महापालिका निवडणुकांपूर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का; डॉ. हेमलता पाटील दोन दिवसांत पक्ष सोडणार
Hemlata Patil : माजी नगरसेवक जॉय कांबळे यांच्या पाठोपाठ आता पाटील यांनीही पक्ष सोडण्याचे संकेत दिल्याने पक्षनेतृत्वाच्या अडचणीही वाढणार आहेत. गेली ३० ते ३२ वर्षे डॉ. पाटील काँग्रेसच्या निष्ठावान म्हणून काम करीत आहेत.
भारतीय महिलांची वनडेत विक्रमी धावसंख्या
तिसऱ्या वनडेत तब्बल 304 धावांनी विजय : मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश :प्रतिका रावल-स्मृती मानधनाची शतके वृत्तसंस्था/ राजकोट प्रतिका रावल (154) व स्मृती मानधना (135) यांच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या वनडेत आयर्लंडवर 304 धावांनी विक्रमी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी आयर्लंडला मालिकेत 3-0 असे व्हाइटवॉश केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी [...]
छत्रपती शिवरायांमुळे नौदलास सामर्थ्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण : माझगाव डॉकयार्ड येथे कार्यक्रम मुंबई / प्रतिनिधी भारतीय नौदलाच्या आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आले. लष्कर दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी [...]
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 2027 साठी व्यक्त केला दावा नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, म्हणजेच जीडीपीच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर जाईल. पियुष गोयल यांनी ‘तुघलक’ या तमिळ मासिकाच्या वार्षिक सभेला संबोधित करताना म्हटले की, 2027 पर्यंत [...]
साबालेन्का, गॉफ, सीगमंड, ओसाका तिसऱ्या फेरीत
व्हेरेव्ह, अल्कारेझ, जोकोविच, पेगुला, अँड्रीव्हा यांचीही आगेकूच, किनवेनचे आव्हान समाप्त वृत्तसंस्था/ मेलबर्न जागतिक द्वितीय मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने ऑस्ट्रेलियन ओपन मोहिमेची विजयाने सुरुवात करीत तिसरी फेरी गाठली तर स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, मॅकहेक यांनी तसेच महिलांमध्ये कोको गॉफ, एरिना साबालेन्का, नाओमी ओसाका, लॉरा सीगमंड, लैला फर्नांडेझ, जेसिका पेगुला, मायरा अँड्रीव्हा यांनी तिसऱ्या फेरीत स्थान [...]
काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन
‘इंदिरा गांधी भवन’ असे नामकरण : सोनिया गांधींच्या हस्ते कार्यक्रम ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय मुख्यालय वास्तूचे उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बुधवारी हा कार्यक्रम पार पडला, हे मुख्यालय दिल्लीच्या कोटला मार्गावरच्या भूखंड क्रमांक 9 अ येथे निर्माण करण्यात आले आहे. आतापर्यंत गेली 47 वर्षे या पक्षाचे मुख्यालय 24, [...]
‘पीएमओ’च्या सिमकार्ड खरेदी, विक्रीसाठी कडक सूचना
बनावट सिमकार्डद्वारे फसवणूक टाळण्यासाठी नवे नियम नवी दिल्ली : बनावट सिमकार्ड खरेदी आणि विक्रीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक नवीन आदेश जारी केला आहे. बनावट सिम कार्डमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा आदेश सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. यामध्ये पीएमओने दूरसंचार विभागाला (डीओटी) हा आदेश दिला आहे ज्या अंतर्गत नवीन सिमकार्ड जारी [...]
केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ
मद्यधोरण घोटाळाप्रकरणी कारवाईला केंद्रीय गृह मंत्रालयाची संमती वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होताना दिसून येत आहे. मद्यधोरण घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरोधात कायदेशीर करवाई करण्यास केंद्र सरकारच्या गृह विभागाने अनुमती दिली आहे. या मद्यधोरण घोटाळ्यामुळे दिल्लीच्या राज्य सरकारचे 2 हजार कोटीहून अधिक रुपयांची [...]
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी झळकणार
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेन्गर (नॉर्वे) जागतिक जलद बुद्धिबळ विजेती आणि भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपी मे महिन्यात होणाऱ्या नॉर्वेतील महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणार आहे. महिलांच्या क्लासिकल बुद्धिबळात सध्या हंपी जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. वरील प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेत आपला ठसा उमटविण्याचे हम्पीचे ध्येय आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे हम्पीचे पुनरागमन तिच्या उल्लेखनीय कारकिर्दीवर प्रकाश टाकते. 2002 मध्ये बुद्धिबळ [...]
शेख हसीना यांच्या भाचीने गमाविले मंत्रिपद
ब्रिटनमध्ये ट्यूलिप सिद्दीक यांचा राजीनामा वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या तक्रारीनंतर शेख हसीना यांच्या भाची ट्यूलिप सिद्दीक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. युनूस यांनी ब्रिटनच्या मंत्री ट्यूलिप सिद्दीक तसेच त्यांच्या परिवाराच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. ट्यूलिप या 9 जुलैपासून ब्रिटनच्या मजूर सरकारमध्ये आर्थिक सचिव आणि शहर मंत्री म्हणून कार्यरत [...]
