आपण पाणी मागितले, रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील, कामाचे काही बोलणार नाहीत. हे म्हणतील मेट्रो देतो, यांना सांगा, पाणी द्या मग बाकीचे बोला, हे लोक फक्त लुटालूट करतात, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक ते गुलमंडी येथे भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी शहरातील संस्थान गणपतीला नारळ फोडून महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संस्थान गणपती हे संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत आहे. बाळासाहेब ठाकरे देखील संस्थान गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करायचे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गुलमंडी येथे कारच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले. आदित्य ठाकरे म्हणाले, हे सरकार आपल्याला परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. पालकमंत्र्यांचे व्हिडिओ येतात, पैसे दिसतात, हे पैसे कुठून येतात? असा सवाल त्यांनी केला. तसेच ते म्हणाले, इथल्या खासदाराची कसली दुकाने आहेत? बॅगमधील पैसा निवडणुकीत बाहेर येईल, त्याला हात लावू नका, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी जनतेला केले. तसेच ठाकरेंच्या युतीवर बोलताना ते म्हणाले, मुंबईत आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे लोक फक्त लुटालूट करतात. हे वसुलीबाज, हफ्तेबाज आहेत. ती शिवसेना नाही ती मिंधे चिंधी चोर टोळी आहे. कोणी तरी आपल्यात प्रवेश केला म्हणून टीका करतात, पालघरमधील साधू हत्याकांड बाबत प्रमुख आरोपी भाजपमध्ये का घेतला? ते आधी सांगा, मग आम्हाला प्रश्न विचारा असे आव्हान त्यांनी दिले.
जे केवळ 'ब्रँड-ब्रँड' अशी भाषा करत आहेत, त्यांचा महापालिका निवडणुकीत जनता बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर नाव न घेता बोचरी टीका केली. डोंबिवली पश्चिमेच्या सम्राट चौकात आयोजित विजय निर्धार सभेमध्ये ते बोलत होते. महायुतीत जागा वाटपावरून अनेक चर्चा सुरू आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या जागा वाटपाच्या शंकांचे निरसन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाहेर काय चर्चा सुरू आहेत, याकडे लक्ष न देता कामाला लागा असे आवाहन शिवसैनिकांना केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशाचा पाढा वाचताना शिंदे म्हणाले की, राज्यात सर्वत्र महायुतीचा भगवा फडकला आहे. नगरपरिषदांमध्येही जनतेने आम्हालाच कौल दिला असून, आगामी महापालिका निवडणुकीतही महायुतीचाच भगवा फडकणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असून 'बोलण्यापेक्षा काम करण्यावर आमचा भर असतो,' असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची मुक्तकंठाने स्तुती केली. या सभेमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने आतापासूनच कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीत मिठाचा खडा टाकू नका कल्याण डोंबिवलीत भाजपचाच महापौर होईल. भाजपाने स्वबळावर लढावे अशी वक्तव्य गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी करीत आहेत. महायुतीविरोधात वक्तव्ये करणाऱ्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी खडे बोल सुनावले. शिंदे म्हणाले की, डोंबिवली हा सुरुवातीपासूनच महायुतीचा, हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिला असून कोणीही त्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विकासकामांची जंत्री वाचून दाखवण्यासह विरोधकांचा समाचार घेतला.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी देखील काही पक्षांनी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, समाजवादी पार्टी मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या निर्देशाअनुसार आगामी संपन्न होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी तर्फे उभे राहत असलेल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या विषयी अधिक माहिती सांगतांना समाजवादी पार्टी प्रमुख महासचिव मेराज सिद्दिकी म्हणाले की, आम्ही मुंबईमधील सर्वच जागेवर आमचे प्रतिनिधी उभे करणार असून लवकरच अजून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांची नावे: १. मोहम्मद अजरुदिन सिडिकी.२. डॉ. शीला अखिलेश यादव.३. सना अब्बास कुरेशी.४. सुमैया शेख शब्चीर.५. शायरा शाफहाद खान आजमी.६. शयनाज समीर शेख.७. रुक्साना नाजीम सिद्दिकी.८. अहाद युनुस कुरेशी.९. आम्रपाली विद्याषर डावरे.१०. जायदा इनायतुला कुरेशी.११. ज्योती लक्ष्मण मुडगे.१२. आयेशा रहेमतुल्ला सय्यद.१३. साक्षी सुनीलकुमार यादव.१४. डॉ. आसमा ठाकूर.१५. मोहम्मद अर्षद मुमताज शेख.१६. गौस मौहीदिन लतीफ खान.१७. इस्म साजिद अहमद सिद्दिकी.१८. अमरीन शहेझाद अब्राहणी.१९. शैबुन्निसा मलिक.२०. गुलाम मन्सुरी.२१. रुबिना जाफर टीनवाला.
बॉम्बे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारखे नागरी सन्मान कोणतीही पदवी (टायटल) नाहीत. त्यामुळे ते कोणाच्याही नावापुढे किंवा मागे लावता येणार नाहीत. बुधवारी एका याचिकेच्या केस टायटलमध्ये 'पद्मश्री' असे लिहिण्यात आल्यावर न्यायालयाने हे मत व्यक्त केले. वास्तविक, न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे खंडपीठ याचिकेची सुनावणी करत होते. यामध्ये 2004 मध्ये पद्मश्रीने सन्मानित डॉ. शरद मोरेश्वर हार्डिकर हे देखील एक पक्षकार होते. केस टायटलमध्ये त्यांचे नाव 'पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हार्डिकर' असे लिहिले होते. यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेतला. तसेच, कायद्यानुसार असे करणे चुकीचे असल्याचे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या 1995 च्या निर्णयाचा हवाला उच्च न्यायालयाने 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की पद्म पुरस्कार आणि भारतरत्न या पदव्या नाहीत आणि त्यांचा नावापुढे किंवा मागे वापर करू नये. न्यायमूर्ती सुंदरेशन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद 141 नुसार सर्वांना लागू होतो. याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यांनी निर्देश दिले की पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालयांनी या नियमाचे पालन करावे. पद्म पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये समाविष्ट असलेले पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये - पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण - प्रदान केले जातात. हे पुरस्कार कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, खेळ आणि नागरी सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी दिले जातात. 28 एप्रिल 2025: क्रिकेटपटू आर अश्विनसह 71 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात 2025 साठी पद्म पुरस्कार प्रदान केले होते. वर्षातील पहिल्या पद्म समारंभात 71 व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. तर उर्वरित व्यक्तींना लवकरच एका वेगळ्या समारंभात सन्मानित केले जाईल. या समारंभात 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले होते. पूर्ण बातमी वाचा... शेवटी देशाच्या 4 नागरिक सन्मानांबद्दल जाणून घ्या ----------------------- ही बातमी देखील वाचा... क्रिकेटर वैभवसह 20 मुलांना बाल पुरस्कार: पंतप्रधान मोदी म्हणाले- जनरेशन Z आणि जनरेशन अल्फा आपल्याला विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत घेऊन जातील वीर बाल दिनानिमित्त शुक्रवारी 20 मुलांना 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट आणि शौर्याच्या कामांमुळे या मुलांना 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडण्यात आले. संपूर्ण बातमी वाचा... पाच खेळाडूंना पद्म पुरस्कारांची शिफारस:यांमध्ये 4 पॅरिस ऑलिम्पिकचे पदक विजेते, वर्ल्ड चेस चॅम्पियन गुकेशचेही नाव क्रीडा मंत्रालयाने पाच खेळाडूंची नावे पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली आहेत. यांमध्ये मनु भाकर, सरबजोत सिंग, स्वप्निल कुशाळे आणि अमन सेहरावत हे चार खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकचे पदक विजेते आहेत. तर, एक नाव चेसचे सध्याचे वर्ल्ड चॅम्पियन डी. गुकेश यांचे आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनी दैनिक भास्करला ही माहिती दिली आहे. संपूर्ण बातमी वाचा...
आधी कोंबडी आली नंतर अंडे; ‘ओसी’ प्रोटीनने सोडवले कोडे
लंडन : वृत्तसंस्था यूकेमधील शेफील्ड आणि वॉरविक विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोंबडी आधी आल्याचा दावा केला आहे. याचे कारण अंड्याच्या कवचात आढळणा-या ओव्होक्लिडिन-१७ (ओसी-१७) नावाच्या विशिष्ट प्रथिनात आहे, हे फक्त कोंबडीच्या शरीरात तयार होते. हे संशोधन फक्त कोडे सोडवण्यासाठी नव्हते, तर अंड्याच्या कवचाच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी होते. यामुळे मजबूत पदार्थ किंवा औषधांच्या विकासात नवीन […] The post आधी कोंबडी आली नंतर अंडे; ‘ओसी’ प्रोटीनने सोडवले कोडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
म्यानमारमधील सायबर फ्रॉडचे अड्डे उद्ध्वस्त
म्यावदी : वृत्तसंस्था चीन, म्यानमार आणि थायलंडच्या एजन्सीने सायबर फ्रॉडविरोधात संयुक्त कारवाई केली. म्यानमारच्या म्यावदी परिसरात जुगार आणि ऑनलाइन फसवणूक करणा-यांचा अड्डा होता. याविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी ४९४ इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तर याताई न्यू सिटीमधील फसवणूक करणारा परिसर पूर्णपणे साफ करण्यात आला. म्यानमारचा हा परिसर जुगारी आणि ऑनलाइन फ्रॉडचा […] The post म्यानमारमधील सायबर फ्रॉडचे अड्डे उद्ध्वस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आठवले यांच्यासह केंद्रामधील ६ मंत्र्यांची नववर्षात अग्निपरिक्षा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारमधील काही मंत्र्यांना आगामी वर्षात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. २०२६ मध्ये किमान सहा मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून, पुन्हा संधी न मिळाल्यास त्यांना मंत्रिपद गमवावे लागू शकते. निवडणुकांच्या दृष्टीनेही २०२६ महत्त्वाचे असून, पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आणि राज्यसभेच्या तब्बल ७५ जागांवर निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, […] The post आठवले यांच्यासह केंद्रामधील ६ मंत्र्यांची नववर्षात अग्निपरिक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नायजेरियातील ‘इसिस’च्या तळांवर अमेरिकेचा हल्ला
अबुजा : वृत्तसंस्था जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र, यादरम्यानच अमेरिकेने नायजेरियातील आयएसआयएसच्या ठिकाणांवर मोठा हल्ला केला. आपल्याच आदेशानंतर हे हल्ले करण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ख्रिश्चन लोकांची हत्या आयएसआयएस करत होते. आम्ही त्यांना याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितले होते की, तुम्ही हे करू नका, नाही तर अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. शेवटी थेट […] The post नायजेरियातील ‘इसिस’च्या तळांवर अमेरिकेचा हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भूकंपाचा पॅटर्न बदलणार, गंगेची पाणी पातळी वाढणार!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण भारत ज्या भारतीय टेक्टॉनिकल प्लेटवर आहे. ती प्लेट दोन भागात विभागत आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, इंडियन टेक्टॉनिकल प्लेटचा खालचा भाग वेगळा होऊन तो पृथ्वीच्या आतील भागात (मेंटल) खचत चालला आहे. या प्रक्रियेला भौगोलिक भाषेत ‘डेलामिनेशन’ म्हणतात. ही नवीन माहिती समोर आल्यानंतर आता हिमालयाच्या […] The post भूकंपाचा पॅटर्न बदलणार, गंगेची पाणी पातळी वाढणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एकेकाळी अजित पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजप आमदार शंकर जगताप यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला 128 पैकी 125 जागा मिळतील, असा दावा केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खंबीर नेते राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद प्रचंड वाढली असून, हा विरोधकांसाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी भाजप 100 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी हा आकडा 125 वर नेला आहे. राहुल कलाटे यांनी यापूर्वी जगताप परिवाराविरोधात आक्रमक निवडणुका लढवल्या होत्या, मात्र आता तेच सोबत आल्याने भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे, उर्वरित तीन जागा अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकणार का? या प्रश्नावर मात्र जगतापांनी सूचक मौन बाळगले. कार्यकर्त्यांना न्यायाचे आश्वासन नव्या नेत्यांच्या प्रवेशामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असण्याच्या शक्यतेवर बोलताना जगताप म्हणाले, भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम असतो. आमच्या कार्यकर्त्यांवर कधीही अन्याय होऊ दिला जाणार नाही, आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्या त्या वेळी त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल. भाजपमध्ये सर्व्हेक्षण करूनच उमेदवारी दिली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? एकडे भाजप विजयाचा दावा करत असतानाच, दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून, केवळ दोन जागांवरून चर्चा अडकली आहे. खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे सुलक्षणा शिलवंत आणि इम्रान शेख यांच्या जागांसाठी आग्रही असून, स्वतः शरद पवारांनी या जागा पदरात पाडून घेण्यासाठी विशेष लक्ष घातल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमधील महाआघाडीच्या युतीचे चित्र स्पष्ट होणार असून, भाजपच्या 125 च्या दाव्याला विरोधक कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि.ल. धारूरकर यांनी 'एक अटल व्यक्तिमत्त्व' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव रामरूले यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संजय पंडित, आनंद परळीकर, करांडे, उत्तमराव तोंडे, एस.आर. वाकळे, डॉ. शारदा, डॉ. कुडे आणि वरद कोळकर यांच्यासह वाचनालयाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जोग यांनी केले, तर वाचनालयातर्फे उदय सुरंगलीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सोलापुरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला असून, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी पक्षशिस्तीला बगल देत निष्ठावंतांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट नाकारल्यास, तो ज्या पक्षात जाईल त्याचा प्रचार आम्ही करू, असा थेट इशारा या दोन्ही नेत्यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्ती आज निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहेत, याचे नवल वाटते. भाजपमध्ये उमेदवाराची आर्थिक क्षमता किंवा तो किती खर्च करणार, हे विचारण्याची पद्धत कधीच नव्हती. मात्र, सध्या मुलाखतींमध्ये याच मुद्द्यांवर भर दिला जात आहे. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या वर्चस्वामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह दुसरीकडे, आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्थानिक निवडणूक समिती आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक समितीत कोण आहे, हे मला माहित नाही. जागांच्या वाटाघाटी केवळ पालकमंत्री करत आहेत. कोणाशी चर्चा करायची हेच स्पष्ट नसल्याने आम्ही प्रक्रियेपासून दूर आहोत, असे सांगत त्यांनी स्थानिक नेतृत्वातील दरी स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले आहे की, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास ते कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. भाजपमधील या दोन बड्या नेत्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जर निष्ठावंतांनी बंडाचे निशाण फडकवले, तर सोलापूर महापालिकेत भाजपला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
नातू आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी कुख्यात बंडू आंदेकर, त्यांची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार, तिन्ही आरोपी पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाने उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक भाषणे करू नयेत, अशी ताकीद दिली आहे. निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, हे तत्त्व अधोरेखित करत न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज भरण्याची मुभा दिली. पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा. नाना पेठ) यांच्यासह एकूण पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराजची पत्नी सोनाली यांना निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी केली होती. नाना पेठ परिसरात आंदेकर कुटुंबीयांची मोठी दहशत मागील अनेक वर्षापासून पाहावयास मिळत आहे.
सावकाराने व्याजासाठी फ्लॅटवर मारला ताबा:वारजे माळवाडी येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
व्याजाचे पैसे वेळेवर देऊनही आणखी आठ लाख रुपयांची मागणी करत, ती रक्कम न दिल्याने थेट फ्लॅटवर ताबा मारणाऱ्या सावकारासह एका महिलेविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरभी हाइट्स, वारजे येथील एका फ्लॅटमध्ये घडली. विशाल लंकेश्वर (रा. वारजे, पुणे) आणि मधुमती रंगदाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सम्राट सुधीर सुपेकर (वय ३६, रा. तिरुपतीनगर, वारजे, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. तक्रारदार सम्राट सुपेकर यांचे नळ स्टॉप परिसरात ‘सूर्या स्नॅक्स’ नावाचे हॉटेल आहे. तसेच, त्यांनी २०१७ मध्ये सुरभी हाइट्स, वारजे येथील ए विंगमधील फ्लॅट क्रमांक ७ खरेदी केला होता. २०१७ ते २०२४ या कालावधीत त्यांनी कर्वेनगर येथे ‘पुरंदरे स्नॅक्स अॅण्ड भोजनालय’ नावाचा हॉटेल व्यवसायही चालविला होता. हॉटेल व्यवसायाच्या विस्तारासाठी सुपेकर यांना पैशांची गरज होती. याच दरम्यान त्यांची ओळख विशाल लंकेश्वर आणि मधुमती रंगदाळे यांच्याशी झाली. आम्ही व्याजाने पैसे देतो, हा आमचा व्यवसाय आहे, असे सांगत त्यांनी 'डेली कलेक्शन' पद्धतीने पैसे देण्याचे आश्वासन दिले. ऑक्टोबर २०२२ मध्ये लंकेश्वर याने सुपेकर यांना ९ हजार रुपये दिले. यासाठी दररोज २५० रुपये व्याज कलेक्शन ठरविण्यात आले होते. ही रक्कम मधुमती रंगदाळे यांच्या नावाने असलेल्या बेअरर चेकद्वारे देण्यात आली होती. पुढील ५० दिवसांत सुपेकर यांनी व्याजासह १२ हजार ५०० रुपये लंकेश्वर यांना परत केले. यानंतर पुन्हा पैशांची गरज भासल्याने सुपेकर यांनी लंकेश्वरकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२४ या २० महिन्यांच्या कालावधीत लंकेश्वरच्या सांगण्यावरून सुपेकर यांनी सहकारी मधुमती रंगदाळे हिच्या मोबाईलवर ऑनलाईन स्वरूपात एकूण ४ लाख ८० हजार रुपये व्याजासह परत केले. तरीही फेब्रुवारी २०२५ मध्ये लंकेश्वर याने पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. सर्व रक्कम दिल्याचे सुपेकर यांनी सांगितले असता, उर्वरित रक्कम न दिल्यास “तुला पाहून घेतो” अशी धमकी लंकेश्वरने दिली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुपेकर हे पत्नीसमवेत सुरभी हाइट्समधील त्यांच्या फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता सायंकाळी लंकेश्वर आणि रंगदाळे तेथे आले. व्याजाचे पैसे मागत त्यांनी शिवीगाळ केली. पैसे न दिल्याने त्यांनी थेट फ्लॅटचा ताबा घेत सुपेकर दाम्पत्याला बाहेर काढले. “व्याजाचे पैसे मिळेपर्यंत फ्लॅट आमच्या ताब्यात राहील,” असे सांगत त्यांनी बेकायदेशीररित्या ताबा मिळविला.
भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये युतीचे शिक्कामोर्तब झाले असून, ठाकरे बंधूंच्या या निर्णयामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेने भिवंडीत कधीही सर्व जागा लढवल्या नव्हत्या, मात्र यावेळी सर्व 90 जागांवर उमेदवार उभे करून ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. या युतीनुसार, शिवसेना ठाकरे गट 80 जागांवर, तर मनसे 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला मनसेकडून 20 जागांची मागणी करण्यात आली होती, मात्र ठाणे आणि भिवंडी येथे झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर 10 जागांवर एकमत झाले. या युतीमुळे भिवंडीत अनेक नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. शिवसेना शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्याची तयारी 2017 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या 12 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. गद्दारीचा बदला आणि पुन्हा एकदा भिवंडीवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेऊन ही मोठी खेळी खेळली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटासह भाजपच्या गोटातही खळबळ उडाली आहे. भिवंडीचा राजकीय आखाडा आता बहुकोणीय झाला आहे. एका बाजूला शिवसेना-मनसे युती आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, शिंदे गट आणि भाजप यांची वरिष्ठ पातळीवर युती असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र स्वतंत्र हालचाली दिसत आहेत.
