळकणार ‘हा’ बडा अभिनेता; एक्झिटचं खरं कारण आलं समोर ! appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:38 pm

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर दरम्यान धावणार विशेष रेल्वे गाड्या, पहा वेळापत्रक

Pune-Nagpur Special Trains : नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे-नागपूर, हडपसर-नागपूर आणि हडपसर-राणी कमलापती स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने […] The post प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर दरम्यान धावणार विशेष रेल्वे गाड्या, पहा वेळापत्रक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:34 pm

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या'लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा उसगावकर यापूर्वी स्टार प्रवाहवरच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' या मालिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी त्या 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन गाजवला होता. चित्रपट असो किंवा मालिका सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला असून आता त्या पुन्हा एकदा मालिका क्षेत्रात दिसणार आहेत.वर्षा उसगांवकरांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेत नंदिनी शिर्केपाटील म्हणजेच 'माई' ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली होती. घराला जोडून ठेवणारी आणि गौरी-जयदीपला क्षणोक्षणी आधार देणाऱ्या माई भुमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेनंतर प्रेक्षक त्यांना छोट्या पडद्यावर प्रचंड मिस करत होते. त्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा छोट्या पडद्यावर वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत.https://prahaar.in/2025/12/27/the-andekar-family-has-entered-the-fray-for-the-upcoming-elections-they-filed-their-nomination-papers-under-tight-police-security/वर्षा उसगांवकर स्टार प्रवाहच्या 'नशीबवान' मालिकेत एन्ट्री घेणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत सुद्धा त्या 'माई' म्हणूनच एन्ट्री घेणार आहेत. त्या गिरिजाला नागेश्वरबरोबर लढण्यासाठी बळ देणार आहेत. वर्षा उसगावकर यांच्या एन्ट्रीबद्दल आलेल्या प्रोमोमध्ये त्या म्हणजेच त्यांच्यातली 'माई' गिरिजाला म्हणते, तुझी रक्षणकर्ती तूच आहेस पोरी.... तुझ्या मनगटातील बळ तू सर्वांना दाखव. कर दोन हात। या प्रोमोमुळे आता प्रेक्षकांना त्यांना पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 3:30 pm

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन कोठडीत आहे. बंडू आंदेकरला महापालिका निवडणुकीमध्ये उतरायचे होते, मात्र तो कोठडीत असल्यामुळे निवडणूक कशी लढवणार? याबाबत चर्चा सुरू असतानाच पुणे विशेष न्यायालयाने त्याला निवडणुकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत.न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर अर्ज दाखल करण्यास आल्या होत्या. या दोघी सुद्धा कोल्हापूर जेलमध्ये असल्यामुळे त्यांना आज सकाळी पुण्यात अर्ज भरण्यासाठी आणण्यात आले. या दोघींचा अर्ज भरून झाल्यानंतर बंडू आंदेकर अर्ज भरणार आहे. बंडू आंदेकर प्रभाग २२ तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर २३ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.https://prahaar.in/2025/12/27/traffic-changes-in-pune-on-the-occasion-of-koregaon-bhima-victory-day-which-alternative-routes-should-be-used/निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्यामुळे आयुष कोमकर हत्या प्रकरणात कोठडीत असलेला बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता. यावर 'निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे', असे सांगत विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 3:10 pm

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी'चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या लग्नाची 'बॅचलर पार्टी' साजरी करण्यासाठी गेलेल्या आदित्य मोहिते या ३३ वर्षीय तरुणाला स्वतःच्याच मित्रांच्या टोकाच्या निष्काळजीपणामुळे जीव गमावावा लागला. विशेष म्हणजे, आदित्य बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याचे मित्र रात्रभर पार्टी आणि नाचगाण्यात मग्न होते. वेळीच उपचार न मिळाल्याने या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असून, या प्रकरणी ११ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेमकं प्रकरण काय?सीसीटीव्ही फुटेजमधून बॅचलर पार्टीचा क्रूर चेहरा समोरगेल्या महिन्यात १६ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या एका फार्म हाऊसवर घडलेल्या आदित्य मोहिते या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने आता एक भयानक वळण घेतले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले असून, त्यामध्ये माणुसकीला लाजवणारा प्रकार कैद झाला आहे. आदित्य जमिनीवर बेशुद्ध पडलेला असताना, शेजारीच असलेल्या टेबलवर त्याचे मित्र आरामात खाण्यापिण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, या मित्रांमध्ये एका डॉक्टराचाही समावेश होता, ज्याने मदतीसाठी हात पुढे करण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. आदित्यचा मित्र जोएल सिंग याच्या लग्नानिमित्त ही बॅचलर पार्टी आयोजित करण्यात आली होती. सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असताना अचानक ३३ वर्षीय आदित्य बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आदित्य कोसळल्यानंतरही त्याच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या मित्रांच्या हालचालीत कोणताही बदल झाला नाही. त्यांनी केवळ एका बाजूला पडलेल्या आपल्या मित्राकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या गप्पांत आणि जेवणात दंग झाले. या संपूर्ण घटनेत सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या मित्रांपैकी एक जण पेशाने डॉक्टर होता. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असूनही, आपल्या समोर एक तरुण बेशुद्ध पडला असताना त्या डॉक्टरने साधी तपासणी करण्याची तसदीही घेतली नाही. त्याला प्रथमोपचार देण्याऐवजी किंवा तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी, त्या डॉक्टरनेही इतर मित्रांप्रमाणेच निष्काळजीपणा दाखवला. याच बेजबाबदारपणामुळे आदित्यला वेळीच उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा हकनाक बळी गेला.https://prahaar.in/2025/12/27/traffic-changes-in-pune-on-the-occasion-of-koregaon-bhima-victory-day-which-alternative-routes-should-be-used/आईच्या संशयानंतर पोलिसांची कारवाईआदित्यच्या आईने सुरुवातीपासूनच या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. मुलाच्या निधनानंतर आईने तक्रार केल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि हा सर्व संतापजनक प्रकार उघडकीस आला. आपल्या मुलाला वाचवण्याची संधी असतानाही मित्रांनी त्याला मरणाच्या दारात सोडून दिले, हे पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आता त्या डॉक्टरसह ११ मित्रांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून खोलीत फेकलंनागपूरच्या खापा परिसरातील एका फार्म हाऊसवर पार पडलेल्या बॅचलर पार्टीत जे घडलं, ते ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल. आपला मित्र आदित्य मोहिते हा डोळ्यादेखत बेशुद्ध पडलेला असताना, त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी एका चादरीत गुंडाळून फरपटत नेले आणि शेजारच्या खोलीत कोंडून दिले. केवळ आपल्या पार्टीत कोणताही व्यत्यय येऊ नये, या एका निर्दयी विचाराने या तरुणांनी आपल्याच मित्राला मरणाच्या दारात ढकलले. आदित्य बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या ११ मित्रांनी त्याला मदत करण्याऐवजी एखाद्या वस्तूंसारखे चादरीत गुंडाळले. त्याला फरपटत नेऊन एका निर्जन खोलीत टाकून दिले आणि हे सर्व नराधम मित्र पुन्हा आपल्या नाच-गाण्यात आणि खाण्यापिण्यात मग्न झाले. रात्रभर त्या बंद खोलीत आदित्य मृत्यूशी झुंज देत होता, मात्र बाहेर संगीताच्या तालावर मित्रांचा जल्लोष सुरू होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या मित्रांना आपल्या मित्राच्या जिवापेक्षा पार्टीचा आनंद मोठा वाटला.सकाळी जाग आली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होतीदुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत हे सर्व मित्र झोपून होते. नशा उतरल्यानंतर जेव्हा एका मित्राने आदित्यच्या खोलीत जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. घाबरलेल्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जर आदल्या रात्रीच त्याला १० मिनिटे आधी उपचार मिळाले असते, तर आदित्य आज जिवंत असता, असे वैद्यकीय सूत्रांकडून समजते.सीसीटीव्ही फुटेजने उघड केला 'सैतानी' चेहरासुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत होता, मात्र आदित्यच्या भावाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये आदित्यला चादरीत गुंडाळून फरपटत नेतानाचे धक्कादायक दृश्य पाहून पोलीसही हादरले. याप्रकरणी खापा पोलिसांनी सर्व ११ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्व आरोपी जामिनासाठी धडपडत असून, या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 3:10 pm

EPFO 3.0: ईपीएफओ परिवर्तनाला 'मान्यता'पैसै काढण्यापासून पीएफ खात्यात आमूलाग्र बदल जाहीर

मुंबई: केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (Central Board of Trustees) बैठकीत ईपीएफओ ३.० (EPFO 3.0) परिवर्तनाला मान्यता दिली गेली आहे. ईपीएफओ (Employees Provident Fund Organisation EPFO) या संस्थेच्या एकत्रीकृत संस्था असलेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजने संस्थेच्या नियमांमध्ये मोठ्या बदलांना परवानगी दिली असल्याने संस्थेच्या इतिहासातील हे महत्वाचे परिवर्तन ठरले आहे. नव्या नियमानुसार, बेरोजगार आता १ महिन्याच्या बेरोजगारीनंतर ७५% रक्कम काढू (Withdraw) शकणार आहेत. खर्चासाठी ही रक्कम काढण्याची परवानगी दिली गेली असून उर्वरित २५% रक्कम बेरोजगारी नंतरच्या दोन महिन्यांनी सदस्यांना मिळणार आहे. संस्थेने आपल्या नव्या परिवर्तनात अनेक मोठे बदल आज जाहीर केले आहेत.नव्या बदलाचा आणखी एक गाभा म्हणजे असलेली पात्रता, निकष, वेतनाचे नियम, निवृत्तीवेतन अशा अनेक गोष्टीत बदल करण्यात आले आहेत. तसेच नव्या निर्णयानुसार जर एखादा व्यक्ती १२ महिन्यांपर्यंत बेरोजगार असला तर संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळणार आहे. यासोबत नव्या नियमात पैसे काढण्याचे विविध निकष, विविध तरतूदी, पात्रता अशा विविध कारणांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी जसे शिक्षण, लग्न, आजारपण इत्यादी कारणासाठी आवश्यक त्या तरतूदी देखील नियमावलीत करण्यात आल्याचे विषद करण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या नियमावलीत पैसै काढण्याच्या तरतूदी मर्यादित होत्या. किंबहुना सदस्यांना १००% रक्कम खाते बंद करताना काढण्याची मुभा नव्हती.यापूर्वी पैसे काढण्याच्या तरतूदीत अडीअडचणीला, संकटप्रसगी,अथवा नैसर्गिक आपत्तीत केवळ ५% रक्कम अथवा ५०% रक्कम जी कमी असेल ती काढण्याची परवानगी होती. नव्या नियमानुसार, स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या वैद्यकीय उपचारांसाठी, सदस्य पूर्वी सहा महिन्यांच्या मूळ वेतन + महागाई भत्त्याच्या (Basic + DA) रकमेपर्यंत किंवा त्यांच्या स्वतःच्या योगदानापर्यंत, यापैकी जी रक्कम कमी असेल, ती काढू शकत होते आणि ही परवानगी अनेकदा दिली जात होती. हा लाभ EPFO 3.0 अंतर्गतही सुरू आहे मात्र आता तो १२ महिन्यांच्या किमान सेवेच्या समान अटीच्या अंतर्गत येतो. ज्यामुळे पात्रतेची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.गुजरामधील एका कार्यक्रमात मंडाविया यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 'सगळ्या आगामी आणि अनेक विद्यमान ईपीएफओ कार्यालयांचा आधुनिक, तंत्रज्ञान-सक्षम, पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर सिंगल विंडो सेवा केंद्रांमध्ये पुनर्विकास केला जात आहे. ज्यामुळे नागरिक देशभरातील कोणत्याही प्रादेशिक कार्यालयातून ईपीएफ संबंधित कोणतीही समस्या सोडवू शकतील' असे ते याविषयी बोलताना म्हणाले आहेत.दिल्लीत एक चालू झालेल्या प्रकल्पाबाबतही त्यांनी भाष्य करताना करून ते पुढे म्हणाले आहेत की भविष्यात कोणताही लाभार्थी आपल्या समस्या कोणत्याही प्रादेशिक कार्यालयातून सोडवू शकेल त्यामुळे संबंधित व्यक्तीला विशिष्ट कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ईपीएफओकडे आज २८ लाख कोटी रुपयांचा निधी आहे आणि ते ८.२५% वार्षिक व्याज देते. जर कामगारांचे पैसे ईपीएफओकडे असतील, तर त्याला भारत सरकारची हमी असते' असे ते म्हणाले आहेत.सरकारने केलेल्या बदलांवर ही त्यानी भाष्य करत,'२०१४ पूर्वी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार (ILO), भारतात केवळ १९% सामाजिक सुरक्षा कवच होते. आज हे प्रमाण ६४% पर्यंत वाढले आहे आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना (ISSA) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आहे. आज ९४ कोटी लोक सामाजिक सुरक्षा संरक्षणाखाली समाविष्ट आहेत, ज्यामुळे चीननंतर सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च २०२६ पर्यंत, भारत १०० कोटी नागरिकांसाठी कवच सुनिश्चित करेल' असे म्हणत बदललेल्या परिस्थितीचे विवेचन केले.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 3:10 pm

तोंडाला बुरखा, हातात दोर….गुंड बंडू आंदेकरने दाखल केला उमेदवारी अर्ज

Bandu Andekar | पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. नातू आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी कुख्यात बंडू आंदेकरसह त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानुसार, आज […] The post तोंडाला बुरखा, हातात दोर….गुंड बंडू आंदेकरने दाखल केला उमेदवारी अर्ज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 3:03 pm

गायकाने भरकॉन्सर्टमध्ये तारा सुतारिया केलं किस; वीर पहारियाची रिअॅक्शन व्हायरल

Singer AP Dhillon | प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोंचा मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. या कॉन्सर्टला तारा सुतारिया आणि वीर पहारिया देखील गेले होते. या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लों गाणे गाताना ताराला स्टेजवर बोलावतो. यावेळी एपीच्या खांद्यावर हात ठेवून तारा देखील कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसते. यादरम्यान एपी ढिल्लों ताराला […] The post गायकाने भरकॉन्सर्टमध्ये तारा सुतारिया केलं किस; वीर पहारियाची रिअॅक्शन व्हायरल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 2:32 pm

“मनरेगा बंद करणे हा गरिबांवर हल्ला …” ; केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत खरगेंचा सरकारवर निशाणा

Mallikarjun Kharge on MNREGA। काँग्रेस कार्यकारिणीच्या एका महत्त्वाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी यावेळी, “देश सध्या अशा टप्प्यातून जात आहे जिथे लोकशाही संस्था कमकुवत केल्या जात आहेत, संविधानाच्या भावनेचे उल्लंघन केले जात आहे आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर सातत्याने अंकुश लावला जात आहे. खरगे यांच्या मते, ही केवळ परिस्थितीचा […] The post “मनरेगा बंद करणे हा गरिबांवर हल्ला …” ; केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत खरगेंचा सरकारवर निशाणा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 2:28 pm

RBI Bulletin: गेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा ४.३६ अब्ज डॉलरने वाढला

आरबीआयच्या बुलेटिनमध्ये स्पष्टमोहित सोमण: आरबीआयने (Reserve Bank of India) १९ डिसेंबर आठवड्याच्या बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात परकीय चलन साठ्यात (Foreign Exchange Reserves Forex) ४.३६ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने चलनसाठा ६९३ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. माहितीनुसार, एफसीए (Foreign Currency Assets FCA) या संपूर्ण आठवड्यात १६४ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने ते ५५९ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. याशिवाय एसडीआर (Special Drawing Rights SDR) मध्ये आठवड्यात ८ अब्ज डॉलरने वाढ झाल्याने १८.७४ अब्ज डॉलरवर पोहोचले. आरबीआयच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे की सोन्याचा साठा (Gold Reserves) आठवड्यात २.६२ अब्ज डॉलरने वाढत ११०.३६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.संपूर्ण आठवड्यात रुपयामध्ये मोठी अस्थिरता (Volatility) दिसून आली आणि सलग चार सत्रांमध्ये डॉलरच्या तुलनेत नवीन निचांकि आकडा गाठला होता. जागतिक स्तरावर फेडदर व्याजदर कपातीनंतर कमोडिटी व डॉलर निर्देशांकाय मजबूती आल्याने रूपया कमकुवत झाला होता. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली. परिणामी रूपयांचे मागणी घटल्याने आणखी अवमूल्यन झाले होते. या अस्थिर सत्रातील व्यापारादरम्यान, प्रति डॉलर ९१.०८ आणि ८९.२५ च्या दरम्यान चढउतार झाल्याने, अखेरीस रूपया डॉलरच्या तुलनेत सुमारे १.३% मजबूत झाला होता.बाजारातील मोठ्या सट्टेबाजीच्या स्थितीची व्याप्ती लक्षात घेतल्यानंतर आरबीआयने अधिक आक्रमकपणे हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल ज्यामुळे स्पॉट दर खाली आला. १९ डिसेंबर रोजी शेवटच्या तासाभरात रुपयामध्ये तीव्र वाढ झाली जी कदाचित आरबीआयने केलेल्या आक्रमक डॉलर विक्रीमुळे झाली असल्याचा तज्ञांचा कयास होता. या दिवशी मध्यवर्ती बँकेने सुमारे ३ अब्ज ते ४ अब्ज डॉलर्सची विक्री केली असावी असा अंदाज आहे.दरम्यान,आरबीआयने डिसेंबर महिन्यात आतापर्यंत खुल्या बाजारातील केलेली २ लाख कोटींची खरेदी (OMO) आणि फॉरेक्स खरेदी-विक्री स्वॅपद्वारे १.४५ ट्रिलियन रुपयांची दीर्घकालीन तरलता बाजारात आणली आहे. त्यामुळे रूपया काही प्रमाणात स्थिरावला आहे.याशिवाय भारताची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताची राखीव स्थिती ९५ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.७८ अब्ज डॉलर्स झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये भारताचा परकीय चलन साठा ७०५ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 2:10 pm

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात. त्यामुळे या परिसरात १ जानेवारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि नगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतुकीतील हे बदल बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.पर्यायी मार्गाचे नियोजनपुण्याकडून नगरकडे जाणारी वाहतूक: पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपासवरून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर मार्गे पुढे जावे.मुंबईकडून नगरकडे जाणारी वाहतूक: मुंबईहून येणाऱ्या वाहनांनी वडगाव-मावळ-चाकण-खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गाचा अवलंब करावा. तर हलकी वाहने पाबळ-शिरूर मार्गे जाऊ शकतात.कोल्हापूर, सांगली, सातारा बाजूकडून नगरकडे: या भागातून येणारी वाहने मांतरवाडी फाटा, हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरकडे वळवण्यात येणार आहे.सोलापूर रोडकडून आळंदी-चाकणकडे: सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी हडपसर-मगरपट्टा चौक-खराडी बायपास आणि विश्रांतवाडी मार्गे पुढे जावे.https://prahaar.in/2025/12/27/birthday-party-forced-smoking-and-rape-in-the-car/जड वाहनांना शहरात प्रवेशबंदीवाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज, बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, नवले ब्रिज, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक आणि मरकळ ब्रिज या ठिकाणांहून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसेच आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांसाठी बंद असून तिथून फक्त हलकी वाहने सोडली जातील.पार्किंगची व्यवस्थाप्रशासनाने अनुयायी आणि पर्यटकांसाठी लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे गाव आणि थेऊर रोड या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सोय केली आहे. मुख्य ठिकाणांवर माहिती फलक लावण्यात आले असून वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 2:10 pm

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या दारात जाऊन तेच सोनं परत मागत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधून समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी संबंधित उमेदवाराने सोन्याचं वाटप केल्याचा आरोप आहे. मात्र निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हा उमेदवार थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन जाब विचारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. दिलेलं सोनं परत न केल्यास सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख करत धमकावण्याचाही आरोप त्याच्यावर होत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उमेदवार मतदारांशी बोलताना, तुमच्याकडे सोनं घेतल्याचा कोणताही पुरावा नाही. तुम्ही माझ्या घरी येऊन सोनं नेल्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे, असं म्हणताना दिसत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी मतदारांनी अशा आमिषांना बळी पडू नये, अशी भूमिका मांडली आहे, तर काहींनी सोनं वाटून मत खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवाराला मतदारांनीच योग्य धडा शिकवल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.दरम्यान, मतदारांना आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 2:10 pm

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन शिक्षकांविरुद्ध बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.कामोठे येथील एका खासगी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून पालकांच्या तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थ्याचा दोन वेगवेगळ्या दिवशी छळ करण्यात आला. १४ नोव्हेंबर रोजी एका शिक्षकाने दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला बोलावून सहा वर्षांच्या मुलाच्या गालावर पाच ते सहा चापट मारण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या प्रकारावेळी संबंधित शिक्षक फक्त उपस्थितच नव्हता, तर तो हसत असल्याचाही गंभीर दावा पालकांनी केला आहे.यानंतर २८ नोव्हेंबर रोजी इंग्रजीच्या तासादरम्यान दुसऱ्या एका शिक्षकाने याच मुलाला कंपास बॉक्सने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीमुळे चिमुकल्याच्या ओठाला मोठी सूज आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.मुलाने घरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी बुधवारी दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांची भूमिका आणि शालेय वातावरणाचीही सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. लहान मुलांवर शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 2:10 pm

