SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

Pandharpur Wari 2025 –माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट, संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर […]

सामना 3 Jul 2025 8:30 pm

दिवसाची कमाई 2 लाख, 10+ कंपन्यांना गंडा; मूनलाईटिंगनं अमेरिकेत खळबळ उडवणारा सोहम पारेख कोण?

अमेरिकेतील सोहम पारेख नावाचा एक अभियंता एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करत असल्याच्या आरोपामुळे चर्चेत आहे. सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप संस्थापकांनी त्याच्यावर हे आरोप केले आहेत.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 8:16 pm

शिवसेना-मनसेच्या मुंबईतील विजयी मेळाव्याला शरद पवार यांचा पाठिंबा

शिवसेना-‘मनसे’कडून राज्यातील हिंदी सक्ती विरोधात आंदोलन पुकारताच महायुती सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. आता 5 जुलै रोजी वरळीच्या ‘एनएससीआय’ डोममध्ये विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या विजयी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी […]

सामना 3 Jul 2025 8:14 pm

'वेडीवाकडी तोंडं, हीन विनोद' ६ वर्षांपूर्वीची शरद उपाध्येंची पोस्ट व्हायरल; निलेश साबळेला म्हणालेले 'भंगारवाला'

Sharad Upadhye Post : शरद उपाध्ये यांनी सहा वर्षांपूर्वी निलेश साबळे आणि 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 8:08 pm

एका SG ने...; शुभमनने महारेकॉर्ड मोडल्यावर गावस्कर यांनी एका वाक्यात सर्वांची मनं जिंकली

Shubman Gill: शुभमन गिलने सुनील गावस्कर यांचा इंग्लंडमधला महारेकॉर्ड मोडला अन् त्यावेळी योगायोगाने तेच कॉमेंट्री करत होते. गावस्कर यांनी गिलच्या महारेकॉर्डवर एका वाक्यात कोणती कमेंट केली, जाणून घ्या..

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 8:05 pm

IND Vs ENG 2nd Test –शुभमन गिलच्या विक्रमापुढे गावसकर, तेंडुलकर, कोहली सर्वच फेल! अशी कामगिरी करणारा आशिया खंडातला पहिलाच कर्णधार

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबेस्टन येथे सुरू आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने (259) द्विशतक झळकावत इतिहास रचला आहे. आशिया खंडातील कोणत्याच कर्णधाराला जो विक्रम करता आला नाही, तो विक्रम शुभमन गिलने आपल्या नावावर केला आहे. शुभमन गिल SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) […]

सामना 3 Jul 2025 8:04 pm

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांचे निलंबन

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर समांतर कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत संघटनेच्या घटनेचे उल्लंघन, आज्ञाभंग आणि बेकायदेशीर कृतीसाठी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ही कारवाई करत लांडगे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. पवार [...]

तरुण भारत 3 Jul 2025 7:59 pm

वॉश बेसिनमध्ये हात धुतले अन् काहीच वेळात मृत्यू, तरुणासोबत ढाब्यावर भयंकर घडलं

Chhattisgarh Crime News: एक तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ढाब्यावर गेला होता. मात्र, ही पार्टी त्याच्या आयुष्यातील अखेरची पार्टी ठरली. या ढाब्यावर त्याच्यासोबत जे झालं त्याचा कोणी विचारही केला नसेल.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 7:54 pm

Latur News –हडोळतीच्या शेतकरी दाम्पत्याला हैदराबादच्या संस्थेचा मदतीचा हात तर, अनेकांची नुसतीच आश्वासनं आणि भेटीचे फोटोसेशन

अहमदपूर तालुक्यातील मौजे हडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी आंबादास पवार यांनी खर्च परवडत नाही म्हणून स्वतः औताला जुंपून घेऊन पत्नी मुक्ताबाई पवार यांच्या सोबत शेती मशागत केली. दैनिक सामना ने हे वृत्त सर्व प्रथम प्रकाशित करताच राज्यात खळबळ उडाली. या शेतकरी दाम्पत्यास अनेकांनी मदतीची आश्वासने दिलेली आहेत. प्रत्यक्षात आजपर्यंत त्यांना एक लाख 40 हजार रुपयांची मदत […]

सामना 3 Jul 2025 7:32 pm

साडे चार हजार शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा, 40 सीएससी केंद्र चालकावर गुन्हा दाखल, मोठा घोटाळा उघड

Nanded News : नांदेडमध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सेतू सुविधा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पीकविमा भरला. सुमारे 4 हजार 453 शेतकऱ्यांचा विमा बोगस कागदपत्रांच्या आधारे काढण्यात आला. कृषी विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर 40 सुविधा केंद्र चालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 7:32 pm

शिंदेंच्या मंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण, दबावाचं राजकारण की वेगळं काही?

Maharashtra Politics : राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाला जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. या निमंत्रणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी वैयक्तिक मैत्री आणि माणुसकीच्या नात्याने निमंत्रण स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. तर राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 7:27 pm

राजा रघुवंशीची बहीण गोत्यात, पोलिसांकडून गुन्हा दाखल; नोटिसही आली, 'तो' दावा अंगाशी

मध्य प्रदेशातील व्यावसायिक राजा रघुवंशीची मेघालयात हत्या झाली. पत्नी सोनमने प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले. यानंतर राजाची बहीण सृष्टीने सोशल मीडियावर पोस्ट केल्या.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 7:25 pm

काय सांगता! निलेश साबळे पाठोपाठ या अभिनेत्याचीही 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट, कारण काय?

Actor Exit From Chala Hawa Yeu Dya : निलेश साबळे पाठोपाठ या अभिनेत्याचीसुद्धा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून एक्झिट झाली आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 7:16 pm

Nanded News –प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मोठा घोटाळा, 40 सेतू सुविधा केंद्रांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सन 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यातील चार हजार 453 शेतकर्‍यांच्या शासकीय जमिनीवर प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे अर्ज भरुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी चाळीस सीएसी सेतू सुविधा केंद्र चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना ही शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत […]

सामना 3 Jul 2025 7:15 pm

शुभमन गिलने डबल सेंच्युरीसह रचला इतिहास, ९३ वर्षांत जे कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं..

IND vs ENG: शुभमन गिलने या सामन्यात डबल सेंच्युरी झळकावली आणि त्यासह त्याने इतिहास रचला आहे. कारण या द्विशतकासह त्याने असा एक रेकॉर्ड रचला आहे, जो गेल्या ९३ वर्षांच्या इतिहासात कोणालाही करता आला नव्हता, काय आहे तो रेकॉर्ड जाणून घ्या...

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 7:00 pm

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे पुत्र आणि अजित डोवाल यांच्या संस्थेला चीनचे फंडिंग

हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र ध्रुव जयशंकर यांच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संबंधित विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन (VIF) या संस्थांना चीनकडून निधी मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर चीनमध्ये हिंदुस्थानचे राजदूत राहिला आहेत. ध्रुव जयशंकर यांच्याशी निगडित द ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडशेन अमेरिकेच्या पुढाकाराने सुरु […]

