Ratnagiri News –आंजर्ले कड्यावरील गणपती मंदिरात धाडसी चोरी; दानपेटी फोडून 90 हजारांची रोकड लंपास
भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या दापोली तालुक्यातील प्रसिद्ध ‘आंजर्ले कड्यावरील गणपती’ मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची खळबळजनक घटना 14 एप्रिल रोजी घडली. मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केलेल्या चार चोरट्यांनी गाभाऱ्यातील स्टीलची दानपेटी पळवून नेली. मंदिराच्या आवाराबाहेर असलेल्या बुरुजाखाली ही पेटी फोडून त्यातील सुमारे 90 हजार रुपयांची रोकड आणि लॉकर घेऊन चोरटे पसार […]
खेड तालुक्यातील कुरवळ जावळी (दत्तवाडी) या छोट्याशा गावाने हिंदुस्थानी सैन्य दलात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या गावाचे सुपुत्र रुपेश मनोहर जाधव यांची हिंदुस्थानी सैन्य दलातील ‘लेफ्टनंट कर्नल’ (Lt Col) या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे. जोधपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. या सोहळ्यामुळे केवळ जाधव कुटुंबच नव्हे, […]
चिपळूण शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत झालेल्या दागिने चोरीच्या घटनेचा चिपळूण पोलिसांनी वेगाने छडा लावला आहे. अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करत आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चोरी केलेले सुमारे ११ तोळे, अंदाजे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी […]
ब्रायडन कार्स IPL 2026 मधून बाहेर; श्रीलंकेचा दिलशान मदुशंका सनरायझर्स हैदराबाद संघात सामील
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे IPL 2026 मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सनरायझर्स हैदराबादने श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याची संघात निवड केली आहे. सनरायझर्सने कार्सला 1 कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र स्पर्धेपूर्वीच झालेल्या दुखापतीमुळे तो पहिल्या पाच सामन्यांना मुकला होता. अखेर आज (14 एप्रिल 2026) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मदुशंकाच्या […]
भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र (पुणे), स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत एका विशेष दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या 24 मे रोजी साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडणार असून, याद्वारे 300 दिव्यांगांना प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचा आधुनिक […]
अमेरिका-इराणमध्ये शांततेसाठी चीनची एन्ट्री; शी जिनपिंग यांचा चार-कलमी प्रस्ताव
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर आखाती देशातील संकट अधिक गडद होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चीनने एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले असून एक शांतता चर्चा यशस्वी होण्यासाठी यात एन्ट्री केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रदेशात चिरस्थायी शांततेसाठी चार-कलमी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्याचे महत्त्व वाढले […]
कोकण रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाई; वर्षभरात २७ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड वसूल
कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधातील कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात ९ कोटी ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात अशा फुकट्या प्रवाशांकडून २७ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या विविध ट्रेनमधून अवैधरित्या आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःची येशूच्या रूपातील एआय-निर्मित पोस्ट डिलीट केली आहे. ट्रम्प यांनी रविवारी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्यावर ईशनिंदेबाबत तीव्र शब्दांत टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी ही पोस्ट डिलीट केली आहे. तसेच आपण स्वतःला डॉक्टर दाखवण्यासाठी ही पोस्ट केली होती. आपण स्वतःला येशूच्या रुपात दाखवले नाही, अशी सारवासराव करण्याचा प्रयत्नही […]
IPL 2026 मध्ये तोडफोड फटकेबाजी करणारा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यासाठी आगामी काळ ऐतिहासिक ठरणार आहे. आयपीएल मधील त्याच्या वादळी कामगिरीमुळे निवड समिती त्याला जून महिन्यात होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघात स्थान देण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत या दौऱ्यासाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी दिली जाणार असून, त्यात वैभवचे नाव आघाडीवर आहे. […]
Sindhudurg News –विजयदुर्गच्या समुद्रात मोठी कारवाई, देवगडमधील मासेमारी नौका जप्त
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बेकायदा एलइडी मासेमारी रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेअंतर्गत देवगडचे परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास समुद्रात गस्त घातली. रात्री एक वाजताच्या सुमारास किनाऱ्यापासून नऊ समुद्री मैल अंतरावर ‘अमीना’ नावाची नौका संशयास्पदरीत्या मासेमारी करताना आढळली. पथकाने जवळ जाऊन पाहणी केली असता, […]
निष्काळजीपणाचा बळी! नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्नात बाळ दगावले, आई थोडक्यात बचावली
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. आशा वर्कर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा निष्पाप बळी गेला. बळजबरीने नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रयत्नात नवजात बाळाचे शीर धडापासून वेगळे झाले. सुदैवाने आई थोडक्यात बचावली आहे. यानंतर प्रकरण दडपण्यासाठी स्टाफ नर्सने महिलेला एका खासगी रुग्णालयात पाठवले. महिलेची प्रकृती अधिकच बिघडत असल्याने खासगी रुग्णालयाने तिला बस्ती […]
PSL चा तिळपापड! IPL ला पसंती दिल्यामुळे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीवर केली कारवाई
झिम्बाब्वेचा स्टार वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीने पाकिस्तान सुपर लीगला (PSL) डावलून IPL ला पसंती दिल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. पीएसएलशी करारबद्ध असूनही तो मोडून आयपीएलमध्ये (IPL) सहभागी झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुजरबानीला सुरुवातीला इस्लामाबाद युनायटेडने बदली खेळाडू म्हणून संघात घेतले होते, मात्र कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानच्या जागी […]
उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वेवर 168 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार
उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे 168 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. मुंबई ते चेन्नई/हैदराबाद/संत्रागाची/वाराणसी/बंगळूरू आणि पुणे ते गाझीपूर शहर व संत्रागाची दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येतील. एलटीटी-वाराणसी गाडी क्रमांक 01125 6 मे 2026 रोजी शिक्षक विशेष गाडी म्हणून धावेल आणि गाडी क्रमांक 01126 वाराणसीहून सुटणारी 12 जून 2026 […]
बालेघरमध्ये आदिवासी हक्कांसाठी धरणे आंदोलन वाई– सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या बालेघर या आदिवासीबहुल गावातील नागरिकांच्या मूलभूत व घटनात्मक हक्कांसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, कायदेशीर सल्लागार अॅड. तृणाल टोणपे व अॅड. निकिता आनंद यांनी आवाज उठवला. त्या अनुषंगाने दिनांक १४ एप्रिल २०२६ [...]
साताऱ्यात दिव्यांग बांधवांनी प्रशासनाला धरले धारेवर सातारा – दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे अद्याप वाटप न झाल्याच्या निषेधार्थ आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी सातारा येथे आज दिव्यांग बांधवांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. [...]
ओटवणे करमळगाळूवाडी ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद!
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे गौरवोद्दगार ओटवणे प्रतिनिधी ओटवणे गावाला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. या गावाशी आपले वडील विकास भाईंसह आजोबा भाईसाहेब सावंतांपासून जवळचे नाते आहे. त्यामुळे या गावासह करमळगाळूवाडीच्या विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली. ओटवणे करमळगाळूवाडीतील [...]
UAE चा पाकिस्तानला अल्टिमेटम; शाहबाज शरीफ यांनी सौदी आणि चीनसमोर पसरले हात
संयुक्त अरब अमिरातीने (युएई) नुकतेच पाकिस्तानकडे आपल्या पैशांची मागणी केली आहे. पाकिस्तानला या महिन्यात सौदी अरेबियाला ३.५ अब्ज डॉलर्स परत करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने हे पैसे परत केले, तर काही दिवसांतच त्याचा परकीय चलन साठा कोसळेल. हे टाळण्यासाठी, पाकिस्तान सौदी अरेबिया आणि चीनकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीन […]
भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
कणगिणी-बेतूल येथील घटना : कुडचडेवर शोककळा कुडचडे : कुडचडे मतदारसंघात रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेमुळे शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेत वस्तवाडा, कुडचडे येथील अवघ्या 10 वर्षांचा श्लोक संजय नाईक व 17 वर्षांची सानिका नाईक या भाऊ-बहिणीचा कणगिणी, बेतूल येथे कुटुंबीयांच्या सोबत सहलीला गेले असता ओहळातील पाण्यात बुडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती हाती [...]
