SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

टोरंटोहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्री नीलम कोठारी बेशुद्ध, वाचा नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांना टोरंटोमधून मुंबईला परत येताना विमानप्रवासात कोणत्या अडचणी आल्या हे मांडले आहे. त्या म्हणाल्या की, टोरंटोहून मुंबईला प्रवास करताना अचानक फ्लाइटमध्ये अस्वस्थ वाटू लागले. परंतु एअरलाइन्सकडून मात्र कोणतीही मदत न मिळाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. नीलम यांनी […]

सामना 10 Dec 2025 2:30 pm

संगमेश्वर – रत्नागिरी सकाळ सहा वाजताची एसटी अचानक बंद; विद्यार्थी संतप्त

संगमेश्वरहून रत्नागिरीकडे जाणारी सकाळी सहा वाजताची एसटी बस गेल्या सहा–सात दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एसटी बंद करण्यापूर्वी संगमेश्वर आगारात एकही सूचना,फलक,किंवा अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. या निष्काळजी कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहत असून विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. […]

सामना 10 Dec 2025 2:19 pm

शशी थरूर यांनी ‘वीर सावरकर पुरस्कार’स्वीकारण्यास दिला नकार

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना ‘वीर सावरकर’ यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, थरूर यांनी पुरस्काराचे स्वरूप आणि तो देणाऱ्या संस्थेबद्दल स्पष्टता नसल्याचे कारण देत हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार का, असे विचारले असता, त्यांनी ‘मी जाणार नाही’ असे उत्तर दिले आणि नंतर एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आपली […]

सामना 10 Dec 2025 2:18 pm

Gujrat Fire –सूरतमधील राज टेक्सटाईल मार्केटमध्ये अग्नीतांडव, आगीत इमारतीचे आठ मजले जळून खाक

गुजरातच्या सूरतमधील राज टेक्सटाईल मार्केटमध्ये बुधवारी भीषण आग लागली. इमारतीचे आठ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सूरतच्या पर्वत पटिया परिसरात बुधवारी सकाळी राज टेक्सटाईल मार्केट या इमारतीला आग लागली. सुरवातीला इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. पाहता पाहता आगीने […]

सामना 10 Dec 2025 1:59 pm

IPL 2026 Auction –लिलाव प्रक्रियेपूर्वी 9 जणांच नशीब फळफळलं; आता 359 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 ची लिलाव प्रक्रिया जसजशी जवळ येत आहे तसतसं खेळाडूंची धाकधूक वाढू लागली आहे. 350 खेळाडूंचा यापूर्वीच लिलाव प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता BCCI ने या खेळाडूंच्या यादीमध्ये आणखी 9 खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी अबुधाबीमध्ये होणाऱ्या लिलाव प्रक्रियेमध्ये देश-विदेशातील 359 खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत. IPL मध्ये खेळण्यासाठी […]

सामना 10 Dec 2025 1:58 pm

कच्चा आवळा की आवळा रस आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर?

हिवाळ्यात आवळा बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागतो. आवळा हा कोणत्याही सीझनमध्ये खाणे हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. सुपरफूड मानला जाणारा आवळा हा औषधापेक्षा कमी नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते आरोग्य सुधारण्यापर्यंत आवळा हा फार उपयुक्त मानला जातो. हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायला हवी? आवळा हा एक सुपरफुड म्हणून ओळखला जातो. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी […]

सामना 10 Dec 2025 1:57 pm

Gujrat Earthquake : कच्छमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद

गुजरातच्या कच्छ भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र धोलावीरापासून 32 किमी नैऋत्येस होते. हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 2 पाजून 28 मिनिटांनी भूकंप झाला. सुदैवाने भूकंपात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कच्छ प्रदेशात हा भूकंप जाणवला. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सामना 10 Dec 2025 1:42 pm

लवकर वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायलाच हवे, वाचा

वजन लवकर कमी करायचे असेल आणि तुमची पचनसंस्था सुधारायची असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी काही पेये पिणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही पेये केवळ आपल्या चयापचयाला गती देत ​​नाहीत तर दिवसभर ऊर्जावान देखील ठेवतात. बडीशेप पाणी : बडीशेपचा वापर अॅसिडिटी आणि पोटफुगीवर नैसर्गिक उपाय म्हणून फार पूर्वीपासून केला जात आहे. दररोज बडीशेप पाणी पिल्याने वजन […]

सामना 10 Dec 2025 1:39 pm

Kolhapur News : पेठवडगावमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काढल्याने खळबळ; स्ट्रॉंग रूमसमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या

पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीत तणाव पेठवडगाव : पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक स्ट्राँग रूम परिसरात खाजगी घरांच्या वर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटवल्याने यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन केले. आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अखेर सहाय्यक [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:39 pm

हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायला हवी?

हिवाळ्यात केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. कोमट पाण्याने केस धुणे केसांसाठी चांगले आहे कारण ते टाळूवरील घाण आणि तेल प्रभावीपणे काढून टाकते, परंतु खूप गरम पाण्याने केस धुणे हानिकारक असू शकते. खूप गरम पाणी टाळू कोरडे करू शकते, केस कमकुवत करू शकते आणि कोंडा होऊ शकते. आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे […]

सामना 10 Dec 2025 1:31 pm

Kolhapur News : पाडळी खुर्द येथे शॉर्टसर्किटमुळे उसाला भीषण आग; 12 लाखांचे नुकसान

करवीर तालुक्यात ऊस शेती भस्मसात कसबा बीड : पाडळी खुर्द तालुका करवीर येथे शॉर्ट सर्कीट होऊन ऊस शेतीला आग लागून जवळपास 12 लाखाचे नुकसान झाले आहे.ग्रामस्थ व आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस पाटील अर्चना सुरेश पाटील यांच्या माहितीनुसार पाडळी [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:30 pm

अग्नितांडव प्रकरण उच्च न्यायालयात

पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून 16 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. ऐश्वर्या अर्जुन साळगावकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित बेकायदेशीर बांधकाम, परवाना उल्लंघन [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:22 pm

‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

‘बर्च’वरील कारवाईस पुन्हा पुन्हा केला मज्जाव : हणजूणपोलिस, सीआयडीकरतहोतीकारवाई पणजी : बर्च बाय रोमिओ लेन या क्लब विरोधात कारवाई करताना एका आयपीएस अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळेच स्थानिक पोलिस कारवाई करू शकले नव्हते, हे आता उघड झाले आहे. या क्लबच्या विरोधात ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार नोंद करण्यात आली होती. मात्र त्या तक्रारीतून या क्लबचे नाव वगळण्यासाठी त्या आयपीएस अधिकाऱ्याने [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:21 pm

ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार’

मालवण । प्रतिनिधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोकण राज्य अभियानातर्फे दिला जाणारा कोकणरत्न पदवी पुरस्कार मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई आझाद मैदान जवळील मराठी पत्रकार भवन, येथे हा [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:20 pm

कळंगुटमधील 17 क्लबना तीन दिवसांची मुदत : लोबो

म्हापसा : कळंगुटमध्ये 17 क्लब आहेत. त्यांच्या आतमध्ये रेस्टॉरंटस्ही आहेत. त्यांच्याकडे सुरक्षा यंत्रणा कोणत्याच नाही, असे आढळून आले आहे. हे क्लब बंद करावे लागेल. त्यांनी नियमांप्रमाणे सर्व व्यवस्था पूर्ण केल्यावर त्यांना पंचायतीत अहवाल पाठवावा लागेल. त्यानंतरच नूतनीकरण पंचायत करील. तोपर्यंत या सर्व क्लबांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:18 pm

‘लुथरांना पळण्यास मदत केलेल्याचे माझ्याकडे पुरावे’

लुथरा ‘बुराटे’ खरा मालक राजकर्त्याचा नातलग : आमदारविजयसरदेसाईयांचासरकारवरघणाघात पणजी : हडफडे येथील बर्च क्लबचे तथाकथित मालक लुथरा बंधू यांना देशातून पळून जाण्यास कुणी मदत केली त्याचे आपणाकडे पुरावे आहेत, असे सांगताना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी लुथरा बंधू म्हणजे ‘बुराटे’ आहेत, क्लबचा खरा मालक एका बड्या राजकर्त्याचा नातलग असून तो सुरक्षित आहे, असा दावा [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:17 pm

वाटते तितके सोपे नाही!

जिल्हाविभाजनाच्यामागणीवरविधानसभेतमहसूलमंत्रीकृष्णभैरेगौडायांचेउत्तर बेळगाव : बेळगाव येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन संपण्याआधी चिकोडी व गोकाक जिल्ह्यांची घोषणा करा, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकमुखाने जिल्हा विभाजनासाठी आवाज उठवला. आता विलंब कशासाठी? अधिवेशन संपण्याआधी नव्या जिल्ह्यांची घोषणा करा, अशी मागणी करण्यात आली. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्यासंबंधी लक्षवेधी सूचना [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:12 pm

भाजपचा घेराव तर सरकारकडून अटकाव

नेते-शेतकऱ्यांनापोलिसांनीघेतलेताब्यात: रॅलीरोखल्यानेघोषणाबाजी: शेतकरी-भाजपकार्यकर्त्यांचीसभा बेळगाव : काँग्रेस सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत सुवर्णविधानसौधला घेराव घालण्यासाठी जाणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक व भाजप नेत्यांना पोलिसांनी हलगा गावानजीकच ताब्यात घेतले. मंगळवारी येडियुराप्पा रोडपासून सुवर्णविधानसौधकडे शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी काढलेली रॅली पोलिसांनी रोखल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भ्रष्टसरकारच्याविरोधातआंदोलन: विजयेंद्र सुवर्णविधानसौधला घेराव घालण्यास जाण्यापूर्वी [...]

तरुण भारत 10 Dec 2025 1:10 pm

यापुढे बेळगाव अधिवेशन जूनमध्ये?

काँग्रेससंसदीयपक्षाच्याबैठकीतविचार: विरोधकांच्याटीकेलासडेतोडउत्तरदेण्याचीसूचना बेळगाव : बेळगावात डिसेंबरऐवजी जूनमध्ये अधिवेशन भरविण्याचा विचार पुढे आला आहे. मंगळवारी रात्री काकतीजवळील खासगी हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीत हा विचार सामोरे आला असून वाढत्या आंदोलनाला वैतागून सरकारने पुढील अधिवेशन डिसेंबरऐवजी जूनमध्ये भरविण्याचा विचार मांडला आहे, अशी माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:56 pm

‘लोकमान्य’च्या सीएसआर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशनतर्फे तात्यासाहेब मुसळे विद्यालय कन्नड माध्यम कॉन्व्हेंट स्कूल येथे आनंदनगर येथील लोकमान्य सोसायटी शाखेच्या साहाय्याने आणि नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल (डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी व कर्मचारी यांच्यात डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:52 pm

लोककल्प फौंडेशनतर्फे घोसे प्राथमिक शाळेला साहित्य वितरण

बेळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून लोककल्प फौंडेशनतर्फे घोसे (ता. खानापूर) येथील मराठी प्राथमिक शाळेला ग्रीन बोर्ड, बेंच, स्टडी टेबल, स्वेटर्स आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केल्यामुळे शैक्षणिक वातावरणामध्ये सुधारणा झाली असून या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला पूरक ठरणार आहे. या साहित्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:51 pm

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

आयुर्वेदात असे म्हटले आहे की जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही ऋतूनुसार अन्न खावे. म्हणजेच हंगामी फळे, भाज्या आणि धान्ये तुमच्या आहाराचा भाग बनवा. हिवाळ्यात अशी फळे आणि भाज्या उपलब्ध असतात जी शरीराला उबदार ठेवतात आणि रोगांपासून वाचवतात. हिवाळ्यात बाजरी खाण्याचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. बाजरीची भाकरी खाण्यास चविष्ट तर असतेच शिवाय ही भाकरी […]

सामना 10 Dec 2025 12:50 pm

पोलीस महासंचालकांकडून सालीमठ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

बेळगाव : कार अपघातात सजीव दहन झालेले पोलीस निरीक्षक पंचाक्षरय्या वीरय्या सालीमठ यांच्या मुरगुड ता. सौंदत्ती येथील मूळ गावी मंगळवारी राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृत पोलीस निरीक्षक पंचाक्षरय्या हे मूळचे मुरगुड ता. सौंदत्ती येथील. सध्या राजीव गांधीनगर गदग येथे राहत होते. तसेच ते लोकायुक्त विभागात कार्यरत [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:46 pm

गजेन्द्रगड प्रकरणी तातडीच्या हस्तक्षेपासाठी निवेदन

बेळगाव : गदग जिह्यातील गजेन्द्रगड येथील होली पॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान आणि लहान चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वाद राज्यातील वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. बेळगाव डायोसिसचे प्रमुख, बिशप डेरेक फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांना तातडीच्या हस्तक्षेपासाठी मंगळवारी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:44 pm

