SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

रोज नई सुबह है... पक्षातील नाराजीला सुप्रिया सुळेंचा स्पष्ट इशारा:‘माझं पोट मोठं आहे’ सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का देणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या एका वक्तव्याने चर्चेला वेग आला आहे. प्रशांत जगताप यांना शुभेच्छा… रोज नई सुबह है; माझं पोट खूप मोठं आहे, असे म्हणत सुळेंनी केवळ प्रतिक्रिया दिली नाही, तर पक्षातील नाराजी, बंडखोरी आणि संभाव्य युतीवर अप्रत्यक्ष पण ठोस संदेश दिला आहे. राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आलेलं हे विधान केवळ शब्दांचा खेळ नसून, आगामी महापालिका निवडणुकांआधी राष्ट्रवादीतील राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट करणारे मानले जात आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना मंगळवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः हा निर्णय जाहीर केला. जवळपास 27 वर्षांची राजकीय-सामाजिक कारकीर्द असलेल्या जगताप यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या निर्णयामागील भूमिका मांडत, आजवर मिळालेल्या संधींसाठी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. पद किंवा सत्तेसाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला होता आणि हेच ध्येय पुढेही कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशांत जगताप म्हणाले की, 27 वर्षांपूर्वी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल टाकताना कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. समाजपरिवर्तनाच्या विचारांशी निष्ठा राखत मी काम करत राहिलो. आजही माझी वैचारिक भूमिका बदललेली नाही. यापुढेही सामाजिक आणि राजकीय जीवनात मी पुरोगामी विचारांसाठी कार्यरत राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने साथ दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. तसेच, भविष्यातही संघर्षाच्या वाटेवर जे सहकारी माझ्यासोबत राहतील, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला असून, तो कोणत्याही क्षणिक भावनेतून घेतलेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांत प्रतिक्रिया दिली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रशांत जगताप यांना मनापासून शुभेच्छा. रोज नई सुबह हैं. याच वेळी त्यांनी आपल्या स्वभावाची झलक दाखवत, माझं पोट खूप मोठं आहे, असे विधान केले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, तसेच महापालिका निवडणुकांतील जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, अद्याप अंतिम प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला की माध्यमांना बोलावून सगळी माहिती दिली जाईल. किती जागा ठरल्या आहेत, याची माहिती सध्या माझ्याकडे नाही. स्थानिक पातळीवर विशाल तांबे, अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यादी तयार करतील आणि ती शशिकांत शिंदे यांच्याकडे सादर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे महापालिका किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये थेट सहभागी नसतात, ते देशपातळीचे नेते आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. नगरसेवक पदाची निवडणूक आपण नक्की लढवणार - प्रशांत जगताप राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत जगताप यांनी आपण राजकारणातून बाहेर पडलो नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. एका पराभवामुळे मी कधीच घाबरलो नाही. विधानसभेची निवडणूक हरलो, मात्र त्या मतदारसंघातील नागरिकांबद्दल माझ्या मनात आजही आदर आणि कृतज्ञता आहे, असे त्यांनी सांगितले. पक्ष कशी निवडणूक लढवेल, यासाठी मी तयारी करत होतो. मात्र एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. ही घालमेल माझ्या आयुष्यावर आणि विचारांवर परिणाम करत होती. सर्व नेत्यांचा मान राखत, सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सर्व बाजूंनी विचार करून मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण शशिकांत शिंदे यांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असून, आगामी काळात नगरसेवक पदाची निवडणूक आपण नक्की लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील युतीला जगताप यांचा विरोध दरम्यान, येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होत असताना, पुण्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 22 डिसेंबर रोजीच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील संभाव्य युतीला जगताप यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. सलग दोन दिवस त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर शहराध्यक्ष पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या राजकीय प्रवासात संधी दिल्याबद्दल त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलो असलो, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना हडपसर-वाणवडी परिसरातील नागरिकांनी मला मोठा पाठिंबा दिला. रस्त्यावर उतरून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे, असे सांगत प्रशांत जगताप यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 3:29 pm

मी खरा वाघ, ठाकरे बंधू केवळ कागदी:रावसाहेब दानवे यांची टीका; उद्धव ठाकरे शेपटी खाली घालून विधान परिषदेवर गेल्याचा दावा

भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत. ठाकरे गट व मनसेची बुधवारी बहुप्रतिक्षित युती झाली. राज व उद्धव ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये या युतीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी या युतीवर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेविषयी प्रश्न केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी उत्तरे देवाला दिली जातात, दानवांना नाही, असे म्हणत दानवेंना टोला हाणला होता. रावसाहेब दानवेंनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ठाकरेंचा एकेक शिलेदार त्यांना सोडून जात आहे रावसाहेब दानवे म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा आम्हाला आनंदच आहे. आता दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असे वागू नये. 2019 व 2024 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली. ते भाजपला सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांचे अडीच वर्षांचे सरकार या राज्यातील जनतेला आवडले नाही. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यांचा एकेक शिलेदार त्यांना सोडून गेला. एकीकडे त्यांच्या युतीची पत्रकार परिषद सुरू होती आणि दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात होते. माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवेंना आता भाजपत कुणीही विचारत नसल्याचीही टीका केली होती. यावर दानवे म्हणाले, भाजपने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री व राज्यात पक्षाचा अध्यक्ष केले. मला पक्षात कुणी विचारत नसते तर असे केले असते का? माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून, शेपटी खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे. त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. मी म्हणालो हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाहीत. कारण, प्रचारासाठी फिरताना मला ते समजत होते. ते आता हरले तर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहून काही अस्तित्वच राहणार नाही. म्हणून त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांना सोडून जातील. दोन्ही भावांवर एकदाट टीका नको. त्यांचे एका होऊन जाऊ द्या, असेही दानवे यावेळी बोलताना म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. ही उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षात कार्यकर्तेच राहणार नाहीत असे लोक म्हणत आहेत. त्यावर राज ठाकरे म्हणाले, लोक म्हणजे कोण? त्यावर पत्रकाराने भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले. त्यावर राज ठाकरे हे आपले बंधू उद्धव यांच्या मदतीला धावून आले आणि म्हणाले, मला असे वाटते उत्तरे देवाला द्यावीत, दानवांना नाही.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 3:21 pm

भाजप प्रवेश सोहळ्यावरून नाशिकमध्ये वाद:देवयानी फरांदेंचा विरोध डावलून माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांच्या हाती कमळ

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने 'इनकमिंग'चा धडाका लावत विरोधी पक्षांतील अनेक बड्या मोहऱ्यांना आपल्या गळाला लावले. मात्र, या पक्षप्रवेशावरून नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांचा तीव्र विरोध डावलून हा सोहळा पार पडला. फरांदे यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नाशिकमधील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांचा समावेश आहे. स्थानिक नेतृत्वाचा 'बंडाचा' झेंडा या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे भाजपची ताकद वाढणार असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र अस्वस्थता आहे. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध होता. देवयानी फरांदे या नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रमुख आहेत, तरीही त्यांच्या शब्दाला डावलून हे पक्षप्रवेश झाल्याने त्यांनी सोहळ्याला दांडी मारली. त्यांच्यासोबतच अनेक जुन्या कार्यकर्त्यांनीही या 'इनकमिंग'बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी नाशिक भाजप कार्यालयाबाहेर हाय वोलेटेज ड्रामा पहायला मिळाला. या दोघांना पक्षात घेण्यासासंबंधी माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका देवयानी फरांदे यांनी घेतली होती. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना भाजपत घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाला विरोध होत आहे. दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाविराधोत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर घोषणाबाजी देखील केली होती. मात्र, हा सगळा विरोध डावलून पाच नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. सगळ्यांनाच तिकीट मिळणार नाही - गिरीश महाजन स्थानिक नेत्यांच्या नाराजीवर भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाराजी होणे स्वाभाविक आहे. मात्र, पक्ष वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. देवयानी फरांदे यांचा विरोध लवकरच मावळेल. यावेळी महाजन यांनी पक्षप्रवेश करणाऱ्यांना स्पष्ट इशाराही दिला. ते म्हणाले, आज ७-८ बड्या नेत्यांनी प्रवेश केला असला, तरी पक्षात प्रवेश म्हणजे तिकीट मिळेलच असं नाही. पक्ष सर्वांच्या कामाचा आढावा घेऊनच निर्णय घेईल. राजकीय समीकरणे बदलणार? मुंबईत ठाकरे बंधू (शिवसेना-मनसे) आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना, नाशिकमध्ये भाजपने विरोधकांचे बालेकिल्ले फोडण्याची रणनीती आखली आहे. मात्र, नव्यांच्या एन्ट्रीमुळे जुन्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्यास निवडणुकीत भाजपला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 2:54 pm

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केले?:सुषमा अंधारेंनी शिंदेंना घातली पोस्ट डिलीट न करण्याची गळ; आनंद दिघेंची घातली शपथ

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काय केले? असा खोचक सवाल उपस्थित केला होता. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदेंच्या 2020 मधील एका ट्विटचा दाखला देत ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले हे दाखवून दिले आहे. तसेच शिंदेंना ही पोस्ट डिलीट न करण्याची गळही घातली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काहीच केले नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांची एक जुनी पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. फक्त पोस्ट डिलीट करू नका - सुषमा अंधारे उद्धव साहेबांनी मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसासाठी काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही स्वतः मांडत आहात. फक्त पोस्ट डिलीट करू नका तुम्हाला तुमचे गुरु आनंद दिघे यांची शपथ आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. आध्यात्मिक समागम आहे का? सुषमा अंधारेंनी अन्य एका ट्विटद्वारे भाजपवरही निशाणा साधला. ठाकरेंनी युती केली म्हणजे सत्तेसाठी असं जर फडणवीसंच म्हणणं असेल तर मग अजित पवार अशोक चव्हाण आणि शिंदे सोबत असणारे तमाम भ्रष्टाचारी यांच्यासोबत भाजपने केलेली युती म्हणजे काय आध्यात्मिक समागम आहे का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. काय आहे एकनाथ शिंदेंच्या पोस्टमध्ये? एकनाथ शिंदे आपल्या 23 फेब्रुवारी 2020 च्या पोस्टमध्ये म्हणतात, गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे,मुख्य सचिव अजोय मेहता,गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर उपस्थित होते. म्हाडाच्या मुंबईतील 3900 घरांची लॉटरी प्रक्रिया 1 मार्चपासून आणि MMRDA च्या रेंटल हाऊसिंग स्कीममधील 2000 हून अधिक घरांची लॉटरी प्रक्रिया 1 एप्रिल पासून सुरुवात करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री यांनी दिले. ठाणे परिसरातील 36 हेक्टर जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. शिंदेंनी ठाकरे बंधूंवर काय केली होती टीका? एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हणाले होते, लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनतेचा महायुतीला कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. यांनी मुंबई महापालिकेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. आता ती कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. युती झाली तरी विठ्ठल आमच्याकडे आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडला, त्यांना जनतेने आधीच त्यांची जागा दाखवली आहे. असली आणि नकली काय, हे नगरपालिकेच्या निवडणुकांत स्पष्ट झाले. आमचा अजेंडा स्पष्ट आहे, मुंबईचा विकास. त्यांनी मुंबईसाठी नेमकं काय केले हे सांगावे. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, त्याला हेच जबाबदार आहेत. त्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. रमाबाई आंबेडकर नगरमधील 17 हजार घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावला आहे. त्यांच्या अजेंडामध्ये असे काय आहे? असा सवाल शिंदेंनी केला. निवडणुका आल्या की, ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असे फलक लावले जातात. पण मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना विकास हवा आहे. आमचे निर्णय मुंबईकरांच्या हिताचे आहेत. पुढील सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त होईल. कोरोनाच्या काळात फक्त पैसे खाल्ले गेले. जे स्वतःच्या पोरांना सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 2:10 pm

विजयाचा गुलाल उधळल्यानंतर नगरसेविका भाग्यश्री जगताप करताहेत फळविक्री

पुणे : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करीत आहेत. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ २४ तास उलटत नाहीत तोच एक नगरसेविका आपल्या हातगाडीवर फळविक्री करताना दिसल्या. संघर्ष, कष्ट व जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मावळ व लोणावळा परिसरात […] The post विजयाचा गुलाल उधळल्यानंतर नगरसेविका भाग्यश्री जगताप करताहेत फळविक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 2:09 pm

प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर?

पुणे : शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशा-याने पक्षाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अखेर सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, […] The post प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 2:06 pm

धावत्या बसचे टायर फुटून ९ ठार

कुड्डालोर : वृत्तसंस्था तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात रात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले. तिरुचिरापल्लीहून चेन्नईला जाणा-या एका रोडवेज बसचे टायर फुटल्याने राज्य महामार्गावर अपघात झाला. टायर फुटल्यानंतर बस अनियंत्रित झाली, दुभाजकावर चढली आणि विरुद्ध लेनमध्ये गेली, ज्यामुळे समोरून येणा-या दोन कार चिरडल्या गेल्या. दोन्ही कार बसखाली अडकून पूर्णपणे चिरडल्या […] The post धावत्या बसचे टायर फुटून ९ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 1:57 pm

वंचित' अन् ठाकरे गटासोबत चर्चा सुरू, पण 'मनसे'शी संवाद नाही:हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरू असून २८ स्थानिक पातळीवर दोन्ही संघटनांचे नेते संवाद साधत आहेत. मात्र, 'मनसे'सोबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाच्या बैठक आज मुंबईत पार पडली. पहिल्या सत्रात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला महापालिकांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी बोलत होते. 'वंचित'सोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत सपकाळ म्हणाले की, मुंबईत वंचित आणि काँग्रेसने एकत्र यावे, अशी अनेकांची इच्छा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्व निर्णय जिल्हा स्तरावर सोपवले होते, त्याचप्रमाणे आताही २८ ठिकाणी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांच्या 'काँग्रेस युती करत नाही' या आरोपावर बोलताना, हा 'नरेटिव्ह'चा गुंता सुटला पाहिजे आणि दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सूत्र सपकाळ यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना (ठाकरे गट) सोबत चर्चा सुरू असून त्याबाबतच्या सूचना संघटनेला आधीच देण्यात आल्या आहेत. 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या व्यतिरिक्त सध्या कोणाचाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही. जर कोणाचा नवीन प्रस्ताव आला, तर त्यावर विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. युती-आघाडीचा स्थानिक नेतृत्वाकडे अधिकार नगरपालिका निवडणुकीच्या अनुभवावरून काँग्रेसने आगामी महापालिकांसाठी देखील 'स्थानिक पातळीवर अधिकार' देण्याचे धोरण अवलंबले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि तेथील राजकीय समीकरणे पाहूनच अंतिम निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत काँग्रेस कधीही जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा काँग्रेस करणार नाही, असे सपकाळ म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:35 pm

माजी आमदार संतोष टारफे काँग्रेसमध्ये जाणार का?:स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला संवाद; चर्चेसाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवरून हालचाली सुरु झाल्या असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यांना मुंबई येथे चर्चेसाठी येण्याचे निमंत्रणही दिले आहे. त्यामुळे जिल्हयातील राजकिय हालचाली गतीमान झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजीने वाताहात झाली आहे. कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, दिलीप देसाई यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्षाचे राजिनामे दिले आहेत. त्यामुळे पक्षामध्ये वसमत तालुका वगळता इतर ठिकाणी मोठा नेताच शिल्लक राहिला नाही. त्यातच आता विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी पदाचा राजिनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु झाले आहेत. या संदर्भात पक्ष निरीक्षक साहेबराव कांबळे यांनी जिल्हयातील सर्व घटनाक्रमाची माहिती वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकली आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्कही साधला आहे. त्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेशाची गळ घातली आहे. त्यासाठी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याचे निमंत्रणही दिले आहे. तर दुसरीकडे हिंगोलीच्या माजी पालकमंत्री खा. वर्षा गायकवाड यांनीही डॉ. टारफे यांच्यासह त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला असून पक्षात पुन्हा परतण्याची अटकळ घातली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरूनच राजकिय हालचाली गतीमान झाल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे हिंगोली जिल्हा निरीक्षक साहेबराव कांबळे यांनी लवकरच हिंगोलीत येणार असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नव्याने कार्यकारीणी जाहिर केली जाणार असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी पदे रिक्त आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची निवड केली जाणार असूुून बुथ पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंतच्या कार्यकारीणीत बदल केले जाणार असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ. टारफेंचा वेट अँड वॉच काँग्रेसच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी संपर्क साधला असला तरी दुसरीकडे मात्र माजी आमदार डॉ. टारफे यांनी वेट ॲण्ड वॉचची भुमीका घेतली आहे. या संदर्भात त्यांच्याकडून कुठलेही भाष्य करण्याचे करण्याचे टाळले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:33 pm

'दशावतार'मधील बाबुली मेस्त्री भूमिका आव्हानात्मक:चित्रपटाच्या १०० दिवसांच्या यशोत्सवाप्रसंगी दिलीप प्रभावळकर यांचे मत

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'दशावतार' चित्रपटातील 'बाबुली मेस्त्री' ही भूमिका आव्हानात्मक वाटल्याने स्वीकारल्याचे सांगितले. कोहिनूर कट्टा प्रस्तुत 'दशावतार नाबाद १००' या कार्यक्रमात ते बोलत होते. या चित्रपटाने १०० दिवसांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानिमित्त कलाकारांचा सत्कार आणि संवाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे येथे पार पडला. कोकणातील परंपरा, वारसा, संस्कृती आणि पर्यावरण रक्षण यावर भाष्य करणारा 'दशावतार' चित्रपट २०२५ मधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम, लागू बंधूंचे सारंग लागू आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या दृक्‌-श्राव्य कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांच्यासह दिग्दर्शक सुबोध खानोलकर, निर्माता सुजय हांडे, कलाकार सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर यांचा सहभाग होता. अजित भुरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चित्रपट निर्मितीतील काही महत्त्वपूर्ण क्षण आणि प्रसंग दाखवण्यात आले. प्रभावळकर यांनी 'बाबुली मेस्त्री' भूमिकेसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक तयारी करावी लागल्याचे सांगितले. चित्रपटाची संहिता मानसिक तयारीसाठी उपयुक्त ठरली, तर दिग्दर्शकाचे मार्गदर्शन आणि तरुण सहकलाकारांचे सहकार्य भावनिक तयारीसाठी महत्त्वाचे ठरले. त्यांच्यातील उत्साह आणि ऊर्जेचा सकारात्मक परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. या भूमिकेसाठी तयारी करताना त्यांनी दशावताराचा प्रत्यक्ष प्रयोग पाहिला, अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्या आणि दशावतारी कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा केली. मिताभिनय आणि जोरकस अभिनय यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला. कोकणातील मूळ दशावतारी कलाकारांनी चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही आमचे प्रतिनिधित्व केले अशी दिलेली दाद आपल्यासाठी खूप मोलाची ठरल्याचे प्रभावळकर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:20 pm

पुणे पिफमध्ये ऑस्कर यादीतील ९ चित्रपट:१५ ते २२ जानेवारी दरम्यान प्रेक्षकांना महोत्सवात चित्रपट पाहण्याची संधी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) मध्ये यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट झालेले नऊ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. १५ ते २२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना हे चित्रपट पाहण्याची संधी मिळेल. या नऊ चित्रपटांपैकी चार चित्रपटांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. या महोत्सवात 'ग्लोबल सिनेमा' विभागात 'सेंटीमेंटल व्हॅल्यू', 'सिरात' आणि 'इट वॉज जस्ट अॅन अॅक्सिडेंट' या तीन गाजलेल्या चित्रपटांसह अन्य पाच चित्रपट दाखवले जातील. 'ऑल दॅटस् लेफ्ट ऑफ यू' हा चित्रपट 'जागतिक चित्रपट स्पर्धा' विभागात प्रदर्शित होणार आहे. शिरेन दाबीस या पॅलेस्टाईन-अमेरिकन दिग्दर्शिकेचा 'ऑल दॅटस् लेफ्ट ऑफ यू' हा चित्रपट नुकताच ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पहिल्या यादीत समाविष्ट झाला आहे. हा चित्रपट जर्मनी, सायप्रस, पॅलेस्टाईन, जॉर्डन, ग्रीस, सौदी अरेबिया आणि कतार या देशांच्या सहकार्याने बनवला आहे. जोआकिम ट्रियर दिग्दर्शित 'सेंटिमेंटल व्हॅल्यू' या २०२५ च्या गाजलेल्या चित्रपटात रेनेट रेन्सवे, स्टेलन स्कार्सगार्ड, इंगा इब्सडॉटर लिलियास आणि एले फॅनिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचे त्याच्या दोन विभक्त मुलींसोबतचे तुटलेले नाते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. २०२५ च्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत याचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता आणि त्याला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला होता. ऑलिव्हर लॅक्से दिग्दर्शित 'सिरात' हा २०२५ चा चित्रपट दक्षिण मोरोक्कोच्या वाळवंटात आपल्या हरवलेल्या मुलीचा आणि रेव्ह पार्टी करणाऱ्या गटाचा शोध घेणाऱ्या वडिलांची कथा मांडतो. जाफर पनाही यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'इट वॉज जस्ट अॅन अॅक्सिडेंट' हा एक थ्रिलर चित्रपट आहे. इराण, फ्रान्स आणि लक्झेंबर्ग यांच्या संयुक्त निर्मितीने हा चित्रपट तयार झाला आहे. मे २०२५ मध्ये ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत याचा जागतिक प्रीमियर झाला होता आणि त्याला पाल्म डी'ओर पुरस्कार मिळाला. ८३ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये, हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी यादीत स्थान मिळवणारा पहिला इराणी चित्रपट ठरला, तसेच त्याला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठीही स्थान मिळाले. या प्रमुख चित्रपटांव्यतिरिक्त, पिफमध्ये मास्का शिलिन्स्की दिग्दर्शित 'साउंड ऑफ फॉलिंग' आणि मोहम्मदरेझा आयनी व सारा खाकी दिग्दर्शित 'कटिंग थ्रू रॉक्स' हा माहितीपट देखील प्रदर्शित होणार आहे. हे सर्व चित्रपट १५ ते २२ जानेवारी या कालावधीत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. 'द प्रेसिडेंट्स केक', हा हसन हादी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, ‘लेट शिफ्ट’, हा पेट्रा व्होल्पे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आणि ‘नो अदर चॉइस’, हा जो पार्क चान-वूक यांनी दिग्दर्शित केलेला कोरियन व्यंग्यात्मक ब्लॅक कॉमेडी थ्रिलर चित्रपट ऑस्करच्या यादीत असून, पिफमध्ये पाहता येणार आहेत. ‘नो अदर चॉइस’, या चित्रपटालाही गोल्डन ग्लोबमध्ये यादीत स्थान मिळाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:19 pm

हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्वाची उपेक्षा थांबवावी:अन्यथा भाजपची अवस्था काँग्रेससारखी होईल, हिंदुत्व जागृती सभेचा इशारा

पुणे येथे आयोजित हिंदुत्व जागृती सभेत हिंदुत्ववादी पक्षांना इशारा देण्यात आला आहे. हिंदुत्वाची उपेक्षा थांबवून मुस्लिमांचे लांगुलचालन न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अन्यथा, भारतीय जनता पक्षाची (भाजप) अवस्था काँग्रेससारखी दयनीय होईल, असे वक्तव्य सभेत करण्यात आले. दहशतवादमुक्त आणि सुरक्षित पुण्यासाठी भाजपची उमेदवारी यादी मुस्लिममुक्त असावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा' या मोहिमेसाठी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये या हिंदुत्व जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. हभप संग्रामबापू भंडारे, क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे यांनी सभेला संबोधित केले. भाजप नेत्यांचा गुंडांना पाठिंबा मिलिंद एकबोटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुण्यात हिंदुत्वाची उपेक्षा सुरू आहे. भाजपचे नेते गुंडांना पाठिंबा देत असून, हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या मुस्लिमांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह करत आहेत. हे चित्र दुर्दैवी असून, यामुळे धर्मासाठी आणि देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रामाणिक नेत्यांवर अन्याय होत आहे. एकबोटे यांनी पुढे म्हटले की, या विशिष्ट राजकीय धोरणामुळे पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दिल्लीतील कार स्फोटाचे संबंध कोंढव्यातील अतिरेक्यांपर्यंत पोहोचतात आणि कोंढव्यातील अतिरेकी प्रवृत्तीचा विस्तार शहरभर झाला आहे, ही गंभीर बाब आहे. स्थानिक शीर्ष नेतृत्व भाजपची पुण्याई वाया घालवत आहे. हज हाऊस बांधण्यासाठी आग्रही असणारेच आज पुन्हा मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. या निवडणुकीत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना व पक्षाला जागा दाखवून देऊ, मग तो पक्ष भाजप असो की शिवसेना, असे आवाहन त्यांनी केले. 'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा' हा वेदमंत्र अमलात आणून येणाऱ्या निवडणुकीत हिंदू उमेदवारालाच मतदान करून हिंदुत्व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी केले. हिंदू सहिष्णू, पण त्याच्यावर सातत्याने आघात हभप संग्रामबापू भंडारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हिंदू सहिष्णू असून सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारा धर्म आहे. मात्र, यावर सातत्याने आघात होत आहेत. अशा परिस्थितीत आपले हिंदुत्व जागृत ठेवण्याची गरज आहे. हिदूंची ताकद विभागली गेली समीर कुलकर्णी म्हणाले, हिंदुत्वाशी पंगा घेणाऱ्यांना तोंड दाखवायलाही जागा राहत नाही, हे आजच्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून दिसून येते. हिंदूंची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांचे फावले आहे. यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हिंदुत्वाची ताकद एकवटली पाहिजे. देव, धर्म आणि देश हाच आपल्या जगण्याचा पाया आहे. परिवर्तन घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे जिहाद्यांना खांद्यावर घेऊन मिरवण्याचे प्रकार बंद व्हावेत. आचार आणि विचार यामध्ये अंतर असता कामा नये. मात्र, आज हिंदुत्वाचा विचार घेऊन राजकारण करणाऱ्यांचे आचरण पाहिले, तर संताप यावा, अशी स्थिती आहे. हिंदू बांधव आणि हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या मतदारांमुळे आपल्या हाती सत्ता मिळाली, याचा विसर सत्ताधाऱ्यांनी पडू देऊ नये.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:17 pm

एकिकडे ठाकरे बंधू एकत्र, दुसरीकडे गुणरत्न सदावर्तेंची राजगादी चर्चेत:बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संकेत? निवडणुकीत एंट्री?

राज्यभरात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक शहरात इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. अनेक वर्षांच्या मतभेदांनंतर मनोमिलन होत ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेसह बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात एकीकडे चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आपल्या हटके वक्तव्यांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे गुणरत्न सदावर्ते हे विशेषतः ठाकरे बंधूंवर सातत्याने टीका करताना दिसतात. ठाकरे बंधूंविरोधातील त्यांच्या वक्तव्यांमुळे ते यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असताना, सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांच्या वक्तव्यांपेक्षा त्यांच्या एका अनोख्या खुर्चीची अधिक चर्चा होताना दिसत आहे. सध्या गुणरत्न सदावर्ते हे मुंबईतील परळ परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीत वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, या इमारतीच्या अगदी समोरच त्यांचे अत्याधुनिक आणि सुसज्ज असे कार्यालय आहे. याच कार्यालयात ते अनेकदा पत्रकार परिषद घेऊन राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. आतापर्यंत साध्या खुर्चीवर बसून पत्रकारांशी संवाद साधणारे सदावर्ते आता मात्र एका वेगळ्याच खुर्चीवर विराजमान होताना पाहायला मिळणार आहेत. कमळाच्या रचनेवर आधारित, महाराजांच्या सिंहासनासारखी भासणारी ही भव्य खुर्ची सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या खुर्चीमुळे सदावर्तेंची प्रतिमा आणखी वेगळ्या पद्धतीने समोर येत असल्याचे दिसून येते. या कमळ प्रतिकृती असलेल्या खुर्चीमागचा नेमका हेतू काय, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. गुणरत्न सदावर्ते हे अनेक वेळा सार्वजनिक मंचांवर आणि माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उघडपणे प्रशंसा करताना दिसले आहेत. त्यामुळे कमळाच्या आकाराची ही खुर्ची राजकीय संकेत देणारी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, यावर सदावर्ते यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही खुर्ची केवळ एक वैयक्तिक आवड आहे की आगामी राजकीय भूमिकेचा संकेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंची युती, बीएमसी निवडणूक आणि सदावर्तेंची ही ‘राजेशाही खुर्ची’ या सगळ्या गोष्टी एकत्र येत मुंबईच्या राजकारणाला वेगळीच धार मिळताना दिसत आहे. कमळ सदृश खुर्चीमागील अर्थाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पार्श्वभूमीवर नजर टाकली तर ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, शिक्षणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे वास्तव केले आहे. त्यांनी एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण घेतले असून, विद्यार्थी दशेतच विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि मुंबईत स्थायिक होऊन वकिली सुरू केली. 2018 साली महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्गाअंतर्गत दिलेल्या आरक्षणाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या खटल्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील हे दोघेही विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सातत्याने व्यक्त होत असतात. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे आणि या कमळसदृश खुर्चीमागील अर्थाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:15 pm

अमोल मिटकरी विदूषक अन् फुटकळ आमदार:त्यांची ग्रामपंचायही निवडून आणण्याची लायकी नाही, प्रशांत जगताप यांनी काढली लायकी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगपात यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची अक्षरशः लायकी काढली आहे. मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक व फुटकळ आमदाराच्या विधानावर मी भाष्य करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी वाटाघाटी सुरू आहेत. त्याला विरोध म्हणून प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता प्रशांत जगताप यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरींची ग्रामपंचायतही निवडून आणण्याची लायकी नाही मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक व फुटकळ आमदाराच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. ज्यांची ग्रामपंचायत ही निवडून येण्याची लायकी नाही, त्यांच्यावर मी काय बोलावे? अमोल मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी व फुटकळ नेते आहेत. जे लोकांतून निवडून आले असतील, त्यांनी माझ्याशी बोलावे, असे प्रशांत जगताप यांनी आमदार अमोल मिटकरी यांचा खरपूस समाचार घेताना म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते अमोल मिटकरी? प्रशांत जगपात यांच्या राजीनाम्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी त्यांना स्वतःची खुमखुमी दाखवण्यासाठी स्वतःचा पक्ष काढण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय. मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार, अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा. पुण्याचा भावी “खाज”दार, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते:ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने मांडले मतांचे गणित; वाचा काय आहे मतांचे समीकरण? मनसे व ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली. यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचे गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 1:13 pm

पुणे-नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल:जयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे निमित्त; कोरेगाव भीमाला कसे जायचे? वाचा

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून हे बदल लागू होतील. राज्याच्या विविध भागांतून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाहतूक बदल १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जाऊन तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. हलक्या वाहनांसाठी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आला असून, या पुलावरून केवळ अनुयायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाने वाहनतळांची सोय केली आहे. लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी (मोटारी व हलकी चारचाकी वाहने), आपले घर शेजारील वाहनतळ, मोनिका हॉटेलशेजारी, तुळापूर फाटा रौनक स्वीटजवळ (दुचाकी वाहने), तसेच थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, लोणीकंद आपले घर सोसायटीजवळील मोकळी जागा (बस, टेम्पो) येथे वाहने उभी करता येतील. याव्यतिरिक्त पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मोकळे मैदान, थेऊर रस्ता, ज्ञानमुद्रा ॲकॅडमी मैदान आणि सोमवंशी ॲकॅडमी येथेही पार्किंगची व्यवस्था आहे. शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीतील मंतरवाडी फाटा, मरकळ पूल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद असेल.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 12:56 pm

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला 'ब्रेक'!:नियमभंगामुळे महापालिकेने बीकेसी स्थानकाचे काम पाडले बंद, नेमके प्रकरण काय?

देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामात वायू प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बुलेट ट्रेनच्या कामाला तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे. बीकेसी परिसरात बुलेट ट्रेनच्या स्थानकाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या बांधकामामुळे परिसरात धुळीचे लोट उसळत असून प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. पालिकेच्या पथकाने तपास केला असता, या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या पाणी फवारणीच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. जोपर्यंत प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जात नाहीत, तोपर्यंत काम सुरू करू नये, असा इशारा पालिकेने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाची कडक भूमिका मुंबईतील हवेची खालावलेली गुणवत्ता लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणावर स्वतः देखरेख करत आहे. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, जेथे नियमांचे उल्लंघन होईल, तेथे काम थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत. न्यायालयाने पालिका आयुक्त आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेवरही ताशेरे ओढले असून, अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. पॅनेलच्या अहवालात धक्कादायक वास्तव दक्षिण मुंबईतील फोर्ट, कफ परेड आणि कुलाबा भागातील विविध बांधकामांच्या पाहणीसाठी नेमलेल्या समितीने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या ठिकाणांवर एअर क्वालिटी मॉनिटर चक्क तळमजल्यावर लावला होता, ज्यामुळे अचूक माहिती मिळत नव्हती. कल्पतरू चेंबर्स, डीजी चेंबर आणि मॅजेस्टिक आमदार निवास या तीनही ठिकाणी नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे आढळले. स्मॉग गन, फॉगिंग आणि पाणी फवारणी केवळ अधिकाऱ्यांच्या पाहणीपुरती किंवा मर्यादित स्वरूपात केली जात असल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. पायाभूत प्रकल्पांना 'प्रदूषण' नियमांचे बंधन केवळ खासगी विकासकच नव्हे, तर बुलेट ट्रेन आणि मेट्रोसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही आता प्रदूषण नियंत्रणाचे कडक नियम पाळावे लागणार आहेत. जर या नियमांचे पालन झाले नाही, तर यापुढे आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. प्रदूषण आणि विकास यांच्यात समतोल राखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले असून, बुलेट ट्रेनचे काम पुन्हा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 12:50 pm

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुदखेड तालुक्यात खळबळ

नांदेड/ मुदखेड : प्रतिनिधी एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे उघडकीस आली. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे सदर घटना संशयास्पद असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुदखेड तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथील दोन मुलं रेल्वे खाली कटली आहेत. तर त्या मुलाच्या आई-वडिलांनी […] The post एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुदखेड तालुक्यात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 12:42 pm

शरद पवारांना सोडून जाऊ नका:शिंदे गटाच्या नेत्याचा शरद पवार गटाच्या नेत्याला सल्ला; प्रशांत जगताप यांनी दिली आहे सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटाला जबर झटका बसल्याचे मानले जात आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शरद पवारांची साथ न सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची स्थानिक राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी वाटाघाटी सुरू आहेत. त्याला विरोध म्हणून प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शरद पवारांची साथ न सोडण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. प्रशांतदादा एक चांगला कार्यकर्ता - रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, प्रशांतदादा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यांनी पुणे शहरात महापौर पदासह इतर पदांवर चांगले काम केले आहे. कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही. त्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी किंवा विरोधक असलो तरी त्याला सन्मान देण्याचे काम सर्वांनी करायचे असते. प्रशांत जगपात यांनी प्रचंड विचार करून आपला निर्णय घेतला पाहिजे. कारण, एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी परत अनेक संकटे पार करावी लागतात. यावेळी त्यांना तुम्हाला प्रशांत जगताप यांच्यावर अन्याय झाला असे वाटते का? असा प्रश्न करण्यात आला असता रवींद्र धंगेकर म्हणाले, पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानंतर अन्याय बाजूला ठेवावा लागतो. कारण, पक्षप्रमुखांना त्यांच्या पक्षाची व कार्यकर्त्यांची काळजी असते. अजून निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 30 तारखेपर्यंतची मुदत आहे. त्यांनी अजूनही आपल्या निर्णयावर फेरविचार करावा. राजकारणात आपल्याला आवडत नसले तरी पक्षप्रमुखांच्या पुढे आपण जाता कामा नये. कुठेही गेले तरी पक्षप्रमुखांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. प्रशांत जगताप यांची भूमिका योग्य असू शकते, पण पक्ष म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. मी त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचा निरोप पाठवला आहे. प्रशांतदादा पुणेकरांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी आपल्या डोक्यात चांगला विचार घ्यावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पुण्यात अनेक जुनेजाणते राजकारणी लोक आहेत. त्यांनी त्या लोकांशी संवाद साधावा. प्रशांतदादा तसा हुशार आहे. पण कधीकधी चांगल्या माणसासोबतही दगाफटका होतो. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी अनेकांशी चर्चा केली पाहिजे, असे धंगेकर म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेमके काय सुरू? पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यावर चर्चा सुरू केली आगहे. यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. या समितीने महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षासोबत युती करण्याची जाहीर भूमिका मांडली होती. त्याला प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला आहे. अजित पवारांशी आघाडी केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असेही ते म्हणाले होते. पण गत काही दिवसांपासून पुण्यात तुतारीचे (शरद पवार गट) उमेदवार घड्याळ (अजित पवार गट) चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंबंधीचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर करण्याची चिन्हे असताना प्रशांत जगताप यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 12:40 pm

अजिंठा घाटात पुन्हा वाहतूक कोंडी:ट्रकमध्ये बिघाड झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, संभाजीनगर-जळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प

छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याला जोडणाऱ्या अजिंठा घाटात आज एका अवजड ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. घाटाच्या वळणावरच ट्रक बंद पडल्याने एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, वाहनांची एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एक अवजड ट्रक अजिंठा घाटातील एका तीव्र वळणावर अचानक बंद पडला. घाटातील रस्ता अरुंद असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास जागा उरली नाही. अवघ्या काही वेळातच या ठिकाणी शेकडो वाहने अडकून पडली. यामध्ये खाजगी बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांचाही समावेश आहे. सध्या एका बाजूने हळूहळू वाहतूक सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या नाताळच्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मात्र, अजिंठा घाटातील या वाहतूक कोंडीमुळे एसटी महामंडळाच्या बसेसही अडकल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजन कोलमडले असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी नित्याचीच अरुंद रस्ता आणि वाहनांच्या बिघाडांमुळे अजिंठा घाटात वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत असून कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. अलीकडेच नोव्हेंबर २०२५ मध्ये २० तासांहून अधिक काळ कोंडी झाली होती. ज्यामुळे एका थायलंडच्या पर्यटकाला मोटरसायकलवरून विमानतळावर जावे लागले होते. त्याआधीही मे २०२५ मध्ये वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने ५ तासांची कोंडी झाली होती, ज्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. घाटरस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 12:12 pm

एकाच कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू:मुलांनी रेल्वेखाली उडी घेतली, तर आई-वडिलांचे मृतदेह घरात पलंगावर आढळले; नांदेड हादरले

एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरातच झोपलेल्या स्थितीत आढळले. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी उलटसूलट चर्चा रंगली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. बजरंग रमेश लखे (22), उमेश रमेश लखे (25) व रमेश होनाजी लखे (51) व राधाबाई रमेश लखे (44) अशी मृतांची नावे आहेत. बजरंग व उमेश हे सख्खे बंधू आहेत. रमेश व राधाबाई असे त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. तो सामाजिक कार्यात सक्रिय होता. नेमकी घटना काय घडली? जवळा मुरार येथे रमेश लखे व राधाबाई लखे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना बजरंग व उमेश ही 2 मुले होती. हे एक सर्वसाधारण कुटुंब होते. अल्पभूधारक असूनही मोठ्या कष्टाने ते आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. पण बजरंग व उमेश या दोघांनी आज गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली असता त्यांचे आईवडीलही घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळले. हे पाहून गावात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला. टोकाचे पाऊल उचलले का? हे प्रकरण आत्महत्येचे आहे की, घातपाताचे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले असून, मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनेचा उलगडा करण्यासाठी न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपासानंतरच सत्य समोर येईल. पोलिसांनी चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत. तसेच या कुटुंबाचा कुणाशी वाद होता का? कौटुंबिक वादातून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले का? किंवा त्यांचा काही घातपात झाला का? या अंगानेही पोलिस तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 12:10 pm

मनसेसोबत युतीच्या आनंदातच उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का:रात्री आनंदोत्सव साजरा करणारे मोठे नेते भाजपात; आघाडीला दुहेरी धक्का

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, नाशिक शहरातील राजकारण सध्या विशेष चर्चेत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांतील नेते पक्षांतराच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत असतानाच नाशिकमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकचे दोन माजी महापौर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दिग्गज नेते विनायक पांडे आणि यतिन वाघ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ व प्रभावशाली नेते शाहू खैरे हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, ही घडामोड अशा वेळी घडत आहे जेव्हा नुकतीच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युतीची घोषणा झाली असून, त्याचा जल्लोष नाशिकसह संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला होता. बुधवारी झालेल्या या युतीच्या घोषणेच्या वेळी विनायक पांडे हे स्वतः उपस्थित राहून आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विनायक पांडे हे ठाकरे गटातील अत्यंत विश्वासू, आक्रमक आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबत माजी महापौर यतिन वाघ यांचेही भाजपकडे वळणे हे ठाकरे गटासाठी मोठे खिंडार मानले जात आहे. मनसे-शिवसेना युतीच्या जल्लोषानंतर लगेचच ही उलथापालथ झाल्याने नाशिकमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. या संभाव्य पक्षप्रवेशाला भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विनायक पांडे, यतिन वाघ आणि शाहू खैरे यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडणार आहे. गिरीश महाजन यांना भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय समीकरणे त्यांनी यशस्वीपणे हाताळलेली आहेत. नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात एकाच वेळी ठाकरे गट आणि काँग्रेसमधील बडे चेहरे भाजपमध्ये आणणे ही भाजपची मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप शहरात आपली ताकद अधिक मजबूत करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, काँग्रेससाठीही ही घडामोड मोठा धक्का ठरणार आहे. नाशिकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून शाहू खैरे यांची ओळख आहे. दीर्घकाळ पक्षासाठी काम केलेला हा चेहरा भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसच्या स्थानिक संघटनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शाहू खैरे यांचा शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय घटकांवर प्रभाव असून, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. एकाच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याची ही खेळी महाविकास आघाडीसाठी गंभीर इशारा मानली जात आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीची पकड सैल करण्याच्या दृष्टीने भाजपने उचललेले हे पाऊल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नाशिकच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार एकूणच पाहता, नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही पक्षांतरांची लाट शहराच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार आहे. मनसे-शिवसेना युतीमुळे ठाकरे गटाला मिळणारा संभाव्य फायदा कमी करण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखल्याचे चित्र आहे. विनायक पांडे, यतिन वाघ आणि शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास नाशिकमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का ठरेल, तर भाजपसाठी ही निवडणूकपूर्व मोठी ताकदवाढ ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता या पक्षप्रवेशाचा अधिकृत कार्यक्रम कधी होतो आणि त्यानंतर नाशिकच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 12:09 pm

घटस्फोटीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार:नांदेडच्या एका तरुणावर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना

सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घटस्फोटीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २४ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे एक पथक आरोपीच्या अटकेसाठी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील राजेश बाबुराव वाघमारे उर्फ मोरे हा सुमारे दिड वर्षापुर्वीपासून सेनगाव तालुक्यात एका फायनांन्स कंपनीमध्ये काम करीत होता. यावेळी वसूली व इतर कारणावरून त्याचे बाहेरगावी दौरे होत होते. यामध्ये त्यांचे एका घटस्फोटीत महिलेसोबत सुत जुळविले. त्याने महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्याशी वारंवार संवाद साधण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने महिलेस लग्नाचे अमिष दाखविले. तु्झ्या सोबत लग्न करतो तसेच तुझ्या मुलाचा सांभाळ करतो असे म्हणत ता. १३ जानेवारी २५ ते ता. १९ सप्टेंबर पर्यंत तिला सेनगाव, नांदेड, वाशीम येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मागील काही दिवसांपासून त्या महिलेने लग्न करण्याचा तगादा लावल्यानंतर त्याने महिलेस टाळण्यास सुरवात केली तसेच महिलेस जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्या महिलेने सेनगाव पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राजेश वाघमारे उर्फ मोरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. उपनिरीक्षक खंदारे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 11:51 am

उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगेच्या बॅनमुळे खळबळ:मराठीचा अपमान केला तर.. नहीं बटोगे... तो भी पिटोगे; मुंबईत राजकीय रणकंदन

