विधानसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७१.११ टक्के मतदान
कणकवली ६९.५५,कुडाळ ७२.२९,सावंतवाडी ७१.५५ टक्के मतदान ; २०१९ विधानसभेपेक्षा ७.१९ टक्क्यांनी मतदानात वाढ सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागांसाठी एकूण ६ लाख ७८ हजार ९२८ मतदारांपैकी ४ लाख ८२ हजार ७५२ मतदारांनी मतदान न केले असून एकूण ७१.११ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६३.९२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे [...]
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनर खेळाडूवर जर्मनीतील रूग्णालयात सर्जरी, अचानक काय घडलं?
Team India : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर जर्मनीमध्ये सर्जरी करण्यात आलीआहे. टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या खेळाडूवर अचानक सर्जरी का करावी लागली, कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.
Share Market मध्ये भूकंप; तेजीत असणारे Adani ग्रुपच्या शेअर्सना झटका, काही सेकंदातच कोट्यवधी बुडले
Adani Group Shares Crashed: गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी उघडताच कोसळले. एक दिवसापूर्वी शेअर बाजारातील घसरणीच्या ट्रेंडला विराम लागला होता मात्र, गुरुवारी सुरुवातीपासूनच अदानी समूहाच्या शेअर्समधील विक्रीच्या दबावाने देशांतर्गत शेअर मार्केटला लालेलाल केले आहे. सर्वात मोठी घसरण अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.
इलेक्शन ड्युटी बजावून परतताना काळाची झडप, भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू
Jalgaon Accident: लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती.
राज ठाकरेंची फौज विधानसभेत? मनसेला चार जागा मिळण्याचा अंदाज, कोणाकोणाच्या विजयाचे संकेत?
Maharashtra Election Exit Poll : मनसेला किती जागा मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. विशेष म्हणजे राज यांचे सुपुत्र अमित ठाकरेही रिंगणात असल्याने सर्वांचे डोळे लागले आहेत.
अमेरिकेत मोदींचं राज्य नाही हे अदानी विसरले! प्रशांत भूषण यांचा टोला
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने लाच व फसवणुकीचे आरोप केले आहेत. गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह 7 जणांनी सौर ऊर्जा कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्सची (2 हजार कोटी रुपये) लाच देऊ केली होती. हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गौतम अदानी आणि […]
Gold Price Today: लग्नसराईत सोन्याचे भाव गगनाला भिडले; ग्राहकांच्या चिंतेत वाढ; पाहा आजचा भाव किती?
Gold Rate : सोन्याच्या दरात मागील दिवसांपासून बरीच चढ-उतार सुरुच आहे. मात्र, आज सोने आणि चांदीच्या वायदा किंमतीत वाढ झाली असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे ७६,२८१ रुपये तर, चांदीचा वायदाही वाढताना दिसत आहे. चांदीच्या वायद्याची किंमत ९२,१०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.
भाजप उमेदवारावर दगडफेक, बचावासाठी कार्यकर्त्यांसह स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं, पाथर्डीत तणाव
Pathardi Vidhan Sabha Voting: पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी या ठिकाणी भाजप उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांनी स्वतः सह बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन एका खोलीमध्ये बंद करून घेतल होतं. त्यामुळे काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
'प्रत्येकजण पैशासाठी...' भूल भुलैया ३ आणि सिंघम अगेनच्या क्लॅशवर स्पष्टच बोलली माधुरी दीक्षित
Madhuri Dixit : भूल भुलैया ३ मध्ये माधुरी दीक्षितने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. अशातच आता माधुरीने भूल भुलैया ३ आणि सिंघम अगेन या सिनेमांच्या क्लॅशबद्दल भाष्य केलं आहे.
Reshma shinde kelvan:मराठी टेलिव्हिजन वरील आघाडीची नायिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अदानींच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा, लाच अन् फसवणुकीचा आरोप; फेडरल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
Gautam Adani Alleged Bribery and Fraud: हिंडेनबर्गनंतर अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आता आणखी एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून अब्जाधीश उद्योगपतीविरुद्ध अमेरिकन कोर्टात खटला सुरू असून या प्रकरणी अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
दहशतवादी हल्ले आणि घुसखोरी रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची छापेमारी
जम्मू-काश्मीरमधील वाढती घुसखोरी आणि दहशतवादी कटबाबत एनआयएने छापेमारी सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील रामबन, किश्तवाड, डोडा, रियासी आणि उधमपूर भागात एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. हल्ली काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. सुरक्षा दलांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय […]
Bitcoin Hits All Time High: डिजिटल आभासी चलन बिटकॉइनने नवा रेकॉर्ड कायम केला आहे. या चलनाने प्रथमच ९५,००० डॉलर्सचा आकडा गाठला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक लाख डॉलरचा करिष्माई आकडा पार करण्याच्या आशा बळकट झाल्या आहेत.
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
पर्थ कसोटीआधी भारतीय संघाला मोठा झटका; गोलंदाजाला दुखापल असल्याने भारतात परतावे लागले
IND vs AUS: डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालला भारताचा राखीव वेगवान गोलंदाज खलील अहमदची जागा देण्यात आली आहे कारण खलील दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. बांगलादेश मालिकेदरम्यान कसोटी संघात समाविष्ट झालेला दयाल दक्षिण आफ्रिकेतील टी-20 संघात होता पण एकही सामना खेळला नाही. जोहान्सबर्गहून तो थेट पर्थला पोहोचला आहे.