सरकारी शाळेतील साहित्याची नासधूस

समाजकंटकांनासमजदेण्याचीपोलिसांकडेमागणी बेळगाव : कणबर्गी येथील सरकारी मराठी शाळेत समाजकंटकांकडून साहित्याची नासधूस करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. शाळेतील फरशी, जीना, पाईप, प्रवेशद्वारावरील जाळी यांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच वर्गाबाहेरील सूचना फलकावर रंग फासण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शाळेच्यावतीने माळमारुती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. समाजकंटकांकडून सरकारी शाळांना लक्ष्य करण्यात येत [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:43 pm

गोरेगाव येथे गॅल सिलिंडरचा स्फोट होऊन लागली आग, तीन जण जखमी

गोरेगाव येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तिघं जण जखमी झाले आहेत. ही घटना गोरेगाव पश्चिम येथील शहीद भगतसिंग नगर-2 येथील राजाराम चाळीमध्ये घडली. तर तळमजल्यावरील 180 आणि 181 क्रमांकाच्या खोल्यांमध्ये भिंत कोसळली. सकाळी 7 वाजून 42 मिनीटांनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळली. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच रहिवाशांनी पाण्याच्या बादल्यांनी […]

सामना 10 Dec 2025 12:38 pm

भात कापणी-मळणीसह सुगीची कामे अंतिम टप्प्यात

ऊसतोडणीच्याकामालाहीप्रारंभ: जांबोटी-ओलमणीपरिसरातीलशेतकरीवर्गाचीएकचधावपळ वार्ताहर/जांबोटी जांबोटी-ओलमणी परिसरात भात कापणी व भात मळणी आदी सुगीची कामे अंतिम टप्प्यात आली असून मळण्याच्या कामांना सर्वत्र वेग आल्यामुळे शेतकरी वर्गाची एकच धावपळ सुरू आहे. या परिसरात यावर्षी मे महिन्यापासूनच मान्सूनचा पावसाने शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी साथ दिल्यामुळे खरीप हंगामातील भात पेरणीसह, भात रोप लागवड, रताळी लागवड, भुईमूग शेंगा पेरणी, नाचणी लागवड आदी [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:38 pm

उचवडे रस्त्याचे डांबरीकरण करा

शेतकऱ्यांचीमागणी: आमदारविठ्ठलहलगेकरयांनादिलेनिवेदन वार्ताहर/किणये उचवडे गावाकडे जाणाऱ्या मुख्य व शिवारातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक धोकादायक बनले आहे. तसेच गावापासून ओलमणीकडे जाणाऱ्या शिवारातील कच्च्या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. सध्याही हा रस्ता कच्च्या स्वरुपाचाच आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी उचवडे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार विठ्ठल [...]

तरुण भारत 10 Dec 2025 12:36 pm

VVIP लोकांसाठी १४३ कोटींची तरतूद, सरकारची प्राथमिकता शेतकरी नसून मौजमजा आणि उधळपट्टी; रोहित पवारांची सडकून टीका

इंडिगो कंपनीचा भोंगळ कारभार साऱ्या देशाने पाहिला. मोठ्या प्रमाणात विामन उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवशांचा संताप झाला. मुंबईमध्ये रेल्वे पकडण्यासाठी जशी गर्दी होते, तशी अभुतपूर्व गर्दी विमानतळांवर झाली होती. एकीकडे नागरिकांची हेळसांड सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये, अशी गंभीर परिस्थिती असताना सरकारने VVIP लोकांच्या हवाई प्रवासासाठी तब्बल १४३ कोटींची तरतूद केली आहे. आमची प्राथमिकता […]

सामना 10 Dec 2025 12:32 pm

Goa Club Fire –रुग्ण असल्याचे भासवत रुग्णालयात लपला होता अजय गुप्ता; पोलिसांनी दिल्लीत केली अटक

गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये ७ डिसेंबर रोजी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात गोवा पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. याच प्रकरणात अजय गुप्ताला दिल्लीत अटक करण्यात आली होती. अजयला मणक्याच्या आजारामुळे लाजपत नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिस त्याला हॉस्पिटलमधून सन लाईट कॉलनी येथील गुन्हे […]

सामना 10 Dec 2025 12:32 pm

थंडीचा हंगाम सुरु झाला; कोकणच्या समुद्रकिनारी स्थलांतरीत पक्षांची लगबग

थंडीचा हंगाम सुरु झाला की, कोकणात विविध परदेशी पक्षांचे आगमन होते. प्रथम आगमन होते ते पांढऱ्यासह विविध रंगांच्या बगळ्यांचे. हे बगळे दरवर्षी आपला मुक्काम ठराविक ठिकाणीच करतात, हे एका पाहणीत आढळून आले आहे. बगळ्यांच्या पाठोपाठ थव्याने आगमन होते ते सीगल पक्षांचे. सीगल हे रायगड आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीवर येतात आणि स्थिरावतात. मात्र, बगळे आपला मुक्काम नदी […]

सामना 10 Dec 2025 12:13 pm

अक्षय खन्नाचा ‘हा’लूक पाहून भरेल धडकी, आगामी चित्रपटाचे पोस्टर होतेय व्हायरल

धुरंदर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहेत. या चित्रपटात अक्षय खन्नाने वठवलेली रेहमान डकैतची भूमिका तर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षयचे डायलॉग, त्याचा डान्स, त्याचे एक्सप्रेशन, त्याने दाखवलेली क्रूरता सर्वच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे रेहमान डकैतच्या भूमिकेवरून अक्षय खन्नाचे कौतुक होत असतानाच त्याच्या आगामी तेलगू चित्रपटातील लूक व्हायरल झाला […]

सामना 10 Dec 2025 12:08 pm

सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल संघटना अध्यक्षपदी आनंद गवस

उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पटेल, सचिवपदी मंदार प्रभू, तर खजिनदारपदी अवधूत साळगावकर प्रतिनिधी बांदा सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल संघटनेची वार्षिक सभा शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव येथे रविवारी संपन्न झाली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड केली. यामध्ये अध्यक्षपदी आनंद विष्णु गवस, रा. बांदा यांची उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम देवजी पटेल रा. कुडाळ, सचिव मंदार प्रभू रा. कुडाळ,खजिनदारपदी अवधूत सतीश साळगावकर. [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:34 am

ट्विटमधील एका व्हिडीओने मिंधे गट बावचळला! अंबादास दानवे यांचा पुन्हा निशाणा

लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर पैशांच्या बंडलांची रास पडलीय, असा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला. ‘हा आमदार कोण आहे, पैशांच्या गड्डय़ांसह तो काय करतोय’, असा सवाल त्यांनी या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. दानवे यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र या ‘मनीबॉम्ब’ने शिंदे गटाचे […]