सामना 3 Jul 2025 6:44 pm

शेतकरी उत्पादक कंपन्यांना औद्योगिक सवलत देण्याची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील अनेक शेतकरी कंपन्या स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत डाळ मिल, फळ प्रक्रिया, साठवणूक गृह इत्यादी कृषी उद्योग प्रकल्प उभारले आहेत. अंतर्गत फक्त एमआयडीसी मधील औद्योगिक नाहरकत असलेल्या युनिटनाच वीजदर, जीएसटी परतावा, व्याज सवलत, कर सवलत अशा औद्योगिक प्रोत्साहनांचा लाभ दिला जातो. परंतु, शेतकरी उत्पादक कंपन्याचे उद्योग कृषी जमिनीवर किंवा ग्रामीण औद्योगिक क्षेत्रात उभारले जातात. परिणामी औद्योगिक नाहरकत नसल्यामुळे नाफेडच्या 'भारत डाळ'योजनांपासून ते वंचित राहतात. ही स्थिती अत्यंत अन्यायकारक असून, नव्याने उभारी घेणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यक्षमतेला मोठा अडथळा निर्माण करते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या संदर्भात सवलत देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी उत्पादक कंपन्यांना औद्योगिक सवलतीमध्ये कमी वीज दर, जीएसटी परतावा, व्याज सवलत आणि प्रोत्साहन लाभ देण्यात यावेत. यामुळे या कंपन्यांचे कार्य अधिक गतिमान होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांने आधुनिक डाळ मिल प्रकल्प प्रस्थापित केले आहेत. जे उच्च दर्जाची प्रक्रिया व उत्पादन करण्यास सक्षम आहेत. मात्र सध्या त्यांना नाफेड मार्फत होणाऱ्या 'भारत डाळ'पुरवठ्याची साखळी उपलब्ध नाही. परिणामी, हे प्रकल्प वर्षभर चालवणे कठीण ठरते. त्यामुळे नाफेडमार्फत राबविल्या जाणाऱ्या 'भारत डाळ'योजनेंतर्गत राज्यातील पात्र व कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्याला थेट वेंडरशिप देण्यात यावी, जेणेकरून डाळ मिल युनिट 12 महिने कार्यरत राहतील, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व स्थानिक रोजगारनिर्मिती व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 6:37 pm

माझ्याकडून अपमान कसा झाला? शरद उपाध्येंच्या आरोपावर निलेश साबळेचा प्रतिप्रश्न

गेली काही वर्षे सुरु असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा टीआरपी अचानक कमी झाल्यामुळे, सूत्रसंचालक नीलेश साबळे याला डच्चू देण्यात आलेला आहे. अशी बातमी माध्यमांमध्ये येताच, प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली. त्यातच या चर्चेवर राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी नीलेशला चांगलेच खडे बोल सुनावले होते. शरद उपाध्ये यांच्या पत्रावर आता निलेश साबळे याने मौन सोडले असून, […]

सामना 3 Jul 2025 6:31 pm

विराट किंवा सचिन तेंडुलकर नाही, जोस बटलरने सांगितलं जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज आणि एक शांत संयमी खेळाडू म्हणून क्रिकेट विश्वात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या जोस बटलरने जगातील सर्वात परफेक्ट खेळाडूचं नाव सांगितलं आहे. सध्याच्या घडीला विराट कोहलीला जगातील पहिला क्रमांकाचा खेळाडू म्हणून नावाजलं जात. परंतु जोस बटलर याला अपवाद ठरला आहे. त्याने विराट कोहली नाही तर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सला जगातील सर्वात परफेक्ट खेळडू […]

सामना 3 Jul 2025 6:17 pm

Hera pheri 3 च्या वादावर अखेर प्रियदर्शन यांनी सोडलं मौन, म्हणाले परेश रावल यांनी स्वत:हून...

Priyadarshan on Hera pheri 3: दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी 'हेरा फेरी ३' संदर्भात एक खास अपडेट दिलं आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्यातील सर्व मतभेद आता मिटले आहेत.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 6:14 pm

युवा सेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी आनंद पाटील यांची निवड

धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात युवा सेना व शिवसेना पक्षवाढीसाठी औश्यापासून बार्शीपर्यंत परिश्रम घेत कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणारे युवा नेते आनंद पाटील यांची युवा सेनेच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पाटील यांच्यावर धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक, राज्याचे सचिव किरण साळी, मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी आनंद पाटील यांची निवड करून शुभेच्छा दिल्या. युवा नेते आनंद पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच युवा सेनेच्या वाढीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, औसा, उमरगा, लोहारा, बार्शी आणि तुळजापूर तालुक्यात प्रभावी काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे युवा सेना व शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून स्वागत केले जात आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 6:12 pm

फोरम ऑफ सिटीझन्स (फुक) च्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)- प्रस्तावित जनसुरक्षा कायदा व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे बाबतीत फोरम ऑफ सिटीझन्स फुक सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले,यात म्हण्टले की,शहरी नक्षलवाद रोखण्याचा बहाना करून,आपले सरकार जो “ जनसुरक्षा कायदा “ आणू पाहत आहे, तो त्वरित रद्द करावा. कारण या कायद्यामुळे नागरिकांच्या व्यक्त होण्याच्या अधिकारावर आणि सरकारच्या धोरणाविरोधात कायदेशीर मार्गाने सनदशीर आंदोलन करण्यासाठी , भारतीय राज्य घटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारावर बंधने येणार आहेत. थोडक्यात, सरकारने चुकीचे व जनविरोधी निर्णय घेतले तरी, नागरिकांनी सरकारच्या विरोधात कायदेशीर मार्गाचा लढा उभाच करू नये, या उद्देशानेच हा जनसुरक्षा कायदा आणला जात आहे, अशी ठाम धारणा सुजाण महागाराष्ट्रीयन नागरिकांची आज झालेली आहे. म्हणजेच हा कायदा हा जनतेच्या कायदेशीर अधिकारावर गदा आणणारा आहे. हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर सरकारविरोधातील जनतेचे आंदोलन दडपून, सरकारची सुरक्षा करण्यासाठी आणला जात असल्याचे, जवळपास आता स्पष्टच झाले आहे. महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना तसेच पुरोगामी विचारधारेच्या चळवळी, दडपून टाकण्यासाठी सदर कायदा आणला जात आहे, याची खात्रीच आता तमाम महाराष्ट्रवाश्यािंना झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील नागरिक व फूक संघटनेच्या वतीने आम्ही सदर प्रस्तावीत जानसुरक्षा कायद्याचा निषेध व विरोध करत आहोत.आपले सरकारन उभारू पहात असलेला “ शक्तीपीठ महामार्ग “ त्वरित रद्द करण्यात यावा. कारण सदर मार्गमुळे महाराष्ट्राच्या नागरिकांचा फायदा तर नाहीच, उलट नुकसानच होणार आहे. आज उभारण्यात आलेले महामार्ग, रेल्वे मार्ग, पवनचक्क्या, धरणे ई साठी अगोदरच शेताकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर पूर्वीच आधीग्रहित करण्यात आलेल्या आहेत. प्रस्तावीत शक्तिपीठ मार्गात संपूर्ण सुपीक जमीन जाणार आहे. अगोदरच अल्पभूधारक झालेला गरीब शेतकरी, या मार्गमुळे भूमिहीन होण्याच्या मार्गवर आहे. तसेच मुळात या मार्गाची महाराष्ट्राला आवशकताच नाही. कारण नागपूर ते रत्नागिरी हा 900 किमी लांबीचा सिमेंटचा महामार्ग अगोदरच अस्तित्वात आहे. प्रस्तावीत असलेला शक्तिपीठ मार्ग, याच पूर्वीच्या मार्गला जवळपास समांतर जाणार आहे. त्यातून काय साध्य होणार आहे ? त्याउलट नांदेड - बीड - नगर असा किंवा बीड - बुलढाना - अकोला - अमरावती असा मार्ग बांधा, ज्याची आज गरज आहे. बरे देवीची चारही शक्तिपीठे आज राष्ट्रीय किंवा राज्य मार्गनी अगोदरच जोडलेली आहेत. मग शक्तिपीठ मार्गाचा हट्ट करून, जनतेच्या पैशाचा वायफट चुराडा आपण कशासाठी करत आहात ? त्यापेक्षा तोच पैसा अन्नधान्या प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी वापरा. शेतकऱ्यांच्या मालाची मागणी वाढेल. शेतमालाला चांगला भाव मिळेल. कोण्यातरी मोठ्या राजकीय गुत्तेदाराच्या फायद्यासाठी, सदर मार्ग आपले सरकार रेटत आहे काय ? अशी शंका आज सर्वसामान्य जनतेला येत आहे. आपलेच पाटीराखे असलेले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सदर मार्गला कायमची स्थगिती दिली होती, हे येथे विशेष. एका माजी मुख्यमंत्र्याने जनतेला दिलेल्या शब्दाला, आज फडणीसजी आपण काळे फासत आहात, हे तुम्हाला व तुमच्या पदाला अशोभनीय आहे. प्रस्तावीत शक्तीपीठ मार्गाचा धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या व फूक संघटनेच्या वतीने, आम्ही निषेध तसेच विरोध करत आहोत. अशा प्रकारचे लेखी निवेदन आरडिसी शोभा जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करुन देण्यात आले, यावेळी अध्यक्ष धर्मविर कदम, सचिव गणेश वाघमारे. उपाध्यक्ष उमाकांत माने.सदस्य शेख रौफ, राजेंद्र धावारे,आर के पंखे,बि डी चव्हाण,बि व्ही हाजगुडे, सिध्देश्वर बेलुरे सह इतर उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 6:03 pm