“देवाच्या कृपेने निष्पापांचे प्राण वाचले” ; बिहारमधील रोपवे अपघातावरून आरजेडीचा हल्लाबोल

Rohtas Ropeway Accident। बिहारच्या रोहतास जिल्ह्यात झालेल्या रोपवे अपघातानंतर बिहारमधील राजकीय परिस्थिती तापली आहे. राज्यातील आघाडीचा राजकीय पक्ष, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे नितीश कुमार सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. आरजेडीने सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या अधिकृत एक्स-पोस्टने रोहतास रोपवे अपघातावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. […] The post “देवाच्या कृपेने निष्पापांचे प्राण वाचले” ; बिहारमधील रोपवे अपघातावरून आरजेडीचा हल्लाबोल appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:26 pm

श्रीदत्त विद्यालयाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड; विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव

जांबूत – भैरवनाथ विद्यालय करडे येथे पार पडलेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करत बाजी मारली आहे. त्यानुसार आता श्रीदत्त विद्यालयाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शिरूर पंचायत समिती तथा गणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम […] The post श्रीदत्त विद्यालयाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड; विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:12 pm

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील मॉर्फ केलेली चित्रे व्हायरल झाली होती, यात न्यायालयाने हस्तक्षेप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने समाज माध्यमांवर व्हायरल झालेली एआयद्वारे तयार केलेली मॉर्फ छायाचित्रे, व्हिडिओ आणि डीपफेक कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह एआय लिंकद्वारे प्रसारित होणारा हा सर्व मजकूर हटवावा, असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दिला आहे.हा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः महिलेला, तिच्या संमतीशिवाय आणि तिच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावर गदा येईल अशा पद्धतीने चित्रित करता येत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले.शिल्पा शेट्टीने व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण, प्रतिमेचा कथित गैरवापर आणि डीपफेक कंटेंटविरोधात उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने एआयच्या वापरातून तिचा आवाज, हावभाव आणि प्रतिमा नक्कल केल्याचा मुद्दा गंभीर असल्याचे नमूद केले.याचिकेनुसार, शिल्पा शेट्टीच्या परवानगीशिवाय तिची मॉर्फ केलेली छायाचित्रे वापरून पुस्तके आणि विविध वस्तू तयार करण्यात आल्या. या प्रकारामुळे तिची बदनामी होण्याची, अश्लील विनोदांचा विषय बनण्याची आणि मानसिक त्रास सहन करण्याची शक्यता असल्याचा दावा तिने केला आहे.न्यायालयाचा दिलासाउच्च न्यायालयाने सर्व संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि एआय लिंकवरून मॉर्फ छायाचित्रे, व्हिडिओ आणि डीपफेक कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत अशा स्वरूपाचा कोणताही मजकूर प्रसारित करू नये, असे स्पष्ट निर्देश देत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.नुकसानभरपाईची मागणीशिल्पा शेट्टीने याचिकेत संबंधित व्यक्तींकडून पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तिच्या प्रतिमेचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही तिने केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम दिलासा देत संबंधित कंटेंट हटवण्याचे आदेश कायम ठेवले आहेत.हा निर्णय डीपफेक आणि एआयच्या गैरवापराविरोधात महत्त्वाचा मानला जात असून, सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्कांबाबत न्यायालयाने ठोस भूमिका घेतल्याचा संदेश यातून जात आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 pm

Kolhapur Fire : आजऱ्यात पहाटे अग्नितांडव! ७ गाड्यांसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आकस्मिक लागलेल्या आगीत सात चारचाकी वाहने आणि अनेक दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, पाहता पाहता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेने संपूर्ण आजरा शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.पहाटेचा थरार: गाढ झोपेत असतानाच दुकानांना वेढलं!मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे जेव्हा शहर गाढ झोपेत होते, तेव्हा बाजारपेठेतील एका भागातून धूर निघण्यास सुरुवात झाली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि बाजूला उभ्या असलेल्या वाहनांनाही आपल्या कचाट्यात घेतले. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली, मात्र आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की कोणालाही जवळ जाणे शक्य होत नव्हते.नेमकं काय घडलं?आजरा-आंबोली मार्गावर असलेल्या पोलीस ठाण्यानजीकच्या 'भाई-भाई चित्रमंदिर' समोरील व्यापारी संकुलाला भीषण आग लागली. पहाटे ५:३० च्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहाटेची वेळ असल्याने संपूर्ण शहर गाढ झोपेत होते. सुरुवातीला लागलेली ही आग कोणाच्याही निदर्शनास आली नाही. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यावर दुकानांमधील सामानाचे आणि वाहनांच्या टायरचे स्फोट होऊ लागले. या भीषण आवाजामुळे परिसरातील नागरिकांना जाग आली. बाहेर येऊन पाहिले असता, आकाश आगीच्या ज्वाळांनी लाल झाले होते. नेमकी आग कुठे लागली आहे, हे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस ठाणे जवळच असल्याने तातडीने प्रशासकीय यंत्रणाही हलली. मात्र, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, स्थानिक पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. या दुर्घटनेत 'भाई-भाई चित्रमंदिर' समोरील अनेक दुकान गाळे आगीच्या कचाट्यात सापडले असून, आगीने काही मिनिटांतच सर्व काही खाक केले.https://prahaar.in/2025/12/27/over-50-vehicles-collide-on-an-expressway-in-japan-one-dead-26-injured/कोट्यवधींच्या नुकसानीने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेआजरा शहरात पहाटे लागलेल्या भीषण आगीने केवळ दुकानेच नव्हे, तर अनेकांचे संसार आणि आयुष्यभराची पुंजीही खाक केली आहे. या दुर्घटनेत सर्वात मोठा फटका कार रिपेअरिंग गॅरेजला बसला असून, तिथे दुरुस्तीसाठी आलेल्या सात आलिशान गाड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीचा हा विळखा इतका भयानक होता की, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून बाजारपेठेचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर एक कार रिपेअरिंग गॅरेज होते. वरच्या मजल्यावरील आगीच्या ज्वाळा आणि वितळलेले साहित्य खालच्या मजल्यावरील गॅरेजमध्ये पडल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभा असलेल्या सात चारचाकी गाड्यांना आगीने वेढले. पाहता पाहता या सर्व गाड्यांचा केवळ सांगाडा उरला असून, वाहनांच्या मालकांचे आणि गॅरेज मालकाचे अतोनात नुकसान झाले आहे.आजऱ्यातील अग्नितांडवात व्यापाऱ्यांची राख झाली स्वप्नंआजरा शहरात शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अग्नितांडवाने केवळ दुकानेच नव्हे, तर अनेक व्यापाऱ्यांची आयुष्यभराची मेहनत आणि स्वप्ने क्षणात खाक केली आहेत. बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील ही दुकाने व्यापारासाठी महत्त्वाची मानली जात होती, मात्र आगीच्या एका विळख्याने येथे केवळ राखेचा ढिगारा शिल्लक ठेवला आहे. डोळ्यादेखत सगळं जळताना पाहण्याशिवाय दुसरं काहीच करू शकलो नाही, अशा शब्दांत व्यापाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ज्या दुकानांना आग लागली, तिथे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. आगीची भीषणता इतकी प्रचंड होती की, दुकानातील अत्याधुनिक फर्निचर, महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि विक्रीसाठी आणलेला कच्चा माल पूर्णपणे जळून कोळसा झाला आहे. आगीच्या ज्वाळांमधून काहीही बाहेर काढणे अशक्य झाल्याने, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा तडा बसला आहे. अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी कर्ज काढून आणि वर्षानुवर्षे बचत करून ही दुकाने उभी केली होती. मात्र, अवघ्या काही तासांत सर्व काही संपल्याने या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडली अन् होत्याचं नव्हतं झालंआजरा शहराला हादरवून सोडणाऱ्या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे समोर आले नसले तरी, प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसानीचा आकडा मात्र थक्क करणारा आहे. पहाटेच्या शांततेत आगीने वेढल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आपापल्या परीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बादल्यांनी पाणी टाकण्यापासून ते अग्निशमन यंत्रणा येईपर्यंत लोक आगीशी झुंजत होते. मात्र, आगीची तीव्रता आणि वेग इतका प्रचंड होता की, नागरिकांचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. अवघ्या काही मिनिटांतच आगीने संपूर्ण व्यापारी संकुल आपल्या कचाट्यात घेऊन सर्वकाही भस्मसात केले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने दुकानांमध्ये किंवा परिसरात वर्दळ नव्हती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ज्यांचे व्यावसायिक नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी हा धक्का मोठा आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 pm

India New Zeland FTA- आम्ही ते करून दाखवलं!- पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन

मुंबई: न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी भारत न्यूझीलंड द्विपक्षीय मुक्त व्यापार करार (Bilateral Free Trade Agreement FTA) बाबत ट्विटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. २२ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंड पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी कराराची घोषणा केली होती. लक्सन यांनी त्यावर एक्सवर प्रतिक्रिया देताना,'आम्ही आमच्या पहिल्याच कार्यकाळात भारतासोबत मुक्त व्यापार करार करू असे म्हटले होते आणि आम्ही ते करून दाखवले आहे. या ऐतिहासिक करारामुळे १.४ अब्ज भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठ खुली झाल्याने अधिक नोकऱ्या, अधिक उत्पन्न आणि अधिक निर्यात शक्य होईल.' असे म्हटले आहे.We said we’d secure a Free Trade Agreement with India in our first term, and we’ve delivered. This landmark deal means more jobs, higher incomes and more exports by opening the door to 1.4 billion Indian consumers.Fixing the Basics. Building the Future.— Christopher Luxon (@chrisluxonmp) December 27, 2025यापूर्वी २२ डिसेंबरला प्रलंबित भारत व न्युझीलंड कराराने मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांना मुक्त व्यापाराची कवाडे उघडी झाली होती. व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल व न्यूझीलंडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले (Toss Macclay) यांच्या बैठकीनंतर ही एफटीएची घोषणा झाली होती. दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक भागीदारीबाबत स्वाक्षरी केल्याने दोन्ही देशातील व्यापार व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. दोन्ही देशांनीही १००% अतिरिक्त शुल्क अथवा टॅरिफ हटवल्याने मोठ्या प्रमाणात दोन्ही देशातील औद्योगिक व सेवा क्षेत्रात गुंतवणूक अपेक्षित आहे. कापड, पादत्राणे, लेदर, मरिन, ज्वेलरी, हातमाग, उत्पादन, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग उत्पादन व इतर मोठ्या क्षेत्रातील मोठ्या कंपनीसह एमएसएमई (MSME) उद्योगातील अनेक उद्योजकांना मोठी संधी निर्माण होईल. या क्षेत्रातील उद्योजकांना न्यूझीलंडमध्ये ड्युटी फ्री प्रवेश आता शक्य होणार असून न्यूझीलंडकडून आयटी, टुरिझम, व्यापार, वित्तीय सेवा, इतर क्षेत्रीय गुंतवणूक, बांधकाम, शिक्षण, व सेवा अशा कित्येक क्षेत्रीय गुंतवणूक भारतात करण्याचे आश्वासन मिळाले आहे. तसेच न्यूझीलंडलाही भारतात अनेक उद्योगांना ड्युटी फ्री प्रवेश सुलभ होणार आहे.नव्या करारानुसार कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत नवा तात्पुरता रोजगार व्हिसा मिळणार आहे. ५००० कर्मचाऱ्यांची क्षमता असलेला हा राखीव कोटा असून ३ वर्षासाठी लागू असणार असल्याचे घोषणेनंतर स्पष्ट करण्यात आले होते. खासकरुन योगा, बांधकाम, शिक्षण, आयटी, इंजिनिअरिंग, हेल्थकेअर, मोबिलिटी अशा क्षेत्रातील कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना व कामगारांना मोठ्या प्रमाणात न्यूझीलंडमधील संधी खुल्या होणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशातील व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये दोन देशांच्या व्यापारात २.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर सेवा क्षेत्रातील व्यवहारात १.२४ अब्ज डॉलर पर्यंत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते.काय आहे दोन्ही देशातील एफटीएमधील महत्वाच्या तरतूदी -१) दोन्ही देशांत १००% ड्युटी फ्री निर्यात होणार२) दोन्ही देशांत आगामी १५ वर्षात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित३) करारात शेतकी व डेअरीचा समावेश नाही.४) हेल्थ व मेडिसिन करारात न्यूझीलंडकडून प्रथमच वचनबद्धता प्राप्त५) हा करार भारतासाठी कुशल मनुष्यबळाचा प्रमुख पुरवठादार (Supplier) म्हणून उदयास येण्याची संधी निर्माण करतो, त्याचबरोबर आयुष (AYUSH) आणि योग प्रशिक्षक, भारतीय शेफ आणि संगीत शिक्षक यांसारख्या सेवा, तसेच माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि बांधकाम यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सेवांमध्ये भविष्यातील सहकार्यासाठी संधी उपलब्ध करून देतो.६) १५ वर्षांमध्ये २० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धतेसह दीर्घकालीन आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य७) कृषी उत्पादकता भागीदारीद्वारे, हा मुक्त व्यापार करार (FTA) शेतकऱ्यांसोबत काम करून उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होणार आणि याशिवाय शेतकऱ्यांना जागतिक मूल्य साखळीत सहकार्य होणार८) हा मुक्त व्यापार करार वस्त्रोद्योग, तयार कपडे, चामडे, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि प्रक्रिया केलेले अन्न यांसारख्या क्षेत्रांसाठी मुक्त प्रवेश देऊन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) आणि रोजगाराला चालना देणार९) भारताकडून न्यूझीलंडवा ७०.०३% टॅरिफ लाईन्समध्ये बाजारपेठ प्रवेश दिला आहे, तर २९.९७% टॅरिफ लाईन्स वगळल्या आहेत.१०) ३०% वस्तूंवरील शुल्क तात्काळ रद्द केले जाईल११) उर्वरित शुल्क टप्प्याटप्प्याने कमी केले जाईल.१२) दुग्धजन्य पदार्थ (दूध,मलई,व्हे,दही,चीज इत्यादी), प्राणी उत्पादने (मेंढीच्या मांसाव्यतिरिक्त), भाजीपाला उत्पादने (कांदे, हरभरा, वाटाणे, मका, बदाम इत्यादी), साखर, कृत्रिम मध, प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्मजैविक चरबी आणि तेल, शस्त्रे आणि दारूगोळा, रत्ने आणि दागिने, तांबे आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू (कॅथोड्स, काडतुसे, सळ्या, पट्ट्या, कॉइल्स इत्यादी), अल्युमिनियम आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू (इंगॉट्स, बिलेट्स, वायर बार) यांसारख्या काही उत्पादनांना वगळण्यात आले आहे.१३)३०.००% टॅरिफ लाईन्सवरील शुल्क तात्काळ रद्द केले जाईल, ज्यात लाकूड, लोकर, मेंढीचे मांस, कच्चे चामडे इत्यादींचा समावेश आहे.१४) ३५.६०% शुल्कावर ३, ५, ७ आणि १० वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने कपात केली जाईल, ज्यात पेट्रोलियम तेल, माल्ट अर्क, वनस्पती तेल आणि निवडक विद्युत व यांत्रिक यंत्रसामग्री, पेप्टोन्स इत्यादींचा समावेश आहे.एफटीएमुळे दोन्ही देशांना होणारे फायदे पुढीलप्रमाणे -न्यूझीलंडच्या बाजारपेठ प्रवेशाच्या प्रस्तावामध्ये करार लागू झाल्याच्या दिवसापासून न्यूझीलंडच्या १००% टॅरिफ लाईन्सवरील (८२८४ टॅरिफ लाईन्स) शुल्काचे तात्काळ संपूर्ण उच्चाटन (Zero Duty) भारतासाठी समाविष्ट आहे.न्यूझीलंडने कापड/वस्त्र उत्पादने, चामडे आणि शिरोभूषणे, सिरॅमिक्स, गालिचे, ऑटोमोबाईल्स आणि ऑटो घटकांसह प्रमुख भारतीय निर्यातीच्या सुमारे ४५० लाईन्सवर सुमारे १०% शुल्क कायम ठेवले आहे. याव्यतिरिक्त, २०२५ मधील सरासरी लागू शुल्क २.२% वरून करार लागू झाल्याच्या दिवसापासून शून्य होईल.या प्रस्तावामुळे अनेक उत्पादने आणि क्षेत्रांना फायदा होणार आहे त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि कपडे, चामडे आणि पादत्राणे यांसारखी श्रम-केंद्रित क्षेत्रे आहेत तर वाहतूक/ऑटो, औषधनिर्माण, प्लास्टिक आणि रबर, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री, यांत्रिक यंत्रसामग्री, रसायने यांसारखी उदयोन्मुख आणि प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रे आणि फळे आणि भाजीपाला, कॉफी, मसाले, धान्ये, प्रक्रिया केलेले अन्न यांसारखी कृषी उत्पादने यांचाही समावेशदेशांतर्गत उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी आयातीतून मिळणारे फायदे: लाकडी ओंडके, कोकिंग कोळसा, लोहयुक्त आणि अलौह धातूंचा कचरा आणि भंगारकृषी, तंत्रज्ञान सहकार्य आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी फायदे-न्यूझीलंडने भारतातील कीवीफळ, सफरचंद आणि मध उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता, गुणवत्ता आणि क्षेत्रीय क्षमता सुधारण्यासाठी केंद्रित कृती योजनांवर सहमती दर्शवली आहे.या सहकार्यामध्ये उत्कृष्टता केंद्रांची स्थापना, सुधारित लागवडीचे साहित्य, उत्पादकांसाठी क्षमता-बांधणी, फळबाग व्यवस्थापनासाठी तांत्रिक सहाय्य, काढणीनंतरच्या पद्धती, पुरवठा साखळी आणि अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे.उत्कृष्ट सफरचंद उत्पादक आणि शाश्वत मधमाशी पालन पद्धतींसाठीचे प्रकल्प उत्पादन आणि गुणवत्तेचे मानके (Quality Standards) वाढवतील.यासोबतच, भारतात न्यूझीलंडमधील निवडक कृषी उत्पादनांसाठी (सफरचंद, कीवीफळ, मानुका मध) बाजारपेठ प्रवेशहा प्रवेश किमान आयात किंमत आणि हंगामी आयातीसह टॅरिफ रेट कोटा (TRQ) प्रणालीद्वारे व्यवस्थापित केला जाईल, ज्यामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांचे संरक्षण करताना ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल.वस्तूंच्या पलीकडील वाढीव संधीसेवा -न्यूझीलंडकडून आतापर्यंतचा सर्वोत्तम प्रस्ताव: ११८ सेवा क्षेत्रांमध्ये वचनबद्धता, १३९ क्षेत्रांमध्ये सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा (MFN) दर्जा मिळणारआरोग्य आणि पारंपरिक औषध- प्रथमच, न्यूझीलंडने भारतासोबत आयुर्वेद, योग आणि इतर पारंपरिक औषध सेवांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी एका परिशिष्टावर स्वाक्षरी केलीही तरतूद माओरी आरोग्य पद्धतींसोबतच भारताच्या आयुष शाखांना (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सोवा-रिग्पा, सिद्ध आणि होमिओपॅथी) केंद्रस्थानी आणते.गतिशीलता आणि शिक्षण संधीन्यूझीलंडने कोणत्याही देशासोबत प्रथमच विद्यार्थी गतिशीलता आणि शिक्षणोत्तर कार्य व्हिसासाठी परिशिष्टावर स्वाक्षरी केली आहे. भविष्यात धोरणात्मक बदल झाले तरी, भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असताना दर आठवड्याला २० तास काम करू शकताततसेच त्यांना विस्तारित शिक्षणोत्तर कार्य व्हिसा मिळेल (STEM पदवी: ३ वर्षे; पदव्युत्तर पदवी: ३ वर्षांपर्यंत; डॉक्टरेट: ४ वर्षांपर्यंत) मान्यताव्यवसायिक संधी- कुशल भारतीयांसाठी ३ वर्षांपर्यंत वास्तव्यासाठी ५००० व्हिसांचा कोटा निश्चितआयुष चिकित्सक, योग प्रशिक्षक, भारतीय शेफ आणि संगीत शिक्षक) आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे - आयटी, अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि बांधकाम या क्षेत्राचा त्यात समावेशवर्किंग हॉलिडे व्हिसा: दरवर्षी १००० तरुण भारतीय १२ महिन्यांच्या कालावधीसाठी न्यूझीलंडमध्ये अनेकदा प्रवेश मिळवू शकतात.या तरतुदी भारतीय तरुण आणि व्यावसायिकांना जागतिक अनुभव मिळवण्यासाठी अभूतपूर्व संधी निर्माण करतात.गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अपेक्षितथेट परकीय गुंतवणुकीची वचनबद्धता: न्यूझीलंड १५ वर्षांमध्ये भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक संबंध मजबूत होणारसेंद्रिय प्राथमिक उत्पादने: दोन्ही बाजूंमध्ये सेंद्रिय प्रमाणपत्राच्या परस्पर मान्यतेवर सहमती होईल.सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सहकार्य: लहान व्यवसायांना व्यापार-संबंधित माहिती आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यात मदत करण्यासाठी संस्थात्मक संबंध प्रस्थापित केले जातील.तांत्रिक सहाय्य: आयुष, दृकश्राव्य उद्योग, पर्यटन, क्रीडा आणि पारंपरिक ज्ञान प्रणालींमध्ये सहकार्यावर सहमती