सामना 10 Dec 2025 11:28 am

वेंगुर्ले तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

६१ प्रतिकृतींचा सहभाग वेंगुर्ले : प्रतिनिधी रा. कृ. पाटकर हायस्कुल व रा. सी. रेगे ज्युनिअर कॉलेज वेंगुर्ले येथे तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वेंगुर्ले तालुका गटविकास अधिकारी तथा प्रशासक वासुदेव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटकर, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. वैभव शिंदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच केंद्रप्रमुख [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:27 am

पाच विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट

बेळगाव : ताशिलदार गल्ली येथील श्री सोमनाथ मंदिरातील हॉलमध्ये कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. बेळगाव जिल्हाक्रीडा संघटनेच्या पाच कराटेपटूना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. या परीक्षेत एकूण 55 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. टॉप 3 ब्लॅक बेल्ट विद्यार्थी-प्रदीप मारीगोद्रा, प्रतीक्षा मारीगोद्रा, वैष्णवी होनगेकर यांनी बेल्ट मिळविले. बाळू गोरल, डॉ. प्रकाश राजगोळकर, कर्नल राज शुक्ला, [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:26 am

सिद्धांत कडालीची निवड

वार्ताहर/किणये खादरवाडीचा मल्ल सिद्धांत कडालीने नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याने त्यांची 14 वर्षाखालील आणि 62 किलो वजन गटामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा 25 ते 30 डिसेंबर दरम्यान उझबेकिस्तान येथे होणार आहेत. सिध्दांतने अनेक ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये विविध पारितोषिके मिळविली आहेत. सिद्धांत हा मराठा मंडळ खादरवाडी [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:24 am

दोड्डण्णावर स्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

वार्ताहर/किणये भरतेश शिक्षण संस्था संचलित हलगा येथील जे. आर. दोड्डण्णावर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. अध्यक्षस्थानी बी. एस. कडेमनी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भरतेश शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद दोड्डण्णावर होते. या स्पर्धांचे उद्घाटन एस. टी. शहापुरी, नीरज दोड्डण्णावर, बाबू देसाई, टी. पी. चौगुले, आर. एस. कुळगेकर, सविता पाटील यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापिका नलिनी [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:23 am

सेंट झेवियर्स फुटबॉल संघ विजेता

बेळगाव : माळमाऊती येथील लव्हडेल शाळेच्या टर्फ मैदानावर मानस फुटबॉल अकादमी आयोजित झेवियर्स चषक आंतर शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने संत मीराचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. सकाळी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने सेंट जोसेफचा 2-0 गोल फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. झेवियर्सतर्फे मारिया मुजावर व वैष्णवी गावडे यांनी प्रत्येकी [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:19 am

प्रमोद पालेकर अकादमीकडे अलाबल चषक

संग्रामपाटीलमालिकावीर, तुफाननदाफसामनावीर बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अपॅडमी आयोजित एस. बी. अलाबाल चषक 10 वर्षाखालील अंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रमोद पालेकर क्रिकेट अपॅडमीने के. आर. शेट्टी लायाजचा 35 धावांनी पराभव करून एस. बी. अलाबाल चषक पटकाविला. संग्राम पाटील मालिकावीर, तुफान नदाफ सामनावर ठरले. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती झालेल्या अंतिम सामन्यात प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने प्रथम [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:17 am

उत्तर कर्नाटकावरील चर्चेला विलंबाचा शुभमुहूर्त

काँग्रेस-भाजपमध्ये वादावादी : कामकाज विलंबाने सुरू झाल्याने विरोधक संतप्त : विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपामुळे सत्ताधारी आमदार आक्रमक बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चेला सुरुवात झाली. सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांमध्ये वादावादीचा प्रसंगही घडला. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारवर उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:12 am

उत्तर कर्नाटक विकासावर विधानपरिषदेत चर्चा

बेळगाव : हिवाळी अधिवेशनात बुधवारचा दिवस उत्तर कर्नाटकाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार (आज) विधानपरिषदेत उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी व आमदार सी. टी. रवी यांनी उत्तर कर्नाटकाच्या विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधक सभागृहाला खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल [...]

तरुण भारत 10 Dec 2025 11:10 am

आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे की पांढरे?

हिवाळा आल्यावर आपल्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. तीळ हे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. बाजारात उपलब्ध असणारे दोन प्रकारचे तीळ हे आपल्याला माहीत आहेत. काळे आणि पांढरे तीळ. पोषणतज्ञ म्हणतात की, पांढरे आणि काळे तीळ हे दोन्ही आपल्यासाठी फायदेशीर आहेत. काळे तीळ साल न काढता खाल्ले जातात. त्यांची साले अँटिऑक्सिडंट्स आणि […]

सामना 10 Dec 2025 11:08 am

कळसुबाई शिखरावर पर्यटकांचे प्रचंड हाल, लहान मुले, महिला, वृद्धांची प्रचंड गैरसोय

कळसुबाई हे राज्यातील सर्वात उंच शिखर. शनिवार-रविवार जोडून आला की येथे आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, एवढय़ा गर्दीसाठी आवश्यक व्यवस्थापन नसल्याने पर्यटकांना अक्षरशः अडचणी आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे. यातील लहान मुले, महिला आणि वृद्धांचे सुविधेअभावी हाल होत आहेत. शनिवार-रविवारी शिखरावर हजारोंचे लोंढे जमा होतात. शिखराच्या मध्यभागी एकाच अरुंद शिडीवरून जाणे-येणे सुरू […]

सामना 10 Dec 2025 11:00 am

अहिल्यानगर जैन मंदिर भूखंड प्रकरण, आमदार जगताप यांची माघार; तीन महिन्यांत जागा परत करणार

‘माता मंगूबाई व्होरा यांनी जैन समाजाला दिलेली जागा आम्ही तीन महिन्यांच्या आत समाजाला हस्तांतरित करू, असे वचन आमदार संग्राम जगताप यांनी दिले आहे,’ असे जैन समाजाचे क्रांतिकारी राष्ट्रसंत आचार्य गुप्तिनंदीजी यांनी सांगितले. ‘आज सकाळी आमची भेट झाली तेव्हा ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा, गणेश गोंडाळ हेही उपस्थित होते,’ असेही आचार्य म्हणाले. जैन समाजाचे राष्ट्रसंत आचार्य गुप्तिनंदीजी […]

सामना 10 Dec 2025 10:37 am

उत्तर हिंदुस्थान गारठला; महाराष्ट्राला थंडीचा यलो अलर्ट जारी

डिसेंबर महिन्यात राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढत आहे. आता येत्या आठवड्यात थंडी महाराष्ट्राला गारठवणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या जोरदार प्रवाहामुळे राज्यातील गारठा वाढत आहे. येत्या आठवड्यात उत्तरेकडून थंड वारे मोठ्या प्रमाणात वाहणार असल्याने राज्यात पुढील काही दिवसांसाठी थंडीची लाट येणार आहे. गेल्या 24 तासात राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील तीन ते चार […]