BIG BREAKING : बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार

Badlapur Firing : बदलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर येत आहे. किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर असणाऱ्या रस्त्यावर दोन गटात मोठा वाद झाला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की, दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. यानंतर हाणामारी करणाऱ्यांची थेट गोळीबारापर्यंत मजल गेली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 6:01 pm

महावीर कॉलेज चौक रस्ता ठरतोय धोकादायक

कोल्हापूर / अवधुत शिंदे : नागाळा पार्क ते महाविर कॉलेज परिसरातील रोड धोकादायक बनत चालला आहे. या ठिकाणी शाळा, कॉलेजस आहेत त्यामुळे या रोडवर दररोज विद्यार्थ्यांची वर्दळ असते. येथे न्यु पॅलेस पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. हा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्वाचा रस्ता आहे. या परिसरात महाविर कॉलेज, शाळा, न्यु पॅलेस, हॉस्पीटल अशी [...]

तरुण भारत 3 Jul 2025 5:57 pm

25 लाख प्रकरणी मॅनेजरला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

धाराशिव (प्रतिनिधी)- लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नळदुर्गच्या शाखा व्यवस्थापक ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जबाजारी झाल्यामुळेच 25 लाख रूपयांच्या लुटीचा बनाव केल्याचे समोर आले आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी बँक मॅनेजर कैलास घाटे याला गुरूवार दि. 3 जुलै रोजी तुळजापूर न्यायालयात उभे केले असता 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक खोखर यांनी सांगितले की, शाखा व्यवस्थापक कैलास घाटे याची नळदुर्गच्या सार्वजनिक रूग्णालयात भेट घेवून त्याच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळवण्यात आली. घटनेची अत्यंत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून गुन्हा त्यानेच केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्या अनुषंगाने त्यास पैशाची काय आवश्यकता होती. याबाबत गोपनीय माहिती काढली. घाटेवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. युवकास विचारपूस केली असता सुरूवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यानेच लुटीचा बनाव स्वतः रचल्याचे समोर आले. त्याने बुधवारी दुपारी सोमनाथ बाबुराव मनशेट्टी (रा. नळदुर्ग) यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीत लपवलेल्या 25 लाख रूपयांच्या नोटा पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे विनोद इज्जपवार, सचिन यादव, आनंद कांगणे, सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे आदी उपस्थित होते. सहन केले जाणार नाही यावेळी पत्रकारांनी जिल्ह्यात लाचखोरीबाबत पोलिस विभागाचे दोन आठवड्यात दोन प्रकरणे उघडकीस आले. याबद्दल पोलिस अधिक्षक यांना विचारले असता खोखर यांनी धाराशिव पोलिस दलात लाचलुचपत बाबत झालेले प्रकार सहन केले नाहीत. लाचखोरांची गंभीर दखल घेतली असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 5:57 pm

आचरा परिसराला मुसळधार पावसाचा फटका

पिरावाडी,वरचीवाडी भागात छप्पराचे पत्रे उडून नुकसान आचरा प्रतिनिधी बुधवार रात्री पासुन सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परिसराला चांगलेच झोडपले . रात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिरावाडी येथील गणपती शाळेचे,तसेच आचरा टेंबली येथील हॉटेलच्या शेडचे सिमेंट पत्रे उडून नुकसान झाले आहे. विद्यूत मंडळालाही याचा फटका बसल्याने आचरा भागातील बराचसा भाग अंधारात बुडाला होता.बुधवार रात्री पासून मुसळधार [...]

तरुण भारत 3 Jul 2025 5:56 pm

करिअर प्रवासात मातृत्वाचा थांबा? मुग्धा गोडबोले म्हणाली, 'सगळंच हातातून निसटलेलं...'

Mugdha Godbole : मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोलेनं मातृत्वाबद्दल आणि करिअरबद्दल भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:56 pm

सप्तपदी आधी EDची धाड, मंडप सोडून नवरदेव फरार; सत्य समजताच नवरीला जबर धक्का, 'तो' कोण होता?

जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यात ईडीने महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील वॉन्टेड आरोपी सौरभ आहुजाला पकडण्यासाठी छापा टाकला. सौरभ सप्तपदीआधीच मंडपातून पळाला, ज्यामुळे खळबळ उडाली. ईडीने लग्नातील तिघांना अटक केली असून, सौरभचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:52 pm

Kolhapur New : वाघ ओहळ पुलामुळे चिक्केवाडीकरांना दिलासा, ग्रामस्थांच्या संघर्षाला यश

चिक्केवाडी गावधी पिढ्यांपिढ्याची ही अवस्था आहे पाटगाव : पावसाळ्यात संपर्क तुटायचा, आजारी माणूस जीव मुठीत घेऊन चालत जायचा, पण आता दिलासा मिळतोय अशी प्रतिक्रिया मुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी गावकऱ्यांनी दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील भटवाडी-चिक्केवाडी रस्त्यावर एका महत्त्वाच्या ‘वाघ जोडळ’ या ओढ्यावर मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून पूल बांधून तयार झाला आहे. त्यामुळे चिक्केवाडी ग्रामस्थांच्या अनेक [...]

तरुण भारत 3 Jul 2025 5:50 pm

दिनेश पुन्हा शिवी देऊ नकोस... ; मित्राचा राग अनावर झाला अन् मावळमध्ये बंगल्यात घडली भयंकर घटना

पवन धरण परिसरात ठाकुरसाई येथे एका माळी कामगाराने आपल्या सहकाऱ्याचा खून केला. दिनेश गरवड नावाच्या व्यक्तीला प्रणव डेकाने दारूच्या नशेत आईवरून शिवीगाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात प्रणवने लोखंडी कुदळ डोक्यात घालून दिनेशची हत्या केली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रणवला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:50 pm

'तुझं कुठे लफडं आहे का?'; भर वर्गात शिक्षकाचा विद्यार्थिनीला संतापजनक सवाल, विद्यार्थ्यांना दिलं विकृत ज्ञान

Pune Crime : पुण्यात शिक्षण क्षेत्रात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चंदननगरमधील एका शाळेत 'मंगेश भाऊ' नावाच्या शिक्षकाने आठवीतील विद्यार्थ्यांना प्रेमसंबंधांविषयी विकृत ज्ञान दिलं. हा शिक्षण तेवढ्यावरच थांबला नाही. विद्यार्थिनीला लफडं आहे का? असा प्रश्न त्याने आठवीतील विद्यार्थीनीला विचारला. त्यामुळे पीडिता भयभीत झाली. पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:46 pm

१० दिवसांपूर्वी लग्न अन् काळाचा घाला; कार जळून खाक, अपघातात दिग्गज खेळाडूचा दुर्दैवी अंत

Star Player Car Accident: फक्त १० दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर त्याला आपला जीव गमवावा लागला. कार जळून खाक झाली आणि त्याला वाचवण्याची संधीही कोणाला मिळाली नाही.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:33 pm

शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी असेल तर जनतेवर दडपशाही का ?

शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा आरोप सावंतवाडी । प्रतिनिधी शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या विकासासाठी आहे, पर्यटन विकासासाठी आहे मग अशी दडपशाही का करण्यात येत आहे. विरोध मोडून काढून, वेळ आली तर फटके मारून हा महामार्ग रेटून करण्याचा अट्टाहास का आहे? यामध्ये काहीतरी काळेबेरे नक्की आहे यात शंका नाही.असा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी [...]

तरुण भारत 3 Jul 2025 5:32 pm

नवोदय विद्यालयात नववी वर्गातील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

तुळजापूर (प्रतिनिधी)- पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दि 3 रोजी नववी वर्गातील नवागत विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय, अलवर (राजस्थान) येथील शैया क्षणिक सत्र 2025-26 या वर्षासाठी आलेले आहेत. त्यांचे गुलाब पुष्प देऊन विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे व उप प्राचार्य डी. व्ही. बढे यांच्या हस्ते जोरदार स्वागत करण्यात आले. हे विद्यार्थी वर्षभर येथे राहून महाराष्ट्रातील संस्कृती ,खानपान पोशाख ,अन्नधान्य, सण, उत्सव, नवरात्र उत्सव, मराठी भाषा यांचा अभ्यास करून या सर्व गोष्टींचा राजस्थानमध्ये प्रचार प्रसार करणार आहेत. याचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधने हा आहे. या अभ्यासासाठी 14 विद्यार्थी व 8 विद्यार्थिनी आलेले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन महाराष्ट्र संस्कृतीचा अभ्यास करून महाराष्ट्रीयन संस्कृती राजस्थानमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू अशा प्रकारचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. जी. जाधव यांनी केले.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 5:29 pm

आषाढी वारीसाठी पायी जाणाऱ्या सिंदफळ येथील महिलेचा वाहनाचा धडकेत मुत्यु

तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ,येथील आषाढी वारी करता पायी पंढरपूरकडे जात असलेल्या उषा अशोक व्यवहारे यांचा गुरुवारी दि.3 जुलै रोजी पहाटे पंढरपूर जवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 5:29 pm

मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई

तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थान कडून मागील महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान कडून प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या पुजाऱ्यांपैकी 6 जणांनी नोटिशीची दखल घेऊन आपला माफीनामा सादर केला होता. त्यांच्यावर 1 महिन्याची प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पुजारी लखन रोहिदास भोसले, अक्षय किशोर कदम-भैय्ये, विशाल हनुमंत चव्हाण, धीरज राजू चोपदार, वैभव खुशालराव भोसले, राहुल हनुमंत पवार हे आहेत. याशिवाय 2 जणांनी नोटिशीला कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांच्यावर 3 महिने प्रवेशबंदी ची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुजारी विशाल दादासाहेब मगर, विशाल बाळासाहेब गंगणे हे आहेत. संबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराचे शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही कारवाई देऊळ कवायत कायदा 1909 कलम 24 व 25 नुसार करण्यात आलेली आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 5:28 pm

तुळजापूर खुर्द परिसरात काँक्रिटीकरण व नाली काम चौकशी करा

तुळजापूर (प्रतिनिधी)- बेंबळी रस्ता ते नावंदर प्लॉटिंग रस्ता काँक्रिटीकरण व नाली काम अंदाजपत्रका नुसार झाले नसल्याने याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली. तुळजापूर खुर्द येथील शिंदे प्लॉटिंग मधील बेंबळी रस्ता ते नावंदर प्लॉटिंग हा बारा मीटर रस्ता सिमेंट काँक्रीट व दोन्ही बाजूने नालीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनावश्यक बिम टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अंदाजपत्रकामध्ये नसलेल्या बीम मुळे बारा मीटरचा रस्ता अरूंद होवून दहा मीटरचा रस्ता राहिला आहे. या शिवाय या बीम मुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी अंदाजपत्रकात नसलेल्या बीम ची चौकशी करून दोषी गुत्तेदार व अभियंत्यावर कारवाई करावी व गुत्तेदार तसेच अभियंत्या कडून खर्चाची वसुली करावी. कारवाईस विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इषारा डाँ अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांनी निवेदन देवुन दिला.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 5:28 pm

दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंचा दावा, आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, रेकॉर्ड करुन...

Mumbai News : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात लैंगिक शोषण किंवा शारीरिक हल्ल्याचा कोणताही पुरावा नाही. हे प्रकरण आत्महत्या असल्याचे दिसते. मात्र, नितेश राणे यांनी या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:18 pm

SL Vs BAN –बांगलादेशच्या फलंदाजीवेळी क्रिकेटच्या मैदानात सापाची एन्ट्री! काही मिनिटांसाठी खेळ थांबवला

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (2 जुलै 2025) राजधानी कोलंबोमध्ये खेळला गेला. वानिंदु हसरंगाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशींना अचूक टिपलं आणि श्रीलंकेने मालिकेची विजयी सुरुवात केली. मात्र, हा सामना कोणत्या खेळाडूमुळे नाही तर चक्क एका सापामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. चालू सामन्यात सापाने मैदानात एन्ट्री […]

सामना 3 Jul 2025 5:12 pm

कास्टिंग काउचच्या प्रश्नावर 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचं उत्तर; म्हणाला, 'हो मी...'

Tharala Tar Mag Fame Actor : 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने चाहत्याच्या कास्टिंग काउचच्या प्रश्नावर चोख उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:12 pm

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची अजित पवारांना शिवीगाळ, गिरगाव चौपाटीवर काय घडलं?

Laxman Hake Slams Ajit Pawar : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात टीका करताना जीभ घसरली. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा प्रयोग केला. त्यांनी केलेली शिवीगाळ ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. लक्ष्मण हाके यांनी आज मुंबईत गिरगाव चौपाटीत समुद्रात जावून जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी हा सगळा प्रकार घडला.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 5:07 pm

स्टॅमिना वाढविण्यासाठी महागडी प्रोटीन पावडर नको, दररोज फक्त 2 रुपये खर्च करा

हिंदुस्थानात सर्वात जास्त सेवन केले जाणारे कोणतेही फळ असेल तर ते केळी आहे. ऋतू कोणताही असो, तुम्हाला केळी सर्वत्र आणि नेहमी आढळतील. काही लोकांसाठी केळी नाश्ता, काही लोकांसाठी दुपारचे जेवण, काही केळी वजन वाढवण्यासाठी तर काही केळी पोटाची समस्या दूर करण्यासाठी खाल्ली जातात. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि डॉक्टरही अनेक आजारांमध्ये केळी खाण्याचा सल्ला […]

सामना 3 Jul 2025 5:04 pm

राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे संविधानाचा अवमान, काँग्रेसची भाजपवर टीका

सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत एका चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोस्ट लावलेला दिसत आहे. तसेच या फोटोआच्या पायत्याशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं पोस्टर लावलेलं दिसत आहे. हाच फोटो आता X वर पोस्ट करत काँग्रेसने भाजपवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस सेवादलाचे आपल्या […]

सामना 3 Jul 2025 5:02 pm

भारतात अडकलेल्या ब्रिटनच्या लढाऊ विमानाचे तुकडे केले जाणार; ब्रिटिशांना नेमकी कसली भीती?