भुजबळांनी राखले राष्ट्रवादीपासून अंतर; पक्षाच्या, तसेच पंतप्रधानांच्या बैठकीलाही गैरहजेरी
Chhagan Bhujbal: पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, तरीही पक्षनेतृत्व असो की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही.
माझे घर ते माझे घर जगावेगळे असेल सुंदर घर ही अशी गोष्ट आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला स्वत:चं घर नावाच्या कल्पनेने पछाडलेलं असतं. आता तर असं चलन आलेलं आहे, की माणसाला एक घर घेऊन तरी समाधान होतच नाही. एकापेक्षा जास्त घरं त्याला हवीहवीशी वाटतात. एकीकडे तो ज्या घरात जन्माला आला असेल ते मूळ घर [...]
अनुपमा, तनिशा-अश्विनी दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली माजी राष्ट्रीय चॅम्पियन अनुपमा उपाध्यायने येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र एचएस प्रणॉय व प्रियांशू राजावत यांना संघर्षपूर्ण लढतीत पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो यांनी दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत प्रियांशूने जोरदार लढत दिली. पण त्याला [...]
हायव्होल्टेज ड्रामानंतर अध्यक्ष योल यांना अटक
दक्षिण कोरियात कारवाई : अध्यक्षीय प्रासादात शिरले 1 हजार पोलीस वृत्तसंस्था/ सोल दक्षिण कोरियात महाभियोगाला सामोरे जाणारे अध्यक्ष यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी दक्षिण कोरियाचे अधिकारी यून सुक सोल यांना अटक करण्यासाठी अध्यक्षीय प्रासादात दाखल झाले. भ्रष्टाचार तपास कार्यालयाने यून यांना स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी अटक करण्यात [...]
जपानमध्ये साकारली जातेय ‘फ्यूचर सिटी’
ड्रोनद्वारे होणार ये-जा, एआयद्वारे होणार काम जगातील पहिले ‘भविष्याचे शहर’ टोयोटा या कंपनीने विकसित केले आहे. हे शहर आता स्वत:च्या रहिवाशांचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. जपानमध्ये माउंट फुजीच्या परिसरात असलेल्या या शहराला ‘वोवेन सिटी’ नाव देण्यात आले आहे. हे शहर हायड्रोजन ऊर्जा, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज 11 स्मार्ट होम्सपासून सुरू होत आणखी [...]
महाराष्ट्रच्या अथर्व माडकरला ‘ब’ गटात अजिंक्यपद
आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा तिसऱ्या मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ब’ गटात महाराष्ट्रच्या अथर्व माडकरने अजिंक्यपद पटकावले. तामिळनाडूच्या आश्विंथ मायकलने द्वितीय तर गुजरातच्या रुद्र पाठकने तृतीय स्थान प्राप्त केले. स्पर्धेत प्रभावी कामगिरी केलेल्या गोव्याच्या देवेश आनंद नाईकने दहावे स्थान पटकावले. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे ही स्पर्धा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद [...]
सुरतसिंग खालसा यांचे अमेरिकेत निधन
शीख कैद्यांच्या सुटकेसाठी उपोषण वृत्तसंस्था/ लुधियाना लुधियानाजवळील हसनपूर गावातील रहिवासी सुरतसिंग खालसा (92) यांचे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले. तुरुंगात असलेल्या शिखांच्या सुटकेसाठी सुरतसिंग खालसा यांनी 2015 मध्ये उपोषण केले होते. तसेच ऑपरेशन ब्लूस्टारच्या निषेधार्थ नोकरी सोडल्यापासून ते सामाजिक जीवन जगत होते. शीख समाजामध्ये त्यांना आदर्श आणि आदरणीय मानले जाते. त्यांच्या निधनाने शीख समुदायावर [...]
पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत गैरप्रकार अन् चुकीच्या मार्गाने ओबीसी अन् दिव्यांग श्रेणीच्या अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरला 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. न्यायाधीश बी.व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने अंतरि जामिनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली [...]
प्राप्तिकर विभागाचे हिमाचल प्रदेशमध्ये छापे
वृत्तसंस्था/ शिमला हिमाचल प्रदेशमधील सोलन जिह्यातील बद्दी औद्योगिक क्षेत्रातील झाडमाजरी येथे असलेल्या एका खासगी कंपनीवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. सकाळी 6.30 वाजता प्राप्तिकर विभागाचे पथक झाडमाजरी येथील कॅप्टाब बायोटेक युनिट-2 मध्ये पोहोचले. या कारवाईमुळे बद्दीच्या उद्योगपतींमध्ये घबराट निर्माण झाली. सायंकाळी उशिरापर्यंत कंपनीमध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू होती. कॅप्टाब बायोटेक ही कंपनी [...]
कधी सेल्समन तर कधी टेलिफोनबूथवर केलं काम, प्रेमासाठी सोडली दुबईची नोकरी,अशी झाली सिनेमात एण्ट्री
Vijay Sethupathi Birthday: साऊथस्टार विजय सेतुपती याने इंडस्ट्रीत स्वत:चा चांगलाच जम बसवला आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा संघर्ष जाणून घेऊ.
भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
भारताने इराणला 84 गुणांनी लोळवले :भारताची प्रियंका इंगळे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाने कालचा अध्याय आज पुढे चालू ठेवत इराणला अक्षरश: लोळवले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक 175-18 अशा विजयानंतर, भारतीय महिला खो-खो संघाने इराणला 84 गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान [...]
केजरीवालांचा पाय खोलात; मद्य घोटाळ्यात खटला चालविण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी
Arvind Kejriwal: दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी सक्तवसुली महासंचालनालयाला (ईडी) परवानगी दिली.
ओपीजी मोबिलिटी 400 कोटींचा निधी उभारणार
नवी दिल्ली : इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) निर्माता ओपीजी मोबिलिटी (पूर्वी ओका ईव्ही) येणाऱ्या 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत जवळपास 400 कोटींचा निधी उभा करणार असल्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंशुल गुप्ता म्हणाले की, ‘कंपनीचा पोर्टफोलिओ आणि नेटवर्कचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे. ओपीजी मोबिलिटीचे एमडी म्हणाले की, [...]
सर्व न्यायालयांमध्ये महिलांसाठी शौचालय असावे
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील न्यायालय परिसर आणि लवादांमध्ये महिला, ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी शौचालय सुविधांच्या निर्मितीवर महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. शौचालयांची निर्मिती, देखभाल आणि साफसफाईसाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिला [...]
सेना दिनानिमित्त जवानांच्या शौर्याचे कौतुक
हुतात्म्यांचे स्मरण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सेना (लष्कर) दिनानिमित्त बुधवार, 15 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या अतुलनीय धैर्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले. भारतीय सैन्य देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या अढळ धैर्याने आणि समर्पणाने उभे आहे. भारतीय सैन्य कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करते’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधानांनी [...]
आजचे भविष्य गुरूवार दि. 16 जानेवारी 2025
मेष: कामात यश साधता येईल परंतु रागावर शब्दांवर नियंत्रण ठेवा वृषभ: नवीन अनुभव पदरी पडेल ज्येष्ठ व्यक्तींची भेट व सहयोग मिथुन: आर्थिक वृद्धी होईल प्रिय व्यक्तीची साथ मनाप्रमाणे लाभेल कर्क: इतरांवर विश्वास ठेवू नका स्वत:ची कामे प्रयत्नपूर्वक करा सिंह: प्रसिद्धी व सिद्धी दोन्ही प्राप्त करता येईल मेहनत वाढवा कन्या: कुटुंबात मंगल कार्य घडेल आपला सहभाग [...]
महिंद्रा थार बनली रॉक्स कार ऑफ द इयर 2025
एका तासात 1.76 लाखांहून अधिक बुकिंग : एमजी विंडसरने ग्रीन कार ऑफ द इयरचा मान पटकावला नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राची लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही थार रॉक्स इंडियन कार ऑफ द इयर 2025 (आयसीओटीवाय 2025) बनली आहे. त्याच वेळी, एमजी विंडसरने ग्रीन कार ऑफ द इयर 2025 जिंकला, मर्सिडीज-बेंझ ई-क्लासने प्रीमियम कार ऑफ द इयर [...]
दादांचा धनंजय मुंडेंना धक्का, अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेले बहुतांश आरोपी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचे ‘आका’ वाल्मीक कराड हे मुंडे यांचे खासम्खास आहेत. खंडणी, हत्या प्रकरणात आतापर्यंत पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची चौकशी झाली. झाली तेवढी बदनामी पुरे, आता झंझटच नको म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारिणीच […]
हत्या झाली त्याच दिवशी कराडची देशमुख यांना फोनवरून धमकी! एसआयटीची न्यायालयात धक्कादायक माहिती
अवादा कंपनीकडे मागितलेल्या दोन कोटींच्या खंडणीला अडथळा आणला म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीने हा कट रचला होता. त्यामुळेच त्यांना ‘मकोका’ लावण्यात आला. हत्या घडली त्या दिवशी कराड आणि घुले, चाटे यांचे दहा मिनिटांचे संभाषणही झाले होते. कराडने देशमुख यांना पह्नवरून धमकावले होते, असे नमूद करत […]
शहापूरजवळ पाच गाड्यांचा विचित्र अपघात; 4 ठार, 14 जखमी; मायलेक व पती-पत्नीने गमावला जीव
मुंबई-नाशिक महामार्गावरील किन्हवली रोडच्या पुलाजवळ आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात चार जण जागीच ठार झाले असून 14 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. अपघातामध्ये मायलेक व पती-पत्नीने आपला जीव गमावला असून तीन वर्षांची चिमुरडी मात्र बचावली आहे. शहापूरजवळ झालेल्या या विचित्र अपघाताची […]