सामना 10 Dec 2025 10:30 am

‘पीडब्ल्यूडी’ अभियंत्याचे कॅशकांड, निधी मंजुरीसाठी कंत्राटदारांकडून टक्केवारी मनसेचा आरोप

सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण झपाटय़ाने दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी कामासाठी निश्चित रक्कम ठरलेली असायची आणि त्या रकमेतून ठरावीक टक्केवारी घेतली जायची. मात्र, आता परिस्थिती बदलली असून शासनाकडून निधी मंजुरीसाठी रोख रकमेत कंत्राटदाराकडून टक्केवारी उकळली जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. हाफकिन शाखेतील ‘पीडब्ल्यूडी’ अभियंत्याच्या कॅशकांडचा व्हिडीओ मनसेकडून व्हायरल करण्यात आला […]

सामना 10 Dec 2025 9:55 am

‘नो मिल्स’ चा पर्याय निवडला तरी पाणी मोफत

राजधानी, वंदे भारत, शताब्दी यासारख्या प्रिमिअम ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी ट्रेनचे तिकीट बुक करताना ‘नो मिल्स’ पर्याय निवडला तरी त्यांना पाण्याची बाटली मोफत मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना पाणी मोफत मिळेल. भले त्यांनी खाण्याचे पॅकेज घेतलेले असेल किंवा नसेल. पाणी ही प्रवाशांची मूलभूत गरज मानून मोफत […]

सामना 10 Dec 2025 9:45 am

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला नातेवाईकांची मारहाण

फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील डॉक्टरला अज्ञात व्यक्तींनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे.आईला उद्धट बोलल्याच्या कारणावरून ही घटना घडली असून, पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टर गायकवाड यांना पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर आरोग्यसेवेतील कर्मचाऱयांनी सामूहिक ‘काम बंद’ आंदोलन […]

सामना 10 Dec 2025 9:37 am

देश – विदेश –व्यक्तिमत्त्व हक्कासाठी ज्यु. एनटीआर हायकोर्टात

वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर विनापरवानगी नाव, छायाचित्रांचा वापर केला जात आहे. यामुळे माझी प्रतिमा मलीन होत आहे, असे सांगत व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणासाठी ज्युनिअर एनटीआर यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. एनटीआर यांच्या वकिलाने कोर्टात दावा केला आहे की, काही वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाऊंटस्वर ज्युनिअर एनटीआरचा विनापरवानगी फोटो, व्हिडीओची विक्री केली जात असून ती प्रसारित केली जात […]

सामना 10 Dec 2025 9:36 am

कांदा, लसणामुळे 11 वर्षांचा संसार मोडला

अहमदाबाद येथील घटस्फोटाचे प्रकरण चर्चेत आले आहे. स्वयंपाकात लसूण आणि कांदा वापरण्यावरून जोडप्यातील वाद विकोपाला गेला व 11 वर्षांनंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर पडली. पत्नीच्या खाण्यापिण्याच्या निर्बंधामुळे त्रस्त नवऱ्याने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि तो मंजूरही झाला. संबंधित जोडप्याचे लग्न 2002 साली झाले होते. पत्नी स्वामीनारायण संप्रदायाची अनुयायी आहे. त्यामुळे […]

सामना 10 Dec 2025 9:35 am

1 जानेवारीपासून बदलणार डिजिटल बँकिंगचे नियम

नव्या वर्षात 1 जानेवारीपासून डिजिटल बँकिंगचे नियम बदलण्यात येणार आहेत. डिजिटल बँकिंग म्हणजेच इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि अन्य दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर सेवा देणारे प्लॅटफॉर्म होय. यामध्ये ट्रान्झॅक्शनची बँकिंग सर्व्हिस कर्ज, फंड ट्रान्सफर आणि बॅलेंस चेक, स्टेटमेंट डाउनलोड करणे यांचा समावेश आहे. नव्या नियमांतर्गत युजर्सला नोंदणीसाठी, बँकेचे नियम आणि अटी सोप्या शब्दांत सांगाव्या लागतील. यामध्ये […]

सामना 10 Dec 2025 9:33 am

सामना प्रभाव –फुलाचा पाडा शाळेत शिक्षक हाजीर हो ! जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आदेश

फुलाचा पाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा भार एकाच शिक्षिकेच्या खांद्यावर टाकण्यात आला होता. त्यामुळे २७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले. याप्रकरणी दैनिक ‘सामना’ वृत्तपत्राने दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने दुसऱ्या शिक्षिकेला तत्काळ फुलाचा पाडा शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले. बोईसर पूर्वेकडील लालोंडे फुलाचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत तब्बल २७ विद्यार्थी […]

सामना 10 Dec 2025 9:30 am

जयश्रीच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया, व्ही. शांताराम चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक आणि निर्माते शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आलीय. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत आहे. व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा भावस्पर्शी प्रवास जयश्री या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. हा चित्रपट नवीन […]

सामना 10 Dec 2025 9:25 am

स्ट्राँगरूम परिसरात घरांवर खासगी सीसीटीव्ही

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक स्ट्राँगरूम परिसरात घरांवर लावलेले खासगी सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटविले. यानंतर यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमसमोर आंदोलन करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींना 24 तासांत स्ट्राँग रूममध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला. […]

सामना 10 Dec 2025 9:22 am

H-1B Visa अनेकांच्या अपॉइंटमेंट्स पुढे ढकलल्या; अमेरिकेच्या सोशल मीडिया नियमांचा परिणाम

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (US State Department) लागू केलेल्या नवीन सोशल मीडिया तपासणी धोरणामुळे हिंदुस्थानातील एच-1बी (H-1B) व्हिसा अर्जदारांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक अपॉइंटमेंट्स पुढील वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानातील यूएस दूतावासाने (US Embassy) मंगळवारी रात्री व्हिसा अर्जदारांना एक सूचना जारी केली. ‘जर तुम्हाला तुमचा व्हिसा अपॉइंटमेंट पुनर्निर्धारित (rescheduled) […]

सामना 10 Dec 2025 9:07 am

11 महिन्यांत 11.7 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, 2025 वर्ष टेक कर्मचाऱ्यांसाठी राहिले आव्हानात्मक