साकुर्डे ग्रामपंचायतीत बनावट ओबीसी प्रमाणपत्र प्रकरण:उमेदवाराचे पद रद्द, गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील साकुर्डे ग्रामपंचायतीमध्ये बनावट ओबीसी प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याप्रकरणी एका उमेदवाराचे पद रद्द करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. साकुर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत (२०२१-२०२६) वॉर्ड क्रमांक १ ओबीसीसाठी राखीव होता. सचिन अरुण थोपटे यांनी बनावट ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली आणि जिंकली, असा आरोप तक्रारदार सतीश अब्बा भोंगळे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी केला आहे. २०२१ च्या निवडणुकीत थोपटे यांनी विहित मुदतीत वैध जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते, असा दावा आहे. नियमांनुसार, सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारी रद्द होणे बंधनकारक होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने थोपटे निवडून आले, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये जात पडताळणी समितीने थोपटे यांचा ओबीसी दावा फेटाळला. असे असूनही, तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि त्यांचे उत्तराधिकारी जितेंद्र दुडी यांनी जागा रिक्त घोषित केली नाही किंवा पुनर्निवडणूक घेतली नाही, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे वारंवार निवेदने दिली आणि भेटी घेतल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतरच या प्रकरणी कारवाईला गती मिळाल्याचे तक्रारदारांनी सांगितले. नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी निकाल जाहीर झाला आहे. जात पडताळणी रद्द झाल्यानंतर थोपटे यांचे पद पहिल्या दिवसापासून रद्द करणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवणे आवश्यक होते, अशी मागणी भोंगळे यांनी केली आहे. तक्रारदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, थोपटे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण ओबीसी आरक्षणातील फसवणुकीचे एक उदाहरण असून, महाराष्ट्रात अशा प्रकरणांची सर्वंकष चौकशी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
भारताची १८% जागतिक लोकसंख्या असूनही, देशाकडे केवळ ४% गोड्या पाण्याची संसाधने आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दलची पारंपरिक समज आता बदलत आहे. जल शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार यांच्या मते, पाण्याचे प्रदूषण राज्यांच्या सीमांपेक्षाही अधिक तीव्रतेने बदलते, ज्यामुळे भारताच्या पिण्याच्या पाण्याच्या सवयींमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. पूर्वी पाण्याचे प्रदूषण राज्य किंवा जिल्हानिहाय वर्गीकृत केले जात होते, जसे की राजस्थान-हरियाणा फ्लोराईडने, पंजाब-उत्तर प्रदेश युरेनियमने, बिहार-पश्चिम बंगाल आर्सेनिकने आणि अनेक राज्ये नायट्रेटने त्रस्त होती. मात्र, केंद्रीय भूजल बोर्डाच्या २०२४ च्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालानुसार, हे धोके आता अधिक हायपरलोकल आणि विखुरलेले आहेत. काहीशे मीटर अंतरावर असलेल्या बोअरवेलमध्येही पाण्याची रासायनिक रचना वेगळी असू शकते. युरेका फोर्ब्सचे मुख्य जल शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार यांनी स्पष्ट केले की, भूगर्भशास्त्र, पाणी उपशाची खोली, शेती पद्धती आणि सांडपाण्याचा ताण यांसारख्या घटकांमुळे हे घडते. यामुळे, एकाच शहरातील दोन सोसायट्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे भिन्न असू शकते, ज्याची रहिवाशांना अनेकदा कल्पना नसते. हे स्थानिक प्रदूषण सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करते. नायट्रेट, फ्लोराईड आणि जड धातूंच्या संपर्कातून मुलांना विशेष धोका असतो. अनेक कुटुंबे प्रत्यक्ष प्रदूषक न समजता सामान्य शुद्धीकरणावर अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांना खोटी सुरक्षिततेची भावना येते. दूषित पाण्याच्या दैनंदिन लक्षणांमध्ये पोटासंबंधी त्रास, त्वचेची जळजळ, केस ठिसूळ होणे, दातांवर डाग आणि थकवा यांचा समावेश होतो. डॉ. कुमार यांनी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाप्रमाणे 'वॉटर क्वालिटी इंडेक्स' नकाशाची गरज व्यक्त केली. हा नकाशा गाव, वस्ती किंवा वैयक्तिक विहिरीपर्यंतच्या स्तरावर पाण्याची गुणवत्ता दर्शवेल. हा डेटा-आधारित दृष्टिकोन नागरिकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, नगरपालिकांना प्रदूषण केंद्रे ओळखण्यास आणि शहरी नियोजनात पाण्याचा दर्जा समाविष्ट करण्यास मदत करेल. भारताकडे आधीच मोठा भूजल डेटा उपलब्ध आहे; आव्हान केवळ त्याचे सुलभ व्यासपीठात रूपांतर करण्याचे आहे. हवामान बदल आणि शहरे विस्तारत असताना, हायपरलोकल पाण्याचे नकाशे पिण्याच्या सवयी आणि आरोग्य संरक्षणात क्रांती घडवू शकतात.
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ च्या वारसा हक्क प्रेरित ट्रॉफीचे जयपूरमध्ये अनावरण करण्यात आले. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी (आयएएस) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी खासदार मदन राठोड, क्रीडा सचिव डॉ. नीरज के. पवन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह आणि राजस्थान सायकलिंग असोसिएशनच्या सरिका चौधरी उपस्थित होते. ही ट्रॉफी पुण्यातील प्रसिद्ध तांबट आळी समुदायातील कुशल कारागिरांनी पूर्णतः तांब्यापासून बनवली आहे. ४८० मिमी उंचीची ही कलाकृती आठ ऐतिहासिक किल्ल्यांपासून प्रेरित असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे प्रतीक आहे. मध्यभागी असलेली आवर्ताकार पोकळी सायकलिंग व्हेलोड्रोमची आठवण करून देते, जी खेळाडूंच्या जिद्द आणि शिस्तीचे प्रतिनिधित्व करते. पुणे जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र शासनाच्या पाठबळाने आयोजित ही स्पर्धा भारतातील पहिली युसीआय २.२ वर्गवारीची आंतरराष्ट्रीय रोड सायकलिंग रेस आहे. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील अव्वल सायकलपटू सहभागी होतील. चार टप्प्यांमध्ये ४३७ किलोमीटर अंतर कापणारी ही रेस पुणे जिल्ह्यातील डोंगररांगा, किल्ले आणि ग्रामीण सौंदर्य जगासमोर आणेल. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री दिया कुमारी म्हणाल्या, भारत आता नवीन खेळांना स्वीकारत आहे आणि मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता दाखवत आहे. ही स्पर्धा व्यावसायिक सायकलिंगला नवी उंची देईल. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांच्या मेहनतीचे हे फलित आहे. युसीआय २.२ ही केवळ सुरुवात असून, भविष्यात टूर द फ्रान्ससारखी प्रो रेस आयोजित करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. देशभर सुरू असलेल्या ट्रॉफी टूरचा भाग म्हणून जयपूरमध्ये ट्रॉफीचे आगमन हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरले. ही स्पर्धा क्रीडा उत्कृष्टता दाखवण्याबरोबरच क्रीडा पर्यटनाला चालना देईल आणि भावी ऑलिम्पियनांना प्रेरणा मिळवून देईल.
पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते हा महोत्सव सुरू करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आणि संघर्षशील साहित्याला समर्पित असलेला हा महोत्सव गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात आहे. अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे मुख्य संयोजक संदीप ससाणे आहेत. यावेळी दिग्दर्शक राही अनिल बर्वे, अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेते दीपक दामले, निर्माते गिरीश पटेल, अंकुर जे सिंह, शामराव यादव, क्रिएटिव्ह कन्सल्टंट आशिष निनगुरकर, तसेच प्रस्तुती व वितरण क्षेत्रातील समीर दीक्षित व ऋषिकेश भिरंगी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि 'मायसभा' या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सुरू झालेला हा महोत्सव केवळ चित्रपटांचे प्रदर्शन नसून विचारांची एक चळवळ आहे. कमी साधनांतही प्रभावी चित्रपट निर्माण होऊ शकतात, त्यासाठी केवळ कल्पना आणि संवेदना असणे महत्त्वाचे आहे. चित्रपट हे समाजाशी संवाद साधणारे एक प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, फुकट कॅमेरा मिळाला म्हणून कोणी दिग्दर्शक होत नाही. कॅमेरा कसा, कुठे आणि का वापरायचा, याची जबाबदारी समजून घेणे महत्त्वाचे आहे. दुर्लक्षित समाजाचा आवाज प्रामाणिकपणे मांडणे हेच खरे सिने-कर्म आहे. अण्णाभाऊ साठेंच्या नावाशी संघर्ष, माणुसकी आणि संस्कृती जोडलेली असल्याने या महोत्सवाची जबाबदारी मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले. अभिनेत्री वीणा जामकर म्हणाल्या की, चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. महोत्सवातील चित्रपट नव्या कथा आणि नव्या दृष्टिकोनांना जन्म देतात. अण्णाभाऊ साठेंचे साहित्य आजही नव्या पिढीला सत्य मांडण्याची ताकद देते.
भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन:येरवडा कारागृहात अत्यवस्थ झाल्यानंतर ससूनमध्ये मृत्यू
भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. वर्षभरापासून ते कारागृहात बंदिस्त होते. जोशी यांच्यासह त्यांचा मुलगा मयुरेश आणि अन्य सात जणांविरुद्ध ठेवीदारांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक होते. त्यांच्या मुलाने सिंहगड रस्ता परिसरात गॅस वितरण एजन्सीत गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गोळा केले होते. पैसे परत न केल्याने त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. उदय जोशी यांच्या पत्नी शुभदा या भाजपच्या नगरसेविका होत्या. जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. येरवडा कारागृहातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांची शस्त्रक्रियाही झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सुनावणीपूर्वीच त्यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी कारागृहात त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, अजित दादा सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे अजित दादा कोणीकडे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचे की नाही, हा निर्णय भाजपचे वरिष्ठ ठरवतील. राष्ट्रवादीची भाजपसोबत आघाडी आहे आणि आमची युती भाजपसोबत आहे. म्हणून भाजपची शरद पवार यांच्याबद्दल काय भूमिका असेल ती भाजपने ठरवावी. शरद पवार हे जास्त काही विरोधी पक्षात राहू शकत नाहीत. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास बघितला तर त्यांनी अनेक वेळा असे उलटे-सुलटे प्रयत्न केले आहेत, असे शिरसाट म्हणाले. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचे की नाही हे एनडीएच्या नेत्यांनी ठरवायचे आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत, भाजपची आणि आमची नैसर्गिक युती आहे. इतर घटक पक्ष एनडीएमध्ये येत असतील तर त्याला भाजप जबाबदार राहील, आम्ही नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल आगामी निवडणुकांच्या संदर्भात बोलताना सणजे शिरसाट म्हणाले, भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त आहे. कोणता प्रभाग सोडायचा, तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक हस्त आहेत आणि जागा कमी आहेत, म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे. आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल. भाजप-शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक युतीमध्ये लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन-चार जागेवर जे आलेले आहे, त्यावर मंत्री अतुल सावे आणि मी चर्चा करणार आहोत आणि योग्य निर्णय घेणार आहोत. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोण कुठे लढणार याची यादी एक-दोन दिवसात फायनल होईल. अतुल सावे आणि मी फायनल चर्चा करून, ती यादी भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठांना पाठवू आणि नंतर जाहीर केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नाताळ सणानिमित्त भाजपने दिलेल्या एका जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवल्याने मोठा वाद निर्माण झाला असून, यावरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. निवडणुकांसाठी हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपने हिंदूंच्या धार्मिक भावनांशी केलेला हा खेळ अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत, पाटील यांनी या कृतीचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. स्वतःला हिंदू संस्कृतीचे रक्षक म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारचा खरा चेहरा या दुटप्पीपणातून समोर आला आहे, असा घणाघातही त्यांनी केला असून या जाहिरातीमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सतेज पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा. सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे, हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य? श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पीआर करण्याची ही वृत्ती आजची नाही. निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह आहे. केंद्र सरकारने त्वरित सर्व हिंदूंची माफी मागावी- यशवंत किल्लेदार सतेज पाटील यांच्यासह मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी देखील भाजपच्या या जाहिरातीवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवलेली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते. तर दुसरीकडे मोदी स्वतः चर्च मध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते. पुढे यशवंत किल्लेदार म्हणाले, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपला खरंच हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. गणपती बाप्पाचा असा अपमान करायचा नालायकपणा करून त्यांनी हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. एकीकडे ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर करून घेत आहेत, अशी बोंब मारायची आणि पंतप्रधानांनी त्यांची स्तुती करायची. हा निव्वळ हिंदूंच्या भावनेचा अपमान आहे...सत्तेसाठी लोकांना हाणामाऱ्या करायला लावणारी भाजप आता हिंदूंच्या देवांचा अपमान करतेय....केंद्र सरकारने त्वरित सर्व हिंदूंची माफी मागावी.
महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर. महाविकास आघाडीतही जागावाटपावर चर्चा सुरू असून मुंबईत ठाकरे बंधूंनी युती केली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांसह कलाकारही सहभागी होताना दिसत आहेत. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले आहे. तसेच मत देताना सामाजिक हिताचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गांधी परिवारावरही जोरदार निशाणा साधला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे बोलत होते. शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीतील निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, लोकशाही राज्यामध्ये आपल्या हिंदूंना दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत. पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानात बटन दाबून जिंकायची आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे वाक्य मनात कोरून ठेवायचे आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. ते म्हणाले, तीन माणसांचे घर ज्याला चालवता येत नाही, त्यांनी 140 कोटींचा देश चालवणाऱ्याला शिकवू नये, असा घणाघात पोंक्षे यांनी केला. पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, हलालच्या वस्तू वापरू नका. जाळीच्या टोपीवाल्यांकडून काहीही खरेदी करू नका. दोन्ही लढाई आपल्याला गुप्तपणे लढायच्या आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारात आपल्याला गुप्तपणे लढाई लढायची आहे. हिंदू राष्ट्र तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नेमकी कुठली लढाई जिंकायची आहे, ते मी तुम्हाला सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेचे उद्या सकाळपासून एबी फॉर्मचे वाटप
मुंबई : राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत. उमेदवारांच्या नावांचा बंद लिफाफा घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत. मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आज सकाळपासून सुरू होती. या बैठकीत मुंबईतील जागावाटप व उमेदवारांची नावे जवळपास फायनल झाल्याची […] The post मनसेचे उद्या सकाळपासून एबी फॉर्मचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसेला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांनी ठाकरे बंधूंवर विशेषतः राज ठाकरेंवर कडाडून हल्ला चढवला आहे. एकनाथ शिंदे रात्री कितीही वाजता भेटतात. याऊलट बाकी लोक औषध घेऊन लवकर झोपतात, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी हिंदुत्त्व सोडले आहे. त्यामुळे एकदा जागावाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणालेत. प्रकाश महाजन अखेर शिंदे गटात:मनसेला दिली होती सोडचिठ्ठी; एकनाथ शिंदेंनी स्वागत करत ठाकरे बंधूंच्या युतीवर साधला निशाणा प्रकाश महाजन यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी सध्या अंधारात एकत्र जाण्यापेक्षा दोघे एकत्र जाऊ अशी भूमिका घेतली आहे. पण त्यांच्या नशिबातील अंधार चुकणार नाही. 20 वर्षांचा दुरावा 10 मिनिटांत संपतो का? दोन्ही भावांनी हिंदुत्व सोडले आहे. एकदा जागावाटप होऊ द्या. त्यांच्याकडे कुणीच उरणार नाही. त्यांचा मुंबई, ठाणे व नाशिक या तीनच महापालिकांत इंटरेस्ट आहे. इतर ठिकाणी ठाकरे कुठेही लक्ष देत नाहीत. बाकी लोक औषध घेऊन झोपतात प्रकाश महाजन यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचेही तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे रात्री कितीही वाजता भेटणारे नेते आहेत. बाकी लोक औषध घेऊन लवकर झोपतात. कुणी कंबरेवर हात ठेवून कुणाचा वारस होऊ शकत नाही. शिंदेंनी स्वतःच्या कामातून स्वतःचा वारसा सिद्ध केला आहे. यापुढे कुणी शिंदेंवर टीका केली तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. आम्हीही मराठी आहोत. मग हे ठाकरे बंधू कोणत्या मराठी माणसांविषयी बोलतात. शिंदे हिंदुत्त्वाविषयी खूप जागरूक प्रकाश महाजन म्हणाले, मी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मी यापूर्वी शिवसेनेचा उपनेता होतो. एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत. पण ते स्वतःला शिवसेनेचा नेता समजतात. हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला. मी गुरुवारी रात्री त्यांना भेटलो. ते फार उत्साहाने मला भेटले. एक मराठी माणूस रात्री 12 वा. एका मराठी माणसाला भेटतो हे पाहून फार बरे वाटले. माझा पक्षप्रवेश मंगेश चिवटे यांच्यामुळे झाला. ते आरोग्य दूत असले तरी माझ्यासाठी राजदूत झाले. माझी हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा होती. शिंदे हिंदुत्वाविषयी फार जागरूक आहेत. ते खरोखरच हिंदुत्ववादी आहेत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खूप चांगले काम केले. महाराष्ट्र जातीयवादाने पेटला असताना त्यांनी अत्यंत कुशलपणे परिस्थिती हाताळली. एखादे गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जाते आणि रात्री दीड वाजता मुख्यमंत्री तिथे पोहचतो. या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झालेत की, त्यांनी घर सोडले नाही. जे परीक्षेला बसले नाही ते पहिले आलेत.
मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत. प्रकाश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून ते कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्न विचारला जात होता. आज अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करून या चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, मी प्रकाश महाजन यांचे मनापासून शिवसेनेत स्वागत करतो. त्यांनी शिवसेना व माझ्यावर विश्वास ठेवून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. प्रकाश महाजन मुळातले शिवसैनिक मी अगदी जवळून प्रकाश महाजन यांची कार्यपद्धती पाहिली. ते बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले मुळातले शिवसैनिक आहेत. त्यांना जी जबाबदारी मिळाली, त्यांनी ती अतिशय जबाबदारीने व सकारात्मकतेने पार पाडली. सर्वसामान्य माणसांचे काम व अडचणी आपण सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणूनच सोडवता येतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्याकडे अनेक पदे होती. पण त्यांनी कधीही पदाचा मोठेपणा दाखवला नाही. ते उत्कृष्ट वक्ते व प्रवक्ते आहेत. मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी त्यांना ऐकले. राजकीय क्षेत्रात संयम महत्त्वाचा असतो. काही लोकं सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्ये करतात. पण प्रकाश महाजन यांनी बोलताना नेहमीच स्वतःची प्रतिष्ठा पाळली. राजकारणात पाळली जाणारी पथ्य सोडली नाही. त्यामुळे मला त्यांचे वर्कृत्व व कर्तृत्व भावले. आता ते माझ्यासोबत शिवसेनेत काम करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले, प्रकाश महाजन यांनी माझ्या अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ पाहिला. मी मुख्यमंत्री असताना व आताही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. याची जाणीव मला आहे. त्यामुळेच आज त्यांनीही त्याचा उल्लेख केला. सध्या अनेकजण शिवसेनेत येत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे यांची शिकवण व विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे प्रकाश महाजन कोणत्याही स्वार्थाशिवाय शिवसेनेत आलेत. त्यांच्यामुळे शिवसेना बळकट होईल. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळेल. ते प्रवक्ते म्हणून पक्षाची चांगली भूमिका पार पाडतील. त्यांच्यावर संघटनेचीही जबाबदारी टाकली जाईल. राज व उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाकरे बंधूंवरही निशाणा साधला. तसेच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कटू अनुभव घेण्यासाठी उद्धव ठाकरेंशी युती केल्याचाही दावा केला. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेशी बांधील आहोत. ज्यांनी विचारधारेशी प्रतारणा केली, त्यांना लोकांनी लोकसभा, विधानसभा व आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जागा दाखवली. येणाऱ्या महापालिका निवडणुकांतही आम्ही बाळासाहेबांचे विचार व विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे महायुतीचाच विजय होईल. भाजप व शिवसेनेची युती सत्तेसाठी झाली नाही. खुर्चीसाठी झाली नाही. स्वार्थासाठी झाली नाही. आता ज्या काही युत्या व आघाड्या होत आहेत, त्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही लोकं नवीन युत्या करत आहेत. काही लोकांनी यापूर्वीही त्याचा अनुभव घेतला आहे. ते आता पुन्हा नवा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा असे होते. पण आता काय होते ते मला माहिती नाही, असे शिंदे म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर आज सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेमुळे हादरून गेलं आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखे हे स्थानिक पातळीवर परिचित व्यक्तिमत्त्व होते आणि यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं होतं. आज सकाळी मंगेश काळोखे हे नेहमीप्रमाणे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला सुरक्षितपणे शाळेत सोडून ते घरी परतत असतानाच दबा धरून बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून घटनास्थळी आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल किंवा कापड बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. काही क्षणांतच अत्यंत क्रूरपणे हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सकाळची वेळ आणि वर्दळ असतानाही इतक्या निर्भयपणे हा हल्ला करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात असून, काळ्या रंगाच्या वाहनाचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नेमकं कारण काय, कोणाचा यात सहभाग आहे, याबाबत पोलिस सर्व शक्य त्या कोनातून तपास करत आहेत. मात्र सध्या तरी आरोपी फरार असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. हल्लेखोर पकडल्यानंतरच या घटनेमागचं खरं सत्य समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्यामुळेच ही हत्या - भरत गोगावले या घटनेनंतर राजकीय वातावरण अधिक तापलं असून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्यामुळेच ही हत्या घडवून आणण्यात आली असावी, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. 21 तारखेला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही हत्या झाली, याकडे लक्ष वेधत गोगावले यांनी हा सगळा प्रकार राजकीय आकसातून घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यामागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. तसेच दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हिंसक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे खोपोली शहर अक्षरशः स्तब्ध झालं आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका नगरसेविकेच्या पतीवर अशा पद्धतीने हल्ला होणं हे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरत आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. मात्र सध्या हत्येमागील नेमकं कारण काय, हल्लेखोर कोण आहेत आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याबाबतची खरी माहिती आरोपी अटकेत आल्यानंतरच समोर येणार आहे. तोपर्यंत खोपोली शहरात तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे.