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 pm

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहाससध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला आहे. बॉक्स ऑफिसवर धुरंधरची तुफान चर्चा सुरू असतानाच हॉलीवूडच्या एका बिग बजेट फिल्मने सगळ्यांनाच विचारात टाकलंय. कोणताही गाजावाजा न करता हॉलिवूडचा 'Avatar Fire And Ash' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने ओपनिंगलाच ५०० कोटी कमावले आहेत. भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या तुफानदार कमाईमुळे बॉलिवूडचे अनेक प्रोजेक्टसही सावध झाले आहेत.धुरंदरच्या काळातही या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी ठरवले आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून सर्व चित्रपटाना मागे टाकले आहे. आणि चांगली कमाई देखील केली आहे. विषेश म्हणजे २०२५ च्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होऊन हॉलीवूड चित्रपटांमध्ये अवतार ३ने पहिला नंबर पटकावलाय.दिवसागणिक कमाई (नेट):पहिला दिवस - १९ कोटीदुसरा दिवस - २२.५ कोटीतिसरा दिवस - २५.७५ कोटीचौथा दिवस - ९ कोटीपाचवा दिवस - ९.३ कोटीसहावा दिवस - १०.६५ कोटीसातवा दिवस - १३.३ कोटीएकूण - १०९.४५ कोटीभारतामधील २०२५ चे टॉप ५ हॉलीवूड ग्रॉसर्स (नेट):अवतार: फायर अँड ॲश - १०९.४५ कोटी (७ दिवसांत)मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंग -१०६.०९ कोटीएफ१ - १०२.८२ कोटीज्युरासिक वर्ल्ड: रीबर्थ - १००.५६ कोटीद कॉन्ज्युरिंग: लास्ट राइट्स - ८२.११ कोटीपहिल्या ‘अवतार’ला मागे टाकणार का?पहिल्या अवतारने भारतात सुमारे १४१. २५ कोटी नेट कमावले होते.सध्या 'Avatar: Fire And Ash' हा अवतार फ्रँचायझीमधील सर्वात कमी कमाई करणारा भाग आहे. मात्र आतापर्यंत १०९. ४५ कोटींची कमाई झाल्याने आणि ख्रिसमस-नववर्षाच्या सुट्टीचा फायदा मिळाल्याने हा टप्पा पार करण्याच्या दिशेने चित्रपट वेगाने वाटचाल करत आहे. पण, Avatar: The Way Of Water ची ३९०.६ कोटींची विक्रमी कमाई गाठणं मात्र सध्या अशक्यच वाटत आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 pm

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं बाळ कसही असलं तरी ते बाकी सगळ्यांपेक्षा आईला अधिकच प्रिय असत. आणि त्यात आई आणि मुलीच नातं हे खूप वेगळं असत, कोणाहीपेक्षा लेक आईचं मन समजून घेऊ शकते असं म्हणतात. मात्र पनवेलमधील कळंबोलीमध्ये घडलेल्या घटनेमुळे या नात्याला काळीमा फासला गेला आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या लेकीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.कळंबोलीतील सेक्टर १ मधील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीत आयटी इंजिनिअर तरुण आपल्या बीएससी शिक्षण घेतलेल्या ३० वर्षांच्या पत्नीसोबत राहतो. या महिलेला मुलगी नको होती. विशेष म्हणजे त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडचण जाणवत होती. ती मराठीऐवजी हिंदी भाषेचे शब्द जास्त वापरायची. तिच्या बोलण्यात अधिकांश हिंदी भाषा असायची. मुलीच्या आईला हे आवडत नव्हतं. मुलीच्या आरोग्याच्या अडचणीमुळे तिची आई मानसिक तणावात होती. अनेकदा तिने पतीला अशी मुलगी नको असल्याचं म्हटलं होतं. पती तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता, अशीही माहिती समोर आली आहे.हृदयविकाऱ्याचे झटक्याने मृत्यूचा बनाव...२३ डिसेंबरच्या रात्री महिलेने मुलीची हत्या केली आणि तिला बेडवरच झोपवलं. पती घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांना या सर्व प्रकारावर संशय आला. त्यांनी डॉक्टरांकडे शवविच्छेदनाची चौकशी केली. शेवटी अहवालात मुलीच्या श्वसनमार्गात अडथळा आल्याचं लक्षात आलं. शेवटी पोलिसी खाक्या दाखवित पती-पत्नीची चौकशी करण्यात आली. यानंतर आईनेच खून केल्याची कबुली दिली.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 pm

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्रउदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या मॅनेजरवर वाढदिवसाच्या पार्टीनंतर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील पीडीतेवर घरी सोडण्याच्या बहाण्याने चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडीतेने सांगितल्याप्रमाणे, तिच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), एक महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीने २० डिसेंबर रोजी पार्टीनंतर तिला कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत समोर आली आहे.एफआयआरमध्ये पार्टी, आफ्टर पार्टी, कार राइड, धूम्रपान आणि सामूहिक बलात्कारासह संपूर्ण घटनेचा तपशील आहे. ही घटनेबाबत उदयपूरच्या सुखेर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यात आयटी कंपनीचा सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. एफआयआरनुसार, २० डिसेंबर रोजी कंपनीने सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पार्टी आयोजित केली होती. उदयपुरच्या शोभागपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पीडिता रात्री ९ वाजता हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे कंपनीचे अनेक कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही पार्टी मध्यरात्री सुमारे १:३० वाजेपर्यंत चालली ज्यात मद्याचा समावेश होता.https://prahaar.in/2025/12/27/pakistan-is-experiencing-a-brain-drain-among-its-working-class-you-will-be-astonished-by-the-number-of-migrants/एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पार्टी दरम्यान पीडितेची तब्येत बिघडली आणि ती अर्धबेशुद्ध अवस्थेत पडली. दरम्यान, काही लोक तिला घरी सोडण्याबद्दल बोलत असताना, कंपनीच्या महिला कार्यकारी प्रमुखांनी तिला आफ्टर पार्टीसाठी आमंत्रित केले. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास, पीडितेला कंपनीचे सीईओ आणि महिला कार्यकारी प्रमुखाच्या पतीने कारमध्ये बसवण्याची जबरदस्ती केली. यानंतर पीडितेला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिघेही आरोपी त्यांच्या कारमधून निघून गेले. तथापि, वाटेत एका दुकानात त्यांनी धूम्रपानासाठी गाडी थांबवली आणि पीडितेलाही धूम्रपान करण्यास भाग पाडले. यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती अस्वस्थ अवस्थेत पडली होती.शुद्धीवर येताच तिने सीईओला तिचा छळ करताना पाहिले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, पीडितेने आरोपींना वारंवार तिला जाऊ देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ऐकण्यास नकार दिला. तर बलात्कार केल्यानंतर सकाळी ५ वाजता घरी सोडले. जेव्हा तिला शुद्धीवर आली, तेव्हा तिला आढळले की तिचे एक कानातले, मोजे आणि अंतर्वस्त्र गायब असून तिच्या गुप्तांगांवर जखमा होत्या. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा पीडितेने केला आहे. ते म्हणजे तिने कारच्या डॅशकॅमचा ऑडिओ आणि व्हिडिओ तपासला. ज्यात संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. या डॅशकॅमच्या आधारावर पीडीतेने सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीवर गु्न्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, एफआयआरमधील सर्व तथ्ये, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे आणि डॅशकॅम फुटेज तपासले जात आहेत.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 1:10 pm

LPG, आधार, पगारापासून ते कारच्या किमतींपर्यंत… ; १ जानेवारीपासून ‘या’९ बदलांनी तुमच्या खिशाला बसणार कात्री

Rule Change। २०२५ हे वर्ष हळूहळू संपत आहे आणि १ जानेवारी २०२६ ची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, अनेक प्रमुख आर्थिक नियम देखील बदलत आहेत, ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. एलपीजी गॅसच्या किमतींपासून ते पॅन, आधार आणि नवीन वेतन आयोगापर्यंत, १ जानेवारीपासून अनेक नियम बदलत आहेत. या नियमांबद्दल […] The post LPG, आधार, पगारापासून ते कारच्या किमतींपर्यंत… ; १ जानेवारीपासून ‘या’ ९ बदलांनी तुमच्या खिशाला बसणार कात्री appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 1:05 pm

‘जनावरांसारखं का वागताय?’कैलाश खेर संतापले; अर्धवट कार्यक्रम सोडून पडले बाहेर

Singer Kailash Kher Concert | गायक कैलाश खेर यांच्या नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कैलाश खेर यांची गाण्यांची मैफल सुरू असताना काही प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीपणामुळे गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे येत थेट स्टेजकडे धाव घेतली. […] The post ‘जनावरांसारखं का वागताय?’ कैलाश खेर संतापले; अर्धवट कार्यक्रम सोडून पडले बाहेर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:47 pm

नववर्षानिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’तारखेपासून भीमाशंकर मंदिर ३ महिन्यांसाठी बंद

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेले भीमाशंकर मंदिर काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील ३ महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्यात येणार आहे. श्री क्षेत्र भिमाशंकर संस्थानने हा निर्णय घेतला […] The post नववर्षानिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून भीमाशंकर मंदिर ३ महिन्यांसाठी बंद appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:21 pm

लालूंच्या नवीन घराची भिंत बेऊर तुरुंगापेक्षा उंच:सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही प्रवेश नाही; लोक म्हणाले- आजूबाजूच्या जमिनीही खरेदी करण्याची तयारी

लालू आणि राबडी यांच्या स्वप्नातील नवीन घर पुन्हा एकदा चर्चेत आहे. पाटण्यातील 10 सर्कुलर रोडवरील निवासस्थान जसजसे रिकामे होत आहे, तसतसे नवीन घर चर्चेत येत आहे. दीर्घकाळ बिहारची सत्ता सांभाळणारे कुटुंब पहिल्यांदाच पाटण्यात स्वतःच्या घरात जाईल. आता प्रश्न असा आहे की, ज्या कुटुंबाकडे बिहारची सत्ता होती, ते शहराच्या झगमगाटापासून दूर घर का बांधत आहे. हे घर कसे असेल? किती खास असेल? लालू कुटुंब नवीन घरात कधी शिफ्ट होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी दैनिक भास्करच्या टीमने पूर्ण तपास केला आहे. महुआ बागेत बनत असलेल्या लालू आणि राबडी यांच्या स्वप्नातील नवीन घराची संपूर्ण कहाणी वाचा आणि पहा..। 30 फूट उंच भिंत आणि वेस्टर्न स्टाईलची हवेली पाटण्यातील 10 सर्कुलर रोडपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर बनत असलेले लालू राबडी यांचे नवीन निवासस्थान वेस्टर्न स्टाईलची हवेली आहे. सर्व बाजूंनी मोठ्या खिडक्यांसह भिंती खूप जाड आहेत. सुरक्षेचा असा आराखडा तयार केला जात आहे की, तुरुंगापेक्षाही कडक निगराणीत कुटुंबातील सदस्य सुरक्षित राहू शकतील. पाटणामधील हे पहिले असे निवासस्थान असेल ज्याची भिंत (बाउंड्री) केवळ बेऊर तुरुंगापेक्षाच नव्हे, तर देशातील अनेक मोठ्या तुरुंगांपेक्षाही उंच आहे. भिंतीची उंची 30 फुटांपेक्षा जास्त आहे. ही हवेली पूर्णपणे तयार झाली आहे, चारही बाजूंनी भिंतीने (बाउंड्रीने) वेढलेली आहे. सध्या फक्त रचना (स्ट्रक्चर) तयार झाली आहे, आता फिनिशिंगचे काम सुरू होत आहे. सुमारे साडे 3 बिघा जमिनीवर बनत असलेल्या घराला आणखी मोठे करण्यासाठी लालू कुटुंब आजूबाजूच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न करत आहे. भास्करच्या तपासणीत हे देखील समोर आले आहे की, लालूंच्या घराशेजारील एका जमिनीचा वापर करून घराचा परिसर आणखी वाढवण्याची तयारी आहे. साडे 3 बिघांची आलिशान हवेली लालू आणि राबडी यांचे नवीन घर स्वतःच ऐतिहासिक आहे. सुमारे साडे 3 बिघा जमिनीवर बांधल्या जात असलेल्या घरात 5 कट्ठ्यांमध्ये बांधकाम सुरू आहे. उर्वरित जमीन मोकळी सोडली आहे, जी हवेलीसारखा देखावा देत आहे. आतमध्ये फार्महाऊससारखा देखावा आहे, ज्यात अनेक खोल्या आणि एक मोठा हॉल आहे. सुमारे 5 वर्षांपासून बांधल्या जात असलेले हे घर पूर्णपणे तयार होण्यासाठी अजून 6 महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. संपूर्ण रचना आधुनिक शैलीत, मजबूत साच्यात आणि उंच कुंपणासह तयार केली जात आहे. काम करणारे बहुतेक मजूर आणि कारागीर बाहेरचे आहेत. अनेक कारागीर दिल्लीचे आहेत. स्थानिक लोक सांगतात की, लालू आणि राबडी अनेकदा बांधकाम पाहण्यासाठी येतात. लालूंच्या नवीन घरात स्थानिक लोकांना प्रवेशबंदी लालूंच्या नवीन घरात स्थानिक लोकांना प्रवेश पूर्णपणे बंद आहे. लालू आणि राबडी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश मिळत नाही. मजूर आणि कारागीर देखील तेच प्रवेश करू शकतात ज्यांना वरून परवानगी असते. घराच्या सुरक्षेसाठी एका कर्मचाऱ्याला नेमण्यात आले आहे जो मुख्य दरवाजाला कुलूप लावून नेहमी आतच असतो. त्यालाही बाहेरील किंवा स्थानिक लोकांशी भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी नाही. आसपासच्या लोकांचे म्हणणे आहे की घराची रचना जवळपास तयार झाली आहे, आता फिनिशिंग आणि डेंट-पेंट सारख्या कामांसाठीही बाहेरच्या कारागिरांना लावण्यात आले आहे. सुमारे 30 फूट उंच भिंतींनी वेढलेल्या या विशाल परिसरात बाहेरच्या कारागिरांची ये-जा असते, पण आत काय चालले आहे, हे कोणालाच कळत नाही. गावकऱ्यांना फक्त एवढेच माहीत आहे की, फार्महाऊससारखे बनवले आहे…सर्व दिल्लीचे कारागीर काम करत आहेत. भास्करची टीम जेव्हा लालू राबडी यांच्या नवीन घराच्या पाहणीसाठी पाटणा येथील महुआ बाग येथे पोहोचली, तेव्हा येथे चारही बाजूंनी सुमारे 30 फूट उंच भिंत दिसली. मुख्य गेटला कुलूप होते आणि आत एक चौकीदार देखरेख करत होता. आवाज दिल्यानंतरही तो आमच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होता. जवळच आमची भेट स्थानिक रहिवासी गोलूशी झाली. रिपोर्टर - ही सरकारी इमारत आहे का? गोलू - नाही, हे लालूजींचे निवासस्थान बनत आहे. रिपोर्टर - बरं, जे बिहारचे मुख्यमंत्री होते तेच लालूजी ना? गोलू - हो, तेजस्वी यादव यांचे वडील. रिपोर्टर - खूप मोठं बनत आहे. गोलू - हो, 3 ते साडे 3 बिघे जागेत बनत आहे. रिपोर्टर - खूप मोठं बनत आहे, भिंत तर तुरुंगापेक्षा उंच आहे. गोलू - हो, पाच वर्षांपासून बनत आहे, हळूहळू काम सुरू असतं. रिपोर्टर - भिंत खूप मजबूत दिसत आहे? गोलू - विटांची भिंत नाही, पूर्णपणे सळ्यांची ढलाई केली आहे. रिपोर्टर - आतमध्ये गेला आहात की नाही? गोलू - आता आतमध्ये कोणीच जाऊ शकत नाही. रिपोर्टर - आतून कसं बनवलं आहे? गोलू - पूर्ण फार्महाऊस प्रकारचं बनत आहे. रिपोर्टर - कितक्या खोल्या असतील? गोलू - आतमध्ये 8 पेक्षा जास्त खोल्या आहेत, एक मोठा हॉल आहे. हॉलमधूनच वर जाण्यासाठी जिना आहे. गोलूशी बोलताना पाहून दूर उभी असलेली त्याची आई सुधाही आमच्याजवळ आली. ती आधी गोलूशी चाललेले आमचे बोलणे ऐकत होती, नंतर तिने बंगल्याबद्दलची पूर्ण कहाणी सांगितली. रिपोर्टर - इकडून जात होतो, दूरून इतके मोठे घर दिसले म्हणून बघायला आलो. सुधा - बंगला बनत आहे, दिल्लीवाला बंगला. रिपोर्टर - इतके सुंदर दिसले, आम्हाला वाटले सरकारी इमारत आहे. सुधा - काय सुंदर दिसणार, आपल्यातच जेव्हा फूट आहे तेव्हा सगळी सुंदरता गळून पडली आहे. रिपोर्टर - आम्हाला तर वाटते लालूजींचे घर बनत आहे, त्यामुळे इकडे जमिनीचा दर वाढला असेल. सुधा - बघा, इकडे जमिनीचा दर विचारू नका, जमीनवाल्याशी भेट होईल तेव्हा समजेल. रिपोर्टर - आतून पाहू देत नसतील ना? सुधा - जा, सांग की लालूजींचं घर बघायला आलो आहोत, ते पाहू देतील. रिपोर्टर - तुमचं त्यांच्याशी कधी बोलणं झालं आहे की नाही? सुधा - हो, झालं होतं, राबडी देवी जेव्हा कंपाऊंड वॉल बांधून घेत होत्या, तेव्हा झालं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, आरामात राहा. महुआ बागेतच आमची भेट सुरेशशी झाली. इतर गावकऱ्यांप्रमाणे सुरेशनेही सांगितले की, घरात जाण्याची परवानगी नाही. सुरेशने लालूंच्या हवेलीबद्दल अनेक माहिती दिली. रिपोर्टर - हे लालू यादव यांचं घर आहे का? सुरेश - हो, तेच आहे, पण याचा दरवाजा पुढच्या बाजूला आहे, मागचा दरवाजा आता बंद करण्यात आला आहे. रिपोर्टर - किती दिवसांपासून बनत आहे? सुरेश - ५ वर्षांपासून बनत आहे. रिपोर्टर - लालू आणि राबडी येतात की नाही? सुरेश - रोज घर बघायला येतात. रिपोर्टर - तुम्ही लोक आत गेला आहात की नाही? सुरेश - आत जाऊ देत नाहीत. वरूनच पाहिलं आहे, चांगलं घर दिसतं. रिपोर्टर - कसं बनलं आहे? सुरेश - आत घर बनलं आहे, चारही बाजूंनी रस्ता बनला आहे. रिपोर्टर - कोण-कोण लोक येतात? सुरेश - फक्त लालू यादवच येतात, रोज बघायला तर येतातच. लालू यादव यांच्या नवीन घराच्या शेजारी राहणाऱ्या राजीवशी आमची भेट झाली. राजीवने सांगितले की, येथे मजूर आणि कारागिरांनाही सूचना आहेत. कुणीही बाहेरच्या व्यक्तीशी बोलत नाही. रिपोर्टर - दादा, लालू यादव यांचं घर इथेच बनत आहे का? राजीव - हो, इथेच बनत आहे. रिपोर्टर - आतमध्ये जाऊ देतात की नाही? राजीव - नाही, आतमध्ये जाऊ देत नाहीत. रिपोर्टर - तुम्ही गेला आहात की नाही? राजीव - नाही. रिपोर्टर - मजूर वगैरे येत-जात असतील का? राजीव - हो, मजूर सगळे जातात, पण बोलत नाहीत. रिपोर्टर - हे इथलेच आहेत की बाहेरचे राहणारे आहेत सगळे? राजीव - सगळे बाहेरचे मजूर असतात, इथे स्थानिक मजूर ठेवत नाहीत. रिपोर्टर - खूप विशाल आणि छान बनत आहे. राजीव - हो, ते तर आहे. 25–30 फूट उंच तर भिंतच आहे. निवासस्थान रिकामे होणार आहे, त्यामुळे लवकरच इथे येतील. रिपोर्टर - काही सामान पण आले आहे का? राजीव - सामान तर येतच असते, काल ट्रॅक्टरने काही अजून सामान आले आहे. रिपोर्टर - अच्छा, कुठून आले होते सामान? राजीव - कुठून आले, हे माहित नाही, पण आले नक्कीच आहे. रिपोर्टर - अच्छा, लोक येतात-जातात का? राजीव - इतर लोक तर नाही, पण लालू यादव रोज सकाळी 9:30 ते 11 च्या दरम्यान येतात. रिपोर्टर - तेज प्रताप येतात की नाही? राजीव - तेज प्रतापला तर पाहिले नाही, तेजस्वीला एकदा पाहिले आहे. रिपोर्टर - येथे लालूंचे कुटुंब आल्याने गर्दी वाढेल. राजीव - बरेच काही बदलेल, रस्ते चांगले होतील, पण वाहतूक कोंडीही कायम राहील. राजीवने सांगितले लालूंच्या जमिनीचा वाद लालू यादव यांच्या नवीन घराच्या शेजारी राहणाऱ्या राजीवने जमिनीचा वादही सांगितला. राजीवने सांगितले की ती खूप जुनी जमीन आहे. राबडी देवींच्या नावावर जमीन घेण्यात आली होती. ही समोरची जमीनही लालू यादव यांची आहे, मागून घेतली आहे, पुढून रस्ता नाही. यावरूनच वाद सुरू आहे. लालू कुटुंबाला हवे आहे की उरलेली जमीनही घ्यावी जेणेकरून रस्ता थेट रस्त्याला मिळेल. जर लालू कुटुंबाने वादग्रस्त जमीन घेतली तर घरापासून मुख्य रस्ता लागेल. म्हणून आता पूर्ण जोर त्याच जमिनीवर आहे. आमची भेट लालूंच्या एका शेजारी दीपकशी झाली. दीपकनेही लालूंच्या नवीन घराशेजारील जमिनीच्या वादाची कहाणी सांगितली. रिपोर्टर - लालू यादवजींचे निवासस्थान इथेच बनत आहे ना? दीपक - हो. रिपोर्टर - खूप मोठे आणि भव्य बनत आहे. दीपक - लालूजी स्वतःच मोठे व्यक्तिमत्व आहेत, तर भव्यच बनणार. रिपोर्टर - आतून पाहू देत नाहीत लोक? दीपक - पाहू देत नाहीत, पण कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, सर्व काही कळेल. रिपोर्टर - कोण कोण लोक येतात? दीपक - कुणी ना कुणी येतच असते. रिपोर्टर - ही जमीन वादग्रस्त नसेल, म्हणून यावर (घर) बनत आहे? दीपक - बघा, जे वादग्रस्त आहे ते तर प्रलंबित आहे. रिपोर्टर - आम्हाला वाटते खूप लोकांनी जमीन खरेदी केली असेल. दीपक - बघा, इथे खूप भूखंड आहेत... कुठे-कुठे आहेत, कोणाला माहीत आहे. रिपोर्टर - या रिकाम्या जमिनीवरही वाद सुरू आहे का? दीपक - होय, यावरही वाद सुरू आहे, एक म्हातारी बाई होती, काल पाणी टाकण्यास मनाई करत होती. लालूंच्या नवीन घराशेजारीच आमची भेट गुड्डूशी झाली. गुड्डूनेही सांगितले की असे घर आजूबाजूच्या परिसरात कोणाचेही बनत नाहीये. लालूजी घर नाही तर कारागृहासारख्या सुरक्षा कवचात आपली हवेली बांधत आहेत. रिपोर्टर - लालू यादवजींचे नवीन घर इथेच बनत आहे का? गुड्डू - होय, हेच आहे. रिपोर्टर - हे खूप मोठे आहे. गुड्डू - होय, खूप मोठे आहे, पूर्ण सळईच्या ढलाईने याची भिंत बनली आहे. रिपोर्टर - इथलेच कारागीर बनवत आहेत की बाहेरचे? गुड्डू - सगळे दिल्लीचे आहेत, खूप मजबूत बनवत आहेत. रिपोर्टर - किती दिवसांपासून हे घर बनत आहे? गुड्डू - खूप दिवस झाले, साधारण 4 ते 5 वर्षे झाली. रिपोर्टर - कुठले मजूर बनवत आहेत? गुड्डू - सगळे बाहेरचे आहेत, काही बेतिया जिल्ह्याचे आहेत, पण कोणीही कोणाशी बोलत नाही. रिपोर्टर - तुम्हाला कसे माहीत की ते इथले नाहीत? गुड्डू - माझे दुकान आहे, किराणाचे, सगळे यायचे तेव्हा सांगायचे. रिपोर्टर - आणखी वेळ लागेल की नाही? गुड्डू - अजून खूप काम बाकी आहे, अजून खूप वेळ लागेल. महुआ बागेत लालूंच्या घराशेजारी आमची भेट शेजारी राजकुमार यांच्याशी झाली. राजकुमार यांनी सांगितले की, जसे ख्रिश्चनांचे घर आणि बंगला बनतो, तसेच लालूजींचे घर बनत आहे. संपूर्ण मॉडेल दूरून पाहिल्यावर मिशनरीचे असल्यासारखे वाटते. बाहेरचा माणूस पहिल्यांदा पाहून हेच विचारेल की ही मिशनरीची इमारत आहे. रिपोर्टर - लालूजींना इथे शिफ्ट व्हायला अजून वेळ लागेल का? राजकुमार - अजून कुठे काही झाले आहे इथे? अजून काही बनलेच नाहीये, अजून तर फक्त स्ट्रक्चर तयार आहे. रिपोर्टर - आतमध्ये किती खोल्या असतील? राजकुमार - घर तर फक्त 5 कट्ठ्यात बनले आहे, तर पूर्ण प्लॉट बिघ्यात आहे. भिंत तर खूपच उंच आहे. रिपोर्टर - खूप मोठ्या जागेत बनले आहे, आतून कसे वाटते? राजकुमार - ख्रिश्चन मॉडेलमध्ये बनले आहे, मिशनरी लोकांचे असावे असे वाटते. रिपोर्टर - म्हणजे? राजकुमार - ख्रिश्चन लोकांची जशी हवेली बनते, मोठमोठ्या खिडक्या तशाच बनवल्या आहेत. रिपोर्टर - बरं. राजकुमार - जेव्हा डेंट-पेंट होईल तेव्हा चांगले दिसेल, लालूजींनी इतके केले आहे की विचारू नका. रिपोर्टर - इथले सामान तर घरात वापरले नसेल? राजकुमार - इथली वीट, वाळू, सिमेंट वापरले गेले, तेच खूप आहे. बाकीचे सर्व सामान बाहेरून. रिपोर्टर - काय, समजले नाही. राजकुमार - यांना काय शोधायचे, कुठूनही काही सांगितले तरी आणून दिले जाईल. सुरक्षेसाठी असलेले जवानही बाउंड्रीच्या आत जात नाहीत लालूंच्या वैयक्तिक रक्षकांना सोडून इतर सुरक्षेचे जवानही नवीन घराच्या गेटच्या आत जात नाहीत. अनेक दिवस लालूंच्या येण्याची वाट पाहिल्यानंतर, एक दिवस अचानक लालू सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी आले. लालूंच्या गाडीसोबत सुरक्षेच्या दोन गाड्या होत्या. लालू येताच गेट उघडले आणि त्यांची गाडी आत गेली, पण सुरक्षेसाठी असलेल्या दोन्ही गाड्या गेटवरच थांबवण्यात आल्या. लालूंची गाडी आत जाताच गेट लॉक करण्यात आले. सुरक्षेत असलेल्या जवानांची गाडी बाहेरच उभी होती. लालू यादव यांनी सुमारे 20 मिनिटे नवीन घराचे कामकाज पाहिले आणि तेथे 24 तास राहणाऱ्या चौकीदाराशी बोलल्यानंतर परत निघाले. यावेळी त्यांनी तेथे कोणत्याही गावातील व्यक्तीशी किंवा इतर कोणाशीही बोलले नाही. लालू जाताच गेट बंद झाले आणि आत सुरक्षेत असलेला कर्मचारीही आत गेला. बोलावल्यानंतरही त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जणू त्याला पूर्णपणे प्रशिक्षित केले होते की तो कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी बोलणार नाही आणि बाहेरही येणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 27 Dec 2025 12:21 pm