केरळमध्ये ब्रिटिश नौदलाचे एफ-35 लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे उतरले. भारतीय हवाई दलाने विमानाला सुरक्षित उतरण्यास मदत केली. विमानाच्या तंत्रज्ञानाबाबत ब्रिटिश खासदारांनी चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 4:57 pm

“कला जपणारा… पण स्वतःला विसरलेला योद्धा !”

कुडाळ – पिंगुळी येथील मयुर पिंगुळकर यांचा खास लेख दशावतार हा नुसती एक कला नसुन ती आपल्या संस्कृतीची जिवंत ओळख आहे. पण या रंगमंचावर जी माणसं आपल्याला रडवतात, हसवतात, विचार करायला लावतात… त्या कलाकारांची जीवनकथा फार वेगळी आणि वेदनादायक असते.प्रत्येक दशावतार कलाकार – हा नुसता एक कलाकार नाही, तो संस्कृतीचा रक्षक आहे. गावोगावी फिरत, रात्री [...]

तरुण भारत 3 Jul 2025 4:54 pm

'मला 100-150 फोन आले, ना मला डच्चू दिलाय, ना काढलंय'... शरद उपाध्येंच्या पोस्टवर निलेश साबळेचं सडेतोड उत्तर

Nilesh sable clarification on sharad upadhye post:राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मिडिया पोस्ट शेअर करत अभिनेता निलेश साबळे याच्यावर टीका केली होती. यावर आता निलेश साबळे यानं भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 4:50 pm

खेळता-खेळता प्लास्टिकचा बॉल गिळला, दीड वर्षांच्या चिमुकलीचा तडफडून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश पाहावेना

gujarat child dead: राजकोटमध्ये एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. खेळताना तिने प्लास्टिकचा चेंडू गिळला. त्यामुळे श्वसनाच्या त्रासामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिला वाचवता आले नाही.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 4:48 pm

Photo –विठ्ठल भक्तीत रमली रिंकु राजगुरू, झिम्मा फुगडी खेळत लुटला वारीचा आनंद

आषाढवारी म्हटल्यावर पांडुरंगाच्या भक्तीचे वेध लागतात. याच वेधामुळे पावलांना पांडुरंग भेटीची आस लागते. पांडुरंगाच्या भेट हेच आषाढवारीचं खरं गमक आहे. अभिनेत्री रिंकु राजगुरु हिनेही आषाढवारीत सहभागी होईन, पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाली. झिम्मा फुगडी आणि डोईवर तुळशी वृंदावन घेत रिंकुनेही आषाढवारीचा अनुभव घेतला. त्यातीलच काही क्षणचित्रे

सामना 3 Jul 2025 4:43 pm

फोन बंद, चौकशीवेळी भयंकर समोर; पाण्याच्या टाकीत... एकाच कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवलं, काय घडलं?

Crime News :बाडमेरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शिवलाल, पती - पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून जीवन संपवलं. या घटनेने संपूर्ण परिसरात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 4:42 pm

धाराशिव येथे मराठी भाषा विद्यापीठ व संशोधन केंद्राची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी)-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था धाराशिव यांच्या वतीने युवराज नळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचेकडे मराठी भाषा विद्यापीठ व संशोधन केंद्र धाराशिव येथे होणे बाबत मागणी केली होती. धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या प्रवर्गात मोडत असल्याने व मराठवाडा मुक्ती संग्राम चे देखील प्रमुख केंद्र राहिला असल्याने मराठी भाषा विद्यापीठ व संशोधन केंद्र धाराशिव येथे होणे आवश्यक असल्याचे देखील प्रतिपादन केले होते. त्या अनुषंगाने आ राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठी भाषा मंत्री ना उदयजी सामंत यांच्याकडे लेखी पत्र देऊन सदर विषयावर बैठक लावणे बाबत निवेदन दिलेले आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 4:42 pm

राम देवकते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील सहशिक्षक राम देवकते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा विद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती गौरव सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जे. के.बेदरे, ए. एन.रणदिवे, एम. एन.शितोळे, एस. एस.बळवंतराव, एम. एल.कांबळे, एस. टी.कोळी, बी. डी.कांबळे, एल. टी.चव्हाण, एम. बी.काणेकर, तानाजी मदने, मयूर लोंढे, शिवम देवकते, एस. बी.पाटील, पल्लवी मते, व्ही. एम.भंडारे आदी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 4:34 pm

Skin Care –दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पीठ लावणे योग्य आहे का?

त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचे पीठ लावण्याचा नवीन ट्रेंड सुरु झालेला आहे. यामुळे त्वचेला चमक येते आणि तेलकट त्वचेवर एक उत्तम इलाजही मानला जातो. आजकाल सोशल मीडियावर अशा प्रकारे ब्युटी टिप्स पसरल्या आहेत की, जणू प्रत्येक घरात एक डॉक्टर बसला आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक – सर्वत्र DIY ब्युटी हॅक्सचा पूर आहे. मजेदार गोष्ट अशी आहे की, […]

सामना 3 Jul 2025 4:20 pm

आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात

आचरा प्रतिनिधी नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच या अपघातात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा – बांबुळी येथे उपचार चालू होते. गोवा बांबुळी येथील उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख [...]

तरुण भारत 3 Jul 2025 4:15 pm

प्रेमात झाली फसवणूक, नवरा गेला सोडून; सहन केलं मिसकॅरेजचं दुःख, ३९ व्या वर्षी जगतेय सिंगल आयुष्य

Tv Actress : या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीनं वैयक्तिक आयुष्यात खूप दुःख सहन केलं आहे. तिचा घटस्फोट झाला असून आता वयाच्या ३९व्या वर्षी सिंगल आयुष्य जगतेय.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 4:09 pm

अनाया बांगरवर रडण्याची वेळ का आली? ऑपरेशनमध्ये असं नेमकं काय घडलं पाहा व्हिडिओ

Anaya Bangar: माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी मागील काळापासून चर्चेचा विषट बनली आहे. अनया बांगर ही त्यांची मुलगी आहे. अनया ही एक ट्रान्सजेंडर आहे. म्हणजेच, ती एका मुलापासून मुलगी झाली आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 4:08 pm

वेंगुर्ले भटवाडी येथे एसटी व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक

वेंगुर्ले (वार्ताहर) वेंगुर्ले आगाराच्या सकाळी 8 वाजता सुटलेल्या वेंगुर्ले कुडाळ कणकवली मार्गे स्वारगेट वल्लभ एम.एच.-13- सीयु -7845 ही पुण्यात जाणारी एसटी बस व वेंगुर्लेत येणारा आयशर टेम्पो एम.एच.-34- बी. झेड.- 6952 यांची सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आडीपूल-भटवाडी स्टॉप नजीकच्या वळणावर समोरासमोर धडक बसली. या अपघातात एसटी बसमधील कांही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर दोन प्रवाशांना [...]

तरुण भारत 3 Jul 2025 4:05 pm

राजाला संपवल्यानंतर सोनमने केले प्रियकरासोबत लग्न?, दोन मंगळसूत्रांमुळे गुंता वाढला

Raja Raghuvanshi Case : इंदूरमध्ये राजा रघुवंशीच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. पत्नी सोनमने प्रियकराच्या मदतीने हनीमूनला हत्या केली, असा आरोप आहे. भावाने सोनमवर गंभीर आरोप केले असून, तिने इंदूरमध्ये प्रियकराशी लग्न केल्याचा दावा केला आहे. सामानात दोन मंगळसूत्र सापडल्याने संशय वाढला आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:59 pm

तर 3 वर्षात पैसे डबल! राम कपूरनं सांगितला गुंतवणूकीचा फॉर्म्युला, म्हणाला बँकेत ठेवले तर...