2025 वर्ष जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक राहिले. अर्थतज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जगभरातील कंपन्यांनी 11.7 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. 2020 मधील कोरोना महामारीच्या काळातील 22 लाख कपातीनंतरचा हा मोठा आकडा आहे. 2024 च्या तुलनेत त्यामध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विकास दरात घट, एआय ऑटोमेशनचा वाढता वापर, महामारीनंतरची अतिरिक्त कर्मचारी भरती […]

सामना 10 Dec 2025 9:05 am

जनगणनेसाठी 15 जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्ति करा, देशाच्या निबंधकाचे सर्व राज्यांना निर्देश

15 जानेवारी 2026 पर्यंत जनगणना कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे संपूर्ण काम पूर्ण करा, असे निर्देश रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) ने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. जनगणना कर्मचारी हेच मोठा डेटा जमा करण्याच्या कामासाठी जबाबदार आहेत. यासंबंधी एक अधिसूचना जारी करण्यात आली असून यात म्हटले की, जनगणनादरम्यान डेटा जमा करण्याचे काम गणनाकार आणि सुपरवायझर […]

सामना 10 Dec 2025 9:00 am

व्हायरल व्हिडीओ गद्दार सेनेचा! बॅगेत आनंदाचा शिधा होता काय? आदित्य ठाकरे यांचा हल्ला

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारले. शिवसेनेचा आमदार पैशांच्या बंडलांसोबत बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे असे पत्रकार म्हणताच, ते शिवसेनेचे नाहीत तर गद्दार टोळीचे आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेतृत्वाखालील अधिकृत खात्यावरूनच तो व्हिडीओ ट्विट झाला आहे, असे ते पुढे म्हणाले. प्रचाराच्या नावाखाली हेलिकॉप्टरमध्ये दोन मोठय़ा […]

सामना 10 Dec 2025 9:00 am

१३ सायबर चोर रायगड पोलिसांच्या जाळ्यात

सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत सायबर क्राईमच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे ८ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगारांनी २ कोटी २७ लाख ८२ हजार ६०९ रुपयांचा डल्ला मारला होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली असून २ कोटी ६२ […]

सामना 10 Dec 2025 8:49 am

सहलीच्या बसचा बोरघाटात ब्रेक फेल; ४० विद्यार्थी बचावले चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

काळ आला होता, पण वेळ नाही… याचा प्रत्यय आज सकाळी बोरघाटात आला. जुन्नर-निमगाव येथून कोकण दर्शन घेण्यासाठी चाललेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचे अचानक ब्रेक फेल झाले आणि सर्वांची पाचावर धारण बसली. चालक, वाहक तसेच शिक्षकांनी देवाचा धावा केला. भेदरलेले विद्यार्थीही रडू लागले. पण अवघ्या काही क्षणातच चालकाने शिताफीने नियंत्रण सुटलेल्या बसवर ताबा मिळवला आणि बस रस्त्याच्या […]

सामना 10 Dec 2025 8:47 am

जंजिरा किल्ला, निसर्ग आणि निळाशार समुद्र, विद्यार्थ्यांच्या सहलीने मुरुड गजबजले

दिवाळीच्या सुट्टीनंतर शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून कोकणचा निसर्ग, जंजिरा किल्ला आणि निळाशार समुद्र पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली मुरुडमध्ये दाखाल होत आहेत. मुरुडचे समुद्रकिनारे मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेले आहेत. शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहली रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळी मोठ्या […]

सामना 10 Dec 2025 8:44 am

71 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आज 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सवाईच्या 71 व्या महोत्सवाला सुरुवात होईल. मुपुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी 10 ते 14 डिसेंबर दरम्यान 71 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी सुमारे 8 ते 10 हजार संगीत रसिकांना सामावून […]

सामना 10 Dec 2025 8:42 am

गुटखा माफियांना मकोका लावणार; कायद्यात सुधारणा करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

गुटखा विक्रेत्यांना मकोका लावण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला होता, त्यावर विधी व न्याय विभागाच्या मतानुसार धमकी व इजा असे गुन्हा असल्याशिवाय मकोका लावता येत नाही. त्यामुळे कायद्यात बदल करून दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात गुटखाबंदी असतानाही नवी मुंबई, अहिल्यानगर, जालना, अकोला, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ […]

सामना 10 Dec 2025 8:38 am

देवाभाऊ आम्हाला चॉकलेट नको, काम द्या

महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या बहिणींच्या तरुण मुलांना काम देऊ अशी हमी देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाही सुरू केली. तरुणांनी 11 महिन्यांचे प्रशिक्षणही घेतले. मात्र त्याला दोन वर्षे झाली. तरीही त्यांच्या हाताला ना काम आहे, ना रोजगार. त्यामुळे एकनाथ मामा आणि देवाभाऊ मामा, आम्हाला चॉकलेट नको, तर काम द्या, असा […]

सामना 10 Dec 2025 8:20 am

जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण; पाणीपुरवठा सुरळीत, 75 वर्षे जुनी पाइपलाइन नव्याने टाकली

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रला पाणीपुरवठा करणारी 75 वर्षे जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम पालिकेकडून पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत असून सोमवार, मंगळवार मुंबईच्या 17 विभागांत करण्यात आलेली 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून पाण्याची वहनक्षमता गमावलेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. मोठय़ा व्यासाच्या नव्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने बदलण्यात […]

सामना 10 Dec 2025 8:20 am

निवडणूक आयुक्तांच्या निवडीची सदोष पद्धत बदला! शिवसेनेची जोरदार मागणी

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचीच निवड पद्धतीच सदोष आहे. सत्ताधीशांच्या मेहरबानीने नियुक्ती होत असल्याने निवडणूक आयोग हा सत्ताधाऱयांच्या ताटाखालचे मांजर बनला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निवडीची पद्धत बदलून या प्रक्रियेत देशाच्या सरन्यायाधीशांचाही समावेश व्हायला हवा, अशी जोरदार मागणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी आज लोकसभेत केली. निवडणूक सुधारणाविषयक चर्चेत देसाई बोलत होते. ‘सरकारमधील ठराविक लोक मुख्य निवडणूक […]

सामना 10 Dec 2025 8:20 am

पुरातत्त्व विभाग परवानगी देत नाही ही सबब सांगू नका, हायकोर्टाने सरकारला सुनावले

राज्यातील न्यायालयीन इमारतींची दुर्दशा झाली असून त्याची दुरुस्ती तसेच त्या वास्तूंना हेरिटेज दर्जा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे बोल सुनावले. पुरातत्त्व विभाग परवानगी देत नाही ही सबब चालणार नाही. पुरातत्त्व विभाग हा सरकारचाच भाग असून परवानग्या कशा मिळवायच्या ते तुम्ही पहा, असे खडसावत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने कार्यवाहीचा आराखडा सुनावणीवेळी […]

सामना 10 Dec 2025 8:12 am

रिलायन्स संचालकाविरोधात सीबीआयकडून गुन्हा

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहातील रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीच्या संचालक आणि प्रवक्त्याविरोधात सीबीआय मुंबईने गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच सीबीआयने मुंबई आणि पुणे येथील निवासस्थानावर छापे मारले. युनियन बँक इंडियाचे 228 कोटी बुडवले आणि बँक ऑफ महाराष्ट्राची 57.47 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे.