व्हायरल व्हिडिओ, मुंबई उच्च न्यायालय अन् आता परराष्ट्र मंत्रालय… ; विजय मल्ल्या अन् ललित मोदींवर सरकारचं स्पष्टीकरण

Lalit Modi Vijay Mallya viral video। “आम्ही भारतातील दोन सर्वात मोठे फरार…” असे म्हणत ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ २२ डिसेंबरपासून व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विजय मल्ल्या आणि ललित मोदी स्वतःला फरार म्हणताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्यामध्ये पिंकी लालवानी दिसत असून तिघेही हसताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर […] The post व्हायरल व्हिडिओ, मुंबई उच्च न्यायालय अन् आता परराष्ट्र मंत्रालय… ; विजय मल्ल्या अन् ललित मोदींवर सरकारचं स्पष्टीकरण appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:10 pm

Bangladesh James Show : बांगलादेश हादरलं! 'भीगी भीगी'फेम गायक जेम्सच्या कॉन्सर्टवर दगडफेक; १५-२० विद्यार्थी जखमी, कार्यक्रम रद्

ढाका : बांगलादेशातील प्रसिद्ध रॉक स्टार आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जेम्स (फारूक महफूज अनम) याच्या संगीत कार्यक्रमात भीषण हिंसाचार झाला आहे. फरीदपूर जिल्हा शाळेच्या १८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मैफिलीवर जमावाने विटा आणि दगडांनी हल्ला केला. या गोंधळात १५ ते २० विद्यार्थ्यांसह किमान २५ जण जखमी झाले असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला.https://prahaar.in/2025/12/27/over-50-vehicles-collide-on-an-expressway-in-japan-one-dead-26-injured/नेमकं काय घडलं?On Friday, 26 December, James, the iconic voice of Bangladeshi rock was scheduled to headline the 185th anniversary concert of Faridpur Zilla School. What should have been a celebration turned into chaos when an extremist group attacked the venue, vandalized property, and forced… pic.twitter.com/htpsEdxQys— Dipanwita Rumi(দীপান্বিতা রুমী) (@dipanwitarumi) December 26, 2025फरीदपूर जिल्हा शाळेच्या दोन दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री ९ वाजता जेम्सचा परफॉर्मन्स होणार होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि प्रेक्षक जेम्सची वाट पाहत होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काही 'बाहेरच्या' लोकांनी विनापरवाना आत शिरण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी त्यांना रोखल्यामुळे संतापलेल्या या जमावाने थेट मंचाच्या (Stage) दिशेने विटा आणि दगड भिरकावण्यास सुरुवात केली.विद्यार्थी रक्ताळले, आयोजकही चक्रावलेजमावाच्या या हल्ल्याला विद्यार्थ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या चकमकीत १५ ते २० विद्यार्थी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून फरीदपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रात्री १० वाजता हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. आम्ही सर्व तयारी केली होती, पण हा हल्ला कोणी आणि का केला हे समजू शकलेले नाही, असे प्रसिद्धी समितीचे प्रमुख राजीबुल हसन खान यांनी सांगितले.तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली चिंताया घटनेवर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी चिंता व्यक्त करत बांगलादेशातील सांस्कृतिक अधोगतीवर भाष्य केले आहे. त्यांनी ट्विटरवर (X) लिहिले की, मैहर घराण्याचे कलाकार सिराज अली खान ढाका येथे आले होते, पण कार्यक्रमापूर्वीच तोडफोड झाल्याने ते न सादरीकरण करताच भारतात परतले. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत कलाकार आणि सांस्कृतिक संस्था सुरक्षित नाहीत, तोपर्यंत ते बांगलादेशात पाय ठेवणार नाहीत. तसेच उस्ताद रशीद खान यांचा मुलगा अरमान खान यानेही सुरक्षेच्या कारणास्तव ढाका येथील आमंत्रण नाकारले आहे. नसरीन यांनी पुढे असेही नमूद केले की, बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी जाणीव जोपासणारे 'छायानौत' (Chhayanaut) हे सांस्कृतिक केंद्रही जाळण्यात आले आहे. संगीत, नाटक आणि लोककलेचा प्रचार करणाऱ्या संस्थांवर होणारे हे हल्ले देशातील कट्टरतावादाचे दर्शन घडवत आहेत.कोण आहे गायक 'जेम्स'?'नगर बाऊल' या रॉक बँडचा मुख्य गायक जेम्स हा बांगलादेशातील संगीताचा आयकॉन मानला जातो. भारतात त्याला 'गँगस्टर' चित्रपटातील भीगी भीगी या सुपरहिट गाण्यामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्याच कार्यक्रमावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने जगभरातील संगीत प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 pm

शरद पवारांची अजित पवारांसोबत आघाडी फिस्कटली, मविआसोबत जाण्याची तयारी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब केले असले तरी जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची स्थानिक युती चर्चेत होती. मात्र शरद पवारांनी मविआसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात चिन्हावरून मतभेद झाल्यामुळे आघाडीची बोलणी अयशस्वी झाल्याचा अंदाज आहे. अजित पवारांनी शरद पवारांना अवघ्या तीस ते पस्तीस जागा आणि घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली होती. या अटीवर शरद पवार गटाचे नेते आणि माजी महापौर अंकुश काकडे व माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर काल (२६ डिसेंबर) रात्री भेट घेतली. यावेळी शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम असल्याने आणि ३५ जागा देण्याचा प्रस्तावही अमान्य असल्याने आघाडीची चर्चा फिस्कटल्याचे समोर आले आहे.https://prahaar.in/2025/12/27/concert-attack-in-bangladesh-james-show-cancelled-after-bricks-hurled/दरम्यान, याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून पक्षातील नेते माहित देत आहेत.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 pm

प्रिमियम घरांच्या किंमतीत १ वर्षात ३६% वाढ

सॅविल्स इंडिया अहवालात स्पष्टमुंबई: प्रामुख्याने भारतातील महत्वाच्या प्रमुख शहरात इयर ऑन इयर बेसिसवर प्रिमियम श्रेणीतील घरांच्या किंमतीत ३६% वाढ झाल्याचे सॅविल्स इंडियाने (Savills India) अहवालात म्हटले गेले आहे. मुख्यतः बांधकाम सुरु असलेल्या अंडर कन्स्ट्रक्शन निवासी मालमत्तेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने हे दर आणखी महागले असल्याचे महत्वाचे निरिक्षण अहवालाने मांडले आहे. यासह तयार असलेल्या निवासी युनिट्स मागणीत झालेली वाढ, घरांच्या निर्मिती बांधकामातील वाढलेला खर्च यामुळे असलेला मर्यादित निवासी पुरवठा हा देखील घरांच्या किंमतीतील वाढीला कारणीभूत असल्याचे अहवालाने म्हटले. 'रेडी टू होम' या श्रेणीतील मालमत्तेला वाढीव मागणीमुळे लोकांचा कल अंडर कन्स्ट्रक्शन निवासी प्रकल्पात अधिक ओढला गेल्याने निवासी मालमत्तेतील किंमतीत आणखी वाढ होत असल्याचे संस्थेने म्हटले.मुंबईच्या बाबतीत तर २०% तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ३०% वाढ किंमतीत झाली आहे. तर गुरूग्राम येथे २ ते १९%, नोएडा येथे ९ ते ३६%, बंगलोर येथे १३ ते १५% वाढ केवळ एका वर्षात झाली आहे असे अहवालात म्हटले गेले. लक्झरी श्रेणीतील तयार घरांच्या मागणीत व किंमतीत स्थिर वाढ (Steady Growth) कायम आहे. या श्रेणीतील किंमतीत २०% पर्यंत पातळीवर वाढ विविध शहरांमध्ये झाली. उदाहरणार्थ बंगलोर येथे अहवालानुसार १२ ते १४%, दिल्ली येथे १० ते १८%, गुरूग्राम येथे ५ ते ९%, मुंबईत ४ ते ७% वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज तयार घरांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे तयार घरांच्याही किंमतीत आणखी वाढ झाल्याचे अहवालाने आकडेवारीत म्हटले आहे.अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५ सालात संपूर्ण भारतातील प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माण बाजारपेठ अत्यंत मजबूत राहिली. यावरून हे दिसून येते की, निवडण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसतानाही लोकांना घरे खरेदी करण्याची तीव्र इच्छा होती. तज्ञांना अपेक्षा आहे की भविष्यात किमतींमध्ये सातत्याने वाढ होत राहील. असे होण्याची शक्यता आहे कारण प्रकल्प वेळेवर पूर्ण होत आहेत आणि नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे, न की लोक केवळ नफा मिळवण्यासाठी घरे खरेदी करून नंतर विकत आहेत.याविषयी बोलताना सॅव्हिल्स इंडियाच्या निवासी सेवांच्या व्यवस्थापकीय संचालक श्वेता जैन म्हणाल्या आहेत की,'२०२५ मध्ये, आर्थिकदृष्ट्या सक्षम अंतिम-वापरकर्त्यांची मागणी, मर्यादित तयार घरे आणि उच्च उत्पन्न गटाच्या वाढत्या संपत्तीमुळे, भारतातील प्रीमियम निवासी विभाग गृहनिर्माण बाजाराचे प्रमुख वाढीचे इंजिन म्हणून उदयास आला. चांगल्या ठिकाणी असलेल्या, नामांकित आणि सुविधांनी परिपूर्ण घरांना असलेली तीव्र पसंती, तसेच विकासकांचा गुणवत्ता आणि शाश्वततेवर असलेला भर, यामुळे किमतींमध्ये जोरदार वाढ झाली आणि खरेदीदारांचा आत्मविश्वास वाढला.'जैन यांनी सांगितले की, २०२६ सालाचा विचार करता, वाढती देशांतर्गत आणि परदेशी संपत्ती तसेच सुधारलेली नियामक पारदर्शकता यामुळे हा विभाग उत्साही राहील अशी अपेक्षा आहे, आणि शिस्तबद्ध किंमत निर्धारण व नियंत्रित पुरवठा हे दीर्घकालीन बाजाराच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे ठरतील.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 12:10 pm

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज

BMC Election 2026 | आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याशिवाय ठाकरे बंधुच्या युतीच्या घोषणेनंतर राजकारणात एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यातच आता महापालिका निवडणुकीत मुंबईचा डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दोघींनीही अखिल भारतीय […] The post कुख्यात गुंड अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 12:04 pm

सलमान खानच्या 60व्या वाढदिवसाचा जल्लोष; बर्थडे पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींची हजेरी

Salman Khan 60th Birthday | बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान 60 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. ज्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खानने आपल्या 60 व्या बर्थडेची पार्टी पनवेल येथे ठेवली होती. त्याने कुटुंब, मित्रमंडळी, बॉलिवूडमधील काही कलाकारांना […] The post सलमान खानच्या 60व्या वाढदिवसाचा जल्लोष; बर्थडे पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींची हजेरी appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 11:36 am

“रवींद्रनाथ टागोर मुस्लिमांचे कट्टर शत्रू…” ; बांगलादेशी मौलानाचे वादग्रस्त विधान

Bangladesh Violence । बांगलादेशमध्ये हेफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या सदस्यांनी प्रसिद्ध गायक जेम्स यांच्या संगीत कार्यक्रमावर हल्ला केला. त्यांनी संगीत कार्यक्रमावर दगडफेक करत प्रेक्षकांना काठ्यांनी मारहाण केली. संगीत कार्यक्रम थांबवल्यानंतर, संस्थेचे सदस्य आणि एक प्रमुख इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना शेख अब्दुर रझाक यांनी आपल्या भाषणात नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी टागोर हे […] The post “रवींद्रनाथ टागोर मुस्लिमांचे कट्टर शत्रू…” ; बांगलादेशी मौलानाचे वादग्रस्त विधान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 11:29 am