Ram Kapoor Investment Tip Double money every 3 years: अभिनेता राम कपूर सध्या त्यांच्या 'मिस्त्री' या नवीन वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमुळं तो सध्या चर्चेत आलाय.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:53 pm

तीन लाखांची लाच मागणारा हवालदार मोबीन शेख निलंबित

धाराशिव (प्रतिनिधी)- गावसूद येथील शेतजमिनीच्या वादातून दाखल गुन्ह्यातून एकाचे नाव बाहेर काढण्यासाठी तीन लाख रूपयांची लाच मागणाऱ्या हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीही सुनावली आहे. धाराशिव तालुक्यातील गावसूद गावात शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भांडण झाले होते. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये दोन भाऊ व वडील मिळून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एकाने भावाचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी विनंती कली होती. या प्रकरणी हवालदार मोबीन शेख याने नाव वगळण्यासाठी चार लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीनुसार त्याने तीन लाख रूपये स्विकारण्याचे पंचासमक्ष कबुल केले होते. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर मंगळवारी रात्री कारवाई केली.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:52 pm

चिंचपूर येथील मद्यपी शिक्षक अखेर निलंबित

परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील मद्यंपी शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुर्यभान हाके यांनी दिली. परंडा तालुक्यातजील चिंचपूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी दि. 28 जून रोजी शिक्षक पी. एन. मोहोळकर मद्यपान करून आल्याचे उघड झाले होते. या प्रकारानंतर शालेय समिती, पालक व ग्रामस्थ संतप्त झाल्याने मुख्याध्यापक गवारे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी रिपोर्ट दाखल कला होता. या प्रकरणी केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांनी शाळेत दारू पिऊन आलेल्या शिक्षकाचा अहवालही दाखल केला होता. प्रभारी गट शिक्षणाधिकारी हाके यांनी शिक्षक मोहोळकर यांचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाखल केला. मोहोळकर यांना निलंबित करून कळंब येथील गटशिक्षण कार्यालयात हजर रहावे व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी दि. 2 जुलै रोजी शिक्षणाधिकारी मापारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे पथक परंडा तालुक्यातील दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देवून तपासणी केली.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:52 pm

बागेश्वर धाममध्ये मंडप कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, 4 जण जखमी

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध बागेश्वर धाम गढा संकुलात गुरुवारी सकाळी मंडप कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये मंडप कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला. तर 3 ते 4 जण जखमी झाले. आरतीनंतर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भाविक पाऊस पडत असताना, मंडपाखाली आडोश्यासाठी उभे राहिले होते. मृताचे नाव श्यामलाल कौशल असे असून, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील ते […]

सामना 3 Jul 2025 3:50 pm

Investment Planning: गुंतवणूकीचे नियोजन करताना, लक्षात घ्या काही विशेष नियम..

या बाजूला काढलेल्या खर्चालाच बचत किंवा शिल्लक म्हणतात By : सागर कांबळे कोल्हापूर : दैनंदिन जीवनामध्ये आपल्या नियमित कमाईमधून आवश्यक गरजा पूर्ण करणारा खर्च बाजूला काढला जातो. या बाजूला काढलेल्या खर्चालाच बचत किंवा शिल्लक म्हणतात. याला इंग्रजीमध्ये सेव्हींग असेही म्हटले जाते. हीच बचत भविष्यातील खर्चासाठी उपयोगी येते. यामध्ये मुलांचे उच्च शिक्षणासाठी, लग्नसमारंभ, औषधोपचार, आदीसाठी उपयोगी [...]

तरुण भारत 3 Jul 2025 3:48 pm

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक अमीन शेख यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

काटी (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक अमीन गफूर शेख हे नियत वयोमानानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत येथील शाळेच्या प्रांगणात त्यांचा यथोचित सन्मान करुन सत्काराने निरोप देण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनींना वह्यांचे वाटप केले. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख यांनी सेवाकार्य काळात केलेल्या कामाचे कौतुक करून सेवानिवृत्त शिक्षक हे समाजाचे खरे मार्गदर्शक असतात, दीपस्तंभ समान त्यांची भूमिका असते. सेवानिवृत्ती म्हणजे सेवेला पूर्णविराम नव्हे तर ती सेवापूर्ती समजून पुढील काळात आपल्या अनुभवांची शिदोरी समाजसेवेसाठी देणे आणि अध्यापनाचा आपल्या जीवनातील भाग समजून आपली जबाबदारी सातत्याने पार पाडून आपल्या ज्ञानाचा दीप सातत्याने ठेवत ठेवावा,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, सहशिक्षक तानाजी शेळके, सहशिक्षिका विद्युल्लता आलाट यांनी शेख यांच्या कार्याचे कौतुक करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निरोप घेताना शेख यांनी ग्रामपंचायत, स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी,पालक,ग्रामपंचायत पदाधिकारी,सहकारी शिक्षकवृंद यांनी सेवा कार्यकाळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला होता. यावेळी गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव,केंद्रप्रमुख हणमंत कदम,शिक्षक संघटनेचे नेते लालासाहेब मगर, कल्याण बेताळे,दयानंद जवळगावकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास सोलंकर,उपाध्यक्षा पल्लवी जामगावकर, सर्व सदस्य व केंद्रातील इतर घटक शाळेचे मुख्याध्यापक,नजीब काझी,प्रभारी मुख्याध्यापक तानाजी शेळके,शाळेतील सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:40 pm

जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार

धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक खाटांची रुग्णालये आणि विशिष्ट 10 खाटांची एकल विशेषता रुग्णालये यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. पात्र एकल विशेषता रुग्णालयांमध्ये खालील उपचार क्षेत्रांचा समावेश आहे.यामध्ये नाक,कान,घसा, नेत्रविकार, अस्थिव्यंग व पोलिट्रॉमा,भाजलेले रुग्ण,बालरोग शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार युनिट्स,नवजात व बालरोग वैद्यकीय युनिट्स, हिमोडायलिसिस (नेफ्रॉलॉजी) युनिट्सचा समावेश आहे. एकत्रित आयुष्यमान भारत : केंद्र शासनाची ही योजना आहे,ज्यामध्ये दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार आणि 1356 आजार-शस्त्रक्रियांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना : महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे.यामध्येही 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येते. पात्र रुग्णालयांनी https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रुग्णालय, धाराशिव (दूरध्वनी: 8275095906) किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने सर्व पात्र रुग्णालयांना या योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असून,यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:40 pm

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिराचे नूतनीकरणाचे काम करतांना मंदिराचे पावित्र्य ठेवा

तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी मंदिर येथे श्री क्षेत्र तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत मंदिराचे नूतनीकरणाचे काम करतांना मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे. असे काम करा यासह अन्य विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघ, समविचारी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि श्री तुळजाभवानी देवी मंदिर समितीकडे देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्वीकारले. या वेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज, सोमवार गिरी मठाचे महंत इच्छागिरी महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, अमरराजे कदम, किशोर गंगणे, अनंत कोंडो, राजन बुणगे, शिवाजी बोधले, संजय सोनवणे, विनोद रसाळ, सर्वोत्तम जेवळीकर,अमोल कुतवळ, शाम पवार, बाळासाहेब शामराज, परीक्षीत साळुंखे, संजय मैंदंर्गे, श्रीराम अपसिंगकर, सुदर्शन वाघमारे, नागेश शास्त्री अंबुलगे, तानाजी कदम, महेश चोपदार आदी उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्यावर वर्ष 1993 मध्ये बांधकाम करून त्यावर गोपूर आणि कळस याचे बांधकाम केले. हे बांधकाम करण्याच्या अगोदरच सध्याचे अस्तित्वात असलेले प्राचीन बांधकामाला ते वजन झेपणार का, याचा अभ्यास केलाच नाही असे दिसून येते असे म्हटले आहे. अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे बांधकाम केले तेव्हा जी पद्धत वापरली होती आणि जो रचनेच्या संदर्भातील अभ्यास केलेला होता तसा अभ्यास श्री तुळजाभवानी मंदिराची रचना करा. मंदिरे ही भक्तांच्या कह्यात असली पाहिजेत आणि त्याचे व्यवस्थापन हे भक्तांच्याच कह्यात हवे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण रहित करावे. अशी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:39 pm