मळा तलावातील मृत माशांसाठी सांडपाणी प्रवाहच कारणीभूत
महापौर मोन्सेरात यांनी उद्या बोलावली बहुविभागीय अधिकाऱ्यांची बैठक पणजी : मळा तलावात शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याचे गांभीर्य ओळखून महापौर रोहित मोन्सेरात यांनी 15 एप्रिल रोजी बहुविभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. हे मृत मासे पडण्यामागे तळ्यात येणारा सांडपाण्याचा प्रवाहच कारणीभूत असल्याचा दावा महापौर मोन्सेरात यांनी केला आहे. मळा तलावातील मृत माशांबाबत चिंता वाढत असताना महापौर मोन्सेरात [...]
भीम गीतांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन,आनंद भालेराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय लातूर, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने कामगार कल्याण भवन, धाराशिव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम गीतांचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक सलोखा आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कामगार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आनंद भालेराव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब माळी तसेच राजू सय्यद हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार चळवळीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.यानंतर त्रिशरण गायन पार्टीच्या वतीने अर्जुन धावारे, दिलीप लांडगे, पांडू ओहाळ आणि मंगल कांबळे यांनी भीम गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सुमधुर आवाजातील गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. भीम गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत डॉ. आंबेडकरांविषयीचा आदर व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र महिला सहायिका मनिषा भंडगे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची नव्याने प्रेरणा निर्माण झाली असून सामाजिक एकात्मतेचा संदेशही देण्यात आला.
वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचा आहारामध्ये कसा उपयोग करायला हवा, जाणून घ्या
वजन कमी करणाऱ्यांसाठी ब्रोकोली हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ब्रोकोलीमध्ये नानाविध पोषक तत्व असल्याने, वजन कमी करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, १०० ग्रॅम ब्रोकोलीमध्ये ३४ किलोकॅलरी ऊर्जा, २.८२ ग्रॅम प्रथिने आणि २.६ ग्रॅम फायबर असते. हा कॅल्शियमचा एक चांगला […]
आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार: प्रवाशांच्या खिशाला कात्री
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी अर्थात लालपरीचा प्रवास मंगळवारी मध्यरात्रीपासून महागणार आहे. प्रवाशांना 10 टक्क्यांच्या हंगामी भाडेवाढीबरोबरच स्वच्छता अधिभाराच्या दोन रुपयांच्या अतिरिक्त रक्कमेचा भार सोसावा लागणार आहे. ऐन उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत झालेल्या या भाडेवाढीने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. उन्हाळी सुट्टीत एसटी तिकीट दरात 10 टक्क्यांची भाडेवाढ जाहीर करण्यात होती. ही हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून […]
छत्तीसगडमधील वीज प्रकल्पात स्फोट; 4 कामगारांचा मृत्यू, 15 जखमी
छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका वीज प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातात काही कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे. शक्ती जिल्ह्यातील सिंगीतराई गावामध्ये वेदांता लिमिटेड कंपनीचा वीज प्रकल्प आहे. या वीज प्रकल्पामध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाला. […]
शेन वॉर्नचा मृत्यू COVID-19 Vaccine मुळे? सक्तीने ‘तीन ते चार’लसींचे डोस…; मुलाचा खळबळजनक दावा
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाला चार वर्षे पूर्ण झाली असताना, त्याचा मुलगा जॅक्सन वॉर्न याने एका पॉडकास्टमध्ये वडिलांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला, तरी त्यासाठी जॅक्सनने कोरोना लसीला (COVID-19 Vaccine) जबाबदार धरले आहे. कामाच्या निमित्ताने वॉर्नला सक्तीने ‘तीन ते चार’ लसींचे डोस घ्यावे लागले होते आणि […]
माकडासाठी ठेवलेला लाडू चिमुकल्याने खाल्ला, निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू
तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. विषारी लाडू खाल्ल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. माकडांना मारण्यासाठी लाडूमध्ये विष मिसळले होते. मात्र, ४ वर्षांच्या मुलाने चुकून तो लाडू खाल्ला. या घटनेनंतर त्याचे कुटुंब दुःखात बुडाले आहे. ही घटना १३ एप्रिल रोजी गोविंदरावुपेट मंडळातील एनटीआर कॉलनीत घडली. मुलांच्या वडिलांचे नाव श्रावण आहे. त्यांना दोन […]
काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका
डॉ. केतन भाटीकर वि.भारतीय निवडणूक आयोग सामना दिल्लीत : फोंडा पोटनिवडणूक रद्द प्रकरण पणजी : मतदानास अवघे काही तास उरले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फोंडा पोटनिवडणूक अचानक रद्द करण्यात आल्याचा निर्णय दिल्याने याविरोधात काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी भारतीय निवडणूक आयोगाविऊद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने पोटनिवडणूक [...]
बाबासाहेबांचे अभ्यास हे तत्त्व अंगी रुजवावे - उत्रेश्वर पायघन
भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी प्रशालेतील मुलींनी व मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर भाषणांमधून व गाण्यांमधून प्रकाश टाकला .शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तरेश्वर पायघन आपल्या मनोगतात म्हणाले की , “ डॉक्टर बाबासाहेब यांनी 18 - 18 तास अभ्यास केला होता . प्रतिकूल परिस्थिती असतानाही समाजाच्या मुक्तीसाठी अभ्यासाच्या माध्यमातून रक्ताचा एक थेंबही न सांडू न देता सामाजिक क्रांती घडवून आणली होती . त्यामुळे आपण अभ्यास करून आपला व समाजाचा आर्थिक विकास करू शकतो . “ तसेच अध्यक्ष तात्या कांबळे म्हणाले की , “ बाबासाहेब म्हणजे जीवन जगण्याचा दिशादर्शक नकाशा आहे . त्यांनी अनेक संकटावर मात करून आपल्या समाजाच्या विकासासाठी सामाजिक क्रांती घडवून आणली होती . यासाठी त्यांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत ,समता ,जनता या वर्तमानपत्रातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले होते व समाजात वैचारिक प्रबोधन घडवून आणले होते . “ यावेळी काकासाहेब पवार यांनी सर्व मुलांना खाऊ वाटप केला. कार्यक्रमाला हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक काकासाहेब पवार , उत्तरेश्वर पायघन ,दयानंद पाटील, अविनाश जोशी, राजेंद्र गाडे ,श्रीमती प्रतिभा मुकटे ,नितीन पवार ,कैलास शिंदे ,हरीश साठे आनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले .यावेळी विद्यार्थ्यांचे वाचन या उपक्रमांतर्गत आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर हा जिल्हा परिषद धाराशिव यांनी प्रसिद्ध केलेला लेख दत्तात्रय गुंजाळ यांनी वाचून दाखवा व सर्वांनी तो एकाग्रतेने ऐकला . आणि सर्व विद्यार्थ्यांना वाचण्यास दिला.
अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील
धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील मौजे चोराखळी येथील महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र अखेर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मंगळवारी (दि. 14) सकाळी सील केले. संबंधित केंद्र बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे तसेच न्यायालयीन व प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ सिताराम माळी (रा. चोराखळी, ता. कळंब) यांनी या कला केंद्रास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र संबंधित विभागांकडून आलेल्या अहवालांच्या आधारे दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजीचा अर्ज तहसील कार्यालयाने नामंजूर केला होता. याबाबत अधिकृत पत्राद्वारे माळी यांना पूर्वीच कळविण्यात आले होते. दरम्यान, या निर्णयाविरोधात माळी यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे 2024 मध्ये रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दिनांक 24 मे 2024 रोजी न्यायालयाने काही अटींसह आदेश दिले होते. मात्र नंतर संबंधित अर्ज नामंजूर झाल्याने आणि अंतिम निर्णय येईपर्यंत केंद्र बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरीही आदेशांचे उल्लंघन करत कला केंद्र सुरूच ठेवण्यात आले. याशिवाय, या केंद्राशी संबंधित काही गुन्हे नोंद झाल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली होती. पोलीस अधीक्षकांनी केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्याची शिफारस केली होती. उपविभागीय दंडाधिकारी, कळंब यांनीही केंद्राची तपासणी करून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही केंद्र सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, या प्रकरणी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुढील आदेश दिल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी महसूल व पोलिस विभागाने संयुक्तपणे कारवाई करून संबंधित कला केंद्र सील केले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट इशारा देत, अनधिकृत व बेकायदेशीररित्या कोणतीही आस्थापना सुरू ठेवू नये. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रावर गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडत असल्यामुळे कलाकेंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, प्रशासनाकडून आता यावर धडक कारवाई करण्यात आली आहे.
घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने हल्ला
धाराशिव (प्रतिनिधी)- घरभाडे मागितल्याच्या रागातून एका भाडेकरूने घरमालकावर लोखंडी कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील बार्शी रोड परिसरात घडली. रविवारी (ता. 12) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात घरमालक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी सोमवारी (ता. 13) धाराशिव शहर पोलिस ठाण्यात भाडेकरूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश अनिल झोंबाडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भाडेकरूचे नाव आहे. याप्रकरणी जखमी घरमालकाचा मुलगा शैलेंद्र राजाभाऊ स्वामी (वय 37, रा. आदित्य पेट्रोल पंपासमोर, बार्शी रोड, धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यांचे वडील राजाभाऊ स्वामी यांचे बार्शी रोडवर आदित्य पेट्रोल पंपासमोर घर आहे. त्यांच्याच घरी आरोपी राजेश झोंबाडे हा भाडेकरू म्हणून राहतो. रविवारी (ता. 12) सायंकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ स्वामी यांनी भाडेकरू राजेश याला घरभाड्याची मागणी केली. याच कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या राजेश झोंबाडे याने राजाभाऊ यांना आधी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने जवळचा लोखंडी कोयता काढून राजाभाऊ यांच्यावर वार केले. या सशस्त्र हल्ल्यात राजाभाऊ स्वामी गंभीर जखमी झाले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी राजाभाऊ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मुलगा शैलेंद्र स्वामी यांनी सोमवारी (ता. 13) दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात आरोपी राजेश झोंबाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 109 (खुनाचा प्रयत्न), 352, 351(2) सह भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलिस करत आहेत.
14 तास अभ्यासातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री साई श्रद्धा सेवाभावी संस्थेच्या वतीने यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिवसभरात तब्बल 14 तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन केले. या उपक्रमात राज्यातील तब्बल 16 जिल्ह्यांमधील सुमारे 750 विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिक्षणातूनच खरी आदरांजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला सर्वोच्च स्थान देणारे व्यक्तिमत्व होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि जगभरातील विद्यापीठांतून उच्च पदव्या संपादन केल्या. त्यांचा विचार शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांभोवती केंद्रित होता. त्यांच्या या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी 14 तास सातत्याने अभ्यास करूनच खरी आदरांजली अर्पण केली पाहिजे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 16 जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद या उपक्रमात धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद, अमरावती, नंदुरबार, धुळे, ठाणे, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांसह एकूण 16 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे नीट, सीईटी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून या उपक्रमाला यशस्वी केले. 14 तास अभ्यास शिस्त आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा आजच्या डिजिटल युगात लक्ष विचलित करणारे अनेक घटक वाढले आहेत. अशा परिस्थितीत 14 तास अभ्यास करणे म्हणजे शिस्त, एकाग्रता आणि आत्मनियंत्रणाची खरी परीक्षा ठरते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सातत्य, मेहनत आणि लक्ष केंद्रीत ठेवण्याची सवय निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. उपक्रमाचे दुसरे वर्ष; प्रतिसादात वाढ हे उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी: सुमारे 600 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता. यावर्षी: सुमारे 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याला असून या वाढत्या प्रतिसादामुळे शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याची सामूहिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम हा उपक्रम केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित नसून, समाजात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा देखील उद्देश आहे. विशेषतः गरीब, वंचित, मागासवर्गीय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातूनच प्रगती साधता येते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे दिला जात आहे. आयोजकांची प्रतिक्रिया उपक्रमाबद्दल बोलताना प्रा. सोमनाथ लांडगे (संचालक, श्री साई श्रद्धा एज्युकेशन) म्हणाले “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे ‘अजन्म विद्यार्थी’ होते. त्यांनी प्रचंड परिश्रम करून शिक्षण घेतले आणि अनेक पदव्या प्राप्त केल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातील हा गुण आत्मसात करावा. सातत्यपूर्ण अभ्यासातूनच यश मिळते. याच भावनेतून 16 जिल्ह्यांतील सुमारे 750 विद्यार्थी 14 तास अभ्यास करून त्यांना अभिवादन करत आहेत.” सहभागी विद्यार्थिनीची प्रतिक्रिया कु. स्नेहल खेलबा सुडके (नीट परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी) म्हणाली “मी नीट ऑनलाईन टेस्ट सिरीज च्या माध्यमातून नीट परीक्षेची तयारी घरीराहूनच करत आहे. सरांनी या उपक्रमाची माहिती दिल्यानंतर मी सहभागी झाले. आज मी 14 तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे. यामुळे माझी एकाग्रता वाढेल आणि मला यश मिळवण्यास मदत होईल.” समाजातून कौतुकाची दाद : या अभिनव उपक्रमाचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असून, शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न मानला जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सोमनाथ लांडगे, उषाताई लांडगे, नागेश गोटे, देविदास बिनवडे, ऋषिकेश लांडगे तसेच अनेक पालक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ कृतीत उतरलेला संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश या उपक्रमातून प्रत्यक्ष कृतीत उतरलेला दिसतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधत समाज परिवर्तनासाठी योगदान देण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
मराठवाडा चालक संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा चालक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी (14 एप्रिल) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष नेहा काकडे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, आरपीआय नेते राजाभाऊ ओव्हाळ, नगरसेवक अमित शिंदे, संघटनेचे अध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, अभिजीत काकडे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सुशांत सोनवणे,प्रवीण शिरसाटे, नगरसेवक अक्षय जोगदंड,हर्षद देशमुख,पृथ्वीराज सरवदे, ऍड.राजहंस शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, नगरसेवक खलिफा कुरेशी, नगरसेवक आयाज बबलू शेख, पंकज भोसले, शुभम सुकाळे,संदीप बनसोडे, राजाभाऊ बनसोडे, शामराव बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष सतीश बाबुराव ओव्हाळ, उपाध्यक्ष दत्तात्रय विठ्ठल वाघमारे, सचिव आकाश भारत खंडागळे, मार्गदर्शक उत्तम घरबुडवे, सुधाकर लष्करे, संयोजक सुशांत वसंतराव बनसोडे, किशोर गायकवाड, अनुप सोनवणे, किशोर सरवदे, लक्ष्मण वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
स्वच्छता हीच सेवा, सेवा हिच भक्ती उपक्रम राबविला
तेर (प्रतिनिधी)- स्वच्छता हीच सेवा,सेवा हिच भक्ती हा उपक्रम तेर येथील श्री संत गोरोबा काका व कालेश्वर यांच्या मंदिरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी 11 एप्रिलला मध्यरात्री राबविला. श्री संत गोरोबा काका मंदिर व कालेश्वर मंदिर पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात आले.यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, भास्कर माळी, विठ्ठल लामतुरे, अशोक अंबाड,खंडू शिरगिरे, सतिष थोडसरे, नवनाथ साळुंके,विवेकानंद नाईकवाडी,रवि सरवदे,प्रा.नयना वाघ, प्रिती कदम,विद्या माने, धनश्री ताड,उषा सजे,माधुरी गरड, मनिषा केंद्रे,अक्षता हाजगुडे,जयदेवी शिराळ, पौर्णिमा झाडे आदी उपस्थित होते.