सामना 10 Dec 2025 8:12 am

निवडणूक आयोगाला नागरिकत्वाचा प्राथमिक निर्णय घेण्याचा अधिकार नाही का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

एखादा मतदार हिंदुस्थानी नागरिक आहे की नाही, याची चौकशी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का किंवा तो हिंदुस्थानी नागरिक आहे की नाही याचा प्राथमिक निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. यासंदर्भात गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे. विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या ‘एसआयआर’च्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज […]

सामना 10 Dec 2025 8:12 am

ट्रेंड –याला म्हणतात जबरा फॅन

क्रिकेटची जबरदस्त क्रेझ दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. लग्नाचा मंडप, सजावट, पाहुणे, वाद्यांचा गजर सगळं एकीकडे, पण नवरदेवाचे मन मात्र विराट कोहलीच्या दमदार खेळीकडे अडकलेले दिसतेय. लग्न सुरू असतानाच नवरदेव मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहताना दिसतो. नवरदेव लग्नाच्या मंडपात लग्नाच्या विधींसाठी बसलाय, पण त्याचे लक्ष विरटाच्या बॅटिंगकडे आहे. हे सगळे पाहून शेजारी बसलेली नवरीही हसू आवरू […]

सामना 10 Dec 2025 8:05 am

पुण्यात भाजपची व्होट चोरी उघड, महाविकास आघाडीकडून सीसीटीव्ही पुराव्यांसह भंडाफोड

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱयांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयातील काही अधिकाऱयांना हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये फेरफार करून घेतल्याचा भंडाफोड महाविकास आघाडीने केला आहे. महापालिकेकडूनच माहिती अधिकारातून मिळालेल्या संवादांसह सीसीटीव्ही पुरावे पत्रकार परिषदेत सादर करत भाजपची व्होटचोरी उघडकीस आणली आहे. असाच प्रकार शहरात अन्य क्षेत्रिय कार्यालयांतही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची […]

सामना 10 Dec 2025 8:04 am

मी माझ्या पगाराकर समाधानी! विभागीय आयुक्त राजेश खकले यांची नेमप्लेट चर्चेत

नागपूर विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खकले यांनी आपल्या कार्यालयाच्या टेबलाकरील एका हटके नेमप्लेट सर्वांचे लक्ष वेधले आहे. खकले यांनी आपल्या नेमप्लेटकर ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे,’ अशी ओळ लिहिली आहे. सरकारी कार्यालये खाबुगिरीसाठी बदनाम आहेत. अशावेळी खवले यांनी उचललेले हे पाऊल अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी धडा देणारे आहे.

सामना 10 Dec 2025 8:02 am

शिवडीचे पोस्ट ऑफिस दादरला स्थलांतरित करू नका! शिवसेनेची आग्रही मागणी 

केंद्रीय पोस्टल खात्याच्या आदेशाने शिवडी पोस्ट ऑफिसचे दादर पोस्ट कार्यालयात विलीनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शिवडी परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस संबंधित कामासाठी आता दादर टी.टी. येथे हेलपाटे घालावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. तसेच हे विलीनीकरण रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेने मुख्य पोस्ट मास्तर यांच्याकडे केली. शिवडी पोस्ट ऑफिस हे […]

सामना 10 Dec 2025 8:00 am

मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

शिवसेना शाखा क्र. 192 तर्फे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती’ या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे करण्यात आले. या दिनदर्शिकेत छत्रपती शिवरायांच्या 12 गडदुर्गांची उत्कृष्ट छायाचित्रे तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 11 व तामीळनाडूतील […]

सामना 10 Dec 2025 7:57 am

अलिबागच्या नागावात बिबट्याचा धुमाकूळ; सहा जणांवर हल्ला, पर्यटकांना फिरण्यास बंदी

निसर्गरम्य नागावमधील वाळंज पारोडा या भागात आज सकाळी बिबटय़ा घुसला आणि ग्रामस्थांची अक्षरशः पाचावर धारण बसली. या बिबटय़ाने दिवसभर धुमाकूळ घालत सहा जणांवर हल्ला केला. त्यातील काही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बिबटय़ा आला रे.. अशी खबर गावात पोहोचली आणि सर्वांचीच तंतरली. खबरदारी म्हणून नागावमधील शाळादेखील सोडल्या असून पर्यटकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली […]

सामना 10 Dec 2025 7:55 am

हे करून पहा दाढ दुखत असेल तर…

दाढदुखी होत असेल तर सर्वात आधी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून 30 सेकंद चूळ भरा. हे हिरडय़ांमधील सूज कमी करण्यास मदत करू शकते. स्वच्छ आणि सुती कपडय़ात बर्फाचा तुकडा ठेवून दाढ दुखत असलेल्या बाहेरच्या भागात काही मिनिटे ठेवा. यामुळे सूज आणि वेदना कमी होतात. लवंग तेलाचे काही थेंब कापसावर घेऊन दुखऱया दाढीवर […]

सामना 10 Dec 2025 7:54 am

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 10 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com मेष ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळणार आहे आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे आर्थिक – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस मंगलमय वातावरणात जाणार आहे वृषभ ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म […]

सामना 10 Dec 2025 7:02 am

लोकसभेत ‘एसआयआर’वर शब्दयुद्ध

निवडणूक आयोगाच्या अधिकारावर विरोधी पक्षांचे प्रश्नचिन्ह : सत्ताधाऱ्यांकडून प्रत्यारोपांचा घणाघात वृत्तसंस्था / नवी दिल्ली निवडणूक सुधारणा आणि ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ या मुद्द्यांवर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शब्दयुद्ध झाले आहे. अशा प्रकारे मतदारसूचीचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला नाही, असा आरोप विरोधकांनी केला. तर विरोधी पक्ष त्यांचे निवडणुकांमधील अपशय लपविण्यासाठी यंत्रणेला दोष देऊन [...]

तरुण भारत 10 Dec 2025 6:58 am

मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकसी

अध्याय तिसरा दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेली आत्मज्ञान आणि बुद्धियोगाची माहिती अर्जुनाने ऐकली. अर्थातच अजूनही त्याच्या मनाचे समाधान झालेले नसल्याने युध्द न करण्याचा त्याचा निर्णय तसाच होता. आता भगवंतांना त्यांच्याच बोलण्यात अडकवावे म्हणून त्याने भगवंतांना विचारले, “हे जनार्दना! कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे तुमचे मत आहे, तर मग हे केशवा, मला कौरवांशी युद्ध करून त्यांना मारण्याचे [...]