कामठा ग्रामपंचायत समोर पाण्याचे तळे

तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कामठा गावात अल्पशा पावसामुळे ग्रामपंचायत समोर पाण्याचे तळे साचल्यामुळे आणी चिखल झाल्यामुळे ग्रामस्थांना ये -जा करताना खूप त्रास होत आहे. तुळजापूर तालुक्यातील कामठा गावची लोकसंख्या दीड हजार आहे. सध्या या गावातील ग्रामपंचायत समोर पावसाचे पाणी साचल्याने ग्रामस्थांना याचा ञास होत आहे. ग्रामपंचायत समोरील रस्ता व्यवस्थित नसेल तर गावातील रस्ताची काय अवस्था असेल असा प्रश्न निर्माण होतो आहे. पावसाचे किंवा साचलेले पाणी वाहून नेण्यासाठी योग्य नाली गटार बांधल्या का, साचणा-या पाणी निचरा करण्याची व्यवस्थेसाठी योग्य ठिकाणी वळवण्यासाठी नाल्या केल्या का, तसेच शासनाकडुन ग्रामपंचायतीला आलेला निधी योग्य ठिकाणी योग्य कामासाठी मंजुर झाला का कि कागदोपञी केला याची चौकशी नुतन गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:38 pm

पत्नी तुमच्यासाठी ठरणार धनलक्ष्मी; जोडप्याने गुंतवणूक करणं फायद्याचे ठरणार; खूप कमी लोकांना माहिती

PPF Scheme: पीपीएफच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर फक्त एकच PPF खाते उघडू शकते. PPF मध्ये संयुक्त खाते उघडण्याचा पर्याय नाही. परंतु जर पत्नी आणि पती दोघेही कमावतात, तर दोघेही त्यांच्या नावावर स्वतंत्र खाते उघडू शकतात आणि फक्त 25 वर्षांत 2 कोटींचे मालक बनू शकतात.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:37 pm

विद्यानंद पाटील यांचा सेवापूर्ती कार्यक्रम

धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्याध्यापक विदयानंद गोपाळराव पाटील यांचा सेवापुर्ती कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटंग्री येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षणविस्तार अधिकारी,बापू शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हरिभाऊ बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,धाराशिव, शाळेतील शिक्षकांच्या वतीने पाटील यांना सपत्नीक भर आहेर,शाल,हार,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाटील यांच्या बदल आपूलकी, प्रेम,त्यांनी सर्वांना दिलेली वागणुक,त्यांचा नेहमी प्रसन्न चेहरा,हसत खेळत,एकमेकांना कठीण प्रसंगातून काढलेले मार्ग यांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. विदयानंद पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की, हरिभाऊचें नेहमी मार्गदर्शन व सहकार्य असल्यामुळे मला कोणतीच समस्या कठीण वाटली नाही. संपूर्ण गांव एका बाजूला आणि ते माझ्या बाजूला असल्याने मला हत्तीचे बळ मिळत गेले. बापू शिन्दे यांनी पाटील यांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुढे सहकुटुंब प्रवास करावा,आनंदीआयुष्य जगावे, असा सल्ला दिला. यावेळी केंद्रप्रमुख श्रीमती वाघमारे, प्रदिप तांबे,पाडूरंग तनमोर,अरुण खराडे,विक्रम लोमटे, राहूल भंडारे,घाटंग्री आश्रम शाळेचे मुख्याध्यापक माने,आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

लोकराज्य जिवंत 3 Jul 2025 3:37 pm

कष्टाने संसार उभारला, पण आयुष्याच्या संध्याकाळी छत्रीने केला घात; कोल्हापुरात दुर्दैवी घटनेत महिलेनं गमावला जीव

Kolhapur News: कोल्हापुरात दुर्दैवी घटना घडली आहे. पावसात दुचाकीवरून जाताना छत्री उलटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मीना दिलीपराव मगदूम असे त्यांचे नाव आहे. त्या महानगरपालिकेत कार्यरत होत्या. सोमवारी त्या मुलासोबत जात असताना हा अपघात झाला. वाऱ्यामुळे छत्री उलटली आणि त्या खाली पडल्या. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि मुलगी आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:34 pm

ड्रग्सच्या पैशांवरून वाद, रागाच्या भरात अभिनेत्रीचा केलेला खून अन्...; नंतर अशा अवस्थेत आढळलेली बॉडी

Bollywood Actress Murder Mystery : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा खून अंत्यंत निर्घृणपणे करण्यात आलेला. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:24 pm

Video –कोल्हापुरात रस्त्याअभावी वयोवृद्ध रुग्ण, गरोदर मातांची हेळसांड ; पाठीवर आणि बैलगाडीतून रुग्णांना नेण्याची वेळ

कोल्हापुरातील गडहिंग्लज शहराला लागूनच असलेल्या बड्याचीवाडी या गावातील शेतवडीत राहणाऱ्या 15 कुटुंबांना रस्त्याअभावी पावसाळ्यात मोठे हाल सोसावे लागत आहे. विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखल तुडवत तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत मुख्य रस्ता गाठावा लागतो. वयोवृद्ध रुग्णांची तर मोठी हेळसांड होते. गडहिंग्लज शहराला जोडलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत एखाद्या बैलगाडीतून ओढत किंवा पाठीवरून वाहून रुग्णाला आणावे लागते. या वसाहतीतील वृद्धे महिले […]

सामना 3 Jul 2025 3:12 pm

पाच महिन्यांपूर्वी पित्याने जीवन संपवलं अन् कोवळ्या खांद्यांवर कुटुंबाची जबाबदारी पडली, तणावाचा अतिरेक झाला आणि...

Farmer Son Ends Life : मयूर याचे वडील रामलाल राठोड यांनी कर्जाच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मयूरच्या वडिलांवर तीन लाख रुपये खाजगी बँकेचे कर्ज होतं. वडिलांच्या आत्महत्येनंतर मयुर देखील तणावात होता. वडिलांचं निधन झाल्यानंतर कुटुंब चालवण्याची जबाबदारी मयूरवर होती.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:11 pm

Gokul Election 2025: केरळ दौऱ्यावर झाडी पहायची का?, गोकुळचे संचालक गोवा दौऱ्यावर

त्यांचा दिल्ली दौराही सोबत असलेल्या राजपुत्रामुळे गाजला होता By : संतोष पाटील कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळ संचालकांनी आणखी काय काय करायचे? मागील सहा महिन्यात संचालकांनी तीन वेळा देश आणि विदेशात अभ्यास दौरा केला. यातील काही दौरे हे खिशातील पैशातूनही केले. असाच त्यांचा दिल्ली दौराही सोबत असलेल्या राजपुत्रामुळे गाजला होता. यावेळी केरळ दौऱ्यावर जायचे [...]

तरुण भारत 3 Jul 2025 3:10 pm

कराड-चिपळूण मार्गावरून आता एसटी धावणार

नवारस्ता : कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव नजीकच्या नवीन पुलाच्या कामाच्या ठिकाणचा पर्यायी वळण रस्ता अतिवृष्टीने वाहून गेल्याने कोकणाला जोडणारा महत्वपूर्ण असा हा महामार्ग काही दिवस बंद होता. या महामार्गावरून कोकणात जाणारी व कोकणातून कराडच्या दिशेने येणारी एसटीची वाहतूक देखील पूर्णपणे बंद होती. मात्र अखेर महामार्गावरील आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने तब्बल [...]