‘समृद्धी’वर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न, बोगद्यांवर झळकली वारली चित्रकला आणि लोकसंस्कृती
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जात आहे. या महामार्गावरील आमने ते इगतपुरी हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिकला जोडणाऱया बोगद्यांवर ऐतिहासिक वारली चित्रकला आणि लोकसंस्कृती झळकळी आहे. महामार्गांवरील बोगद्यांवर लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात प्रथमच एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावर केला […]
हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांचा विजयी झंझावात खो-खो जगज्जेतेपदाच्या दिशेने सरकू लागलाय. मंगळवारी दक्षिण कोरियाचा फडशा पाडणाऱ्या हिंदुस्थानी महिला संघाने इराणची 100-16 अशा धुळधाण उडवली तर हिंदुस्थानच्या पुरुष संघाने पेरूचा 70-38 असा धुव्वा उडवत आपल्या विजयाची हॅटट्रिक साजरी केली. आजच्या या धडाकेबाज विजयामुळे हिंदुस्थानच्या महिलांपाठोपाठ पुरूष संघानेही उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. हिंदुस्थानचे दोन्ही […]
फेरीवाले जुमानत नाहीत हे मान्य करा! हायकोर्टाने पालिकेसह राज्य सरकारला सुनावले
मुंबईतील रस्ते, चौक व फुटपाथ अडवणाऱया फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून हायकोर्टाने आज मुंबई महापालिकेसह राज्य सरकारवर ताशेरे ओढले. अनेकदा आदेश देऊनही त्याची पूर्तता होत नाही. पालिका आणि पोलीस जबाबदारी झटकत असल्याचे पाहायला मिळते, असे चित्र असेल तर फेरीवाले तुम्हाला जुमानत नाहीत हे मान्य करा, अशा शब्दांत न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने प्रशासनाला फटकारले. इतकेच नव्हे तर मुंबईतील […]
जिजामाता उद्यानात घुमणार सिंहगर्जना!
मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात लवकरच ‘सिंहगर्जना’ होणार आहे. यासाठी पालिका गुजरातच्या जुनागड प्राणिसंग्रहालयातून सिंहाची नर-मादी अशी जोडी आणणार आहे. यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून समन्वय साधला जात असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून याच्या […]
महाराष्ट्रातील महायुती सरकारला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. सरकारने निधी नसल्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील दोन सांडपाणी प्रकल्पांना मंजुरी दिली नाही. सरकारच्या या असमर्थतेवर न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना समन्स बजावले. सरकार सांडपाणी प्रकल्पाला पुरेसा निधी का उपलब्ध करू शकत नाही याचा खुलासा प्रधान सचिवांनी करावा, असे सक्त आदेश न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती […]
निवडणूक नियमांतील दुरुस्तीला आव्हान देणाऱया काँग्रेसच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. याचवेळी मोदी सरकार व केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. सरकारने निवडणूक नियमावलीत दुरुस्ती करून मतदान, मतमोजणीचे रेकॉर्ड मागण्याच्या नागरिकांच्या हक्कांवर गदा आणल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मोदी सरकारने सार्वजनिक सल्लामसलत न करताच मनमानीपणे 1961 च्या निवडणूक नियमांमध्ये […]
>> पद्मश्री अशोक भगत चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आले तेव्हा सर्वात प्रथम कृषी पायाभूत सुविधांचा विकास झाला. अमेरिकेचे दूरदर्शी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनीही शेतीला विकासाचा आधार बनवले होते. या तुलनेत भारतात कृषी विकासाबाबत भरीव प्रयत्न झाले नाहीत. देशातील सुमारे दोन हजार लाख हेक्टर जमीन शेतीसाठी योग्य आहे. यापैकी केवळ 1,200 ते 1,500 लाख हेक्टर जमीन वापरण्यायोग्य आहे. […]
ते देशातून पळून गेले, तुम्ही काय करत होता? हायकोर्टाकडून पोलिसांची झाडाझडती
टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणूकप्रकरणी तपास करणाऱया पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते देशातून पळून जात असताना तुम्ही काय करत होतात? पाठपुरावा का केला नाहीत? त्यांना का रोखले नाहीत अशा प्रश्नांची सरबत्ती करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले. इतकेच नव्हे तर आरोपींनी देश […]
अरविंद केजरीवाल यांची होणार ईडी चौकशी
आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी चौकशी होणार आहे. त्यांच्याविरोधात मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाला मंजुरी दिली आहे. तर दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनीही केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कर्मचाऱयांवर खटला चालवावा लागेल. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर […]
आभाळमाया –‘पार्कर’चा टिकाव कसा लागला?