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडीनवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील चौथी कसोटी मेलबर्नमध्ये खेळली जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला, तर इंग्लंडचा संघ ११० धावाच करू शकला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी मिळाली.बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत कांगारुंना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदरल्ड १२ आणि १० धावांवर बाद झाले, तर मार्नस लाबुशेननं फक्त सहा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने फक्त नऊ धावा केल्या. उस्मान ख्वाजा चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकला नाही आणि २९ धावांवर बाद झाला. अॅलेक्स कॅरीला फक्त २० धावा करता आल्या, तर कॅमेरॉन ग्रीनला फक्त १७ धावा करता आल्या. मायकेल नेसरने खालच्या फळीत शानदार फलंदाजी केली आणि त्याने नाबाद ३५ धावा केल्या. जोश टँगविरुद्ध कांगारु फलंदाज पूर्णपणे असहाय्य होते आणि संपूर्ण संघ फक्त १५२ धावांवरच गारद झाला. टँगने ४५ धावांत ५ बळी घेत कहर केला.पहिल्या दिवशी २० विकेटपहिल्या दिवशी एकूण २० फलंदाज बाद झाले, त्यातील सर्व फलंदाज जलद गोलंदाजांनी बाद केले. सुमारे १२४ वर्षांनंतर अॅशेस कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा हा पहिला दिवस होता. यापूर्वी, जानेवारी १९०२ मध्ये याच मैदानावर २५ विकेट्स पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गमावलेल्या विकेट्सची ही सर्वाधिक संख्या होती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी २० किंवा त्याहून अधिक विकेट्स पडण्याची ही चौथी वेळ होती.इंग्लंडची फलंदाजी सपशेल अपयशीकांगारूंच्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करायला आलेल्या इंग्लंडची स्थिती ऑस्ट्रेलियापेक्षाही वाईट होती. कांगारू गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांनी एकप्रकारे शरणागती पत्करली आणि संपूर्ण संघ फक्त ११० धावांतच तंबूत परतला. संघाकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर गस अॅटकिन्सनने २८ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात इंग्लंडचे आठ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. मायकेल नेसरने शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर बोलँडने ३ बळी घेतले. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात एकही बळी न गमावता ४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे आता ४६ धावांची आघाडी आहे. मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून कांगारूमनी आधीच मालिका आपल्या नावावर केली आहे.कमिन्स आणि लायन बाहेरइंग्लंडकडून जोश टंगने ५ बळी घेतले. जोश टंगच्या चेंडूवर स्टीव स्मिथ बोल्ड झाला. टंगचा चेंडू थेट मधल्या स्टंपला लागला, स्वतः स्मिथही बाद झाल्याने आश्चर्यचकित झाला होता. स्टीव स्मिथ ३१ चेंडूंत ९ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ॲशेस मालिका जिंकली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाची मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स तिसरा कसोटी सामना खेळल्यानंतर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. तर अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आहे आणि त्याची शस्त्रक्रिया झाली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणीमुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी बीसीसीआयला वैभव सूर्यवंशी या तरुण प्रतिभेला लवकरात लवकर वरिष्ठ संघात स्थान देण्याची जोरदार मागणी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या करिअरचे उदाहरण देत श्रीकांत यांनी सांगितले की, सचिनने अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते व वैभवलाही त्याच प्रकारे संधी देण्याची वेळ आली आहे.टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असली तरी श्रीकांत यांचे मत आहे की, निवडकर्ते आता तरी वैभवच्या कामगिरीकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकतात व त्याला विश्वचषक संघात समाविष्ट करण्याचा विचार करू शकतात. ते म्हणाले, या तरुण खेळाडूला संधी देणे शक्य आहे. वैभव सूर्यवंशीने वयोगट क्रिकेट तसेच स्थानिक स्पर्धांमध्ये अतिशय जलद प्रगती केली आहे. त्याचे तंत्रज्ञान आणि धावांसाठी असलेली तळमळ इतरांपेक्षा वेगळे आहे, असे श्रीकांत यांचे निरीक्षण आहे. वैभवने वरिष्ठ खेळाडूंसमोरही क्षमता सिद्ध केली असून तो उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये सहज जुळवून घेऊ शकतो.विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करताना वैभवने इतिहास रचला. पहिल्याच लिस्ट ए सामन्यात त्याने फक्त ८४ चेंडूंमध्ये १९० धावा फटकावल्या आणि अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले. तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. श्रीकांत यांना वैभवच्या सातत्यपूर्ण कामगिरीने विशेष प्रभावित केले आहे.प्रतीक्षा न करता संधी देण्याची गरज : श्रीकांत पुढे म्हणाले, मी गेल्या वर्षीच सांगितले होते की त्याला टी-२० विश्वचषकासाठी संधी द्यावी. आता बराच उशीर झाला असेल, तरीही निवडकर्ते त्याला संघात घेऊ शकतात. या मुलामध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि त्याला लवकरात लवकर भारतीय संघात आणले पाहिजे. लोक त्याला आणखी वेळ द्या, आणखी खेळू द्या असे म्हणतात, पण सचिन तेंडुलकरनेही लहान वयातच पदार्पण केले होते, याकडे लक्ष वेधत श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, क्रिकेटमध्ये वैभवसाठीही असाच मार्ग अवलंबता येईल. प्रत्येक स्तरावर शतके करणाऱ्या या तरुणाला आता प्रतीक्षा न करता संधी देण्याची गरज आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

सेबीकडून लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा आता डुप्लिकेट प्रमाणपत्र घेणे झाले सोपे!

मुंबई: सेबीकडून एक महत्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बाजार नियामक सेबीने (Security Exchange Board of India SEBI) ५ लाखांपर्यंत सिक्युरिटीज पोर्टफोलिओ असलेल्या कागदपत्रांची पूर्तता सोपी व सुटसुटीत केली होती त्याची मर्यादा आता १० लाखांपर्यंत केल्याचे आपल्या अधिनियमात स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या सिक्युरिटीज डुप्लिकेट प्रमाणपत्र (Security Duplicate Certificate) मागणी केल्यास त्यांना त्वरित सोप्या सुटसुटीत प्रकियेतून जावे लागणार आहे. आधीच्या क्लिष्ट पद्धतीतून गुंतवणूकदारांना सुटका होईल. महत्वाची बाब म्हणजे १० लाखांपर्यंत सिक्युरिटीज असलेल्या गुंतवणूकदारांना ही सुट दिली असून सेबीने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी निर्णयापूर्वीच अर्ज केला आहे त्यांनाही ही तरतूद लागू होणार आहे.त्यामुळे डिमटेरियलायझेशन (Dematerialisation) प्रक्रियेत गुंतवणूकदारांचा वेळ, खर्च दोन्ही वाचणार आहे. सेबीने आपल्या नवीन धोरणात्मक प्रकियेत हा नवा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. खास बाब म्हणजे नोटरायझेशन (Notarisation) बाबतीतही छोट्या गुंतवणूकदारांची आता सुटका होणार आहे. म्हणजेच १०००० रूपयांपर्यंत बाँड खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना आता नोटरी करण्याची गरज नसल्याचेही सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. २५ मे २०२२ रोजी सेबीने हे परिपत्रक काढले होते. त्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा सेबीने हा निर्णय घेतला आहे.केवळ गुंतवणूकदारांना नाही तर सगळ्या सूचीबद्ध कंपन्यांना (Listed Companies) डिमटरेलायझेशनचे सगळे नवे नियम लगेच प्रकियेत लागू करण्याचेही निर्देश दिले आहेत. ज्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला असेल त्यांना पुन्हा कागदपत्रे नव्या नियमानुसार मागू नका असेही आदेश आरटीए (Registar and Transfer Agents RTAs) दिले असल्याचेही सेबीने नमूद केले आहे. त्यामुळे सेबीने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो गुंतवणूकदारांना यांचा फायदा होणार आहे. प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजात यात सुधारणा आल्याने अनेक भौतिक कागदपत्रे अथवा प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात वेगात जतन होणार आहेत. याविषयी नमूद करताना सेबीने म्हटले आहे की की,'जारी केल्या जाणाऱ्या डुप्लिकेट सिक्युरिटीज मूलतः डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असल्याने ही पावले बाजार प्रणालीमध्ये डिमटेरियलायझेशन वाढविण्यातही योगदान देतील.'हे सुधारित फ्रेमवर्क सेबीच्या २५ मे २०२२ रोजीच्या पूर्वीच्या परिपत्रकानुसार आहे असेही सेबीने अंतिमतः स्पष्ट केले आहे. त्या पूर्वीच्या परिपत्रकात डुप्लिकेट सिक्युरिटीज प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या आणि कार्यपद्धतीच्या आवश्यकता तसेच मर्यादा विहित केल्या होत्या. ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी, सेबीने विद्यमान नियमांचे पुनरावलोकन (Review) केला असून सुधारित मर्यादा व कागदपत्रांच्या नव्या नियमाची प्रस्तुती यानिमित्ताने केली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ‘कॅप्टन कूल’ला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या माजी खेळाडूंच्या सन्मानार्थ व त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पेन्शन योजना राबवते. २०२२ मध्ये या योजनेत मोठी सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत वाढ झाली आहे. २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन मिळते. माजी कसोटी क्रिकेटपटूला दरमहा ६० हजार रुपये, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दरमहा ३० हजार रुपये व महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुला दरमहा ५२ हजार ५०० रुपये पेन्शन दिली जाते. धोनीने कारकिर्दीत ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने व ९८ टी-२० सामने खेळले आहेत. नियमांनुसार, ज्या खेळाडूंनी २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत, त्यांना सर्वोच्च पेन्शन मिळते. या निकषानुसार, बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला ७० हजार रुपये पेन्शन देते.धोनीची संपत्ती १ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून खेळला, ज्यासाठी त्याला ४ कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. कसोटी सामने, एकदिवसीय सामने तसेच क्रिकेटमधील योगदानाबद्दल मिळणारा हा पेन्शनचा निधी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानाचे प्रतीक मानला जातो.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्यानंतर शहरातील अनेक ठिकाणचे कबुतरखाने बंद करण्यात आले. यामध्ये दादर येथील कबुतरखाना जास्त वादग्रस्त ठरला. कबुतरखान्यावरील बंदी उठण्यासाठी अनेक आंदोलनदेखील करण्यात आली. धार्मिक भावना दुखावल्यामुळे जैन समाजही आक्रमक झाला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. याप्रकरणाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी काही जण दादरच्या कबुतरखान्याजवळ येऊन दाणे टाकत होते. या प्रकारावर पालिकेने कारवाई करण्यासाठी एका व्यक्तीला दंड ठोठावला आहे.दादर परिसरात राहणारे व्यापारी नितीन शेठ कबुतरखान्याजवळ दाणे टाकत असल्यामुळे पालिकेने त्यांची दखल घेतली. यामध्ये न्यायालयानेही त्यांना दोषी ठरवले आणि दंड ठोठावला. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे झालेली शिक्षा, अशाप्रकारची ही देशातील पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे. नितीन शेठ हे दादर परिसरातील व्यापारी असून स्थायिक आहेत. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्यात आल्यानंतरही त्यांनी कबुतरांना दाणे टाकले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. नितीन यांनीसुद्धा आपली चूक कबूल केली. पोलिसांनी सांगितले की हा व्यापारी सार्वजनिक ठिकाणी बंदी घातलेली असतानाही कबुतरांना दाणा टाकत होता. तक्रारी आधारे या व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली.https://prahaar.in/2025/12/27/state-public-service-commissions-mega-recruitment-drive-find-out-the-last-date-to-apply-eligibility-criteria-and-vacancies/याप्रकरणी कोर्टाने नितीन यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी हा निकाल दिला. भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (ब) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. व्यापाऱ्याने लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहचवल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय बीएनएसचे कलम २७१ अंतर्गत आरोग्याला घातक आजार पसरवल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला.या निकालपत्रात कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची शिक्षा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. हे एक उदाहरण आहे. त्यामुळे लोकांनी भविष्यात असे कृत्य करु नये असे मत न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले. बृहन्मुंबई महानगरपालिकाने यापूर्वीच कबुतरांना दाणे टाकण्यावर प्रतिबंध घातला आहे. ऑगस्ट महिन्यात याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रतिबंध कायम ठेवला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

Japan : जपानमध्ये ५० वाहनांचा थरारक साखळी अपघात! एक्स्प्रेस वेवर वाहनांचे जळते लोळ; एका महिलेचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी

टोकियो : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच जपानमध्ये एका भीषण अपघाताने शोककळा पसरली आहे. जपानमधील एका मुख्य महामार्गावर खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातानंतर वाहनांना भीषण आग लागली, ज्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर २६ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जपानमध्ये सध्या वर्षा अखेरच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आणि घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. परिणामी, महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, अचानक झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले आणि वेगवान वाहने चालकांचा ताबा सुटून एकमेकांवर आदळली. या धडकेनंतर काही क्षणातच गाड्यांनी पेट घेतला आणि महामार्गावर आगीचे लोळ दिसू लागले.मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील बर्फामुळे वाहने घसरून हा साखळी अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, अग्निशमन दल पोहोचेपर्यंत अनेक वाहने जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या २६ प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून तातडीने रस्ता रिकामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस बर्फवृष्टीचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. सुट्ट्यांच्या उत्साहात झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण जपानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.७७ वर्षीय महिलेचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी関越で事故に巻き込まれ明日のスノボが pic.twitter.com/pmHpODSo0G— りく (@Lc2BESpn5JG0MTk) December 26, 2025जपानची राजधानी टोकियोपासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुन्मा प्रांतातील प्रीफेक्चरमधील कान-एत्सु एक्सप्रेसवेवर शुक्रवारी रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. निसरडा रस्ता आणि खराब हवामानामुळे तब्बल ५० हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण टकरीनंतर गाड्यांनी पेट घेतल्याने संपूर्ण महामार्गावर आगीचे साम्राज्य पसरले होते. या दुर्घटनेत एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले आहेत.एकामागून एक ५० गाड्या आदळल्या; महामार्गावर अग्नितांडवमुसळधार बर्फवृष्टीमुळे एक्स्प्रेस वेवर दृश्यमानता कमी झाली होती. सुरुवातीला काही ट्रकची एकमेकांना जोरदार धडक बसली, मात्र रस्ता निसरडा असल्याने मागून येणाऱ्या वेगवान गाड्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. पाहता पाहता ५० हून अधिक वाहने एकावर एक आदळली. या धडकेनंतर भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक वाहनांचा कोळसा झाला. पाच जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड कसरत करावी लागली. तब्बल सात तासांच्या थरारानंतर आग विझवण्यात यश आले. आश्चर्याची बाब म्हणजे, वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी, सुदैवाने आगीत होरपळून अधिक जीवितहानी झाली नाही. मात्र, या साखळी अपघाताने एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 11:10 am

जपानच्या एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; ५० हून अधिक वाहनांची एकमेकांना धडक

Japan Road Accident। वर्षाची सांगता होत असताना जपानला एका भयानक रस्ते अपघाताने हादरवून टाकले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाच्छादित एक्सप्रेसवेवर वाहनांची एक लांब रांग लागली होती. याच वाहनांची एकमेकांवर जोरदार टक्कर झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि डझनभर जण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या […] The post जपानच्या एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; ५० हून अधिक वाहनांची एकमेकांना धडक appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 11:02 am

वोलोदिमिर झेलेन्स्की-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उद्या भेट ; दोन्ही देशातील युद्ध संपणार ?

Russia Ukraine War। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की रविवारी फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा पल्लवित झाल्यात. या भेटीत युक्रेनसाठी सुरक्षा हमींवर चर्चा होईल असे झेलेन्स्की यांनी सांगितले. तसच २० कलमी शांतता योजना लवकरच अंतिम केली जाईल असही त्यांनी सांगितलय. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील ही बैठकअसा […] The post वोलोदिमिर झेलेन्स्की-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उद्या भेट ; दोन्ही देशातील युद्ध संपणार ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 10:36 am

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे'१० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल केवळ प्रशासकीय नसून त्यांचा थेट संबंध तुमच्या खिशाशी, मासिक बजेटशी आणि पाकीटाशी असणार आहे. बँकिंग सवयींपासून ते सोशल मीडियाच्या वापरापर्यंत सर्वच क्षेत्रात नवीन वर्षात मोठी क्रांती पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षात बँकिंग क्षेत्रातील नियमांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँक काही महत्त्वाचे बदल लागू करू शकते. यामध्ये डिजिटल पेमेंटवरील सुरक्षा मानके (Security Standards) आणि ऑनलाइन ट्रांजॅक्शनवरील शुल्कात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यूपीआय (UPI) व्यवहारांबाबतचे काही नवीन तांत्रिक बदल सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करू शकतात. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घेणे अनिवार्य ठरेल. केवळ शहरी जीवनच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतही बदलांचे वारे वाहणार आहेत. शेतकरी वर्गासाठी विविध योजनांच्या लाभ हस्तांतरणाचे (DBT) नियम अधिक कडक आणि सुटसुटीत केले जाणार आहेत. दुसरीकडे, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि डेटा प्रायव्हसीसाठी कडक कायदे अमलात येतील. फेक न्यूज आणि सायबर फसवणुकीला लगाम घालण्यासाठी नवीन वर्ष २०२६ हे निर्णायक ठरणार आहे.https://prahaar.in/2025/12/27/this-is-a-blow-to-the-basic-structure-of-the-constitution/१ जानेवारी २०२६ पासून 'हे' १० बदल होणार१. डिजिटल रेशन कार्ड: हेलपाटे आता बंद!रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे आता पूर्णपणे ऑनलाइन होणार आहेत. नवीन नाव नोंदवणे असो किंवा दुरुस्ती, आता सरकारी कार्यालयांत चकरा मारण्याची गरज उरणार नाही. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.२. शेतकरी मित्रांसाठी 'फारमर आयडी' सक्तीचीशेतकऱ्यांसाठी आता 'युनिक फारमर आयडी' बंधनकारक करण्यात आली आहे. ही आयडी नसल्यास 'पीएम किसान' योजनेचा हप्ता अडकू शकतो. आनंदाची बातमी म्हणजे, आता वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई सुद्धा पीक विमा योजनेत (PMFBY) समाविष्ट करण्यात आली आहे.३. बँकिंग आणि क्रेडिट स्कोर: वेगवान अपडेटआता तुमचा क्रेडिट स्कोर (CIBIL) अपडेट होण्यासाठी १५ दिवस वाट पाहावी लागणार नाही, तर तो अवघ्या ७ दिवसांत अपडेट होईल. तसेच, SBI सह इतर बँकांचे नवीन व्याजदर लागू झाल्यामुळे तुमच्या EMI मध्ये बदल होऊ शकतो.४. शाळांमध्ये 'डिजिटल अटेंडन्स'शिक्षण क्षेत्रात शिस्त आणण्यासाठी आता सरकारी शाळांमध्ये शिक्षकांसाठी डिजिटल हजेरी सक्तीची होणार आहे. यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवर थेट नजर ठेवली जाईल आणि पारदर्शकता वाढेल.५. मुलांसाठी सोशल मीडियाचे नियम कडकसायबर सुरक्षा लक्षात घेता, १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सरकार नवीन कडक नियमावली (Age Verification) आणण्याची शक्यता आहे. यामुळे पालकांना मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर नियंत्रण ठेवता येईल.६. गॅस सिलिंडरच्या दरात दिलासा?दर महिन्याच्या १ तारखेप्रमाणे, १ जानेवारीला गॅसचे नवीन दर जाहीर होतील. व्यावसायिक सिलिंडरपाठोपाठ घरगुती गॅस (LPG) सिलिंडरच्या किमतीतही कपात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.७. केंद्रीय कर्मचाऱ्यांची 'लॉटरी': ८ वा वेतन आयोग!१ जानेवारी २०२६ ही तारीख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरू शकते. या दिवसापासून ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची चर्चा आहे, ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते.८. सीएनजी आणि पीएनजी होणार स्वस्तसरकारच्या नवीन 'टॅक्स झोन सिस्टम' मुळे १ जानेवारीपासून सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या किमती कमी होऊ शकतात. यामुळे तुमचा प्रवास आणि घरातील स्वयंपाक दोन्ही स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.९. पॅन-आधार लिंकिंगची 'डेडलाईन'जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर १ जानेवारीपासून तुमचे पॅन कार्ड 'निष्क्रिय' होऊ शकते. यामुळे बँक खाते उघडणे, आयटी रिटर्न भरणे किंवा मोठे व्यवहार करणे कठीण होईल.१०. सायबर फसवणुकीला बसणार लगामडिजिटल फसवणूक रोखण्यासाठी UPI आणि सिम कार्ड पडताळणीचे नियम अधिक कडक होणार आहेत. संशयास्पद बँक खात्यांवर आणि मोबाईल नंबरवर विशेष नजर ठेवली जाईल, ज्यामुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंदनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक 'टर्निंग पॉइंट' ठरले आहे. नाममात्र जीडीपीनुसार भारताने जपानला मागे सारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकावला आहे. याच काळात देशातील जॉब मार्केटमध्येही अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली असून, एका वर्षात तब्बल ९ कोटींहून अधिक नोकरीचे अर्ज प्राप्त झाले आहेत.'अपना.को' यांच्या 'इंडिया अॅट वर्क २०२५' अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकरीसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमागे मेट्रो शहरांपलीकडे वाढलेली सेवा क्षेत्रे, महिलांचा वाढता सहभाग आणि डिजिटल रिक्रूटमेंट टूल्सचा वापर ही प्रमुख कारणे आहेत.या वर्षात नोकरी शोधणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः फायनान्स, प्रशासन, आरोग्यसेवा आणि कस्टमर एक्सपिरियन्स यांसारख्या क्षेत्रांत महिलांकडून येणाऱ्या अर्जांमध्ये ३६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 'पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे'नुसार, अधिकाधिक महिला आता औपचारिक आणि संरचित करिअर मार्गाकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.भारताची युवाशक्ती रोजगार बाजारपेठेत आपले वर्चस्व सिद्ध करत आहे. सेवा आणि तंत्रज्ञान आधारित उद्योगांमध्ये तरुणांकडून येणाऱ्या अर्जांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरवर्षी जवळपास १ कोटी तरुण नवीन नोकरीच्या शोधात कार्यबलात सामील होत असून, त्यांच्यामुळे भरती प्रक्रियेला मोठी गती मिळत आहे.महत्त्वाचे मुद्दे :अर्थव्यवस्था : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली.एकूण अर्ज: ९ कोटींहून अधिक (२९% वार्षिक वाढ).महिला सहभाग: ३६% अर्जांमध्ये वाढ.तरुण शक्ती: दरवर्षी १ कोटी नवीन तरुण रोजगाराच्या प्रवाहात.या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत नसून, रोजगाराच्या बाबतीतही एक सक्षम आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभे राहत आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