एसटी बस चालकांसाठीचे मार्गदर्शक तत्वे अखेर शिथिल
पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनचालक परवाने काढण्यापूर्वीच्या प्रक्रियेत नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली. परंतु, या निर्णयामुळे परवाना काढणा-यांना चाचणीपूर्वीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रचंड तक्रारी आणि समस्या निर्माण झाल्याने नागरिक आणि संघटना आक्रमक झाल्या. अखेर यावर तातडीने निर्णय घेऊन बदल करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन विभागाकडूनच देण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या […] The post एसटी बस चालकांसाठीचे मार्गदर्शक तत्वे अखेर शिथिल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या 4 दिवसांचा अवधी उरला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी आघाडी केली आहे. या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद मिळण्याची शक्यता आहे. पण ठाकरे - पवार आघाडीत 4 जागांचा पेच सुटत नसल्यामुळे शरद पवार काय करणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले आहेत. तिथे या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जागा निवडून आल्या होत्या. त्यानुसार, शरद पवार गटाने यावेळी उद्धव ठाकरे यांच्यापुढे 20-25 जागांचा आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीचे मुंबईतील पदाधिकारी ठाकरे बंधूंसोबत जाण्यास इच्छुक आहेत. पण ठाकरे गटाने एवढ्या जास्त जागा राष्ट्रवादीला सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत. जयंत पाटील यांच्यासोबत शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधवही उपस्थित आहेत. त्यामुळे या मुद्यावर लवकर तोडगा काढून पुढे सरकण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. नेमका कुठे अडकलाय पेच? ठाकरे बंधू व शरद पवार गटात विक्रोळी - भांडूप परिसरातील जागांवरून पेच निर्माण झाला आहे. येथील 2 वॉर्डांवरून युतीची चर्चा रखडली आहे. त्यामुळे जयंत पाटील व उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीत या मुद्यावर तोडगा निघणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाला वॉर्ड क्रमांक 111 हा धनंजय पिसाळ व वॉर्ड कर्मांक 119 हा मनिषा रहाटे यांच्यासाठी हवा आहे. हे दोन्ही नेते या वॉर्डांतून निवडून आले होते. त्यामुळे शरद पवार गटाने या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. पण ठाकरे बंधूंमधील जागवाटपात 119 क्रमांकाचा वॉर्ड मनसेला सुटल्याने पेच वाढला आहे. यामुळे शरद पवार गट नाराज झाला असून, ठाकरे बंधूंनी आपल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाने वॉर्ड क्रमांक 124 व 168 वरही दावा केला आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत या वॉर्डांमधून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. पण सध्या हे नगरसेवक इतर पक्षांत गेल्यामुळे या जागांवरील चर्चेलाही धार आली आहे. विक्रोळी - भांडूपमधील या 4 वॉर्डावरून निर्माण झालेला वादच ठाकरे बंधू व शरद पवार गटातील युतीच्या चर्चेतील प्रमुख अडथळा ठरत आहे.
राज्यात सुमाारे दिड लाख मुले कुपोषित
मुंबई : राज्यातील कुपोषणाच्या समस्येचे निवारण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि गेल्या तीन वर्षांत कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात अद्यापही १ लाख ३७ हजार ४०७ मुले कुपोषणग्रस्त असल्याची कबुली खुद्द राज्य सरकारने नुकतीच उच्च न्यायालयात दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने प्रतिज्ञापत्राद्वारे […] The post राज्यात सुमाारे दिड लाख मुले कुपोषित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘सीईटी’ अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक
मुंबई : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होईल. यासह सीईटी […] The post ‘सीईटी’ अर्जासाठी अपार आयडी बंधनकारक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शरद पवार भाजपप्रणीत एनडीएमध्ये येऊ शकतात
मुंबई : भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने चर्चा सुरू आहेत. कोणता प्रभाग सोडायचा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक जास्त आहेत आणि जागा कमी आहेत, म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे. आज किंवा उद्या आमची महायुतीची घोषणा होईल असे संजय शिरसाट म्हणाले. भाजप-शिवसेनेने छत्रपती […] The post शरद पवार भाजपप्रणीत एनडीएमध्ये येऊ शकतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत. उमेदवारांच्या नावांचा बंद लिफाफा घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे उद्यापासून आपल्या एबी फॉर्मचे वाटप करेल. त्यानंतर लगेचच उमेदवार अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतील. तसे संदेशही मनसेतर्फे आपल्या कार्यकर्त्यांना गेलेत. मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आज सकाळपासून सुरू होती. या बैठकीत मुंबईतील जागावाटप व उमेदवारांची नावे जवळपास फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई व बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेत. या बंद लिफाफ्यात मनसे उमेदवाराची यादी असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आज रात्रीपासूनच आपल्या उमेदवारांना योग्य ते संदेश पाठवेल. त्यानंतर उद्या सकाळपासून सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जाईल. तूर्त राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेच्या उमेदवारांच्या नावांवर शेवटचा हात फिरवला जाईल. दादरची जागा मनसेच्या वाट्याला? दुसरीकडे, ठाकरे गटासोबतच्या जागावाटपाच्या चर्चेत दादर वॉर्ड कर्मांक 192 ची जागा मनसेला सुटल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी माहिती आहे. 2017 च्या निवडणुकीत या वॉर्डातून ठाकरे गटाच्या प्रती पाटणकर विजयी झाल्या होत्या. पण आता वाटाघाटीत हा वॉर्ड मनसेच्या ताब्यात घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी याविषयी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचाही समावेश आहे. महायुतीचे उद्या जागावाटप दुसरीकडे, सत्ताधारी भाजप व शिवसेनेचे जागावाटप उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाईल. या प्रकरणी आज रात्री शिवसेना समन्वय समितीच्या नेत्यांची एक बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत होईल. या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित केले जातील. त्यानंतर या उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. पक्षातील संभाव्य बंडखोरी टालण्यासाठी उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर केली जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हे ही वाचा... इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात; संधी सर्वांना मिळते म्हणत दिला सूचक इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस आहे. उद्या आमचा येील. इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही. सत्तेचा मुकूट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर
मंत्री गोगावले यांचे सुपुत्र विकास २४ दिवसांपासून फरार
महाड : महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. […] The post मंत्री गोगावले यांचे सुपुत्र विकास २४ दिवसांपासून फरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना विविध पक्षांकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणा-या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज मुंबईतील टिळक […] The post प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सध्या सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांमध्ये सुंदोपसुंदी माजली आहे. विशेषतः ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर मराठीच होईल असे ठणकावून सांगत मुंबईतील मराठी जनतेला आपल्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यातच एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद व अन्सारी का होऊ शकत नाही? असा सवाल करत रान अधिकच पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होतील. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर येथील सत्ता व महापौरपद स्वतःकडे राखण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांत कुरघोडी रंगली आहे. या पार्श्वभूमीवर वारीस पठाण यांनी उपरोक्त सवाल केला आहे. प्रथम पाहू काय म्हणाले वारीस पठाण? वारीस पठाण म्हणाले, मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद, अन्सारी का होऊ शकत नाही? संविधानात तर समानता आहे ना? सर्वांना बरोबरीचा दर्जा, हे संविधानच वाचत नाहीत. यांना काही माहितीच नाही. यांचे केवळ एकच काम आहे. देशात द्वेष पसरवणे, मतांचे ध्रुविकरण करणे व मुस्लिमांना कोणत्याही पद्धतीने शिवीगाळ करणे. यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. यांना विकासासंदर्भात प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. महाराष्ट्रात एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना पॅकेज केव्हा देणार? सरकारला प्रश्न विचारा. त्यांच्याकडे उत्तर नाही. महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढला. त्यावरही त्यांच्याकडे उ्ततर नाही. ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नाही. यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्त नाही. केवळ एकच गोष्ट ध्रुविकरण. मुंबईचा महापौर. जिसको मुंबई में रहना है, ये कहना है. अरे काय मुंबई कुणाच्या बापाची जहागीर आहे का? मुंबई सोडा म्हणणारे तुम्ही कोण? असा खडा सवाल वारीस पठाण यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. ठाकरे गट - एमआयएमची छुपी युती - भाजप दुसरीकडे, भाजपने वारीस पठाण यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत ठाकरे गट व एमआयएमची छुपी युती झाल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, उबाठा एमआयएम छुपी युती? मुंबई महापालिकेत पठाण, खान, कुरेशी, शेख, अन्सारी किंवा एखादी हिजाबधारी महिला महापौर होऊ शकते, हा सूर अचानक उमटलेला नाही. तो उबाठा गटाच्या नव्या, दिशाहीन राजकारणातूनच जन्माला आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि एमआयएमसारख्या पक्षांमध्ये छुपी मोर्चेबांधणी सुरू आहे का, याकडे मतदारांनी अत्यंत सावधपणे पाहणे गरजेचे आहे. ही हातमिळवणी काल-परवा झाली नाही, तर तीन वर्षांपूर्वीच तिची पायाभरणी झाली होती का? 2022 च्या राज्यसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेला एमआयएमने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणूनच आज महापौरपदाचे गाजर पुढे केले जात नाही ना? या प्रश्नांची स्पष्ट, थेट आणि निर्भीड उत्तरे उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली पाहिजेत. मराठी माणसाच्या नावावर मते मागायची, भावनांचे राजकारण करायचे आणि सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर मात्र बिगरमराठी परप्रांतीयांना बसवायचे—हेच ठाकरेंचे खरे राजकारण आहे, हे मुंबईकरांनी विसरू नये. मराठी माणसा, तुझ्या नावावर सत्ता मिळवून तुझ्याच पाठीत खंजीर खुपसण्याचा हा कट ओळख. वेळीच सावध राहा, कारण आज मौन म्हणजे उद्याचा पश्चात्ताप ठरू शकतो, असे ते म्हणालेत.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्रित युतीत निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असलं, तरी जागावाटपाचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आली असून, एवढ्या जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. याच नाराजीचा उद्रेक मंगळवारी उघडपणे पाहायला मिळाला. शिवसेनेचे काही इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते थेट शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन छेडलं. या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यात आल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, जागावाटपात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत अनेक इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असली, तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत होत नसल्याने शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अस्वस्थ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. युती आहे, पण शिवसेनेला न्याय नाही, अशी भावना आंदोलनकर्त्यांच्या घोषणांतून व्यक्त होत होती. आंदोलनादरम्यान इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर बोट ठेवलं. काही शिवसैनिकांनी सांगितलं की, पक्षासाठी पाच-पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अहवाल तयार करून नेत्यांकडे दिले जातात, मात्र ते अहवाल पाहिलेही जात नाहीत. 500 ते 700 इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले असून, त्यामधील बहुतांश कार्यकर्त्यांनी तळागाळात मेहनत घेतलेली आहे. तरीही अहवाल न पाहता बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी शिवतारे बापू यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका करत, ते ग्रामीण भागातील नेते आहेत, त्यांना पुणे शहरातील राजकारण आणि परिस्थितीची माहिती नाही, असा आरोप केला. आमच्या भागात भाजपचे चार उमेदवार आहेत, त्यामुळे तुमचं काही होणार नाही, असं थेट सांगितलं जात असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. या आंदोलनात आणखी गंभीर आरोप पुढे आले. भाजपच्या सांगण्यावरूनच शिवसेनेचे निर्णय होत असल्याचा आरोप करत, शिवसेनेला ताकद दिली जातेय की खच्चीकरण केलं जातंय? असा थेट सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला. काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांची पुण्यातील शिवसेना हळूहळू कमकुवत केली जात आहे. आमची नाराजी ही आजची नाही, तर दीर्घकाळ साचलेली खदखद आहे, ती व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. मात्र, नेते भेटायला तयार नाहीत, संवादाची कोणतीही दारे उघडी नाहीत, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नाराजीच्या या आंदोलनात नीलम गोऱ्हे यांच्यावर थेट आरोप करत, त्यांच्या परिसरात आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला नाही, कारण तिथे शिवसेनेला वाढू दिलं गेलं नाही, असा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या पुण्यातील काही नेत्यांनी निवडणुकीची तिकिटं ‘कमर्शियल’ पद्धतीने देण्याचं ठरवल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. भाजप जे सांगेल तेच ऐकण्याचं काम शिवसेनेचे काही नेते करत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जो प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतो, त्याला आपल्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ येत नाही, असा टोला लगावत, नीलम गोऱ्हेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली ही नाराजी भाजप-शिवसेना युतीसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
युतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना
मुंबई : अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप- शिंदेसेनेची युती होणार असून नेत्यांच्या चर्चेच्या फे-या सातत्याने होत आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात एकमत वजा अंतिम निर्णय होत नाही. त्यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर व चंद्रपूर महापालिकेत युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी युतीतील वरिष्ठ नेत्यांची नागपूर येथे बैठक पार पडली असून यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंधारण मंत्री […] The post युतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गिरीश महाजन यांच्या नेतृ्त्वात गुरुवारी नाशिक येथील मनसे व ठाकरे गटाचे बडे पदाधिकारी भाजपमध्ये आले. यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांनी या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. विरोधी पक्षांनीही या प्रकरणी भाजपला खडेबोल सुनावले. पण गिरीश महाजन यांनी राजकारणातील वास्तव मांडत या टीकेला फारसे महत्त्व नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, जे आमच्यावर टीका करतात, ते उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात. उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको. भाजपचा विस्तार सुरू हेच वास्तव ते म्हणाले, राजकारणात विरोध व टीका ही कायमस्वरुपी नसेत. आज भाजपमध्ये असणारे अनेक नेते पूर्वी भाजपविरोधात बोलत होते. पण आज तेच नेते भाजपमध्ये आहेत. आमदार व मंत्री अशा विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. यावरून पक्षवाढ हीच खरी राजकीय वस्तुस्थिती आहे हे स्पष्ट होते. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. भाजपकडे विविध विचारांचे नेते येत आहेत. ही बाब पक्षाची ताकद दर्शवणारी आहे. पक्षाचा विस्तार होत आहे हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणी पक्षावर होणाऱ्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. राजकारणात काहीही होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. इतरांचे नेते घेणे हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण - संजय राऊत उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी काल नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजप व गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. जे आमच्याकडून गेले किंवा मनसेतून गेले ते भटकेच आहेत. गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात. पण त्यांनाही नगरपालिकेत फटका बसला आहे. त्यांची पत्नी निवडून आली, पण इतर कारणांमुळे त्यांना त्यांना फटका बसला. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. गौतम अदानी सुद्धा भाजपचे सदस्य आहेत. इतरांचे आमदार, खासदार, नेते आपल्या पक्षात घेणे हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे, असे राऊत म्हणाले. हे ही वाचा... मुंबईत युती, आघाडीच का करावी लागते?:BMC निवडणुकीत 30% चा जादुई टप्पा काय? स्थानिक मुद्दे विजयाचे समीकरण कसे बदलतात? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही पक्षांची सध्याची राजकीय व निवडणूक कामगिरी पाहता ही युती आवश्यकही वाटते. पण राज्याच्या राजधानीतील आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या मुंबईत केवळ ठाकरेंसाठीच नव्हे तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी युती किंवा आघाडीचे राजकारण अत्यावश्यक ठरते. यासाठी येथील 30% मतांचे समीकरण फार महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. वाचा सविस्तर
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात मुंबईतील जागावाटपावर सातत्याने चर्चा सुरू आहेत. या चर्चांमधून आता महायुतीचा मुंबईसाठीचा नवा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. 2026 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 227 जागांपैकी भाजप 140 जागांवर तर शिंदे गटाची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने, भाजप आणि शिवसेना मिळूनच सर्व 227 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जागावाटपाबाबतच्या चर्चांचा मागोवा घेतला तर सुरुवातीला भाजपने शिंदे गटासाठी मुंबईत केवळ 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीची चर्चा रंगली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. विरोधकांची एकजूट लक्षात घेता भाजपने आपली भूमिका लवचिक करत शिंदे गटाला अधिक जागा देण्याचे संकेत दिले. त्यानंतर आता 140 आणि 87 असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. तरीही या सूत्रावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, अंतिम घोषणेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपने सध्या वेट अँड वॉच धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि पनवेल या महत्त्वाच्या महानगरपालिका आणि शहरांमधील जागावाटपाचा पेच अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. मात्र भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ठिकाणचे जागावाटप लवकरच अंतिम होईल आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. स्थानिक पातळीवर नाराजी उसळू नये, यासाठी पक्षाकडून अत्यंत सावध भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होईल. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर तेव्हापासून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि किशोरी पेडणेकर या महापौरपदी होत्या. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हे जाहीर केली जातील. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, एमआयएमला 2 आणि 5 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर 2026 ची निवडणूक मुंबईच्या राजकारणाला निर्णायक वळण देणारी ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
पुण्यात विनयभंगाच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. ख्रिसमस पार्टीच्या बहाण्याने एका शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, दोन अन्य घटनांमध्ये पादचारी महिला आणि तरुणीचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. काळेपडळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील महंमदवाडी परिसरात राहणाऱ्या कुतबुद्दीन अली महंमद (वय ७२) या आरोपीने १३ वर्षीय शाळकरी मुलीला २४ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आपल्या घरी बोलावले. 'ख्रिसमस पार्टी करूया, तुला चॉकलेट देतो,' असे आमिष दाखवून त्याने मुलीला घरात बोलावले. घरात दरवाजा बंद करून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन आपल्या आईला ही घटना सांगितली. मुलीच्या आईने तातडीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी कुतबुद्दीन अली महंमद याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, विश्रांतवाडी परिसरात एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. २२ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही तरुणी जेवणानंतर शतपावली करत असताना एका दुचाकीस्वाराने तिच्याशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत, लष्कर भागात एका पादचारी महिलेचा विनयभंग करून तिला धमकावल्याप्रकरणी बलराज संदुपटला (रा. संगम वाडा, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता कामावरून घरी परतत असताना आरोपीने महिलेला अडवले. त्याने तिला 'तू चारित्र्यहीन आहेस' असे बोलून विनयभंग केला आणि 'तुझ्या मुलांना खोट्या पोलिस केसमध्ये अडकवतो' अशी धमकी दिली. आरोपी सतत महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. आरोपीच्या त्रासाला कंटाळून आणि घाबरून महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिस हवालदार एन. धायगुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-शिवसेना युती होणार हे अंतिम असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून युतीच्या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. या प्रकरणी फार काही राहिले नाही, युतीचा तिढा जवळपास सुटला आहे, असे ते म्हणालेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. त्यासाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अद्याप सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नाही. पत्रकारांनी याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी हा प्रश्न जवळपास सुटल्याचे स्पष्ट केले. फडणवीस - शिंदेंत युतीवर चर्चा बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून युतीच्या मुद्यावर चर्चा केली आहे. त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यावर कामही सुरू झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी फार काही राहिले आहे असे मला वाटत नाही. तिढा जवळपास सुटला आहे. आमच्या जागांवर आम्ही आमचे उमेदवारही फायनल करत आहोत. ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील. पण 90 ते 95 टक्क्यांवर काहीही प्रॉब्लेम नाही. बावनकुळे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचे, कुणाला सोबत घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यांच्या अंतर्गत बाबींवर मी बोलणे योग्य नाही. त्यांनी निर्णय करायचेत. अजित पवारांचा पक्ष काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे. अकोल्यात असे घडत आहे. आमची चंद्रपूरसाठीही चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. भाजपची मुंबईत 13 मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. आमची रिपाइंशी चर्चा सुरू आहे. आमच्या घटक पक्षांशीही चर्चा सुरू आहे. नागपुरात जोगेंद्र कवाडेंशी चर्चा सुरू आहे. जयदीप कवाडे यांच्याशीही संवाद सुरू आहे. त्यामुळे त्या - त्या पातळीवर, त्या - त्या ठिकाणी, त्या - त्या पक्षाची क्षमता पाहून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. या पक्षांना भाजप किंवा शिंदे गटाच्या कोट्यातून जागा दिली जाईल. शरद पवार एनडीएत येणार का? सध्या शरद पवार एनडीएत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना तसे संकेत दिलेत. पत्रकारांनी याविषयी बावनकुळेंना छेडले असता त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. आज एनडीएचे निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार केंद्रीय भाजपला आहे. आमचे पंतप्रधान मोदी व अमित शहा व जे पी नड्डा हे याविषयी ठरवतील. पण महाराष्ट्रात आता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही भाजप - सेना महायुती म्हणून लढत आहोत. नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो. त्या - त्या स्थानिक राजकारणात काय परिस्थिती निर्माण होईल, स्थानिक पातळीवर कोणत्या युत्या होतील. आम्ही जास्त अधिकार स्थानिक लेव्हलला दिलेत. त्यानुसार त्या - त्या लेव्हलला सर्वकाही ठरत आहेत. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज्याच्या महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत बावनकुळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार पक्षावर नाराज नाहीत. शांत आहेत. आम्ही सर्वजण शांतपणे बसलो आहोत. मुनगंटीवार यांच्याविषयी चुकीचा गैरसमज निर्माण केला जात आहे. कारण नसताना असे केले जात आहे. ना त्यांच्या मनात तसे काही आहे, ना आमच्या मनात तसे काही आहे. मुनगंटीवर आमचे नेते आहेत. राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चंद्रपूर व विदर्भातील महापालिका लढवत आहोत. स्थानिक पातळीवर पक्षप्रवेश होताना काही जुने कार्यकर्ते नाराज होतात. पण भाजपचा डीएनए असा आहे की, कुणी भाजपमध्ये नवे आले तर पक्ष त्याला सांभाळून घेतो.