तरुण भारत 3 Jul 2025 3:07 pm

Diogo Jota –लिव्हरपूलच्या स्टार फुटबॉलपटूचा भीषण कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

फुटबॉल जगतातील एक दु:खद बातमी आली आहे. पोर्तुलागचा स्टार खेळाडू आणि लिव्हरपूल या आघाडीच्या क्लबचे प्रतिनिधित्व करणारा फुटबॉलपटू डिओगो जोटा याचा भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. डिओगो जोटा याचे 10 दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. स्पेनमध्ये कारचा अपघात झाला त्यावेळी त्याचा धाडका भाऊ आंद्रे सिल्वा हा देखील त्याच्यासोबत […]

सामना 3 Jul 2025 3:07 pm

चार महिन्याला मी फिलर्स करते, तरुण दिसायला सर्जरीही करेन; 77 वर्षीय अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Mumtaz On Cosmetic treatments and Botox: सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांच्या फिटनेसची, दिसण्याची नेहमीच चर्चा होत असते. पण यासाठी ते बरंच काही करत असतात. योगा, जीम सोबतच वेगवेगळ्या सर्जरी, औषधांचा वापर यासाठी केला जातो.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 3:03 pm

Pune Crime –इन्स्टाग्रामवरून ओळख, मग अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोघांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून महिलांशी जवळीक साधत गैरफायदा घेत लैंगिक शोषण, मानसिक छळ, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे दोन गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आले आहेत. इन्स्टाग्रामवरून सुरू झालेल्या ‘मैत्री’चं रूपांतर हनी ट्रॅपमध्ये झाल्याचं दिसून आलं आहे. या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत भारती विद्यापीठ आणि खराडी पोलीस ठाण्यांत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात, […]

सामना 3 Jul 2025 3:02 pm

रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकारग्रहण समारंभ उद्या

रोटेरियन विनायक (संदीप) नाईक यांची २०२५-२६ या सालाकरीता अध्यक्षपदी निवड बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या २०२५–२०२६ रोटरी वर्षासाठीच्या संचालक मंडळाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन उद्या शुक्रवार, ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता फाउंड्री क्लस्टर हॉलमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवीन नेतृत्वाच्या कार्यकाळाची औपचारिक सुरुवात होणार आहे. अध्यक्षपदी रोटेरियन विनायक (संदीप) नाईक, सचिवपदी डॉ. संतोष [...]

तरुण भारत 3 Jul 2025 2:54 pm

प्रिय नरेंद्र मोदीजी, कृपया वेळेवर दंड भरा! थकवलेल्या दंडाचे स्क्रीनशॉट शेअर; पोस्ट चर्चेत

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या DL 2 CAX 2964 या क्रमांकाच्या गाडीवर तीन वाहतूक दंड थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन सिंह नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर ही बाब उघडकीस आणली असून, त्यांनी पंतप्रधानांना दंड भरण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:49 pm

Vasai Churchgate Local –लोकलमध्ये पुन्हा राडा; आता तर पोलिसाचाच दात तोडला, एकाला अटक

लोकलमध्ये रोजच राडे होत असताना ट्रेनच्या दारात उभे राहून जागा अडवणाऱ्या टोळक्यांना जाब विचारणाऱ्या एका पोलिसालाच जबर मारहाण झाली आहे. वसईहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिसाचा एक दात तुटला असून या पोलिसांनी रेल्वे हेल्पलाइन कडे दोनदा मदत मागूनही त्याच्या मदतीला रेल्वे सुरक्षा दलाची कोणतीही कुमक धावून आली नाही. याप्रकरणी एका […]

सामना 3 Jul 2025 2:47 pm

'तृतीयपंथी माझ्या घरात राहायचे' मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव; म्हणाला, 'भीती वाटली...'

Marathi Actor On Transgender : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान तृतीयपंथींचा अनुभव सांगितला आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:33 pm

कोकणात समुद्रपर्यटनासाठी गेला, पोहण्याचा मोह अंगलट आला; पुण्यातील तरुणाची ४३ तासांनंतर बॉडी सापडली

Raigad News : पुण्याहून काशीद येथे पर्यटनासाठी आलेला एक तरुण पर्यटक तनिष्क मल्होत्रा हा काशिद येथील समुद्रात बुडून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह आता तब्बल त्रेचाळीस तासांनी सापडला आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:33 pm

लग्न, महिन्याभरात पतीचा खून अन् आत्याच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध; बिहारमध्ये हत्येचा ‘सोनम रघुवंशी’पॅटर्न

मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशी हत्याकांडाने देश हादरून गेला होता. लग्नानंतर मधुचंद्राला गेलेल्या राजाला पत्नीने सुपारी देऊन संपवले होते. आता असाच एक प्रकार बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात घडला असून लग्नाला महिना होत नाही तोच पत्नीने सुपारी देऊन पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आत्याच्या नवऱ्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तरुणीने थंड डोक्याने कट रचला आणि […]

सामना 3 Jul 2025 2:28 pm

चार महिन्यांपूर्वीच दर्शनच्या आईचे दुसरे लग्न; सावत्र बापाने काढला मुलाचा काटा...अकोल्यातील खळबळजनक घटना

अकोल्यातील अकोटमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची त्याच्या सावत्र बापाने हत्या केली. दर्शन पळसकार असे मुलाचे नाव आहे. आरोपी आकाश कान्हेकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोले यांना अटक करण्यात आली आहे. मुलाच्या आईने चार महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते. संपत्तीच्या संशयातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना पकडले. अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:26 pm

ITR भरताना एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड, या Mistake टाळा नाहीतर जेलची हवा

Income Tax Return Filing: आता आयकर रिटर्न भरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे कारण आयकर विभागाने नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:22 pm

पुन्हा एकदा भीषण विमान अपघात, हजारो फूट उंचीवर पंख तुटला; धावपट्टीवरून निघालेलं प्लेन जंगलात कोसळलं

Plane Crashed : अहमदाबाद - लंडन विमान अपघातानंतर पुन्हा एकदा दोन विमान अपघात समोर आले आहेत. एका दुर्घटनेत विमानाचा पंख तुटला, तर दुसऱ्या अपघातात स्काईडायव्हिंग करताना एक विमान कोसळलं. जखमींवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:22 pm

वडिलांना 3 वेळा कॅन्सरमधून बाहेर काढलं, 25 लाख खर्च केले, त्याच लेकीचा असा शेवट, हिंदुस्तानी भाऊचा व्हिडिओ व्हायरल

Shefali Jariwala spend 25 lakhs father cancer treatment: शेफाली जरीवाला हिचा मृत्यू प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला. आता तिच्या निधनानंतर तिच्याबद्दल बोललं जातं आहे. ती तिच्या आई-वडिलांची खूप काळजी घ्यायची.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:16 pm

Vari Pandharichi 2025: आषाढी एकादशी वारी उत्सवासाठी प्रतिपंढरपूर सज्ज, अशी असेल वाहतूक व्यवस्था?

व्यवस्था ग्रामस्थांच्यावतीने व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत वाशी : 32 युगापूर्वी विठ्ठल साक्षात प्रकट झाले असा उल्लेख करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये आढळून येतो. अशा प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे आषाढी यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी व देवस्थान समितीने नेटके नियोजन केले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास बाळकृष्ण पाठक व सदस्य यांच्यावतीने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची [...]

तरुण भारत 3 Jul 2025 2:12 pm

अंगावर काटा आणणारा टीजर, यश-रणबीरची झलक पाहून चाहते थक्क! बॉक्स ऑफिस गाजवणार 'रामायण'

Ramayana Teaser Out: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या 'रामायण'या सिनेमाच्या पहिल्या भागाचा टीजर रीलिज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल असा विश्वास चाहते व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्र वेळा 3 Jul 2025 2:12 pm