राज्य सेवा आयोगाची मेगाभरती! जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि जागा

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत चर्चा सुरू असुन भरतीच्या बातम्यांबाबत उत्सुकता असते. तुम्ही जर आयोगाच्या भरतीसाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे राज्य सेवा (सामान्य प्रशासन विभाग) आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा (महसूल व वन विभाग) यांमध्ये एकूण ८७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ पर्यंत आहे.या भरती प्रक्रियेत एकूण ८७ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सेवेतील ७९ आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेतील ८ जागांचा समावेश आहे. अर्जदार ३१ डिसेंबर २०२५ पासून २० जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ऑनलाईनसाठी २० जानेवारी २०२६ असून, एसबीआय चलनद्वारे ऑफलाईन शुल्क २३ जानेवारी २०२६ पर्यंत भरता येईल. या भरतीमध्ये खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ आरक्षणाचाही समावेश आहे. आयोगाने सादर केलेल्या जाहिरातीनुसार, भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. पूर्व परीक्षा, लेखी मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतील. ज्यात पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जाणार असून अंतिम निकालात त्यांचा समावेश नसेल.https://prahaar.in/2025/12/27/new-year-2026-news-10-rules-many-rules-changing-from-the-new-year/राज्य सेवेत भरल्या जाणाऱ्या जागेमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ पदासाठी १३ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ साठी ३२ जागा, सहायक गट विकास अधिकारी गट-ब साठी ३० जागा, उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब साठी ४ जागा आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ साठी ८ जागा भरल्या जातील. उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब या पदासाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा विज्ञान शाखेची पदवी आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेनुसार, राज्य सेवा परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी (किमान ५५% गुणांसह), सनदी लेखापाल (CA) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, परिव्यय लेखाशास्त्र अंतिम परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य पदव्युत्तर पदवी किंवा वित्त व्यवसाय प्रशासन (MBA) पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदाकरिता पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक पदवी आवश्यक असून, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९७१ नुसार नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळीनवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने जिंकत एकतर्फी मालिका विजय नोंदवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांसह शफाली वर्माने वादळी कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्मा अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेच्या संघाला एकटीच भारी पडली. यासह पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने ३-० च्या फरकाने जिंकली आहे.दोन सामने विशाखापट्टणममध्ये खेळवल्यानंतर तिसरा सामना तिरुअनंतपुरम खेळवला गेला व या सामन्यातही भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यासह श्रीलंकेचा संघ ११२ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १३.२ षटकांत सामना जिंकला.श्रीलंकेने दिलेल्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती-शफाली फलंदाजीला उतरल्या. स्मृती मानधना तिसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली व १ धाव करत पायचीत होत बाद झाली. तर शफाली वर्माने गेल्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवत २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा रॉड्रीग्ज ९ धावा करत बाद झाली. शफाली वर्माने या सामन्यात ४२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची वादळी खेळी केली. शफाली वर्माला कर्णधार हरमनप्रीत कौरने चांगली साथ दिली. हरमनप्रीतने २१ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाने दणदणीत विजय मिळवला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने सुरुवात चांगली केली, पण मोठी धावसंख्या पुन्हा एकदा अपयशी ठरली. कर्णधार चमारी अट्टापटू लवकर बाद झाली. तर हसीनी परेराने २५ धावांची चांगली खेळी केली. तर इमेशा दुलानी २७ व कविशा दिल्हारी यांनी २० धावांची खेळी केली. कौशिनीने १९ धावांचे योगदान दिले. एकही खेळाडू अर्धशतक करू शकला. तर भारताकडून रेणुका सिंग ठाकूर व दीप्ती शर्माने उत्कृष्टगोलंदाजी केली. रेणुका सिंगने ४ षटकांत २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. यासह दीप्ती शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

२००० कोटीपेक्षा अधिक मोठा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेकडून उघड

मोहित सोमण: पंजाब नॅशनल बँकेने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये मोठा घोटाळा उघड केला आहे. दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांनी २००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा केल्याचे स्पष्ट केले आहे. शुक्रवारी उशीरा एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत पीएनबी (Punjab National Bank) म्हटले आहे की, सेबीच्या कलम ३० एलओडीआर (LODR Act 2015) कायद्याच्या पूर्ततेनुसार बँकेने आरबीआयला संबंधित प्रवर्तकांनी केलेल्या घोटाळ्याची माहिती दिली आहे.' असे म्हटले आहे. एसईएफएल (SREI Equipment Finance SEFL) व एसआरईआय (SREI Infrastructure Finance Limited) या दोन कंपनीच्या प्रवर्तकांनी अनुक्रमे १२४०.९४ व ११९३.०६ कोटींच्या केलेल्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एनसीएलटीने यावर यापूर्वीच कार्यवाही सुरू केली होती. बँकेने त्याची माहिती आरबीआयच्या पूर्ततेसाठी दिली असल्याचे एक्सचेंजला कळवले आहे.दोन्ही कंपन्यांनी २०२१ वर्षाच्या सुमारास संबंधित रक्कमेचे कर्ज काढले होते. परंतु दोन्ही प्रवर्तकांनी ही १००% रक्कम अद्याप भरली नसल्याचे बँकेने म्हटले. यानंतर एसआरईआय (SREI Infrastructure Finance Limited) कंपनीच्या दिवाळखोरीनंतर एनसीएलटीने (National Company Law Tribunal NCLT) दिवाळखोरी प्रस्तावावर काही यशस्वी ठराव मांडला होता. त्यानंतर कंपनीच्या पुनर्वसनासाठी एनएआरसीएल (National Asset Reconstruction Co NARCAL) कंपनीने आपल्या दिलेल्या माहितीनुसार, या यशस्वी प्रस्तावानुसार जुने संचालक मंडळ बरखास्त करून नवे संचालक मंडळ बनवले गेले आहे.उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये आरबीआयने प्रवर्तकांविरोधात दिवाळखोरीची प्रकिया सुरू केली होती. त्यानंतर २८००० कोटींच्या प्रलंबित थकबाकीवर कार्यवाही करण्यापूर्वी आरबीआयने दोन्ही कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. दुसऱ्या तिमाही दरम्यान बँकेचे एनपीए (Non Performing Assets NPA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४७५८२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४०३४३ कोटींवर घसरले होते. असे असले तरी बँकेने ६४८ कोटींची राखीव तरतूद (Provision) नफापूर्व पातळीवर केली होती. दरम्यान पहिल्या तिमाहीत बँकेने ३९०९ कोटींची वसूली केली होती.पीएनबी भारतातील पहिल्या तीन सरकारी पीएसयु बँकापैकी एक बँक ओळखली जाते. सध्या बँकेच्या १०२२८ पेक्षा अधिक स्थानिक शाखा व २ आंतरराष्ट्रीय शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या मुख्य शाखांची अधिक संख्या ग्रामीण व निमशहरी भागात तब्बल ६३.३% आहे. काल बँकेच्या शेअर्समध्ये ०.५% घसरण झाली असून बँकेचा शेअर १२०.३५ रुपये प्रति शेअरवर बंद झाला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:30 am

ठाण्यात भाजप-शिवसेना युतीवर आजची डेडलाईन

भाजप स्वबळावर जाण्यास तयारठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाण्यात भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही, असा प्रश्न चर्चेत आहे. भाजपकडून शिवसेनेला उद्याची डेडलाईन देण्यात आली आहे. उद्यापर्यंत चर्चा झाली नाही तर परवा पासून भाजप स्वबळावर लढण्यास मोकळे असल्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले. ठाण्यात युती विना किंवा युतीसह भाजप दोन्हीसाठी तयार असल्याचे मत आ.केळकर यांनी व्यक्त केले. आतापर्यंत झालेल्या चर्चेत काहीही निष्पन्न झाले नाही. शिवसेना उद्या तरी चर्चेला जाणार का? यावर ठाण्यातील युतीचे भविष्य अवलंबून आहे. युतीच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्याच्यातून फारसे काहीही निष्पन्न झालेले नाही. उद्याची डेडलाईन आम्ही दिलेली आहे असे केळकर यांनी स्पष्ट केले.दरम्यान, भाजपने ठाण्यात घरोघरी प्रचार सुरू केला आहे. ''युतीसाठीचा फॉर्म्युला आम्ही पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली आहे. प्रदेश अध्यक्षांकडे ज्या काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत. जे काही भाजपाला युतीसंदर्भातील तपशील आहे तो त्यांना दिलेला आहे. आम्ही त्यांना सांगितले आहे की, उद्यापर्यंत निर्णय घ्यावा. ठाण्यात लोकांना युतीसह किंवा स्वतंत्रपणे लढण्याची सवय आहे. २०१७ ला स्वतंत्रपणे लढले होते. त्याआधी दोन वेळेला स्वतंत्रपणे लढले, तीन वेळा युतीसह लढले. त्याच्यामुळे मला असे वाटत नाही की ही स्फोटक अशी गोष्ट नाही. दोन्हींसाठी लोकांना सवय आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही पर्यायांसाठी सज्ज आहोत.''असे आ. केळकर म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट झाली होती. मात्र, आ.केळकरांनी सूचक वक्तव्य केल्याने ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का नाही? हे चित्र स्पष्ट होणे गरजेचे आहे. ठाण्यात भाजप-शिवसेना युती होईल की स्वतंत्र लढणार, हे उद्याच्या चर्चेनंतरच स्पष्ट होणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

मीरा-भाईंदरमध्ये आम्ही ८७ जागा लढवू !

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अटी; महायुतीत खळबळभाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेसमोर कठोर अटी ठेवल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या अटी मान्य न झाल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल, असा थेट इशाराच मेहता यांनी दिल्याने मीरा–भाईंदरमधील भाजप–शिवसेना युती धोक्यात आल्याचे चित्र आहे. पत्रकार परिषदेत मेहता यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत गेल्या महिनाभरात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांना फोडण्यात आल्याचा दावा केला. शिवसेनेने पक्षात घेतलेले भाजपचे सर्व कार्यकर्ते तात्काळ सन्मानपूर्वक परत करावेत, ही पहिली आणि महत्त्वाची अट त्यांनी मांडली. युती टिकवायची असेल, तर कार्यकर्त्यांची पळवापळवी थांबली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.शिवार गार्डनच्या जागेवरून वाद : दुसरी अट मीरा–भाईंदरमधील शिवार गार्डनच्या जागेशी संबंधित आहे. ही जागा शिंदे गटाच्या एका स्थानिक नेत्याने महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचा आरोप मेहता यांनी केला. ही जागा तात्काळ महापालिकेला परत देऊन तेथे नागरिकांसाठी सार्वजनिक टाउन पार्क विकसित करावे, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावरून भाजप–शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.जागावाटपावरून तणाव: जागावाटपावर बोलताना मेहता यांनी भाजपची ताकद अधोरेखित केली. भाजपने ६६ जागा स्वतःसाठी निश्चित केल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा देण्याचे ठरले आहे. उर्वरित २१ जागांपैकी शिवसेनेला केवळ १० ते १२ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेला ही संख्या मान्य होण्याची शक्यता कमी आहे. अटी मान्य न झाल्यास भाजप सर्व ८७ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल, असा अंतिम इशाराही मेहता यांनी दिला.सरनाईक–मेहता बैठकीकडे लक्ष : या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अटींवर तोडगा निघतो की महायुतीचा तिढा अधिकच वाढतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

Ekvira Devi Karla : आई एकवीरा देवीच्या खजिन्यावर अध्यक्षांचा डल्ला? दागिने आणि रोकड हडपल्याचा पुजाऱ्याचा खळबळजनक आरोप!

लोणावळा : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान (Ekvira Devi Karla) ट्रस्टमध्ये गेल्या काही काळापासून गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा खुद्द देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यांसह ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. देवीच्या चरणी येणाऱ्या दानावर डल्ला मारला जात असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पुजारी गणेश देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार, भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंमध्ये मोठी अफरातफर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, देवस्थानच्या मालकीची गाडी ट्रस्टच्या कामाऐवजी स्वतःच्या खासगी आणि राजकीय कामांसाठी वापरली जात असल्याचा ठपकाही अध्यक्षांवर ठेवण्यात आला आहे. देवीच्या संपत्तीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला जात आहे, असा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला आहे.https://prahaar.in/2025/12/27/in-the-match-against-sri-lanka-shafali-excelled-she-became-the-third-fastest-batter-to-score-a-half-century-in-the-history-of-indian-womens-t20-cricket/व्हीआयपी दर्शनाचा 'बनावट पावती' स्कॅम!या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी भक्तांची होणारी लूट. देवस्थानच्या अधिकृत यंत्रणेला बगल देऊन बनावट पावती पुस्तके छापण्यात आली असून, त्याद्वारे भाविकांकडून रोख रक्कम उकळली जात असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. हा एक मोठा आर्थिक घोटाळा असून यामध्ये अनेक जण सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व गैरव्यवहारांबाबत पुजारी गणेश देशमुख यांनी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कोट्यवधी रुपयांची ही अफरातफर उघड करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे कार्ला गडावर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून, देवस्थानच्या प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राजकीय हेतूने बदनामी, दीपक हुलावळे यांचे स्पष्टीकरणप्रसिद्ध कार्ला एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांवर करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अफरातफरीच्या आरोपांनंतर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या सर्व प्रकरणावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी आपली मौन सोडले असून, हे सर्व आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील तक्रारदार पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आरोपांची सरबत्ती केली होती. देवस्थानच्या मालकीच्या महागड्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर गाड्यांचा वापर देवीच्या कामासाठी होण्याऐवजी अध्यक्षांकडून वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जात आहे, असा दावा त्यांनी केला होता. गाडीच्या गैरवापरासोबतच सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधील अफरातफर आणि बनावट पावत्यांचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आपल्यावर होत असलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना दीपक हुलावळे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस किंवा माहिती मिळालेली नाही. सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने जाणीवपूर्वक ही चिखलफेक केली जात आहे, असे हुलावळे यांनी म्हटले आहे. तसेच, योग्य वेळ आल्यावर सर्व पुराव्यानिशी आपण माध्यमांसमोर आपली बाजू मांडू, असे स्पष्टीकरण देत त्यांनी तूर्तास अधिक बोलणे टाळले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

श्रीवर्धन नगर परिषदेत ‘गड आला, पण सिंह गेला’

नगरध्यक्षपदी उबाठाचा नगराध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवकश्रीवर्धन निवडणूक चित्ररामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीच्या चुरशीच्या निव़डणुकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती युतीची झाली. उबाठाचे रायगडमधील अस्तित्व संपले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मनसेच्या पाठिंब्यावर उबाठाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले यांनी बाजी मारीत ते नगराध्यक्ष पदी निवडून आले. त्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलले असून, या निवडणुकीत युतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५, भारतीय जनता पक्षाचे २, तर स्वतंत्र शिवसेना शिंदे गटाचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती, तर शिवसेना उबाठा गटाने राष्ट्रीय काँग्रेसला सोबत घेत निवडणूक लढवली होती. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. पैकी शिंदे गटाला तीन जागा मिळाल्या, तर शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही. श्रीवर्धन नगर परिषदेच्या मागील राजकीय इतिहासाकडे पाहता, याआधी प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते. मात्र यंदा काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्याने काँग्रेस पूर्णतः बाहेर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, मात्र यंदा भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्याने ‘भाजप इन’ झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. या निकालानंतर श्रीवर्धन नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष, तर सत्तास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस–भाजप व विरोधी बाकावर शिंदे गटाचे समीकरण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उबाठा गटाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, स्वतः नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी या चर्चांना पूर्णविराम देत कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे ठामपणे जाहीर केले आहे.नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी नगर परिषदेत यापुढे पारदर्शक कारभार केला जाईल, निकृष्ट दर्जाच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊनच शहराच्या विकासाची कामे केली जातील, असे स्पष्ट करतानाच निवडणुकी दरम्यान सोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे, तसेच जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांनी जाहीर आभार मानले.त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचेही आभार मानले असून, हे कार्यकर्ते कोण हा मोठा विषय रंगत असून, खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान देणाऱ्या या कार्यकर्त्यांचा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचार होईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धनच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीमुळे नवे समीकरण उदयास आले असून, आगामी काळात नगर परिषदेत सत्तेचा खेळ अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

उरण नगर परिषद नगराध्यक्ष निवडीत भाजपला धक्का

उरण निवडणूक चित्रविशाल सावंत उरण : उरण नगर परिषद निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या निवडीत भाजपची स्थिती ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. या नगर परिषदेवर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा शाह यांना पराभवाचा धक्का बसला.या नगर परिषदेत एक हाती भाजपची सत्ता होती. मात्र यावेळच्या उरण नगर परिषदेच्या चुरशीच्या निवडीत भाजपकडून ही नगरपालिका निसटली आहे. तेथे भाजपला २१ पैकी १२, तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. उरणमध्ये महाविकास आघाडीने जोर लावल्याने महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने भाजप आमदार महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे. उरण तालुक्यात भूमिपुत्रांचा रोष हा भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या केलेल्या उमेदवार शोभा शाह यांना मतदारांनी साफ नाकारले आणि या अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत शोभा शाह यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले, असले, तरी या नगर परिषदेत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले. ही संख्या सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे पुरेशी असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे.या निवडणुकीदरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार बाळ्या मामा असो किंवा जितेंद्र आव्हाड असो, स्वतः या नेत्यांनी या निवडणुकीत थेट सहभाग घेतला होता. दुसरीकडे आमदार महेश बालदी यांनी पूर्णपणे जोर लावला असतानाही भाजपला आपले नगराध्यक्ष पद गमवावे लागले. खरे तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे होतेच; परंतु येथे जातीचे, प्रांतवादाचे मुद्देही निर्णायक ठरले, तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनाही भाजपने विचारात न घेता, भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरला होता. त्याचा परिणाम म्हणून बंडखोर उमेदवार यांनी भाजपची मते आपल्याकडे खेचल्याचे बोलले जाते. गेली १५ ते २० वर्षांची भाजपची सत्ता उलथून एक महिला षंडू ठोकून उभी राहिली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार स्वीकारला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

स्वीकृत सदस्यत्वासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’

चार ठिकाणी १० नगरसेवकांना संधीगणेश पाटील पालघर : जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत ४ नगराध्यक्षांसह ९४ नवे नगरसेवक निवडून आले आहेत. आणि आता याच नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये स्वीकृत १० सदस्यांची ( नगरसेवक) निवड केली जाणार आहे. त्यामुळे थेट निवडणुकीतून नाही जमले, मात्र स्वीकृत सदस्य म्हणून तरी पालिकेत जाता यावे यासाठी, अनेकांनी आपापल्या राजकीय नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये नामनिर्देशित सदस्य निवडण्याबाबत त्यांची पात्रता आणि नियुक्त्या करण्याची पद्धत शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा ५ यापैकी जी संख्या कमी असेल तितके स्वीकृत सदस्य नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये निवडल्या जातात. या नियमानुसार पालघर नगर परिषदेच्या ३० नगरसेवकांच्या संख्येनुसार या ठिकाणी ३ स्वीकृत सदस्य निवडल्या जातील. डहाणू नगर परिषदेमध्ये एकूण २७ नगरसेवकांच्या संख्येनुसार दहा टक्के हे प्रमाण २.७ येते.दरम्यान, एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ही संख्या पॉइंट ५ पेक्षा जास्त आल्यास त्याठिकाणी पूर्ण संख्या विचारात घेण्यात येते. त्यामुळे डहाणू नगर परिषदेमध्ये सुद्धा ३ स्वीकृत सदस्य निवडल्या जाणार आहेत. असेच गणित वाडा नगरपंचायतीला लागू पडते. परिणामी वाडा नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक असल्याने येथे सुद्धा २ स्वीकृत सदस्य निवडावे लागणार आहेत. जव्हार नगर परिषदेच्या नगरसेवकांची संख्या २० असल्याने या ठिकाणी २ स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. नव्या नगराध्यक्षासह नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. याच सभेत नगर परिषद उपाध्यक्षांची निवड करावी लागते. तसेच स्वीकृत सदस्यांची नावे देखील याच सभेत जाहीर केल्या जातात. तथापि, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर २५ दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित झाल्यानंतर त्या सभेच्या २४ तास पूर्वी राजकीय पक्ष, आघाडी किंवा गटाकडून स्वीकृत सदस्याचे नाव नामनिर्देशित करावे लागणार आहे. संबंधित नावांची छाननी जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. आणि पात्र नावे सभेचे पिठासीन अधिकारी म्हणजेच नगराध्यक्षांकडे पाठविले जातात. या अनुषंगाने नरसेवक होण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत जाण्यासाठी आपल्या नेत्यांकडे 'फील्डिंग' लावायला सुरुवात केली आहे.स्वीकृत सदस्य निवडीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्तीतीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी चार अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पालघर नगर परिषदेसाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी शाम मदनुरकर, डहाणू करिता सहा. जिल्हाधिकारी विशाल खत्री, जव्हार करिता सहा.जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आणि वाडा नगरपंचायतीसाठी वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