मुंबई : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुस-या लढतीत विराट कोहलीने आणखी एक दमदार खेळी करुन दाखवली. पहिल्या सामन्यात शतकी खेळीसह लक्षवेधी ठरलेला विराट गुजरात विरुद्धच्या दुस-या सामन्यातही तो शतक झळकावेल, असे वाटत होते. पण ७७ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग दुस-या शतकाची त्याची संधी हुकली, पण या खेळीसह त्याने वनडेत […] The post विराट कोहलीचे शतक हुकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुलचालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत, त्यांच्या सुपुत्राकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशिद खान मामू यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी हा निर्णय केवळ मतांचे लांगुलचालन करण्यासाठी असल्याचा आरोप केला. अशा प्रकारे व्यक्तीविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून, यातून संबंधित नेतृत्वाची वैचारिक घसरण स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी आणखी आक्रमक शब्दांत सांगितले की, विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशावर प्रेम करणारे, राष्ट्रनिष्ठ आणि विचारांशी प्रामाणिक असलेले नागरिक हे सर्व बारकाईने पाहत असल्याचे सांगत, या प्रकारच्या राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना फडणवीस यांनी महायुतीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीची घोषणा करण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही किंवा आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. आम्ही आधीपासूनच एकत्र आहोत आणि आमच्यात कोणताही संभ्रम नाही, असा दावा त्यांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या घोषणा या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमच्यातील एकजूट कृतीतून दिसते, घोषणांमधून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उदाहरण देत विरोधकांची खिल्ली उडवली. पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येणार असतील, तरच त्यांना घोषणा करावी लागते, असा उपरोधिक उल्लेख करत त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यात नेमकं काय सुरू आहे, हेच कुणालाच कळत नाही, असा टोमणाही फडणवीस यांनी मारला. महायुती योग्य वेळी योग्य पद्धतीने आपली भूमिका जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून, पुणे महानगरपालिका निवडणूक पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. पुण्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत असून, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये संभाव्य युतीच्या चर्चांनी वातावरण तापले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच या निर्णयाला तीव्र विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट राजीनाम्याचं अस्त्र उपसले आहे. या घडामोडीमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि आतापर्यंत मिळालेल्या संधींबद्दल आभार मानले. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांमुळे आपली वैचारिक भूमिका डावलली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेदरम्यान प्रशांत जगताप भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी वेदनादायी असल्याचं त्यांच्या शब्दांतून स्पष्ट दिसत होतं. राजीनाम्यानंतर लगेचच प्रशांत जगताप काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जगतापांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही प्रशांत जगताप यांना संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र दोन दिवसांपूर्वीच आपण काँग्रेसच्या विचारधारेचा असल्याचं स्पष्ट करत, शिवसेनेत जाण्याची शक्यता जगताप यांनी नाकारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काँग्रेस प्रवेशावरच त्यांची शिक्कामोर्तब झाला. पुण्यातील एक अनुभवी आणि वजनदार नेते प्रशांत जगताप यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ते पुण्यातील एक अनुभवी आणि वजनदार नेते मानले जातात. त्यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती. पुणे महानगरपालिकेत त्यांनी दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम केलं असून, वानवडी प्रभागातून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2007, 2012 आणि 2017 या तिन्ही महापालिका निवडणुकांत त्यांनी विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली होती. स्थानिक पातळीवरील संघटन बांधणी आणि जनसंपर्कात ते कुशल मानले जातात. 2016-17 या कालावधीत प्रशांत जगताप यांनी पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत प्रशासकीय अनुभव मिळवला. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राहण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते आणि पुण्यातील शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. जरी त्यांना विजय मिळवता आला नसला तरी, हडपसर आणि आसपासच्या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याचं स्पष्ट झालं होतं. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला या निर्णयामुळे मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसमध्येही काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील पुण्यातील एकमेव ताकदवान नेता असल्याची चर्चा होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची पुण्यातील ताकद कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर, काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला एक अनुभवी नेता मिळणार असून, नगरसेवकांची संख्या वाढण्याची संधी काँग्रेससमोर निर्माण होणार आहे. मात्र, काँग्रेसमध्येही काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, प्रशांत जगताप यांना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही प्रशांत जगताप यांना फोन केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र जगताप यांनी शिंदेंशी संवाद टाळल्याचं समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी त्यांना आपल्याकडे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा असल्याने ते काँग्रेसमध्येच प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पक्षप्रवेशाबाबत माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप यांनी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधून भावना समजून घेतल्या. भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला आक्रमक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचा त्यांनी उल्लेख केला. मात्र, आपण भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. संविधान, पुरोगामी विचारसरणी आणि भाजपविरोधी लढा हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी नमूद करत, पुण्याच्या भल्यासाठी योग्य तो राजकीय निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. या सर्व घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची नांदी ठरली असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही पक्षांची सध्याची राजकीय व निवडणूक कामगिरी पाहता ही युती आवश्यकही वाटते. पण राज्याच्या राजधानीतील आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या मुंबईत केवळ ठाकरेंसाठीच नव्हे तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी युती किंवा आघाडीचे राजकारण अत्यावश्यक ठरते. यासाठी येथील 30% मतांचे समीकरण फार महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकींपेक्षा मुंबईतील बीएमसी निवडणुका वॉर्डाच्या हिशोबाने लढल्या जातात. येथील मतदार क्वचितच एखाद्या पक्षाच्या मागे एकसंधपणे उभे राहतात. मागील 2 दशकांतील निवडणूक निकालांवरून असे दिसून येते की, मुंबईने सातत्याने विभाजित निकाल दिले आहेत. म्हणूनच राजकीय पक्षांना येथे स्वतःच्या लोकप्रियतेच्या भरवशावर बसता येत नाही. त्यांना सातत्याने युती किंवा आघाडी, जागावाटप व समन्वय यावर अवलंबून रहावे लागते. 2002 पासून एकाही पक्षाला 30 टक्क्यांचा टप्पा ओलांडता आला नाही इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, गेल्या 4 बीएमसी निवडणुकांमधील आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, 2002 पासून कोणत्याही एका पक्षाने 30 टक्के मतदानाचा टप्पा ओलांडला नाही. त्यामुळे बीएमसी निवडणुकीचा निकाल मोठ्या जनादेशावर अवलंबून नाही, तर कोणता पक्ष किंवा गट मतांचे विभाजन रोखून किरकोळ आघाडीचे विजयात रुपांतर करू शकतो यावरच सर्वकाही अवलंबून आहे. मतांचे हेच विभाजित अंकगणित पक्षांना युती करण्यासाठी बाध्य करते. मुंबईचे मतदार स्वतःच्या मर्जीने मतदान करतात. 2002 च्या निवडणुकीत शिवसेना 28.10 टक्क्यांच्या मतांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आली होती. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. तिला 26.48 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर 15 वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये स्थिती तीच राहिली. अनेक राजकीय घडामोडी व समीकरणे बदलली, पण कोणत्याही पक्षाला 30 टक्क्यांचा टप्पा ओलांडता आला नाही. 30 टक्क्यांचा टप्पा का ओलांडता येत नाही? याचे मुख्य कारण हे आहे की, मुंबईत प्रत्येक ठिकाणी एकसारखे मतदान होत नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे मुद्दे असतात. त्यामुळे तेथील मतदारांचा व्होटिंग पॅटर्नही वेगळा असतो. त्यात भाषा, उत्पन्नाचा स्तर, धर्म व व्यवसाय आदी मुद्दे मतदारांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकतात. यामुळेच बीएमसी निवडणुकीत आघाड्यांची भूमिका वाढते. एकूण व्होट शेअरमधील छोटे-मोठे बदलही अनेक वॉर्डांमधील निर्णय फिरवण्याची ताकद ठेवतात. 2017 नंतर काय घडले? भाजप व शिवसेनेने 2017 ची बीएमसी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. वेगळ्या वाटा केल्यानंतरही एकाही पक्षाला मुंबईत 30 टक्के मतांचा टप्पा ओलांडता आला नाही. आजचे समीकरण काय? सध्याचा राजकीय सारीपाट पूर्णतः बदलला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना तथा पारंपरिक मराठी मतदार एकजूट न होण्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नव्या आघाडीची नितांत गरज होती. यामुळेच ठाकरे गटासाठी राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करणे नितांत आवश्यक बनले होते. या आघाडीमुळे उद्धव यांना विजयाची हमी मिळणार नाही. पण मतांचे नुकसान निश्चितच टाळता येईल. मनसेचा प्रभाव मनसेचा 2012 मध्ये झालेला उदय एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्या वर्षी राज ठाकरे यांच्या पक्षाला 20.67 टक्के मते मिळाली. पण जागा फक्त 28 मिळाल्या. परिणामी, सत्तासुंदरी त्यांच्यापासून दूरच राहिली. तथापि, मनसेमुळे शिवसेनेचा सपोर्ट बेस कमी झाला. अनेक वॉर्डांमधील निकाल फिरले. पण त्यानंतर 2017 पर्यंत मनसेचा मतदानाचा वाटा 8 टक्क्यांपर्यंत घसरला. त्यांच्या जागांची संख्या 7 वर आली. या घसरणीचा फायदा शिवसेनेला नाही तर भाजपला झाला. बीएमसी निवडणुकीत भाजपचे समीकरण भाजप जवळजवळ 15 वर्षे मुंबईच्या महापालिका निवडणुकीत एक लहान पक्ष होता. 2002 ते 2012 पर्यंत त्याचा मतदानाचा टक्का 9 टक्क्यांपेक्षा कमी राहिला. त्याच्या जागाही 28 ते 35 दरम्यान होत्या. मुंबईत त्याच्यावर शिवसेनेची सावली कायम राहिली. पण 2017 मध्ये भाजपने या सावलीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यामुळे चित्र पूर्णतः बदलले. एकाच निवडणुकीत त्यांचा मतदानाचा टक्का 27.32 टक्क्यांपर्यंत वाढला. जागांची संख्याही 82 वर पोहोचली. हा आकडा शिवसेनेपेक्षा फक्त 2 जागांनी कमी होता. आतापर्यंतच्या बीएमसी निवडणुकीतील ही सर्वात मोठी घडामोड होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजपने कोणत्याही औपचारिक युतीशिवाय हे यश मिळवले होते. तथापि, याची अनेक कारणे होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीत घसरण झाली होती. मनसेच्याही टक्केवारीत लक्षणीय घट झाली होती. तसेच अनेक वॉर्डांमधील मतविभाजनाचा फायदाही भाजपला झाला होता. भाजपसाठी शिंदे का महत्त्वाचे? भाजपचा मतांचा टक्का वाढला तरी ते त्याच्यासाठी पुरेसे नाही. केंद्र व राज्यात सत्तेत असूनही भाजपला शिवसेनेला सर्वात मोठा पक्ष म्हणून हटवता आले नाही. तसेच 30 टक्के मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. म्हणूनच, सध्या सर्वात ताकदवान पक्ष असूनही भाजपला मुंबई मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करण्याची आवश्यकता वाटते. बीएमसीच्या 20 वर्षांच्या वाटचालीतून असे दिसून येते की, मुंबई कोणत्याही पक्षाला क्वचितच स्पष्ट बहुमत देते. 227 सदस्यीय महानगरपालिकेवर एकट्याने राज्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त जागा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला मिळवता आल्या नाहीत. निवडणुका सामान्यतः राजकीय पक्ष त्यांच्या विभाजित मतांचे व्यवस्थापन किती चांगल्या प्रकारे करतात यावरून जिंकल्या जातात. सर्वात लोकप्रिय कोण? आहे यावरून हे ठरत नाही. ठाकरे बंधूंसाठी युतीच महत्त्वाची ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना मतांचे विभाजन कमी करता येईल. यामुळे कडवी टक्कर असणाऱ्या वॉर्डांतील त्यांच्या विजयाची शक्यताही वाढेल. पण 30 टक्क्यांची मतांचा टप्पा कसा पार करता येईल? हे त्यांना पाहावे लागेल. फक्त युतीच त्यांना येथे सत्तेत आणू शकते. त्यामुळे मतांची व राजकीय पक्षांची बेरीजच त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मतदानाच्या दिवशी घडलेल्या हिंसाचारामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी विकास गोगावले यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाड पोलिस ठाण्यात विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी भूमिगत झाले आणि आजपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणात विकास गोगावले यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. माणगाव न्यायालयात त्यांनी दोन वेळा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, मात्र दोन्ही वेळा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई न्यायालयातही धाव घेतली, परंतु तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सलग तिसऱ्यांदा जामीन नाकारण्यात आल्याने विकास गोगावले यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. गेल्या 24 दिवसांपासून ते फरार असल्याची माहिती असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. याच प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाना जगताप हे देखील अद्याप फरार असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय वर्चस्वाची लढाई असल्याची चर्चा रंगली आहे. महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला होता. या राड्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र न्यायालयाने आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जांना नकार दिल्यानंतर, संबंधित सर्व आरोपी भूमिगत झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावरही आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. राजकीय आघाड्यांवर वेगळं वळण मिळणार दरम्यान, या मारहाण प्रकरणाला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्षाचीही पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेते एकमेकांच्या गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर अधिक तीव्र झाले असून, त्याचाच स्फोट मतदानाच्या दिवशी हिंसाचाराच्या रूपात झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या प्रकरणाला कायदेशीर व राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर वेगळं वळण मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका जवळ येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची, पण गुप्त स्वरूपाची बैठक नुकतीच पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे, या बैठकीची माहिती बाहेर येताच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, येत्या महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महत्त्वाचा खुलासा केला. अजित पवार यांच्या सूचनेनुसारच ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत प्रामुख्याने जागावाटपाचा गुंतागुंतीचा प्रश्न कसा सोडवता येईल, यावर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीत दोन्ही गटांचे उमेदवार ज्या जागांवर विजय मिळवू शकतील, अशाच जागांवर योग्य उमेदवार देण्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे. या महत्त्वाच्या बैठकीला शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून स्वतः अजित गव्हाणे यांनी सहभाग घेतला होता. दोन्ही बाजूंनी अनुभवी आणि प्रभावी नेते उपस्थित असल्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक नव्हे, तर आगामी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक असल्याचं मानलं जात आहे. बैठकीदरम्यान स्थानिक राजकीय परिस्थिती, मतदारांचा कल, तसेच मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. या सगळ्या घडामोडी पाहता, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेसाठी एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं - खासदार अमोल कोल्हे दरम्यान, अजित गव्हाणे यांनी हेही स्पष्ट केलं की, अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा ठोस फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील, असं त्यांनी सांगितलं. अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरच घेतला जाईल, यावर त्यांनी भर दिला. दुसरीकडे, खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीवर थेट भाष्य करणं टाळलं. त्यांनी ही बैठक मैत्रीपूर्ण स्वरूपाची होती, असं सांगत चर्चांवर मौन बाळगलं. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकतं, असा सूचक इशारा देत त्यांनी भविष्यातील घडामोडींसाठी दार उघडं ठेवलं आहे. महापालिका निवडणूक चुरशीची ठरणार शहरात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशानेच या हालचाली सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. अजित गव्हाणे यांच्या माहितीनुसार, शिवसेना, मनसे तसेच इतर काही राजकीय पक्षही अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील भूमिकेबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आता अधिकच बळावली असून, आगामी महापालिका निवडणूक चुरशीची ठरणार हे निश्चित मानलं जात आहे.
हिंदुत्वाशी बेइमानी करून सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमांचे लाड करणे थांबवा. हिंदू बांधवांवर, हिंदुत्वावर, गोवंशावर वारंवार हल्ले करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींच्या गळ्यात गळे घालून उमेदवारी देण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. हिंदुत्ववादी पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षातील काही नेतेमंडळी हिंदुत्वाची उपेक्षा करत आहेत. गुन्हेगारांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न कर्तर आहेत. हे असेच चालत राहिले तर भविष्यात भाजपाचीही अवस्था काँग्रेससारखीच दयनीय होईल. अशा लोकांना पुण्यातील हिंदुत्ववादी समाज जागा दाखवून देईल, असा इशारा हिंदुत्व जागृती सभेत देण्यात आला. दहशतवादमुक्त, शांत व सुरक्षित पुण्यासाठी भाजपची उमेदवारी यादी मुस्लिममुक्त असायला हवी, असा आग्रहही या सभेत धरण्यात आला. हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्वाची उपेक्षा थांबवावी या मागणीसाठी “ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’ या मोहिमेसाठी हिंदुत्व जागृती सभेचे आयोजन केले होते. समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये आयोजित सभेला हभप संग्रामबापू भंडारे, क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंदभाऊ एकबोटे यांनी संबोधित केले. पुण्यात भगव्याची, हिंदुत्वाची उपेक्षा सुरू : एकबोटे मिलिंद एकबोटे म्हणाले, पुण्यात भगव्याची, हिंदुत्वाची उपेक्षा सुरू आहे. भाजपचे नेते गुंडांना पोसण्याचे काम करत आहेत. हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या मुस्लिमांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह करत आहेत. हे चित्र अतिशय दुर्दैवी असून धर्मासाठी, देशासाठी व पक्षासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या प्रामाणिक नेत्यांवर अन्याय होत आहे. या देशाच्या, धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मात्र, आज हिंदूंकडूनच मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू असल्याचे ते म्हणाले. आपल्यातील हिंदुत्व जागृत ठेवण्याची गरज : भंडारे संग्रामबापू भंडारे म्हणाले, हिंदू सहिष्णू आहे. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जाणारा धर्म आहे. मात्र, यावर सातत्याने आघात होत आहेत. आपण शांतपणे हे पाहत बसायचे का? आपल्यातील हिंदुत्व जागृत ठेवण्याची गरज आहे. समीर कुलकर्णी म्हणाले, हिंदुत्वाशी पंगा घेणाऱ्यांना तोंड दाखवायलाही जागा राहत नाही, हे आजच्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून दिसून येते. हिंदूंची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांचे फावले असल्याचे ते म्हणाले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना जागा दाखवून देऊगेल्या अनेक वर्षांत भाजपने कमावलेली पुण्याई वाया घालवण्याचे काम स्थानिक शीर्ष नेतृत्व करीत आहे. हज हाऊस बांधण्यासाठी आग्रही असणारेच आज पुन्हा मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. आज हिंदुत्वाच्या जिवावर मंत्रिपद, आमदारकी मिळवणाऱ्या याच लोकांनी आणलेला हज हाऊसचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्याप्रमाणे या निवडणुकीत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना व पक्षाला जागा दाखवून देऊ, असेही या वेळी मिलिंद एकबोटे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. राज्यात येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट व मनसेने युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळे मुंबईतील महायुतीचे राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेची धार अधिकच धारदार केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, नाशिकमध्ये “ठाकरे बंधू एकत्र” आल्यावर ढोल पिटणारे कार्यकर्ते अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपात सामील होतात तेव्हा त्यावर संजय राऊत दुःख व्यक्त करत नैतिकतेचे प्रश्न विचारतात, हा सरत्या वर्षांतील सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल. ...आणि नैतिकता थेट रसातळाला गेली राजकारणात कार्यकर्त्यांसमोर नैतिकतेचा आदर्श नेत्यांनीच ठेवायचा असतो. पण तो आदर्श केव्हाच उद्ध्वस्त झाला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी, उद्धव ठाकरे यांनी कोणताही वैचारिक विधीनिषेध न पाळता, क्षणार्धात भूमिका बदलत काँग्रेससोबत आघाडी केली. त्या दिवशी केवळ सत्ता-समीकरण बदलले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण सुरू झाली… आणि नैतिकता थेट रसातळाला गेली. नैतिकतेवर प्रश्न करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे ज्या नेतृत्वाने स्वतः विचार, भूमिका आणि शब्द यांची किंमत शून्यावर आणली, ते आज कार्यकर्त्यांना नैतिकतेचे धडे देत आहेत… हा दुटप्पीपणाचा कळस आहे. नेतेच जर संधीसाधूपणाचे प्रतीक बनले असतील, तर कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा तरी कोणत्या तोंडाने करणार? आज जे घडते आहे ते अचानक नाही; ते 2019 मध्ये पेरलेल्या संधीसाधू राजकारणाचेच पीक आहे. नैतिकतेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्यांनी आधी गमावला आहे, त्यांनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये काय घडले होते? उल्लेखनीय बाब म्हणजे काल नाशिक येथील ठाकरे गट व मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. पण मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवत त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. या घटनाक्रमावरून विरोधकांनी भाजपच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे भाजपने राजकीय नैतिकतेच्या घसरणीची सुरुवात महाविकास आघाडीच्या स्थापनेसोबतच झाल्याचा दावा करत विरोधकांची टीका फेटाळून लावली आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, हा दावा करणाऱ्या भाजपवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई मराठी माणसाची असून ती कोणाच्या मित्राला विकण्यासाठी नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिले. मोदींच्या जवळच्या उद्योगपतीच्या घशात मुंबई घालणे म्हणजे मराठी माणसांची सेवा नसून हा विश्वासघात आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. भाजपने खरोखर मराठी माणसांसाठी काय केलं ते जाहीरपणे सांगावं, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, राज्यात कायदा-सुव्यवस्थेवरूनही संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप गुंडांचं राज्य चालवत असून पोलिस यंत्रणा ही भाजपची टोळी बनली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सातारा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे देवेंद्र फडणवीसांना माहीत असल्याचा दावा करत त्यांनी गंभीर आरोप केला. त्या प्रकरणातील आरोपींना अभय दिलं जात असल्याचा आरोप करत राज्यात गुन्हेगारीला संरक्षण मिळत असल्याचं चित्र त्यांनी मांडलं. इतकेच नाही तर या प्रकरणात मुंबईतील एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. हा पोलिस अधिकारी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा असल्याचा मोठा दावा देखील राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी माणसाला मुंबईबाहेर हुसकावलं गेलं, असा आरोप भाजप नेते करत असताना संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले तर तुम्हीही सत्तेसाठी एकत्र आलात का, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय योगदान दिलं, याचं उत्तर द्यावं लागेल, असं राऊत म्हणाले. मराठी माणसांची ताकद एकत्र ठेवण्याऐवजी भाजपने ती संघटना फोडण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाजप कायमच मौन बाळगत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांना वगळता भाजपमधून कुणीही कधी अखंड महाराष्ट्रासाठी ठाम भूमिका घेतली नाही, असं ते म्हणाले. बेळगाव-कारवार सीमाप्रश्नात मराठी माणसावर अन्याय होत असताना भाजप नेत्यांनी आवाज उठवला नाही. अधिवेशनात महाराष्ट्र तोडण्याची आणि वेगळ्या विदर्भाची भाषा सुरू असताना मुख्यमंत्री म्हणून उभं राहून जाब विचारणं गरजेचं होतं, पण ते कर्तव्य भाजपने पाळलं नाही, असा घणाघात राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज भाजप राज्यात सत्तेत असती का? असा सवाल करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्राचे तुकडे पाडून एखाद्या छोट्या भागाचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राच्या अस्मितेचा खरा रक्षणकर्ता कोण, हे जनतेला चांगलंच माहीत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत....