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसत आहे. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संभाव्य संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागांत “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…” अशा आशयाचे बॅनर झळकले आणि या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या बॅनरला उत्तर देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट करत मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा थेट इशारा दिला. या घटनेमुळे निवडणुकीआधीच मुंबईतील राजकारण तापले असून भाषिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संदीप देशपांडे यांनी या बॅनरवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, हा वाद मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा नसून, जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी तो निर्माण केला जात आहे. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावर आरोप करत म्हटले की, एआय जनरेटर वापरून तयार केलेल्या पोस्टरमागे भाजपचा हात आहे आणि उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम हा वाद पेटवला जात आहे. मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, हा संदेश देण्यासाठीच आपण सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांच्या भावना, भाषा आणि अस्मिता यांचा वापर फक्त मतांसाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मराठी माणूस कुणाच्या विरोधात नाही, पण त्याच्या स्वाभिमानावर आघात झाला तर उत्तर देणे अपरिहार्य ठरेल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. भाषिक मुद्द्यापुरतेच न थांबता संदीप देशपांडे यांनी सत्ताधाऱ्यांवर विकासाच्या मुद्द्यावरूनही जोरदार हल्ला चढवला. मुंबईकरांचा खरा ‘हॅपिनेस इंडेक्स’ किती आहे, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे अटल सेतूसारख्या मोठ्या प्रकल्पांचे श्रेय घेतले जाते, मात्र दुसरीकडे मुंबईतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रोजच्या जगण्यात सामान्य मुंबईकरांना कोणत्या सुविधा मिळतात, हा खरा विकासाचा निकष असल्याचे त्यांनी सांगितले. दोन-दोन हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप होत असताना सत्तेत असलेले पहारेकरी झोपेत होते का, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. गेली 25 वर्ष सत्ता उपभोगूनही मुंबईच्या मूलभूत समस्यांवर तोडगा न निघाल्याचा आरोप करत त्यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. या साऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये संदीप देशपांडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही जोरदार टीका केली. शेलार यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नसल्यामुळे ते रामदास आठवले यांच्याशी जवळीक वाढवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. सत्तेत असलेले लोक जर गुंडांसारखे वागू लागले आणि भ्रष्टाचार करू लागले, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणारच, असे म्हणत त्यांनी अनेक नेत्यांच्या नातेवाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ही यादी अजून मोठी होऊ शकते, असा इशारा देत “बात निकलेगी तो लंबी जाएगी” असे सूचक विधानही त्यांनी केले. अडाणी कुटुंबासाठीच महापालिकेवर ताबा हवा आहे का, असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विकास मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. किरीट सोमय्यांनी हातोडा घेऊन केलेल्या आरोपांचे काय झाले सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबाबत स्पष्टीकरण देताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, हे त्यांनी कौतुक म्हणून ट्विट केले असून त्यामागे स्पष्ट राजकीय संदेश आहे. आशिष कुरेशी यांच्यावरही त्यांनी टीका करत त्यांना मुंबईला लागलेली बुरशी, असे संबोधले. रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी भाजपचे हिंदुत्व कुठे होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. नवाब मलिक, भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्याशी भाजपच्या जवळकीवर प्रश्न उपस्थित करत फडणवीस सरकारवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांनी हातोडा घेऊन केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेवटी, मराठीचा अपमान केला तर उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा देत संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेची आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 11:40 am

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची निर्दोष मुक्तता:दिल्ली स्थित कोर्टाचा निर्णय; आरोपीविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचा दाखला

दिल्ली स्थित एका न्यायालयाने दहशतवादी कृत्यांत कथित हात असणाऱ्या 2 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. अब्दुल सुभान कुरेशी व अरीज खान अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अब्दुल सुभान कुरेशीला 2006 चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट व गुजरात बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आली होती. यासंबंधीच्या माहितीनुसार, अब्दुल कुरेशीवर इंडियन मुजाहिदीन (आयएम) या अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. कतर दुसरा आरोपी अरीज खान याच्यावर इंडियन मुजाहिदीन व सिमी या अतिरेकी संघटनांना पुनरुज्जीवित करण्याचा ठपका आहे. दोन्ही आरोपींवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. कुरेशीला पूर्व दिल्लीतील गाझीपूर येथून 23 जानेवारी 2018 रोजी अटक करण्यात आली होती. तर अरीज आखान हा बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणानंतर देशातून पळून गेला होता. त्याला 14 फेब्रुवारी 2018 रोजी त्याला भारत - नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. काय म्हणाले पटियाला कोर्ट? कोर्टाने आपल्या निर्णयात प्रस्तुत दोन्ही आरोपी बंदी असलेल्या संघटनांचे सदस्य असल्याचे किंवा त्यांनी भारतविरोधी कृ्त्यांमध्ये सहभाग घेतल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवले. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश अमित बन्सल आपल्या निकालात म्हणाले, आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तसेच ते सिमी व इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनांशी संबंधित असल्याचे किंवा त्या संघटनांना पुनरुज्जीवित केल्याचे अथवा त्यांनी भारतविरोधी कृत्य केल्याचेही कोणते ठोस पुरावे नाहीत. आरोपपत्रात आरोपींनी दिलेला जबाब व त्यांच्यावर दाखल इतर गुन्हे व त्या गुन्ह्यांशी संबंधित आरोपपत्र जोडण्यात आलेत. आरोपींनी पोलिसांना दिलेला जबाब न्यायालय ठोस पुरावे असल्याशिवाय ग्राह्य धरत नाही. तसेच आरोपपत्रात साक्षीदारांच्या यादीत मुख्यतः ड्यूटी अधिकारी व रेकॉर्ड नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणात आरोपी दोषी असल्याचे दिसून येत नाही, असे कोर्ट म्हणाले. आत्ता पाहू काय आहे नेमके प्रकरण? राजस्थानच्या बिजनौर जिल्ह्यात 12 सप्टेंबर 2014 रोजी एक स्फोट झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दिल्ली व उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगत असलेल्या भागांत छापेमारी केली होती. 20 ऑक्टोबर 2014 रोजी सिमी व इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असलेले अतिरेकी दिल्ली व आसपासच्या भागात दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. बिजनौरमध्ये झालेल्या हल्ल्यात कुरेशी व अरीज खानचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, अब्दुल सुभान कुरेशी व अरीज खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत कलम 18 व आयपीसी 120 ब नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने 20 डिसेंबर रोजी या दोघांची या प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीतून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेत. दोन्ही आरोपींवर इतर प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणात त्यांच्यावर न्यायालयीन खटला सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 11:37 am

मुनगंटीवार-फडणवीसांच्या भेटीच्या दोन दिवसांतच राजकारण बदलले:निवडणूक प्रमुखपदावरुन एकाची उचलबांगडी, दुसऱ्याची नियुक्ती

चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला चांगले यश प्राप्त करता आले नाही. भाजपने जिल्ह्यात पक्षाला ताकद दिली नसल्यानेच पक्षाला अपयश मिळाले असल्याचा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांनीच आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर लगेचच चंद्रपूर भाजपमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांची नाराजी दूर करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे बालले जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेले आमदार किशोर जोरगेवार यांना अचानक निवडणूक प्रमुखपदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने घेतल्याची चर्चा असून, या बदलामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्वात बदल झाल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या बदलामागे केवळ प्रशासकीय कारणे नसून, भाजपमधील दीर्घकालीन अंतर्गत संघर्ष हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला तणाव सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा अप्रत्यक्षपणे समोर आले असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही दोन गट स्पष्टपणे दिसून येतात. मुनगंटीवार यांच्या नाराजीचा विचार करूनच जोरगेवार यांच्याकडून निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजय संचेती यांची नियुक्ती ही मुनगंटीवार गटाला दिलेला दिलासा मानला जात आहे. या घडामोडींची पार्श्वभूमी पाहता, सुरुवातीला प्रदेश भाजपच्या निर्देशानुसार किशोर जोरगेवार यांची चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वेळी शहर भाजपचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाने दिलेल्या या आदेशानुसार इच्छुक उमेदवारांनी जोरगेवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान मुनगंटीवार गटाशी संबंधित माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी वेगळेच आवाहन करत इच्छुक उमेदवारांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे सांगितले. या परस्परविरोधी सूचनांमुळे भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि पक्षातील अंतर्गत वाद अधिकच तीव्र झाला. राहुल पावडे यांच्या या भूमिकेला विद्यमान शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र शब्दांत विरोध केला होता. पक्षशिस्तीचा भंग झाल्याचा आरोप करत त्यांनी पावडे यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले होते. मात्र, या संपूर्ण वादावर राहुल पावडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. या घडामोडींनंतरच आता आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुखपदावरून गच्छंती झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संचेती हे मुनगंटीवार गटाशी जवळीक असलेले नेते मानले जात असल्याने, या नियुक्तीकडे मुनगंटीवार यांच्या नाराजीची दखल घेऊन केलेला निर्णय म्हणून पाहिले जात आहे. चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. अजय संचेती हे निरीक्षक असून, निवडणूक प्रमुख हा स्थानिक नेता असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. निरीक्षक किंवा प्रभारी हे बाहेरून येणारे असतात आणि निवडणूक प्रमुखपदावरून हटवण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी ही केवळ चंद्रपूरपुरती मर्यादित नसून राज्यपातळीवरील विषयांशी संबंधित होती, असेही त्यांनी नमूद केले. मुनगंटीवार हे पक्षातील मोठे नेते असून त्यांची ताकद कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत त्यांनी या चर्चांना अप्रत्यक्षपणे फेटाळले. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून, त्याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 11:15 am

दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते:ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने मांडले मतांचे गणित; वाचा काय आहे मतांचे समीकरण?

मनसे व ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली. यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचे गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते, असे भाजपने म्हटले आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मंगळवारी वरळी येथील एका खासगी सभागृहात मनसे व ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. तूर्त ही युती मुंबई महापालिकेसाठी झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पण भविष्यात ही युती राज्यभर होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी त्यांनी मराठी मतदारांना आपल्या युतीमागे एकसंधपणे उभे राहण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गट व मनसेच्या युतीला शून्याची उपमा दिली आहे. काय म्हणाले केशव उपाध्ये? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बुधवारी यासंबंधी म्हणाले की, मनसे - उबाठा युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र! किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर - उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल, रातभर थंडीने काकडून मेल… दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. थोडं वास्तव पाहूया… फक्त मुंबईची आकडेवारी. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात लोकसभेत भाजपा–सेना युती विरुद्ध उबाठा–मविआ अशी लढत होती. भाजपने काय मांडले मतांचे गणित? मुंबईत भाजपा, मते – 15,30,853शिवसेना, मते – 11,43,380महायुतीची एकत्रित मते – 26,74,233 उबाठा – 16,94,326कॉंग्रेस – 7,68,083मविआची एकत्रित मते – 24,62,409 विधानसभा 2025 मध्ये मनसे स्वतंत्र लढली.भाजपा – 18,90,931शिवसेना – 10,09,083महायुती – 29,00,020 उबाठा – 13,95,303कॉंग्रेस – 6,82,532मविआ – 20,77,835 मनसे – 4,10,735 आता हिशोब सरळ आहे.उबाठा + मनसे = 18,02,678 महापालिकेत उबाठा सोबत कॉंग्रेस नाही, फक्त उबाठा - मनसे युती आहे. आणि ही आकडेवारी थेट सांगते - ही मते भाजपाच्या मतांपेक्षा कमी आहेत. म्हणूनच राजकारणात लक्षात ठेवा - दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते, असे उपाध्ये यांनी सांगितले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 11:03 am

ठाकरे बंधू एकत्र येताच भाजपची रणनीती बदलली:शिंदे गटासाठी जागांची संख्या वाढवली, तरीही नाराजी; जागावाटपावर तिढा कायम

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची औपचारिक घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मुंबईतील मराठी मतदारांचा मोठा वर्ग एकवटण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही युती भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः मुंबईत शिवसेना-मनसेची एकत्रित ताकद भाजप आणि शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते, हे लक्षात घेऊन भाजपने तातडीने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा धोका ओळखत भाजपने आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील जागावाटपाबाबत लवचिक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. याआधी झालेल्या पहिल्या जागावाटप बैठकीत भाजपने 227 पैकी केवळ 52 वॉर्ड शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दाखवली होती. या प्रस्तावामुळे शिवसेना प्रचंड नाराज झाली होती. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपने आता शिंदे गटासाठी 70 वॉर्ड सोडण्याचा नवा प्रस्ताव मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तरीही शिवसेनेकडून 100 जागांची मागणी कायम असून, भाजपने ती मागणी फेटाळल्याने सध्या दोन्ही पक्षांमध्ये 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे. शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली ही जागावाटपाची रस्सीखेच अद्याप सुटलेली नाही. भाजप 70 जागांवर ठाम असल्याचे सांगितले जात असताना, शिवसेना मात्र अधिक जागांवर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद अजूनही कायम आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनेही आपली तयारी वेगाने सुरू केली असून, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपच्या रणनीतीत मोठे बदल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मुंबई पालिकेसाठी उमेदवारांची निवड, निवडणूक रणनीती आणि संभाव्य समीकरणांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. मुंबई भाजपच्या कोअर कमिटीकडून काही उमेदवारांची अंतिम यादी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली असून, आज पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ठाकरे युतीच्या दिवशी मनसेला धक्का, शिंदे गटात प्रवेश दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेदिवशीच मनसेला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून आले. मनसेचे माजी सिनेट सदस्य आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुधाकर तांबोळी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. गेली 19 वर्षे मनसेत सक्रिय असलेले सुधाकर तांबोळी दोन वेळा मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. मात्र, मागील काही काळापासून पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचाली आणखी तीव्र झाल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 10:52 am

संजय राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार:म्हणाले - आम्ही सत्तेसाठी, मग तुम्ही एकमेकांची चंपी करायला एकत्र आलात का?

ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'बाळबोध' टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. जर या युतीमुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नसेल, तर मग त्यावर प्रतिक्रिया का देत आहात? तोंडाची डबडी का वाजवताय? असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही सगळे एकमेकांना चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. संजय राऊत यांनी भाजपच्या 'मराठी अस्मिते'च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले? दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता, भाजपच्या एकाही नेत्याने अखंड महाराष्ट्र, बेळगाव-कारवार सीमा प्रश्न किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधी आवाज उठवला आहे का? मराठी माणसासाठी केलेली तुमची केवळ १० कामे आम्हाला दाखवा. बावनकुळेंच्या विधानावरून घेरले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशन काळात 'वेगळा विदर्भ' करण्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. बावनकुळे जेव्हा महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत होते, तेव्हा त्यांच्याविरोधात ठाकरे उभे राहिले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारण्याचे कर्तव्य फडणवीसांचे होते, पण त्यांनी ते केले नाही. मग आता आम्हाला मराठी माणसाच्या गोष्टी का शिकवताय? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला. अदाणीला मुंबई विकणे मराठी माणसाची केलेली सेवा नाही ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून, त्या लहानशा तुकड्याचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते. पण आम्ही ते होऊ देत नाहीत. मुंबई वेगळी होऊ देत नाही. आम्ही मुंबईला अजुनपर्यंत संघर्ष करून महाराष्ट्रात ठेवले, हीच तुमची पोटदुखी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तुम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केले? मराठी माणसासाठी केलेली दहा कामे दाखवा. गौतम अडाणीच्या घशात मुंबई घालणे म्हणजे महाराष्ट्रासाठी केलेले काम किंवा मराठी माणसासाठी केलेली सेवा नाही, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. तुम्ही एकमेकांची चंपी करायला एकत्र आलात का? आमचे दोन ठाकरे एकत्र आलेत, तुम्ही तुमचे बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही सगळे एकमेकांना चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावत आहात? तुम्ही आमची शिवसेना फोडली हे तुमचे महाराष्ट्राच्या बाबतीत केलेले कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांची संघटना निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एका लफंग्याच्या हातात दिलीत, हे तुमचे मराठी प्रेम? राजकीय मतभेद असतील, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचे पाप तुम्ही केले. यासाठी महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल, असा संताप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. त्या पक्षाचा बापच अनौरस,शिंदेंवर बोचरी टीका एकनाथ शिंदेंच्या पक्षाची मुले ही अनौरस आहेत. स्वतःची मुले नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. अमित शाह यांनी या पक्षाला आपले नाव दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची मुले सांभाळावीत. भारतीय जनता पक्ष त्यांची मुले पळवणार आहे. कुत्रे पकडण्याच्या गाड्या असतात. तसे पिंजरे भाजपने लावली आहेत. महापालिका निवडणुकीनंतर कुणाची मुले, कोण पळवतंय हे समोर येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 10:36 am

महापालिका निवडणुकीतही 'घराणेशाही'चा व्हायरस:पुतणे, कन्या अन् पत्नीसाठी बड्या नेत्यांची 'फिल्डिंग'; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय मैदानात रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, यंदाची निवडणूक केवळ पक्षीय संघर्षाची नसून ती 'घराणेशाही'च्या वर्चस्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरसह कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बड्या नेत्यांनी आपल्या मुला-मुलींसाठी, पत्नीसाठी आणि नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावली जात आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पक्षश्रेष्ठी या 'वजनदार' मागण्यांना कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या (भाजप-शिवसेना) माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असली, तरी सुमारे २ हजार इच्छुक मैदानात आहेत. त्यात नेत्यांच्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापुरातही राजकीय वारसदार आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये घराणेशाही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर: युतीत इच्छुकांची गर्दी शिवसेना (शिंदे गट): पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी तिकीट मागितले आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी, तर किशनचंद तणवाणी यांनी मुलगा आणि भावासाठी फिल्डिंग लावली आहे. माजी महापौर नंदू घोडेले आणि विकास जैन यांनी स्वतःसह पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. भाजप: खासदार भागवत कराड यांनी मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्वला दहिफळे यांच्यासाठी, तर आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतलसाठी मागणी केली आहे. आमदार संजय केनेकर यांचा मुलगा हर्षवर्धन आणि गुजरातचे मंत्री सी. आर. पाटील यांची कन्या धर्मिष्ठा चव्हाण देखील शर्यतीत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) व इतर: अंबादास दानवे यांनी भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी, तर चंद्रकांत खैरे यांनी मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांच्यासाठी तिकीट मागितले आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल देखील निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. २. कोल्हापूर: मैदानात 'नवे' गडी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव रिंगणात उतरणार आहेत. पिंपरी-चिंचवड: वर्चस्वाची लढाई अजित पवार गट: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे प्रभाग ९ मधून नशीब आजमावणार आहेत. शिवसेना (शिंदे): खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित आणि पुतणे निलेश बारणे या दोघांना प्रभाग २४ मधून मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. भाजप: आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, आमदार उमा खापरे यांचे पुत्र जयदीप खापरे (प्रभाग १९) आणि आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे (प्रभाग १०) यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता एकीकडे बड्या नेत्यांचे नातेवाईक तिकीटासाठी दावेदारी करत असताना, दुसरीकडे वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटताना पक्षश्रेष्ठी गुणवत्तेला प्राधान्य देतात की नेत्यांच्या दबावापुढे झुकून घराणेशाहीला खतपाणी घालतात, याचे उत्तर लवकरच उमेदवारांच्या पहिल्या यादीतून मिळणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 10:14 am

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या आदर्शांचे अनुकरण करणे आवश्यक- इंगोले:बाबासाहेबांच्या जीवनप्रवासावर आरएलटी विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रम‎

‘दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी’द्वारा संचालित श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणासाठी साधने, सुविधा आणि सामाजिक स्वीकार नसतानाही डॉ. बाबासाहेबांनी केलेले अथक प्रयत्न आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. किशोर इंगोले यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांनी सिनेअभिनेत्याचे अनुकरण करण्याऐवजी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दि बी.जी.ई. संस्थेचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी डॉ. पवन माहेश्वरी, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. किशोर इंगोले, प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रविण कावळे, गौतम इंगोले, हर्षल बैस, अॅड. आकाश हिवराळे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांसमोर डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग उलगडून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी आढावा मांडला. प्रास्ताविक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम इंगोले यांनी केले. मनोगत डॉ. राजेश चंद्रवंशी यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रविण कावळे, समन्वयक, समान संधी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुजाता ताडम यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. गणेश सातपुते यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शैक्षणिक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. साहित्याचे वाचन करावे : आजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोबाईल फोनच्या जादा वापराचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड. मोतीसिंह मोहता यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जास्त वेळ मोबाईलवर घालवण्याऐवजी महापुरुषांच्या जीवनावर आधारित साहित्याचे वाचन करण्यात घालवावा असे आवाहन केले. शिक्षणाच्या बळावर झुंज समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या बळावर डॉ. बाबासाहेबांनी केलेली झुंज विद्यार्थ्यांसमोर डॉ. किशोर इंगोले यांनी उलगडून दाखवली. वर्गाच्या बाहेर बसून गणित शिकण्याची वेळ आलेल्या डॉ.बाबासाहेबांनी पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून इतिहास घडवला, असे सांगताना डॉ. इंगोले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासाठी साधने, सुविधा आणि सामाजिक स्वीकार नसतानाही डॉ.बाबासाहेबांनी केलेले अथक प्रयत्न आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांनी सिनेअभिनेत्याचे अनुकरण करण्याऐवजी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:55 am

अमरावतीच्या प्रवाशांना तिकीट दरवाढीचा फटका नाही‎:सामान्य श्रेणीत इंटरसिटीचे नागपूरपर्यंत, अंबा, सुरत एक्सप्रेससाठी वरणगावपर्यंत द्यावे लागणार नाही वाढीव भाडे‎

अमरावती अंबानगरीतील रेल्वे प्रवाशांना येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या रेल्वे तिकीट दरवाढीचा फारसा फटका बसणार नाही. कारण, अमरावतीहून नागपूरला जायचे असल्यास इंटरसिटी किंवा जबलपूर एक्सप्रेसने प्रवासी जातात. नागपूरचे अमरावतीपासूनचे अंतर सुमारे १५० कि.मी. आहे. तसेच, रेल्वे तिकीट दरवाढ ही सामान्य श्रेणीसाठी २१५ कि.मी. अंतरापर्यंत लागू नसल्याने नागपूरहून अमरावतीला येणे किंवा नागपूरला जाणे यासाठी एकही पैसा जास्त खर्च करावा लागणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. केवळ २१५ कि.मी. पेक्षा जास्त अंतर जायचे असेल तर त्या अंतरावरील रेल्वे स्टेशनपासून पुढे १ पैसा प्रति किलोमीटर वाढीव दर द्यावा लागणार आहे. अर्थात, मेमू आणि इंटरसिटी या गाड्यांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न देताच प्रवाशांना नागपूर, अकोला, शेगांव, वरणगांवपर्यंत जाता येईल. अमरावतीहून वरणगांवचे रेल्वेने अंतर २१५ कि.मी. आहे. मात्र, तेथून पुढे प्रति कि.मी. १ पैसा याप्रमाणे अतिरिक्त तिकीट दर द्यावा लागेल. सुरत एक्सप्रेसने जर सामान्य कोचमधून प्रवास करायचा असेल तरीही १ पैसा, मेल, एक्सप्रेस जसे अंबा अमरावती-मुंबई सीएसएमटी, अमरावती-पुणे या गाड्यांसाठी २ रु. प्रति कि.मी. अंतराने शुल्क द्यावे लागेल. तर एसी कोचमध्ये प्रवासाकरिता २ पैसे प्रति कि.मी. दराने वाढीव तिकीट खरेदी करावे लागणार आहे. याचाच अर्थ ५०० कि.मी. पर्यंत नॉन एसीने प्रवास करण्यासाठी १० रु. अतिरिक्त द्यावे लागतील. तर एसी कोचने ५०० कि.मी. पर्यंत प्रवास करण्यासाठी २० रु. लागतील. मेमू, मासिक पासच्या शुल्कात वाढ नाही जे चाकरमाने दररोज नोकरीच्या निमित्ताने जवळच्या शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करतात, त्यांच्याकडे मासिक पास असते. अशा पासकरिता कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे उपनगरीय रेल्वेलाही दरवाढीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती-बडनेरा, अमरावती-भुसावळ मेमूच्या तिकिटासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला. एक्सप्रेस आणि मेलच्या एसी प्रथम, द्वितीय श्रेणी तसेच द्वितीय श्रेणी एसीसाठी २ पैसे प्रति कि.मी. तिकीटांमध्ये दरवाढ आहे. उदाहरणच घ्यायचे असल्यास, अंबा एक्सप्रेसने दादरपर्यंत प्रवास करायचा असल्यास एकूण ६६३ कि.मी. अंतर आहे. यासाठी सामान्य श्रेणीसाठी भुसावळ स्टेशनपासून दादरपर्यंत १ पैसा प्रति कि.मी. दराने ४ रु. ४८ पैसे जास्त द्यावे लागतील. कारण हे अंतर ४४८ कि.मी. आहे. मूळ तिकीट खरेदी करतानाच तिकीटामध्ये ही वाढ लागून येईल. मात्र, द्वितीय श्रेणी स्लीपर कोच आणि प्रथम श्रेणी एसीसाठी अमरावती स्टेशनपासूनच दरवाढ द्यावी लागेल. अर्थात, १३ रु. २६ पैसे २६ डिसेंबरपासून अतिरिक्त द्यावे लागतील, अशी प्राथमिक माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली. २६ रोजी रेल्वेचे सॉफ्टवेअर अपडेट होईल. तिकिटात नेमकी किती दरवाढ झाली ते स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:20 am