पास्थळ महोत्सव २०२५

'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि मीडिया पार्टनर 'दैनिक प्रहार'च्या संयुक्त विद्यमाने यंदा पालघरमध्ये मनोरंजनाचा आणि बक्षिसांचा महाकुंभ होणार आहे. पास्थळ व परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी पास्थळच्या आंबटगोड मैदानावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'दैनिक प्रहार पुरस्कृत' दोन विशेष भव्य स्पर्धा! यामध्ये महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' आणि तरुणाईसाठी 'लोकधारा नृत्य स्पर्धा' रंगणार असून, पैठणी साडी, रोख रकमा आणि घरगुती उपकरणांच्या रूपात बक्षिसांची मोठी लूट करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे.सहभागाचे आवाहन : जाणता राजा फाउंडेशन वर्षभर सामाजिक आणि क्रीडा कार्यात अग्रेसर असते. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश भरत, सचिव हितेश राऊत, खजिनदार निपुल घरत, सहसचिव जितेश घरत आणि सह-खजिनदार सौरभ घरत यांच्यासह सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी या महोत्सवाचा पास्थळ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.२७ डिसेंबर : चिमुकल्यांचा उत्साह आणि सुरेल सायंकाळमहोत्सवाचा शुभारंभ शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. पहिल्या दिवशी प्रामुख्याने बालकांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रंगभरण स्पर्धा : ४ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी. वेशभूषा स्पर्धा : ५ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळणार आहे. लाईव्ह आर्केस्ट्रा : सायंकाळी सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमात नागरिक मंत्रमुग्ध होतील.२८ डिसेंबर : 'दैनिक प्रहार' पुरस्कृत भव्य स्पर्धां आणि आकर्षक बक्षिसेमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर रोजी स्पर्धांचा खरा थरार अनुभवायला मिळेल. 'दैनिक प्रहार' पुरस्कृत दोन मोठ्या स्पर्धा यावेळी आकर्षण ठरणार आहेत.१. खेळ पैठणीचा (सायंकाळी ४:३० वा.)घरातील कर्तृत्ववान महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल पाच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे :१. प्रथम क्रमांक : सुंदर पैठणी साडी२. द्वितीय क्रमांक : डिनर सेट३. तृतीय क्रमांक : फ्राय पॅन४. चौथा क्रमांक : स्टायलिश पर्स५. पाचवा क्रमांक : सुवर्णदीप२. भव्य महाराष्ट्र लोकधारा (फोक डान्स) स्पर्धा (सायंकाळी ६.३० वा.)आपली संस्कृती आणि ऊर्जा दाखवण्यासाठी ही मोठी संधी आहे. विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख पारितोषिके व ट्रॉफी प्रदान करण्यात येतील. प्रथम क्रमांक : ७,५०० रुपये + आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांक : ५,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी तृतीय क्रमांक : ३,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भरनवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने दुपारच्या भोजनासोबत सकाळचा सकस नाश्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि कर्नाटक या राज्यांत यशस्वीपणे राबविलेल्या या उपक्रमानंतर आता देशातील इतर राज्यांनाही ही योजना अमलात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी दोन्ही राज्यांचे नियोजन व अंमलबजावणीचे मॉडेल सर्व राज्यांशी शेअर करण्यात आले असून, पीएम-पोषण योजनेच्या बैठकीत यासंदर्भातील स्वतंत्र कृतीआराखडा मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सकाळचा नाश्ता देण्याची ही संकल्पना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील (एनईपी) शिफारशींनंतर पुढे आली आहे. विविध अभ्यासांचा दाखला देत एनईपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सकस नाश्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि काही तासांपर्यंत अवघड विषय आत्मसात करण्याची क्षमता सुधारते. देशातील अनेक विद्यार्थी सकाळी उपाशीपोटीच शाळेत येतात, ही बाब लक्षात घेऊन ही शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात व कर्नाटक या राज्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे.गुजरातमध्ये ‘सीएम-पौष्टिक अल्पाहार योजना’अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज सुमारे २०० किलो कॅलरी ऊर्जा व ६ ग्रॅम प्रथिने मिळतील, असा नाश्ता दिला जातो. यात दूध व बाजरीसारख्या भरड धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना रागी हेल्थ मिक्स व दूध देण्यात येते, तसेच आठवड्यातून चार ते पाच दिवस अंडी व केळीही दिली जातात. मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांतील नाश्त्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला असून, इतर राज्येही हा उपक्रम सहज राबवू शकतील. सध्या देशात सुमारे २५ कोटी शालेय विद्यार्थी असून, सकाळच्या नाश्त्याच्या योजनेमुळे त्यांच्या आरोग्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.गुजरात, कर्नाटकातील मुलांना नाश्ता गुजरातमध्ये, मुलांना नाश्त्यात दररोज सरासरी २०० किलोकॅलरीज आणि ६ ग्रॅम प्रथिने देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये दूध आणि बाजरीसारखे संपूर्ण धान्य समाविष्ट आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री-पोषक स्नॅक्स योजना सुरू केली आहे, जी शाळांमध्ये नाश्त्याच्या वेळी दिली जाते. कर्नाटकमध्ये, मुलांना नाश्त्यात नाचणीचे आरोग्य मिश्रण आणि दूध देखील दिले जाते. आठवड्यातून चार ते पाच दिवस अंडी आणि केल देखील दिले जातात. हा कार्यक्रम राज्य सरकार, अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि श्री सत्य साई अन्नपूर्णा ट्रस्ट यांच्या सहकार्याने चालवला जात आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 10:10 am

कोल्हापूरात काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

Congress First List | कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. या यादीत २९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच […] The post कोल्हापूरात काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:55 am

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटण्यापासून ते कैलास खेरच्या लाईव्ह शोपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटली दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिस्कटल्याची माहिती आहे. घड्याळ की तुतारी, कोणत्या चिन्हावर लढायचं यावरुन ही युती फिस्कटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू […] The post पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा फिस्कटण्यापासून ते कैलास खेरच्या लाईव्ह शोपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:49 am

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. काल झालेल्या भारत विरूद्ध श्रीलंका तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने ८ विकेट घेत श्रीलंकेला पराभूत केले. तिरुअनंतपुरम येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला ११२ धावांवर रोखले. तर भारताने हे आव्हान १४ ओव्हरमध्येच पूर्ण केले. यामुळे आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. पण या सामन्यात केंद्र ठरली 'शफाली वर्मा'! तिने ४२ चेंडूंमध्ये ७९ धावांची खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांचा जास्त काळ टिकाव लागला नाही. सुरुवातीच्या ४५ धावांवर श्रीलंकेने ४ विकेट गमावल्या होत्या. इमेशा दुलानी २७ धावा आणि कविशा दिलहारी २० धावा असा भागीदारीचा खेळ करत श्रीलंकेने १०० धावांचा टप्पा पार केला. तर २० ओव्हरमध्ये श्रीलंकेने केवळ ११२ धावा केल्या.https://prahaar.in/2025/12/27/bhaijaan-enters-his-sixties-bandra-worli-sea-link-specially-illuminated-for-his-birthday/भारताची सुरुवातही चांगली झाली नव्हती. स्मृति मानधना पहिल्या धावेनंतर लगेच बाद झाली. तर जेमिमा रॉड्रिग्ज देखील ९ धावा करुन बाद झाली. मात्र दुसरीकडे शफाली वर्माने फटकेबाजी सुरु ठेवत २४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील टी 20 मधील हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. शफाली वर्माने एकूण ४२ चेंडूंमध्ये ७९ धावा केल्या. ज्यात तिने ११ चौकार आणि ३ षटकार मारले. महत्त्वाचे म्हणजे शफाली वर्माने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत ४८ धावांची भागीदारी करत विजय निश्चित केला.दरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचातही एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान तिला मिळाला आहे. आजपर्यंतच्या तिच्या श्रीलंकेविरुद्ध २० सामन्यांपैकी १६ सामने तिने जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चार्लोट एडवर्ड्स असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ पैकी १४ सामने जिंकले आहेत. यामुळे हरमनप्रीत महिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत कर्णधार म्हणून १३० पैकी ७७ सामने जिंकले असून तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे टाकले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:30 am

महायुतीचे मुंबईतील जागावाटप ठरले

आता उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू ; बावनकुळेमुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून, आता उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून महायुतीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे. तिढा जवळपास सुटला आहे. आमच्या जागांवर आम्ही उमेदवार अंतिम करत आहोत. ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील. पण ९० ते ९५ टक्के जागांवर कोणतीही अडचण नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.भाजपची मुंबईत १३ मित्रपक्षांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपाई, नागपुरातील जोगेंद्र कवडे आणि जयदीप कवडे यांच्याशीही संवाद सुरू आहे. त्या-त्या पातळीवर, त्या-त्या ठिकाणी, त्या-त्या पक्षाची क्षमता पाहून चर्चा सुरू आहे. या पक्षांना भाजप किंवा शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जातील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.शरद पवार एनडीएत येणार का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, एनडीएचे निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार केंद्रीय भाजपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा याविषयी ठरवतील. महाराष्ट्रात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-सेना महायुती म्हणून लढत आहोत. स्थानिक पातळीवर युती ठरत आहेत. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:30 am

भिवंडीसाठी ठाकरे बंधूंचे ठरले

पहिल्यांदाच सर्व ९० जागा लढणार, भाजप-शिवसेनेला आव्हानभिवंडी : भिवंडी महापालिकेत ठाकरेंची शिवसेना-मनसे एकत्र आल्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर काँग्रेस-पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. उबाठा आणि मनसेची युती निश्चित झाली आहे. या युतीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ९० जागा लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिवसेनेने भिवंडीत कधीही सर्व जागा लढवल्या नव्हत्या. त्यामुळे हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडीनंतर भिवंडीचा राजकीय आखाडा तापताना दिसत आहे. २०१७ च्या भिवंडी महापालिका सभागृहातील १२ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मनसेसोबत युती करत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.युतीच्या अंतिम सूत्रानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट ८० जागांवर, तर मनसे १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला मनसेकडून २० जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे आणि भिवंडी येथे झालेल्या बैठकीनंतर चर्चेअंती १० जागांवर एकमत झाल्याने जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना-मनसे युतीकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भिवंडी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची वरिष्ठ पातळीवर युती घोषित झाली आहे; परंतु स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यावेळी भिवंडी महापालिका निवडणूक बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाल्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भिवंडीत नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे भिवंडीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं दिसंतय.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:30 am

Breaking : तुतारीला ‘राम कृष्ण हरी’करत काँग्रेसचा हात धरलेल्या प्रशांत जगतापांची उमेदवारी अडचणीत ?

Prashant Jagtap | तुतारीला ‘राम कृष्ण हरी’ करत काँग्रेसचा हात धरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची काँग्रेसकडून उमेदवारी अडचणीत आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रभाग प्रभाग क्रमांक २५ मधील दोन्ही जागांवर पवार गटाने दावा केला आहे. तसेच या जागांचा निर्णय स्वतः सुप्रिया सुळे घेतील असेही काँग्रेस […] The post Breaking : तुतारीला ‘राम कृष्ण हरी’ करत काँग्रेसचा हात धरलेल्या प्रशांत जगतापांची उमेदवारी अडचणीत ? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 9:22 am

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णयनवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी दोन ऐतिहासिक निर्णय घेतले. एकीकडे चीनमधून होणाऱ्या स्वस्त आयातीला रोखण्यासाठी 'अँटी-डंपिंग' शुल्क लागू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे कोळसा आणि लिग्नाइट खाणी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत केली आहे.चीनकडून होणाऱ्या स्वस्त आणि अयोग्य आयातीमुळे भारतीय उत्पादकांचे मोठे नुकसान होत होते. यावर लगाम लावण्यासाठी वित्त मंत्रालयाने चीनच्या दोन प्रमुख उत्पादनांवर पुढील पाच वर्षांसाठी अँटी-डंपिंग शुल्क लागू केले आहे.कोळसा खाणींसाठी ‘लालफितीचा कारभार’ संपणारकेंद्र सरकारने ‘कोलियरी कंट्रोल रूल्स, २००४’ च्या नियम ९ मध्ये सुधारणा केली आहे. या बदलामुळे कोळसा आणि लिग्नाइट खाणी सुरू करणे अधिक सोपे होणार आहे. यापूर्वी खाण सुरू करण्यासाठी किंवा १८० दिवसांहून अधिक काळ बंद असलेली खाण सुरू करण्यासाठी ‘कोळसा नियंत्रक संघटनेची’ पूर्वपरवानगी अनिवार्य होती. आता ही अट रद्द करण्यात आली.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

खोपोलीत शिवसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. या हल्ल्यानंतर खोपोली शहरात खळबळ उडाली. काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ खोपोलीत बंद पाळण्यात आला. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि धनेश व त्यांचे अंगरक्षक तसेच खुनाच्या कटाला सहकार्य केल्याप्रकरणी अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश काळोखे हे सकाळी सात वाजता, त्यांच्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी एका वाहनातून चार ते पाच अज्ञात इसम तिथे आले. त्यांनी धारदार शस्त्रांनी काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. ज्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खोपोली परिसरात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते म्हणून मंगेश काळोखे सुपरिचीत होते.काळोखे यांच्या पत्नी नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर खोपोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामाकरून मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोपी पोलिसांना सापडले नसल्यामुळे महिलांनी आक्रोश केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर खोपोली परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी खोपोलीत दाखल झाले असून, त्यांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हातीनवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून, हीचे मुले भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'वीर बाल दिवसा'निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात भाषण केले. वीर बाल दिवस हा गुरू गोविंद सिंग यांच्या साहिबजादे-जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण त्या शूर साहिबजादांचे स्मरण करत आहोत, जे आपल्या भारताचा अभिमान आहेत. ते भारताच्या धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वय आणि परिस्थितीच्या सीमा तोडणारे हे शूरवीर आहेत. ज्या राष्ट्राचा इतका गौरवशाली भूतकाळ आहे, ज्यांच्या तरुण पिढीला अशी प्रेरणा वारशाने मिळाली आहे.माझ्या देशाची तरुण पिढी आज या कार्यक्रमात आहे. एका अर्थाने, तुम्ही सर्व 'जेन-झी' आहात. काही 'जेन-अल्फा' देखील आहात. तुमची पिढी भारताला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मला प्रामाणिकपणे वाटते की, केवळ वयाने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. प्रत्येकाचे कर्तृत्व त्याला लहान-मोठा बनवत असते. तुम्ही तुमच्या कामातून आणि कामगिरीतून महान बनता. अगदी लहान वयातही तुम्ही अशी कामे करू शकता की इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात. तुम्ही भारताचे भविष्य आहात, असा मोलाचा संदेश मोदी यांनी युवांना दिला.पंतप्रधानांनी संस्कृतमधील एका श्लोकाचा उल्लेख करत सांगितले की, एखादे लहान मूल जर ज्ञानाची गोष्ट सांगत असेल, तर ती स्वीकारली पाहिजे. त्यांनी तरुण वयात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “तुम्ही कमी वयात मोठी कामे करू शकता, आणि तुम्ही ते करून दाखवले आहे. मात्र, या यशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तुमची स्वप्ने आकाशापर्यंत न्या. देश ठाम निर्धाराने तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे त्यांनी सांगितले.भूतकाळातील निराशेची आजच्या संधींशी तुलना करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी तरुण स्वप्ने पाहण्यास घाबरत होते, कारण जुन्या व्यवस्थेमुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता देश प्रतिभेचा शोध घेत आहे आणि १४० कोटी नागरिकांच्या ताकदीवर आधारित भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्यांनी इंटरनेट, स्टार्टअप मिशन आणि लक्षीत विकासासाठी उभारलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख केला.पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी)वर विशेष भर दिला. हे धोरण पाठांतराऐवजी व्यावहारिक शिक्षण, चिकित्सक विचारसरणी आणि प्रश्न विचारण्याला प्राधान्य देते, असे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच सरकार नव्या शिकण्याच्या आणि विचार करण्याच्या प्रक्रियेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवकल्पना आणि डिझाइन थिंकिंगला चालना देण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हालमुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. मात्र येत्या शनिवार–रविवारच्या ब्लॉकमुळे मुंबईकरांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी (दि. २७) रोजी तब्बल ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी (दि. २८) रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कांदिवली–बोरिवलीदरम्यान पायाभूत कामे सुरू असून यासाठी २० डिसेंबरपासून पुढील ३० दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारी २०२६ पर्यंत असणार आहे. या कालावधीत शुक्रवार, दि. २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अप व डाऊन मार्गिका बंद राहणार आहेत.या ब्लॉकदरम्यान कांदिवली ते दहिसरदरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेवरील अप, डाऊन, जलद व धीम्या अशा सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या १४ लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंतच चालवण्यात येतील. तसेच अंधेरीहून सुटणाऱ्या काही लोकल सेवा फक्त गोरेगावपर्यंतच धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे १,४०६ लोकल फेऱ्या चालतात. त्यापैकी ब्लॉक काळात सुमारे २० टक्के फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी आणि मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्यांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे.दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११.५ ते दुपारी ३.४५ या वेळेत जलद लोकल सेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या सर्व स्थानकांवर थांबतील.हार्बर मार्गावर सीएसएमटी–चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या वेळेत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेल तसेच वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या आणि त्या दिशेने येणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द राहतील. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्था व वेळापत्रक लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.प्रवाशांसाठी दिलासा आणि पर्यायी व्यवस्था विशेष लोकल: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवल्या जातील. प्रवासाची मुभा: हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.प्रशासनाचे आवाहन : पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी हे ब्लॉक अत्यंत आवश्यक आहेत. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 9:10 am

“पाकिस्तान हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा पाठलाग करतोय” ; थरूर यांनी भारताला दिला इशारा

Shashi Tharoor। काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देशाला इशारा देत भारत पाकिस्तानच्या बदलत्या लष्करी रणनीतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, विशेषतः हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणालींवरील त्यांचे लक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल आणि त्यांच्या वाढत्या भारतविरोधी कट्टरतावादाबद्दल भाष्य केले. “भारताने पाकिस्तानसोबतच्या भूतकाळातील अनुभवांमधून धडे घेतले आहेत आणि म्हणूनच आपण पूर्णपणे तयार […] The post “पाकिस्तान हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा पाठलाग करतोय” ; थरूर यांनी भारताला दिला इशारा appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 8:42 am