रवीना टंडनला आलेली राजकारणात प्रवेश करण्याची ऑफर; नकार देत म्हणाली, 'मी खऱ्याचं खोटं…'
Raveena Tandon : रवीना टंडनला राजकारणात येण्याची ऑफर आली होती. मात्र, अभिनेत्रीने नकार दिला. काय होतं नेमकं कारण? जाणून घ्या.
वाढलेला टक्का प्रस्थापितांना धक्का! सर्वाधिक मतदानाचे १५ मतदारसंघ, कोणकोणत्या दिग्गजांना धाकधूक?
Maharashtra Vidhan Sabha Election Voting Percent : सुधारित टक्केवारीनुसार कोल्हापूरच्या मतदारांनी सर्वाधिक मतदान केल्याचं स्पष्ट झालं आहे. कोल्हापुरात ७६.२५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
जनतेचं विकासाला मतदान, महायुती बहुमताने सरकार स्थापन करणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास
Vidhan Sabha Election: जनता भरभरुन विकासाला मतदान करेल, महायुती पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शाहरुख खान धमकी प्रकरण, वकील फैजान खानच्या मोबाईल तपासणीत धक्कादायक माहिती उघड
बॉलीवूड किंग शाहरुख खानला धमकी देत खंडणी मागितल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रायपूरमधील आरोपी वकील फैजान खान याने धमकी देण्यापूर्वी शाहरुखचे सुरक्षा कर्मचारी आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांची माहिती गोळा केली होती. आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत मोठे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजानने शाहरुखची सुरक्षा व्यवस्था आणि आर्यन खानबाबत ऑनलाईन […]
Election Result Share Market: निवडणूक निकाल शेअर बाजाराची बदलणार चाल, उसळणार की आणि ढासळणार?
Maharashtra Assembly Election Result Impact on Share Market: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते निवडणुकीनंतर बाजारात अल्पकालीन चढउ-तार संभव आहेत मात्र, बाजारातील हालचाल प्रामुख्याने आर्थिक धोरणे, जागतिक ट्रेंड आणि कॉर्पोरेट कमाईवर अवलंबून असतील.
'मतदान चाळिशी'चा शिक्का अखेर पुसला; कल्याण-डोंबिवलीत ५० टक्क्यांची सरासरी ओलांडली
Kalyan-Dombivli Voting Percentage: कल्याण-डोंबिवली हद्दीतील चारही मतदारसंघात सकाळ पासूनच मतदारामध्ये उत्साह दिसत होता. मतदान सुरू होण्याआधीच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावलेल्या दिसल्या.
राज्यात सर्वाधिक मतदान 'या' जिल्ह्यात, उमेदवारांची धाकधूक वाढली; मातब्बर नेत्यांच्या दांड्या उडणार?
Kolhapur Political News: राज्यात गेल्या पाच वर्षात चाललेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला कौल मतदानाद्वारे काल दिला.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने केला चमत्कार, चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास
Asian Champions Trophy: 'गोल्डन गर्ल' दीपिकाच्या स्पर्धेतील 11व्या गोलच्या बळावर भारताने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे विजेतेपद राखले. गेल्या वर्षी रांची आणि 2016 मध्ये सिंगापूरमध्ये हे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने कमालीचा समन्वय आणि संयम दाखवून चीनला बाजूला ठेवले होते.
South Indian Actress : सीतेच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीने मांसाहारही सोडला होता. इतकंच नव्हे तर लोकांनी केलेल्या विरोधामुळे तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल.
अपक्षांकडे सर्वपक्षीयांची नजर, सत्तास्थापनेसाठी लागणार मदत, मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडलं, यावेळी सत्ता स्थापनेसाठी १४५ चा आकडा गठण्यासाठी अपक्षांची मदत लागणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी सध्या आपला मोर्चा अपक्षांकडे वळवला आहे.
Video : धुळ्यात खळबळ, ९४००००००० किंमतीची दहा हजार किलो चांदी पोलिसांनी पकडली, मालकाची माहिती समोर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर धुळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमधून १० हजार किलो चांदी जप्त केली आहे. चेन्नईहून जयपूरला जाणाऱ्या या कंटेनरमधील चांदीची किंमत ९४ कोटी ६८ लाख रुपये असून ती एचडीएफसी बँकेची असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून सध्या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
१३ मिनिटांची भेट, फडणवीस-मोहन भागवतांची गुप्त चर्चा, मतदानाच्या रात्रीच प्लॅन ठरला
Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat : एग्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सरसंघचालकांची भेट घेऊन सुमारे १३ मिनिटे चर्चा केली
परळीत लोकशाहीचा शिमगा…मारहाण, दमदाटी, प्रचंड दहशत
विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवात परळी मतदारसंघात शिमगा पाहण्यास मिळाला. मतदारांना धमकावण्यात आले. बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. मतदान केंद्रावर मारहाण करण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी या गंभीर घटना घडल्या. त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे जाऊन धडकले. या घटनांची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या गंभीर घटनांमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले […]
आधी मतदान, मग लग्न! मतदान केल्यानंतरच नवरी चढली बोहल्यावर, नागपूरच्या नेहाचं सर्वत्र कौतुक
Maharashtra Assembly Election 2024: तिने आधी मतदान केले आणि नंतर लग्न, 'लोकशाहीच्या उत्सावात आपलाही सहभाग असणे आवश्यक आहे. हे आपले प्रथम कर्तव्य आहे', अशी प्रतिक्रिया नेहाने व्यक्त केली.