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सेवेत:दररोज 30 विमानांची ये-जा अन् जागतिक दर्जाच्या सुविधा; मार्चपासून परदेशी उड्डाणे

देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील एका ऐतिहासिक पर्वाची आज, २५ डिसेंबर (नाताळ) रोजी सुरुवात झाली आहे. बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या विमानतळावरून ३० विमानांची रेलचेल असणार असून सुमारे ४ हजार प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. या विमानतळाच्या कार्यान्वित होण्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आजच्या पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या आपली सेवा देणार आहेत. पुढील १५ दिवसांत विमानांची ही संख्या दररोज ४८ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच, येत्या मार्च २०२६ पासून येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जगातील सर्वांत व्यस्त विमानतळ होण्याचा अंदाज सध्या या विमानतळावर दोन धावपट्ट्या कार्यरत आहेत. मात्र, भविष्यात तिसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन आहे. तिसरी धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर, नवी मुंबई विमानतळ हे जगातील सर्वांत जास्त प्रवाशांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नावारूपाला येईल. पहिल्या टप्प्यात वर्षाला सुमारे २ कोटी प्रवासी येथून प्रवास करतील, असा अंदाज आहे. सध्या विमानतळ १२ तास कार्यरत राहणार आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असताना, सुरुवातीच्या काळात हे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहील. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून हे विमानतळ २४ तास सुरू करण्यात येईल. नवी मुंबई विमानतळाची खास वैशिष्ट्ये:

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:19 am

शिंदेसेनेकडून 50 जागांची मागणी;‎भाजप बुचकळ्यात:तिढा कायम‎, आज सकाळी युतीची बैठक, प्रभागनिहाय जागांवर होणार खल‎

महानगर पालिकेतील युतीसंदर्भात बुधवार २४ रोजी दुपारी २ वाजता कॅम्प परिसरातील हॉटेल ग्रॅण्ड महफील येथे भाजपा व शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये बैठकीच्या दोन फेऱ्या झाल्या. या चर्चेत शिंदेसेनेकडून ५० जागा मिळाल्या तर आनंद वाटेल, अशी मागणी करण्यात आल्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते बुचकाळ्यात पडले आहेत. कारण, महानगर पालिकेत ८७ जागा आहेत, त्यापैकी ५० जागा म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. ते बघता युतीतील तिन्ही घटक पक्ष शिंदेसेना, भाजपा व युवा स्वाभिमानपुढे जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे आव्हान आहे. यासंदर्भात गुरुवार २५ रोजी सकाळी पुन्हा जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत प्रभागनिहाय जागांवर खल होणार आहे. आम्ही प्रभागनिहाय जागांवर चर्चा केल्याचे शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी सांगितले तर, आम्ही कोणता उमेदवार या जागेवरून निवडून येणार त्यालाच तिकीट देण्यात यावे, असा आग्रह धरल्याचे भाजपाचे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संजय कुटे म्हणाले. सोबतच युती ही कायम राहणार, { उर्वरित पान ४ निवडून येणे हाच मुख्य निकष ^युती निश्चित होणारच आहे. आम्ही सकारात्मकतेने पुढे जात आहोत. चर्चेत जागा कमी, जास्त होतील. ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तेथे त्या पक्षाचा उमेदवार देणार. निवडून येणे हाच मुख्य निकष आहे. चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. - आ. संजय कुटे, भाजपा, जिल्हा निवडणूक प्रभारी. महानगर पालिकेत जागांबाबत सुवर्णमध्य काढला तरच तो युतीसाठी पोषक ठरणार आहे. कारण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीचे तिन्ही घटक पक्ष जर अडून राहिले, तर यामुळे मतदारांमध्ये वेगळाच संदेश जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भाजपाला २०१७ मध्ये ४५, शिवसेनेला ७ तर युवा स्वाभिमानला ३ जागा मिळाल्या होत्या. भाजपा २०१७ च्या निवडणुकीत ४५ जागांसह बहुमतात होता. तर शिवसेना चौथ्या व युवा स्वाभिमान सहाव्या क्रमांकावर होता. भाजपा जास्त जागांवर दावा केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना एकूण सदस्य संख्या ८७ असताना जर ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा जर शिंदेसेनेने मागितल्या तर युवा स्वाभिमानला किती जागा देणार, भाजपा किती जागांवर लढणार हा प्रश्न आहे. युवा स्वाभिमाननेही २० जागांची मागणी केली आहे. यात तिन्ही पक्षांना जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सुवर्णमध्याचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. शिंदेसेनेचा हेका; पुन्हा होणार चर्चा आम्हाला अमूक इतक्या जागा हव्यात, असा शिंदेसेनेचा हेका असल्यामुळे चर्चेच्या दोन फेऱ्यांनंतरही जागा वाटपाबाबत निश्चिती झाली नाही. जोवर तिन्ही पक्ष जागांबाबत समाधानी होणार नाहीत, तोवर चर्चेच्या फेऱ्या चालत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, २०१७ च्या निवडणुकीला ८ वर्ष झाली आहे. आता परिस्थिती बदलल्याचे शिंदेसेनेच्या नेत्यांचे मत आहे. भाजपामध्ये असलेले दोन दिग्गज नेते माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख हे आता काँग्रेसमध्ये व माजी मंत्री जगदीश गुप्ता हे आता शिंदेसेनेचे नेते आहेत. या दोघांच्याही नेतृत्त्वात त्यावेळी भाजपने मनपा निवडणूक लढली होती.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:17 am

मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करू नका:गाडगेबाबांचा आदर्श घ्या, साऊर येथे भागवत सप्ताहात सुश्री स्नेहगंगाश्री यांचा उपदेश‎

भातकुली तालुक्यातील साऊर येथे १८ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित श्रीमद्भ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सध्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. आपले विचार व्यक्त करताना सुश्री स्नेहगंगाश्री म्हणाल्या की, मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करू नका, संत गांडगेबाबांचा आदर्श घ्यावा.ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रवचनात सुश्री स्नेहगंगाश्री आळंदीकर यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबांचा मुलांना शिक्षण द्या हा अमूल्य संदेश प्रभावी शब्दांत मांडला. मनुष्य जीवन जगत असताना केवळ सुसंस्कृत नव्हे तर सुशिक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.गाडगेबाबांच ्या विचारांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, गरिबांचे लग्न लावून द्या, अनाथांना आसरा द्या, बायकोला कमी भावाचे लुगडे घ्या; पण मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करू नका. विद्यार्थी जीवन कसे असावे आणि विद्यार्थ्यांनी आयुष्य कसे जगावे, हे भागवत कथेच्या माध्यमातून त्यांनी उलगडून सांगितले. आज समाजात पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे अनेक मिळतील. मात्र, पैसा नाही म्हणून दारू सोडणारा एकही सापडणार नाही. असे परखड उपदेश सुश्री स्नेहगंगाश्री यांनी उपस्थितांची मने हेलावून टाकली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे खरे साधन असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. या ज्ञानयज्ञ सप्ताहामुळे साऊर परिसरात भक्ती, संस्कार आणि विचारांची उर्जा निर्माण झाली असून भाविकांकडून कार्यक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:16 am

कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय अन् सनराइज् स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात:महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

स्थानिक कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तसेच सनराइज् इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार राजेश वानखडे, तहसीलदार मयूर कळसे, आरती वानखडे, गंगाधर दंडाळे, छाया दंडाळे, रवी वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील बुरघाटे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. निलेश माहोरे व संचालिका कोमल दंडाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुख्या. रजनी माहोरे यांनी मानले. या वेळी बाबाराव दंडाळे, प्रमिला दंडाळे, विलास इंगोले, मुख्याध्यापिका एम. टी. फाले, विश्वजीत दंडाळे, कोमल दंडाळे, जयश्री नवले, अशोक वेरुळकर, संजय देशमुख, अजय गुल्हाने, जयश्री गुल्हाने, मयुरी राऊत, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अडचणींना समोरे जावे तहसीलदार मयूर कळसे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना कसे सामोरे जावे, याबद्दल प्रोत्साहन दिले. संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव दंडाळे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तसेच सनराइज इंग्लिश स्कूल तिवसा च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:16 am

मनपा निवडणूक:गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निगराणी पथकांची नियुक्ती, पथकांना कारवाई करण्याचे निर्देश‎

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौंम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनात मनपा कॉन्फरन्स हॉल येथे संनियंत्रण समितीची सविस्तर व महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध निगराणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये स्थिर निगराणी पथक, भरारी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथकांमार्फत निवडणुकीशी संबंधीत सर्वच कारवाईवर सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये बेकायदेशीर मद्यसाठा, रोख रक्कम, प्रचार साहित्य तसेच इतर वस्तूंच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवली जाणार आहे. निगराणी पथकांद्वारे जप्त करण्यात येणाऱ्या मद्य, रोख रक्कम, साहित्य व इतर वस्तूंवर तत्काळ व योग्य कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत संबंधित अधिकाऱ्यांची अध्यक्ष व सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथकांकडून कोणतीही कार्यवाही झाल्यास तत्काळ समितीला कळवण्यात येणार आहे. मनपा निवडणूक पूर्णतः पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, विनय ठमके, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, उपायुक्त योगेश पिठे, श्यामसुंदर देव, दत्तात्रय फिस्के, शिल्पा पवार, संजय नेवारे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:15 am

क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत व्यक्तिमत्त्व घडते:सांस्कृतिक अविष्कार महोत्सवामध्ये डॉ. कमलताई गवई यांचे प्रतिपादन‎

प्रतिनिधी | अमरावती शालेय जीवनातील क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. असे प्रतिपादन डॉ. कमलताई गवई यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक अविष्कार यांचे आयोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते. त्या वेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या डॉ. कमल गवई, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्यासह उप जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, सेवानिवृत्ती कार्यकारी अभियंता उषा ठुसे, अंजली ठाकरे, डॉ. राजकुमार दासरवाड, तुषार शेळके, पुनम कैथवास, आयुक्त राजेद्र जाधवर, सरीता बोबडे उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:14 am

तिवसा येथे प्रहारचे महाआरोग्य रोगनिदान शिबिर:230 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया, शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, 900 रुग्णांची निशुल्क झाली तपासणी‎

ग्रामीण व सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवा ही काळाची गरज ओळखून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका जीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर तसेच शालिनी मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तिवसा येथे निशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ९०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून २३० गरजू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण कुटुंबांसाठी हे शिबिर वरदान ठरले आहे. शिबिराचे उद्घाटन तिवसा पोलीस निरीक्षक गोपालजी उपाध्याय, संजय देशमुख, गौरी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख प्रहार योगेश लोखंडे, बाळा देशमुख, सरपंच सुरेंद्र भिवगडे, मनोज काळमेघ, प्रविण केने, नरेंद्र आसोडे, सारंग हिवसे, मंगेश वानखडे, प्रशांत राऊत, पंकज चौधरी, दिलीप गोरडे, अंकुश राऊत, सागर ढोरे, विशाल ठाकूर, अमोल वाढोनकार, लोकेश लावनकर, श्रीकृष्ण पाटील, बबलू महात्मे, सुरज कुरजेकर, मोहन गोरडे, राजा देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. या वेळी मेडिसिन, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, शल्यचिकित्सा, न्यूरोलॉजी (मेंदू शस्त्रक्रिया), किडनी रोग, अस्थिरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, हृदयरोग अशा विविध विभागातील तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची सखोल तपासणी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:13 am

शेतकऱ्यांना मनरेगात 125 दिवसांचा कौशल्याधारित दीर्घकालीन रोजगार:दीर्घकालीन रोजगार हमी योजनेसाठी सरकारचा 60. 40 खर्चाचा वाटा

विकसित भारत जी रामजी या नवीन योजनेबाबत मार्गदर्शन दरम्यान २०४७ विकसित भारत ही संकल्पना समोर ठेवून भारत सरकारने या योजनेचा शुभारंभ केला आहे. या मनरेगा अंतर्गत केवळ १०० दिवसांची रोजगार हमी होती. यावेळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीही काळाची गरज आहे, शेतकऱ्यांना मनरेगात १२५ दिवसांचा कौशल्याधारित दीर्घकालीन रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी वाळकुंडे यांनी केले आहे. ते विकसित भारताची संकल्प योजनेचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होतो. या योजनेअंतर्गत १२५ दिवसांची कौशल्याधारित आजीविका व दीर्घकालीन रोजगाराची हमी देण्यात आली. या योजनेमध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्यात ६०. ४० असा खर्चाचा वाटा देत असल्याची माहिती कृषी विस्तार विषयतज्ज्ञ डॉ. विशाल वैरागर यांनी दिली. भारताचे माजी पंतप्रधान व शेतकरी हिताचे अग्रदूत स्व. चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे नैसर्गिक शेती पर्यावरणपूरक शेतीचे फायदे याबाबत मार्गदर्शक शेती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्व. चौधरी चरण सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तानाजी वाळकुंडे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय किसान दिनाचे महत्त्व विशद करताना स्व. चौधरी चरण सिंग यांच्या शेतकरी-केंद्रित धोरणांचा उल्लेख केला तसेच शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. स्वाती कदम,डॉ. मडावी, डॉ. वैरागर, क्षीरसागर, तुषार आहिरे, सुयोग ठाकरेसह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातील तांत्रिक सत्रात काजल म्हात्रे यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना, मूलतत्त्वे, उत्पादन खर्च कमी करण्याच्या पद्धती, मातीची सुपीकता वाढवणे तसेच पर्यावरणपूरक शेतीचे फायदे याबाबत सखोल व मार्गदर्शक माहिती दिली. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:02 am

महिलांना बाजारपेठ विक्रीची संधी उपलब्ध:सांगोल्यातील प्रशिक्षण कार्यशाळेत सरपंच कविता अलदर यांचे प्रतिपादन‎

जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत, मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील प्रस्तावित मधाचे गाव कोळे येथे महिला स्वयंसहायता समूहांच्या सदस्यांसाठी उत्पादन पॅकेजिंग, लेबलिंग व ऑनलाईन विक्री या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ विक्रीची संधी उपलब्ध व्हावी, यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन सरपंच कविता अलदर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना व्यावसायिक दर्जा कसा द्यावा, यावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये उत्पादनाचे योग्य पॅकेजिंग, लेबलिंग, विविध आवश्यक परवाने तसेच उत्पादनाची गुणवत्ता सातत्याने कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ व डिजिटल माध्यमांतून विक्रीची संधी उपलब्ध व्हावी. या उद्देशाने जिल्ह्यात प्रस्तावित १० कृषी मॉल तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि उमेद मार्टवर उत्पादन नोंदणी, सूचीकरण, विक्री प्रक्रिया, दरनिर्धारण व वितरण व्यवस्थापन या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. महिलांच्या शंका व प्रश्नांचे समाधान करत त्यांना बाजारपेठाभिमुख उत्पादन बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच सरपंच कविता अलदर, ग्रामसेवक हनुमंत मोहिते, बी.एम.एम. उमेद अण्णासाहेब औताडे, रुपाली काळे, अलका हत्तेकर, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:02 am

नगराध्यक्षा सुनंदा आवताडे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला:निधीचा दिला शब्द

मंगळवेढ्याच्या नगराध्यक्ष सुनंदा बबनराव आवताडे, नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नूतन नगराध्यक्षांचा सन्मान केला. शहरातील भूमिगत गटारी, रस्ते, पाणी इत्यादी मूलभूत गरजा भागवण्यासाठी नगरविकासच्या माध्यमातून भविष्यात निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, महेश साठे, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, महेश साठे, आबासाहेब लांडे, दिलीप सावंत मंत्री संजय शिरसाट, दादा भुसे, पक्षाचे सचिव मोरे उपस्थित होते. दुधनी नगरपरिषदेत भाजप शून्यावर असून २० पैकी २० नगरसेवक शिवसेनेचे विजयी झाले आहेत. युवासेना जिल्हाप्रमुख ते नगराध्यक्ष असा प्रथमेश म्हेत्रे यांचा प्रवास आहे. विक्रमी मताधिक्याने विजय होत ५ दशकांचा दुधनीचा गड अबाधित ठेवला. आपल्या वडिलांची गादी चालवत आजोबा स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्याप्रमाणे प्रथमेश म्हेत्रे यांना दुधनीत निर्विवाद वर्चस्व मिळाल्यामुळे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, वडील शंकर म्हेत्रे यांचे डोळे पाणावले. म्हेत्रे बंधूंचे डोळे पाणावले

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:01 am

जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 39, 439 कामे:आर्थिक मर्यादा वाढीमुळे मजुरांना दिलासा, केंद्र सरकारने रोजगार हमी कामाच्या नियमात बदल, 100 ऐवजी 150 दिवस काम मिळणार‎

सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनेरेगा) सध्या तब्बल ३९ हजारांहून अधिक कामे सुरू आहेत. दुष्काळी परिस्थिती, कमी पावसामुळे शेतीवर आलेले संकट आणि ग्रामीण बेरोजगारी लक्षात घेता मनेरेगा योजना जिल्ह्यासाठी मोठा आधार ठरत आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये मनरेगा अंतर्गत आर्थिक मर्यादा २ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांपर्यंत वाढवली , त्यामुळे ५ लाखांपर्यंतची कामे पूर्ण करण्यास मदत होणार आहे . जिल्ह्यात फळबाग लागवड, घरकुल, वैयक्तिक विहिरी, वृक्षलागवड, रस्ते, रेशीम तुती लागवड, गुरांचा गोठा पेव्हर ब्लॉक, शोषखड्डा व अन्य कामे अशा विविध स्वरूपातील कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः सांगोला, माळशिरस, मोहोळ, करमाळा, पंढरपूर आणि बार्शी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर मनेरेगाची कामे सुरू असून हजारो मजुरांना रोजगार मिळत आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यास मदत होत आहे. अनेक कुटुंबांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने आर्थिक दिलासा मिळत आहे. महिला मजुरांचा सहभागही लक्षणीय असून त्यांच्या हाताला नियमित काम मिळतआहे.प्रशासनाकडून कामांची वेळेवर मोजणी, मजुरी थेट बँक खात्यात जमा करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा प्रशासनाने आगामी काळात आणखी कामे मंजूर करण्याचा आराखडा केला असून मनेरेगामधून जास्तीत- जास्त गरजू कुटुंबांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळी सोलापूरसाठी मनेरेगा योजना सध्या ‘जीवनवाहिनी’ ठरत असल्याचे चित्र आहे. तालुका आकडेवारी सांगोला ३८०९ अक्कलकोट ३०७५ बार्शी २६५३ करमाळा ३६११ माढा ५२१२ माळशिरस ४७८१ मोहोळ ४१७२ उत्तर सोलापूर ७८३ दक्षिण सोलापूर २३४५ मंगळवेढा २५१९ पंढरपूर ६४७९ Share with facebook संबंधित योजनेची माहिती घेऊन कामाचा प्रस्ताव देणार मनेरेगा अंतर्गत होणाऱ्याचा काम लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील मनेरेगा कार्यालयात भेट देऊन संबंधित योजनेची माहिती घेऊन त्या कामाचा प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत पंचायत समितीकडे द्या. अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी, रोहयो सोलापूर प्रशासनाने योजनेची योग्य अंमलबजावणी करावी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , माढा व माळशिरस तालुक्यात सर्वाधिक काम होत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले गुरांचा गोठा, शेळीचा गोठा, कुक्कुटपालन निवारा यांची कामे होताना दिसत नाहीत. शेतकरी ग्रामपंचायतमध्ये प्रस्ताव सादर करतात पण पंचायत समितीमध्ये धूळखात पडतात. त्यामुळे प्रशासनाने या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षात करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 9:00 am

सुंदर नेतृत्वामुळे जीवन सुखकर होते:व्याख्याते प्रा. वसंत‎हंकारे यांचे प्रतिपादन‎

जीवन खूप सुंदर आहे ते जगता आले पाहिजे, या सुंदर जीवनामध्ये जर सुंदर नेतृत्व मिळाले तर जीवन अधिक सुखकर होते. असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले. ते शेळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव गायकवाड हे होते. शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै नानासाहेब गायकवाड यांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमित्त प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आई-वडिलांच्या शिकवणीसह त्यांना आज कशी साथ देणे गरजेचे आहे. याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर वेगाने बदलणाऱ्या सत्ता संघर्षामध्ये सुंदर नेतृत्व असेल तर सुंदर कार्यभार देखील करता येतो, असे देखील सांगितले. यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबा गायकवाड यांचा शेळगाव शिक्षक प्रसारक मंडळातील संचालकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आ. राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली उपसभापतीपद बाबा गायकवाड यांना मिळाल्यामुळे शैक्षणिक, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शेळगाव गावाचा नावलौकिक वाढला आहे असे देखील हंकारे म्हणाले. या कार्यक्रमास भारत देशमुख, बळीराम बादगुडे, वासुदेव गायकवाड ,सचिन बादगुडे, बजरंग गायकवाड, मुख्याध्यापक सुनील गोरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजित गायकवाड यांनी केले तर आभार प्रवीण गाढवे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:59 am

महायुतीचे जागावाटप रखडल्याने मविआने थांबवली उमेदवारांची यादी:महायुतीची आज पुन्हा बैठक, महाविकास आघाडीची पहिली यादी तयार‎

महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढणार असल्याचे तिन्ही पक्ष सांगत असले, तरी जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा पाहता, अखेरच्या क्षणी वेगळाच निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. महायुतीत जागावाटपावर तोडगा न निघाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनेही अंतिम केलेल्या उमेदवारांची यादी थांबवली आहे. भाजपने ३२, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३०, तर शिवसेनेने २२ जागांवर दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. मात्र, अद्यापही जागावाटपाबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. गुरुवारी महायुतीच्या जागावाटपाची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या बैठकीत जागावाटपाची कोंडी फुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचा निर्णय रखडल्याने आघाडीनेही त्यांच्या अंतिम झालेल्या उमेदवारांची यादी थांबवली असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे सेना, मनसे युतीचा फटाके फोडून जल्लोष मुंबईत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर अहिल्यानगर शहरातही मनसे व ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी झाली आहे. मनसेने १५ जागांची मागणीही केली आहे. आघाडीच्या जागावाटपात मनसेला स्वतंत्रपणे जागा दिल्या जातील, असे ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला बाजूला ठेवून युतीच्या चर्चेने खळबळ गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच बुधवारी सकाळपासून भाजप व शिवसेना युती निश्चित झाल्याच्या व राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी मात्र, आम्ही महायुती करून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, जागावाटप रखडल्याने महायुतीबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:52 am

किमान तापमान 3 अंशांनी वाढले, हुडहुडी कायम:शहराचे किमान तापमान 9 अंशावर, 30 डिसेंबरपर्यंत 10 ते 11 अंशावर राहणार किमान तापमान‎

गेल्या ३ दिवसांपासून शहराचे किमान तापमान ६ ते ७ अंशावर होते. बुधवारी मात्र किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली. ही वाढ होऊनही थंडीची तीव्रता कायम होती. ३० डिसेंबरपर्यंत किमान तापमान १० ते ११ अंशावर स्थिर राहण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे यंदा १ ते २३ डिसेंबर या कालावधीत केवळ दोन दिवस वगळता शहराचे किमान तापमान ६ ते ८ अंशावर होते. त्यामुळे डिसेंबरचे २१ दिवस हे तीव्र थंडीचे ठरले. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यातच सप्टेंबरपासून परतीचा पाऊस जिल्ह्यात सुरु होते,मात्र सप्टेंबरमधील २३ दिवस अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. त्यामुळे थंडी लांबणीवर पडले, असा अंदाज होता. मात्र १७ व १८ नोव्हेंबरला किमान तापमान ८ अंशावर गेले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता, त्यानंतर मात्र ‘सेनियार’ व ‘दिटवा’ चक्रीवादळामुळे किमान तापमान वाढले असतानाच ढगाळ वातावरणामुळे थंडीत घट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच शहराचे किमान तापमान ९ अंशावर गेले होते. त्यानंतर किमान तापमानातील घसरण कायम होती. ९ डिसेंबरला किमान तापमान ७ अंशावर गेले होते. १० डिसेंबरला यामध्ये १ अंशांनी घट होऊन ते ६ अंशावर गेले. त्यानंतर ११ व १२ डिसेंबरला ६ अंशावर किमान तापमान होते.त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊन ८ ते ९ अंशावर गेले होते. २० डिसेंबर ला चौथ्यांदा शहराचे किमान तापमान ६ अंश होते, रविवारी, सोमवारी तापमान घटलेलेच होते. मंगळवारी देखील तापमान ७ अंशावर होते. बुधवारी मात्र शहराचे किमान तापमान ९ अंशर नोंदवले. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत बुधवारी किमान तापमानात ३ अंशांनी वाढ होऊनही थंडीची तीव्रता कायम होती. रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी गेल्या वर्षी १५ ते २३ डिसेंबर या ८ दिवसांत किमान तापमान ५ ते १५ अंशावर होते. यंदा १५ ते २३ डिसेंबर या कालावधीत ८ ते ९ अंशावर किमान तापमान होते. गेल्या वर्षी १८ व २२ डिसेंबरला किमान तापमान १५ अंश तर १५ डिसेंबरला ६.४ , १६ डिसेंबरला सर्वात कमी ५.५ अंश सेल्सिअस होते. यंदा डिसेंबरमधील बहुतेक दिवस कमी तापमानाचे होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:51 am

राहात्याचे सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च श्रद्धा, सेवा अन् एकतेचे केंद्र:110 वर्षे जुने सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च रोषणाईने उजळले, चर्चतर्फे राबवले जातात वर्षभर शैक्षणिक

प्रेम,क्षमा,शांती आणि बंधुतेचा संदेश देणारा नाताळ सण साजरा करण्यासाठी राहाता येथील ऐतिहासिक सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च सजले आहे. ११० वर्षांची परंपरा लाभलेल्या या चर्चमध्ये नाताळाच्या पूर्वसंध्येला विशेष प्रार्थना सभा, स्तुती-आराधना व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सन १९१७ मध्ये स्थापन झालेले हे चर्च आजही आपल्या दगडी बांधकामातून इतिहासाची साक्ष देत उभे आहे.कौलारू छत,प्रशस्त सभागृह आणि शांत वातावरण असलेली ही वास्तू केवळ प्रार्थनेचे ठिकाण नसून राहाता तालुक्यासह परिसरातील ख्रिस्ती बांधवांसाठी श्रद्धा,सेवा आणि एकतेचे केंद्र बनली आहे. चर्चच्या स्थापनेपासूनच गोरगरीब,वंचित व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देण्यात आले.याच विचारातून सेंट जॉन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच पीजेएसएस स्कूल या शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या.त्यांच्या स्थापनेला १०७ वर्ष पूर्ण झाली आहेत.या संस्थांच्या माध्यमातून शिक्षणासोबत संस्कार,शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली जाते. चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर पॉली डिसिल्वा म्हणाले, राहाता व परिसरातील सुमारे ४५० ख्रिस्ती कुटुंबे या चर्चशी जोडलेली आहेत. चर्चच्या वतीने वर्षभर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, युवक-युवतींसाठी मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी व सामाजिक जनजागृती उपक्रम सातत्याने राबवले जातात. या कार्यात सहायक धर्मगुरू फादर प्रमोद बोधक, फादर जॉन गुलदेवकर तसेच चर्चचे सहकारी व स्वयंसेवक मोलाची भूमिका बजावत आहेत. यंदा चर्च व परिसरात भव्य आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात न्हालेल्या चर्चचे दृश्य मन मोहून टाकणारे आहे.प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सजीव देखावा साकारलेला गव्हाण हे नाताळचे मुख्य आकर्षण ठरत असून लहान मुलांपासून ज्येष्ठ भाविकांपर्यंत सर्वजण भक्तीभावाने दर्शन घेत आहेत. नाताळ सणानिमित्त प्रेम,शांती आणि मानवतेचा संदेश संपूर्ण परिसरात पसरत असून सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च त्या संदेशाचे केंद्रबिंदू ठरत आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च हे केवळ धार्मिक केंद्र नसून समाजसेवेचे आणि शिक्षणाचेही प्रेरणास्थान आहे, असे फादर पॉली डिसिल्वा यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:50 am

ग्रामपंचायत योजनांचे ऑडिट करूनच कर आकारणी करा:ज्येष्ठ नेते भगीरथ होन यांची सरकारकडे मागणी‎

राज्यातील बहुतांशी ग्रामपंचायती ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना प्रत्यक्षात पुरवत नाहीत, त्या सुविधांच्या नावाखाली कर वसुली करणे हे अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेते भगीरथ होन यांनी केला आहे. ग्रामपंचायतींकडून कर वसुली करण्यापूर्वी संबंधित योजनांचे स्वतंत्र आणि सखोल ऑडिट करण्यात यावे, तसेच कर भरण्यासाठी दिलेल्या ३० डिसेंबरच्या अंतिम मुदतीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. भगीरथ होन म्हणाले, राज्यात राष्ट्रीय जलमिशन अंतर्गत गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या योजना कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. अनेक ठिकाणी पाइपलाइन जमिनीत पुरण्यात आल्या, मात्र आजही अनेक गावांमध्ये नळाला पाणीच येत नाही. पाणी नसताना ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आकारली जात असल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे. याचप्रमाणे, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील दिवाबत्ती, स्वच्छता व्यवस्था या सुविधांच्या नावाखालीही कर आकारणी केली जाते. प्रत्यक्षात अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, रस्त्यांवर दिवे नाहीत, कचरा उचलण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. अशा परिस्थितीत वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांकडून हे कर वसूल करणे पूर्णतः चुकीचे व कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे होन यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायतीकडून कर आकारणी करताना त्या सुविधा प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का, नागरिकांना त्याचा लाभ मिळतो का, याची पडताळणी करणे गरजेचे आहे. केवळ कागदावर योजना दाखवून नागरिकांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. भगीरथ होन

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:48 am

बिबट्यांचा सांभाळ करणे वनविभागाला डोईजड:स्थलांतर परवानगीची प्रतीक्षा, जिल्ह्यात 40 बिबटे वनविभागाच्या नर्सरीमध्ये घेताहेत पाहुणचार''‎

अहिल्यानगरमध्ये स्वतंत्र 'रेस्क्यू सेंटर' (बचाव केंद्र) नसल्याने आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असल्याने वनविभागाची कोंडी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १८ हून अधिक बिबटे जेरबंद झाले आहेत. सद्यस्थितीत जखमी आणि इतर असे एकूण ४० बिबटे वनविभागाच्या नर्सरीमध्ये 'पाहुणचार' घेत आहेत. या बिबट्यांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि त्यांना ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याने त्यांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. परिणामी, हे बिबटे पिंजऱ्यातच असल्याने नवीन मोहिमांसाठी पिंजरेही अपुरे पडत आहेत. बिबट्यांची वाढती संख्या जिल्ह्यासह राज्यभरात चिंतेचा विषय बनली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुलांसह प्रौढांचे मृत्यू होत असल्याने आता जनसामान्यांतून बिबट्यांना ठार करण्याचा आग्रह धरला जात आहे. वर्षभरात या हल्ल्यांतील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला असून, हे प्रमाण पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या किमान ४० बिबटे अकोले, राहुरी, संगमनेर यांसह विविध क्षेत्रीय स्तरांवरील नर्सरीमध्ये पिंजऱ्यात बंद आहेत. या बिबट्यांना पुन्हा निसर्गात न सोडता थेट 'वनतारा' किंवा इतर रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्याची परवानगी मागितली आहे. दीड महिना उलटूनही अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. खाद्याचा वाढता खर्च आणि सुरक्षेचा प्रश्न वनविभागासमोर उभा आहे. दरम्यान, जुन्नर येथील बिबटे 'वनतारा'मध्ये पाठवण्यास हिरवा कंदील मिळाल्याने अहिल्यानगर वनविभागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जुन्नर येथील जागा रिकामी झाल्यास अहिल्यानगरमधील बिबटे तिथे पाठवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ...तर १०० बिबटे सांभाळावे लागतील जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून दर दोन दिवसाला एक ते दोन बिबटे जेरबंद होत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे पकडलेले बिबटे पिंजऱ्यातच ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. विभागात ६०० पिंजरे उपलब्ध असले तरी ९७० गावांमध्ये बिबट्यांचा वावर आहे. रेस्क्यू सेंटर नसल्याने बिबट्यांना पिंजऱ्यातच ठेवले जात आहे. पुढील दोन महिने स्थलांतराची परवानगी मिळाली नाही, तर सुमारे १०० बिबटे सांभाळण्याची वेळ वनविभागावर येऊ शकते. पुणे येथे पाठवता येतील बिबटे ^ आपल्याकडे जेरबंद असलेल्या बिबट्यांना वनतारा किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याची परवानगी आपण यापूर्वीच मागितली आहे. मात्र, ती अद्याप न मिळाल्याने काही बिबटे आमच्या देखरेखीखाली आहेत. पुण्यातील बिबट्यांच्या स्थलांतराला परवानगी मिळाली आहे. तिथे जागा उपलब्ध झाल्यास आपल्या जिल्ह्यातील बिबटे तिकडे स्थलांतरित करणे शक्य होईल. -धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक. वनविभाग.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:47 am

सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे ठरले:काँग्रेस 40+, उद्धव सेना 30 ते 32, राष्ट्रवादी 18 ते 20, माकपला 8 जागा; आज करणार घोषणा

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुती करायची की नाही यावर भाजप व शिंदेसेनेत खल सुरू असताना महाविकास आघाडी मात्र जागावाटपाच्या चर्चेत अंतिम निर्णयापर्यंत आली आहे. यापूर्वी चर्चेच्या तीन फेऱ्यांमध्ये आघाडीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत एकूण ९२ ते ९५ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ८ ते १० जागांवर गुरुवारी निर्णय होईल. यानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या २६ प्रभागात १०२ नगरसेवक संख्या आहे. यात सर्वाधिक ४० ते ४५ जागा काँग्रेस पक्षाला मिळू शकतील. उद्धव सेनेने ३० ते ३२ जागांवर सहमती दर्शवली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला १८ ते २० जागा येतील. माकपला ८ जागा देण्यावर एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे हे पाहून जागावाटप अंतिम झाले आहे. त्यानुसारच उमेदवार ठरतील, असेही सांगण्यात आले. काँग्रेसच्या कोट्यातून वंचितला, सेनेकडून मनसेला देणार जागा वंचित बहुजन आघाडीलाही मविआत सहभागी करुन घेण्यावर एकमत झाले. परंतु काँग्रेसच्या कोट्यातून त्यांना दोन ते तीन जागा दिल्या जाणार आहेत. मात्र वंचित आघाडीला जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे ते आघाडीत येतील का याविषयी शंकाच आहे. उद्धव सेनेच्या वाट्याला आलेल्या जागांमधून मनसेला चार ते पाच जागा दिल्या जातील. माकप उमेदवारांना मिळणार प्रभाग ९ व १३ मधील जागा प्रभाग नऊमधील तीन व प्रभाग १३ मधील चारही जागा माकपच्या उमेदवारांना देण्यात येणार आहेत. माजी आमदार आडम मास्तर यांचा या भागात प्रभाव असल्याने त्यासाठी ते आग्रही आहेत. मात्र प्रभाग नऊमधील एका जागा उद्धव सेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड यांचे पती सुरेश गायकवाड यांच्यासाठी सोडण्यावर चर्चा झाली. चर्चेनंतर काँग्रेसचे नेते मुंबईकडे रवाना

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:47 am

रांजणखळगे परिसरात मुलांसाठी बोटींग प्रकल्प उभारणार:मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून गाव विकासासाठी प्रयत्नशील : वसंत कवाद‎

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट माध्यमातून पदाधिकारी व विश्वस्त मंडळ गाव विकासासाठी प्रयत्नशील आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने ट्रस्ट पदाधिकारी व विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहे. यात मुलांसाठी बोटींग प्रकल्प उभा करणे, भाविकांसाठी स्नान घाट बांधकाम करणे, वाहन पार्किंग व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे, परिसर सुशोभित करणे, स्वच्छतागृह दुरुस्त करणे, वॉटर पार्क प्रकल्प, मुलांसाठी मोनोरेल प्रकल्पांची उभारणी करणे आदी कामे होतील, मळगंगा तिर्थक्षेत्र माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे करीत गावचा विकास झाला पाहिजे ही संकल्पना आहे, असे प्रतिपादन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी केले. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी पदाधिकारी व विश्वस्त यांच्या हस्ते देवी प्रतीमा तसेच संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे सचिव शांताराम कळसकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी ट्रस्ट उपाध्यक्ष अमृता रसाळ, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव विश्वासराव शेटे, कोषाध्यक्ष रामदास वरखडे, संघटक मंगेश वराळ आदी उपस्थित होते. माजी कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, देवराम बुवा लामखडे,दिलीप ढवण, ॲड बाळासाहेब लामखडे,अर्जुन लामखडे, शिवाजीराव वराळ , सोमनाथ वरखडे, आदीनी सुचना केल्या या सुचना मंजूर करण्यात आल्या. वसंत कवाद म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुंड पर्यटन स्थळास संरक्षण भिंत बांधणे, व्यवसायीक गाळे बांधकाम करणे, स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे, भोजनालय ईमारत बांधणे, कॅन्टीन सुविधा अद्ययावत करणे, कुकडी नदीपात्रात खडकावर काचेचा पूल तयार करणे आदी कामे करणार आहे. आभार रामदास वरखडे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:46 am

पदभार स्वीकारला:नागरिकांना पालिकेत चकरा मारण्याची वेळ न येऊ देता समस्या जागेवरच सोडवा, आमदार मोनिका राजळे यांचे नगराध्यक्षांह, नगरसेवकांना आवाहन

पाथर्डी नगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याचा एक आराखडा तयार करावा. आपला प्रभाग आदर्शवत कसा होईल, याकडे लक्ष देऊन नागरिकांना पालिकेत चकरा मारण्याची वेळ येणार नाही याकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या जागेवरच सोडवा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी नूतन नगराध्यक्ष, नगरसेवकांना केले. पाथर्डीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या पदग्रहण सोहळा नूतन नगर परिषदेच्या कार्यालयात झाला. यावेळी कार्यालयात फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी शंकर महाराज भक्ती मठाचे माधवबाबा,नगराध्यक्ष आव्हाड,प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, हिंदकुमार औटी, डॉ. मृत्युंजय गर्जे,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, शकुंतला छाजेड,रंजना गर्जे,जनाबाई घोडके उपस्थित होते. नगरपरिषदेचे नुकतेच पुन्हा हजर झालेले मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे स्वागत केले आणि अधिकृत प्रक्रिया पार पाडली. आ. राजळे म्हणाल्या,हा विजय एकजुटीचा आहे.त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांनी नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित सुविधा तातडीने सोडवण्यावर भर द्यावा. व्यापारी,उपनगरातील रहिवासी,जुने शहर, दाट वस्तीतील नागरिक अशा सर्व घटकांसाठी पुढील पाच वर्षांचा स्पष्ट आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. मागील चार वर्षांत प्रशासन आणि नागरिकांमधील तुटलेली नाळ पुन्हा एकदा घट्ट करण्याची जबाबदारी नगरसेवकांवर आहे. सातत्याने लोकसंपर्क ठेवा.पालिका निवडणुकीतून आपल्या विजयाची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशीच एकजूट ठेवून काम करावे. पक्षाचा निरोप येवो किंवा न येवो,सर्वांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करावे,असे आवाहन शेवटी आमदार मोनिका राजळे यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक नंदकुमार शेळके,मंगल कोकाटे,बजरंग घोडके,बंडूशेठ बोरुडे,डॉ.जगदीश मुने,डॉ.शारदा गर्जे,वर्षा मोरे,मंगल सोनटक्के,सुभाष बोरुडे,अमोल गर्जे,किरण प्रतीक खेडकर,संजय देशमुख,ज्योती पवार,मनीषा उदमले,प्रतीक नांगरे व शितल लोहिया,मुकुंद लोहिया उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ मृत्युंजय गर्जे,सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी, तर आभार अमोल गर्जे यांनी मानले. खडलेली विकासकामे मार्गी लावण्यावर भर शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. पाणीपुरवठा,स्वच्छता, रस्ते,ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यात येईल. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवू. शहराच्या प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमान निर्णयप्रक्रिया राबवण्यावर भर दिला जाईल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार सर्व कामे काटेकोरपणे राबवण्यात येतील, असे नगराध्यक्ष आव्हाड यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर शहरवासीयांचे आभार मानताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:44 am

विद्यार्थ्यांनी व्यवहारज्ञान, कौशल्ये-सुरक्षिततेबाबतची सजगता अंगीकारावी:कानमंडाळे येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आखेगावकर यांचे प्रतिपादन‎

ज्ञानार्जनाबरोबरच व्यवहारज्ञान, आधुनिक कौशल्ये आणि सुरक्षिततेबाबतची सजगता विद्यार्थ्यांनी अंगी बाणवली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक आखेगावकर यांनी केले. ते जिल्हा परिषद शाळा कानमंडाळे येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी चिमुकल्यांचे कौतुक करताना आजच्या बदलत्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी व्यवहार कौशल्य, आधुनिकता, शिस्त आणि जबाबदारी यांचा समतोल साधावा. व्यवहारिकता हीच जीवनाची दिशा ठरवत असून त्यातूनच सजगता व सुरक्षितता निर्माण होते. लहान वयातच सुरक्षिततेची सवय लागली तर विद्यार्थी उद्याचे सुजाण व सक्षम नागरिक घडतात, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तागड, महंत ईश्वरदास महाराज, धोडंबे केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनंदा जाधव, सरपंच सविता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज किरकाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मुख्याध्यापक कैलास लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ल्या व भाजीपाला विक्रीची दुकाने सजवली होती. पाव वडा, इडली, डोसा, दहिपुरी, पाणीपुरी, भेळ, ओली व सुकी भेळ यांसारख्या पदार्थांची खरेदी-विक्री करताना विद्यार्थ्यांनी व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून त्यांच्यात आत्मविश्वास, आर्थिक शिस्त आणि सहकार्याची भावना विकसित झाल्याचे दिसून आले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:13 am

मुदत संपण्याच्या भीतीने ऑनलाइन नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा:31 डिसेंबर नाेंदणीची शेवटची मुदत; नियोजनाअभावी शेतकऱ्यांमध्ये संताप‎