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेपनवी दिल्ली : जीएसटी कमी करण्याच्या सूचनेमुळे न्यायालय कायदेविषयक क्षेत्रात हस्तक्षेप करत असून यामुळे ‘सेपरेशन ऑफ पॉवर्स’ संविधानाच्या या मूलभूत रचनेचे उल्लंघन होत असल्याचे शुक्रवारी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एअर प्युरिफायरचे वर्गीकरण वैद्यकीय उपकरणात करून त्याच्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. २४ डिसेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने एअर प्युरिफायरवरील जीएसटी कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर केद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली.या याचिकेची दखल घेतली गेली तर पुढे अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागेल. संविधानाच्या दृष्टिकोनातून संसदेसाठी हा काळजीचा विषय आहे, असे विधान केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ताएन. वेंकटरमण यांनी केले. जीएसटीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संसदेच्या स्थायी समितीमध्ये तसा प्रस्ताव तयार करावा लागतो, त्यानंतर तो प्रस्ताव जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी द्यावा लागतो. एवढी प्रक्रिया केवळ न्यायालयाच्या निर्देशामुळे खंडित कशी करता येईल? असा प्रश्न महाधिवक्ता यांनी उपस्थित केला.दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेला विरोध करत असताना महाधिवक्त्यांनी याचिकेचा हेतू आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “ही जनहित याचिका बिलकूल वाटत नाही. जीएसटी हे फक्त डावपेचाचे कारण आहे. मात्र यामुळे पेंडोरा बॉक्स उघडण्याची भीती आहे. याचिका दाखल करून त्या माध्यमातून जीएसटी परिषदेला हे किंवा ते सांगणारा आदेशा मिळवला जात आहे. घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास केंद्र सरकारला यात चिंता वाटते.”केंद्राच्या अधिकारावर गदा नको“संविधानाने सेपरेशन ऑफ पॉवर अंतर्गत प्रत्येक संस्थेचे अधिकार निश्चित केले आहेत. जीएसटी परिषदेला आपण निश्चित तारीख देऊ शकत नाही. आम्हाला यात एक अजेंडा दिसतो. जर एअर प्युरिफायरला वैद्यकीय उपकरण म्हणून वर्गीकृत केले तर परवाना आणि इतर बाबींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतील. याचे नियमन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केलेली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे या प्रक्रियेला कसे काय खंडित करता येईल?”, असाही प्रश्न महाधिवक्त्यांनी केंद्र सरकारतर्फे उपस्थित केला.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:30 am

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयमुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे, ते एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत. न्यायालयाने एका याचिकेच्या केस शीर्षकात ‘पद्मश्री’ शब्दाच्या वापराबद्दल हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू होती. २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर हे देखील एक पक्ष होते. त्यांचे नाव केस शीर्षकात ‘पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर’ असे सूचीबद्ध केले होते. न्यायाधीशांनी यावर आक्षेप घेत म्हटले की, हे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे, असे स्पष्ट केले.उच्च न्यायालयाने १९९५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला दिला. त्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की पद्म पुरस्कार आणि भारतरत्न ही उपाधी नाही आणि नावापूर्वी किंवा नंतर वापरली जाऊ नयेत. न्यायमूर्ती सुंदरेसन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या कलम १४१ अंतर्गत सर्वांना लागू आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालये या नियमाचे पालन करतील, असे निर्देश त्यांनी दिले.पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातातदेशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे पुरस्कार कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेसाठी दिले जातात. २०२५ मध्ये एकूण १३९ व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्रींचा समावेश होता.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:30 am

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्येही वेगळाच उत्साह दिसून येत आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला असून आज ६०व्या वयात ही सिनेसृष्टीत तो तेवढाच सक्रिय आणि 'फिट' आहे, जेवढा तो त्याच्या तारुण्यात होता. मुळात भाईजान आता साठीचा झाला आहे हे त्याच्या दिसण्यावरून जाणवतही नाही. आजच्या वाढदिवसाची एक खास गोष्ट म्हणजे, ६०व्या वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक वर सलमानची प्रतिमा असलेली रोषणाई करत त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.सिनेसृष्टीत गेल्या तीन दशकांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या सलमानचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आणि चढ-उतारांचा राहिला आहे. सलमानने १९८८ मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून एका साहाय्यक भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळवून दिली ती १९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाने. या सिनेमासाठी त्याला सुरुवातीला केवळ ३१,००० रुपये मानधन मिळाले होते, जे नंतर वाढवून ७५,००० रुपये करण्यात आले. या चित्रपटाने सलमानला रातोरात 'स्टार' बनवले.गाजलेले चित्रपटसलमानच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले, पण त्याने प्रत्येक वेळी कमबॅक केले. ९० च्या दशकात त्याचे साजन, हम आपके हैं कौन, करण अर्जुन, हम दिल दे चुके सनम हे सिनेमे गाजले तर.२००९ नंतर वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, अशा काही सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. तर बजरंगी भाईजान, सुलतान, टायगर जिंदा है या सिनेमांनी कोट्यावधींची कमाई करत त्याला पुन्हा सुपरस्टार केले. अशाप्रकार भाईजानने आजवर विविध साहसी, प्रेमळ भुमिकांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:10 am

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाईमुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० डिसेंबर रोजी या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली. त्यानंतर, महाराष्ट्र शासनाने याबाबतचे अध्यादेश जारी केले आहेत. गेल्या काही वर्षांत नक्षलवादी संघटनांनी जंगलातील लढ्याऐवजी शहरांमध्ये शिरकाव करून आपली रणनीती बदलली आहे. विशेषतः विद्यापीठे, संशोधन संस्था आणि बुद्धिजीवी वर्तुळांमधून सामाजिक अस्थिरतेचे बीज रोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ‘अर्बन नक्षल’ हिंसेपेक्षा व्यवस्थेला आतून कमकुवत करण्यावर भर देतात. अशा अदृश्य शक्तींविरोधात कठोर कारवाईसाठी फडणवीस सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.या कायद्यात 'बेकायदेशीर कृत्य' याची अत्यंत स्पष्ट आणि विस्तृत व्याख्या देण्यात आली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता किंवा प्रशांतता यांना धोका निर्माण करणे. न्यायदानात किंवा कायद्याद्वारे स्थापित संस्थांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये हस्तक्षेप करणे. लोकसेवकाला कायदेशीर अधिकारांचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर करणे किंवा दहशत निर्माण करणे. हिंसाचार, विध्वंसक कृती किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या कृतींमध्ये सामील असणे किंवा त्यांचा प्रचार करणे. अग्निशस्त्रे, स्फोटके किंवा इतर साधनांचा वापर करणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे. रेल्वे, रस्ते, हवाई किंवा जलमार्गाद्वारे होणाऱ्या दळणवळणामध्ये व्यत्यय आणणे. प्रस्थापित कायद्याची आणि कायद्याद्वारे स्थापित संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणे, प्रशासनाविरोधातील खुले आव्हान इत्यादी कृतीही या व्याख्येत येतात.‘हे’ कारवाईस पात्र ठरणार बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना : ज्या व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक सुरक्षा, शांतता किंवा कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी कृत्ये करतात. संबंधित किंवा संलग्न बाबींमध्ये सामील व्यक्ती/गट : जे वरील बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित आहेत किंवा त्यांना प्रोत्साहन देतात, मदत करतात किंवा सहाय्य करतात.बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असणे, बैठकांमध्ये भाग घेणे, देणगी देणे किंवा स्वीकारणे : अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.काय शिक्षा होणार बेकायदेशीर कृतीत सहभागी व्यक्ती/गट → ७ वर्षांपर्यंत कारावास + ५ लाखांपर्यंत दंड. बेकायदेशीर संघटनेचे सदस्य/सहयोगी → ३ वर्षांपर्यंत कारावास + ३ लाखांपर्यंत दंड. अशा संघटनेच्या बैठकीत सहभागी वा आर्थिक मदत करणारे → तीन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही. गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र असतील. पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:10 am

अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही !

भारताचा बांगलादेशला गंभीर इशारासुमारे तीन हजार हल्ल्यांचा पुरावानवी दिल्ली : बांगलादेशातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली. बांगलादेशात दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला या प्रकरणी तातडीने न्याय देण्याचे आवाहन केले आहे.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत एका धक्कादायक आकडेवारी दिली. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या सुमारे तीन हजार घटनांची नोंद आहे.

फीड फीडबर्नर 27 Dec 2025 8:10 am

‘कुलदीप सेंगर आम्हाला 5 हजार किमी दूरून मारून टाकेल’:रेप पीडितेने सांगितले- त्याची मुलगी CBI अधिकाऱ्याला भेटली, बृजभूषणने शिक्षा निलंबित केली

‘5 किमी काय, 5 हजार किमी सुद्धा त्याच्यासाठी काहीच नाही. तो आम्हाला कुठेही मारू शकतो. माझ्यासाठी आयुष्यभराचा धोका आहे. तो मेल्यानंतरही धोका राहील, कारण त्याच्या लोकांना माझा चेहरा आठवेल की याच मुलीने आमच्या आमदाराला तुरुंगात पाठवले होते.’ उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी हे बोलताना भावुक होते. 23 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची शिक्षा निलंबित केली. सेंगरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने जामीन देताना ही अट ठेवली की कुलदीप सेंगरने पीडितेपासून 5 किमी दूर राहावे. पीडितेचे म्हणणे आहे की या निर्णयाने आमच्या आशा तोडल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर दैनिक भास्करने पीडितेशी आणि तिच्या आईशी संवाद साधला. त्यांनी CBI आणि भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सेंगरला मदत केल्याचा आरोप केला. आम्ही पीडितेच्या वकिलांकडून आणि कायदेतज्ञांकडूनही समजून घेतले की कुलदीप सेंगरची शिक्षा निलंबित होण्याचे काय अर्थ आहेत. तरीही, शिक्षा निलंबित होऊनही कुलदीप सेंगरला तुरुंगातच राहावे लागेल, कारण 2020 मध्ये पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. या निर्णयाविरुद्धही कुलदीप सेंगरने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केली आहे. ‘लोक धमकी देऊन जातात की जास्त दिवस जगात राहणार नाहीस’पीडितेवर 4 जून 2017 रोजी बलात्कार झाला होता. आरोप आमदार कुलदीप सेंगरवर होता, त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. पीडितेने पोलीस ठाण्यात सुनावणी न झाल्याने मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कुलदीप सेंगरला 13 एप्रिल 2018 रोजी अटक करण्यात आली. पीडित आणि त्यांचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी CRPF चे 9 जवान तैनात असतात. पीडित म्हणतात, 'न्यायालयाच्या निर्णयामुळे बहिणी-मुलींचे धैर्य कमी झाले आहे. माझ्यावर अन्याय होत आहे. न्यायाधीश मला म्हणायचे की तुम्ही काही बोलू शकत नाही. तुमचे वकील बोलतील. माझीच केस, माझ्यावर बलात्कार झाला आणि मलाच बोलण्यापासून रोखण्यात आले.' पीडितेचा दावा आहे की त्यांना आजही धमक्या मिळतात. त्या म्हणतात, 'लोक बाजूने जाताना म्हणतात की जास्त दिवस जगात राहू शकणार नाहीस. असे बोलतात की CRPF वालेही समजू शकत नाहीत. माहित नाही, मला कधी मारले जाईल.' 'CBI ने व्यवस्थित युक्तिवाद केला असता तर जामीन मिळाला नसता'न्यायालयाच्या निर्णयानंतर पीडितेने आपल्या आईसोबत आणि महिला हक्क कार्यकर्त्या योगिता भयाना यांच्यासोबत इंडिया गेटवर आंदोलन केले होते. यावर त्या म्हणतात, 'मी धरणे देण्यासाठी गेले होते. मला सांगण्यात आले की याला परवानगी नाही. मग बलात्कार करायला परवानगी आहे का, बहिणी-मुलींना छेडायला परवानगी आहे का.' ‘सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवावे. कुत्र्यांना न हटवता बलात्काराच्या दोषींना हटवावे, जेणेकरून बहिणी-मुलींना न्याय मिळू शकेल. कुत्रे राहिले तर किमान मुलींना बाहेर पडल्यावर सुरक्षा मिळेल. हा निर्णय पाहता असे वाटते की महिलांना न्याय मिळणे कठीण आहे.’ पीडित आरोप करते की कुलदीप सेंगरला जामीन मिळवून देण्यात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा हात आहे. सरकार त्यांना घाबरते. त्यांनीही कुस्तीपटू मुलींसोबत चुकीचे केले होते. CBI वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणतात, 'जर CBI ने व्यवस्थित युक्तिवाद केला असता, तर त्याला जामीन मिळाला नसता. कुलदीप सेंगरची मुलगी युक्तिवादादरम्यान कोर्टात येत असे. ती मागून येऊन CBI च्या तपास अधिकाऱ्याला भेटत असे. मी हे कोर्टात पाहिले आहे.' आई म्हणाली- ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती, त्याला जामीन मिळालापीडितेची आई देखील त्यांच्यासोबत आहे. त्या म्हणतात, 'कोर्टाने चांगले केले नाही. कुलदीप सेंगरला जामीन मिळणे चुकीचे आहे. त्याला तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आम्ही आठ वर्षे लढा दिला आहे. माझ्या पतीला उन्नावमध्ये मारहाण करून ठार मारण्यात आले. मुलांना अनाथ केले.' ‘सरकारने कुलदीप सेंगरचा जामीन रद्द करावा. जोपर्यंत असे होत नाही, तोपर्यंत आम्ही धरणे-प्रदर्शन करणे बंद करणार नाही. माझी मुले भरकटत आहेत. हा कसला न्याय आहे. माझ्या कुटुंबाची सुरक्षा कमी केली आहे. उन्नावमध्ये साक्षीदार आहेत, त्यांची सुरक्षा काढून टाकली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले होते की, त्यांना सुरक्षेची गरज आहे. कुलदीप सेंगरला मोठे नेते वाचवत आहेत.’ कुलदीप सेंगरची शिक्षा कोणत्या आधारावर निलंबित झाली?शिक्षा निलंबित करणे हे जामिनासारखेच आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तीला शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा अधिकार असतो. उच्च न्यायालयाला शिक्षा निलंबित करून जामीन देण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन यांच्या खंडपीठाने कुलदीप सेंगरची शिक्षा निलंबित केली आहे. आमदाराला 'लोकसेवक' न मानण्याचा युक्तिवाद न्यायालयाने स्वीकारत हा निर्णय दिला. हे निलंबन अपीलावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत राहील. बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने IPC आणि POCSO च्या कलमांखाली कुलदीप सेंगरला दोषी ठरवले होते. 20 डिसेंबर 2019 रोजी कनिष्ठ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सेंगरच्या वकिलांनी 2020 मध्ये याला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. POCSO च्या कलम-5 मध्ये गंभीर लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम-5(C) हे अल्पवयीन मुलींसोबत लोकसेवकाने केलेल्या गंभीर लैंगिक हिंसाचाराबद्दल आहे. त्याचप्रमाणे, IPC च्या कलम 376 (2) मध्ये देखील लोकसेवकाने केलेल्या बलात्कारावर शिक्षेची तरतूद आहे. उच्च न्यायालयात आमदाराला लोकसेवक न मानण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयासमोर प्रश्न हाच होता की कुलदीप सेंगरला लोकसेवक मानले जावे की नाही. सेंगरच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, ट्रायल कोर्टाने 1997 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या आधारावर दोषीला 'पब्लिक सर्व्हंट' (लोकसेवक) मानले होते. त्या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी आमदाराला 'पब्लिक सर्व्हंट' मानले गेले होते. पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम-2 (2) मध्ये 'पब्लिक सर्व्हंट'ची व्याख्या आयपीसी (IPC) च्या कलम-21 मधून घेण्यात आली आहे. यानुसार आमदाराला 'पब्लिक सर्व्हंट' मानले जात नाही. ‘सर्वोच्च न्यायालयाने आमदार-खासदारांना लोकसेवक मानले, उच्च न्यायालयाने नाही’हा प्रश्न आम्ही ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांना विचारला. ते म्हणतात की एका आमदाराला लोकसेवक न म्हणणे, दुर्दैवी आहे. आमदार संविधानानुसार शपथ घेतो. विधानसभेचा सदस्य बनतो आणि जनतेची कामे करण्यासाठी निवडला जातो. आमदारांना भत्ते मिळतात, तर यांना लोकसेवक न म्हणणे आश्चर्यकारक आहे. प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आमदार आणि खासदार सार्वजनिक सेवक आहेत, पॉक्सो (POCSO) तर आणखी कठोर कायदा आहे. यात उच्च न्यायालयाने आमदारांना सार्वजनिक सेवक न मानणे हा अन्याय आहे. दवे पुढे म्हणतात, ‘पॉक्सो (POCSO) अल्पवयीन मुलांविरुद्ध, विशेषतः मुलींविरुद्ध होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणला गेला होता. उच्च न्यायालयाने या कायद्याचा अर्थ उदारपणे लावायला हवा होता. याचा अर्थ असा लावला पाहिजे की त्याचा फायदा पीडितेला मिळावा, दोषीला नाही.’ ‘न्यायालयाने कायद्याचे कलम-४ देखील पाहिले असते, ज्यात सामान्य लोकांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा दिली जाऊ शकते. पीडितेवर बलात्कार झाला, तिच्या वडिलांना मारण्यात आले, तिच्या वकिलाचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टी उच्च न्यायालयाने विचारात घ्यायला हव्या होत्या. फक्त सार्वजनिक सेवकाच्या तांत्रिक बाजूचा विचार करून निर्णय देणे बेजबाबदारपणाचे आहे. कायद्यामागील उद्देश काय आहे, हे पाहून जामीन मंजूर करायला नको होता.’ दवे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की न्यायाधीशांनी ट्रायल कोर्टाचे निष्कर्ष योग्यरित्या वाचले नाहीत. त्याची योग्य प्रकारे तपासणी केली नाही. तो दोषी व्यक्ती आहे. हा कोणताही प्रलंबित खटला नव्हता. वकील म्हणाले- उच्च न्यायालयाने दोषीवर दया केली, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊपीडितेचे वकील महमूद प्राचा म्हणतात, ‘न्यायालयाने कुलदीप सेंगरला दयेचा पात्र मानले, पीडित मुलीला नाही. न्यायालयाला आणखी थोड्या सखोलतेने जाण्याची गरज होती. निलंबनाच्या प्रकरणांमध्ये अति-तांत्रिक गोष्टींमध्ये जाण्यास मनाई आहे. हे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे.’ प्राचा म्हणतात की, जे आधार सांगितले आहेत, त्यावर शिक्षेचे निलंबन होऊ नये. त्याच आधारावर आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. ते सीबीआयवरही आरोप करतात की, तपास यंत्रणा पहिल्या दिवसापासून कुलदीप सेंगरला मदत करण्याचा आणि त्याला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, सेंगरविरुद्ध इतके पुरावे होते की, कनिष्ठ न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती.

दिव्यमराठी भास्कर 27 Dec 2025 7:40 am

थंडीचा पारा चढला! राज्यातील लाट ओसरली; जाणून घ्या शहराचं तापमान

प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील थंडीची लाट ओसरत आहे. तर अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली नोंदविल्यामुळे गारठा चांगलाच जाणवत आहे. तर अन्य जिल्ह्यातील थंडीचा पारा १० ते ११ अंशाच्या पुढे गेला आहे.राज्यातील मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश […] The post थंडीचा पारा चढला! राज्यातील लाट ओसरली; जाणून घ्या शहराचं तापमान appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:30 am

MHADA Lottery: म्हाडाच्या ४ हजार घरांचा ‘लकी ड्रॉ’अडकला; आचारसंहितेचा फटका की मिळणार परवानगी?

प्रभात वृत्तसेवा पुणे – म्हाडा पुणे विभागाने 4 हजार 186 घरांसाठी सोडत घेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीमध्ये संपूर्ण राज्यातून नागरिकांचे एकूण २ […] The post MHADA Lottery: म्हाडाच्या ४ हजार घरांचा ‘लकी ड्रॉ’ अडकला; आचारसंहितेचा फटका की मिळणार परवानगी? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:25 am

Pune Weather Update: सलग दुसऱ्या दिवशी तापमान स्थिर; नव्या वर्षात थंडीचा मुक्काम वाढणार?

प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान स्थिर असल्याने थंडीचा जोर कायम आहे. वर्षअखेरीस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून शुक्रवारी (दि. २६) हवेलीत सर्वात कमी ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर आणि पाषाणसह जिल्ह्यातील बारामती, माळीण परिसरातील थंडीचा पारा एका आकड्यावर नोंदविला गेला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून किमान तापमानात लक्षणीय घट होऊन […] The post Pune Weather Update: सलग दुसऱ्या दिवशी तापमान स्थिर; नव्या वर्षात थंडीचा मुक्काम वाढणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:20 am

Pune Shivsena: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन; शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच जागावटपावरून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. मात्र, वादाची ठिणगी पेटवणारा कोण? पक्षात कोण शिवसैनिकांची डोकी भडकवत आहे, गटा-तटाचे राजकरण कोण करते, यावर पक्षाने गांभीर्याने लक्ष देऊन लगाम लावणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भाजप केवळ १५ जागा देऊन आमची चेष्टा करत […] The post Pune Shivsena: डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन; शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:15 am

भाजपची फिल्डिंग तयार! १४५ उमेदवारांची यादी फायनल; पहिली यादी रविवारी येणार?

प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक असलेल्या भाजपने महायुतीच्या जागा वगळता इतर १४० ते १४५ उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. ही यादी आता जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने भाजप पहिली यादी रविवारी तर नंतर बाकीच्या दोन याद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी तीन टप्प्यात यादी जाहीर करण्याची खेळी केली […] The post भाजपची फिल्डिंग तयार! १४५ उमेदवारांची यादी फायनल; पहिली यादी रविवारी येणार? appeared first on Dainik Prabhat .

दैनिक प्रभात 27 Dec 2025 7:15 am