माहीममध्ये मिंध्यांचा धनुष्यबाण पडला
माहीम विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये मतदानासाठी सकाळपासून उत्साह होता. शिवाजी पार्कमध्ये मार्ंनग वॉक झाल्यावर मतदारांनी बालमोहन शाळा, वनिता समाज, सूर्यवंशी हॉल अशा केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहरातील दहा मतदारसंघांपैकी माहीम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या मतदारसंघात 55.23 टक्के मतदान झाले होते. या भागात अत्यंत शांतपणे मतदान सुरू होते. माहीम कापडबाजार […]
बोटाला शाई लावली, बटण दाबले अन् मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू
बोटाला शाई लावली…वोटिंग बटण दाबले अन् हृदयविकाराने मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी साताऱयाच्या खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर घडली. श्याम नानासाहेब धायगुडे (67) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राज्यात लोकशाहीचा महोत्सव सुरू असताना शाम नानासाहेब धायगुडे हे मोर्वे येथील मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी नावाची चिठ्ठी देऊन ओळखपत्र दाखवून बोटाला शाई लावली. […]
या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कधी आहे? जाणून घ्या महत्त्व…
>> योगेश जोशी आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांना अनन्यासाधारण महत्त्व आहे. या योगावर एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे शुभ मानले जाते. या साडेतीन मुहूर्तांवर तिथी, वार, नक्षत्र बघण्याची गरज नसते. त्यामुळे या मुहूर्तावर अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यात येते. तसेच अनेकजण या मुहूर्तांवर सोने, चांदी, अलंकार, वाहन किंवा गृह खरेदीला प्राधान्य देतात. या साडेतीन मुहूर्तांव्यतिरिक्त इतर आणखी […]
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील शहर आणि उपनगर या जिल्ह्यांचा मतटक्का मात्र काहीसा समाधानकारक असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरात ५१.३६ टक्के मतदान झाले होते. तेच बुधवारी शहरात पाच वाजेपर्यंत ४९.०७ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
जिवंत मतदाराला ठरवलं मृत; मुंबादेवी मतदारसंघातील घटना
जिवंत मतदाराला मृत घोषित केल्याची घटना मुंबादेवी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर घडली. गोव्याहून खास मतदानासाठी आलेले अँथोनी ब्रिगेन्झा यांच्या नावापुढे मृत असल्याचे दर्शविण्यात आले होते. अखेर बराच काळ वादावादीनंतर त्यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली. मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीत राहणारे अँथोनी ब्रिगेन्झा हे मतदान केंद्रावर गेले असता तेथील कर्मचाऱयांनी त्यांना मतदान करण्यास मनाई केली. मतदार यादीनुसार […]
महाराष्ट्रात महायुती, झारखंडमध्ये भाजप?
एक्झिट पोल अंदाजात ‘रालोआ’चे पारडे जड : झारखंडमध्ये ‘झामुमो’ला धक्का मिळण्याचे संकेत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, मुंबई, रांची महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील 38 विधानसभा जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी मतदानोत्तर अंदाज म्हणजेच एक्झिट पोल जाहीर केले. या अंदाजांनुसार महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा सत्ता काबीज करण्याचे संकेत मिळत आहेत. [...]
22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन शेवटच्या सामन्यात हरला :लाल मातीवरील बादशहाचा टेनिसला गुडबाय वृत्तसंस्था/ मलागा, स्पेन लाल मातीचा बादशहा राफेल नदालची टेनिस कारकीर्द संपुष्टात आली आहे. डेव्हिस कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा नेदरलँड्सकडून पराभव झाला. 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला, ज्यात त्याला पराभव पत्करावा लागला. मंगळवारी मलागा येथील त्याच्या घरच्या मैदानावर [...]
पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 17 जवान ठार
खैबर पख्तुनख्वा प्रांतात 6 दहशतवाद्यांचाही खात्मा वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 17 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यात सहा दहशतवादीही ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. जवानांनी दहशतवाद्यांना बाहेरच रोखल्यानंतर एका दहशतवाद्याने चेकपोस्टच्या भिंतीला आपले वाहन धडकवल्यानंतर स्फोटकांचा स्फोट झाला. यापूर्वी गेल्या [...]
Pune News : बस गेल्या निवडणूक 'कर्तव्या'वर अन् प्रवासी वाऱ्यावर, पुण्यातील आगार 'फुल्ल'
पुण्यात एसटी आणि पीएमपीच्या ७० ते ८० टक्के बस निवडणूक कामासाठी दिल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. मंगळवारी आणि बुधवारी बसची तीव्र टंचाई निर्माण झाली, ज्यामुळे प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली किंवा खासगी वाहनांचा पर्याय निवडण्यास भाग पाडले गेले.
भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी राखण्यात यश
भारतीय महिला हॉकी संघाचा चीनवर 1-0 ने विजय, युवा आघाडीपटू दीपिकाने नोंदवला निर्णायक गोल वृत्तसंस्था/ राजगीर, बिहार युवा आघाडीपटू दीपिका पुन्हा एकदा उत्कृष्ट रिव्हर्स हिटवरील गोलच्या जोरावर स्टार बनली असून तिच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या चीनला बुधवारी 1-0 ने पराभूत करून महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे (एसीटी) विजेतेपद राखले. दीपिकाने 31 व्या मिनिटाला पेनल्टी [...]
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : तरुणाईचा उत्साह : 23 रोजी निकाल प्रतिनिधी, / मुंबई महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली आणि राज्याच्या इतिहासातील पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस [...]
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ६३ टक्के मतदान; वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा
Gadchiroli Voting Percentage: माओवाद्यांची दहशत झुगारून गडचिरोली जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सिरकोंडा या गावात दुपारी १ वाजतापर्यंत ८५ टक्के मतदान झाले होते.
सायलीची वाट बघत अर्जुन झाला हतबल; मेसेज प्रकरणामुळे झोल, येईल का प्रियाचं सत्य समोर?
Tharla Tar Mag : सायलीच्या मोबाईलवरून मेसेज गेल्यामुळे अर्जुन तिची वाट बघत असतो. या सगळ्यामध्ये सायलीला तिच्या मनातलं सांगायचं असतं ते राहून जातं.
आपण वास्तव्य करतो त्या पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे. भूमीचे खोदकाम करताना कित्येकदा अशा गूढ वस्तू हाती लागतात की आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. ही रहस्ये उकलल्यानंतर आपल्या ज्ञानात मोलाची भर पडते. तसेच आपला वारसा काय आहे, याचेही दर्शन होते. युरोपातील नॉर्वे या देशात उत्खनन होत असताना संशोधकांच्या हाती एक काचेची [...]
अॅमेझॉन लॉजिस्टिक नेटवर्क वाढविणार
भारतीय माल विदेशात पोहचविणे होणार सोपे नवी दिल्ली : भारतीय माल आता परदेशात सहज पोहोचणार आहे, कारण लवकरच ई कॉमर्स या क्षेत्रातील मुख्य कंपनी अॅमेझॉन आपला क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक कार्यक्रम ‘ग्लोबल सेलिंग सेलर एक्स्पोर्ट अॅण्ड डिलिव्हरी’ या अंतर्गत वाढविणार आहे. यामुळे आता भारतीय निर्यातदारांना विदेशात माल पाठविण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान कंपनीने एक्स्पोर्ट नेव्हिगेटर [...]
गयाना : पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत
भारतीय वंशाच्या लोकांकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन, अनेक मान्यवरांची उपस्थिती वृत्तसंस्था / जॉर्जटाऊन नायजेरिया आणि ब्राझील या देशांचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गयाना या दक्षिण अमेरिकेतील देशात आगमन झाले आहे. या देशातील भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे बुधवारी भव्य स्वागत केले. त्यांच्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी [...]
दुबईला फरार होण्यापूर्वी आरोपी ईडीच्या जाळ्यात
‘कॅश फॉर व्होट’ प्रकरणातील संशयित वृत्तसंस्था/ अहमदाबाद कथित कॅश फॉर व्होट प्रकरणात ईडीने बुधवारी एका व्यक्तीला अटक केली. नागनी अक्रम मोहम्मद शफी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमदाबाद विमानतळावरून तो दुबईला जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत नव्याने उघडलेल्या 14 खात्यांमध्ये 100 कोटींहून [...]
झारखंडमध्ये जवळपास 68 टक्के मतदान
528 उमेदवारांची भवितव्य मतदानयंत्रात बंद : आता निकालाची प्रतीक्षा वृत्तसंस्था/ रांची झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात बुधवारी 38 जागांवर मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 67.59 टक्के मतदान झाले. त्यानंतरही काही जागांवर मतदान सुरू असल्यामुळे मतदानाची टक्केवारी 68 टक्क्यांवर पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोग गुरुवारी जाहीर करणार आहे. झारखंडमध्ये विधानसभेसाठी बंपर मतदान झाल्याचे दिसून [...]
मणिपूर मुख्य न्यायाधीशपदी कृष्णकुमार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली न्या. डी. कृष्णकुमार यांची नियुक्ती मणिपूर राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांच्या नियुक्तीची सूचना केंद्र सरकारला केली होती. या सूचनेवर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मणिपूर उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल हे आज गुरुवारी निवृत्त [...]
राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद
Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आयोगाच्या अधिकृत अॅपवरील आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी ६२.६८ टक्के, मुंबई शहरात ५०.९८ टक्के, तर मुंबई उपनगरात ५५.०७ टक्के मतदान झाले.
चहा उत्पादनात घट, तिमाहीत नफा कमाई
चहाच्या बागायती कंपन्यांचा नफा वधारला : प्रतिकूल हवामानामुळे भाववाढ नवी दिल्ली : सप्टेंबर तिमाहीत चहाच्या बागायती कंपन्यांनी नफ्यात वाढ नोंदवली आहे. चहाचे भाव का वाढल्याने हा नफा वाढला असल्याचे समजते. प्रतिकूल हवामानाचा परिणाम चहाच्या उत्पादनावर झाला ज्यामुळे भाव वाढले. अनिश्चित पावसानंतर प्रदीर्घ दुष्काळामुळे, चहाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे 7.67 कोटी किलो कमी होते. [...]