आदिवासी विकास महामंडळातर्फे शेतकरी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असली तरी हरसूल येथील ऑनलाइन नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या आठवड्यापासून सकाळपासून सायंकाळपर्यंत नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा कायम असल्याचे चित्र आहे. शासनामार्फत शेतमालाला हमीभाव तसेच त्यावर बोनस दिला जात असल्यामुळे शेतमाल बाजारात आणण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, वेळेवर नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे हंगामी नियोजन बिघडत असून याचा थेट फटका त्यांना सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अद्याप फोन किंवा संदेश प्राप्त न झाल्याने ते स्वतः नोंदणी केंद्रावर येत आहेत. परिणामी केंद्रावर प्रचंड गर्दी होत असून व्यवस्थेवर ताण वाढला आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या अपुऱ्या नियोजनामुळे काही शेतकऱ्यांचे सलग दोन ते तीन दिवस वाया जात असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून नोंदणी प्रक्रियेत तातडीने सुधारणा करावी आणि अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. २२ नोव्हेंबर रोजी अर्ज करूनही ऑनलाइन नोंदणीसाठी फोन आला नाही. नोंदणीची मुदत संपत असल्याने आम्ही स्वतःहून अर्ज घेऊन रांगेत उभे होतो. तिसऱ्या दिवशी ऑनलाइन अर्ज नोंदणी झाली. शेतकऱ्यांना नोंदणी करताना मोठी अडचण सहन करावी लागत असल्याने प्रशासनाने कारभार सुधारण्याची अपेक्षा आहे. - नामदेव भोये, शेतकरी रेंज व आधार अपडेट नसल्याने अडचणी हरसूल आणि ओझरखेड या दोन्ही केंद्रांची नोंदणी प्रक्रिया एकाच ठिकाणाहून चालत असून या केंद्रांअंतर्गत तब्बल ५८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे एका केंद्रावरच मोठा ताण येत आहे. अनेक शेतकऱ्यांना मोबाइल रेंज नसणे किंवा अन्य कारणांमुळे नोंदणीसंदर्भातील फोन किंवा संदेश वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे बुकिंग नसतानाही शेतकरी थेट केंद्रावर येत असल्याने गर्दी वाढत आहे. यापूर्वी केवळ ॲपवर अंगठा घेऊन नोंदणी केली जात होती. मात्र नव्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे स्कॅनिंग बंधनकारक करण्यात आल्याने प्रक्रियेला अधिक वेळ लागत आहे. याशिवाय सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर दुपारी नंबर आल्यावर आधार कार्ड अपडेट नसल्याने अनेक नोंदणी होत नाही. रांगेत उभे असतानाही ऐनवेळी ओळखीच्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. दोन केंद्राचा भार एकाच केंद्रावर हरसूल व ओझरखेड या दोन केंद्राची नोंदणी हरसूल केंद्रात करतो. या दोन्ही केंद्रात ५८ गावांतील शेतकरी येतात. त्यासाठी १४० शेतकऱ्यांना फोनद्वारे नोंदणीसाठी बोलावले जाते. पहिले प्राधान्य त्या शेतकऱ्यांना दिले जाते. त्यानंतर नोंदणी अर्ज पूर्ण भरलेला असला तर त्यांची नोंदणी केली जाते. परंतु त्या शेतकऱ्यांसोबत गावातील इतरही शेतकरी नोंदणीसाठी रांगेत उभे राहतात त्यामुळे गर्दी होते. - विजय भागवत, गोडाऊन कीपर, हरसूल रांगेत उभे राहूनही वेळेत काम होत नाही एक महिन्यांपूर्वी शेतकरी नोंदणी अर्ज केला होता. आज ऑनलाइन नोंदणीसाठी भाकरी घेऊन सकाळी रांगेत आलो होतो. दुपारी तीन वाजता नंबर आल्यावर यादीत नाव आल्याचे कळाले. त्यामुळे सलग दोन दिवस वाया गेले. - शंकर माळगावे, शेतकरी

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:12 am

लासलगाव महाविद्यालयाचे विद्यार्थी‎ खेडलेझुंगेत 7 दिवस करणार श्रमदान‎:रस्ता दुरुस्ती, ग्रामस्वच्छता मतदान जनजागृती व आरोग्य शिबिराचे आयोजन

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर अंतर्गत दि. २३ ते दि. २९ या दरम्यान श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खेडलेझुंगे येथे या शिबिराचे उद्घाटन पार पडले असून या शिबिरात विद्यार्थी ७ दिवस श्रमदान करणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ महाराज खेडलेकर, प्रमुख पाहुणे म्हणून नू.वि.प्र. मंडळाचे खजिनदार अनिल डागा, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल गायकर यांनी केले. डॉ. संजय शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये शिबिराचा उद्देश, सात दिवसाचे नियोजन, होणारे उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली. तर प्रा. देवेंद्र भांडे यांनी आभार मानले. उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, सरपंच माया सदाफळ, उपसरपंच विश्वनाथ घोटेकर आदींसह गावकरी उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थी स्मशानभूमी रस्ता दुरुस्ती, ग्रामस्वच्छता, मतदान जनजागृती आदी उपक्रम राबविणार आहे. आरोग्य शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे. आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 8:10 am

तीन कन्यारत्नांच्या स्वागतासाठी गावभर जिलेबी वाटप:तिन्ही पित्यांचा सत्कार, मुलींच्या जन्माचे स्वागत होण्याच्या उद्देशाने चितळीपुतळी गावात राबवण्यात आला उपक्रम‎

मुलींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे दोन दिवसांत चितळीपुतळी गावातील तीन कुटुंबांत मुली जन्मल्या. या मुलींचे उत्स्फूर्तपणे स्वागत व्हावे या उद्देशाने तिन्ही पित्यांनी गावभर जिलेबी वाटप केली. मुलींच्या जन्मदात्या वडिलांनी एकत्र येऊन या मुलींच्या जन्माचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या उपक्रमाबद्दल सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी या तिन्ही पित्यांचा गावात विशेष सत्कार केला. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भातच कळी खुडण्याचे प्रकार घडत आहेत. असे असताना वंशाची पणती असलेल्या स्त्री जन्माचे स्वागत चक्क गावभर जिलेबी वाटून करण्यात आले. चितळीपुतळी येथील तीन युवकांनी एकत्र येऊन त्यांना दोन-दोन दिवसांच्या अंतराने झालेल्या मुलींचे स्वागत केले. सुदर्शन अशोक अकाशे, कपिल बाळकिसन पटणे, रवींद्र बाबुराव चोकनफळे अशी त्या मुलींच्या वडिलांची नावे आहेत. मुलीच्या स्त्री जन्माचे स्वागत हे स्त्री जन्माचे प्रतीक असलेल्या आनंद उत्सव साजरा करून गावात जिलेबी वाटप करण्यात आले. लेकींच्या गोडव्याचे गावभर कौतुक केले जात आहे. या वेळी गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी या तिन्ही युवकांचे या आगळ्या वेगळ्या स्त्री जन्माच्या स्वागताबद्दल शाल पुष्पहार घालून सत्कार केला. वंशाचा दीपक म्हणून मुलगाच हवा असतो, जेणेकरून तो आपल्या म्हातारपणाची काठी होईल. आपला सांभाळ करेल अशी अपेक्षा त्यामागे असते. मात्र, अनेकांना मुलगी नको असते. कारण मुलगी झाली तर तिच्या लग्नाचा प्रचंड खर्च, हुंडा, पालनपोषणाचा खर्च, तिच्या शिक्षणात बिनकामाची गुंतवणूक अशी मानसिकता असायची. पण आता काळ बदलला आहे. मुलगी शिकू लागली, मुलांच्या खांद्याला खांदा देऊन आज ती प्रत्येक क्षेत्रात चमकू लागली आणि आज मुलगी जन्मली की ‘पहिली बेटी, तूप रोटी’ किंवा ‘पहिली बेटी, धन की बेटी’ असे सामाजिक बदल होताना दिसत आहे. या सामाजिक बदलाचा प्रत्यय माझ्या गावातील या तीन युवकांनी सुदर्शन अशोक अकाशे, कपिल बाळकिसन पटणे, रवींद्र बाबुराव चोकनफळे यांनी घातला आहे, असे सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी सांगितले. मुलींबाबत सामाजिक परिवर्तनाची गरज मुलींच्या जन्माबाबत सामाजिक परिवर्तनाची गरज आहे. मुलींसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. मुलींना मोफत शिक्षण, कन्यादान यासह विविध योजना राबवल्या जात आहेत. यामुळे मुलींच्या जन्माचे असेच प्रत्येक गावात स्वागत व्हायला हवे, असे प्रतिपादन सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:56 am

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा- आमदार दानवे

शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आता आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त शेती करावी. पारंपारिक पिके सोडून जे विकतं, ते पिकवलं पाहिजे. असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले. भोकरदन तालुक्यातील अनवा येथे बालाजी अभिनव सहकारी संस्थेतर्फे नाफेड अंतर्गत सोयाबीन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. हेमंत सपकाळ जी.एस. सपकाळ आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी गट शेती करावी. गट स्थापन करून फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेष करून तरुणांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीची कास धरावी. आपण या भागामध्ये विजेची, रस्त्याची आणि पाण्याची सोय केली आहे. आता शेतकऱ्यांनी आधुनिक तिकडे वळून पारंपरिक पद्धतीने शेती सोडून द्यावी व तंत्रज्ञानयुक्त आधुनिक शेतीची कास धरावी. शासनाच्या विविध योजनेचा फायदा घ्यावा. मिरची पिक आपल्या भागामध्ये भरपूर उत्पादन घेतले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी, जेणेकरून आपल्याला जेव्हा भाव मिळेल तेव्हा आपले उत्पादन विकता येईल. असे आमदार दानवे म्हणाले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावरच शेतीमाल देऊन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:51 am

सिल्लोड तालुक्यात 18 जिनिंग केंद्रांना‎मिळाली कापूस खरेदीसाठी परवानगी‎:सिल्लोडच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पणन मंत्र्यांची भेट

सिल्लोड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी सीसीआयमार्फत खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी शासनाने तालुक्यातील १८ खाजगी जिनिंग केंद्रांना नव्याने परवानगी दिली. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा केल्याचा दावा प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील बनकर यांनी केला. काही दिवसांपासून शेतकऱ्यांची लूट सुरू होती. या तक्रारी भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, इद्रिसजी मुलतानी, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर त्यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. रावल यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयानुसार ऋषी फायबर, जय भगवान बाबा कॉटन, हरी ओम जिनिंग अँड प्रेसिंग, गौरीशंकर कोटेक्स, जोशी कोटेक्स, श्री रोकडोबा महाराज जिनिंग अँड प्रेसिंग, पुनीत एंटरप्रायझेस, किंजल कॉटन प्रायव्हेट लिमिटेड, सचिन फाइंड कॉटन फायबर, त्रिवेणी कॉटन इंडस्ट्रीज, सिल्लोड तालुका कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग, राजा राजेश्वर कॉटन इंडस्ट्रीज, राधा सर्वेश्वर फायबर्स, ओम यार एजन्सी, अग्रवाल कोटेक्स, नवीन कोटेक्स, तयाल कॉटन प्रायव्हेट लिमिटेड, माणिक कॉटन प्रायव्हेट लिमिटेड या १८ केंद्रांना परवानगी मिळाली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी पर्याय उपलब्ध होणार आहेत. योग्य हमीभाव मिळणार आहे. भाजपच्या मागणीला यश मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:50 am

खुलताबाद तालुक्यात शेततळी ठरत आहेत वरदान‎:जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे; डाळिंब, पेरू, कांदा, टोमॅटो, मिरची लागवड वाढली‎

तालुक्यात राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, ही योजना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अक्षरशः वरदान ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अमलात आणलेल्या या योजनेमुळे पावसाचे पाणी अडवून साठवण्याची आणि त्याचा योग्य वापर शेतीसाठी करण्याची मोठी संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. शासनाकडून शेततळे खोदण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जात असून, काही भागात ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेशी संलग्न करूनही प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. शेततळ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून साठवले जात असल्याने पाण्याची मोठी बचत होत आहे. साठवलेल्या पाण्यामुळे पिकांना आवश्यकतेनुसार सिंचन मिळत असून पिके सुकण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. भाजीपाला व फळबाग लागवडीसाठी शेततळी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. डाळिंब, पेरू, कांदा, टोमॅटो, मिरची यांसारख्या पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक शेतकरी आता वर्षभर शेती करू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल दिसून येत आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून दुबार व तिबार पीक घेणे शक्य झाले आहे. भाजीपाला व फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल: शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून कर्जावरचे अवलंबित्व कमी झाले आहे. उत्पन्न वाढल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे जीवनमान सुधारले जाणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे संपूर्ण परिसर हिरवागार होत आहे. शेततळ्यांमुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या यांना सहज पाणी उपलब्ध होत असल्याने पशुपालन व्यवसायालाही चालना मिळाली आहे. काही प्रगत शेतकऱ्यांनी शेततळ्यात मत्स्यव्यवसाय सुरू करून उत्पन्नाचा मार्गही खुला केला आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत खुलताबाद तालुक्यात एकूण १०५ शेततळी झाली आहेत. यासोबतच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत १५ शेततळ्यांची कामे झाली असून तालुक्यात एकूण १२० शेततळी आहेत. खुलताबाद तालुक्यातील दरेगाव, पाडळी, खांडीपिंपळगाव, बाजारसावंगी, इतर अनेक गावांमध्ये शेततळी तयार करण्यात आली आहेत. खुलताबाद तालुक्यात १२० शेततळी

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:49 am

विज्ञान प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांमध्ये होतो वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित:आमठाणा येथे विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रात्यक्षिकांचे आयोजन‎

न्यू हायस्कूल आमठाणा येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. प्रयोगशील शिक्षणाचा अनुभव मिळाला. या उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक धनंजय हजारी यांनी पुढाकार घेतला. छत्रपती संभाजीनगर येथील व्हीआयपी क्लासेसचे संचालक सोनवणे, धनंजय सोंडगे आणि महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे मार्गदर्शन केले. मानवी शरीररचना, रक्ताभिसरण, श्वसन प्रक्रिया आणि शरीरातील अवयवांची कार्यपद्धती सुलभ भाषेत समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाकडे नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोमवंशी एस. जी. होते. त्यांनी अशा उपक्रमांमुळे निरीक्षणशक्ती, प्रश्न विचारण्याची सवय आणि प्रयोगशीलता वाढते असे सांगितले. भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात विज्ञान शिक्षक हजारी, निकाळजे एस. आर., शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. हजारी यांनी आभार मानले. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रात करिअर घडवण्याची प्रेरणा मिळाली, असे पालक आणि शिक्षकांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:48 am

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकरी मेळावा उत्साहात:सिल्लोड येथे पात्र शेतकऱ्यांना बक्षीस वितरण‎

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सिल्लोड येथे बळीराजा ट्रॅक्टर्सच्या विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा झाला. या वेळी पात्र शेतकऱ्यांना बक्षीस देण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप, डी. सी. कदम, भारत कासार, नीलेश जोशी, महेश श्रीखंडे, शुभम काळे, राहुल कोटाने, विश्वनाथ राऊत, नीलेश राऊत, दिनेश राऊत, कचरू बनसोड, शिवाजी फुके, सदाशिव फुले, पांडुरंग कमळ आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार सत्तार यांनी शेतकरी हा देशाचा कणा असल्याचे सांगितले. डॉ. संदीप जगताप यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक पद्धती, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती व शाश्वत उत्पादन पद्धती यावर मार्गदर्शन केले. डी. सी. कदम यांनी शेती यांत्रिकीकरणाचे महत्त्व सांगितले. आधुनिक अवजारे व तंत्रज्ञानाची माहिती दिली. मेळाव्यात २५० पात्र शेतकऱ्यांना बळीराजा ट्रॅक्टरकडून बक्षीस देण्यात आले. ११ शेतकऱ्यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:47 am

सिल्लोड तालुक्यातील 283 पैकी 42 शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे:विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात, सरकारचे आदेश असूनही शिक्षण विभागाला गांभीर्य नाही‎

राज्य सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, असे आदेशित केले होते. तरीही सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या केवळ ४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थी सुरक्षेबाबत किती गांभीर्य आहे हे दिसून येते. शाळेतील विद्यार्थी सुरक्षा धोरणानुसार सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रशासनाने आदेश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. परंतु सिल्लोड तालुक्यात शासनाच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. दरम्यान, तालुक्यात २८२ जिल्हा परिषद तर ७५ खासगी अनुदानित शाळा अशा एकूण ३५७ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या केवळ ४२ तर खासगी ४४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. उर्वरित शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. या सीसीटीव्ही कॅमेरे न बसवलेल्या जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी शालेय मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुसार, आता सरकारनेही यावर कडक पावले उचलली आहेत. खासगी व्यवस्थापन, यामुळे राज्यातील खास जिल्हा परिषदांसह सर्व शाळांसाठी शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत शिक्षण विभागाच्या वतीने वेळोवेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या बैठकीत सूचित करण्यात आले आहे. दरवर्षी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत वरूड (पिंपरी) येथील जिल्हा परिषद शाळेत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे. रमेश ठाकूर, गटशिक्षणाधिकारी Q सिल्लोड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळांची संख्या किती? A तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण २८२ शाळा आहेत. Q. आतापर्यंत किती शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत? A. आतापर्यंत ४२ शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. Q जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांवर सीसीटीव्ही कधी बसवणार ? A. सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेबाबत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना सूचना दिल्या. जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. दरम्यान, सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची सुरक्षासाठी काटेकोरपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत पाठपुरावा करावा. ज्या शाळांकडून हलगर्जीपणा करण्यात येईल, अशा शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या कारवाई करण्यात याव्यात, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रीया रहिमाबाद येथील रहिवासाी अंकुश पाटील यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असून त्याचे फुटेज तपासणीही तितकीच आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा सुरक्षेसाठी कॅमेरे बसवावे. लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आम्ही सहकार्य करू. यासाठी शिक्षण विभागाने पहिले पाऊल टाकावे, असे पळशी येथील शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णा बडक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मुख्याध्यापकांवर जबाबदारी : शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून, ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणेही आवश्यक आहे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:47 am

खंडाळा परिसरातील 112 पशुपालकांना 5 क्विंटल 60 किलो बियाण्यांचे मोफत वाटप

प्रतिनिधी | खंडाळा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि चारा पिकांची उपलब्धता वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण बियाणे वाटप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत वैजापूर तालुक्यातील खंडाळा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या १४ गावांतील ११२ लाभार्थींना बुधवारी (२४ डिसेंबर) संकरित मका आणि ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी डॉ. नवेद शेख, डॉ. सचिन वेळंजकर, सुभाष बहाळस्कर, भाऊसाहेब जानराव, जालिंदर पवार, संतोष सोनवणे, रामहरी जाधव, मंगल मगर यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे आहे बियाण्यांचे स्वरूप : प्रत्येक लाभार्थीला ४ किलो संकरित मका (मुरघाससाठी) आणि १ किलो ज्वारी असे एकूण ५ किलो बियाणे देण्यात आले. खंडाळा केंद्रासाठी एकूण ४ क्विंटल ४८ किलो मका आणि १ क्विंटल १२ किलो ज्वारी असे एकूण ५ क्विंटल ६० किलो बियाणे उपलब्ध झाले होते. मुरघासचे महत्त्व: दुग्ध उत्पादनात होईल वाढ ^पशुसंवर्धन विभागामार्फत मिळणारे हे संकरित बियाणे मुरघास तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मुरघासामुळे पशुधनाला वर्षभर पौष्टिक चारा मिळतो. ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन पशुखाद्यावरील खर्च कमी होतो. हा चारा रुचकर आणि पचायला सोपा असल्याने जनावरे तो आवडीने खातात. विशेषतः टंचाईच्या काळात तो अत्यंत उपयुक्त ठरतो. - डॉ. कैलास मोती (पशुवैद्यकीय अधिकारी, श्रेणी-२)

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:46 am

जायकवाडी फुगवट्यामुळे नुकसान; 10 तास जलसमाधी आंदोलन:जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकरी झाले संतप्त‎

जायकवाडी जलाशयाच्या फुगवट्यामुळे अमळनेर, लखमापूर, गळनिंब येथील शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. वर्षभर पाठपुरावा करूनही आजच्या हमीभावानुसार नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच जायकवाडी विभाग व भूमी अभिलेख यांनी केलेल्या संयुक्त मोजणीचा अहवालही शेतकऱ्यांना दिला नाही. या निषेधार्थ मंगळवारी सकाळी अकरा वाजता अमळनेर वस्ती येथे शेतकऱ्यांनी थंडीच्या गारठ्यात तब्बल १० तास जलसमाधी आंदोलन केले. रात्री आठ वाजता अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांनी शेकोटी पेटवून थंडीचा सामना केला. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर फुगवट्याचे पाणी शेतात शिरते. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. आंदोलनस्थळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप निरपळ यांनी भेट दिली. त्यांनी खासदार संदिपान भुमरे यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले. कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. पीक नुकसान भरपाई व भूसंपादनासाठी प्रयत्न करू, असे लेखी आश्वासन दिले. आंदोलनात राधेश्याम कोल्हे, समद पठाण, इसाभाई पठाण, बालचंद पंडित, संतोष टेकाळे, मुनीर पठाण, शिवाजी दरगुडे, कडूबाबा पठाण, विक्रम पंडित, जनार्दन मिसाळ, किरण साळवे, साहेरा पठाण, शाईन पठाण, मीना कोल्हे, सविता मिसाळ, मंदाबाई दरगुडे, अलकाबाई नरवडे सहभागी झाले. दीपककुमार डोंगरे, मंगेश शेलार, तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड उपस्थित होते. जलसंपदा विभागाने दिले लेखी पत्र जलसंपदा विभागाने दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, महसूल, कृषी, जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त समितीमार्फत पंचनामे करून पीक नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनास सादर केला जाईल. ही कारवाई बुधवारपासून सुरू होईल. यापूर्वी तयार केलेले प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर येथे नियामक मंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले जातील.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:44 am

हायवांचा खुलेआम उच्छाद; कारवाई फक्त कागदावर:नांदूरढोकमध्ये भरधाव टिप्परने घेतला 1 बळी‎

नांदूरढोक शिवारात मंगळवारी सायंकाळी भरधाव हायवा टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जालिंदर एकनाथ गायधने यांचा जागीच मृत्यू झाला. योगेश भाऊसाहेब बाजारे गंभीर जखमी झाले. दोघेही शेतातून घरी परतत होते. अपघातानंतर चालक हायवा सोडून फरार झाला. जालिंदर हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मातीने भरलेला हायवा पेटवून दिला. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध केला. हा अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली घटना असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नांदूरढोक-गंगथडी परिसरात मुरूम, वाळू आणि मातीची अवैध वाहतूक खुलेआम सुरू आहे. ओव्हरलोड हायवा गावातून भरधाव जातात. महसूल आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. कागदोपत्री कारवाई दाखवली जाते. प्रत्यक्षात काहीच होत नाही. नांदूरढोकसह परिसरातील रस्ते अवैध वाहतुकीचे मार्ग बनले आहेत. ओव्हरलोड आणि भरधाव हायवांमुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. अपघातानंतरच प्रशासन हलते. ग्रामस्थांनी ठाम मागणी केली आहे की गावातून हायवांची ये-जा तात्काळ बंद करावी. पर्यायी मार्ग निश्चित करावेत. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:43 am

शिंदेसेना, भाजपकडून फोडाफोडी, उद्धवसेनेत ‘टेन्शन’:दोन्ही राष्ट्रवादींचे लक्ष पक्षश्रेष्ठींकडे, भाजपमध्ये 14, शिवसेनेत 22 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश

मनपा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी महायुतीचे गणित बसेना. दोन्ही पक्ष बैठकीसाठी तयार असल्याचे दाखवता आहेत. मात्र, दोघांनी मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते स्वपक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत उद्धवसेना, मनसेसह दुसऱ्या पक्षातील ५० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेना किंवा भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीसाठी बैठकांचे सत्र आणि आतून स्वबळाची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांनी एकत्र येण्याची चर्चा आहे. पण, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे लागले आहे. भारतीय जनता पक्षात १४ तर शिवसेना (शिंदे गट) मध्ये २२ प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि समर्थकांनी प्रवेश केला. भाजप आणि शिंदेसेना या पक्षांकडे उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. भाजपमध्ये प्रत्येक वॉर्डातून ३०, तर शिवसेनेत एका वॉर्डासाठी सुमारे २५ जणांची नावे पुढे आली आहेत. कुणाच्याही उमेदवारीवर परिणाम नाही पक्षात आलेल्या सर्वांना सामावून घेण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. बाहेरून येणाऱ्यांमुळे कुणाच्याही उमेदवारीवर परिणाम होणार नाही. - अतुल सावे, नेते, भाजप. भाजपकडून बैठकीचे अद्याप निमंत्रण नाही २४ डिसेंबरच्या बैठकीसाठी भाजपकडून आम्हाला अद्याप कोणतेही निमंत्रण मिळाले नव्हते. भाजपच्या श्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतरच प्रत्यक्ष बोलणी होईल. -राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना. उद्धवसेना : संघटनात्मक कमकुवतपणाची जाणीव पदाधिकारी रोखण्यात अपयश आले असून उलट ज्येष्ठ नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप आणि अंतर्गत वाद उफाळला आहे. संघटनात्मक कमकुवतपणा उघड झाल्याचा परिणाम उमेदवारांच्या तयारीवर होत आहे. वंचित, एमआयएमचे गणित महायुतीतील ही फोडाफोडी ‘वंचित’आणि एमआयएमसाठी संधी ठरू शकते. राष्ट्रवादी शरद पवार गट नगर पालिकेत अपयशी ठरला आहे. अजित पवार गटाला महायुतीच्या चर्चेत स्थानच मिळत नसल्याचे चित्र आहे. भाजप : आलेले पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी उद्धवसेनेचे महानगरप्रमुख व अनेक वर्षांपासूनचे मनपात प्रतिनिधित्व करणारे राजू वैद्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फुलंब्री पालिकेसाठी उद्धवसेनेत प्रयत्न करणारे अक्षय खेडकर हे त्यांच्यासोबत भाजपत आले. कामगार नेते सलीम शहा, हर्सूलच्या माजी नगरसेविका ज्योती अभंग, एकनाथ काळे, विनायक पांडे, विठ्ठलनगरचे माजी नगरसेवक मनोज गांगवे, युवा नेते राम फुलंब्रीकर, अजबनगरच्या माजी नगरसेविका आशा भालेराव, जना कांबळे, तसेच मनसेचे गजनगौडा पाटील व आशिष सुरडकर यांचे प्रवेश चर्चेचे ठरले. मोठा भाऊ होण्यासाठी स्पर्धा स्वबळावर लढण्याच्या तयारीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून महायुतीचा निर्णय लांबत चालला आहे. इनकमिंग वाढवत शक्ती दाखवण्याची ही स्पर्धा पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. युतीचा निर्णय प्रलंबित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही एकमेकांच्या पक्षात गळ टाकणे सुरू शिंदेसेनेतील काही पदाधिकारी पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्यानेच महायुतीची बैठक पुढे ढकलल्याची चर्चा आहे. ४ वेळा चर्चा होऊनही ठोस निर्णय न झाल्याने अविश्वासाचे वातावरण वाढले आहे. २४ डिसेंबर रोजी होणारी महायुतीची बैठक प्रत्यक्षात झालीच नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवसेनेकडून भाजपच्या निरोपाची वाट पाहण्यात आली. मात्र, भाजपकडून कोणताही अधिकृत निरोप आला नाही, असे राजेंद्र जंजाळ यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे भाजपने अंतर्गत बैठका घेऊन प्रभागनिहाय उमेदवार निवड, मुलाखती आणि सर्वेक्षणावर भर दिला असल्याची चर्चा आहे. शिवसेना आलेले नेते शिवसेनेत विकास जैन, नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, कला ओझा, विमल राजपूत, मकरंद कुलकर्णी, स्वाती नागरे, किशोर नागरे, रूपचंद वाघमारे, सुमीत खांबेकर, राजू वैद्य, ज्योती पिंजरकर, सीमाताई खरात, मोहन मेघावाले, मीनाताई गायके, गजानन मनगटे, गजानन बारवाल यांनी प्रवेश केला.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:40 am

कुख्यात गुंड ‘तेजा’ची मैत्रीण राखी मुरमुरे अटकेत:नगर नाक्यावर थरार; गुंगीकारक औषधाच्या 99 गोळ्या आणि कट्ट्यास दोन साथीदार गजाआड

कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल ऊर्फ तेजा याने काही महिन्यांपूर्वी गोळी झाडून जखमी केलेली त्याची मैत्रीण राखी मुरमुरे हिला पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. एनडीपीएस (अमली पदार्थविरोधी) पथकाने मंगळवारी ( २३ डिसेंबर) रात्री नगर नाका ते तिसगाव फाटादरम्यान सापळा रचून ही कारवाई केली. राखीसह तिचे दोन साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या, गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. राखी गणेश मुरमुरे (२६, रा. नांदेड), अमोल लक्ष्मण इंगळे (३०) आणि तुषार निवृत्ती आगळे (३१, दोन्ही रा. पुंडलिकनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी झाली कारवाई : छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पांढऱ्या रंगाच्या होंडा अमेझ कारमधून (एमएच २० एफयू ०६१५) काही लोक शस्त्रे आणि अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती एटीआय विनायक शेळके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा लावला. रात्री १०:४५ च्या सुमारास संशयित कार येताच पोलिसांनी तिला घेरले. झडती घेतली असता आरोपींकडे निट्रोसॅन-१० या गुंगीकारक औषधाच्या ९९ गोळ्या, एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. राखी मुरमुरे ही मूळची नांदेडची असून तिचे वडील पोलिस दलात कार्यरत आहेत. दुर्दैवाने, खाकीच्या छायेखाली वाढलेली ही तरुणी शहरातील कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल ऊर्फ तेजा आणि टिप्या यांच्या संपर्कात आल्याने गुन्हेगारीकडे वळली. दरम्यान, ११ ऑगस्ट २०२५ रोजी कारागृहातून सुटल्यानंतर तेजाने राखीवरच गोळीबार केला होता, ज्यात ती जखमी झाली होती. तरीही ती त्याच्या प्रभावाखाली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला पहिल्यांदा अटक झाली होती. गुन्हेगारांची अशी कार्यपद्धती

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:37 am

नवे समीकरण:महापालिका, जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस-रासपची ‘हात’मिळवणी

राज्यातील आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे वेगवान झाली आहेत. नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने आता राष्ट्रीय समाज पक्षासोबत (रासप) आघाडी जाहीर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बुधवारी मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या बैठकीनंतर या युतीवर शिक्कामोर्तब केले. लोकशाही आणि संविधान जपण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर यांनी राहुल गांधी यांच्या दिल्लीतील भेटीचा संदर्भ देत, ३१ मे रोजीच आघाडी निश्चित झाल्याचे सांगितले. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत देतानाच, इतरत्र रासपसारख्या मित्रपक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची रणनीती आखली असून त्यानुसार आखणी सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:31 am

राज’कारण:मनसेच्या इंजिनने 19 वर्षांत दहादा बदलला ट्रॅक; मराठी कार्ड ते हिंदुत्वाची साद, आता अस्तित्वासाठी उबाठासोबत युतीचा आधार, पुन्हा मराठी मतांचा जोगवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाने गेल्या १९ वर्षांत तब्बल १० वेळेस आपला ट्रॅक बदलला आहे. कधी स्वबळाची गर्जना, कधी भाजप-काँग्रेसला छुप्या-उघड पाठिंब्याची खेळी, तर कधी निवडणूकच न लढण्याचा अजब निर्णय. या धरसोड वृत्तीमुळे मनसेची ताकद १३ आमदारांवरून थेट “शून्या’वर आली, तर पालिकेतील नगरसेवकांची संख्याही सातत्याने कमी होत गेली. मराठी मतांपासून सुरू झालेला मनसेचा प्रवास हिंदुत्वाच्या दारी जाऊन आता परत एकदा मराठी मतांवर येऊन थांबला आहे. अस्तित्वाच्या अखेरच्या लढाईसाठी राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंशी हातमिळवणीची वेळ आली. १८ डिसेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजेच “विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे’ असा आरोप करत शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ९ मार्च २००६ रोजी त्यांनी मनसेची स्थापना केली. यानंतर २००९ चा अपवाद वगळता मनसेच्या इंजिनला कधीच वाट नाही सापडली. अखेरीस १९ वर्षांपूर्वी ज्या शिवसेनेला आव्हान दिले त्याच शिवसेनेच्या मदतीने इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज यांनी उबाठासोबत युती केली. दरम्यान, मुंबई मनपासाठी ही युती झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मनसेला मुंबई मनपात २२७ पैकी किती जागा मिळतात याकडे राजकीय पक्षांसह विश्लेषकांचेही लक्ष असेल. २००९ मध्ये अनेक जागी तिसऱ्या ठिकाणी वर्ष जागा विजयी मतांचा % दुसऱ्या क्रमांकवरही मते मिळवली२००९ १४३ १३ ५.७१% (१२ दुसऱ्या, ५३ तिसऱ्या क्रमांक)२०१४ २१९ ०१ ३.१५%(६ दुसऱ्या, १५ तिसऱ्या क्रमांक)२०१९ १०१ ०१ २.२५%(१० दुसऱ्या, २५ तिसऱ्या क्रमांक)२०२४ १२५ ०० १.५५%(२ दुसऱ्या, २९ तिसऱ्या क्रमांक) लोकसभा निवडणुकीत नेहमीच मिळाला भोपळा २००९, २०१४ च्या लोकसभेत पक्षाचा एकही खासदार झाला नाही. २०१९ मध्ये मनसेने लोकसभा लढवलीच नाही. २०२४ मध्ये भाजपला पाठिंबा दिला. मात्र,त्याचाही फारसा परिणम नाही. नरेंद्र मोदींना पाठिंबा, पण निवडणूक लढवली. १० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त महापालिकांतील पकडही ढिली मुंबईत २०१७ मध्ये ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेले. नाशकात २०१२ मध्ये मनसेचा महापौर झाला. पुण्यात २०१२ मध्ये मनसे मुख्य विरोधी पक्ष ठरला. आमदारांची संख्या १३ वरून ० वर स्थापनेनंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार आले. नंतर मात्र पक्षाची वाताहत होत गेली. २०१४ आणि २०१९ विधानसभेत १ तर २०२४ मध्ये ० आमदार झाले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:24 am

विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील प्रश्नांकडे महापालिकेच्या कारभाऱ्यांचे झाले दुर्लक्ष:जीव मुठीत धरून नागरिकांवर रस्ता ओलांडण्याची वेळ

दाट वस्तीत स्ट्रीट लाइट बंद, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग व फेरीवाल्यांचा ताबा यामुळे रात्री वाढलेले अपघात व गुन्हे. रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे, वाहणारे ड्रेनेजचे पाणी आणि उघड्या नाल्यातील उग्र वासाचा हा त्रास प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांना कायम सहन करावा लागतो. पाणी, कचरा, ड्रेनेज, रस्त्याच्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही यांवर तोडगा काढण्यात मनपाला यश आलेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगूनही फारसा फरक पडला नसल्याचे नागरिकांनी ‘दिव्य मराठी’ बोलताना सांगितले. प्रभागातील सर्व नगरसेवक विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळे अन्य प्रभागांच्या तुलनेत निधी कमी मिळाला आहे. आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, गरमपाणी, ज्युबिली पार्क, जयभीमनगर, भडकल गेट, ग्रीन व्हॅली, टाऊन हॉल, आनंदनगर भागांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. खराब रस्ते, ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर, कचऱ्याचे डोंगर यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. क्र. ५ आरेफ कॉलनी, भडकल गेट, आसेफिया कॉलनी २०१५ : पक्ष, नगरसेवक, मतदान वॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान१९ जमीर कादरी - एमआयएम १६३३४९ गंगाधर ढगे - एमआयएम २२६०२० सय्यद मतीन - एमआयएम २९६९२१ शकिला बेगम - एमआयएम १५८२प्रभाग आरक्षण : अ - एससी महिला, ब - ओबीसी एकूण मतदार । ५० हजार १०३ जाणून घ्या आपला प्रभाग प्रभागात सर्व नगरसेवक एमआयएमचे होते. हा पक्ष विरोधात असल्याने निधी देण्यात सत्ताधारी पक्षाने आखडता हात घेतला होता. मागील ५ वर्षांच्या प्रशासक काळात खंबीर नेतृत्व नसल्याने निधी फारसा दिला नाही. ५ वर्षांत ५० कोटींपेक्षाही कमी निधी या प्रभागात खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रभागाची व्याप्ती : आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, गरमपाणी, ज्युबिली पार्क, जयभीमनगर, भडकल गेट, ग्रीन व्हॅली, टाऊन हॉल, आनंदनगर, नेहरू भवन, मध्यवर्ती बसस्थानक, पोलिस मुख्यालय वसाहत, मोगलपुरा, कोहिनूर कॉलनी, बुऱ्हाणी कॉलनी, सिद्धार्थ उद्यान, रशीदमामू कॉलनी. 1. कचरा संकलन : केवळ २० घंटागाड्यांमुळे कचरा तुंबलारस्त्यालगत कचरा साठलेला असतो. मोठी व्याप्ती असलेल्या प्रभागात २० पेक्षाही कमी घंटागाड्या आहेत. नागरिक, व्यावसायिक, हॉटेलचालक रस्त्यावरच कचरा टाकतात. 2. रस्ते : रहदारी वाढली, मात्र रस्ते रुंद करण्याकडे मनपाचे दुर्लक्षप्रभागात नव्याने २५ किलोमीटरचेही रस्ते झाले नाही. रहदारी वाढली. मात्र, रस्ते रुंद केले नाही. खड्डे, दुकानासमोर उभी राहत असलेली वाहने, अतिक्रमण यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. 3. पाणीपुरवठा : जलवाहिन्या जुन्या झाल्याने वारंवार गळती प्रभागात जुन्या शहराचा बहुतांश भाग आहे. जलवाहिनीदेखील जुनी झाली. यामुळे ती वारंवार फुटते. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:20 am

फडणवीस-शिंदेंची मोहोर; 200 जागा फायनल:आज अटलजींच्या जयंतीदिनी भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

मुंबई महानगरपालिकेसह एमएमआर क्षेत्रातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये युतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईतील २२७ जागांपैकी तब्बल २०० जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून उर्वरित २७ जागांचा पेच पुढील ४८ तासांत सुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी भाजप आपल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्याची तयारी करत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे ४ वाजेपर्यंत तब्बल पाच तास खलबते चालली. या बैठकीत मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी २०० जागांच्या सहमतीला दुजोरा दिला. नवी मुंबईत गणेश नाईकांसोबत चर्चा दुसरीकडे, नवी मुंबईतही युतीची समीकरणे जुळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. नवी मुंबईत नाईकांचा असलेला प्रभाव आणि शिंदेंची ताकद एकत्र आल्यास महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:16 am

थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता सभागृहात मतदानाचा अधिकार:सरकारचा मोठा निर्णय, निर्णायक मतासह 2 मते देता येतील

राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता केवळ खुर्चीच नाही, तर सभागृहात नगरसेवकाप्रमाणे मतदानाचा कायदेशीर अधिकारही मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे नगराध्यक्षांचे सभागृहातील स्थान अधिक भक्कम झाले आहे. आता नगराध्यक्ष एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य अशी दोन्ही पदे धारण करू शकतील. विशेष म्हणजे, एखाद्या विषयावर मतदान झाल्यास त्यांना सदस्याप्रमाणे मत देता येईल. मतांची विभागणी समान झाल्यास आपले “निर्णायक मत” (कास्टिंग व्होट) वापरून ते निकाल फिरवू शकतील. यामुळे विरोधी गटाचे बहुमत असलेल्या नगरपालिकेतही नगराध्यक्षांना आता आपले राजकीय वर्चस्व टिकवता येईल. अध्यक्ष आणि सदस्य, दोन्ही भूमिका अध्यक्षांची दुहेरी भूमिका : आता थेट जनतेतून निवडून आलेले अध्यक्ष तांत्रिकदृष्ट्या सभागृहाचे ‘सदस्य’ म्हणूनही ओळखले जातील. ते एकाच वेळी अध्यक्ष व सदस्य अशी दोन्ही पदे भूषवतील. मतदानाचा कायदेशीर अधिकार : कामकाजात आणि विविध ठरावांवर आता अध्यक्षांना सामान्य सदस्याप्रमाणेच मतदानाचा पूर्ण अधिकार असेल. निर्णायक मताची ताकद : एखाद्या विषयावर दोन्ही बाजूंनी समान मते पडली तर नगराध्यक्षांना ‘निर्णायक मता’चा अधिकार कायम असेल. कायदेशीर सुधारणा : या बदलांसाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र नग रपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ मध्ये सुधारणा करण्यासाठी लवकरच नवीन अध्यादेश काढणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:12 am

नांदेडला लाखाची लाच घेणारा पीएसआय, जमादार अटकेत:गुन्ह्यात मदतीसाठी मागितली होती ~3 लाख लाच

दोन गुन्ह्यांत मदत करण्यासाठी महिलेकडून १ लाख रुपयांची लाच घेणारा विमानतळ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक व जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद जाधव (५७) व जमादार वैजनाथ तांबोळी (४३) अशी अटक केलेल्या दोघा लाचखोरांची नावे आहेत. ही कारवाई मंगळवारी (२३ डिसेंबर) करण्यात आली. तक्रारदार महिलेच्या पतीने भाऊ,आई व इतरांविरोधात जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी दीड लाखांची व दुसऱ्या एका प्रकरणात तक्रारदार महिलेच्या आई व वडिलांवर फसवणुकीचा, विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मदत करण्यासाठी दीड लाख अशी एकूण तीन लाख रुपयांची मागणी पोलिस उपनिरीक्षक गोविंद जाधव व जमादार वैजनाथ तांबोळी यांनी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार महिलेने या संदर्भात मंगळवारी (२३ डिसेंबर) लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई झाली. तक्रारदाराच्या वडिलांच्या घरी लावला सापळा पडताळणीदरम्यान तक्रारदाराची आई, वडील व भाऊ यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये कोर्टात लवकर दोषारोपपत्र दाखलसाठी महिलेच्या वडिलांच्या घरी लाचेची रक्कम घेण्याचे ठरले होते. शासकीय पंचांसमक्ष संशयित उपनिरीक्षक जाधव याने तक्रारदारांकडून एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच कॉन्स्टेबल तांबोळीने गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या वडिलांच्या घरी सापळा लावून दोघांना पकडले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 7:09 am

पार्थ पवारांचा जमीन घोटाळा:सरकारतर्फे पुणे न्यायालयासमोर माहिती सादर, तेजवानीच्या कोठडीत वाढ, पार्थच्या ‘अमेडिया’त भागीदार म्हणून तेजवानीच्या ऑफिस बॉयची सही

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी १८०० कोटी रुपयांची जमिन ३०० कोटी रुपयात खरेदी केली. या प्रकरणी पार्थ यांना जमीन विकणाऱ्या शीतल तेजवानी नामक महिलेला अटक करण्यात आली आहे. सध्या बावधन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तेजवानीला मागील कोठडीची मुदत संपल्यानंतर पौड परिसरातील न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्याविषयी माहिती देताना सरकारी वकिलांनी पुणे न्यायालयासमोर सांगितले की, तेजवानीसोबत काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा भागीदार म्हणून महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, तेजवानीची पोलिस कोठडी २७ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. सरकारी पक्षाने न्यायालयाला माहिती दिली की, ऑफिस बॉयने मुंडवा येथील सरकारी जमीन खरेदी करणाऱ्या ‘अमेडिया’ कंपनीचा भागीदार म्हणून प्रतिज्ञापत्रे आणि प्राधिकारपत्रांसारख्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. हा ऑफिस बॉय आणि तेजवानीत काही आर्थिक व्यवहार झाले होते का, हे निश्चित करण्यासाठी पोलिसांना या कागदपत्रांची तपासणी करायची आहे. काही आरटीआय कार्यकर्त्यांनी जमीन व्यवहाराशी संबंधित नवीन कागदपत्रे बावधन पोलीस ठाण्यात सादर केल्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. ... पार्थचेही नाव एफआयआरमध्ये टाका : दमानिया, कुंभार दरम्यान, कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना पत्र लिहून, या प्रकरणातील तक्रारदार असलेले सह-जिल्हा निबंधक संतोष हिंगणे यांच्यासोबत पार्थ पवार यांचे नावही एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 6:56 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:विकासाचा श्रेयवाद, अपयशाची कबुली आणि नव्या चेहऱ्यांना संधीची मागणी; विकास, भ्रष्टाचार आणि पाणीप्रश्नावरून रंगली राजकीय रणधुमाळी

महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, छत्रपती संभाजीनगरमधील प्रभागांमधील वास्तव परिस्थिती, स्थानिक प्रश्न आणि राजकीय भूमिका नागरिकांसमोर मांडण्यासाठी ‘दिव्य मराठी’ ॲपने सुरू केलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या विशेष मालिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मधील राजकीय हालचालींचा आढावा घेत असताना, विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला. या संवादातून निवडणुकीत कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहणार, कोणत्या कामांचा दावा केला जात आहे आणि कोणावर टीका होत आहे, याचे स्पष्ट चित्र समोर आले. रस्ते, पाणी, ड्रेनेज, निधी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, शिक्षण आणि विकास अशा अनेक मुद्द्यांवरून प्रभाग क्रमांक 7 चे राजकारण चांगलेच तापलेले दिसून आले. महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असताना छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 7 राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरत आहे. विकासकामांचे दावे, अपयशाचे आरोप, पाणी-ड्रेनेजसारख्या मूलभूत प्रश्नांवरून सुरू असलेली वादळं आणि पक्षांतील परस्पर दोषारोप यामुळे हा प्रभाग चांगलाच तापलेला दिसतो. कोण काय म्हणतंय, कुणाचा दावा कितपत खरा आहे आणि मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत, याचे चित्र या संवादातून स्पष्ट होत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी नगरसेविका पद्मा शिंदे यांनी विकासकामांच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली. हडको-सिडको परिसरातील रस्त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी या प्रभागात नगरसेवक नव्हते का, असा सवाल उपस्थित करत, प्रत्यक्षात रस्त्यांची बहुतेक कामे ही शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या इच्छुक उमेदवार पूजा कैलास सोनवणे यांनीही निधीच्या मुद्द्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला आजवर सर्वाधिक निधी दिला असल्याचा दावा करत, विशेषतः पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. हडको परिसरातील रस्तेही देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी तुषार सुरासे यांनी मात्र शहरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न हा सर्वात गंभीर मुद्दा असून, नागरिकांना आठ दिवसांतून केवळ एकदाच पाणी मिळते, असा आरोप त्यांनी केला. यासोबतच ड्रेनेज लाईनची समस्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नांवर उपाय करण्यासाठी केवळ राजकीय अनुभव नव्हे, तर शिक्षित आणि सक्षम उमेदवारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी मतदारांना पटवून दिले. पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे झाली असून, त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही सुरासे यांनी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार गौरव पुरंदरे यांनी महायुती सरकारवर आणि जुन्या नगरसेवकांवर जोरदार टीका केली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये ड्रेनेजची समस्या अत्यंत गंभीर असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील टीव्ही सेंटर चौकातही ड्रेनेजचे पाणी साचत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रभागातील माजी नगरसेवकांना जबाबदारीने काम करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीतील घटक पक्ष एकमेकांत भांडत असले तरी, खरे महत्त्व प्रभागातील प्रश्नांचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते चांगले झाले की ड्रेनेज लाईन आठवते आणि ड्रेनेज टाकल्यानंतर पुन्हा रस्ते फोडले जातात, हे केवळ भ्रष्टाचारासाठीच केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. साडेतीनशे कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी योजना चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून आली होती, मात्र भाजपने या योजनेला विरोध केला, असा दावा त्यांनी केला. गौरव पुरंदरे यांच्या या आरोपांना भाजपचे माजी नगरसेवक महेश माळवतकर यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. जलवाहिनी योजना पूर्ण होऊ न देण्यास उद्धव ठाकरे गटच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शहरातील पाणीपुरवठा योजना जाणीवपूर्वक रखडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या काळात केंद्र सरकारकडून या योजनेसाठी निधी मिळवून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सध्या प्रभागातील अनेक रस्ते चांगल्या स्थितीत असल्याचे सांगत, विकासकामांवर महायुती सरकारचा ठसा उमटल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष गणेश साळुंखे यांनी वेगळ्याच मुद्द्यांकडे लक्ष वेधले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये गुन्हेगारी वाढत असून, नशा करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी दोन दिवसाआड पाणी येत होते, मात्र आता आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपचे इच्छुक उमेदवार सतीश छापेकर यांनी मात्र शिवसेनेवर जोरदार टीका केली. शहरातील खासदार, आमदार आणि नगरसेवक हे दीर्घकाळ शिवसेनेचेच होते, मग ते उद्धव ठाकरे गटाची असो वा एकनाथ शिंदे गटाचे, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेनेच महानगरपालिका ‘खड्ड्यात घातली’ असून, शिवसेनेचे नेते भूखंड माफिया असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. एमआयएम पक्षाचे इच्छुक उमेदवार रवी हिवराळे यांनी शहरातील विकासाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही शिवसेना गट आणि भाजप यांनी शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याचा आरोप करत, मराठी शाळा बंद पडत असल्याचा मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला. मराठीच्या नावावर राजकारण करणारेच पक्ष मराठी शाळा विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी शहरात 187 मराठी शाळा होत्या, मात्र आता केवळ 32 शाळा उरल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा शिवसेना-भाजप सत्तेत आल्यास उरलेल्या शाळाही विकल्या जातील, असा आरोप त्यांनी केला. राहुल कुमार सोनवणे यांनीही विद्यमान राजकारणावर नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून तेच चेहरे नगरसेवक म्हणून निवडून येत असून, उद्याने, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा दुर्लक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या व्हिजनने काम होणे अपेक्षित होते, मात्र निवडणुका केवळ रस्ते, ड्रेनेज आणि लाईटपुरत्याच मर्यादित राहिल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे यावेळी तरुण पिढीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी नीलेश शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. मागील 70 वर्षांत जेवढा निधी शहराला मिळाला नाही, तेवढा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शहरात 1550 कोटी रुपयांचे रस्ते तयार झाले असून, 190 कोटी रुपयांच्या ड्रेनेज लाईनला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता लागू झाल्यामुळे काम सुरू होऊ शकले नसले तरी, ती संपल्यानंतर तात्काळ काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलावरून भ्रष्टाचाराचे आरोप टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलावरून एमआयएमचे रवी हिवराळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना महेश माळवतकर यांनी विरोध केला. खेळाडूंसाठी असलेले मैदान व्यापारी वापरासाठी वापरले गेल्याचा आरोप हिवराळे यांनी केला, तर या संकुलामुळे शहराचा विकास झाल्याचे माळवतकर यांनी सांगितले. माजी नगरसेवक मोहन मेघावले यांनीही परिसरातील रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा व्यवस्थित असल्याचा दावा केला. आगामी काळात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास, येथे अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 6:45 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:कचरा, पाणी, ड्रेनेज आणि पैसे दिल्याशिवाय काम नाही; अग्निशामक दलाची गाडी येण्यासाठीदेखील व्यवस्थित रस्ता नाही

महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्य मराठी ॲपने सुरू केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या मालिकेला छत्रपती संभाजीनगरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलो असता येथे अनेक गोष्टींना तोंड फुटले. पाण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः आक्रोश केला. मात्र, या प्रभागात सर्वात जास्त त्रास अस्वच्छतेचा असल्याचा येथील नागरिकांनी सांगितले. ठीक ठिकाणी साठणारा कचरा, वारंवार चोकअप होणाऱ्या ड्रेनेज लाईन यामुळे या प्रगातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दिव्य मराठीच्या समोर या समस्यांचा नागरिकांनी पाढाच वाचला. एन-12, स्वामी विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या प्रमिला शेटे यांनी सांगितले की, या परिसरात वारंवार ड्रेनेज लाईन चोक-कप होत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. माजी नगरसेवक किंवा इतर कोणाकडेही याबाबत तक्रार केली असता, कोणीही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार त्यांनी केली. ज्योती गिरी यांनी या परिसरात अनेक वर्षांपासून कचरा आणि पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली. या मोकळ्या जागेवर नागरिक कचरा आणून टाकत असल्यामुळे, तसेच साचलेल्या पाण्यामुळे येताना जाताना या ठिकाणी दुर्गंधी येते. या परिसरात येण्यासाठी रस्ता देखील नसल्याची तक्रार त्यांनी केली. या परिसरातील रहिवाशी नम्रता प्रवीण काळे यांनी सांगितले की, या परिसरात ड्रेनेजची काम अंत्यत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे. या बाबत वारंवार महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर देखील साफसफाई करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. वारंवार त्यांना कॉल करावा लागतो. याचा लहान मुलांना त्रास होत असल्याची तक्रार देखील त्यांनी केली. लता नारखेडे यांनी देखील ड्रेनेज लाईन संदर्भात तक्रार केली. महानगरपालिकेचे कर्मचारी देखील साफसफाईसाठी बोलल्यानंतर ते पैसे मागत असल्याची तक्रार त्यांनी केली. माजी नगरसेवकांना देखील फोन केल्यानंतर मनपाचे माणसे येत असते तरी देखील ते माणसे पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर कठाळे हॉस्पिटल पासून आमच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन मधून घाण पाणी बाहेर पडत असल्याचे विमल कावले पाटील यांनी म्हटले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी देखील आम्हाला या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला, असा आरोप देखील त्यांनी केला. नगरसेवक पद गेल्यानंतर देखील नागरिकांच्या नगरसेवकांनी समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे होते. मात्र, त्यांनी कधीही लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता निवडणूक आल्यानंतरच इच्छुक नगरसेवक दारापुढे येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या परिसरातील रहिवासी सारंगधर अक्कर यांनी दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. घराचे दरवाजे यामुळे कायमच बंद ठेवावे लागत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. अग्निशामक विभागाची गाडी येण्यासाठी देखील रस्ता नसल्याचा आरोप तुषार सुरासे यांनी केला. परिसरात सासलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी बोलवल्यानंतर देखील ते थातूरमातूर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महानगरपालिकेचे कर्मचारी देखील पैसे घेतल्या शिवाय काम करत नसल्याचा गंभीर आरोप देखील सुरासे यांनी केला आहे. अशी आहे प्रभागाची व्याप्ती एन-12, सिडको, सिद्धार्थ नगर, एन-11, सुदर्शन नगर भागशः, पवन नगर, रायगड कॉलनी म्हाडा, पोलिस क्वॉर्टर, रशीदपुरा,शताब्दीनगर, स्वामी विवेकानंद नगर अशा भागांचा या प्रभागात समावेश होतो. या प्रभागाची मतदारसंख्या 36,283 इतकी आहे. यामध्ये 18,355 पुरुष मतदार तर 17,927 स्त्री मतदार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Dec 2025 6:40 am

पंचक्रोशीत प्रसिध्द जांबच्या बैल बाजारात गर्दी

जळकोट : प्रतिनिधी जळकोटपासून जवळ असलेल्या जांब (बु) या ठिकाणी गत वीस वर्षांपासून जनावरांचा मोठा बाजार भरतो. विशेष म्हणजे या ठिकाणी बैल विक्री तसेच खरेदीस प्राधान्य असते दर आठवडी बाजारामध्ये म्हणजेच शुक्रवारी लाखो रुपयाची उलाढाल होत असते . सध्या हा बाजार चांगलाच बहरला आहे . जांब येथील जनावरांच्या बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीला बाजार […] The post पंचक्रोशीत प्रसिध्द जांबच्या बैल बाजारात गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 1:36 am

शिक्षक, अधिकारी, कर्मचा-यांच्या दयानंद कला महाविद्यालयात विभाग स्तर स्पर्धा 

लातूर : प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड ता. जि. लातूर द्वारा शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. २०२५-२६ विभागस्तर स्पर्धा दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे रविवारी संपन्न झाल्या. या स्पर्धेत राज्य मंडळाच्या अधिनस्त सर्व शासकीय, स्थानिक […] The post शिक्षक, अधिकारी, कर्मचा-यांच्या दयानंद कला महाविद्यालयात विभाग स्तर स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 1:34 am

‘पोषण भी, पढाई भी’ उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अंगणवाड्या आता केवळ खाऊ देणारे केंद्रे न राहता उज्ज्वल, सक्षम व सुसंस्कारित भावी पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. शासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनांना अंगणवाडी सेविकांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित ‘पोषण भी, पढाई भी’ या […] The post ‘पोषण भी, पढाई भी’ उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 1:03 am

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांचा नागरिकांशी संवाद

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या समजून घेत त्यांच्याशी संवाद साधला. […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांचा नागरिकांशी संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Dec 2025 1:01 am

मल्ल्या भारतात कधी परत येणार?

मुंबई : भारताला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेल्या उद्योगपती किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विजय मल्ल्याच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा न्यायालयात सुरू झाली आहे. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने मल्ल्याला कडक शब्दांत जाब विचारत, तू भारतात नेमका कधी परत येणार? असा थेट प्रश्न उपस्थित केला. याआधी विचारलेला हाच […] The post मल्ल्या भारतात कधी परत येणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Dec 2025 11:55 pm

'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही...':अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यावर काळाचा घाला; कारंजात हरिश हेडांचा अपघाती मृत्यू

नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही...' अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. कारंजा-वाशिम बायपासवर बुधवारी रात्री झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिश हेडा हे बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने काही कामानिमित्त वाशिम बायपासवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरातून जात होते. यावेळी एका भरधाव पिक-अप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, हरिश यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातापूर्वी त्यांनी आपल्या मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडले होते आणि मित्रांची भेटही घेतली होती, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ती फेसबुक पोस्ट ठरली शेवटची! कारंजा नगरपालिका निवडणुकीत हरिश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. दोन दिवसांपूर्वीच लागलेल्या निकालात त्यांचा पराभव झाला. राजकीय जीवनातील या मोठ्या धक्क्याने खचून न जाता, हरिश यांनी मंगळवारी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी सुरेश भटांच्या विझलो जरी मी... या ओळींमधून पुन्हा नव्या दमाने राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. तसेच मतदारांचे आभारही मानले होते. मात्र, नव्या जिद्दीने पेटून उठण्यापूर्वीच त्यांच्या आयुष्याचा दिवा मालवला गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 2008 पासून राज ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ता हरिश हेडा हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारसरणीने भारावलेले कार्यकर्ते होते. 2008 मध्ये मनसेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या काळातच त्यांनी पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते. एक कट्टर कार्यकर्ता, उत्कृष्ट संघटक आणि राज ठाकरेंच्या भाषण शैलीचे चाहते म्हणून त्यांची ओळख होती. कारंजा शहरात मनसेची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हरिश हेडा यांच्या निधनाचे वृत्त समजताच कारंजा शहरात सन्नाटा पसरला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. एका संवेदनशील आणि लढाऊ कार्यकर्त्याच्या अशा अचानक जाण्याने राजकीय क्षेत्रासह सर्वच स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 11:50 pm

महायुती-मविआच्या चर्चेत एमआयएमची बाजी:महापालिकेसाठीची पहिली यादी जाहीर, छत्रपती संभाजीनगरसाठी 8 नावांची घोषणा

राज्यात महापालिका निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे चर्चाचक्र सुरू असतानाच, एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि नाशिकमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, पक्ष 'स्वबळावर' मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगरमधील विविध प्रभागांतील 8 उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय जालन्यातील 1 आणि नाशिकमधील 3 उमेदवारांची नावेही घोषित करण्यात आली आहेत. इतर मोठ्या पक्षांची युती आणि जागावाटपाची गणिते अद्याप सुटलेली नसताना एमआयएमने घेतलेली ही झेप आगामी निवडणुकीत चुरस वाढवणारी ठरणार आहे. गेल्या महापालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक निवडून आले होते आणि पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावली होती. यावेळी ही संख्या 30 ते 35 पर्यंत नेण्याचा आमचा निर्धार आहे, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. निवडणुकीसाठी पक्षाकडे 400 हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, एका एका प्रभागात 7 ते 8 इच्छुक उमेदवार असल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण असल्याचा दावाही त्यांनी एका मुलाखतीत केला होता.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 11:36 pm

वर्षानुवर्षांची मेहनत आगीत भस्म!:अभिनेते सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; हजारो झाडे अन् दुर्मिळ वनसंपदा खाक

आपल्या अभिनयासोबतच वृक्षारोपणाच्या चळवळीसाठी ओळखले जाणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील पालवण डोंगररांगेत उभ्या केलेल्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले असून, यात हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून घेतलेल्या अपार मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. सायंकाळच्या सुमारास पालवण डोंगरावर अचानक धुराचे लोट दिसू लागले. उन्हाळ्याचे दिवस आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच आगीने संपूर्ण देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आकाशात झेपावताना दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाळलेले गवत आणि कडक उन्हामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत असले, तरी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षानुवर्षांची मेहनत आगीत भस्म सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराचा कायापालट करून तिथे घनदाट जंगल उभे करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. कडक उन्हाळ्यातही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पाण्याचे टँकर लावून इथली झाडे जगवण्यात आली होती. या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची जोपासना केली जात होती, ज्यामुळे परिसरात विविध पक्षी आणि वन्यजीवांचा वावर वाढला होता. मात्र, आज लागलेल्या या आगीमुळे ही संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली असून, निसर्गप्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 11:15 pm

महेंद्र हरपाळकर यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची धुरा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदाचा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. हे पद रिक्त राहिल्यामुळे आयोगातील परीक्षा, निकाल आणि मुलाखती रखडल्या होत्या, ज्याचा थेट फटका हजारो स्पर्धा परीक्षार्थींना बसत होता. मात्र आता रखडलेले निकाल आणि लांबणीवर पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला गती […] The post महेंद्र हरपाळकर यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची धुरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Dec 2025 11:04 pm

दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती जिंकेल:संजय गायकवाड यांचा दावा; ठाकरेंची युती स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी - जयकुमार गोरे

आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीची अधिकृत घोषणा केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप वर्षांनी दोघे भाऊ एकत्र आले आहेत. दोघांतील वैर संपले आहे. दोघे भाऊ एकत्र आल्याने दोघांनाही शुभेच्छा. पुन्हा कधी दोघांनी भांडू नये. तसेच दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती ताकदीने लढेल आणि जिंकेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. संजय गायकवाड म्हणाले, मराठीचा महापूर आम्ही पण करणार आहोत. ज्यांचे लोक जास्त निवडून येतील त्याचा महापौर होणार आहे. 227 पैकी 150 जागा भाजप शिवसेना युतीला मिळतील. मुंबईकर आमच्या पाठीशी उभा राहील. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर उभी आहे. 25 वर्षांपासून ज्यांच्या हाती सत्ता दिली ती आता मुंबईकर ठेवणार नाहीत, असे गायकवाड म्हणाले. ठाकरे बंधू अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले- जयकुमार गोरे दरम्यान, दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी, विकासासाठी एकत्र आले नाहीत, तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर केली आहे. ते म्हणाले, आपले अस्तित्व संपत चालले आहे, त्यामुळे एकत्र येऊन अस्तित्व टिकवण्यासाठी हे एकत्र आले आहेत. यांच्या एकत्रीकरणामुळे राज्याच्या राजकारणात खूप काही परिणाम होईल असे नाही असे गोरे म्हणाले. जनतेचा विश्वास भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. यांच्या एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही. राज ठाकरेंची भूमिका दिवसाला बदलत जाते भाजप पक्ष फोडणारी टोळी असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले, ते जर टीका करत असतील तर मग याच व्यवस्थेसोबत (भाजप) ते आजपर्यंत होते. भाजपचे कौतुक करत होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला अधिकचे महत्त्व देण्याची गरज नाही. राज ठाकरेंची भूमिका दिवसाला बदलत जाते, त्यामुळे त्यांच्या विधानाला फार महत्त्व देता येत नाही, अशी टीका गोरे यांनी केली आहे. तसेच सोलापुरात आम्ही महायुती करण्यासाठी इच्छुक आहोत. आज त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली उद्याही चर्चा होणार आहे. मात्र युतीसाठी योग्य तो प्रस्ताव आला तर एकत्रित निवडणूक लढवण्यास आम्ही तयार आहोत, असे जयकुमार गोरे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 11:04 pm

मंत्री राणे, दरेकर, लाड यांना अजामीनपात्र वॉरंट

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कोरोना कालावधीतील एका आंदोलन प्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या ३ नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिला. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. संविधान बचाव आंदोलन केल्या प्रकरणी […] The post मंत्री राणे, दरेकर, लाड यांना अजामीनपात्र वॉरंट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Dec 2025 10:51 pm

बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग

बीड : बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाली असून निसर्गप्रेमींमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा ९ वाजेच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. […] The post बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Dec 2025 10:43 pm

मी खरा वाघ, त्यांच्यासारखा कागदी नाही:रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, म्हणाले- माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागले

राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला शाब्दिक कलगीतुरा आता शिगेला पोहोचला आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निवडणूक निकालांवरून जोरदार निशाणा साधला. माझे बोलणे त्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी माझ्यावर टीका केली, असे दानवे यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दानवेंची खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देताना दानवे म्हणाले, मी या पक्षात जनता पार्टीच्या काळापासून निष्ठेने काम करत आहे. पक्षाने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री आणि राज्याचा अध्यक्षही केले. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून किंवा शेपूट घालून मी विधानपरिषदेत गेलो नाही. मी सात वेळा जनतेतून निवडून आलो आहे. समोरून डरकाळी फोडत विधानसभेत आणि लोकसभेत जाणारा मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. नऊ आणि सातच्या आकड्यांवरून टोला दोन्ही पक्षांच्या निवडणूक कामगिरीवर बोट ठेवताना रावसाहेब दानवे यांनी आकडेवारीच सादर केली. मी वर्तवलेले भविष्य खरे ठरले आहे. प्रचारादरम्यान मला परिस्थिती समजत होती, म्हणूनच मी म्हणालो होतो की निवडणुकीनंतर यांचा पक्ष राहणार नाही. अखेर झाले काय? एकाचे 9 आमदार आले आणि एकाचे 7. साधी दोन अंकी संख्याही त्यांना गाठता आली नाही. मग त्यांना माझे बोलणे झोंबायचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंना ठेवले 'वेटिंग'वर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता दानवे यांनी सावध पवित्रा घेतला. दोन्ही भावांवर एकाच वेळी टीका करायला नको. राज साहेबांना सध्या 'वेटिंग'वर ठेवा. उद्या ते काय बोलतात ते पाहू आणि मगच त्यांना उत्तर देऊ, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरील तोफ तूर्तास राखून ठेवली आहे. संजय राऊतांनाही दिले प्रत्युत्तर भोकरदनमधील भाजपच्या पराभवावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही दानवेंनी समाचार घेतला. भोकरदनचे सामाजिक समीकरण वेगळे आहे. जे लोक आमच्याकडून तुमच्याकडे गेले, त्यांनीच तुमचा सत्यनाश केला. त्यांच्या नादी लागल्यामुळेच तुमचा आकडा नऊवर आला आहे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 10:02 pm

महाराष्ट्राच्या डाळिंबाची आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात भरारी:शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - पणन मंत्री जयकुमार रावल

राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यात उत्पादित झालेल्या डाळिंबाचे तीन कंटेनर वाशी येथील सुविधा केंद्रातून के.बी. एक्सपोर्ट्सचे चेअरमन प्रकाश खाखर यांनी नुकतेच ब्रिस्बेन - (ऑस्ट्रेलिया), न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस- (अमेरिका) येथे निर्यात केले. या पार्श्वभूमीवर पणन मंत्री रावल यांनी प्रकाश खाखर यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी सातत्याने वाढत आहे. राज्यात उत्पादित होणारा डाळिंब हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशात निर्यात होत आहे. टप्प्याटप्प्याने इतर फळांची निर्यात करण्यासाठी पणन विभाग प्रयत्न करत आहे. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक मूल्य मिळेल. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासह अन्य देशांमध्ये कंटेनर रवाना होणे हे राज्याच्या कृषी-निर्यात व शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. येणाऱ्या काळात निर्यात सुविधा केंद्रातून मोठ्या क्षमतेने डाळिंब निर्यात केले जाणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 9:50 pm

भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा:प्रकाश आंबेडकरांच्या जिल्हाध्यक्षांना सूचना; ठाकरे बंधूंच्या युतीवरही दिली प्रतिक्रिया

राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या युतीची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही आपली रणनीती स्पष्ट केली असून, पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करण्याच्या सूचना सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे स्वागत करतानाच, ही एक चांगली गोष्ट असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दिशा स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, भाजप सोडून कोणासोबतही युती करा, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस बरोबर युती केली तर चालेल, अशा सूचना आंबेडकरांनी जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भाजप काही ठिकाणी त्यांच्या मित्रांबरोबर चालली आहे, तर काही ठिकाणी युती करणार नाही. कॉंग्रेस सुद्धा काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत चालली आहे, काही ठिकाणी नाही. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे. त्यामुळे एक अशी पॉलिसी नाही. ज्या महापालिका आहेत, तिथल्या अध्यक्षांना युतीसंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत. त्यांनी कोणासोबत युती करता येईल याची चाचपणी करावी. मात्र, यात एकच आहे, भाजपसोबत युती करायची नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या युतीचे स्वागत आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे. महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यानुसार आता सगळेच पक्ष कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Dec 2025 9:04 pm