>> वैश्विक, khagoldilip@gmail.com सूर्यस्पर्शी ‘पार्कर प्रोब’ची माहिती आपण गेल्या लेखात घेतली. ‘पार्कर प्रोब’चा पराक्रम खरोखरच अद्वितीय आहे. प्रचंड तापमानाच्या सूर्य नावाच्या ताऱ्याला ‘स्पर्श’ करणं ही विलक्षणच गोष्ट म्हणावी लागेल. कारण सूर्यामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा दडलेली आहे की, अवघ्या सौरमालेला पुरून उरेल इतका ऊर्जासाठा त्यात भरला आहे. सूर्याच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचं हिलियम वायूत रूपांतर करणारी एक अतिशक्तिमान […]
बीड प्रकरणात फडणवीस यांना अधिक कठोरपणे वागता आले असते. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली. हे ढोंग आहे. बीडमध्ये बंदुकीचे राज्य होते. शिवाय लोकांना हालहाल करून मारण्यात आले. उत्तर प्रदेश आणि बिहारात अतीक अहमदसारखे गुन्हेगार […]
कर्नाक पूल जूनपर्यंत सुरू होणार; दुसरा गर्डरही लाँच
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पी.डि’मेलो मार्गाला जोडणाऱया 154 वर्षे जुन्या कर्नाक पुलाची पालिकेकडून पुनर्बांधणी सुरू असून मंगळवारी रात्री या पुलाचा 550 मेट्रिक टन वजनाचा उत्तर बाजूचा गर्डर 9.30 मीटरपर्यंत सरकवण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून ’ब्लॉक’ जाहीर झाल्यावर पाच तासांच्या कालावधीत तुळई आणखी पुढे सरकवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून रेल्वेशी चर्चा सुरू […]
गुन्हेगारी रोखण्यास गृह विभागाला अपयश, गुड गर्व्हनन्स अहवालातील विदारक सत्य
राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. हत्या, अपहरण, दरोडा, अत्याचार यांसारख्या गंभीर गुह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नुकताच गुड गर्व्हनन्स अहवाल समोर आला असून यात राज्यातील 36 पैकी 32 जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यास गृह विभाग अपयशी ठरला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावरून गुन्हेगारी रोखण्यासाठी गृह विभाग हा सपशेल अपयशी ठरत आहे, असे मत माजी गृहमंत्री […]
सागरी सुरक्षेत हिंदुस्थान ग्लोबल पार्टनर म्हणून पुढे यायला हवा असे सांगतानाच समुद्राला ड्रग्ज, दहशतवाद आणि शस्त्रास्त्र तस्करीपासून सुरक्षित करा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीच्या राष्ट्रार्पणानंतर केले. मुंबईतील माझगाव डॉक येथे ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी […]
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 100 ठिकाणी एकाचवेळी डागली क्षेपणास्त्रे
रशियाने युक्रेनवर गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठा हल्ला केला असून काळ्या समुद्रातून टीयू-95 बॉम्बरमधून क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. रशियाने युक्रेनमधील तब्बल 100 हून अधिक ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. युक्रेनने केलेल्या हल्ल्याला रशियाने प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. युक्रेनने मंगळवारी रात्री रशियावर हल्ला केला होता. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी सायरन वाजू लागले. कीव्हमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात […]
विकासकांनी संक्रमण शिबिराचे 200 कोटी थकवले, भाडे थकवणाऱ्या बिल्डरांविरोधात म्हाडा गुन्हे दाखल करणार
शहरातील 16 बिल्डरांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिराचे सुमारे 200 कोटी रुपये भाडे थकवले आहे. थकीत भाडे वसुलीसाठी म्हाडाने बिल्डरांना नोटीस धाडली असून सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकणार आहे. तरीही संबंधित बिल्डरांनी थकीत भाडे न भरल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच त्या बिल्डरांच्या म्हाडाच्या जमिनीवर सुरू असलेल्या कामाला स्टॉप वर्क नोटीस दिली जाणार […]
हिंदुस्थानी महिलांचा त्रिशतकी विजय, सलामीवीर प्रतिका-स्मृतीची दमदार शतके
सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मनधनाने वैयक्तिक शतकांसह 233 धावांची दिलेली सलामी आणि त्या बळावर हिंदुस्थानी महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली 435 धावांची विक्रम धावसंख्या उभारून दिवस गाजवला. त्याचबरोबर आयर्लंडचा डाव अवघ्या 131 धावांत गुंडाळत एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील आपला 304 धावांचा सर्वोच्च विजय नोंदवला. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी महिलांनी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे […]
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा व सद्भावना सेवा समिती मुंबई यांच्यावतीने जुहू चौपाटी येथे ‘बीच वॉकथॉन 2025’ स्पर्धेचे शनिवार, दि. 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गेली 6 वर्षं बीच वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते, स्पर्धेचा शुभारंभ बिर्ला लेन येथे होतो तर बक्षीस वितरण बिर्ला […]
स्वामी रामगिरी महाराज यांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा रामगिरी महाराज यांच्यावर आरोप आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. रामगिरी महाराज यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली […]
मराठा आरक्षण पुन्हा लटकणार! मुख्य न्यायमूर्तींच्या बदलीमुळे नव्या खंडपीठासमोर नव्याने सुनावणी
मराठा समाज हा मागास असून समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा केला. सरकारच्या मराठा आरक्षणाविरोधात तसेच आरक्षणाच्या बाजूने हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या. त्यावर सुनावणी अंतिम टप्प्यात आली असतानाच मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या बदलीची अधिसूचना पेंद्र सरकारने मंगळवारी जारी केली. त्यांच्या जागी नवे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये हे येणार असून मराठा आरक्षणाचा प्रश्न […]
तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटींच्या फसवणुकीची तक्रार, टोरेस नंतर आता ‘मनी एज’चा घोटाळा उघड
टोरेस आर्थिक फसवणूक हे सध्या हॉट प्रकरण असतानाच आता नवीन आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱया मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजच्या चार संचालकांसह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. […]