हरीनामाच्या गजराने तेरनगरी दुमदुमली
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त हरीनामाच्या गजराने तेरनगरी दुमदुमली गेली आहे. एकादशीच्या पहाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील,तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मल्हार पाटील, श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे, दत्तात्रय मुळे, उषाताई मुळे व प्रशांत वाघ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.यावेळी हभप रघुनंदन महाराज पुजारी,निरीक्षक अतुल नळणीकर,पद्माकर फंड, धनंजय पुजारी,हभप विजय महाराज डक,डॉ गुरूप्रसाद चिवटे,नवनाथ नाईकवाडी,विठ्ठल लामतुरे, साहेबराव डक,नवनाथ पांचाळ, अजित कदम, किशोर काळे , राहुल गायकवाड,अशिष माळी, राजाभाऊ आंधळे,संजय इंगळे, व्यंकट माळी, पांडुरंग बगाडे,नामदेव कांबळे, कांचन इंगळे,राजकुमार थोडसरे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. ग्रामप्रदक्षणेमुळे परीसर दुमदुमून गेला श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणांहून आलेल्या दिंडयांची एकादशीमुळे ग्रामप्रदक्षणा झाली.यावेळी हरीनामाच्या गजराने तेरनगरी दुमदुमली गेली. पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त एकादशी निमित्ताने महापूजा असते त्यामुळे भाविक भक्त यांनी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. खजूर व पाण्याच्या बाटलीचे वाटप तेर येथील रचना कंनट्रक्शन कंपनी लि.यांच्या वतीने भाविकभक्त यांना खजूर व पाण्याचे बाटलीचे वाटप करण्यात आले.याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आ. पाटील यांच्या वतीने ताकाचे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त भाविकभक्त यांना आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने 5 हजार लिटर ताकाचे वाटप करण्यात आले.याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रणसम्राट ग्रूपच्या वतीने केळी वाटप श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त तेर येथील रणसम्राट ग्रूपच्या वतीने भाविकभक्त यांना केळी फळाचे वाटप करण्यात आले.याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
भरधाव वेगात असलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलर्सवरील चालकाचा ताबा सुटल्याने दापोलीकडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर रस्ता सोडून थेट खोल दरीत कोसळली. ही घटना चाचवळ गावाच्या हद्दीत सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या टेम्पो ट्रॅव्हलस मधून पर्यटनासाठी आलेले १२ प्रवासी सुदैवाने बचावले. मुंबई- बोरवली येथून दापोली येथे पर्यटनासाठी टेम्पो ट्रॅव्हलरमधून येणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरवरील वाहन […]
सूचनांचे पालन करूनच श्री लईराईचा जत्रोत्सव होणार
देवस्थान समितीतर्फे जय्यत तयारी अंतिम टप्प्यात : यंदाही सर्व भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार पणजी : राज्यातील प्रसिद्ध श्री लईराई देवीचा जत्रोत्सव 21 ते 25 एप्रिल दरम्यान होणार असून, हा जत्रोत्सव प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळूनच साजरा करण्यात येणार असून, या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देवीच्या धोंडगणांसह राज्यातील तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविकांना [...]
‘इस्लामाबाद टॉक्स’ निष्फळ ठरल्यानंतर इराणला नमवण्यासाठी अखेर अमेरिकेने इराणची नाकेबंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला. इराणच्या बंदरावरून येणारे किंवा तिथे जाणारे एकही जहाज सोडले जाणार नाही असे अमेरिकेने स्पष्ट केले. यामुळे आखातातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक देशांमधील स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. अमेरिकेचा मित्रदेश असलेला सौदी अरेबियाची चिंता आता अधिक वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड […]
टी-20 विश्वचषकातील कामगिरीचं फळ! संजू सॅमसनला ‘ICC Men’s Player of The Month’पुरस्कार जाहीर
T-20 World Cup 2026 मध्ये बाद फेरीच्या सामन्यांमध्ये आपल्या बॅटने विरोधी संघांच्या बत्त्या गुल करणाऱ्या संजू सॅमसनला मार्च महिन्यासाठी ICC Men’s Player of The Month पुरस्कार जाहीर झाला आहे. टीम इंडियाने मायदेशात खेळताना विश्वचषकावर नाव कोरले असून, या ऐतिहासिक विजयामध्ये संजू सॅमसनची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्याच्या तडाकेबंद फलंदाजीमुळे टीम इंडियाने बाद फेरीत वर्चस्व गाजवलं. […]
मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे नाटक सुरु आहे पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण तरुणांची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलीसांना कशी लागली नाही. मुंबईतील ही घटना दोन मृत्यूमुळे उघड झाली […]
भूषण प्रधानने उरकला गुपचूप साखरपुडा? सोशल मीडियावरील ‘त्या’फोटोमुळे चाहत्यांमध्ये खळबळ
मराठी सिनेसृष्टीचा ‘हँडसम हंक’ आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता भूषण प्रधान सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. आपल्या फिटनेस आणि दमदार अभिनयाने ओळखल्या जाणाऱ्या भूषणने नुकतीच सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्याच्या हजारो फिमेल फॅन्सचे हृदय तुटले आहे. भूषणने इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना एक सुखद […]
पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा; एकाच सिरिंजमुळे 331 चिमुकल्यांना एड्सची लागण
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील तौंसा शहरातून मानवी सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 331निष्पाप बालकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या सुयांचा पुन्हा वापर केल्यामुळे या चिमुकल्यांचे आयुष्य धोक्यात आले असून, या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तौंसा […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे विविध उपक्रमांनी समृद्ध असा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान होते. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी लाकाळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उज्वला गवळी, उपअधिष्ठाता डॉ. एस. ए. मुंडेवाडी, तसेच डॉ. सचिन देशमुख, डॉ. भास्कर साबळे आणि अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व फ्लेक्सचे अनावरण करून करण्यात आली. यानंतर प्रा. देवदत्त (एम.एस्सी. फिजिक्स, बी.एड.) यांनी प्रमुख व्याख्यान देत आंबेडकरांच्या विचारांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उपयुक्तता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच समाजसेवेची जाणीव जोपासावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन तसेच विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेले पथनाट्य विशेष ठरले. पथनाट्याद्वारे संविधानातील मूल्ये प्रभावीपणे मांडत सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. या सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अब्दुल लतीफा (सोशल वर्कर व मेंबर), डॉ नलावडे, डॉ महेश पाटील, रवी सुरवसे (प्राचार्य), शाम माळी, शुभदा तांबे, शेळकीकर तसेच मान्यवरांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सिद्धार्थ जानराव, अंकिज सवाई, विठ्ठल कांबळे, नवनाथ सरवदे, महादेव शिनगारे तसेच श्री गणेश चव्हाण आनंद, अमृत कुंभार,जयंती समिती सदस्यांनी आणि स्मार्ट कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.
मळगाव घाटीत २० पोती कचरा गोळा करीत स्वच्छता मोहीम
पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांचा पुढाकार ओटवणे प्रतिनिधी सावंतवाडी रेल्वे स्टेशन रोड वरून येताना माजगावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मळगाव घाटीत कचऱ्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनली आहे. याची माजगाव मतदार संघाचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी दखल घेत माजगावातील युवकांसोबत मंगळवारी सकाळी मळगाव घाटीत स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत हा परिसर स्वच्छ [...]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 135 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिजाऊ रमाई संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने 135 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शहर व परिसरातील नागरीक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ रमाई संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मंगळवार 14 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सांजा रोड राम नगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड सांजा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप घोणे, सांजा पंचायत समिती सदस्य राजदीप गायकवाड, नगरसेवक रवी वाघमारे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, संस्थेचे अध्यक्ष राज धज,नामदेव राठोड, गफूर शेख,संतोष धावारे, महेश लिमये, हनुमंत सूर्यवंशी,शंकर सूर्यवंशी, मालोजीराजे सूर्यवंशी,ओम सूर्यवंशी, प्रतीक साळवी, नामदेव राठोड, अनिल सूर्यवंशी, उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपा नेते व्यंकट गुंड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ रमाई संघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष राज धज यांनी केले.सूत्रसंचलन रणजीत राठोड यांनी तर आभार राकेश कचरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौतुक माने,कृष्णा भोसले,रणजीत राठोड,वैभव राठोड, अजय माने,परमेश्वर बळी,किरण राऊत, सागर अतकरे यांनी परिश्रम घेतले.