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती व मिंधे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांना पराभव समोर दिसू लागताच त्यांनी थयथयाट सुरू केल्याचे दिसून आले. गुरुगोविंदसिंगपुरा भागातील मतदान केंद्राबाहेर थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांना ‘मस्ती आली का तुला? एका मिनिटात नीट करून टाकीन…’ म्हणत बुधवारी दुपारी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढय़ावरच न थांबता. दोन […]
केजरीवाल यांनी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा
बहुचर्चित मद्य धोरणाला दिले आव्हान वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या फिर्यादीच्या तक्रारींची दखल घेण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांनी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयाकडून निर्देश मिळविण्याची मागणी केली आहे. यावर आज म्हणजेच 21 नोव्हेंबरला सुनावणी [...]
भाड्यापेक्षा जास्त खर्च नखांवर…
आपल्या अवती भोवती अनेक छंदिष्ट लोक असतात याची हे आपल्याला माहीत आहे. अनेकांना अनेक अद्भूत प्रकारचे छंद असतात. अशा व्यक्ती आपल्या छंदांवर प्रचंड रक्कम खर्च करण्यास सज्ज असतात. ते असे छंद का सांभाळतात आणि त्यांना अशा छंदांमधून नेमका कोणता आनंद मिळतो, हे सर्वसामान्य माणसांना कधीही कळू शकत नाही. मात्र, ही माणसे आपल्या छंदांशी अतिशय प्रामाणिक [...]
गौतम अदानी यांच्यावर लाच आणि फसवणुकीचा आरोप, न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने गौतम अदानी यांच्यासह 7 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा केला आहे अदानी यांनी हिंदुस्थानात सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केली होती, असे युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाने म्हटले आहे. या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांचा भाचा सागर […]
संघाकडून झाले हैद्राबादचे ‘भाग्यनगर’
भव्य कार्यक्रमात सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवीत वृत्तसंस्था / हैद्राबाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तेलंगणाची राजधानी हैद्राबादचे नामकरण ‘भाग्यनगर’ असे केले आहे. हे नामकरण सांकेतिक असून भारताचा सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवीत करण्याचा हा उपक्रम आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येथे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हा नामकरण सभारंभ [...]
महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे दहा हजार होमगार्ड; निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध असताना गुजरातमधील तब्बल दहा हजार होमगार्ड आणल्याचे समोर आले आहे. एकीकडे मिंधे-भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राला मिळणारे पाच लाख रोजगार गुजरातला पळवले असताना आता महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे होमगार्ड आणल्याने निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संताप व्यक्त केला […]
अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं देहान्ते तव सान्निध्यं, देहि मे परमेश्वर: अशी एक प्रार्थना आहे. असा एक श्लोक आहे. देवळात जाणारी व्यक्ती देवाच्या समोर मागणं मागताना दोन्ही हात जोडून वरती दिलेल्या इच्छा व्यक्त करते. मागणाऱ्याने देवाकडे दुसरं काही मागू नये म्हणतात. देवाकडे मागण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. की ‘अनायासेन मरणं….’ म्हणजे मला विनासायास मृत्यू यावा. [...]
बॅटरींच्या किंमतींमध्ये 50 टक्क्यांची घट अपेक्षित
येत्या दोन वर्षांमध्ये ही स्थिती राहणार नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या म्हणजेच ईव्हीच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होतील. 2026 पर्यंत, ईव्ही बॅटरीच्या किमती कमी राहण्याचा अंदाज आहे. ईव्ही उत्पादन खर्चाच्या 28-30 टक्के खर्च बॅटरीचा आहे. ग्लोडमॅन सॅच यांच्या अलीकडील अभ्यासानुसार, 2022 मध्ये जगभरात ईव्ही बॅटरीची सरासरी किंमत 153 डॉलर (सुमारे 13 हजार रुपये) [...]
इनव्हायरोचा आयपीओ 22 नोव्हेंबरला होणार खुला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इनव्हायरो इन्फ्राचा 22 नंबर रोजी आयपीओ खुला होणार असून या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 650 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनी एकूण 4,39,48,000 समभाग सादर करणार आहे. यामध्ये 3,86,80,000 इतके नवे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. इनव्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड यांचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर यादरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. 650 [...]
कोलकाता येथे गोदरेज 53 एकरमध्ये प्रकल्प उभारणार
भव्य निवासी प्रकल्प होणार असल्याची माहिती नवी दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने कोलकात्यात सुमारे 500 कोटी रुपयांची कमाई क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी 53 एकर जमीन संपादित केली आहे. गोदरेज प्रॉपर्टीज ही भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, कोलकाता येथील जोका येथे जवळपास 53 एकर [...]
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात चिदंबरम यांना मोठा दिलासा
कनिष्ठ न्यायालय कारवाई करणार नाही; ईडीलाही बजावली नोटीस वृत्तसंस्था/ नवी दिल्ली माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध एअरसेल-मॅक्सिस प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. चिदंबरम यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत. तसेच न्यायालयाने ईडीला नोटीसही बजावली असून चिदंबरम यांच्या याचिकेवर उत्तर मागितले आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या कनिष्ठ [...]
आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’मध्ये नवीन फिचर्स
नवी दिल्ली : दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्समध्ये आता नवीन फिचर्स अपडेट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एलॉन मस्क यांनी वर्ष 2022 मध्ये एक्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. तेव्हापासून मस्क यांनी एक्समध्ये मोठे बदल केले आहेत. पूर्वी एक्समध्ये व्हिडिओ कॉलिंग फिचर, लाँग व्हिडीओ शेअरिंग, लाँग पोस्ट, एडिटिंग, लाईव्ह सारखी फीचर्स नव्हती, पण [...]
एमआरआरसाठी तीन वर्षांची प्रतीक्षा
वैद्यकीय उपचार आणि त्यांच्यावरील खर्च गेल्या 20 वर्षांमध्ये पुष्कळच वाढला आहे. तुमचा आरोग्य विमा असेल तर या खर्चाची झळ विमा कंपनी सहन करते. तरीही विमा लागू होत नाही, असे खर्च असतातच. सध्या एमआरआय स्कॅनिंग बऱ्याच जणांना करावे लागते. या स्कॅनिंगमधून आपल्या शरिराच्या आतील भागांमध्ये काय दोष लपलेले आहेत याची माहिती मिळते आणि रोगनिदान अचूकपणे करता [...]
आजचे भविष्य गुरूवार दि. 21 नोव्हेंबर 2024
मेष: आरोग्य साथ देणार नाही, पोटाचे विकार उद्भवतील वृषभ: जोडीदाराचे आणि आपले एकमत असेल, मोठा निर्णय घ्याल मिथुन: एखादा प्रयोग पूर्ण होईल नवीन नियमांचा शोध लागेल कर्क: कुटुंबातील वातावरण चांगले खेळीमेळीचे असेल सिंह: घरातील लहान सदस्य आपल्यावर खूष असतील कन्या: संततीच्या शिक्षणासाठी घेतलेले निर्णय योग्य असतील तुळ: वरीष्ठांकडून कौतुक पण सहकारी थोडे नाराज असतील वृश्चिक: [...]
प्रणीती शिंदे म्हणजे भाजपची बी टीम -शरद कोळी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणीती शिंदे यांनी आज सकाळी अचानक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले. या वेळी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी संताप व्यक्त करत प्रणीती शिंदे या भाजपच्या बी टीम असून, त्यांचे सोलापूर जिह्याच्या राजकारणातून नामोनिशाण […]
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी कोथरूडमध्ये केले मतदान
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघात मतदान केले. काय विश्वास बसत नाही? होय, हे खरे आहे. या नावामुळे कोथरूड मतदारसंघ चर्चेच्या पेंद्रस्थानी आला. थांबा… मतदारयादीत नामसाधर्म्य असलेली अनेक नावे असतात. त्यामुळे गोंधळही उडतो. त्यावरून अनेक गैरसमजही होतात. असाच गैरसमज सध्या कोथरूड मतदारसंघात […]
रत्नागिरी जिल्ह्यात मतदान शांततेत, पाच विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान
विधानसभा निवडणुकीसाठी आज रत्नागिरीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून 1747 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हय़ामध्ये सुमारे 65 टक्के मतदान झाले. जिल्हय़ातील पाच विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हय़ामध्ये 1747 मतदान पेंद्रांमध्ये 13 लाख 23 हजार 413 […]
महाराष्ट्र आपला स्वाभिमानी बाणा कायम राखणार, उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेल्या बिटकॉईनवरील आरोपांवर शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाच्या थापांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करतानाच, भाजपने कितीही थापा मारल्या तरी महाराष्ट्र महाराष्ट्राचा बाणा कायम राखल्याशिकाय राहणार नाही, असे उद्धक ठाकरे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी कांद्रे पूर्व येथे उद्धव ठाकरे यांनी […]
येवला मतदारसंघातील खरवंडी येथे मंत्री छगन भुजबळ यांना मतदान केंद्रात जाण्यास संतप्त ग्रामस्थांनी रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर केंद्राला भुजबळांनी भेट दिली. येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे अॅड. माणिकराव शिंदे अशी सरळ लढत आहे. बुधवारी खरवंडी येथील मतदान केंद्रावर जाताना ग्रामस्थांनी भुजबळ यांना रोखले. मी उमेदवार असल्याने कुठल्याही केंद्रात जाण्याचा मला अधिकार आहे, असे भुजबळांनी […]
महाराष्ट्रात 65 टक्के मतदान! महागाई, बेरोजगारी आणि अदानीच्या संकटाविरोधात मतदारांचा आसुड
मुंबई आणि महाराष्ट्रावर घोंघावणाऱया अदानी संकटाविरोधात मतदारांचा रोष आज बाहेर आला. कंबरतोड महागाई, वाढती बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील मिंधे-भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी भरभरून मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात भरभरून मतदान झाले. विधानसभेच्या 288 जागांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले. सत्तापालट करण्याच्या दृष्टीनेच इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याचे राजकीय पंडितांचे मत आहे. […]
झारखंडमध्ये 68 टक्के मतदान, 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया आणि शेवटच्या टप्प्यात 12 जिह्यांतील 38 जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 68 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. बोगस मतदान झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना […]
भाजपकडून निवडणुकीत मतांसाठी पैसै, दारूचे वाटप; नाना पटोले यांचा गंभीर आरोप
भाजपने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. आर्वी विधानसभेचे भाजप उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. या वानखेडेंच्या गोदामात दारूच्या बाटल्यांचा साठा सापडला. वर्धा जिह्यात दारूबंदी असतानाही हा दारूसाठा कसा आला? मतदारांना पैसे आणि दारू वाटून भाजपचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. […]
शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील पेंद्रावर अजित पवार व शरद पवार गटात वाद झाला. या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाच्या स्लिपा वाटल्या जात असून कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला. दरम्यान, अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे आरोप फेटाळून लावले. महात्मा […]
सामना अग्रलेख –म्हणे हा उत्सव!