मुंबई महानगरपालिकेने आजपासून सामूहिक स्वच्छता मोहीम राबवताना गल्लीबोळांसह रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि बाजारपेठांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. पालिकेच्या शेकडो कामगारांसह नागरिक, विद्यार्थी आणि संघटनांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 55 आठवड्यांपासून ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येत आहे. यामध्ये आता 24 प्रशासकीय विभागात कचरामुक्त तास (गार्बेज फ्री अवर) ही विशेष […]
केईएमची शतक महोत्सवी घोडदौड, 18 ते 22 जानेवारीदरम्यान पाच दिवस कार्यक्रम
मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाने शतक महोत्सवी घोडदौड केली आहे. मुंबईच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब-सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेल्या या रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 18 ते 22 जानेवारीदरम्यान अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी सकाळी 11 […]
धारावीकरांचे मालाडमध्ये पुनर्वसन नको, जमीन मोजणीला विरोध; गावकऱ्यांचे आज आंदोलन
धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना अपात्र धारावीकरांचे मालाडमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. आक्सासह परिसरातील गावकऱयांचा विरोध डावलून जमीन मोजणीसाठी गुरुवारी आक्सा गावामध्ये पोलीस बंदोबस्तात महसूल प्रशासनाचे अधिकारी येणार आहेत. या जमीन मोजणीला आपला विरोध दर्शवण्यासाठी उद्या, गुरुवारी सकाळी 11 वाजता श्री साई विद्यामंदिर, आक्सा गाव येथे गावकरी एकत्र येणार आहेत. धारावीचा पुनर्विकास अदानीमार्फत करण्यात येणार आहे. […]
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरची अटक तूर्त टळली
कागदपत्रांमध्ये फेरफार करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक करणाऱया वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरची अटक तूर्त टळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणी घेतली आणि तिला 14 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले. दिव्यांग व ओबीसी आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून यूपीएससीची […]
हवाला एजंटची होणार चौकशी, टोरेस फसवणूक प्रकरण
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील कोटय़वधी रुपये हवालामार्फत देशाबाहेर पाठविण्यात आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पोलीस त्या हवाला एजंटची चौकशी करून गुह्यांची सखोल माहिती जाणून घेणार आहेत. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 24 कोटी 49 लाखांची मालमत्ता हस्तगत केली आहे. त्यात पाच कोटी 98 लाखांची रोकड, बँक खात्यात गोठवलेली 15 कोटी 81 लाखांची […]
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उद्या, गुरुवारी प्रथमच राज्यमंत्री परिषदेची बैठक होत आहे. मंत्रालयात संध्याकाळी 5 वाजता होणाऱया बैठकीला राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंत्री परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर रोजी फडणवीस यांनी […]
विश्वविक्रमी जोकोविच सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू
सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीतील सामन्यासाठी कोर्टवर पाऊल ठेवताच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. जोकोविच हा चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक 430 सामने खेळला असून हा नवा विक्रम आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत रॉजर फेडररची (429) बरोबरी केली […]
थॅलसेमिया, बाल कर्करोग, बोनमॅरोच्या रुग्णांना दिलासा; बोरिवलीत पालिकेने उभारली दुमजली निवासी इमारत
बोरिवली (पूर्व) येथे महापालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलसेमिया केअर, बालरोग रक्तदोष – कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रातील रुग्णांसाठी दुमजली रुग्ण निवासी इमारत उभारण्यात आली आहे. विशेषतः मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत येणाऱया पालकांकरिता ही व्यवस्था मोठा दिलासा देणारी आहे. महापालिकेच्या जागेवर अॅक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांच्या सहकार्याने ही इमारत उभारण्यात आली आहे. […]
सायबर गुन्हे व फसवणूक, पोलिसांचे दहिसर येथे व्याख्यान
‘सायबर गुन्हे व फसवणूक कशी टाळता येईल’ यावर जनसहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबई पोलीस दलातील सायबर अधिकारी विवेक तांबे यांचे व्याख्यान दहिसर (पश्चिम) रंगनाथ केसकर रोड येथील ‘बोनावेन्चर’ या सोसायटीमध्ये रविवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. जनसहयोग संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे. […]
कोनेरू हम्पी नॉर्वे महिला बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार
जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती आणि हिंदुस्थानची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पी मे महिन्यात नॉर्वे येथे होणाऱया बुद्धिबळ महिला स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या महिलांच्या क्लासिकल बुद्धिबळात जगात सहाव्या क्रमांकावर असलेली खेळाडू हम्पीचे लक्ष्य या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रभाव पाडण्याचे असेल. हम्पी 2002 मध्ये ग्रॅण्डमास्टर होणारी हिंदुस्थानची पहिली महिला खेळाडू ठरली होती. दोनवेळा 2019 आणि 2024 मध्ये […]
पल्लवी फाउंडेशनतर्फे आयोजित बाल जल्लोष हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरूनगर मनपा शाळा येथे अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ’आजचे हे विद्यार्थी उद्याचा भारत घडवणारे खरे शिल्पकार आहेत. आज त्यांच्यावर चांगल्या संस्कारांची आणि कलागुण जोपासण्याची मेहनत […]
सिद्धार्थ मल्होत्रालाही चुकला नाही आईचा मार, केलं असं काही की चप्पल मारलेली फेकून
sidharth malhotra birthday : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या बालपणीचे किस्से जाणून घेऊ.