ज्ञानसाधना ही सर्व पैलुंची आधारस्तंभ असते-डॉ. अशोक नारनवरे
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलु होते. ज्ञानसाधना ही सर्व पैलूंचे आधारस्तंभ असते. असे प्रतिपादन मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय लातूरचे प्रा. डा. अशोक नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात फुले आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. अशोक नारनवरे यांचे “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानसाधना“ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले. पुढे बोलताना प्रा. डॉ. अशोक नारनवरे म्हणाले की, मुंबई येथील मलबार हिलवरील राजवाड्यात सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांची मुलाखत घेऊन अमेरिकेत शिक्षणाकरिता शिष्यवृत्तीसाठी निवड केली. शिक्षणातून समाजाची अवगत अवस्था सुधारणार आहे, असे उत्तर डॉ. आंबेडकर यांनी दिले. गुणवत्ता बघुन महाराजांनी अमेरिकेला शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. बुद्ध आणि त्यांचा धर्म हा त्यांचा अखेरचा ग्रंथ आहे. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. यावेळी रक्तदान शिबिरात 21 जणांनी सहभाग घेतला, त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. महेश्वर कळलावे यांनी 52 व्या वेळेस रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यालयातील कर्मचारी अशोक लोंढे, हेमंत साने,व विद्यार्थी वैभव भोरे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. 18 तास वाचन उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल विद्यार्थांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे यांनी आभार व्यक्त केले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
मुरुम (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरा यानी आपल्या आयुष्यभर शिक्षण, समानता आणि बंधुता या तत्त्वांचा प्रचार केला. या तत्त्वाचा प्रचार झाला पण आपण त्याचा स्विकार आणि पालन करतो काय? त्यांनी स्पष्टपणे सांगितले “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” आजच्या युगातही हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण शिकलो, संघटित झालो, पण कशासाठी? संघर्ष करतो आहे कशासाठी? या सर्व बाबीवर चिंतन आणि मनन करण्याची आज गरज आहे. 14 एप्रिल हा दिवस केवळ जयंती साजरी करण्याचा नसून, त्यांच्या या विचारांचा अंगीकार करण्याचा आहे. आजचे शिक्षक/प्राध्यापक हे समाजाचे शिल्पकार असतात. केवळ पुस्तकातील ज्ञान देणे हे त्यांचे कार्य नाही, ते ऑनलाईन मिळतेच. पण विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, नैतिकता, मूल्ये-संस्कार, याबरोबरच त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता युगातही डॉ. बाबासाहेब यांचे हे विचार शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमार्फत समाजात रुजवले तर नक्कीच आपण एक समतावादी आणि प्रगत भारत घडवू शकतो. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी. केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात महान विचारवंत, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अस्वले त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि सर्व स्टाफच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यानी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, पर्यवेक्षक प्रा. एस ए. महामुनी, प्रबंधक राजकुमार सोनवणे, डॉ. ए एस पदमपल्ले, प्रा. मुरली जाधव सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
मुरुम (प्रतिनिधी)- यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून दि. 8 ते 14 एप्रिल या सप्ताह कालावधीत संपूर्ण राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्ताने वाचन उपक्रम शनिवारी (ता.11) रोजी आयोजित करण्यात आला होता. या वाचन उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. अविनाश मुळे, डॉ. राजेंद्र गणापुरे, प्रकाश रोडगे आदींची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने ग्रंथालयात विविध ग्रंथांचे वाचन उपक्रमांतर्गत दिवसभर ग्रंथालय खुले ठेवून वाचन दिन उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला. डॉ. नागोराव बोईनवाड, दत्तू गडवे, नितीन कंटेकुरे, विजयालक्ष्मी भालेराव आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपाळ कुलकर्णी तर आभार डॉ. मुकुंद धुळेकर यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने यांना अभिवादन करण्यासाठी महामानव डॉआंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर प्रेमींनी 38 अंश सेल्सिअस तापमानात मोठी गर्दी केली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भीमगीते गायन, रक्तदान शिबिर, अन्नदान उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले. जयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य वाहतूक नियोजन न झाल्याने आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकर प्रेमींना याचा त्रास सहन करावा लागला. या प्रकाराबद्दल आंबेडकर प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नगराध्यक्ष विनोद गंगणे, गटनेते औदुंबर कदम, माजी नगरसेविका हेमा कदम, नगरसेविका प्रियंकाताई विजय गंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सागर कदम, गुलचंद व्यवहारे सह सर्वांना आजी-माजी नगरसेवक भाजपा अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे न प गटनेते अमोल कुतवळ, अमर मगर, ऋषी मगर, रंजीत इंगळे, आनंद जगताप, सुधीर कदम, खरेदी विक्री संघ चेअरमन अनिता वाघे, उत्तम अमृतराव, अक्षय परमेश्वर, किरण कदम, काँग्रेस मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष प्रमोद कांबळे, किरण यादव, श्याम पवार, नागनाथ भांजी, बाबासाहेब कदम, पिंटू पांडागाळे, राहुल खपले, गोरख पवार, सुनील शिंदे, छोटु पाटील, युसूफ शेख, श्रीकांत रसाळ, महादू कदम, अर्जुन भोजने, अजिंक्य दांडे, सुदर्शन वाघमारे, बालाजी तट, नरेश पेंदे, विराज जगदाळे असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष अमोल जाधव आपल्या पदाधिकाऱ्यांसह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्ताने प्राचार्य चंद्रकांत घोडके घोडके, डॉ. पेटकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विश्ववंदय, भारतरत्न, महामानव व भारतीय संविधानकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठया उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रथम प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व मान्यवरांच्या हस्ते डॉ .बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी यावेळी डॉ . बाबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यासोबतच त्यांचे प्रेरणादायी चरित्र कायमच भारतीयांच्या मनात ज्योत पेटवती ठेवेल, असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला. तर सलग आठ तास अभ्यास करून मुलांनी यावेळी अनोख्या पध्दतीने अभिवादन केले. प्रशालेच्या वतीने वक्तृत्व, निबंध व चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या चरित्राचा व कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, कुमार निकम, प्रवीण बागल, बालाजी गोरे व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ईटमध्ये नृत्याचा जल्लोष; तांडव, भारुड, भक्तीगीते आणि लावणीची रंगली मेजवानी
भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथे भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा दि. 11 व 12 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या भव्य स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 68 संघांनी सहभाग नोंदवून सांस्कृतिक वैभवाची झलक दाखवली. रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमास आमदार तथा माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, परंडाचे नगराध्यक्ष जाकिर सौदागर, जिल्हा परिषद माजी सभापती दत्ताना साळुंखे, भैरवनाथ साखर कारखान्याचे उप चेअरमन केशव सावंत, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख यांच्यासह आयोजक प्रवीण देशमुख, शंभूराजे देशमुख, बाळासाहेब हाडोंग्रीकर पाटील व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईट येथे अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने परिसरातील तरुण-तरुणींसह महिला वर्गाने मोठी गर्दी केली. तांडव नृत्य, भारुड, भक्तीगीते, गोंधळ, लावणी, कथक, भरतनाट्यम अशा विविध नृत्यप्रकारांनी रंगमंच अक्षरशः दणाणून गेला. घुंगरांची छनछन, तबला-ढोलकीचा ठेका, संबळाचे नाद आणि रंगीबेरंगी रोषणाईमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. रविवारी आयोजकांच्या विनंतीला मान देत आमदार तानाजीराव सावंत स्वतः उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी पुढील वर्षी स्पर्धकांसाठी स्वतःच्या निधीतून 5 लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली. स्पर्धेचे निकाल समूह गट (शनिवार) प्रथम नृत्य निकेतन अकॅडमी, द्वितीय साया अकॅडमी, तृतीय ऑसम अकॅडमी, वैयक्तिक गट (शनिवार) प्रथम विराट काळे, द्वितीय अदिती जाधव, तृतीय शौर्य गोडबोले, समूह नृत्य (अंतिम फेरी)- प्रथम स्कोडा 24, द्वितीय डी टू डी, तृतीय एंजल डान्स, एकल नृत्य (अंतिम फेरी)-प्रथम सानिका भागवत, द्वितीय अभी गाडगे, तृतीय गणेश पवार. कार्यक्रमादरम्यान ईट गावातील असून सध्या विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रोहित राठोड (मुंबई) व सिद्धी गाडेकर (शिर्डी) यांनी काम पाहिले, तर ऐश्वर्या हिबारे व हनुमान गवळी यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर देशमुख, बंटी देशमुख, आप्पा चव्हाण, पप्पू देशमुख तसेच पत्रकार बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. नुकत्याच झालेल्या आकस्पीत वादळामुळे भूम तालुक्यातील ईट येथील शेतकरी सुधीर भोसले यांच्या केळीच्या भागाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या कार्यक्रमात शेतकरी सुधीर भोसले यांना बोलवून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी वैयक्तिक रित्या एक लाख रुपयांची मदत केली. तर सामनगाव येथील मिराबाई काळे या महिलेचे घर जवळ तिचे मोठे नुकसान झाले होते. या महिलेची यावेळी पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून सावंत यांनी दिली. तसेच मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात मी सदैव सोबत असल्याचं यावेळी सांगून जनतेचे आभार व्यक्त केले. भूम परडा वाशी मतदारसंघात राज्यस्तरीय नृत्याचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्याबद्दल या कार्यक्रमात आमदार सावंत यांनी भूम बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख व त्यांच्या टीमचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.