लोकशाही हाच देशाचा धर्म आहे. त्या धर्मासाठीच स्वातंत्र्याचा संग्राम झाला, पण निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचे सांगत भाजप व संघाचे लोक घराघरात पोहोचले. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या सरकारी लवाजम्यासह महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्यात होतो. नव्हे, तो कालच्या निवडणुकीत झालाच आहे. […]
कठोर कारवाई नाही, कार्यालयीन वेळेतच चौकशी; हायकोर्टाचा चंदा कोचरांना दिलासा
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी चंदा कोचर यांच्यावर तूर्त तरी कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने गंभीर घोटाळे तपास ऑफिसला (एसएफआयओ) दिले आहेत. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. चंदा कोचर यांची कार्यालयीन वेळेतच चौकशी करा, असेही न्यायालयाने एसएफआयओला सांगितले आहे. कोचर यांना 22 […]
महाराष्ट्राच्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून बिटकॉईनचा वापर केल्याबाबत भाजपने केलेला आरोप कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावला आहे. भाजपने रवींद्र पाटील नामक जो आयपीएस अधिकारी उभा केला आहे तो मुळात आयपीएसच नाही. तो एक तोतया आहे. भारतीय जनता पार्टी हा एक तोतया पक्ष आहे आणि तो आयपीएस अधिकारीही तोतया आहे, असे नाना पटोले म्हणाले. मी […]
लेख –…तर पृथ्वी ‘आयसीयू’मध्ये जाईल!
>> अनिल दत्तात्रेय साखरे anilsakhare5499@gmail.com अझरबैजान येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी काही निर्णय घेतले जातील, मात्र त्यांचे पालन करण्यासाठी मोठय़ा देशांना आणि कंपन्यांना कायद्याने कुठलीच बांधिलकी नाही. त्यांच्या स्वयंप्रज्ञेने ते जो काही निधी देतील, कार्यवाही करतील त्यावर अविकसित देशांना भरपाई मिळून पुढील कामकाज चालेल. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि हवामान […]
विधानसभा निवडणुकीसाठी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पालिकेच्या 60 हजार कर्मचारी-अधिकाऱयांसह तब्बल एक लाखांवर कर्मचाऱयांनी बहुमूल्य योगदान देत गोंधळ न होता मतदान सुरळीतपणे पार पडले. यामध्ये आज मतदानाच्या दिवशी मुंबईतील 36 मतदारसंघांतील 10 हजार 117 मतदान केंद्रांवर पालिका मुख्यालयाच्या कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवण्यात आले. पालिका आयुक्त […]
706 कोटी 98 लाखांची रोकड, दारू, अमली पदार्थ जप्त; आचारसंहिता भंगाच्या 10 हजार 134 तक्रारी निकाली
विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या 37 दिवसांच्या आचारसंहितेच्या काळात राज्यभरात 706 कोटी 98 लाखांची बेकायदा रोकड, दारू, अमली पदार्थ आणि सोने-चांदी जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे आचारसंहिता भंगाच्या 10 हजार 134 तक्रारी निकाली काढण्यात आल्या अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. आचारसंहितेच्या काळात काही गैरप्रकार घडू नयेत तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसा, […]
Maharashtra Assembly Election सेलिब्रेटींचे भरभरून मतदान
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. कलाकारांनी मतदानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. अभिनेत्री सुकन्या मोने, सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, हेमंत ढोमे, रवी जाधव, जुई गडकरी, सायली संजीव, मंदार चांदवडकर, सुनील बर्वे, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या कुटुंबासह मतदान केले. याचे […]
>> वैश्विक khagoldilip@gmail.com) हो ना करता करता बराच लांबलेला ‘क्रू-9’ यानाचा प्रवास प्रत्यक्षात आला आणि चार अंतराळयात्रींची सोय असलेलं हे स्पेसेक्स या इलॉन मस्कच्या स्पेस कंपनीचं यान व्यवस्थितपणे पृथ्वीपासून अंतराळात 402 किलोमीटरवर असलेल्या ‘स्पेस स्टेशन’शी जुळणी (डॉकिंग) करण्यात यशस्वी झालं. ताशी 17,500 किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती 90 मिनिटांत फेरी पूर्ण करणारं ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ ही अंतराळात […]
नदालच्या कारकीर्दीचा पराभवाने शेवट
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या टेनिस कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. तो आपल्या अखेरच्या सामन्यात जगातील 80 व्या क्रमांकाच्या बोटिच वान डे झॅण्डस्कल्पविरुद्ध 6-4, 6-4 असा सहज पराभूत झाला. यासह डेव्हिस चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतही स्पेनचा नेदरलॅण्ड्सकडून पराभव झाला. 22 ग्रँडस्लॅम विजेता नदाल दोन दशकांहून अधिक काळ टेनिस खेळला. नेदरलॅण्ड्सने स्पेनला 2-1 असे पराभूत केले. चाहते ‘राफा, […]