मांजाच्या जाळ्यात आणखी एकजण जायबंदी, कामाला निघाला असता मांजाने फास आवळला; तरुण गंभीर जखमी
Nandurbar News : मकर संक्रांतीच्या पतंगोत्सव दरम्यान नायलॉन मांजामुळे नंदुरबार शहरातील एका सात वर्ष निष्ठा बालकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच १५ जानेवारी रोजी मिरची पथारीवर कामाला जाणाऱ्या एका युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्याची घटना घडली आहे.
Kho Kho World cup –हिंदुस्थानने इराणला लोळवले, महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत धडाकेबाज प्रवेश
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने इराणला अक्षरशः लोळवल. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक 175-18 अशा विजयानंतर, बुधवारी इराणला 84 गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात भारतीय खो-खो खेळाडूंनी इराणच्या खेळाडूंना चांगलेच पळवले. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात हिंदुस्थानच्या महिलांनी 100-16असा मोठा विजय मिळवला. या कामगिरीने […]
राजकीय विरोधक बारामतीत एकाच व्यासपीठावर, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंची गळाभेट अन्...
Supriya Sule And Pankaja Munde Hug : राज्याच्या राजकारणात जसा अमुलाग्र बदल होत आहे. तद्वतच काही महिन्यांपासून बारामतीच्या राजकारणातही बदल होताना पाहावयास मिळत आहे. यासोबतच आता विरुद्ध पक्षाच्या दोन राजकारणी महिलांची गळाभेट झाल्याचे आज पाहावयास मिळाले आहे.
संक्रांत साजरी करुन मुंबईला निघाले, वाटेत भीषण अपघात; अडीच वर्षांच्या लेकीसमोर आई-वडिलांचा मृत्यू
Jalgaon Accident News: संक्रात सण साजरा करुन मुंबईच्या दिशेने निघाले होते. वाटेत खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. यामध्ये दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ना कोणता कॉल, ना कोणता संबंध; वाल्मिक कराड यांना मीडिया प्रेशरमुळे अटक, आरोपी वकिलांची माहिती
Walmik Karad Advocate Reaction: वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर असून त्यांना मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आली असल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला आहे.
मकर संक्रांत ठरली अखेरची; मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू, १४ जखमी
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई - नाशिक महामार्गावर गोटेघर जवळ भीषण अपघात झाला आहे. कंटेनरने चार ते पाच वाहनांना धडक देत झालेल्या या अघातात तिघांचा मृत्यू झाला असून १४ जखमी झाले आहेत.
पंतप्रधान संग्राहालयात स्मृती ईराणी; शेखर कपूर यांना संधी, कुणाला वगळलं?
Prime Minister Museum : पंतप्रधान संग्राहालयात नवीन सदस्यांमध्ये स्मृती ईराणी, शेखर कपूर यांना संधी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन समिती करणार तपास
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी समितीची स्थापना केली आहे. माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तपास करणार आहे. पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अगोदर विष्णू चाटे, जयराम […]
रस्त्यावरील खडीमुळे बोलेरोचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट ५० फूट विहिरीत कोसळली; चौघांचा भयानक अंत
Jamkhed Accident Car Falls Into Well : जामखेडमध्ये कार विहिरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. यातच महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारिया यांचा पहिल्या अमृत स्नानात समावेश करून त्यांना महामंडलेश्वराच्या शाही रथावर बसवण्यावरून वाद सुरू झाला आहे. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. साध्वी हर्षा रिछारिया यांच्यावर संताप व्यक्त करत शंकराचार्य म्हणाले […]
भाजपनंतर आता राष्ट्रवादीचे शिर्डीत मंथन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार
NCP Ajit Pawar state-level camp: शिर्डीतील अधिवेशनात भाजपने हा संकल्प केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षानेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मंथन करण्यासाठी शिर्डीची निवड केली आहे.
माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा बनवलं, मी कुणाकडे न्याय मागू? मंजिली कराड संतापल्या
Walmik Karad Wife: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यावर पत्नी मंजिली कराडने प्रतिक्रिया देत कराडला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
रशियाचा युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 100 ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने एकाच वेळी युक्रेनमधील 100 ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यांनी TU-95 बॉम्बरमधून क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत. गेल्या 3 वर्षातील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियाचा हा हल्ला युक्रेनवर केलेला पलटवार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी मंगळवारी रात्री युक्रेनने रशियावर हल्ला केला होता. रशियाने केलेल्या हल्ल्यात कीवमधील […]
परळीतील धनंजय मुडेंच्या टोळ्या आणि दहशत संपवली पाहिजे; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक
मस्साजोगचे सरपंच संतष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर या घटनेबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खंडणीतल्या आरोपींना आम्हाला वाचवा म्हणून सरकारमधल्या मंत्र्याकडे मदत मागितली असणार आहे. या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये. धनंजय मुंडेंची गुंडाची टोळी संपली पाहिजे. ही टोळी दहशत निर्माण करणारी आहे. देशमुख […]
Thane Police Returned 60 Thousand to Couple : पती-पत्नी उबरमध्ये ६० हजार रुपये असलेली पिशवी विसरले होते. मात्र ठाणे पोलिसांनी दाम्पत्याला त्यांचे पैसे परत मिळवून दिले आहेत.
दापोली तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिकचे तीन तेरा; प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि शासकीय कामकाजात दिरंगाई होऊ नये, या उद्देशाने शासनाने बायोमेट्रिक पद्धत अंमलात आणली. मात्र, अनेक शासकीय विभागात ही प्रणाली कार्यान्वित दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. तसेच त्यांच्या कामाच्या वेळेची नोंदणी होत नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या दापोली तालुक्यात शासनाच्या सर्वच विभागात दिसत आहे. त्यामुळे शासकीय प्रशासकीय कार्यालयातील […]
Nagpur Crime News : नागपुरच्या धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तकिया वस्तीत मंगळवारी रात्री हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून २० वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडवर ईडीची चौकशी का नाही? सरपंच हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा संताप
Supriya Sule On Walmik Karad: बीड सरपंच हत्या प्ररकणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याची पुण्यात कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत त्याच्यावर ईडीची कारवाई का होत नाही असा सवाल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या राज्य कर्माचाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तसेच स्पष्ट केले की, प्रतिनियुक्ती ही तात्पुरती आहे आणि ती कर्मचाऱ्याला केंद्र सरकारचा कायमचा कर्मचारी म्हणून मान्यता देत नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय सेवा श्रेणीनुसार पेन्शन लागू होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, […]
बीडमध्ये तणाव, परळी बंद; पंकजा मुंडे म्हणतात - या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत
Pankaja Munde On Parli Beed Santosh Deshmukh Murder Case : पंकजा मुंडे यांना बीड, परळी प्रकरणावर विचारलं असता, त्यांनी याबाबत मला काही माहिती नाही, त्या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाही, असं उत्तर दिलं आहे.
'बिग बॉस' फेम अभिनेत्री झळकणार स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत; या शोमध्ये साकारणार महत्वपूर्ण भूमिका
Bigg Boss Marathi Fame Actress In Star Pravah Serial : स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
निधीअभावी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची साफसफाई आणि देखभाल करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरले आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना समन्स बजावले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना निधी देण्यास अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारला आणि नगरविकास खात्याला चांगलाच दणका दिला […]
गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रालयाचे अपयश –सुप्रिया सुळे
बारामती विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांन संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. शहरात वाहतुकीचे नियोजन नाही. त्यामुळे वाहतुक कोंडी वाढलीय. त्यासोबतच उपनगरातील पाणी, कचरा या समस्या देखील सोडवल्या गेलेल्या नाहीत. या संदर्भात आज जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा […]
रत्नागिरीतील शाळेतील आणखी एका लंपट शिक्षकाचा कारनामा उघड, विद्यार्थीनींना केले अश्लील मेसेज
विद्याथींनींशी अश्लील चाळे करणाऱ्या एका शिक्षकाचे बिंग फुटले असतानाच त्या शाळेत आणखी एका लंपट शिक्षकाचा कारनामा उघड झाला आहे. तू फार सुंदर आहेस, तू मला आवडतेस, शाळेच्या बाहेर मला भेट असा मेसेज एका शिक्षकाने विद्यार्थीनींना पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारामुळे पालकवर्गात संतापाचे वातावरण पसरले असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुला […]
Manoj Jarange Slams Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या आहेत. ही त्यांचीच टोळी आहे जी कोर्टाबाहेर पोलिसांना धमक्या देते, ही टोळी थांबली पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.
Photo –तोबा तोबा…महाकुंभ मेळ्यात ‘हर्षा’ची मोहीनी
साध्वी हर्षा रिछारिया यांची सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे. साध्वी सुंदर असल्याने त्याची चर्चा होत आहे. साध्वी हर्षा याआधी अँकर म्हणून काम करत होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बँकॉकमध्ये एका डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता. हर्षा रिछारिया या इन्स्टाग्रामवरसुद्धा ऑक्टिव असतात. या अकाऊंटवरून त्यांनी साध्वी आयुष्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. साध्वी हर्षा […]
म्हणून अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली; CID चा कोर्टात मोठा दावा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात युक्तिवाद करताना गुन्हे अन्वेषण विभागने (CID) न्यालयात मोठा दावा करत संतोष देशमुख यांच्या हत्येमागचं खरं कारण सांगितलं आहे. संतोष देशमुख […]