हभप. कल्याणराव चव्हाण यांचे निधन
धाराशिव (प्रतिनिधी)- संत गोरोबाकाका पब्लिक मंदिर ट्रस्ट पंढरपूरचे उपाध्यक्ष,साने गुरुजी वाचनालय रुईभर चे अध्यक्ष, अध्यात्मिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक, रुईभर तालुका धाराशिव येथील रहिवासी, हभप. कल्याणराव गणपती चव्हाण यांचे दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सोमवारी पहाटे 5:00 वाजता वृद्धापकाळाने व दीर्घ आजाराने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. लहानपणापासून संत गोरोबा काकांच्या पालखीसोबत तेर ते पंढरपूर नियमितपणे ते पायी वारी करत होते. त्यांच्या पश्चात भाऊ,बहीन,दोन मुले, तीन मुली,नातू पणतू आहेत. केशव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खानापूर तालुका धाराशिव चे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण व सामाजिक वनीकरण विभाग धाराशिव येथील सेवानिवृत्त कर्मचारी गुरुनाथ चव्हाण यांचे ते वडील तर कॉम्रेड नाना चव्हाण यांचे ते भाऊ होत. अंत्यविधी दुपारी 4 वाजता चव्हाण मळा रुईभर येथे करण्यात आली. यावेळी अध्यात्मिक, शिक्षण, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
एकादशीच्या निमित्ताने महापूजा संपन्न
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त महापूजा करण्यात आली. महापूजा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील, रूपाली कोरे, दत्तात्रय मुळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; 622 उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास
धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 1015 प्रकल्पांपैकी तब्बल 622 प्रकल्प महिला उद्योजिकांचे असून, जिल्ह्यात ‘नारीशक्ती’ची प्रभावी ओळख निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून,सुशिक्षित बेरोजगार महिला व युवकांना उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देते.या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत असून,त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत,तर कुटुंबाच्या उत्पन्नातही महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी विविध उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.विशेषतः ब्युटी पार्लर,पिठाची गिरणी,मिरची कांडप,खाद्यप्रक्रिया उद्योग,मसाला उद्योग अशा व्यवसायांत महिलांची संख्या लक्षणीय आहे.या उद्योगांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होत असून,अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील महिला उद्योजिकांनी विविध क्षेत्रांत आपली छाप पाडली आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार, ब्युटी पार्लर क्षेत्रात सुमारे 53 महिला उद्योजिकांनी व्यवसाय सुरू केला आहे.पिठाची गिरणी या उद्योगात सुमारे 25 महिलांनी पुढाकार घेतला असून,मिरची कांडप उद्योगात 27 महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आहे.याशिवाय मसाला उद्योगात 29, खाद्यप्रक्रिया (फूड प्रोडक्ट्स) क्षेत्रात 81,तसेच बेकरी,कुक्कुटपालन, सलून,झेरॉक्स व ई-सेवा केंद्र अशा विविध क्षेत्रांतही महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.या उद्योगांमुळे महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून,स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. महिलांच्या या उद्योजकीय पुढाकारामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक सक्षमीकरण होत नाही,तर संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे.ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःचे उद्योग उभे करून सामाजिक बंधने मोडीत काढत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून बँकांशी समन्वय साधून महिलांना कर्जप्राप्ती सुलभ करण्यात आली आहे.अर्ज प्रक्रिया,मार्गदर्शन आणि पाठपुरावा यामुळे महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे.परिणामी, धाराशिव जिल्हा महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात राज्यात आदर्श ठरत आहे.एकूणच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात नवे दालन खुले झाले असून,महिला सक्षमीकरणातून विकास या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ मिळाले आहे.
सामाजिक समता सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान साजरा करण्यात येत आहे.या सप्ताहानिमित्त जिल्हाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे आणि विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने 13 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात सहायक आयुक्त समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी,तसेच विविध महामंडळातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.यामध्ये जितेंद्र डोंगरे,राहूल पेंढारकर,विवेक गायकवाड,श्रीकृष्ण मोटे,सिद्धार्थ ओव्हाळ,कृष्णा गायकवाड,संदीप पाटील,अक्षय गंगावणे,लक्ष्मण क्षिरसागर,भगवंत कपाळे,आदटराव लक्ष्मण,रतनराव भोसले आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमास सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने आदी उपस्थित होते. सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजात सामाजिक ऐक्य,बंधुता आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
विजयदुर्ग समुद्रात अवैध एलईडी मासेमारी करणारी नौका ताब्यात
जप्त केलेली नौका देवगडची ; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई मालवण | प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली असून, सोमवारी रात्री उशिरा विजयदुर्ग समोरच्या समुद्रात एलईडी पद्धतीने अवैध मासेमारी करणारी देवगड येथील एक नौका जप्त करण्यात आली. ही मोहीम जिल्ह्यातील छोट्या मच्छिमारांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.१४ एप्रिल २०२६ रोजी [...]
प्रसूतीसाठी दाखल महिलेचा बाळासह मृत्यू
सिव्हिल हॉस्पिटलच्या कारभारावर नातेवाईकांचा संताप : संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद बेळगाव : प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या हुनशीकट्टी, ता. कित्तूर येथील एका महिलेचा प्रसूतीनंतर नवजात शिशुसह मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे दोन जीव दगावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. इरम्मा नागाप्पा माटोळी (वय 21) राहणार हुनशीकट्टी असे त्या दुर्दैवी महिलेचे [...]
म्हापशातील अट्टल घरफोड्याला अटक
घरफोड्यांतील 24 लाखांचे दागिने जप्त : कॅम्प पोलिसांची कारवाई बेळगाव : सांगोल्डा-म्हापसा, गोवा येथील एका अट्टल घरफोड्याला अटक करून त्याच्याजवळून 24 लाख रुपये किमतीचे 160 ग्रॅम सोन्याचे दागिने कॅम्प पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. तंगराज सेल्वराज आचार्य (वय 40) राहणार सांगोल्डा-म्हापसा असे त्याचे नाव [...]
पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा
नारीशक्ती पुरस्कारप्राप्त शोभा गस्ती यांचे मनोगत : 3,600 महिलांना देवदासी दुष्टचक्रातून काढले बाहेर मनीषा सुभेदार, बेळगाव दुर्दैवाने आणि परिस्थितीच्या रेट्याने सक्तीने तिला देवदासी व्हावे लागले. त्यावेळी तिचे वय होते अवघे 13. मुलीला देवदासी केले तर आपल्या मुलांना जोगप्पा होण्यापासून प्रतिबंध करता येईल, असे आईला वाटले आणि त्यामुळे देवदासी होणे तिच्या नशिबी आले. मात्र, जिद्दीने यातून [...]