भरधाव वेगातील कारचे टायर फुटले:जि. प. सदस्य डॉ. प्रतीक उईके प्रतीक उईके थोडक्यात बचावले
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नँचरल ग्रोवर्स साखर कारखाना समोर शुक्रवारी (ता.२६) पहाटेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतीक उईके यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. चालत्या गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, डॉ. प्रतीक उईके सुदैवाने बालबाल बचावले आहेत. प्राप्त माहितीनुसार, डॉ. प्रतीक उईके हे पंचायत समिती सदस्य मधुर उके यांच्या सोबत काही कामा निमित्ताने नागपुरला गेले होते. नागपुर वरून परत येतांना डाँ. उईके यांनी पंचायत समिती सदस्य मधुर उके यांना त्यांच्या बारव्हा या गावी सोडून दिल्यानंतर सोनी या स्वगावी चारचाकी वाहनाने जात होते. माञ औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखांदुर समोर त्यांच्या एक्स.यु.व्हि. या चार चाकी वाहनाचा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, नशिबाची साथ आणि वेळेत बचाव कार्यामुळे डॉ. उईके यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर सामसूम होती, मात्र अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. डॉ. प्रतीक उईके सुखरूप असल्याची बातमी मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पुण्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ घडल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती. गाठीभेटी, बैठका आणि पडद्यामागील हालचाली सुरू असतानाच या संभाव्य युतीला उघड विरोध करणारे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत जगताप यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मोठी माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत जगताप हे आज काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून, दुपारी 12 वाजता पुण्यातील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीच्या धोरणावरून नाराजी व्यक्त करणाऱ्या जगतापांनी अखेर काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसव्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटाकडूनही प्रशांत जगताप यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशांत जगताप यांना फोन केल्याचे समजते. गुरुवारी रात्री उशिरा सुमारे नऊ मिनिटे दोघांमध्ये थेट संवाद झाला. या फोन कॉलमध्ये उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देत योग्य सन्मान दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट कधीही भाजपसोबत जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. याशिवाय, गेल्या दोन दिवसांत ठाकरे गटातील अनेक नेत्यांनीही जगताप यांच्याशी संपर्क साधून पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली होती. या सर्व घडामोडींवर प्रशांत जगताप यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांनी आपल्यासारख्या एका कार्यकर्त्याशी थेट संवाद साधला, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि संघर्ष करण्याची तयारी असलेल्या नेत्याने आपली भावना समजून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही आमच्या पक्षात काम करू शकता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचा उल्लेख करत जगताप यांनी आभार मानले. मात्र, आपण भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. आपण काँग्रेस विचारसरणीचा कार्यकर्ता असल्याने ठाकरे गटात जाणे शक्य नसल्याचेही त्यांनी याआधी स्पष्ट केले होते. लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून, विचारधारात्मक आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना प्रशांत जगताप यांनी आपली लढाई संविधान आणि पुरोगामी विचारधारेसाठी असल्याचे स्पष्ट केले. ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून, विचारधारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील भाजप सरकारला आणि महायुतीला सक्षमपणे आव्हान देऊ शकणारा पक्ष निवडणे, हाच आपल्या निर्णयामागचा निकष असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काही तासांत आपण आपल्या राजकीय आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, आणि त्यानुसार काँग्रेस प्रवेशाची घोषणा समोर आली आहे. या साऱ्या घडामोडींमुळे पुण्यातील राजकारण तापले असून, आगामी महापालिका निवडणुकीआधीच पक्षांतराच्या राजकारणाने वेग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळजनक घटना समोर आली असून, नगरपालिकेच्या निवडणुकीतील विजयानंतर अवघ्या काही दिवसांतच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत विजयी ठरलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात एकच खळबळ उडाली असून, आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव पवन अशोक काळे (वय 32) असे असून, त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीड शहरातील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात घडली. बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अशोक काळे हे नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या विजयाचा आनंद कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये साजरा होत असतानाच, त्यांचे पुत्र पवन काळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घरातील व्यक्तींना ही घटना लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. पवन यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला. पवन काळे हे वडिलांच्या राजकीय वाटचालीत अत्यंत सक्रिय होते. नगरसेवकपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान पवन यांनी वडिलांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. युवकांना एकत्र करत त्यांनी प्रचार यंत्रणा मजबूत केली होती. प्रचाराच्या काळात पवन सतत कार्यकर्त्यांमध्ये दिसत होते आणि निकालाच्या दिवशीही त्यांनी वडिलांच्या विजयाचा जल्लोष मनापासून साजरा केला होता. विजयी मिरवणुकीतही पवन सहभागी होते. घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असतानाच पवन यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न आता सर्वांनाच सतावत आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. पवन काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणताही सुसाईड नोट मिळालेला नसल्याची माहिती असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. कौटुंबिक, वैयक्तिक किंवा अन्य कोणतेही कारण होते का, याचा शोध घेतला जात आहे. आनंदाच्या क्षणी आलेला हा दुर्दैवी धक्का पचवणं कठीण वडिलांच्या राजकीय यशाचा आनंद साजरा होत असतानाच मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आनंदाच्या क्षणी आलेला हा दुर्दैवी धक्का पचवणं कठीण आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. अशोक काळे कुटुंबावर कोसळलेल्या या संकटाने संपूर्ण बीड शहर सुन्न झाले आहे. तरुण पवन काळे यांच्या निधनाने एक उत्साही, सक्रिय युवक काळाच्या पडद्याआड गेला असून, या घटनेने पुन्हा एकदा मानसिक तणाव आणि आत्महत्यांसारख्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके सत्य समोर येणार आहे.
आखाडा बाळापूर, सापळी शिवारातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले:महसूल विभागाच्या पथकाची कारवाई
आखाडा बाळापूर व सापळी शिवारातून महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले असून सदर ट्रॅक्टर शुक्रवारी ता. २६ पहाटे आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणून लावण्यात आले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकावर गुुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महसूल विभागाच्या पथकातील सुत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्हयात अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. सदरील ट्रॅक्टर भरधाव वेगाने तसेच शेतातील पिकांतून नेले जात असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रारीही केल्या जात आहे. तर काही ठिकाणी वाळू वाहतूकदार व शेतकऱ्यांमधून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पथक स्थापन केले आहे. तर वसमत येेथे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, हरीष गाडे, हिंगोलीत उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सखाराम मांडवगडे यांनी पथक स्थापन केले आहे. दरम्यान, सापळी शिवारातील वाळू घाटावरून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून मंडळ अधिकारी आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी कमलकुमार यादव, विकास पंडीत, सुनील भुक्तार, विशाल पतंगे, एकनाथ कदम यांच्या पथकाने मध्यरात्री पासून वाहनांची तपासणी सुरु केली होती. यामध्ये सापळी शिवारात एक तर आखाडा बाळापूर शिवारात एक असे दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आली. पथकाने दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणले आहेत. याप्रकरणी दोन्ही ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
घाटपुरी येथील श्री जगदंबा संस्थांच्या मंदिरातील देवी व गणपतीच्या मूर्तीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. घाटपुरी येथील जागरूक देवस्थान म्हणून ओळख असलेल्या मंदिराच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज चोरट्याने २४ ते २५ डिसेंबरच्या रात्री नऊ ते सकाळी सहा यादरम्यान तोडून मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. जगदंबा देवीच्यावरील चांदीचा मुकुट, गळ्यातील सेवन पीस, सोन्याचे मंगळसूत्र, आरटीपीसीएल हार, चांदीचे डोळे, गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट असा एकूण ७३ हजार रुपयांचा अलंकार चोरून नेले.नित्याप्रमाणे मंदिराचे पुजारी संजय शर्मा हे २५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मंदिर उघडण्यासाठी आले असता त्यांना मुर्त्यांवरील अलंकार दिसून आले नाही. या घटनेची माहिती मंदिराचे व्यवस्थापक पुरुषोत्तम भट्टड यांना त्यांनी दिली. त्यांनी संस्थांचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष सुभाष मंत्री यांना दिली. ही माहिती मिळतात त्यांनी मंदिरा प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर देवीच्या अंगावरील सोने-चांदीचे व गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट दिसून आला नाही. या घटनेची माहिती येथील शिवाजीनगर पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर हे सहकाऱ्यांसह मंदिरात पोहोचले. आजूबाजूच्या परिसरात पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना देण्यात आली. ते पण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो चोरटा कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज हस्तगत केले आहे. चोरट्याच्या शोधासाठी तीन पथके; लवकरच अटक करू चोरट्याचा शोध लावण्यासाठी शिवाजीनगर पोलिस स्टेशन, एलसीबीचे दोन पथक असे तीन पथक तयार करण्यात आले आहे. ही पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. या पथकाला किंवा प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंदार पुरी यांना केव्हा यश मिळते हे येणाऱ्या दिवसातच समजू शकेल. दरम्यान चोरट्याचा पोलिसांना मार्ग मिळावा, यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. श्वानाने मंदिरापासून ते मंदिरा नजीक असलेल्या बोर्डी नदीपर्यंत मार्ग दाखवला. तेथून चोरटा एखाद्या वाहनाने पसार झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिसांनी मंदिराचे पुजारी संजय शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंदार पुरी करीत आहे.
लाखांदूर शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे हा अपघात घडला असून, यात एक चार वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. सकाळच्या शांत वेळेत, कामासाठी निघालेल्या ट्रॅक्टरने अचानक रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटल्याचा थरारक प्रसंग घडला. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकासह त्याच्यासोबत असलेला लहान मुलगा गंभीर अवस्थेत असून, या घटनेने लाखांदूर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप बालकाचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे साडेसात वाजताच्या सुमारास घडली. लाखांदूर येथील रहिवासी निलेश अवसरे (वय 28) हा आपल्या काही सहकाऱ्यांसह ट्रॅक्टरने कामानिमित्त बाहेर पडला होता. मात्र, प्रत्यक्षात ट्रॅक्टर चालवताना तो पूर्णपणे मद्याच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, ट्रॅक्टर अतिशय वेगात आणि चुकीच्या दिशेने जात होता. अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळला. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की, काही क्षणांसाठी परिसरात एकच खळबळ उडाली आणि रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. अपघाताची तीव्रता अत्यंत भयावह होती. ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे रस्त्यावरील लोखंडी कठडे पूर्णपणे मोडून पडले. ट्रॅक्टरची ट्रॉली धडकेनंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली. या दुर्घटनेत चालक नीलेश अवसरे याच्यासह त्याच्यासोबत असलेला दक्ष अवसरे (वय 4 वर्षे) हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेला दक्ष हा नीलेशचा पुतण्या असल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या कुटुंबातील लहान मुलाला सोबत घेऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. रस्त्यावर पडलेला उलटलेला ट्रॅक्टर आणि चिरडलेले कठडे पाहून अपघात किती भीषण होता, याची कल्पना नागरिकांना आली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली, तर काहींनी तातडीने रुग्णवाहिकेसाठी आणि मदतीसाठी संपर्क साधला. जखमी चालक नीलेश आणि चिमुकला दक्ष यांना त्वरित लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान दक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मद्यपान करून वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम समोर या अपघातानंतर लाखांदूरमधील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना दिसून येत आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे गंभीर गुन्हे असताना, स्वतःच्या चार वर्षांच्या पुतण्याला सोबत घेऊन ट्रॅक्टर चालवणाऱ्या नीलेश अवसरेच्या कृत्यावर नागरिकांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. अशा निष्काळजी आणि बेजबाबदार चालकांमुळे निष्पापांचे जीव धोक्यात येतात, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून पोलिस प्रशासनाकडे केली जात आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा मद्यपान करून वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम समोर आले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सकारात्मकता, उत्तम नियोजन, नावीन्यपूर्ण साहित्यविषयक कार्यक्रम व उत्साहाने भरलेले लेखिका संमेलन निश्चितच यशस्वी व स्मरणात राहणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. भारती सुदामे यांनी केले. त्या विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित एक दिवसीय लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. व्यासपीठावर लेखिका संमेलनाच्या उद्घाटक अभिनेत्री व लेखिका डॉ. श्वेता पेंडसे, पुणे येथील शिक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर, स्वागताध्यक्ष नीलिमा पाटील, विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, सदस्य नितीन सहस्त्रबुद्धे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. दादा गोरे, अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल, डॉ. सहदेव रोठे, लेखिका संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. डॉ. भारती सुदामे म्हणाल्या की, आतून व्यक्त होणं हे स्त्रीचं सामर्थ्य आहे, लेखनाचा धर्म हा प्रवास व प्रवाह असून केवळ स्वतःपुरतं न बघता समाजासाठी उत्तरदायी असणं, लहान सहान गोष्टीत समाज व राष्ट्राचे भान आवश्यक असेल तर लेखन निर्मितीत सुद्धा लेखन भाग व साहित्यिक जाणिवा जागृत असणे गरजेचे आहे. ज्येष्ठ लेखक डॉ. दादा गोरे यांनी संमेलन आयोजनाचे कौतुक केले. संमेलनाच्या उद्घाटक डॉ. श्वेता पेंडसे यांनी विदर्भ साहित्य संघाचे हे लेखिका संमेलन हे लिहिणाऱ्या जुन्या व नव्या पिढीसाठी एनर्जी बुस्टर आहे, योजनाबद्ध आयोजन व व्यवस्थापनाचा हा अविष्कार सर्व संस्थांना दिशादर्शक आहे, असे उद्गार काढले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, पुणे येथील शिक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर यांचीही भाषणे झाली. संमेलनात दऊत लेखणी या विजय देशमुख संपादित संमेलन विशेषांकाचे प्रकाशन झाले. नृत्यासह नाट्यछटेने भारावले रसिक- लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी या गीतावर प्रभातच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या दिलखेचक नृत्यावर मान्यवरांना व्यासपीठावर बोलावून स्क्रीनवर त्यांचा परिचय हे सुजाण साहित्य रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरले. ग्रंथदिंडीसह स्व. मिर्झा रफी अहमद बेग ग्रंथदालन व स्व. प्रा. निशाताई बाहेकर कवयित्री कट्टाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. महिला कलावंत दीपा शर्मा यांच्या कलादालनाचा गौरव म्हणून संमेलनाच्या व्यासपीठावर सन्मानचिन्ह देऊन गौरव झाला. प्रभातची विद्यार्थिनी कार्तिकी मनोज सोनोने यांच्या ‘माझा डेबू संत झाला रे.’ ही नाट्यछटा व सादरीकरणाने रसिक भारावून गेले. काव्यलेखन कार्यशाळेला प्रतिसाद लेखिका संमेलनात लेखिका व सायबर तज्ज्ञ मोहिनी मोडक यांच्या मार्गदर्शनात ब्लॉग लेखन कार्यशाळा झाली. अनुवादिका प्रा. डॉ. स्वाती दामोदरे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनात काव्य लेखन कार्यशाळेला महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा प्रतिसाद मिळाला. संयोजन समिक्षाराजे खुमकर, कवयित्री कट्ट्याचे संयोजन सारिका अयाचित व सहसंयोजन वैशाली पागृत व अंकिता कांगटे यांनी केले. प्रा. मीनल येवले यांच्या अध्यक्षतेत विद्याताई बनाफर, शोभना पिंपळकर व कविता राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रियंका गिरी, मधुराणी बनसोड, वर्षा कावरे, मंदा नांदूरकर, डॉ. मीना सोसे, वर्षा ढोके, अंजली वारकरी, पुष्पा पोरे, विद्या राणे, रेवती पांडे, साधना काळबांडे, अॅड. रजनी बावस्कर, किर्तीमाला गोंडचवर, अमिता घाटोळ, नम्रता अडसूळ, सारिका अयाचित, वर्षा दांडगे यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन कल्पना कोलारकर यांनी केले तर आभार प्रा. गोपाल नेरकर यांनी मानले. ज्येष्ठ लेखिकांचा सन्मान दुपारच्या सत्रात अभिनेत्री व लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची मोहिनी मोडक व डॉ. समृद्धी तिडके यांनी प्रकट मुलाखत घेतली. महिला पत्रकार व ज्येष्ठ लेखिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिभा जानोळकर, प्रभा खंडेलवाल या पाहुण्या होत्या. साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका पद्मा मांडवगणे, मीरा ठाकरे, शीला गहलोत, देवकामाई देशमुख, डॉ. विमल भालेराव, डॉ. लीना आगाशे, वीणा मालशे, प्रेमा शुक्ल, प्रा. डॉ. अनघा सोनखासकर यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पापड हे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव. येथील डॉ. पंजाबराव देशमुख हायस्कूल क.म.वि. तसेच श्रीमती विमलाबाई पंजाबराव देशमुख एच एस व्ही सी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंजाबराव देशमुख यांची १२७ वी जयंती उत्सव २० ते २७ दरम्यान आयोजित केला आहे. २० तारखेला आनंद मेळाव्याचे आयोजन गेले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लावून त्याच्यातून विक्री करून फायदा व नुकसान याचा ताळमेळ बसवण्यात आला.कार्यक्रमाचे प्रभारी किशोर सोनकुसरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. दुपारच्या सत्रात स्वाती भडके यांनी विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेतली.भारतातील विविध राज्यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. सदर कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता यावर भाष्य करून कार्यक्रमाच्या संचालन करणाऱ्या भडके यांनी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. दोन्ही स्पर्धांमध्ये मुख्याध्यापक विजय गणगणे यांनी अध्यक्षस्थान भुषवून व आपला बहुमोल असा अभिप्राय देऊन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. असा वृत्तांत कार्यक्रमाच्या संयोजक कुमारी सुचिता पाटील व सहसंयोजक कुमारी सुचिता ठाकरे यांनी कळवला आहे. सोमवार २२ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यात १९९८-९९ मध्ये दहावा वर्ग उत्तीर्ण झालेले सुमारे ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये पापळ येथील रहिवासी असलेले सतीश वारे, नाझीम कुरेशी, खटपटे यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. २६ वर्षानंतर एकत्र आलेले दहावीतील वर्गमित्र यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहत असलेला आनंद दिसून आला. त्यावेळेस त्यांना शिकवत असलेले शिक्षक अथाटे व ठाकरे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांसमवेत माजी विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला. १९९८ मधील दहावी बॅचचे ६० विद्यार्थी सहभागी; २६ वर्षांनंतर झाली सर्वांचे पुन्हा भेट
नागपूर येथील भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयात चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली बैठक राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. चंद्रपूरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश दोन्ही नेत्यांमधील मतभेद मिटवणे आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकसंध रणनीती ठरवणे हा होता. मात्र, प्रत्यक्ष बैठकीदरम्यान मतभेद मिटण्याऐवजी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत काही टप्प्यांवर वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते, अशी चर्चा राजकीय सूत्रांकडून केली जात आहे. असे असले तरी, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाल्याचे या बैठकीत पाहायला मिळाले. शहरातील विविध प्रभागांमध्ये कोणते उमेदवार रिंगणात उतरवायचे, यासाठी दोन्ही नेत्यांनी आपल्या-आपल्या समर्थकांची आणि गटातील इच्छुकांची नावे मांडली. बहुतांश प्रभागांमध्ये दोघांनी वेगवेगळ्या नावांची शिफारस केल्यामुळे एकमत होणे कठीण झाले. त्यामुळे तातडीने कोणत्याही नावावर अंतिम निर्णय न घेता, पुढील दोन दिवसांत या सर्व इच्छुक उमेदवारांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या अहवालाच्या आधारे आणि उमेदवारांच्या निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेचा विचार करून अंतिम यादी तयार केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर 28 डिसेंबर रोजी निवडणूक निरीक्षक आणि प्रभारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची अंतिम नावे जाहीर केली जातील, अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार निवडताना काही ठोस आणि कडक निकष लावावेत, अशी भूमिका मांडली. त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर चार महत्त्वाच्या अटी ठेवल्या. एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. तसेच ज्या नेत्यांची मुले राजकारणात सक्रिय नाहीत किंवा संघटनात्मक कामात दिसून येत नाहीत, अशा व्यक्तींना उमेदवारी देऊ नये, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, केवळ एक-दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नव्या सदस्यांना थेट उमेदवारी देणे टाळावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवारी देताना केवळ सर्वेक्षण अहवाल आणि उमेदवाराचे इलेक्टोरल मेरिट हाच निकष असावा, असा आग्रह मुनगंटीवार यांनी धरला. या निकषांमुळे पक्षातील अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी संघटनात्मक पातळीवर काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा एकदा चंद्रपूर महापालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांची चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार अशोक नेते यांना पूर्वीप्रमाणेच जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे निवडणूक प्रक्रियेत पक्ष अधिक काटेकोरपणे नियंत्रण ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बैठकीनंतर भाजपकडून अधिकृतपणे मात्र पूर्णपणे वेगळी भूमिका मांडण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. या बैठकीत मुनगंटीवार, जोरगेवार यांच्यासह माजी खासदार हंसराज अहिर, निवडणूक प्रभारी अशोक नेते आणि निरीक्षक चैनसुख संचेती उपस्थित होते. बैठकीत कोणताही वाद किंवा खडाजंगी झाली नसल्याचे सांगत, सर्व निर्णय एकमताने झाल्याचा दावा करण्यात आला. बैठकीत वाद झाल्याच्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजप आणि शिवसेना युतीतून महापालिका निवडणूक लढवण्यावर चर्चा सुरू आहे. एकूण 69 प्रभागांसाठी 458 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असून, सर्वांचे इंटरव्ह्यू पूर्ण झाले आहेत. सर्वेक्षणातून ज्यांचे नाव पुढे येईल आणि ज्यांचे इलेक्टोरल मेरिट जास्त असेल, अशाच उमेदवारांना तिकीट दिले जाईल. कोणतेही मतभेद नसून, सर्व नेते एकदिलाने आणि एकमताने निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा निर्धार बैठकीत करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बैठकीत वाद झाल्याच्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे सांगत, पक्षाच्या निर्णयाचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीद्वारे संचालित यादव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तिवसा येथे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती निमित्त २३ ते २७ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाला उदघाट्क म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद रमेश बोके उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून यादव देशमुख महा. प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायतीचे विरोधी पक्ष नेते अनिल थुल, नगरसेवक आशिष ढोले, नगरसेवक नरेश लांडगे, श्रीराम नागरी पथ संस्थेचे अध्यक्ष विक्रम जोशी,जगदीश माहोरे, पत्रकार हेमंत निखाडे, पत्रकार संदीप दाहाट, इंग्रजी विभाग प्रमुख श्याम गेडाम व इंदापवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. कुसुमेंद्र सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश बोके यांनी विद्यार्थ्यांना भाऊसाहेब जयंती कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन संगीत विभाग प्रमुख विनोद खडसे यांनी तर आभार प्रदर्शन सुमित सोनोने यांनी केले. कार्यक्रमाला मोठी गर्दी होती.
माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत गुरुवारी सकाळी हजारो स्पर्धक धावले. त्यामध्ये मुख्य शर्यत २१ कि.मी.अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटातील विजेत्या राज तिवारीला टीव्हीएस स्पोर्टस बाईक तर महिला गटातील विजित्या साक्षी जडयालला टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी पुरस्कार म्हणून देण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातून २ हजार १६४ धावकांनी सहभाग घेतला. स्थानिक दसरा मैदान येथे स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी., ८ कि.मी., ५ कि.मी., ३ कि.मी., तसेच रन फॉर अमरावती खुला गट अशा सहा प्रकारातील शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.या वेळी मुख्य आयोजक तुषार भारतीय, खा. डॉ.अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, माजी महापौर चेतन गावंडे, अथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रा. अतुल पाटील,ऋषी खत्री, प्रशांत शेगोकार, सचिन मोहोड, डॉ. श्याम राठी, डॉ. मिलिंद पाठक यांनी हिरवी झेंडी दाखवून शर्यतीला सुरुवात केली. धावक दसरा मैदान ,राजापेठ ,कंवरनगर, फरशी स्टॉप, दस्तूरनगर, यशोदानगर, काँग्रेसनगर, बियाणी चौक, वेलकम पॉईट, पंचवटी चौक, राठीनगर, शेगाव नाका, विलासनगर, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक, भुतेश्वर चौक, रवीनगर, सातुर्णा चौक, साईनगर चौक, बेनाम चौक, नवाथे चौक येथून दसरा मैदानात पोहोचले. स्पर्धेअंती सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी विविध गटांमध्ये आयोजित करण्यात येते. स्पर्धेसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून धावक अमरावतीमध्ये रात्रीच दाखल झाले होते. त्यांची निवास व भोजन व्यवस्था व्यवस्थापन समितीतर्फे लोहाना महाजन वाडी येथे करण्यात आली होती. स्पर्धकांना धावताना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक चौकात स्वागत व इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात आली. अतिशय नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे स्पर्धा पार पाडण्यासाठी स्पर्धेच्या मार्गावर पाणी औषधे, वेदनाशक स्प्रे इत्यादी व्यवस्था करण्यात आली. आवश्यक पोलिस बंदोबस्त, वाहतूक पोलिस, मोठ्या प्रमाणात शिक्षक, ५०० पेक्षा जास्त अधिक स्वयंसेवक स्पर्धेच्या मार्गावर उपस्थित होते.स्पर्धेअंती स्पर्धकांना अल्पोपराची व्यवस्था व वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती, अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सचिन मोहोळ, निरंजन दुबे, राम शेगोकर, भूषण हरकूट, कार्तिक नाचनकर, गोपाळ दलाल, सुधीर पावडे, आकाश वाघमारे, सुरज जोशी, जयेश गायकवाड, देशपांडे, सौरभ वडुरकर, योगेश उघडे, राजेश जगताप, बंडू विघे यांनी परिश्रम घेतले. विविध वयोगटातील विजेते झालेले खेळाडू महिला गट २१ कि.मी.शर्यत विजेत्या ठरलेल्या महिला यामध्ये साक्षी जडयाल-चिपळूण, रविना गायकवाड-नाशिक, स्वाती पंचबुद्धे-नागपूर, दिव्या जाधव- बुलडाणा, मैत्री ढोणके-अमरावती, भारती जयस्वाल-अमरावती तर पुरुष गटामध्ये २१ कि.मी. शर्यतीत राज तिवारी- मुंबई, राजन यादव- नागपूर, लीला राम- भंडारा, गौरव पवार- यवतमाळ, शंकर नांदे-नांदेड, कृष्णकांत राखोंडे-अकोला आदी. १४ वर्षांखालील विजेत्या ठरलेल्या मुली यशस्वी राठोड - सेलू-वर्धा, ईश्वरी काळमेघ- वर्धा, नंदिनी सावरकर- सेलू वर्धा, स्वरा लांधे- यवतमाळ, हर्षिता मांढरे- सेलू वर्धा, कार्तिकी घरपाले- चांदूरबाजार तर मुले : कपिल हटकर- पुसद, यश बागवे- नागपूर, प्रद्युम्न राऊत- नागपूर, आर्यन पिंपळकर- नागपूर, सुमित चव्हाण- अकोला. १६ वर्षांखालील मुली लावण्या नगरकर - चंद्रपूर, नव्या चिताडे- यवतमाळ, सालिया खान- यवतमाळ, संस्कृती पालसपगार- अमरावती, मनस्वी कुंजरपगार- यवतमाळ, ऐश्वर्या परसखेडे- सेलू वर्धा. १६ वर्षांखालील मुले - रितेश राठोड-जालना, अजय राठोड- जळगाव, अभय इंगळे- अमरावती, शिवम बुंदे- वर्धा, संयम महाले- वाशीम, आकाश ठाकरे- अकोला.
सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मार्फत कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम थकीत कर्जाच्या नावाखाली थेट कर्ज खात्यात वर्ग केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचे आधार कार्ड ज्या बँकेत लिंक आहे, त्या बँकांकडून परस्पर कर्जवसुली केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. याच गंभीर बाबींची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती यांच्याशी थेट चर्चा करून निवेदन सादर केले आहे. कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी सीसीआयची रक्कम, शेतकरी अनुदान किंवा इतर कोणतेही शासकीय पैसे बँकांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग करू नयेत, अशी ठाम भुमिका यावेळी मांडण्यात आली. यानंतरही जर कोणत्याही बँकेने अशी वसुली केली, तर संबंधित बँक अधिकाऱ्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ,असा स्पष्ट इशाराही यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी दिला आहे. बँक टाळाटाळ करत असल्यास, अशा पीडित शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन व बँकांनी तात्काळ स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. या वेळी मोहन खळबळकार, रवींद्र बायस्कर, प्रशांत धर्माळे, पवन पतिंगे व शेतकरी उपस्थित होते.
aअर्जुन नगर परिसरातील नलिनीकृष्णपुरम व राष्ट्रसंत कॉलनी या दोन्ही वसाहतींमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून परिस्थिती आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचली आहे. या भागातील घरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी मुख्य नालीमध्ये जाण्यासाठी ना नियोजित उघडी नाली उपलब्ध आहे, ना पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. परिणामी सांडपाणी मोकळ्या जागेत, झुडपांमध्ये व रस्त्यालगत साचत असून परिसरात भीषण अस्वच्छता निर्माण झाली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे चिखल, प्लास्टिक व घरगुती कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचे व इतर कीटकांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईडसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला व आजारी व्यक्ती यांचे आरोग्य थेट धोक्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांनी वारंवार स्वच्छता विभाग, ड्रेनेज विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तात्पुरते उपाय सुद्धा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या आणखी भयावह होण्याची शक्यता असून साचलेले सांडपाणी घरांमध्ये शिरण्याचा धोका आहे. नागरिकांनाच करावी लागते स्वच्छता सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेने आजवर या भागात कोणतीही स्वच्छता मोहीम राबवलेली नाही. हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असून, मूलभूत नागरी सुविधा देण्यात महानगरपालिका याठिकाणी सपशेल अपयशी ठरली आहे. मनपा प्रशासन या भागातील स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष करते. त्यामुळे वेळोवेळी नागरिकांना स्वत:च स्वच्छता करावी लागते.
साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण ३७ कारखान्यांपैकी आदिनाथ साखर कारखाना बंद असून ३६ कारखाने सुरू आहेत. ३६ पैकी गोकुळ शुगर (धोत्री,दक्षिण सोलापू), सहकार शिरोमणी वसंतराव काळे (भाळवणी,पंढरपूर) या २ कारखान्यांना अद्याप गाळप परवाना मिळाला नाही. लोक शक्ती शुगर (औराद़ मंद्रूप) इंद्रेश्वर शुगर मिल (उपळाई, बार्शी),भीमा कारखाना, (टाकळी,मोहोळ), मातोश्री लक्ष्मी (रुद्देवाडी. ता. अक्कलकोट) या कारखान्यांचे गाळप उशिरा सुरू करण्यात आले आहे. ३० कारखान्यांनी साधारण ४४ लाख २५ हजार ७६८ मे टन इतके गाळप केले आहे. खासगी २० कारखान्यांचा सरासरी उतारा ७. ४९ टक्के तर या तुलनेत १० सहकारी कारखान्यांचा उतारा ७.६२ टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी दर द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलने केली होती. काही तास काही कारखान्याच्या गव्हाणी मध्ये उतरून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन करून कारखान्याचे गाळप बंद पाडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी प्रति टन ऊस दर जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कारखान्याच्या ऊस गाळपावर परिणाम झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ३७ कारखान्यांपैकी जिल्ह्यातील ३६ कारखाने सुरू झाले आहेत. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज धोत्री, दक्षिण सोलापूर व सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पंढरपूर या २ कारखान्यांना शासनाकडून अद्याप गाळप परवाना मिळालेला नाही. लोकशक्ती शुगर, मंद्रूप, इंद्रेश्वर शुगर मिल, बार्शी, भीमा कारखाना टाकळी (सि) मोहोळ, मातोश्री लक्ष्मी, रुद्देवाडी. ता. अक्कलकोट यांनी उशिरा गाळप सुरू केले आहे. यंदा उसाचे गाळप लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धोत्रीच्या गोकुळ शुगर व पंढरपूरच्या सहकार शिरोमणी काळे कारखान्यांचा गाळप परवाना रोखला ^सद्यस्थितीला खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली. ऊस पिक जोपासणीसह शेत मशागतीसाठी मुबलक खर्च होत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्याची दुरावस्था रोखण्यासाठी कारखान्यांवरील काटे ऑनलाईन करावेत. काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी. तसेच शासन नियमानुसार २० दिवसांच्या आत ऊसबिल देण्यात यावे. ज्या कारखानदारांनी ३ हजार रुपये दर जाहीर केले आहे. अशा कारखान्यांकडे शेतकऱ्यांचा ओढ आहे. मात्र ज्या कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला नाही. अशा कारखानदारांकडे उसाची कमतरता जाणून येत आहे. -शिवाजीराव चव्हाण, माजी संचालक (भीमा सहकारी कारखाना टाकळी सिकंदर)
पंढरपूर शहरातील ख्रिस्ती समाज बांधवांनी २५ डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी गुणदर्शन केले, तसेच चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना आणि बायबल धर्म ग्रंथावर प्रवचन ही संपन्न झाले. ख्रिस्ती बांधवांनी मिठाई वाटून प्रभू येशूंच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला. ख्रिस्ती धर्मीयांसाठी नाताळ आहे. प्रभू येशूंचा जन्मदिवस सर्वोच्च आनंदाचा दिवस मानला जातो. त्यामुळे जगभरातील ख्रिस्ती समाज बांधव हा जन्म दिवस दिवाळी सणासारखाच साजरा करतात. पंढरपूर शहरातील ख्रिस्ती बांधवांनी सांगोला रोडवर असलेल्या चर्च मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ख्रिस्ती धार्मियांच्या शाळकरी मुलांनी चर्चच्या आवारात प्रभू येशूच्या जन्माचा सुंदर देखावा सादर केलेला होता. तसेच बुधवार ( दि. २४ डिसेंबर ) रोजी शालेय मुलांनी प्रभू येशूच्या जन्मावर आधारित नाटिका सादर केली. रात्री बारा वाजल्यानंतर सर्व समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बायबलमधील वचनांवर प्रवचन दिले धर्मगुरू पास्टर विश्वास साळवी यांनी बायबलमधील वचनांवर प्रवचन दिले. या जगात पाप वाढले होते. त्यामुळे येशूना पवित्र आत्म्याच्या माध्यमातून जन्म घ्यावा लागला. कुमारिका असलेल्या मरिया या मातेच्या पोटी कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय गाईच्या गोठ्यात पवित्र आत्मा जन्मास आला. आणि त्याने जगातील दुःख, पाप नष्ट करण्यासाठी उपदेश केला. देवाचा पुत्र असूनही त्याला या चांगल्या कार्याची शिक्षा दुष्ट प्रवृत्तींकडून सहन करावी लागली. मानवाचे पाप त्याने आपल्या डोक्यावर घेतले, आणि क्रूर पद्धतीने मृत्यू पंथाला गेला, आणि तिसऱ्या दिवसी तो परत अवतरला, असे मार्गदर्शन यावेळी पास्टर साळवी यांनी उपस्थितांना केले.
नागनाथ महाविद्यालयाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा:मोहोळ येथील राष्ट्रीयमहामार्गावर भगदाड
मोहोळ पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथील सेवा रस्त्याला मोठे भगदाड पडले असून रहदारीच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन हा खड्डा बुजवणे गरजेचे आहे. अन्यथा येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोहोळ येथून जाणाऱ्या पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नागनाथ विद्यालयाजवळ सेवा रस्त्याला खचून मोठ्या खड्डा पडल्यामुळे आणि येथून वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ बसस्थानका जवळच नागनाथ विद्यालयाकडील बाजूस हा खड्डा पडला आहे. येथून एसटी बस, ट्रक, ऊसाचे ट्रॅक्टर तसेच शाळेत ये-जा करणारी वाहने विद्यार्थी व अन्य वाहनांची मोठी वर्दळ आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्यामुळे उस घेऊन जाणारे डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर तसेच मोठे कंटेनर, हायवा यासह मोठमोठी वाहने इथून जातात.रात्रीच्या अंधारात हा खड्डा दिसत नसल्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन हा खड्डा बुजवून घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर अकलूज यासह अनेक रस्ते अत्यंत खराब झाले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वात वेळापूर येथे अकलूज मार्गावर सुमारे एक तासाचे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.ही कामे तातडीने हाती न घेतल्यास आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनावेळी झालेल्या सभेत बोलताना एन. के. साळवे, सोमनाथ भोसले, किरण धाईंजे,सरपंच रजनीश बनसोडे, विजय बनसोडे,रणजित सरवदे, गोपाळराव घार्गे,स्वप्निल सरवदे आदींनी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालकांना येणाऱ्या अडचणींबाबत भावना व्यक्त करत निषेध नोंदविला. प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या कामास सुरुवात करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा पुढील टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून हालगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलक मिलिंद सरतापे यांनी दिला. यावेळी रिपाइंचे प.महा.उपाध्यक्ष एन. के. साळवे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, युवक राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, प.महा. संघटक एस. एम. गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जिल्हा सचिव रमेश धाईंजे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, सरपंच रजनीश बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए. डी. पवार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. कार्यकारी अभियंता सुनीता पाटील कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तासभर आंदोलनकांनी केला रस्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा माळशिरस तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले असून चारचाकी, दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. अकलूज येथील अशोका चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवामृत ते उदयनगर, निमगाव पाटी ते यशवंतनगर अकलूज,वेळापूर-धानोरे , वेळापूर-उघडेवाडी-माळ खांबी-चव्हाणवाडी, तसेच मंजूर असूनही प्रलंबित असलेला वेळापूर-निमगाव म्हेत्रे मळा-पिसेवाडी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीच्या बळावर झालेले सामाजिक परिवर्तन आणि विकास यामुळे गावाचे नाव राज्यासह केंद्र स्तरावर पोहोचून गणेगाव या आदर्श गावाची निर्मिती झाली. यातून गावचा विकास घडला.सन २०१० पर्यंत गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता आणि जुनी शालेय इमारत, ग्रामपंचायतला असणारी पत्र्याची जुनी इमारत आणि गावामध्ये शेती जिरायत सिंचन सुविधा नाही, वेड्या बाभळीने गावाला घातलेला वेढा यामुळे गावात विकासाची वानवा होती. मात्र गावाने अमोल भनगुडे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे स्वप्न बघून त्यातून गावात बदल घडला आणि येथे विकासाचे वारे वाहू लागले. गावात पक्के रस्त्याची निर्मिती, स्ट्रीट लाईट ची सुविधा झाली. शासनाच्या प्रत्येक योजना गावात राबवल्या जाऊ लागल्या जिरायत गाव म्हणून ओळख असलेल्या गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यातून गावात स्वच्छता करण्यात आली. स्ट्रीट लाईटसाठी सोलार दिव्यांची खरेदी झाली. पक्क्या रस्त्याचे जाळे तयार झाले शाळेची नवी इमारत उभी राहिली. रोजगार हमी योजनेतून ओढ्याचे गाळ काढण्याचे काम झाले. त्यातून बंधारे बांधले, त्यात पाणी अडवले. त्यामुळे शेताला पाणी उपलब्ध झाले. जलयुक्त शिवार कार्यक्रम राबवण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. घरोघरी शौचालयाची कामे करण्यात आली त्याच बरोबर शौचखड्ड्याची निर्मिती केली. पाण्याचा निचरा करण्यासाठी या खड्ड्यांचा योग्य वापर झाल्याने गावात साठलेले पाणी खड्ड्यात जिरल्याने गावातील रोगराई कमी झाली. या गावाला २०१० ते २०२५ या कालावधीत महात्मा गांधी तंटा मुक्त गाव, हागणदारी निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुकास्तरीय पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार, पंडित दीनदयाळ पंचायत सशक्ती करण अभियान, हरित स्वच्छ सुंदर गाव जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. शासनाच्या विविध योजना यशस्वी राबवणारे गाव म्हणून या गावाला आदर्श गाव पुरस्कार देऊन शासनाकडून गौरवले. गावात मियावकी घनवन, माझी वसुंधरा योजनेतून राबवण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. कुरणवाडी योजनेतून या गावाला थेट मुळा धरणातून गोड पाण्याची योजना पिण्यासाठी राबवली. गावात बदल घडण्यात विविध अधिकारी, ग्रामस्थांचे पाठबळ आणि ग्रा.पं. पदाधिकारी अन् गावचे संघटन हेच गमक असल्याचे सरपंच शोभा अमोल भनगडे, उपसरपंच प्रमोद कोबरणे, ग्रामसेविका श्रीमती हारदे यांनी सांगितले. आदर्श गाव पुरस्कार देऊन शासनाकडून गावाचा गौरव
नाताळच्या सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर सध्या भाविकांच्या उत्साहाने गजबजून गेले आहे. शिर्डीत गुरुवारी एका दिवशी ९५ हजारांहून अधिक भाविकांनी साईंचे दर्शन घेतले. सकाळपासूनच मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच शिर्डीतील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. शनिशिंगणापुरात गुरुवारपासून नववर्ष दिनापर्यंत भाविकांची संख्या वाढणार असली तरी यंदा प्रथमच रात्रीचे दर्शन बंद असणार आहे. त्यामुळे पुढील ८ दिवसांत तब्बल साडेतीन ते ४ लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज देवस्थान प्रशासनाने व्यक्त केला आहे. शनिदेव मंदिर परिसरात सायंकाळ होताच आकर्षक विद्युत रोषणाई उजळून निघाला आहे. मंदिर, दर्शन मार्ग, तसेच पानसतीर्थ प्रकल्पावरील शिल्पकलेवर करण्यात आलेली रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. फुलांची रोजची सजावट मंदिराच्या सौंदर्यात भर घालत आहे. गेल्या शनिअमावस्येपासून सुरू झालेला हा प्रकाशोत्सव नववर्षापर्यंत राहणार आहे. गुरुवारपासून नाताळ सुट्ट्या सुरू झाल्या. त्यानंतर नववर्ष येत आहे. शिर्डीला वर्षअखेरीस दर्शनासाठी येणारे भाविक मुक्कामी असतात. त्यापैकी सुमारे ४० टक्के भाविक शनिशिंगणापुरात येऊन शनिदेवाचे दर्शन घेतात. विशेषतः शनिवार व रविवारी भाविकांची गर्दी तीन पटीने वाढत असल्याचे चित्र आहे. आयुक्त, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत दर्शन व्यवस्था व गर्दी नियंत्रणाबाबत बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी शनिशिंगणापूर सज्ज झाले असून, भाविकांच्या सुरक्षित व सुरळीत दर्शनासाठी प्रशासन तयारी करत आहे. पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा, प्रसाद वाटप, वाहतूक नियंत्रण यावर भर देण्यात येत आहे. शिर्डी शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी शिर्डीत सकाळपासूनच मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच शिर्डीतील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. भाविकांची संख्या अचानक वाढल्याने शिर्डी शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. विशेषतः मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याने भाविकांना काही काळ ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात अतिरिक्त कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत होती. आठ दिवस शनिदेवाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी वाढणार आहे. शिर्डीला मुक्कामी येणारे भाविकातील तीस ते चाळीस टक्के भाविक शिंगणापूरला येत असतात त्यामुळे या आठ दिवसांत शनिदेवाचे दर्शन अहोरात्र सुरु ठेवावे, अशी मागणी मराठा महासंघांचे नेते संभाजी दहातोंडे यांनी भाविकांच्या वतीने केली आहे मुलभूत सुविधांचा आढावा : चोरमारे उपजिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून नेमलेले अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले की, परंपरेनुसार नाताळ सुट्ट्या, वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मुलभूत सुविधांवर अधिक लक्ष दिले जात आहे. शनिअमावस्येपासूनच गर्दी वाढल्याने नियोजन केले आहे. भक्तनिवास, लॉजिंग बुकिंग वाढले शनिशिंगणापुरातील भक्तनिवास व खासगी लॉजिंगमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच बुकिंग वाढले आहे. देवस्थानच्या अंदाजानुसार रोज सरासरी ५० हजार भाविक दर्शनासाठी येतील. वर्षअखेरीस सुमारे दोन लाख, तर नववर्ष दिनी दोन ते अडीच लाख भाविक येतील, असा अंदाज वर्तवला आहे.