तरुण भारत 10 Dec 2025 6:55 am

शेअरबाजारात दुसऱ्या दिवशी पडझड सुरुच

फेडरल निर्णयाबाबत चिंता, सेन्सेक्स 436 अंकांनी नुकसानीत मुंबई : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण अनुभवायला मिळाली. सेन्सेक्स 436 अंकांनी घसरला होता. आयटी समभागांवर दबावाचे वातावरण मंगळवारी होते. याचदरम्यान मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 436 अंकांनी घसरत 84666 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 120 अंकांनी घसरत [...]

तरुण भारत 10 Dec 2025 6:55 am

भारतामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांचे नुकसान : ट्रम्प

स्वस्त तांदळाच्या डम्पिंगचा आरोप : अतिरिक्त आयातशुल्क लादण्याचा इशारा वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिका भारतातून येणारा तांदूळ आणि कॅनडातून येणाऱ्या खतांवर अतिरिक्त शुल्क लादण्याचा विचार करत आहे. इतर देशांमधून येणारी स्वस्त सामग्री अमेरिकेच्या शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवत असल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या आर्थिक मदतीच्या घोषणेवेळी केला आहे. भारत, व्हिएतनाम आणि थायलंड यासारखे देश अमेरिकेत अत्यंत [...]

तरुण भारत 10 Dec 2025 6:54 am

विनाअनुमती लडाखमध्ये पोहोचला चिनी नागरिक

सीमकार्डही केले खरेदी : पोलिसांनी घेतले ताब्यात वृत्तसंस्था/ लेह श्रीनगरमध्ये व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि लडाख तसेच काश्मीरच्या संवेदनशील भागांमध्ये विनाअनुमती पोहोचल्याप्रकरणी चीनचा नागरिक हु कॉन्गताईला ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्याच्या विरोधातील तपासाला वेग मिळाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याचा मोबाइल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून तो संवेदनशील माहिती विदेशात पाठवत होता का हे जाणून घेण्याचा प्रयत्न [...]

तरुण भारत 10 Dec 2025 6:53 am

रवींद्र चव्हाण-नीलेश राणे ‘सत्तासंघर्षा’त विजय कुणाचा?

कोकणचे नेते नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू मानले जाते. 1990 साली ते सर्वप्रथम आमदार झाले. त्यानंतर 2024 पर्यंत सिंधुदुर्गात जेवढ्या निवडणुका झाल्या, त्या सर्व नारायण राणे या नावाभोवतीच फिरत राहिल्या. राणेंमुळे सुरुवातीच्या काळात ‘शिवसेना विरुद्ध काँग्रेस’ आणि 2005 नंतर ‘राणे विरुद्ध ठाकरे’ असा राजकीय संघर्ष सिंधुदुर्गात पाहायला मिळाला. राणे आज भाजपचे खासदार आहेत. [...]

तरुण भारत 10 Dec 2025 6:53 am

शिवसेनेच्या मनीबॉम्बवर शिंदे गटाचा आमदार घायाळ, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले; पैशांच्या बंडलांसोबत दिसणारा ‘तो’ आमदार कोण? अंबादास दानवे यांच्या व्हिडीओमुळे उडाली खळबळ

लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर पैशांच्या बंडलांची रास पडलीय, असा व्हिडीओ आज शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला. ‘हा आमदार कोण आहे, पैशांच्या गड्डय़ांसह तो काय करतोय’, असा सवाल त्यांनी या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. दानवे यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र या ‘मनीबॉम्ब’ने शिंदे गटाचे अलिबागचे आमदार […]

सामना 10 Dec 2025 5:30 am

निवडणूक आयोग बनलाय सरकारच्या हातचे बाहुले! राहुल गांधी यांचे संसदेत वादळ

मतचोरीच्या मुद्दय़ावर देशभरात रान उठवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत वादळ निर्माण केले. निवडणूक सुधारणांवरील चर्चेत भाग घेताना राहुल यांनी भाजप, निवडणूक आयोग व मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. निवडणूक आयोग सरकारच्या हातचे बाहुले बनलाय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकसभेत राहुल यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावरून सरकारला घेरले. ‘मतचोरी हे सर्वात मोठे राष्ट्रविरोधी […]

सामना 10 Dec 2025 5:28 am

लाडक्या बहिणींना विरोध कराल तर घरी बसावे लागेल! फडणवीसांनी आपल्याच आमदाराला बजावले

प्रत्येक गोष्टीत ‘लाडकी बहीण’ आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका अन्यथा तुम्हाला घरी बसावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना आज विधानसभेत झापले. गुटखा व अमली पदार्थाच्या विक्रीच्या संदर्भातील लक्षवेधी चर्चेत भाग घेताना भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार थेट लाडक्या बहिणींच्या मुद्दय़ावर घसरले. ग्रामीण भागात अवैध दारूची […]

सामना 10 Dec 2025 5:22 am

वडिलांच्या नव्हे, आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार एससी प्रमाणपत्र; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

मुलीच्या शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. या मुलीला आईच्या जातीच्या आधारे जात प्रमाणपत्र जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. या मुलीची आई मागासवर्गीय असून तिने मागासवर्गीय नसलेल्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. बदलत्या काळानुसार जात प्रमाणपत्र आईच्या जातीच्या आधारे का दिले जाऊ नये, असा प्रश्न सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी यावेळी […]

सामना 10 Dec 2025 5:20 am

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा पुतळा बसवणार, शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर अखेर सरकार नमले

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या विषयाचा लोकसभेत सतत पाठपुरावा केला. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी पत्र पाठवून […]

सामना 10 Dec 2025 5:19 am

हिंदुस्थानी तांदूळ शिजू देणार नाही, आणखी टॅरिफ लादण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

रशियाशी व्यापार सुरूच ठेवणाऱ्या हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लादण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यावेळी त्यांचा रोख हिंदुस्थानातून आयात केल्या जाणाऱया तांदळावर आहे. हिंदुस्थानी तांदूळ अमेरिकेत शिजू देणार नाही, असेच त्यांनी अप्रत्यक्ष ठणकावले आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी ट्रम्प यांनी आज अब्जावधी डॉलरच्या पॅकेजची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानसह आशियातून आयात केल्या जाणाऱया अन्नधान्यावर निर्बंध आणण्याचे संकेत […]

सामना 10 Dec 2025 5:18 am