नोयडाच्या रस्त्यावर जे काल झाले तो या देशातील श्रमिकांचा आक्रोश होता –राहुल गांधी
नोयडा येथे पगारवाढीसाठी कामगार गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत होते. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्या फोडल्या. या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक भलीमोठी पोस्ट शेअर करत सत्ताधारी मोदी सरकावर टीका केली आहे. ”काल नोएडाच्या रस्त्यांवर जे काही घडले, तो या देशातील कामगारांचा आक्रोश होता. एक […]
Samrat Choudhary –सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री, शिवराजसिंह चौहान यांनी केली घोषणा
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कुणीची वर्णी लागणार याबाबतचा सस्पेन्स संपला आहे. भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. मंगळवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. कमिटीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतची घोषणा केली. बातमी अपडेट होत आहे… Samrat Choudhary […]
FII मुळे शेअर बाजार संकटात; अच्छे दिन कधी येणार?
अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध सुरू झाल्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारातून अंदाजे १.५ लाख कोटी ($१८ अब्ज) काढून घेतले आहेत. यामुळे बाजार त्याच्या उच्चांकावरून लक्षणीयरीत्या खाली घसरला आहे. त्यामुळे शएअर बाजार संकटात सापडला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि देशातील वाढलेला भांडवली नफा कर यामुळे परदेशी कंपन्यांना असे वाटते की […]
Hair Care –केसांना किती वेळ मालिश करणे गरजेचे असते, मालिश करताना मेथी दाण्याचा उपयोग कसा करावा?
आपले केस हे आपल्या सौंदर्याचा आरसा असतात. त्यामुळेच केसांना नियमित मालिश करणे देखील खूप गरजेचे असते. केसांना मालिश केल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. काळ्याभोर लांबसडक केसांसाठी आपल्या डोक्याला नियमितपणे मालिश करणे खूप गरजेचे आहे. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल हे मिश्रण […]
पीआयडी घोटाळ्याचा अंतिम अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर
मनपा आयुक्त संबंधितांवर कोणती कारवाई करणार? याबाबत उत्सुकता बेळगाव : महापालिकेतील पीआयडी घोटाळ्याच्या अंतिम चौकशीचा अहवाल महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी सोमवार दि. 13 रोजी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना सादर केला आहे. चौकशी अहवालात चौघांना दोषी ठरविण्यात आले असल्याने आता मनपा आयुक्त संबंधितांवर कोणती कारवाई करणार? याबाबत महापालिकेत उत्सुकता निर्माण झाली आहे. गोवावेस [...]
समादेवी गल्लीतील व्यावसायिकांकडून सहा सिलिंडर जप्त; मनपाची कारवाई
बेळगाव : व्यापार परवाना न घेणे, अतिक्रमण करून व्यवसाय करणे, कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करणाऱ्या चहा, फास्टफूड दुकानांवर महानगरपालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी समादेवी गल्लीत व्यवसाय करणाऱ्या सहा दुकानांवर कारवाई करून दोन घरगुती व चार व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त केले. अचानक करण्यात [...]
निलगिरी झाडांची कत्तल करणाऱ्या चौघांवर एफआयआर
वनखात्याची भुतरामहट्टी येथे कारवाई बेळगाव : जंगल भागात बेकायदेशीररित्या निलगिरी झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वन खात्याकडून भुतरामहट्टी येथे कारवाई करून चौघा जणांवर एफआयआर दाखल केला आहे. यल्लाप्पा चंद्राप्पा डुमनायक, बसवराज चंद्राप्पा डुमनायक दोघेही रा. राजकट्टी, अलीनाईक नाईक रा. बसापूर, मल्लेश मेकळ्ळी रा. बेनकोळ्ळी अशी त्यांची नावे असून काकती वनक्षेत्रपालांनी ही कारवाई केली आहे. बेकायदेशीररित्या काही जणांनी [...]
गोरेगाव येथील लाईव्ह कॉन्सर्टमधील मृत्यू प्रकरण, वनराई पोलिसांकडून सहा जणांना अटक
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) आणि एनडीपीएस कायद्याच्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलीस संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कचा शोध घेत आहेत. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या […]
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी फोर्ट रोडवर एकेरी वाहतूक
बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फोर्ट रोड परिसरातील महत्त्वाच्या दोन रस्त्यांवर वनवे ट्रॉफिक (एकेरी वाहतूक) करण्यात आली आहे. देशपांडे पेट्रोलपंप ते मुजावर खूट या मार्गावर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतूक सुरू राहील तर जिजामाता सर्कल ते देशपांडे पेट्रोलपंप या मार्गावर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. फोर्ट रोड परिसरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मंगळवार [...]
डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज शहर-तालुक्यात दारुविक्री बंदी
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी मंगळवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत बेळगाव शहर व तालुक्यात दारुविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारीही असणारे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक अबकारी कायदा 1965 च्या [...]
मुंबई-बेंगळूर स्लीपर वंदे भारत धावणार सोलापूर-कलबुर्गी मार्गे
मिरज-बेळगाव-हुबळीला पुन्हा ठेंगाच : लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तोकडे बेळगाव : केंद्र सरकारकडून मुंबईपासून बेंगळूरपर्यंत नवी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस सोलापूर, गुलबर्गा या मार्गे धावण्याबाबत निश्चित झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावसह उत्तर कर्नाटकाची संधी हुकल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींचा योग्य प्रमाणात पाठपुरावा नसल्यामुळेच ही वंदे भारत एक्स्प्रेस आता इतर [...]
डॉ. आंबेडकर अन् बेळगाव ऐतिहासिक ऋणानुबंध
महामानवांच्या समन्वयाची भूमी-बेळगाव : बाबासाहेबांच्या 1924 सालच्या बेळगाव दौऱ्यातील आठवणींचा घेतलेला आढावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. ‘उठा, शिका, संघर्ष करा’ हा मूलमंत्र त्यांनी दिला. डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट मोठा आहे. जगात भारतीय लोकशाहीचे कौतुक केले जाते, त्याची मूळ प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहूनही [...]
IPL 2026 –रवींद्र जडेजाला गोलंदाजी का दिली नाही? कर्णधार रियान परागने दिले धक्कादायक स्पष्टीकरण
इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामात सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना रंगला. हा सामना मराठमोळ्या प्रफुल हिंगे याने गाजवला. यासह राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयाचीही चर्चा रंगली आहे. संघात रवींद्र जडेजासारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू असतानाही रियान परागने त्याला एकही षटक टाकू दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. […]
सोलापुरात पिता-पुत्राला खुनाच्या प्रयत्नप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सोलापूर – मानसिक त्रास देऊ नकोस असे सांगितल्याचा राग मनात धरून तरूणावर कोयत्याने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्रास प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी पाच वर्षाची शिक्षा सुनावली. ओंकार तुकाराम खुळे (वय २१) आणि तुकाराम [...]
लोककल्पतर्फे ओतोळी ग्रामस्थांना चष्म्यांचे वाटप
बेळगाव : लोककल्पच्यावतीने ओतोळी (ता. खानापूर) येथील गरजू ग्रामस्थांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी गावात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरादरम्यान या लाभार्थ्यांची ओळख पटविण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींना आधार देणे व त्यांचे दैनंदिन जीवनमान सुधारणे हा होता. वितरित केलेल्या चष्म्यांमुळे लाभार्थ्यांना दैनंदिन जीवनात लाभदायक ठरणार आहे. याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले. [...]
जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा
कृषी खात्याची माहिती : शंकांना पूर्णविराम देत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा बेळगाव : राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये खत टंचाईबाबत निर्माण होणाऱ्या शंकांना पूर्णविराम देत कृषी विभागाने दिलासा दिला आहे. जिल्ह्यात चालू हंगामासाठी आवश्यक असलेले रासायनिक खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास [...]
नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता, जवळपास दोन दशकांनंतर, भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे देशात बिहारच्या राजकारणाची चर्चा सुरू होती. आता नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता भाजपकडून कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत चर्चा […]
>> विजय जोशी सत्ता आल्यानंतर आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही जणांना मंत्री केले मात्र काही मंत्र्यांच्या डोक्यात वारं गेलं आहे. आमदारांचे फोन उचलले जात नाही, काम करणं तर बाजुलाच उंटावरून शेळ्या हाकणार्या मंत्र्यांना आता घरची वाट दाखवा, हा पक्ष म्हणजे त्यांच्या बापाची जहागीर नाही, अशी खदखद कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली […]
मनपा आयुक्तांकडून महांतेशनगर परिसराची पाहणी
रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेऊन केल्या अधिकाऱ्यांना सूचना : कचरा गाडी नियमित येत नसल्याची तक्रार बेळगाव : महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. हे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह महांतेशनगर परिसरात विविध ठिकाणी भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक राजशेखर डोणी यांच्यासह परिसरातील रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना [...]
जायकवाडी धरणावरील डिजिटल भूकंपमापक यंत्र शासनाने केले रद्द!
>> बद्रिनाथ खंडागळे जायकवाडी धरणावर बसवण्यात येणारे डिजिटल भूकंपमापक यंत्र राज्य शासनाने रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील भूकंपांच्या नोंदी तत्क्षणी नोंदविणारे अद्ययावत भूकंपमापक यंत्र कोयना प्रकल्पावर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. चीड आणणारी बाब म्हणजे जुने भूकंपमापक यंत्र १० वर्षांपासून निकामी झाले असल्याने पैठणच्या जलसंपदा प्रशासनाने यासाठी उपलब्ध निधीतून ४६ […]
मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी
बेळगाव : एनसीईआरटीच्या इयत्ता 8 वीच्या इतिहास पाठ्यापुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा साम्राज्य हा भारतीय इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि प्रशासन कौशल्याचा महत्त्वाचा अध्याय आहे. अशा ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेला नकाशा पाठ्यापुस्तकातून वगळणे म्हणजे पिढ्यान्पिढ्या प्रेरणादायी ठरलेल्या इतिहासाला दुय्यम ठरवण्यासारखे आहे. त्यामुळे एनसीईआरटीने मराठा साम्राज्याचा नकाशाचा पुन्हा समावेश करावा, अशी [...]
ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांना मातृशोक
सातार्डा – सातार्डा – तरचावाडा येथील रहिवासी सौ .चंद्रावती चंद्रकांत पवार ( 79 ) यांचे मंगळवारी निधन झाले. बुधवारी सकाळी तरचावाडा येथील वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सैनिक चंद्रकांत पवार यांच्या त्या पत्नी होत तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या त्या मातोश्री होत.पश्चात पती,दोन मुलगे,चार मुली, जावई,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सिडको एन-१२ येथील कचरा ट्रान्सफर स्टेशनवर मशिनरी बसविण्याचे काम सुरू असताना ७ एप्रिल रोजी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ट्रान्सफर स्टेशनच्या कामात अडथळा आणला. तरी देखील प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल नगरसेवक राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी यांनी केला. या प्रश्नावर आयुक्तांनी उपायुक्तांना अहवाल सादर करण्याचे […]
तुर्कीत माजी विद्यार्थ्याकडून शाळेत अंधाधुंद गोळीबार, 10 विद्यार्थ्यांसह 16 जण जखमी
तुर्कस्तानच्या सानलिउर्फा प्रांतात माजी विद्यार्थ्याने शाळेत अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 10 विद्यार्थ्यांसह चार शिक्षक, एक कॅन्टीन कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. शाळेत गोळीबार केल्यानंतर माजी विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सानलिउर्फा प्रांतातील सिवेरेक येथील एका शाळेत ही घटना घडली. गोळीबार […]
कंग्राळी बुद्रुक यात्रेनिमित्त पूर्वतयारी बैठक घ्या
महालक्ष्मी यात्रा उत्सव संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पत्रकार परिषद घेण्याची मागणी बेळगाव : कंग्राळी बुद्रुकची ग्रामदेवता महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव तब्बल 43 वर्षांनंतर होत आहे. यामुळे यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा 28 एप्रिल 2026 ते 06 मे 2026 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या [...]
एका चार ओळीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने अख्ख्या पोलीस दलाला कामाला लावले. ‘वरिष्ठांनी मानसिक खच्चीकरण करून आत्महत्येस प्रवृत्त केले’ अशा आशयाचे स्टेटस ठेवून एक महिला पोलीस गायब झाली. स्टेटस वाचून पोलीस दलात एकच खळबळ उडाली. शोधाशोध केल्यानंतर ती महिला सापडली. वरिष्ठांनीच समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. हेड कॉन्स्टेबल असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याची अलिकडेच स्थानिक गुन्हे शाखेत […]
इंदूरमधील पिथमपूर औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोट; चार कामगारांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तरपुरा येथील रामकी एन्वायरो कंपनीमध्ये मंगळवारी एक भीषण स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, […]
Satara Crime |सातारा हादरले! किरकोळ वादातून आरफळमध्ये थरार; डोक्यात खोऱ्याने वार करून एकाची हत्या
आरफळ गाव खून प्रकरणाचा अवघ्या ४ तासांत उलगडा सातारा -सातारा तालुक्यातील आरफळ गावच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावत आरोपीला जेरबंद केले. या प्रकरणातील आरोपी ऋषिकांत कासकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी [...]
तळवणेत १८ एप्रिलपासून पुन:प्रतिष्ठापना शिखर कलशारोहण सोहळा
न्हावेली /वार्ताहर तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात शनिवार १८ एप्रिलपासून अर्चाशुध्दी,संप्रोक्षण व परिवार देवता पुन : प्रतिष्ठापना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार १८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता यजमानदेहशुध्दी,अंगभूत पंचगणाहोम,कुष्मांड होम,गणपती पूजन,पुण्याहवाचनादी,आचार्यवरण,शांतिसुक्त जप,स्थलप्राकारशुध्दी,पार्थिव गणपती पूजन,प्रतिष्ठागंभूत देवता आवाहन पूजन,देवताजलाधिवास दुपारी २ वाजता नैवेद्य,आरती,तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ७.३० वाजता श्री गुरुकृपा मित्रमंडळ तळवणे [...]
अनेक रहस्यांचा खजिना…जगन्नाथ पुरी मंदिर! विज्ञानालाही उलगडले नाही गूढ
पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर देशविदेशातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिर त्यातील खजिन्याच्या मोजणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. येथील रत्नांचा खजिन्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. मंदिराच्या खजिन्याची मोजणी सुरू झाली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती विविध टप्प्यांमध्ये केली जात आहे. या खजिन्याच्या मोजणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या मंदिराबाबतची अनेक रहस्ये पुन्हा […]
जानेवाडीला जाणारे दोन्ही रस्ते खड्डेमय
रस्त्यांवर मोठमोठे खड्डे : अनेक वर्षांपासून दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष वार्ताहर/किणये तालुक्याच्या पश्चिम भागातील जानेवाडी गावाला जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या गावची वाहतूक धोकादायक बनली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये [...]
यशराजच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूरच्या जागी अहान पांडेची एन्ट्री
‘सैयारा’ या चित्रपटानंतर अहान पांडे पुन्हा एकदा मोहित सुरीसोबत आपल्याला दिसणार आहे. अनित आणि अहान पांडे या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे अहान आता पुढच्या कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार याची त्याचे फॅन्स वाट पाहात होते. यशराज फिल्म सोबत रोमॅंटिक काॅमेडीमध्ये आता अहान दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सुरुवातीला रणबीर कपूरचे नाव चर्चेमध्ये होते. परंतु आदित्य चोप्रा मात्र […]
संगमेश्वर-देवरुख राज्यमार्गावर लोवले येथे दोन वाहनांची भीषण धडक, दोन जण गंभीर जखमी
देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. देवरुखकडून संगमेश्वरच्या दिशेने येणाऱ्या एलपी वाहनाच्या चालकाने वळणावर आपले वाहन थेट रस्त्याच्या मधोमध आणल्याने समोरून येणाऱ्या ट्रकशी त्याची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक थेट रस्त्याखालील दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक आणि व एलपी चालक दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. […]

30 C