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या कारणावरून कसबा बावडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी राहुल माळी यांना शिंदे गटाकडून शिवीगाळ करून अरेरावी केल्याने वादाला तोंड फुटले. तीन हजारांहून अधिकच्या जमावात आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम हजर असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या शक्यतेने वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी सतेज पाटील यांनी संयमी भूमिका […]
लक्ष्य, सिंधू, मालविकाचा विजयी प्रारंभ
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिच्यासह झुंजार वृत्तीचा लक्ष्य सेन आणि फॉर्मात असलेली मालविका बनसोड यांनी आपापले सामने जिंकून चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. महिला गटात सिंधूने क्रमवारीत आपल्यापेक्षा सरस असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिला 50 मिनिटांत 21-17, 21-19 असे पराभूत केले. 36 व्या क्रमांकावरील मालविकाने डेन्मार्कच्या 21 व्या क्रमांकावरील […]
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हटके जनजागृती
लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जरा हटके पद्धतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले. कृत्रिम प्राण्यांच्या माध्यमातून ‘आम्ही मतदान करणार, आम्ही मतदार’ असे फलक झळकावून मतदारांना आकर्षित करण्यात आले. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली होती. पण निसर्ग आणि पशुपक्ष्यांचा मुक्त […]
ऑस्ट्रेलियन्स खेळाडूंना आठवतोय पुजारा
एकीकडे पर्थ कसोटीसाठी हिंदुस्थानच्या अंतिम संघाची नावे निश्चित होत नाहीत. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना हिंदुस्थानचा संयमी फलंदाज चेतेश्वर पुजारा आठवतोय. सध्या हिंदुस्थानची आघाडीची फळी कमकुवत भासत असल्यामुळे संघात चेतेश्वर पुजारा नसल्याचा सुटकेचा निःश्वास सोडलाय वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने, तर मार्नस लाबूशेनला बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत पुजारासारखा खेळपट्टीवर नांगर टाकायचाय. हिंदुस्थानी फलंदाजीला कमकुवत लेखण्यासाठी ऑस्ट्रेलियन्स फलंदाजांनी माइंड […]
तुझा मर्डर फिक्स! मिंधेंच्या कांदेंकडून समीर भुजबळ यांना धमकी
बुधवारी मतदारांना तीन तास अडवून ठेवल्याने मिंधे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘आज तुझा मर्डर फिक्स आहे’, अशी उघड धमकीच त्यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना दिली. दरम्यान, आपण हे मारहाण होत असलेल्या कार्यकर्त्याला उद्देशून म्हणालो, अशी सारवासारव कांदे यांनी केली. या घटनेने दिवसभर मतदारसंघात तणाव होता. नांदगावचे मिंधे गटाचे आमदार […]
टीम इंडियासाठी पर्थवर अग्निपथ; पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी संघाचा संघर्ष अटळ
न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश आणि ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवायच्या दडपणामुळे पर्थवरचा पहिला कसोटी सामना हिंदुस्थानी संघासाठी अक्षरशः ‘अग्निपथ’सारखा झाला आहे. त्यामुळे पर्थवर हिंदुस्थानी संघाचा संघर्ष अटळ आहे. परिणामतः ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत आघाडी घेण्यासाठी रणनीती आखली आहे. न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माच्या बॅटमधून धावाही निघाल्या नव्हत्या आणि संघही दारुणरीत्या पराभूत झाला होता. या पराभवामुळे हिंदुस्थानी संघाला दुहेरी धक्का बसला असला […]
लाडक्या बहिणींना बाळासाहेबच आठवले! सर्वच केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेमुळे महिला आपल्याच पारडय़ात भरघोस मतांचे दान टाकतील, अशी अपेक्षा महायुतीने ठेवली. मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी बहुसंख्य महिलांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार आठवले आणि त्यांनी मिंधेंच्या ‘थापां’ना न भुलता परिवर्तनासाठी मतदानाचा हक्क बजावला. मुंबई शहर व उपनगरांतील सर्व मतदान पेंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा […]
सेम टू सेम नावामुळे ‘लोच्या झाला रे’, नावातील साधर्म्यामुळे चारकोपमधील दोघा मतदारांना बसतोय फटका
निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे चारकोपमध्ये राहणाऱया एकाच नावाच्या दोन मतदारांना फटका बसतोय. एकाने मतदान केले की, त्याच नावाच्या दुसऱया व्यक्तीला मतदानापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तक्रार करूनही निवडणूक आयोग दखल घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होतेय. चारकोप येथील सह्याद्री नगर आणि गणेश मंदिर येथे संजय शामराव कांबळे या एकाच नावाच्या दोन व्यक्ती राहतात. या दोन्ही […]