लहान वयातच मुलांना योग्य वातावरण मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आईवडील आणि शिक्षक जे संस्कार देतात ते आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात, असे प्रतिपादन माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केले. केडगाव येथील लिटिल विंग्ज नर्सरी प्री स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळ रमेश साळुंके, विजय दळवी, प्रा. योगेश अल्हाट, संजय लोंढे, संस्थापक बाबूराव लोखंडे, प्रन्सिपल अनिता लोखंडे आदी उपस्थित होते. कोतकर पुढे म्हणाले, आजच्या धावपळीच्या काळात पालकांकडून नकळत मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मुले मोबाइल आणि इतर गोष्टींकडे जास्त आकर्षित होत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देऊन योग्य सवयी, संस्कार आणि मूल्ये शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. पालक आणि शिक्षकांनी मिळून काम केल्यास मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थापक बाबूराव लोखंडे यांनी शाळेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. या परिसरातील लहान मुलांसाठी दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन लिटिल विंग्ज नर्सरी स्कूलची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रमेश साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मोबाइलचा अतिरेक टाळून त्याचा योग्य वापर शिक्षणासाठी करावा.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा भिंगार येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक, पौराणिक, अध्यात्मिक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने भिंगारवासियांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचे उद्घाटन भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन रवींद्र बाकलीवाल होते. यावेळी शाळा समितीचे सदस्य किसन चौधरी, बापूराव शिंदे, जालिंदर बोरुडे, रुपेश भंडारी, संजय सपकाळ उपस्थित होते. मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे, पूर्व प्राथमिक इन्चार्ज अर्चना गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात पाहुण्यांच्या भाषणाऐवजी शाळेतील विद्यार्थ्यांनी अनिल झोडगे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज्य, जिल्हा पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये विजेते, शिष्यवृत्ती परिक्षेत मेरीटमध्ये आलेल्या तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमातील नियोजन, भोजन व्यवस्था, पाहुण्यांच्या मुलाखतींसह अनेक ठिकाणचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते. नृत्य, नाट्य, प्रबोधनात्मक गाण्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने पाहुण्यांसह सर्वच उपस्थितांनी कौतुक केले. भव्यदिव्य स्टेज, ध्वनीव्यवस्था, वेळेचे काटेकोर पालन, नृत्य व कार्यकम सादरीकरणासाठी शालेय प्रशासनाने घेतलेले कष्ट यामुळे कार्यक्रम देखणा झाला होता.
भविष्यात प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाला शेती क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील. पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक अभ्यासावर भर द्यावा, असा सल्ला कासार पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी मोहिनी राजळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. तालुक्यातील आदिनाथनगर येथील डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कासार पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी राजळे यांच्या संत्रा फळबागेला शैक्षणिक भेट दिली.यात विद्यार्थ्यांनी फळबाग लागवड पद्धतीपासून ते फळ तोडणीपर्यंतचा सर्व अभ्यास आत्मसात करून घेतला. त्यावेळी शेतकरी राजळे बोलत होते. फळबाग व्यवस्थापन विषयाच्या व्यावहारिक अभ्यासाचा भाग म्हणून ही भेट आयोजित केली होती. या उपक्रमात सुमारे ६३ विद्यार्थी व ५ प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रगतशील शेतकरी मोहिनी राजळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे स्वागत केले. व व्यवस्थापकांमार्फत बागेची माहिती दिली.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना संत्रा लागवडीसाठी आवश्यक जमिनीची निवड,पूर्व मशागत,विविध वाणांची माहिती देण्यात आली.नागपूर संत्रा (मँडरीन), किन्नू व संकरित वाणांची ओळख करून देताना जम्बेरी अथवा रंगपूर लिंबू खुंटाची निवड, कलम तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखवण्यात आली. झाडांची छाटणी,आकार देणे तसेच फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सेंद्रिय स्लरीचा वापर कसा करावा,याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ठिबक पद्धतीमुळे ५० टक्क्यांहून अधिक पाणी बचत होते आणि झाडांना अचूक पोषण मिळते. विद्यार्थ्यांनी ठिबक पाइपलाइन,फर्टिलायझर टॅंक व ड्रिपर्सची प्रत्यक्ष तपासणी केली.कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती,सीट्रस सायला व लीफ मायनर नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप, तसेच सेंद्रिय व जैविक कीटकनाशकांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी संत्रा काढणीचे प्रात्यक्षिक पाहिले.फळांची गुणवत्ता,ग्रेडिंग,पॅ किंग आणि बाजारपेठेतील मागणी याबाबत सविस्तर माहिती घेतली.कृषी सहाय्यक साधना मुरदारे म्हणाले, अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रवृत्त होतात. प्राचार्य सुनील पानखडे यांनी ही शैक्षणिक भेट यशस्वी ठरल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशात संत्रा उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे ४० टक्के पाच एकर क्षेत्रातील ही संत्रा बाग इंडो–इस्त्राईल तंत्रज्ञानावर आधारित आहे. ठिबक सिंचन व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पाणी बचत आणि उत्पादन वाढ साधली आहे. भारतात संत्रा उत्पादनात महाराष्ट्राचा सुमारे ४० टक्के वाटा आहे. बदलत्या शेतीत संत्रा लागवड ही आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे, असे शेतकरी राजळे यांनी सांगितले.
मनात नकारात्मक विचार जेव्हा असह्य होतात, तेव्हा संवाद हाच सर्वात मोठा उपचार ठरतो..आयुर्वेद जीवनशैलीच योग्य असून आयुर्वेद केवळ औषधे नव्हे तर 'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आहे. निरोगी व्यक्तींचे आरोग्य टिकवून ठेवणे', हा आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे. कारण चुकीचा आहार व विस्कळीत दिनचर्येने मानसिक आजार होतात. विद्यार्थ्यांनी 'ऋतुचर्या' पाळल्यास अभ्यासात अधिक लक्ष लागेल. अपयशाने खचू नका, कारण अपयश यशाची अखेरची नाही, तर पहिलीच पायरी आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व समुपदेशनात आत्महत्येस प्रतिबंध करण्याचे उपाय आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ.अविनाश देवरे यांनी सूचवले. माळवाडी (बोटा) येथे डॉ.देवरे हे श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी व शिक्षकांना आयुर्वेदिक जीवनशैली व मानसिक आरोग्य व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवाजीराव पोखरकर होते. यावेळी संस्थचे सचिव डॉ.अमित पोखरकर, डॉ. सागर सांगळे आदी उपस्थित होते. पुस्तकी ज्ञानदानात विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी हा मोफत उपक्रम संसंथेने राबवला. या उपक्रमांतर्गत इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, ॲग्रीकल्चर, बीएससी, बीबीए, डेअरी, डीएमएलटी व डिप्लोमा व सर्व युनिटचे विद्यार्थिनी व महिला शिक्षकांचा सहभाग होता. डॉ.देवरे यांनी आयुर्वेदाचा आधुनिक विज्ञानाशी मेळ घालत सखोल विचार व्यक्त केले. दैनंदिन समस्यांवर साध्या उपायात गॅसेस, ॲसिडिटी, डोकेदुखी किंवा हार्मोनल बदलांमुळे होणारी चिडचिड यावर घरगुती औषधांचे महत्त्व सांगून स्वयंपाकघरातील ओवा, जिरे, सुंठ, तूप यांचा वापर करून आपण आरोग्य सुधारू शकतो, याचे प्रत्यक्षिक दाखवले. डॉ.शिवाजीराव पोखरकर म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या मानसिक कणखरतेवरही आम्ही विशेष भर देतो. सामाजिक, आरोग्यविषयक कार्यक्रमास नेहमी प्रोत्साहन देतो व विद्यार्थी हिताचे उपक्रम घेतो. संस्थेचे सचिव डॉ.अमित पोखरकर म्हणाले, धावपळीच्या युगात ताणतणाव ही मोठी समस्या आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतनीय आहे. त्यावर समुपदेशन व आयुर्वेदिक जीवनशैली हाच प्रभावी उपाय आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.केशव आरोटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता मानसिक आरोग्य जपले पाहिजे. तांत्रिक शिक्षण घेताना मनाची एकाग्रता टिकवून ठेवावी. आयुर्वेदाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागेल व तणावमुक्त वातावरण मिळेल. आभार प्रा. सूर्यवंशी यांनी मानले.
शेततळ्यातील गावठी दारुच्या हातभट्टीवर छापा:साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी पसार
पठारवाडी (पारनेर) येथे कुकडी डाव्या कालव्याच्या कडेला, खडी क्रशरच्या परिसरात असलेल्या दोन हातभट्ट्यांवर नगर ग्रामीण विभागाच्या पोलिस उप अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत १८ लाख ६६ हजार ५०० रुपयांचे हातभट्टी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करुन नष्ट केले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. हातभट्टीचे कच्चे रसायन आंबवण्यासाठी शेततळ्याचा वापर करण्यात आल्याचे पाहून पोलिस पथक चक्रावून गेले. उपअधीक्षक शिरीष वमने, पोलिस निरीक्षक संतोष खेडेकर यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाई दरम्यान आरोपी पसार झाला. कॉन्स्टेबल प्रकाश बोबडे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने १८ लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीच्या कच्च्या रसायनापासून गावठी हातभट्टीची दारु तयार करताना तसेच विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगताना आढळला. मात्र तो विना क्रमांकाच्या गाडीतून पसार झाला. आदिनाथ मच्छिंद्र पठारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात १८ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३६ हजार ३०० लिटर कच्चे रसायन,१४ हजार रुपये किंमतीची १४० लिटर हातभट्टीची तयार दारू,१० हजार रुपये किमतीचा १०० किलो काळा गूळ,१२ हजार ५०० रुपये किंमतीचे २५ किलो नवसागर नष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. पोटे यांनी विकासकामातून मते मागितली. पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली. याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख ॲड. उज्ज्वला भोपळे यांनी श्रीगोंदे येथे बोलताना दिली. यावेळी टिळक भोस, महिला तालुकाप्रमुख मीरा खेंडके, नंदुकमार ताडे, बाळासाहेब दुतारे आदी उपस्थित होते. नगरपरिषद निवडणुकीनंतर आगामी रणनिती आणि विजयी नगरसेवकांचा सत्कार समारंभ येथील श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ॲड. भोपळे बोलत होत्या. शिवसेनेच्यावतीने महिला आरोग्य शिबीर, घरकुल, आरोग्य योजना, रस्ते यांसाठी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी समन्वयातून काम करावे. मनोहर पोटे म्हणाले, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्याची आमची भूमिका होती पण काहींना ती मान्य नव्हती. आम्ही स्वतंत्र पॅनल केला याचे नागरिकांनी स्वागत केले. हे विरोधकांना रुचले नाही. स्थानिक नेतृत्व तयार होऊ नये म्हणून शिवसेनेच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र आले. त्यामुळे नगराध्यक्षपद उमेदवार पराभूत झाला आणि नगरसेवक पद निवडणुकीत विरोधकांनी अन्य पॅनेलला मदत केल्याने ३ ते ४ ठिकाणी थोड्या मतांनी शिवसेना उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा भाजपने नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांनी पराभव केला, असे स्पष्ट करून भविष्यात आमचे ९ नगरसेवक उत्कृष्ट काम करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आदींची भाषणे झाली. यावेळी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्य लढ्यात आपण नव्हतो, यापेक्षा मोठा संघर्ष आपल्या आयुष्यात नाही, असे स्पष्ट मत व्याख्याते शरद तांदळे यांनी मांडले असून तरुणांना स्व संघर्षाची जाणीव करून दिली. असे सांगत त्यांनी संस्कारांचे महत्त्व विशद केले. येथे दरवर्षीप्रमाणे दीपस्तंभ व आयर्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्य मानाने व्याख्यानमालेचे आयोजन या.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे हे १८ वर्ष होते. दुसऱ्या पुष्पात आपल्या व्याख्यानात यशस्वी उद्योजक व मार्गदर्शक शरद तांदळे यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपण नव्हतो, यापेक्षा मोठा संघर्ष आपल्या आयुष्यात नाही, असे स्पष्ट मत तांदळे यांनी मांडले असून, तरुणांना स्व संघर्षाची जाणीव करून दिली. आई-वडिलांच्या अनुभवाला पर्याय नाही. ज्याला बाप समजला, त्याच्या इतका समजदार कोणीच नाही,” असे सांगत त्यांनी संस्कारांचे महत्त्व विशद केले. प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थित श्रोते भारावून गेले. तिसऱ्या दिवसाच्या पर्वात धनश्री करमळकर आदींनी आपली वैचारिक मते मांडली. सदर व्याख्यानमालेसाठी शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मृणाल पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील, माजी तहसीलदार अरुण माळी, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरा यांच्यासह विविद क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्णपदक प्राप्त सपना पारधीचा सन्मान याप्रसंगी पॉवर लिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केलेल्या सपना पारधी या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला. तिने मिळवलेल्या या यशामुळे तिने मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा दिली.
बागलाणमधील जुनी शेमळी येथील सात जण दारू पिण्यासाठी अज्ञातस्थळी गेले. मात्र दारुच्या अतिसेवनामुळे सर्व बेशुद्ध झाल्याने गावकऱ्यांनी त्यांना रुग्णवाहीकेतून सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तिघांची प्रकृती ठिक आहे. तर दोन रुग्ण व्हेंटीलीटरवर असल्याची माहीती सिम्स हाँस्पिटलचे डॉ. संदेश निकम यांनी दिलीयातील दोघांवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जुनी शेमळीत दोन वर्षापूर्वी दारुबंदीचा ठराव केला होता. मात्र बाहेरून दारू आणून येथे चोरी - छुप्या पध्दतीने विक्री केली जाते. बुधवारी (दि. २४) सायंकाळी अमृत जगताप (४३), साजन लोंढे (३०), प्रवीण पवार (३५), राहुल पवार (३२), अजय पवार (४०), शरद पवार (५२), योगेश पगारे (४२) हे सात जण दारु पिण्यासाठी गावाबाहेर अज्ञास्थळी गेले. पार्टीदरम्यान अति दारू सेवनामुळे त्यांना विषबाधा होऊन ते सर्व एकामागोमाग एक बेशुद्ध पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी सर्व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना रात्री सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दारु कुठून आणली याबाबत शोध सुरू, विक्रीची माहिती द्यावी ^बुधवारी सायंकाळी बाहेरून दारु आणली होती. मात्र ती जास्त कडक होती. पाणी न टाकताच दारु प्याले त्यामुळे त्यांना त्रास झाला. - रुग्णाचे नातेवाईक, शेमळी ^जुनी शेमळी गावात ग्रामपंचायतीद्वारे दारुबंदी बाबत ठराव झालेला असून दारु बंद करण्यात आलेली आहे. तरी वरील व्यक्तिंनी सेवन केलेली दारु ही कुठून आणली होती, याबाबत माहिती काढून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. सर्व गावातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले गावात कोणत्याही प्रकारे अवैध गावठी दारु बनवित किंवा विक्री करत असल्याची माहिती द्यावी. - योगेश पाटील , पोलिस निरीक्षक. गावठी हातभट्टीची दारु बनवून ती अज्ञातस्थळी ठेवली जाते. ग्राहकांना ते ठिकाण माहित असते ते बरोबर तेथे जातात. बुधवारी हे तरुण दहा लिटर दारुची डपकी घेऊन अज्ञातस्थळी पार्टी करीत होते. ही दारु अती कडक स्वरुपाची होती. मात्र त्यांनी अति दारु सेवन केली. त्यामुळे एक -एक जण बेशुद्ध पडू लागले यापैकी एकाने घरी पत्नीला फोन करून मला जास्त दारु चढली असून मला घ्यायला या, असे सागितले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना शोधले मात्र तोपर्यंत सर्व बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेले.
ख्रिसमसनिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक शहरातील काळाराम व अन्य मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी दुपटीने वाढलेली दिसून येत आहे. गुरुवारी (दि. २५) त्र्यंबकेश्वरला ६५ हजार भाविकांनी, तर काळाराम मंदिरात ३० हजारहून अधिक भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतल्याची माहिती संबंधित मंदिर देवस्थानकडून देण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांना ४ तास, तर पेड दर्शनासाठी अडीच ते तीन तास रांगेत उभे राहावे लागले. अंदाजे ९ ते १० हजार भाविक बुधवारी (दि. २४) रात्रीच त्र्यंबक नगरीत दाखल झाले. हॉटेल्स बूकिंग फुल्ल असल्याने अनेकांना थंडीत मंदिर तसेच कुशावर्त परिसरात मुक्काम करावा लागला. गुरुवारी पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत मंदिराबाहेर दीड किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. दरम्यान, शनिवारी व रविवारी भाविकांचा ओघ आणखीन वाढणार असल्याने त्यादृष्टीने देवस्थान प्रतिष्ठानकडून नियोजन सुरू आहे. रेल्वे आरक्षण ४ दिवस फुल्ल; टूर ऑपरेटर्सचे दर वाढले : लाँग वीकेंडमुळे रेल्वेचे पुढील ४ दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले असून त्र्यंबक परिसरातील ६०० तर शहरातील हॉटेल्सच्या अंदाजे २४०० रुम्स पुढील चार दिवसांपर्यंत बूक करण्यात आल्याची माहिती ‘तान’कडून देण्यात आली आहे. रेल्वेने उत्तरप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेशमधून येणाऱ्या भाविकांचे आरक्षण अधिक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यातील अनेक भाविक, पर्यटक नाशिकरोडला उतरल्यावर तेथूनच ट्रॅव्हल्सचे बूकिंग करत आहेत.तर काहीजण नाशिक शहरातील टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवी गड, चांदवड रेणुका माता मंदिर, शिर्डी आदी ठिकाणांसाठी बुकिंग करत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय खासगी ट्रॅव्हल्स, बसेसद्वारेही मोठ्या संख्येने पर्यटक शहरात तसेच त्र्यंबकला दाखल झाले आहेत. टूर ऑपरेटर्सनेदेखील प्रति किलोमीटर २ ते अडीच रुपये वाढ केल्याने आता कार वा जीपसाठी १९ ते २० रुपये, तर मिनी बससाठी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोमीटर दर आकारले जात आहेत. पंचवटीत भाविकांचा ओघ वाढला पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, सीता गुंफा, तपोवन तसेच पांडवलेणी आदी ठिकाणी भाविकांचा ओघ गुरुवारी वाढलेला दिसून आला आहे. दिवसभरात कपालेश्वरला १५ ते २० हजार भाविकांनी, तर काळाराम मंदिरातही ३० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.
तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कायदेविषयक प्रबोधन शिबिर पार पडले. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. छल्लाणी हे शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश व्ही. डी. सुंगारे उपस्थित होत्या. प्रास्ताविकात अॅड. दिनकर ठाकरे यांनी तालुका विधी सेवा समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. अॅड. संग्राम थोरात यांनी लग्नासंबंधीचे कायदे व बालविवाह कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वारस कायदा अधिनियमाविषयी माहिती दिली. या कायदयातील तरतूदीप्रमाणे वारस प्रमाणपत्र मिळणेकामी अर्जदार न्यायालयात अर्ज दाखल करु शकतात. मयत व्यक्तीचे मिळकत जमीनीला नाव लावणेसाठी तसेच मयताचे शेअर विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटी व एफ डी च्या रकमा वारसांना मिळणेकामी वारस प्रमाणपत्र हे दाखल करावे लागते. दत्तक कायद्याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, कायद्याने मुल दत्तक घेतल्यानंतरच ते कायदेशिर वैध ठरते. स्त्री अथवा पुरुष दोघेही मुलगा किंवा मुलगी कोणालाही दत्तक घेवू शकतात. मात्र पुरुष मुलीला आणि स्त्री मुलाला दत्तक घेणार असेल तर त्यांच्या वयातील अंतर हे किमान २१ वर्षे असणे गरजेचे आहे. दत्तक मुलाची माता, पिता किंवा सांभाळणारे पालक यापैकी कोणीही एकजण हयात असणे आवश्यक आहे, जेणेकरुन दत्तक देण्यासाठी संमती घेता येईल. इतर धर्मामध्ये कायदेशिर दत्तक विधान संदर्भात गार्डीयन अॅन्ड वॉर्डस अॅक्ट अंतर्गत मुल दत्तक घेता येते, असे त्यांनी सांगितले. पोटगी संबधातील माहिती देताना ते म्हणाले, फौजदारी प्रकिया संहिता १२५ नुसार पत्नी, मुले किंवा आई वडील यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १४४ प्रमाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे संबधीत अर्जदार अर्ज करु शकतात. मध्यस्थीकामी प्रकरण ठेवल्यास पक्षकार यांचा वेळ व पैशांची बचत होते व आपसांतील वाद मिटविता येतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. न्या. एस. एस. छल्लाणी यांनी वारस कायदा अधिनियम अंतर्गत मुलीला देखील आई-वडीलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मागण्याचा अधिकार आहे. यावेळी त्यांनी दत्तक कायदा व पोटणी संबधातील कायदेविषयक तरतुदींवर प्रकाश टाकला. महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेंतर्गत गावांतर्गत तंटे सोडविण्याचे कार्य केले जाते. तसेच न्यायालयात देखील मध्यस्थी केंद्रामध्ये पक्षकारांमध्ये मध्यस्थी वकीलांमार्फत चर्चा घडवून आणली जाते, यासह बालविवाह कायद्याची माहितीही त्यांनी उपस्थिताना दिली.
कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय येथे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. हे प्रदर्शन महाराष्ट्र शासन व पंचायत समिती शिक्षण विभाग कन्नड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित या प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातील ६५ शाळांनी सहभाग घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांच्या हस्ते झाले. गटशिक्षणाधिकारी सबाहत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, प्रयोगशीलता आणि चिकित्सक वृत्तीमुळे जीवनात मोठे बदल घडू शकतात. त्यामुळे अशा प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी नेहमी सहभाग घ्यावा. प्रदर्शनासाठी अन्न, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग, संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन, संसाधन व व्यवस्थापन हे विषय देण्यात आले. प्राथमिक, माध्यमिक, दिव्यांग, शिक्षक व प्रयोगशाळा परिचर असे गट तयार करण्यात आले होते. पंचायत समितीचे विशेषतज्ञ संदीप कुलकर्णी, प्रशांत अहिरराव, आसिफ शेख उपस्थित होते. बक्षीस वितरणप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सबाहत, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव ताठे, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, पर्यवेक्षक गणेश डव्हारे, विज्ञान शिक्षक संतोष परदेशी उपस्थित होते. परीक्षक म्हणून सुनील पाटील, गणेश मैंद, सुधाकर निळ यांनी काम पाहिले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक गटात आरजू रफिक खान (एएनआय स्मार्ट स्कूल, कन्नड) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तनिष्का विनायक राठोड (साईराज इंग्लिश स्कूल, जेऊर) दुसऱ्या क्रमांकावर, अनुज गवळी (जि. प. प्रा. शाळा, विटखेडा) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. माध्यमिक गटात पियुष काळे (समता कन्या विद्यालय, पिशोर) प्रथम, मेहरीन युनूस कुरेशी (संजय गांधी उर्दू हायस्कूल, कन्नड) दुसऱ्या, जुबेरिया पठाण (सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, कन्नड) तिसऱ्या क्रमांकावर राहिली. शिक्षक गटात यांचे यश ः प्राथमिक शिक्षक गटात अतुल विजय अंभोरे (जिल्हा परिषद प्रशाला, हतनुर) प्रथम आले. माध्यमिक शिक्षक गटात गणेश ठकसेन मैद (विद्यानिकेतन विद्यालय, जोड बोरसर) आणि स्मिता पवार (अंजनासागर विद्यालय, रामनगर पिशोर) यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला. प्रयोगशाळा परिचर गटात संजय अण्णाराव जाधव यांना गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी सबाहत व बाजीराव ताठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रदीप सनंसे यांनी सूत्रसंचालन केले.
नाताळची सुटी असल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये गुरुवारी (दि. २५) पर्यटकांची संख्या वाढली होती. दिवसभरात ५ हजार १०० पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटक संख्येत वाढ झाल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. पर्यटकांच्या वाहनांना वाहनतळ अपुरे पडत होते. पण, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या कमी दिसून आले. गतवर्षी ८,५०० पर्यटकांनी भेट दिली होती. सलग सुट्या असल्याने पर्यटक अजिंठा लेणीला पसंती देत आहेत. गुरुवारी नाताळाची सुटी असल्यामुळे अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांची गर्दी झाली होती. सकाळपासून पर्यटक येण्यास सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत वाहनतळ भरलेले होते. वाहनांना जागा नसल्याने अजिंठा व्हिजिट सेंटरला वाहने उभी करण्यात आली होती. पर्यटकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. गुरुवारी ५ हजार १०० जणांनी लेणीला भेट दिली. इतर दिवशी रोज २ ते ३ हजार पर्यटक भेट देत असतात. गुरुवारी पर्यटक संख्या वाढली असताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे मनुष्यबळ कमी असल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. वाहनांना रांगा लावण्यासाठीही कर्मचारी कमी पडत होते. येथे पर्यटकांना पुरेशा सुविधा मिळत नाही व बसेसही कमी प्रमाणात असतात. यामुळे पर्यटकांचा वेळ वाया जात असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पर्यटक व्यावसायिक सांगत आहेत. लेणीला येण्यासाठी रस्ते चांगले नाहीत ^महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. लेणीत जाण्यासाठी बसेस अपुऱ्या पडतात. बससाठी पर्यटकांना तासन््तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे पर्यटक त्रस्त होऊन अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत आहे. -पपिंद्र पालसिंग वायटी, अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक संघटना
अजिंठा घाटात ट्रकचे ब्रेक निकामी, तीन तास कोंडी:काही पर्यटकांनी पायी गाठला लेणी टी पॉइंट
अजिंठा घाटात लोखंडी आसारी घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास निकामी झाले. ट्रक घाट उतरत असताना मध्येच बंद पडला. त्यामुळे घाटात तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जालना येथून जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच २१. बीएच ५११६) अजिंठा घाटात आला. घाट उतरताना ब्रेक निकामी झाले. चालकाने गिअरच्या साहाय्याने ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रक मधेच बंद पडला. ट्रकमध्ये लोखंडी आसारी भरलेली होती. त्यामुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहनांना अडथळा निर्माण झाला. गुरवारी नाताळ असल्याने सकाळपासून अजिंठा लेणीकडे पर्यटकांची गर्दी होती. त्यांची वाहनेही कोंडीत अडकली. काही पर्यटकांनी वाट पाहणे टाळून पायी चालत लेणी टी पॉइंट गाठला. ट्रकचालकाने मेकॅनिक बोलावून ट्रक दुरुस्त केला. तोपर्यंत घाटात वाहनांची कोंडी कायम होती. तीन तासांनी वाहतूक सुरळीत झाली. या प्रकारामुळे वाहनचालक आणि पर्यटकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे या घाटात नेहमीच अपघात घडतात. त्यामुळे कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.
पथक मागे लागले, नियंत्रण सुटून डंपरची पोलला धडक:चालकाचे नियंत्रण सुटल्याने दे. रंगारीत घटना
मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने शिक्षक कॉलनीत थरार उडवला. वैजापूर येथील प्रशासकीय वाहन पथक पाठलाग करत होते. डंपरचालकाने वेग वाढवला. नियंत्रण सुटल्याने डंपर थेट महावितरणच्या विद्युत खांबावर आदळला. धडकेमुळे खांब तुटून पडला. त्यावरील वीजवाहक तारा थेट घरांच्या आवारात कोसळल्या. सुदैवानी जीवितहानी टळली. ही घटना रात्री दीड-दोनच्या सुमारास घडली. दिवसा ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. अवैध वाळू वाहतुकीमुळे परिसरात वारंवार जीवघेणे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. प्रशासकीय पथक पाठलाग करत असतानाही डंपरचालक निर्धास्तपणे वाहन चालवत होता. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या अभियंता हेमानी जोशी यांनी सांगितले की, डंपरचालकाने नुकसान भरून दिले. त्यामुळे गुन्हा नोंदवलेला नाही.
तालुक्यातील दीड शतकापूर्वी पूर्णतः बेचिराख झालेले साजेगाव आजही शासकीय व महसूल दप्तरी स्वतंत्र गाव म्हणून नोंदलेले आहे. गाव अस्तित्वात नसले तरी या गावातून विस्थापित झालेल्या शेळके कुटुंबीयांनी आपली परंपरा, मान-पान आणि धार्मिक विधी आजही साजेगावलाच अर्पण करून इतिहास जपल्याचे दिसून येते. एकेकाळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून काही फर्लांग अंतरावर, गल्हाटी नदीच्या काठी वसलेले साजेगाव हे शेळके (पाटील) कुटुंबीयांचे वतनदार गाव होते. मात्र, नदीला वारंवार येणाऱ्या पुराच्या धास्तीने सुमारे दीड शतकापूर्वी संपूर्ण गाव पाचोड येथे स्थलांतरित झाले. या गावात आज कुणी राहत नसले तरीही येथील लोक धार्मिक परंपरा याच गावात जाऊन करतात. आजही गावातील काही अवशेष साक्ष देतात. जुन्या मातीच्या भिंती, घरांच्या पाऊलखुणा, उखळ, वरवंटे, पुरातन विटा, मातीचे ढिगारे आजही त्या काळाची साक्ष देतात. गावाच्या पूर्वेला छोट्या चबुतऱ्यावर पत्र्यांच्या शेडखाली हनुमान मंदिर असून उत्तरेस लक्ष्मीदेवीचे छोटे देऊळ आजही उभे आहे. लग्नानंतर वधू- वरसुद्धा पहिले दर्शन साजेगावलाच घेतात, अशी माहिती आनंद शेळके यांनी दिली. महसूल दप्तरी तब्बल ६८ खातेदारांची नोंद साजेगावचे एकूण भौगोलिक क्षेत्र १५३ हे. असून १५० हेक्टर लागवडीखाली आहे. येथे एकही कुटुंब वास्तव्यास नसले तरी महसूल दप्तरी ६८ खातेदारांची नोंद आहे. सुरुवातीला सर्व जमिनी शेळके कुटुंबीयांच्या मालकीच्या होत्या. कालांतराने सीलिंग कायद्यानुसार जमिनी इतर समाजघटकांकडे गेल्या आणि भुमरे, डोईफोडे, लोढे, हिवाळे, पवार, चव्हाण, वडार, भिल्ल, शेख-पठाण आदींची नावे महसूल दप्तरी नोंदली गेली.
करंजखेड येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त थेट शेतकऱ्याच्या बांधावर भेट दिली. विद्यार्थ्यांनी शेतीविषयी प्रत्यक्ष माहिती घेतली. मुख्याध्यापक ऋषिकेश चव्हाण यांनी पॉलिहाऊस शेतीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. वेगवेगळ्या पिकांची काळजी कशी घ्यावी, कोणती पिके पॉलिहाऊसमध्ये घेतली जातात, मशागत कशी केली जाते, कोणत्या पिकांवर कोणते रोग पडतात याचे मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक युवराज शेलार यांनी मातीचे प्रकार, त्यात घेतली जाणारी पिके, पाण्याचे स्रोत, ठिबक व तुषार सिंचन पद्धती यांची माहिती दिली. शेतकरी लक्ष्मण पवार व रामराव खैरे यांनीही विद्यार्थ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. या वेळी सहशिक्षक स्वप्निल ताजने, शिक्षिका शीतल शेलार व पायल वाघ, तसेच गाडीचे चालक व मालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षणातून पारंपरिक व शेतीची सविस्तर माहिती घेतली.
सोयगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थींना त्वरित निधी द्या:माजी जि. प. सदस्या पुष्पा काळे यांची मागणी
तालुक्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/विमुक्त जाती-भटक्या जमाती घरकुल योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्तावांना तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी राज्यमंत्री अतुलजी सावे यांची जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात सोयगाव तालुक्यातील निंबायती, जरंडी व बहुलखेडा येथील नागरिकांचे घरकुल प्रस्ताव मंजूर झालेले असतानाही अद्याप निधी वितरित झालेला नसल्याने लाभार्थींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले. निधीअभावी अनेक घरकुलांची कामे रखडलेली असून लाभार्थींना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे या वेळी मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच संबंधित योजनेंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थींना त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी केली. निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थींना वेळेत घरकुल पूर्ण करता येऊन त्यांना सुरक्षित निवारा मिळेल,या वेळी अतुल सावे यांनी संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तब्बल १० दिवसांच्या खंडानंतर पाणी येते, तेही दूषित. अनेक ठिकाणी ड्रेनेज फुटल्यामुळे त्याचेच पाणी वाहिनीत शिरते. त्याचबरोबर अतिक्रमणे वाढल्यामुळे छोट्या गल्ल्या झाल्या आहेत. सिमेंट रस्ते झालेले नाहीत. या गल्ल्यांमध्ये चारचाकी वाहने शिरू शकत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर पथदिवे नाहीत. नेहमी अंधार असतो. नागरिकांना चोरीची भीती असते. याबाबत मनपाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र प्रतिसाद देत नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अंतर्गत रस्त्याबरोबर मुख्य रस्त्याचा प्रश्नही बिकट आहे. सिटी चौक ते गांधीपुतळा हा रस्ता याच प्रभागात आहे. या रस्त्यालगत दुकानदारांची अतिक्रमणे, दुकानांसमोरील हातगाड्या, दुचाकी वाहनांचे पार्किंग यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होते. सायंकाळी वाहतुकीचा प्रश्न आणखीच गंभीर होतो. क्र. ६ लोटाकारंजा, शहाबाजार, चेलीपुरा, नेहरूनगर २०१५ : पक्ष, नगरसेवक, मतदानवॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान२२ तसनीम बेगम--एमआयएम १७२६२३ सायरा खान-एमआयएम १४३७२४ स.सरवत बेगम-एमआयाएम २८५४२६ शेख नर्गीस --एमआयएम २६६३प्रभाग आरक्षण : अ-ओबीसी, ब- सर्वसाधारण महिलाक- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण जाणून घ्या आपला प्रभाग गेल्या १० वर्षांमध्ये लोटाकारंजा, शहाबाजार, काचीवाडा, एसटी कॉलनी, औरंगाबाद टाइम्स कॉलनीमध्ये ड्रेनेजलाइन, रस्ते आणि इतर विकासकामांवर ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती माजी नगरसेवकांनी दिली. प्रभागाची व्याप्ती : मुर्गी नाला, मोहन टॉकीज, विभागीय आयुक्त कार्यालय, लोटाकारंजा, शहाबाजार, काचीवाडा, एसटी कॉलनी, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, नेहरूनगर, हर्षनगर, विश्वासनगर, सराफा भाग, मुर्गी नाला, मोहन टॉकीज, फाजलपुरा, जिल्हाधिकारी कार्यालय, रोहिल्लागल्ली, देवडीबाजार 1. कचरा संकलन : घंडागाडीची वेळ ठरलेली नसल्याने नागरिक त्रस्तया प्रभागामधील काही भागांमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे. घंटागाडी वेळेचे नियम पाळत नाही. त्यामुळे अनेक कचरा दीर्घकाळ घरातच ठेवावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 2. रस्ते : काँक्रिटीकरण केले नाही, पावसाळ्यात रस्ते चिखलमयप्रभागामध्ये छोट्या गल्ल्या आहेत. तेथून चारचाकी वाहने जाऊ शकत नाहीत. रस्ते सिमेंटचे झालेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चिखल होतो आणि नागरिक घसरून पडतात. 3. पाणीपुरवठा : फुटलेल्या ड्रेनेजचे पाणी शिरते जलवाहिनीमध्ये या प्रभागामध्ये सुमारे १० दिवसांनी पाणी येते. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन फुटलेली व नळाला गळती आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत शिरते.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना स्वच्छतागृह असल्याचे शपथपत्र जोडणे बंधनकारक केल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. शहरात वास्तव्यास असूनही घरी स्वच्छतागृह नसलेला उमेदवार कोण असू शकतो, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ ४ दिवस उरले आहेत. मंगळवारपासून (२३ डिसेंबर) उमेदवारी अर्जांचे वाटप व भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने ९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत अर्ज विक्री व स्वीकृती सुरू आहे. पहिल्या २ दिवसांत तब्बल ३,१७० अर्जांची विक्री झाली आहे. गुरुवारी (२५ डिसेंबर) नाताळच्या सुटीमुळे अर्ज विक्री व भरण्याची प्रक्रिया बंद होती. अनेक इच्छुक एकापेक्षा अधिक अर्ज खरेदी करत असून चूक टाळण्यासाठी प्रथम डमी अर्ज व नंतर अंतिम अर्ज भरण्याची पद्धत अवलंबली जात आहे. यामध्ये माजी नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे. अर्जासोबत स्वच्छतागृह असल्याचे शपथपत्र जोडणे बंधनकारक झाल्याने काही इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. प्रत्येक रिकामी जागा भरणे बंधनकारक उमेदवारी अर्जातील प्रत्येक कॉलम भरलेला असणे आवश्यक आहे. अर्जात ‘होय’ किंवा ‘नाही’ असा स्पष्ट उल्लेख न झाल्यास उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्जाची तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ... तर सदस्यत्व रद्द होईल २०१६ मध्ये कायद्यात दुरुस्ती महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनुसार, उमेदवाराच्या स्वतःच्या मालकीच्या घरात शौचालय असणे आणि त्याचा तो नियमित वापर करत असणे किंवा उमेदवार घरात राहत असेल ते स्वतःचे शौचालय नसल्यास तो सार्वजनिक किंवा सामुदायिक शौचालयाचा नियमित वापर करत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या कायद्याची अंमलबजावणी जानेवारी २०१६ पासून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वच्छतागृहासंदर्भातील प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. स्वच्छतागृह वापराचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केलेली ही मनपाची पहिलीच निवडणूक आहे.
इच्छुकांना विनंती:उमेदवारी न मिळाल्यास समित्यांवर वर्णी लावणार, बंडखोरी करू नका
महापालिका निवडणुकीसाठी पुढील ३ दिवसांत सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उमेदवारीची घोषणा केली जाणार असल्याचे राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसोबत युतीमुळे अनेकांना उमेदवारी देणे शक्य होणार नाही. राज्यात १,९०० विविध शासकीय, निमशासकीय समित्या रिक्त असून, यातील ८५० समित्या भाजपच्या वाट्याला येतील. निष्ठावान कार्यकर्त्यांना अशा समित्यांवर संधी दिली जाईल, असे आश्वासन सावे यांनी गुरुवारी (२५ डिसेंबर) भाजप प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दिले. उमेदवारी मिळाली नसली तरी केंद्र अथवा राज्याच्या समितीवर घेतले जाऊ शकते, असे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीवरून मतभेद भाजपची नेतेमंडळी आपले पाल्य, बहीण, नातेवाईक, मर्जीतील कार्यकर्ते यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या यादीवरून मतभेद आहेत. परिणामी भाजपची यादी अंतिम होत नाही. नेतेमंडळी जाणीवपूर्वक विघ्न आणत असल्याची चर्चा पक्षात आहे. उमेदवारी सर्वांना नाही उमेदवारी मिळवण्यासाठी भांडू नका. उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षाचे काम थांबवू नका. बंडखोरी करू नका. एक तपापेक्षा जास्त काळ पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केले आहे, असे आमदार संजय केणेकर यांनी या वेळी सांगितले.

26 C